प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे     
       
खतें— जो जिन्नस जमिनींत घातला असतां तींत पोषक द्रव्यांची वाढ होते, त्याला खत असें म्हणतात. खत व पाणी या दोहोंची पिकाचें उत्पन्न वाढण्यास जरूरी आहे. व हीं दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. ज्या ठिकाणीं पुष्कऴ व पुरेसा पाऊस पडतो त्याठिकाणीं फक्त खताचाच विचार केला पाहिजे; व ज्या ठिकाणीं नवीन जमीन काढिली असेल किंवा ज्या ठिकाणीं दरवर्षी गाळ येऊन बसत असेल तेथें फक्त पाण्याचाच विचार केला पाहिजे. पण अशा जोड क्वचितच आढळून येतो. खताचा विचार करण्यापूर्वी झाडांचें अन्न कोणतें व तें कोठून येतें याचा विचार करणें जरूरीचें आहे. सतराव्या शतकाच्या अखेरपावेतों पोषक द्रव्यें झाडांस वातावरणांतून अगर जमिनींतून मिळतात असा समज होता. व्हानहेल्माँट हे सतराव्या शतकाच्या सुरुवातीस झाडांचे सर्व घटक हे पाण्यातून मिळतात असें म्हणत होते. इ.स. १६६० या वर्षी सर केनेलडिग्बी यांनीं आपल्या पुस्तकांत असें प्रतिपादिलें आहे कीं, झाडांची वाढ ही सर्वस्वीं हवेंतील बाल्सम नामक पदार्थांवर अवलंबून असते; झाडांचा बरेवाईटपणा व मरण हीं त्या पदार्थांवर अवलंबून आहेत. पुढें इ.स. १७३० सालीं जेथ्रोटल् यांनी असा शोध लावला कीं झाडांचीं मुळें जमिनीचे कण खातात व जमिनीची जास्त मशागत करून जितके ते बारीक करावे तितकीं तीं झाडें जास्त जोरानें वाढतात, म्हणून टल्नी घोड्यांच्या सहाय्यानें कोळपणी यावर एक पुस्तक लिहिलें. त्यांत ते असें प्रतिपादूं लागले कीं जमिनीची मशागत चांगली केल्यास जमीन खतविण्याची किंवा पिकांत फेरपालट करण्याची मुळींच जरूरी नाहीं. त्यांची अशी समजूत होती कीं, जमिनींत खत घातलें म्हणजे तीं पिकत (कुजत) असतां त्याचा परिणाम जमिनीवर होऊन तिचे कण बारीक होतात. पुढें १७२० ते १८०९ पावेतों जास्त शोध लागत चालले. बोनेट व जेन सेनीबायर- स्वित्झर्लंडमधील शास्त्रज्ञ यांनीं असा शोध लावला कीं, झाडांच्या अंगीं हवेतील कॅर्बानिक अ‍ॅसिड् गॅस घेऊन- उन्हाचे वेळीं कॉर्बन् ठेऊन ऑक्सिजन वायु बाहेर सोडून देण्याची शक्ति आहे. इ.स. १८०४ सालीं डी. सासुरे शेतकीरसायनशास्त्रवेत्ते यांनी झाडांतील खनिज द्रव्यांचा शोध लाविला. फ्रान्स देशांतील शास्त्रज्ञांनी झाडांना खनिज द्रव्याची फारच जरूरी आहे व हीं जर नसतील तर झाडें वाढावयाचीं नाहींत असें सिद्ध केलें; व पोषक द्रव्यांचा बराच मोठा भाग हवा व पाणी यांतून मिळत असून खनिजद्रव्यें मात्र जमिनींतून मिळतीत असें ठरविलें.

इ.स. १८०२ ते १८१२ पावेतों सर हंफे डेव्ही रसायनशास्त्रज्ञ यांनी व्याख्यानद्वारा असें प्रतिपादिलें की, झाडांत सांपडणारे पदार्थ जमीन, वातावरण व पाणी यांतून मिळतात; व या तिन्ही तत्त्वांचा बारकाईनें विचार (शोध) केला म्हणजे झाडांचें अन्न कोठून मिळतें, ते कसें तयार होतें व ते झाडांस कसें जातें हें सर्व कळून येईल. ते म्हणतात कीं, प्राणिजन्य, व वनस्पतिजन्य पदार्थ जे जमिनींत सांपडतात ते व पाणी हेंच झाडांचें खरें अन्न होय. जमिनीचे कण पाणी राखून ठेवण्यास उपयोगी पडतात व तें पाणी  तेथून झाडांच्या मुळांस जसजसें लागेल तसतसें मिळत जाते. इ.स. १८३४ सालीं बॉसिग् व्हाल्ट या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञांनी आपल्या शेतीवर रासायनिक व शेतकीचे प्रयोग सुरू केलें; व शेतकी क्रिया व शास्त्र या दोहोंतील प्रयोग बरोबरीनें करण्यास सुरुवात झाली. पुढे सर जोसलेन लॉज यानें रादेमस्टेड् येथें प्रयोगक्षेत्र काढिलें व तें अद्यापि चालू आहे. इ.स. १८४० सालीं लीबीग यानें शेतकी रसायनशास्त्र या विषयावर ब्रिटिश संस्थेकडे एक रिपोर्ट पाठविला; त्यांत त्यांनें आपल्या बर्‍याच गोष्टींचा उहापोह केला आहे.

तो येणेंप्रमाणें:- खनिज द्रव्यांची झाडांच्या वाढीला अति अवश्यकता असून ऊन, पाऊस, वारा व हवा वगैरेंचा निद्रित (डॉर्मंट) असलेल्या पोषक द्रव्यांवर मोठा परिणाम होऊन तीं झाडांस मिळण्याजोगीं होतात. पोटॅश, फॉस्फेट्स व नायट्रोजन यांची झाडाच्या पोषणास फार आवश्यकता आहे या कल्पनांचें महत्व पहिल्यानें जर्मन लोकांनां समजून आलें; व त्यांनीं लिपझिगजल मोकर्न येथे १८५१ सालीं एका प्रयोगक्षेत्राची स्थापन केली व आतां तेथें असलीं क्षेत्रें १०० वर आहेत. सर्व जगभर प्रसिद्ध असलेलें रॉदेमस्टेड् प्रयोगक्षेत्र हें सन १८४३ साली स्थापन झालें. सर लो यानें आपल्या प्रयोगांस याच्यापूर्वीं १० वर्षें सुरुवात केलेली होती. इ. स. १८४३ सालीं त्यास गिल्बर्टचें साहाय्य मिळालें. इ. स. १८८९ सालीं सर जेलॉज यानें हें प्रयोगक्षेत्र ब्रिटिशसरकारच्या स्वाधीन केलें. इ. स. १८४७ पासून या प्रयोगक्षेत्रामार्फत सुमारें ८०-९० निबंध प्रसिद्ध झाले आहेत. याप्रमाणें पाश्चात्य देशांतील खतासंबंधीं शोधांची पूर्वपीठिका झाली. आपल्याकडे वेदकालापासून जरी खताचें महत्व अवगत आहे तरी अशा तर्‍हेचे शोध पूर्वीं केलेले आढळून येत नाहींत.

हल्लीं झाडांत अनेक मिश्र जातींचे पदार्थ कार्बन्, हायड्रोजन्, ऑक्सिजन व नायट्रोजन यांच्या मिश्रणानें झालेले आढळतात. हे वाळलेल्या झाडपाल्याच्या पदार्थांत सुमारें शेंकडा ९५ या प्रमाणांत आढळतात; व बाकी राहिलेलें शेकडा ५ हें प्रमाण खनिज द्रव्यांचें असून तें जमिनींतून मिळतें. हीं द्रव्यें झाडाच्या वाढीला अत्यावश्यक आहेत. हीं जर नसतील तर वातावरणांतील कार्बन्, पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजन व जमिनींतील अगर वातावरणांतील कार्बन्, पाण्यांतील हायड्रोडजन् व ऑक्सिजन् व जमिनींतील अगर वातावरणांतील नायट्रोजन् हे झाडांत जाऊं शकणार नाहींत. एकंदरींत असें दिसून येतें कीं, जगांतील वाढणा-या  वस्तूंतील सर्व पदार्थ वातावरण, पाणी व जमीन यांतून येतात.

वर निर्दिष्ट केलेल्या द्रव्यांपैकीं वातावरणांतील मिळणा-या  वस्तूंचा सांठा इतका प्रचंड आहे कीं, तो कितीही वर्षें पिकें घेतली तरी संपावयाचा नाहीं; परंतु जमिनींतून निघणा-या पदार्थंचा सांठा हा पुरेसा नसून तो सर्वस्वी शेत करणा-या मनुष्याच्या मेहनतीवर अवलंबून असतो; याकरितां शेतक-याला जमीन ही आवश्यक व फार महत्वाची आहे.

आपण जर एखाद्या चांगल्या एक एकर जमिनींत ८ इंच खोल थर खणला व त्यांतील मातीचें पृथक्करण केलें तर त्यात दर एकरी ४०० पौंड नायट्रोजन, ६००० पौंड फास्फेरिक् अ‍ॅसिड् व २०,००० पौंड पोटॅश सांपडतो, व खालील थरांत इतकींच आणखीं पोषक द्रव्यें सांपडतात. अशा परिस्थितीचा विचार केल्यास आपल्याला हजारों वर्षेपर्यंत बिन खतानें चांगलीं पिकें आली पाहिजेत असें वाटतें, परंतु तसें होत नाहीं. याचें कारण हीं वरील सर्व द्रव्यें द्राव्य स्थितींत नसतात; ती जमिनीची मशागत केल्यानें मातीच्या कणांवर हवा, उष्णता व पाणी यांचा परिणाम होऊन दरवर्षीं थोडथोडीं निद्रित द्रव्यें विद्राव्य (जागृत) होऊन पिकांस घेतां येतात. या द्रव्यांनां भर घालण्याकरितां जमिनीला दरवर्षी थोडथोडें खत दिलें पाहिजे. पिकें पोषक द्रव्यें कोणत्या प्रमाणांत घेतात याचा खुलासा खाली दिलेल्या आंकडयांवरून सहज होईल.

एकरीं उत्पन्न पौंड नायट्रोजन् फास्फेरिक अेंसिड पोटॅश
गहूं धान्य १८०० ३३ १६ ९.८
'' काड. ........ १५  ४.७ २५.९
वाल धान्य १८०० ७७ २२.८ २४.३
'' पाला  ........ २९ ६.३ ४२.८
बटाटे १३४४० ४७ २१.५ ७६.५


वरील आंकडयांवरून असें सिद्ध होतें कीं, निरनिराळया वर्गांतील पिकांनां निरनिराळया प्रकारचीं पोषक द्रव्यें कमी जास्त प्रमाणांत लागतात व ती जमिनींत असणा-या पोषक द्रव्यांच्या सांठयांच्या मानानें फारच थोडीं असतात. गव्हासारख्या तृण धान्यांनां नायट्रोजन् जास्त लागतो; वालासारख्या द्विदल धान्यांनां पोटॅश व नायट्रोजन् जास्त लागतो; परंतु या वर्गांतील पिकांनां हवेंतून नायट्रोजन घेतां येतो. बटाटयांच्या वर्गांतील पिकांस पोटॅश जास्त लागतो.

झाडांच्या राखेंत पोटॅश, चुना, मॅग्नीशिया, फॉस्फेट्स वगैरे अनेक पदार्थ सांपडतात; परंतु त्यांपैकीं मुख्य नऊ आहेत. झाडें हे पदार्थ दोन तर्‍हेनें घेतात. पाणी, नायट्रेट्स, पोटॅश्, फॉस्फेट्स, चुना, मॅग्नेशिया, व लोखंड हीं पानांतून घेतात. वरील अनेक पदार्थ जरी झाडांत सांपडतात तथापि जमिनींत पिकाच्या वाढीसाठीं मुख्यत्वेंकरून कमतरता नायट्रोजन्, फॉस्फरिक् अ‍ॅसिड् व पोटॅश या तिहींची भासते. याकरितां ज्या पदार्थांत हीं तीन पोषक द्रव्यें सापडतात. मग तीं सर्व पदार्थांत सांपडाते किंवा वेगवेगळालीं निरनिराळया पदार्थांत सांपडोत. या सर्व पदार्थांना खत ही संज्ञा द्यावी. याप्रमाणें जे पदार्थ जमिनीत घातले असतां जमिनींची सुपीकता वाढते त्यांनाहि खत म्हटलें तरी चालेल. खतें पाण्यांत विरणारीं किंवा कांहीं विवक्षित स्थितींत असलेलीं झाडांच्या उपयोगी पडतात. खतांपासून जमिनीचा पोत सुधारण्यास किंवा ओलावा राखून ठेवण्यास अथवा जमिनींत असलेलीं द्रव्यें झाडांच्या उपयोगीं पडतील अशा स्थितींत आणण्यासहि मदत होते. वर जी मुख्य तीन द्रव्यें सांगितली त्यांपैकी नायट्रोजन हें द्रव्य झाडांचा मुख्य जीव आहे. फॉस्फरस व गंधक हीं ओषट द्रव्य तयार होण्यास लागतात. पोटॅश हा पदार्थ पिष्टमय पदार्थ तयार होण्यास लागतो व झाडाचा हिरवा रंग हा जमिनींत भरपूर लोखंडाचा पुरवठा असल्याशिवाय यावयाचा नाही. एकंदरीनें पहातां पिकें चांगलीं जोरांत वाढण्यास व भरपूर पीक होण्यास खत हें पिकांचें मुख्य साधन आहे. शरीरास जसें अन्न तसें वनस्पतींच्या पोषणास खत होय. खतांतील द्रव्यें मात्र पिंकांस सुलभ रीतीनें मिळतील अशा स्थितींत असली पाहिजेत. जमिनीचा सुपीकपणा एकसारखी पिकें करीत गेल्यामुळें नाहींसा होतो व काही वर्षांनीं त्या जमिनींत फायदेशीर पिकें घेणें दुरापास्त होतें. या करितां जमिनीचा सुपीकपणा कायम राखण्यास जमिनींत खत घातलें पाहिजे. कोणी असें म्हणले कीं, खत घातल्याशिवाय व जमिनीची मशागत केल्याशिवाय रानावनांत मोठमोठीं झाडें कशीं होतात, त्याचीं कारणें वेगळीं आहेत. बहुधा डोंगराळ प्रदेशांत पाऊस पुष्कळ पडतो; त्यामुळें जमीन हलकी असली तरी झाडें वाढतात, बी येतें, फळें येतात व वाढ पुरी झाल्यावर ही झाडें जमिनीवर मरून पडतात, झाडपाला कुजतो व जास्त चांगल्या तर्‍हेचीं झाडें तयार होण्यास जमीन तयार होतें. या रीतीनें रानांतील जमिनीची सुपीकता नाहींशी होत नाहीं. परंतु ज्या जमिनींत शेती करून पिकें काढून घेतात त्या जमिनीची गोष्ट निराळी पडते. पिकें काढल्यानें कांहीं खनिज द्रव्यें व इतर पोषक द्रव्यांचा सांठा कमी होतो. या करितां प्रत्येक प्राण्याचा व वनस्पतीचा भाग जर जमिनींत मिसळून टाकिला तर जमीन सुपीक राहील. किंवा माणसांची व जनावरांची विष्टा, शेण व मूत हीं जर पुन्हां जमिनींत मिळवून टाकिलीं तरीसुध्दां जमिनीचा सुपीकपणा फारसा कमी होणार नाही. परंतु ज्या ठिकाणीं पीक उत्पन्न होतें त्याच ठिकाणीं धान्य व चारा जनावरांस चारून त्यांचे शेत व मूत त्याच जमिनींत टाकितात, असें उदाहरण क्वचितच आढळून येईल.

सर्व सुधारलेल्या देशांत प्राण्यांचें व वनस्पतींचें उत्पन्न फार लांबपर्यंत विक्रीला जातें. विष्टा तर बहुतेक नाल्यांत, ओढयांत, अगर नदीच्या पाण्यांत मिसळून सरते शेवटीं समुद्रांत जाऊन पडते. याकरितां विष्टा, शेण व मूत हीं सर्व काळजीनें राखून जमिनींत घातलीं तर जमिनीची सुपीकता कायम राहील. जे प्राणी पिकावर पोसले जातात त्यांच्याकडून आपण दूध दुभतें, लोंकर, कांतडीं, मांस वगैरे घेतों व त्याचा उपयोग विक्रीकडे, खाण्याकडे, वस्त्रप्रावरणाकडे वगैरे करतों. त्यापैकीं जमिनींत फारच थोडा भाग जातो. वनस्पतीच्या उत्पन्नाकडे पाहिलें तर, गहूं, जोंधळा, बाजरी भाजीपाला, फळफळावळ इत्यादि पदार्थ माणसें खातात; जनावरें ताटांवर पोसलीं जातात; यांपैकी जमिनीला परत जाणारें म्हणाल तर थोडेंसें शेण होय; व तेंहि ब-याच प्रमाणावर गोव-या लावून विकण्यांत, सर्पणाप्रमाणें उपयोग करण्यांत जमिनी सारविण्यांत व घरें व कणगी लिंपण्यांत खर्चिलें जातें. प्रेतें जाळण्यासहि गोवर्‍यांचा किती खर्च होतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मुताची काळजी कोणी घेतच नाहीं. याकरितां खताच्या अभावीं जमिनी निकस होत चालल्या आहेत.

ज्या खतांपासून झाडांस लागणारीं पोषक द्रव्यें मिळतात त्यांस पोषक खतें म्हणतात व काहीं पदार्थ जमिनींत घातले असतां त्यांपासून पोषक द्रव्यें न मिळतां त्यांचा परिणाम जमिनीचा पोत सुधारण्यांत, ओलावा राखण्यांत वगैरे होतो, त्यांना उद्धारक खतें म्हणतात.

ख तां चे प्र का र.- खतें मुख्यत्वेंकरून तीन प्रकारचीं असतातः प्राणिजन्य, वनस्पतीजन्य व कृत्रिम अगर रासायनिक. प्राणिजन्य खतांत शेणखत, मूत व इतर प्रवाही खतें, बक-या मेंढयांचे खत, सोनखत, पक्ष्यांची विष्टा, अस्थिजन्य खत, मासळी, कसाईखान्यांतील रक्त वगैरे मोडतात. वनस्पतिजन्य खतांत झाडांचीं पानें व फांद्या, ताग, उडीद, मूग, हुलगे, गवारी, खुरासनी वगैरेंचीं हिरवाळ खतें, पाचटाचें खत, निरनिराळया प्रकारची पेंड वगैरेंचा समावेश होतो. कृत्रिम खतांत नायट्रोजन, पोटॅश व फॉस्फेरिक अ‍ॅसिड असणारे क्षार मोडतात. यांशिवाय कांहीं कांहीं ठिकाणीं राख, चुना, मीठ, भाजलेली माती, तळयांतील गाळ वगैरे पदार्थांचा खतांकडे उपयोग करतात. ज्या मोठमोठया शहरांत ड्रेनेजची पद्धत चालू आहे, त्या शहरांतील सांडपाणी लांब नेऊन त्या पाण्यावर निरनिराळया प्रकारचीं पिकें करण्यांत येतात. अशी सांडपाण्यांची शेतें पुणें, अहमदाबाद, कराची, अमृतसर, अलाहाबाद वगैरे ठिकाणीं आहेत.

याखेरीज मुंबई इलाख्यांतील पुष्कळ पावसाच्या भागांत (कोकणपट्टींत) भात, नाचणी व वरी यांची रोपें टहाळ, गोंव-या  व गवत वगैरेंनी भाजून तयार करतात त्याला राब असें म्हणतात. शेणखत, लेंडयांचें खत व सोनखत ही मुख्य प्राणिज खतें होत. त्यापैंकी हिंदुस्थानांत शेणखताचाच जास्त प्रमाणानें उपयोग करतात व तें प्रत्येक शेतक-या ला सर्वांत सुलभ रीतीनें मिळण्याजोगें आहे. हें खत प्रत्येक खेडयांत दरएक शेतक-या चे घरीं गाई, म्हशी, बैल, रेडे व कांहीं कांहीं ठिकाणीं मेंढयाबक-या   ठेवितात तेथें उपलब्ध होतें. हें खत शेतीच्या जनावरांचें शेण, मूत, गळाठा व थोडीशी घरांतील राख या पदार्थांचें बनलेलें असतें. परंतु हें खत तयार करण्याच्या कामीं शेतकरी लोक फार निष्काळजी असतात. जनावरें गवत, सरकी, पेंड, चूण, कांहीं धान्यें व कडबा खातात; यामुळें धान्यांस अवश्य अशा पदार्थांचा त्यांच्या शेणमुतांत भरपूर अंश असतो. प्रत्येक पिकवाढीस नायट्रोजन, पोटॅश व फॉस्फरिक ऑसिड् यांची आवश्यकता असते व हीं पोषक द्रव्यें     सर्व शेणखतांत असतात. नायट्रोजन पैकीं १/3 शेणांत असतो व २/3 मूत्रांत असतो. सर्व पोटॅशपैकी १/५ हिस्सा शेणांत व ४/५ हिस्सा मुतांत व फॉस्फरिक अ‍ॅसिड् सर्व शेणांत असून मुतांत फारच थोडया प्रमाणांत सापडते. त्यापैकीं मुतांतील सर्व पोषक द्रव्यें पाण्यांत ताबडतोब विरघळणारीं असल्यामुळें तें शेणाबरोबर सांठविण्याची तजवीज केल्यास शेणखताची किंमत जास्त वाढेल.

शेणखतापासून नुसतीं पोषक द्रव्येंच मिळतात इतकेंच नसून त्यांत वनस्पतिजन्यहि बराच भाग असतो. त्याच्या योगानें जमिनीचा पोत सुधारतो. चिकण जमीन भुसभुशीत होते, व पोकळ जमिनीच्या अंगी ओलावा धारण करण्याची शक्ति येतें. असे अनेक गुण शेणखतांत असल्यामुळें तें सांठवून ठेवण्यांत हल्लींपेक्षां विशेष खबरदारी घेतली पाहिजे. शेतक-या ची सांपत्तिक स्थिति खताच्या सांठयावर अवलंबून असते. 'जर खताचा सांठा तर पैशाला काय तोटा?' अशी एक म्हण आहे, ती खत चांगलें काळजीनें साठवून ठेवल्यास सर्वस्वी लागू पडते.

बहुतेक शेतकरी मुताची मुळींच काळजी घेत नाहींत; तें बहुतेक सर्व वाया जातें. ते शेणहि व्यवस्थेशीर ठेवीत नाहींत. बहुतेक भागांत गोव-या अगर शेणी करून विकण्याची किंवा जाळण्याची पद्धत आहे. मोठमोठया शहरांशेजारील गांवांत तर गोव-या करून विकण्याचा स्वतंत्र धंदा झालेला आहे. ही पद्धत ज्या ठिकाणीं सर्पणाचा तोटा अगर अति महर्घता असते त्या ठिकाणीं जास्त प्रमाणावर आढळून येते. गोव-या जाळल्यावर जी राख राहते ती सुध्दां राखून जमिनींत घातल्यास जमीन भुसभुशीत होते व पोटॅशचा सांठा वाढतो. राखेचें खत लवकर विरघळतें व त्याचा पिकांस ताबडतोब उपयोग होतो.

हल्लीं शेणखत ठेवण्याची पद्धत पाहिली असतां तिच्यापासून पुष्कळ नुकसान होत आहे असें आढळून येते. ताज्या खताचा पिकावर तात्काळ व हवा तसा उपयोग होत नाहीं. शिवाय खत तयार होतांक्षणींच शेतास घालणें अनेक वेळां गैरसोयींचें असतें. यामुळें खत सांठवून ठेवणें फार अगत्याचें आहे. खत जितकें कुजवून पिकवावें तितकें चांगलें. परंत तें कुजत असतांना जीं पोषक द्रव्यें तयार होतात त्यापैकीं काहीं हवेत उडून जातात व कांहीं जमिनींत झिरपून जातात. याकरितां तें अशा रीतीनें साठविलें पाहिजे कीं त्यांतील अतिशय महत्वाचे पदार्थ नाहींसें न होतां ते पिकाच्या उपयोगी पडतील अशा स्थितींत ते राखले पाहिजेत. खेडयांत शेतकरी लोक घराच्या मागें अगर गांवाबाहेर एखादा लहान खड्डा करून त्यांत शेण, काडी, कचरा वगैरे नेऊन टाकतात. तेथें तें खत उन्हांनें वाळतें व पावसाच्या पाण्यानें धुपून जातें. खत कुजत असतांना जी द्रव्यें तयार होतात त्यापैकीं बरींच उन्हाच्या तापानें हवेंत उडून जातात व कांहीं पावसाच्या पाण्यांत मिसळून वाहून जातात. ही गोष्ट खतांच्या ढिगांतून येणा-या उग्रट वासावरून सहज लक्षांत येईल. अशा दोन्ही बाजूंनीं होणारें नुकसान थोडासा खर्च व जराशी मेहनत घेतल्यास टाळतां येईल.

बहुतेक शेतकरीलोक गुरांचें मूत वायां दवडतात; हे मूत शेणाइतकेंच महत्वाचें आहे. गुरांच्या गोठयाची जागा उंच व टणक जाग्यावर असावी. गोठयांतील जमीन मुरूम टाकून ठोकून घट्ट करावी. गुरें बांधण्यांच्या मागील बाजूस जमिनीला थोडा ढाळ द्यावा व लहानसें गटार करावें व त्याच्या शेवटीं एक लहानसा हौद बांधावा. असें केल्यानें गुरांचें सर्व मूत गटारांतून वाहून हौदांत जमा होईल. हें मूत रोजच्यारोज खताच्या खड्डयावर नेऊन ओतावें. गटार वगैरे बांधण्याची सोय नसल्यास गोठयांतील जमीन तयार झाल्यावर तिजमध्यें बाहेरच्या बाजूनें चार फळया बसवाव्या व कोपर्‍यांत मेखा मारून त्या मजबूत कराव्या. फळया मारून झाल्यावर रस्त्यावरील बारीक धूळ अगर शेतांतील भुसभुशीत माती किंवा वाळू व माती यांचें मिश्रण करून तिचा थर या फळयांच्या आंत द्यावा. अशा गोठयांत जनावरें बांधल्यास त्यांचें सर्व मूत मातींत राहील व त्यांतील अति महत्वाच्या पोषक द्रव्यांचा संचय वाढेल. ही माती घट्ट झाल्यास  रोजच्यारोज जनावरें बाहेर गेल्यावर खुरप्याने अगर दांताळयानें वरचा थर भुसभुशीत करावा. असें केल्यानें मातीची मूत शोषून घेण्याची शक्ति वाढेल. ही मुताची माती दोनातीन आठवडयांनीं काढून खताच्या खडयांत टाकावी व पुन्हा गोठयांत नव्या मातीचा थर द्यावा. मातीच्या बदली शेंगाच्या टरफलांचा चांगला उपयोग होतो. खत सांठविण्यांस खड्डयाची आवश्यकता आहे. खड्डा आजूबाजूच्या जागेपेक्षां थोडा उंचवट्यावर असावा. तो पांच सहा फूट खोल असावा; परंतु त्याचा आकार शेतक-या जवळ असणा-या जनावरांवर अवलंबून आहे. एकंदरींत खड्डा सहा महिन्यांत भरेल अशा आकाराचा असावा. दोन खड्डे असल्यास बरे. ते आळीपाळीनें भरतां येतील. खताचा खड्डा कठिण जागेंत खणावा. त्याचा तळ व बाजू कठीण मुरमाच्या असाव्या. तशी सोय नसल्यास तळ व बाजू शेण व चिकणमातीनें लिंपाव्या; परंतु सवडीनुसार तळाला व बाजूला चुनेगच्ची करावी. चुनेगच्ची करण्यास थोडा खर्च येईल परंतु तो खर्च एकदोन वर्षांत भरून येईल. कारण खत कुजत असतांना जीं पोषक द्रव्यें तयार होतात तीं जमिनींत झिरपून जाऊन त्यांचा नाश होणार नाही . ज्याप्रमाणें पोषक द्रव्यें जमिनींत झिरपून जातात त्याचप्रमाणें कांहीं हवेंतहि वायुरूपानें उडून जातात. याकरतां ज्या ठिकाणीं वार्षिक पावसाचें मान ५० इंचाहून जास्त असेल त्या ठिकाणीं खड्डयाला लहानसें छप्पर करावें. छपराची पश्चिमेकडील बाजू जमिनीस टेंकावी व इतर बाजू मोकळया ठेवाव्या. ज्या ठिकाणीं २० ते ३० इंच पर्यंत पाऊस पडतो त्या ठिकाणीं उघडया हवेंत खड्डा करण्यास हरकत नाहीं. अशा ठिकाणीं दर आठ दिवसांनीं खतावर सुमारें चार इंच जाडीचा मातीचा थर दिल्यास पोषक द्रव्यें उडून जाणार नाहींत; तीं मातींत राहतील. खड्डयांतील खत कुजत असतांना फार उबून त्यांतील द्रव्यें उडून जाऊं नयेत म्हणून खत दडपून ठेवावें व खताच्या अंगीं कुजण्यास जेवढा ओलसरपणा पाहिजे असेल तेवढाच ठेवावा. एखादे वेळीं खड्डयांतील खताची फार घाण सुटत आहे असें वाटल्यास खड्डयांत थोडें पाणी ओतावें. या पद्धतीनें खत व मूत राखल्यास शेतक-याजवळ असलेल्या जनावरांपासूनच दुप्पट खताचा पुरवठा होण्याचा संभव आहे. या पद्धतींत थोडा जास्त त्रास व अंगमेहनत आहे.

कांहीं ठिकाणीं दिपवाळीपासून पुढें शेतावर आलटून पालटून जनावरें बांधण्याची चाल आहे. प्रत्येक ३-४ दिवसांनीं तळ बदलतात. या पद्धतींत मुताचा पूर्ण फायदा मिळतो. ज्यांचीं शेतें गांवाजवळ आहेत त्यांनाच ही पद्धत अनुकरणीय आहे मेंढया शेतांत बसविल्यापासून अशाच तर्‍हेचा लेंडया व मूत यांचा फायदा मिळतो. खानदेश, नाशिक, मध्यप्रांत येथें व कोंकणांत कांहीं कांहीं ठिकाणीं ही पद्धत प्रचलित आहे. ह्या पद्धतींत गुरांचा पालट केल्यावर ती जमीन कुळवून टाकवी म्हणजे तीतील पोषक द्रव्यें उन्हाच्या तापाने हवेंत उडून जाण्याला प्रतिबंध होईल.

याशिवाय खत करण्याची दुसरी एक पद्धत आहे. तीत इंग्रजींत बॉक्स सिस्टिम म्हणतात. याचा प्रयोग मद्रास येथील सरकारी प्रयोगशाळेंत (सैदापेट) करून पाहिला आहे. या पद्धतींत थोडीशी जास्त जागा व शेज लागते. सर्व खत व मूत एकाच ठिकाणीं रहातें. या पद्धतींत पहिल्यानें जमिनीच्या सपाटीपेक्षां समारें २॥ फूट खोल सारखा खड्डा करावा व त्याचा तळ व बाजू गच्ची करून बाजूच्या जमिनीपेक्षां एक फूट उंच बांधून काढावा; आणि वर लोखंडी गजांचा पिंजरा करून बसवावा किंवा बाजूला बांबूच्या अगर लांकडाच्या दांडया माराव्या. कोणीकडून जनावरें बाहेर निघून जाऊं नयेत अशी तजवीज करावी. एका बाजूला जनावरांस आंत जाण्याला दार ठेवावें व वर छप्पर करावें. असा खड्डा एका जोडीला १० फूट लांब व सुमारे ८ फूट रुंद असला पाहिजे. ह्या खड्डयांत बैल बांधावयाचे नसून ते मोकळे ठेवावयाचे असतात. प्रत्येक जोडीला पडद्या घालून वेगवेगळाले गोठयाचे भाग केले पाहिजेत. या खड्डयांत एका बाजूला गवाण करून जनावरास चारा वगैरे घालावा. रोजचें खत व मूत जें पडतें तें तेथेंच सारखें करून त्याजवर रोज नवीन शेज पसरावी. जनावरें आंत मोकळी असल्यामुळें त्यांच्या पायाखाली केरकचरा व शेण चांगलें तुडवून दडपून बसतें. असा खड्डा तळापासून वरपावेतों म्हणजे दोन फूट भरून येण्यास चारपासून सहा महिने लागतात. खड्डा भरला म्हणजे हें खत एकदम काढून टाकण्यास तयार होतें; पुन्हां कुजत ठेवण्याची जरूरी नाहीं. या पद्धतींत प्रत्येक जोडीमागें १० ते १२ गाडया पावेतों दरवर्षी खत तयार होतें. या पद्धतींत खर्च जास्त असून गोठयाला जास्त जागा लागते. मुबलक जागा असून गोठयाला जास्त जागा लागते. मुबलक जागा असून चा-याची टंचाई नाहीं अशा शेतकर्‍यांनीं ही पद्धत घेण्यासारखी आहे. नेहमींच्या पद्धतीनें खत सांठविल्यास एका जोडीपासून एका वर्षात सुमारें पांच गाडया खत मिळते; तें या पद्धतीनें दुपटीहून जास्त मिळूं शकतें.

मुंबई इलाख्यातील कारवार जिल्ह्यांत शिरसी, गल्लापूर वगैरे तालुक्यांत सुपारीची व वेलदोडयाची लागवड बरीच आहे. तेथें एक एकर बागाईत करणारास ९ एकर फॉरेस्टांतील जमीन दिलेली असते.या जमिनीला बत्ता जमीन अशी संज्ञा आहे. या जमिनींतील वाळलेला झाडपाला व झाडांच्या डहाळया तोडून नेण्याची शेतक-याला मुभा असते. येथील बागाईती लोक झाडपाचोळा व शेण यांपासून तयार केलेलें खत वेलदोडयांना व सुपारीच्या झाडांस देतात. तिकडील खत तयार करण्याची रीति पुढीलप्रमाणें: जनावरें बांधण्याचे गोठे इतर ठिकाणांप्रमाणेंच असतात. परंतु चरण्याला मुबलक असल्यामुळें प्रत्येक शेतकरी बरींच जनावरें पाळतो. गुरांनां शेज डाहाळयांची घालतात व तींतच खत व मूत रोज पडतें. हे डहाळ व खत दर दोन दिवसांनीं शेणखळींत नेऊन टाकितात व गुरांच्या खालीं नव्या डहाळयांची शेज घालतात. शेणखळी दहा बारा फूट खोल असते. हें खत एक वर्षानें उपसतात व दोन झाडांनां एक पाटी (४० पौंड) या हिशेबानें बुडख्यांना खत देतात. खत खड्डयांतून काढितात तेव्हां तें अगदीं ओलें असतें. या पद्धतींत खड्डयावर आच्छादन करून बाजूनें चर खणून पावसाचें पाणी काढून दिल्यास खत जें अगदी चिखलासारखें होतें व कांही भाग पाण्याबरोबर वाहून जातो तो जाणार नाहीं.

शेणखतास जास्त महत्व देण्याचें कारण त्यांत सर्वप्रकारचीं पोषण द्रव्यें असतात; तथापि सर्व जनावरांचें शेण खत सारखें नसतें. इतर गाईबैलांपेक्षां ज्यांनां पेंड, धान्य वगैरे चारतात त्यांचें खत जास्त सत्वशील असतें. दुभत्या जनावरांचें खत कमी दर्जाचें असतें. कारण दुधामध्यें महत्वाचीं द्रव्यें जातात. यावरून असें दिसून येईल कीं, शेणखताची किंमत जनावरांच्या वयावर, त्यांच्या खुराकावर व त्यांच्या उपयोगावर अवलंबून असते; इतकेंच नव्हे तर खताची किंमत तें सांठविण्यावर व कुजत असतांना काळजी घेण्यावरहि आहे.

प्र वा ही ख त- प्रवाही खत देण्याची चाल मालवण तालुक्यांत व महाबळेश्वर येथें आढळून येते. मालवण (जिल्हा रत्नागिरी) येथें कांद्याच्या पिकाला प्रवाही खताचा उपयोग करतात. एक चार फूट औरस चौरस व तितकाच खोल खड्डा करून (तो चुनेगच्ची असल्यास चांगला) त्यांत मोठया माशाचे तुकडे तुकडे करून घालितात. नंतर खड्डयांत पाणी सोडून तें मिश्रण हालवून तयार करितात. हें पाणी रोज घडयाने कांद्याच्या पिकास घालतात. महाबळेश्वरास भाजीपाल्याला गुरांच्या मुतांत पाणी मिसळून थोडथोडें वर खत प्रत्येक झाडाला तीन चार वेळ देतात. मिलिटरी दुधाच्या कारखान्यांत जेथें पाण्याचा पुरवठा मुबलक आहे तेथें गुरांच्या मागील गटारांत सारखें पाणी सोडून शेण व मूत दोन्हीही प्रवाहांस मिसळून तें पाणी शेतावर नेऊन त्यावर कडवळाचीं पिकें करितात. असा प्रघात खडकी (पुणें) येथील मिलिटरी डेअरी फार्मांत चालू आहे.
    
में ढया ब क र्‍यां चें ख त.- हें खत सुद्धां शेतकरी लोकांच्या आटोक्यांतील आहे. सर्व शेतकरी मेंढया ठेऊं शकत नाहींत. कारण त्यांनां चरण्यास व फिरावयास मुबलक जागा लागते. यासाठीं बक-या मेंढयांचे कळप बहुतकरून धनगर लोकच ठेवितात व उघाडीच्या दिवसांत कळप घेऊन जेथें खताची वाण असेल तेथें जातात व ज्यांनां खताची जरूरी असेल त्यांच्या शेतांत आलटून पालटून रात्रीं जाळी लावून तळ देतात. त्यांचे तळ शेतांत बसविले असतां त्यांच्या लेंड्या पडून उत्तम खत होतें. लेंडयांपेक्षां त्यांच्या मुतांत विशेष गुण आहे. एक जमीनीचा तुकडा खतावून झाला म्हणजे दुस-या तुकडयांत जाळीं लावून बकरीं बसवितात. याप्रमाणें सर्व शेत संपेपावेतों क्रम चालतो. या बसविण्याबद्दल शेताच्या मालकास निरनिराळया ठिकाणीं निरनिराळ्या दरानें धनगरास धान्य किंवा रोकड पैसे द्यावे लागतात. गुजराथेंत ५०० मेंढया एक रात्रभर बसविण्यास ४८ शेर बाजरी द्यावी लागते. साता-याकडे ८०० मेंढया २४ दिवस बसविण्यास पांच मण ज्वारी द्यावी लागते व तिची किंमत सुमारें ३० रुपये होते. मेंढयांचें खत व मूत जागच्या जागींच पडत असल्यामुळें त्याचा परिणाम पिकावर चांगला होतो. शेणखतापेक्षां हें खत जास्त पोषक असतें. शेतांत मेंढया बसविल्या म्हणजे रात्रींतून त्यांना दोन तीन वेळ उठवितात. असें केल्यानें दर खेपेस मेंढया मुततात; व अशा योगानें द्राव्य खताची जमीनींत जास्त भर पडते. एक एकर जमीन चांगल्या तर्‍हेनें खतविण्यास ३०० मेंढयांचा कळप सुमारें १० दिवस पावेतों बसवावा लागतो. मेंढयांचा तळ जसजसा हालेल त्या प्रमाणें जमीन नांगरणें चांगलें. नांगरटीनें खत जमीनींत चांगले मिसळलें जातें व  पोषक द्रव्याचा नाश होत नाहीं. एका मेंढीच्या एका रात्रीच्या लेंडयांचें वजन १ पौंड ४ औंस होतें व एका रात्रीच्या मुताचें वजन १३ औंस भरतें.

घो डया ची ली द.- या खताचा पाश्चात्य देशांत उपयोग करितात. कारण तिकडे आउतें ओढण्याला मुख्यत्वेंकरून घोडेच लावितात. यामुळें हें खत तिकडे जास्त प्रमाणावर उपलब्ध असतें.

डु क रां ची वि ष्टा.- पाश्चात्य देशांत डुकरें त्यांच्या मांसाकरिता पाळितात व त्यामुळें त्यांची विष्टा तिकडे विशेष मिळत असून तिचा खताकडे उपयोग करितात, हिंदुस्थानातून खेडयांपाडयांत वडार जातीचे लोक डुकरें पाळितात व तीं दक्षिण हिंदुस्थानांत विशेष आढळतात. मद्रास इलाख्यांत कॉइल पट्टीकडे डुकराची विष्टा गोळा करून खतासाठीं वापरतात. पाश्चात्य देशांत घोडा, गाय, डुकर व मेंढया यांचें खत वापरतात. त्यांच्या पोषक द्रव्याचें तुलनात्मक आंकडे उपयुक्त असल्यामुळें पुढें दिले आहेत. हे आंकडे डॉ. विल्यम् पी. ब्रुक्स यांच्या शेतकी विषयावरील दुस-या भागांतील पृष्ठ २२५ यांतून घेतलेले आहेत. (आकडे पौंडांचे आहेत.)

हजार पौंड ताज्या विष्टेचें पृथक्करण
प्राणी पाणी नायट्रोजन फास्फे.अ‍ॅसिड अल्कली (पोटॅश)
घोडा ७६० ५.० ३.५
गाय ८४० ३.० २.५ १.०
डुकर ८०० ६.० ४.५ ५.०
मेंढी ५८० ७.५ ६.० ३.०
     हजार पौंड ताज्या मुताचें पृथक्करण
 घोडा  ८९०  १२.०  ...  १५.०
 गाय  ९२०  ८.०  ...  १४.०
 डुकर  ९७५  ३.०  १.२५  २.०
मेंढी ८६५ १४.० ०.५ २०.०


सो न ख त.- हें प्रत्येक गांवांत मिळण्याजोगें आहे. याच्यावर बागाइत पिकें फार उत्तम येतात व कोरडवाहू जमिनीसहि याचा उपयोग करतां येतो. माणसें चांगलें अन्न खातात म्हणून त्यांचें खत जास्त कसदार असून ते व्यवस्थित असतें. सरासरीं एका मनुष्याची विष्टा रोज सहा औंस धरल्यास एक वर्षाचें उत्पन्न १३५ पौंड भरेल व त्यांत सुमारें एकपूर्णांक तीनदशांश पौंड नायट्रोजन सांपडेल. हें खत कोरडवाहू जमिनीस दर एकरीं सुमारें २६ पौंड नायट्रोजन (सुमारें शेणखताच्या पांच गाडयाइतकें) असणारें द्यावयाचें असल्यास २७०० पौंड द्यावें लागेल. म्हणजे वीस माणसांची एक वर्षाची विष्टा द्यावी लागेल. याहि हिशोबानें मुंबई इलाख्याच्या १,४५,६८,६७१ लोकसंख्येपासून उत्पन्न होणारें खत ७,२८,४३४ एकरांना पुरेल असा अजमास आहे. या हिशोबांत फक्त मैलाच धरलेला आहे. मूत्र वगैरे धरलेलें नाहीं. दोन्हीं धरल्यास हें खत जवळ जवळ दीडपट क्षेत्रास पुरेल. या आंकडयांवरून सोनखताची किंमत किती आहे हें सहज लक्षांत येईल.

सोनखत तयार करणें- पूर्वीं जेव्हां लोकवस्ती पातळ होती व जमीन मुबलक होती तेव्हां लोक जेथें राहात तेथेंच त्यांची विष्टा पडे. पुढें वस्ती जास्त होऊन लोक खेडयापाडयांत व शहरांत एकजुटीनें राहूं लागले तेंव्हां विष्टेची घाण कशी काढावी हा प्रश्न पुढें आला. ती घाण नाहींशी करण्याचे प्रयत्न हरतर्‍हेने झाले. विष्टेशीं माती मिसळणें, राख मिसळणें, गांवांतील केरकचरा मिसळणें वगैरे प्रयत्न झालें. मुबई इलाख्यांत व त्याप्रमाणेंच मध्यप्रांतांत विष्टेचा खताकडे उपयोग माहीत नव्हता. पूर्वीं भंगी लोक विष्टा (मैला) शेतकर्‍यांस विकीत असत. ही गोष्ट म्युनिसिपालिटी स्थापन होण्याच्या पूर्वींची झाली. परंतु सोनखत तयार करून वाळवून वगैरे विकणें हें अलीकडील आहे. पुणें जिल्ह्यांत कालव्याचें पाणी मुबलक असल्यामुळें ऊंस व इतर बागाईत पिकांचा पुष्कळ पेरा होता व हें खत उंसाला मानवत असल्यामुळें सोनखताची मागणी पुण्याजवळ फार आहे. जसजसा शेतक-याला सोनखताचा उपयोग कळूं लागला तसतसा या मैल्याच्या खताविषयीं तिटकारा कमीं होऊं लागला. चीन व जपान देशांत शेतकरी लोक या खताची व्यवस्था स्वतः हातानें करतात. तेथें जमिनीची सुपीकता कायम राखण्यास मुख्य हेंच खत आहे असें तें समजात. खेडयांपाडयांत लोक बहुतकरून शौचास गांवाच्या आसपास बसतात व पाऊस पडल्याबरोबर हें खत जवळच्या शेतांत वाहून जातें. यामळें अशा शेतांतून पिकें फार जोरानें येतात. या गोष्टी शेतकर्‍यांस माहीत नाहींत असें नाहीं. परंतु सोनखतासारखें घाणेरडें खत हातानें वापरणें हलकेपणाचें आहे अशी त्याची समजूत आहे. सोनखत घातलेल्या जमिनीस भरपूर पाणी पाहिजे, नाहींपेक्षां पहिल्यानें पीक जोराने वाढूं लागतें व पुढें पावसाच्या अभावामुळें लवकर करपून जातें. सोनखत घालण्यापूर्वीं जमिनीची चांगली मशागत केली पाहिजे. सोनखत तयार करण्याच्या रीती आहेत त्या:- (१) वाफ्यांत अगर खड्डयांत मैला टाकून तो केर कचरा अगर माती यांत मिसळणें व कांहीं दिवसांनीं तो बाहेर काढून शेतांत घालणें. (२) शेतांत उथळ वाफोळया करून त्यांत कच्चा मैला टाकून तो बारीक मातीनें झांकून टाकणें, ही रीत लहान म्युनिसिपालिटी व सॅनिटरी कमिटी यांनां फार उपयोगाची आहे. (३) सबंध शेतांत खोल स-या (चर) पाडून आडोशाकरितां तट्टे बांधणें व स-या जसजशा मैल्यानें भरतील तसतसे तट्टे बदलणें, या रीतीचा उपयोग दुष्काळी कामावर आढळून येतो. जपानांतील रीती दोन तर्‍हेच्या आहेत  एकींत रोजच्यारोज मैल्यांत कोरडी माती मिसळून तो शेतांत नेऊन टाकणें, ही पद्धत इंग्लंडांत खेडयांपाडयांत व सीलोना (लंका) तहि कांहीं ठिकाणीं प्रचलित आहे. दुस-या रीतींत मैला शेतांत नेऊन तो टिपांत टाकणें व पाण्यांत मिसळणें. पाणी मिसळल्यानंतर सुमारें १० दिवसांनीं मिश्रण तयार झाल्यावर त्यांत दोन ते दहा पटीनें पाणी मिसळून पीक उभें असताना प्रत्येक झाडाला दोन तीन वेळ थोडथोडें मिश्रण घालणें. पहिल्यानें एक वेळ बीं पेरण्याच्या पूर्वीं व शेवटचा हप्ता पिके फुलूं लागलीं म्हणजे द्यावयाचा.

पुण्यांत सोनखत दोन तर्‍हेनें तयार करीत असत. गांवापासून डेपो सुमारें दोन मैलांवर होता. गांवांतील केरकचरा बाहेर नेऊन तो जाळीत व झालेली राख गाळीत. डेपोंत १८ फूट लांब, १५ फूट रुंद व १ फू. खोल असे वाफे केलेले होते. वाफ्याचा तळ मुरूम घालून ठोकून चोंपून घट्ट केला होता. मैला टाकण्यापूर्वीं या वाफ्यांत एक इंच जाडीचा राखेचा थर देत. त्यावर ५ इंच जाडीचा मैल्याचा थर देत व पुन्हां एक इंच राखेचा थर देऊन चोवीस तास पावेतों तसेंच उन्हांत वाळूं देत. दुस-या दिवशी हे थर दांताळयानें हालवून सर्व मिसळीत व आणखी एक इंच राखेचा थर देऊन उन्हाळ्यांत तीन दिवस व पावसाळयांत ८ दिवस वाळूं देत. चवथ्या दिवशीं सर्व मिश्रण एक वेळ दांताळयानें हालवून तेंवाफ्याच्या बाहेर काढून उन्हांत पसरीत. आणि वाळल्यानंतर ढीग मारून ओटा करून विकण्यास ठेवीत. पावसाळयांत हें खत छायेखालीं वाळवावें लागते. प्रत्येक ओट्यांत बारा ते पंधरा गाडया भरतात. व एका गाडीची किंमत पांच ते सात रुपये येते. दुस-या रीतींत चार फूट खोल व तीन फूट रुंद चर खणून प्रथम त्यांत कच-याचा थर तळाशीं देऊन वर मैल्याचा थर व पुन्हां कचरा असे आळीपाळीनें खड्डा भरेपावतों थर देतात. हें मिश्रण चार ते सहा महिने तेथेंच राहूं देऊन नंतर उसपून ओटा मारला म्हणजे तें विकण्यास तयार होतें. नाशिक येथील म्युनिसिपालिटीची रीत अशीच असून तेथें चर मात्र लहान असतात. तेथें चरांतील खत कुजून जसजसें खालीं बसेल तसतसें त्याच्यावर कच-याचा थर देतात. व कोठेंहि व केव्हांहि खत उघडे न पडूं दिल्यामुळें बिलकूल माशा होत नाहीत. या शिवाय शेतकरी लोकांस खतास मुळींच हात लावण्यास नको अशी एक रीत आहे ती अशीः- प्रथम जमीन दोनतीन वेळ कुळवून सुमारें तीन चार इंच खोल माती मोकळीं होईल अशी तयार करावी. नंतर कुळवाच्या दिंडानें खत देण्याच्या शेतांत लांब वाफोळया पाडाव्या. त्यांची रुंदी सुमारें साडेपाच फूट असावी म्हणजे त्यांत मैल्याची गाडी सहज मावते. वाफोळया तयार झाल्यावर मैल्याची गाडी सहज मावते. वाफोळया तयार झाल्यावर मैल्याची गाडी आंत नेऊन त्यांत थोडथोडा मैला सोडीत जावा व भंगी लोकांकडून तो चांगला पसरवावा व वाफोळीच्या कडेस असलेल्या सरीची माती खो-यानें त्यावर उडवावी म्हणजे घाणीवर माशा फार होत नाहींत. अशा रीतीनें खतावलेल्या जमिनींतील खत पंधरा दिवसांत वाळून जातें व पुन्हां आडव्या उभ्या दोन पाळया घातल्या म्हणजे मातींत खत चांगले मिसळतें व एकदोन महिन्यांनीं जमीन पेरण्यास तयार होतें.

ज्या ठिकाणी मैला मिळण्यासारखा असेल व जेथें म्युनिसिपालिटीमार्फत तो जमा केला जातो. अशा शहराजवळ या पद्धतीचा उपयोग करणें इष्ट आहे. ज्या ठिकाणीं पावसाळयाचे दोन महिने चांगला भरपूर पाऊस पडतो तेथें या खताचा जास्त चांगला उपयोग होतो. हें खत उन्हाळ्यांत द्यावें. सुरत, जळगांव व रत्नागिरी येथील प्रयोगक्षेत्रांत ताजा मैला व सोनखत ही खतें देऊन कापूस, ज्वारी, भात वगैरे पिकें करण्यांत आलीं त्यांचा तपशील पुढें दिला आहे. सुरत येथें प्रयोग १९०४ सालीं सुरू झाले व त्याच भागांत दहा अकरा वर्षे पुन्हां खत न घालतां कापूस व ज्वारी ही पिकें फेरपालटानें घेण्यांत येत असत.

सुरत फार्म वरील दर एकरीं खत व उत्पन्न
(६ वर्षांची सरासरी)
खत. एकरीं गाडया ज्वारी पौंड कडबा पौंड कापूस पौंड
मैलाखत ८४॥ १४१८ ३५६२ ५६२
शेणखत. ४० १०९१ २४७६ ४१६
ताजा मैला ४० १८०८ ७२०० ३७४
बिनखती ... १०५५ १२८६ १९१
रत्नागिरी फार्म वरील दर एकरीं खत व उत्पन्न
खत एकरी गाड्या भात पौंड भातेण पौंड
सोनखत ३००० ३१६०  ३०२०
बिनखती ... २६८० २३८५
जळगांव फार्म वरील दर एकरी खत व उत्पन्न
खत एकरी गाडया कापूस पौंड
ताजा मैला ३४॥ ९९८
बिनखती ... २१३

कि त्ये क मां सा हा री प क्ष्यां ची वि ष्टा.- हें खत म्हणजे जलचर पक्ष्यांचें मलमूत्र मिळून झालेली विष्टा होय. या विष्टेचे ढीगच्या ढीग पेरू देश (दक्षिण अमेरिका) व त्याच्या आसपासच्या बेटांच्या सर्व किना-यावर आढळतात. हे ढीग तयार होण्यास कित्येक पिढया गुदरल्या असल्या पाहिजेत. या ठिकाणीं पाऊस बिलकुल पडत नाहीं. यामुळें त्यांतील द्रव्यें वाहून जात नाहींत. हें खत गव्हास चांगलें मानवतें. हें दर एकरीं दोन तीन हंड्रेडवेटपर्यंत द्यावें. हिंदुस्थानांत अशा तर्‍हेचें खत करनूल येथें गुहांत सापडतें व असलें खत आसामांतील मळेवाले लोक निकोबार बेटांतून आणितात.

हिंदुस्थानांत कोंबडीं, बदकें, कबुतरें वगैरे पक्ष्यांची विष्टा इकडे तिकडे पडून वाया जाते. ती मिळेल त्या ठिकाणीं सांठवून ठेवून खताकडे तिचा उपयोग केल्यास फायदा होईल. एका कोंबडीपासून एका वर्षांत सुमारे १२ पौंड एका टर्कीपासून सुमारे २५ पौंड व एका बदकापासून १८ पौंड खत मिळूं शकतें. या खताच्या पृथ्थकरणाचे शेंकडा प्रमाणाचे आंकडे पुढील प्रमाणे आहेत.

पक्ष्यांच्या ताज्या विष्टेचें पृथक्करण
प्राणी पाणी  नायट्रोजन फॉस्फेरिक ऍसिड अल्कली पोटॅश वगैरे
कोंबडी ५६ १.६० १.५० २.०० ०.८- ०.९०
टर्की ७७.१० ५५ ०.५४ ०.९५
बदक ५६-६० १.०० १.४० ०.६२०
कबुतर  ५२-०० १-७५ १.७५.२.०० १.०० ते १.२५


क सा ई खा न्यां ती ल र क्त व गै रे.- हें रक्त हल्लीं वाळवून परदेशीं रवाना होतें. ह्यांत शेंकडा सुमारे पांचे ते १० टक्के नायट्रोजन असतो. ह्या रक्ताचा उंसाला वर खत दिल्यास चांगला उपयोग होतो.

हा डा चें ख त.- हिंदुस्थानांतील प्रत्येक मोठमोठया ठिकाणाहून शेंकडों खंडी हाडें परदेशी जातात व त्यामुळें या देशांतील एक मोठें उपयोगी असें खताचें द्रव्य नाहींसें होतें. मेलेलीं गुरें व दुसरीं बहुतेक सर्व जनावरें यांचीं हाडें द-याखोर्‍यांत पडलेलीं असतात, हीच हाडें बाहेर देशीं जातात. हाडांचा व्यापार करणारे बहुतेक मुसुलमान, महार, युरोपियन हेच असतात. ते लोकांकडून आसपासच्या ठिकाणाहून हाडें वेंचून आणवितात. अशा जमा करून आणलेल्या हाडांचे ढीग कांही स्टेशनांवर दृष्टीस पडतात. हा व्यापार फायद्याचा असल्यामुळें दिवसेंदिवस वाढतच आहे. पूर्वीं खेडेगांवानिहाय हाडकीं आणि हाडवळा (मेलेलीं गुरें फाडण्याच्या जमिनी) या नावांचीं शेतें असत. या शेतांत इतर शेतांपेक्षां पीक चांगलें येऊन सकस व जोरदार उत्पन्न येत असें. हल्ली शेतकरी लोक प्रत्यक्ष हाडांचा शेतीस खरा उपयोग करीत नाहींत. कांहीं कांहीं ठिकाणीं आपोआपच हाडें कुजून जें काय खत मिळत असेल तेवढेंच. कारण जातिभेद व देवभोळेपणाच्या जुन्या समजुतीमुळें हिंदू लोकांच्या हातून हाडांच्या पुडीचा दुस-या   कोणत्याहि रीतीनें खत तयार करण्याच्या प्रयत्न झाले नाहींत. हिंदुस्थानांत हाडें पुष्कळ आहेत. हाडांत नायट्रोजन व फॉस्फरस असतो. या द्रव्यांचा इकडील जमिनीस फार उपयोग होतो. हल्ली कोंकणांत व बंगाल्यांत या खताचा भातशेतीत थोडा थोडा उपयोग दिसून येऊं लागला आहे. बंगाल्यात हें खत भात, बटाटे, ऊंस या पिकांस चांगलें मानवतें. त्याचप्रमाणें या खताचा नारळीच्या बागांना फळ झाडांना, त्याप्रमाणेंच चहा व काफीच्या मळयांत जास्त उपयोग होतो असें अनुभवास येत आहे. परंतु हाडांना बाहेर जास्त भाव येत असल्यामुळें ती येथें देणें परवडत नाहीं.

जमिनींत हाडांचे खत घालावयाचे असल्यास हाडांची जितकी बारीक पूड होईल तितकी चांगली; कारण ती लवकर कुजते. युरोप, अमेरिका व इतर सुधारलेल्या देशांत हाडांचें खत करावयाचे असल्यास त्यांच्यावर गंधकाम्ल ओतून तीं विरवतात. या मिश्रणानें झालेल्या खतास सुपरफॉस्फेट ऑफ लाइम म्हणतात. हा पदार्थ पाण्यांत फारच लवकर विरघळतो; कारण हाडांतील सेंद्रियद्रव्यें गंधकाम्लानें लवकर द्रवतात. या रीतीनें तयार केलेल्या हाडांच्या खताचा जसा उपयोग होतो तसा दुस-या कोणत्याही रीतीनें केलेल्या हाडांच्या खताचा उपयोग होत नाहीं. हिंदुस्थानांत गंधकाम्ल तयार करण्याचे कारखाने फार थोडे आहेत व यामुळें येथें हें आम्ल फार महाग पडतें. जों जों हें खत येथे पुष्कळ तयार होईल. व स्वस्त मिळेल तों तों त्याचा खप जास्त होत जाईल. हाडांचें पीठ व सुपरफॉस्फेट ऑफ लाइम या दोनहि द्रव्यांचें खत जमिनीस दिलें असतां त्यापासून जमिनीवर सारखाच परिणाम होतो. परंतु हा परिणाम जमिनीवर होण्यास दोन प्रकारच्या खतांस वेळ मात्र कमी जास्त लागतो. सुपरफॉस्फेट्चा परिणाम पिकांवर त्वरित होतो. या खताची पूड भरड असते व ती बीं पेरतांना त्या बियांत मिसळावी म्हणजे त्यापासून पिकांस चांगला उपयोग होतो. हाडांच्या पिठाची स्थिति सुपरफॉस्फेटच्या खताच्या उलट आहे. हें खत जमिनींस दिल्यापासून एक दोन वर्षांनंतर त्याचा उपयोग पिकांस होऊं लागतो. याकरतां हें खत फळ झाडांस चांगलें.

हा डां चें ख त त या र क र ण्या ची सोपी री त.- दोन टोपल्या हाडांचा चुरा, तीन टोपल्या ताजा भाजलेला चुना व सहा अगर आठ टोपल्या लांकडांची अगर गोवर्‍यांची राख याप्रमाणें घेऊन एका मोठया खड्डयांत थरावर थर क्रमानें घालावेत. खड्डा भरत आला म्हणजे वर गवताचा चुरा व मातीचा एक थर घालावा. नंतर त्या खड्डयांत पाणी सोडून द्यांवें. असें केल्यानें खत सुमारें सहा महिन्याच्या आंत तयार होतें.

मा स ळी चें ख त.- खताचे मासे मुंबई इलाख्यात कोंकण, कारवार, रत्‍नागिरी, कुलाबा आणि ठाणें व मद्रास, बंगाल वगैरे समुद्रकिनारी भागांत मुबलक सांपडतात. या खताचा कोंकण प्रांती भात, नाचणी, नारळ व इतर बागाईत पिकें करण्याच्या कामीं जास्त उपयोग करिंतात. मासळीचें खत उसांकरतां घांटावर जास्त प्रमाणांत जातें. घांटावर उंसाला इतर खतें देऊन मासळीचें खत पावसाळीं दर एकरीं एक टन पावेतों वरखत (टॉपड्रेसिंग) देतात. हें खत दिल्याबरोबर ताबडतोब जमिनींत मिसळून टाकिलें पाहिजे, नाहींपेक्षां कोल्हे, कुत्रे, पांखरें, रानडुकरें वगैरेंपासून अति त्रास होतो. हल्लीं मद्रास इलाख्यांत मलबार किना-यावर माशांचें तेल काढण्याचें शेंकडों कारखाने निघाले आहेत. त्या कारखान्यांत तेल काढून तें बाहेर पाठवितात व मासळीचा बाकी राहिलेला कुटा 'फिश गुऑनो' या नांवाखालीं विकला जातो. याचा खतांकरितां चांगला उपयोग होतो. मासळींचे खत लवकर द्राव्य स्थितींत येतें व त्यांत पिकांस लागणारीं सर्व पोषक द्रव्यें कमीजास्त प्रमाणांत असतात. या खतांत नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरिक अ‍ॅसिड आणि चुना हीं सर्व द्रव्यें असून तीं सर्व द्राव्य स्थितींत असतात. बाजारांत पांच प्रकारचें मासळीचें खत मिळतें. ढोमा, सुकट, टारली, चिंगली व पंचभेळ या प्रत्येक जातीच्या खताचा वेगवेगळा भाव असतो. त्या सर्वांत चिंगळी जास्त पोषक असून ती जास्त महाग विकली जाते. मि. मिगेट यांनी केलेलें पृथक्करण पुढें दिलें आहे.

माशाचें नांव नायट्रोजन शेंकडा फॉस्फरिक अ‍ॅसिड शेंकडा पोटॅश शेंकडा
ढोमा ८.२४ ६.२५४ १.८८
सुकट(पिवळा बारीक) ६.०२ ३.५७५ १.१६
भुईमासा (टारली) ६.०३ ५.७३० २.१२
चिंगळी ७.६७ ४.४२१ १.६८
पंचभेळ ४.५४ २.९७४ १.३१


हि र व ळ ख तें, तागः- ताग हें पीक इतर पिकांपेक्षां जमिनींत नांगरून टाकण्यास फार उपयोगीं आहे. अशा पद्धतीस कोठें कोठें बेवड करणें असें म्हणतात. ताग इतर पिकांपेक्षां लवकर वाढतो, वजनांत पुष्कळ भरतो व लवकर कुजतो. साधारणपणें हें पीक दोन महिन्यांनीं तयार होतें व त्याचें ओलेपणीं दर एकरीं १८००० ते २८००० पौंडपर्यंत वजन भरतें. यांत आंठ ते पंधरा शेणखताच्या गाडयांत सांपडतील इतकीं पोषक द्रव्यें जमिनीत परत बुजविलीं जातात. शिवाय या खतानें जमिनीचा पोत सुधारतो. तागाचें पीक करून त्याचा खता ऐवजीं उपयोग करणें कमीजास्त प्रमाणानें सर्वत्र आढळतें. परंतु त्याच्या बुजवणींत अनेक प्रकार आढळून येतात. उदाहरणांर्थः- कोणी भातखांतचरांत एक महिन्याचा ताग झाला म्हणजे बैलांकडून तो पाण्यांत तुडवितात. कोणी रब्बीच्या पिकासाठीं ताग करितात तेव्हां उभ्या पिकांत नांगर घालितात, कोणी ताग काठयानीं झोडून पाडून त्याच्या मागें नांगर घालितात. कोणी उभें पीक कुळवाच्या दिंडानें पाडून मग तें नांगरानें मोडितात. कोणी अगोदर ताग कापून अगर उपटून मग तो नांगराच्या तासांत टाकितात. या सर्व प्रकारांपैकीं कापून अगर उपटून मग तासांत मूठ-मूठ टाकणें फायदेशीर आहे. अशा रीतानें ताग गाडल्यास बाहेर काडी कुडी उघडी रहात नाहीं, तो लवकर कुजतो व त्याचा त्याच्या मागून पेरलेल्या पिकास जास्त उपयोग होतो. ही बुजवणी लांकडी नांगरानें करितात, व त्याला खर्च बराच येतो. याकरितां बुजवणी लोखंडी नांगरानें केल्यास खर्च कमी येऊन बुजवणीहि उत्तम प्रकारची होते.

हलक्या जमिनींत बेवड करण्यास मूग, कुळीथ, खुरासणी यांसारखीं पिकें चांगलीं समजतात. भारी जमिनींत गाडण्यासाठीं ताग, उडीद, नीळ, गोवारी यांसारखीं पिकें, पसंत करावीं. मद्रासेकडे भात खांचरांत घईन नावांची शेवरीची जात आहे, तिचें पीक करून तें गाडतात.

उं सा क रि तां पा च टा चें ख त.- उंसाच्या वाळलेल्या पानांस पुण्याकडे पाचट म्हणतात. याचा उंसाच्या रानांत जमिनीचा पोत सुधारण्याकडे भरीच्या खताऐवजीं चांगला उपयोग होतो तागाचें पीक करून तें गाडण्याचीहि वहिवाट आहे; परंतु हें पोत सुधारण्याचें गाम पाचट गाडल्यानें ब-याच कमी खर्चांत भागतें. ऊंस चांगला असल्यास दर एकरीं सुमारें पांच टन पावेतों पाचट निघतें. याकरितां गूळ रांधून जें पाचट शिल्लक राहील तें शेतांत जाळून न टाकतां त्याचा भरीच्या खताप्रमाणें उपयोग केल्यास शेणखताची कांही अंशी तरी उणीव भरून येईल. याचे तुलनात्मक प्रयोग भरीच्या खताऐवजीं पांच वर्षे पावेतों मांजरी फार्म (पुणे जिल्हा) येथें करून पाहिले त्यांची पांच वर्षाची सरासरी पुढें दिल्याप्रमाणें:- शेणखत ३० गाडया घातलें तर गूळ दर एकरी ९९५० पौंड वजनी होतो. व पाचटीचें खत पाच टन (एक एकरांतून निघालेलें) घातल्यास एकरी गूळ ९६०० पौं. वजनी होतो. पाचट हें साधारणपणें शेणखताची बरोबरी करितें. वरील उत्पन्न नुसतें भरीच्या खतावर झालेलें नव्हतें शिवाय इतर वरखतें दिलेली होतीं.

पाचट गाडण्यापूर्वीं खताच्या खड्डयांत एक थर पाचट व एक थर माती अशा प्रमाणें घालून तें एक पावसाळा कुजूं द्यावें व दुस-या वर्षी शेतांत पसरावें अगर उंसापूर्वीं खरिपाचें पीक काढल्याबरोबर त्याची तागाप्रमाणें लोखंडी नांगरानें गाडणी करावी. जमिनींत भरपूर ओलावा असल्यास हें सर्व एक दोन महिन्यांत कुजून जातें.

तेलाची पेंडः- शेणखत, सोनखत, लेंडया वगैरेंशिवाय प्रत्येक शेतक-यास मिळण्याजोगीं दुसरीं खतें म्हटलीं म्हणजे सर्व तर्‍हेच्या पेंडी होत. पेंडींचीं खतें बागाईत पिकांनां चांगलीं. या खतांची किंमत जास्त असल्यानें अशा महागाईच्या पेंडी घेऊन त्या कोरडवाहू पिकांनां घालणें पुरवणार नाही. पेंडींत तेल जितकें कमी असेल तितकी ती खताला चांगली. पेंडींत तेल असल्यानें ती कुजत नाहीं. पेंड जितकी जुनी असेल तितकी चांगली. गुजराथ, पुणें व ठाणें जिल्ह्यांत जेथें जेथें बागाईत आहे तेथें तेथें एरंडी व करंजीच्या पेंडीचा जास्त उपयोग करितात. बाजारांत दोन तर्‍हेच्या पेंडी मिळतात. एक देशी घाणीच्या व दुस-या संचाच्या. या दोहोंपैकीं घाणीच्या पेंडीचा पिकावर लवकरच परिणाम होतो. संच्यांतील पेंड तयार करितांना पहिल्यानें बी भरडून तें वापरतात, यामुळें त्यांतील अलब्युमिनाइड्स् अद्राव्य स्थिति पावतात; सबब त्यांचा पिकांवर परिणाम होण्याला दिरंगाई लागते. पेंडी दोन तर्‍हेच्या आहेत. गुरांनां खाण्यालायक व खाण्यास नालायक. या दोहोंचा खतकरितां चांगला उपयोग होतो. करडई, कारळे, भुईमूग, तीळ, सरकीची पेंड वगैरे गुरांच्या खाण्यालायक पेंडी उंसाला नेहमीं वापरण्यांत असलेल्या एरंडी व करंजी यांच्या पेंडीपेक्षां जास्त फायदेशीर पडतात असा अनुभव मांजरी येथील सरकारी शेतावर आलेला आहे. याशिवाय रायन (खिरणी), मोहा, उंडी, निंब वगैरे पेंडी खताला चांगल्या आहेत. गुजराथेंत एरंडीची पेंड स्वस्त मिळते. खानदेशांत सरकी स्वस्त मिळते. देशावर करडई, कारळा, भुईमूग वगैरेंच्या पेंडी माफक दरानें मिळतात. याकरितां जेथें जेथें जी पेंड स्वस्त मिळत असेल तेथें ती वापरावी. पेंडीचे प्रकार व गुणधर्म पुढें दिले आहेत.

एरंडीः- ही स्वस्त असते. हिचा पिकावर परिणाम करडईच्या पेंडीप्रमाणें लवकर होतो. ही पेंड कडू असल्यामुळें वाळवी कमी होते. करंजीः- हिचाहि गुण एरंडीप्रमाणेंच होतो.

करडईः- दोन तर्‍हेच्या पेंडी मिळतात. एकींत बी भरडून टरफलें काढून मग पेंड करतात; ही पेंड जास्त जोमदार असते. टरफलासहित केलेली पेंड कमी दर्जाची असते. ही लवकर खंवट होत नाहीं. व ती टिकाऊ असून गुरांना चारतात. खुरासणी अगर रामतीळः- ही गुरांनां चारतात. हिला लवकर बुरसा चढतो. एरंडीपेक्षां परिणाम पिकांवर लवकर होतो.

तिळाची पेंडः- ही गुजराथ, खानदेश वगैरे ठिकाणी गुरांनां जास्त चारतात. भुईमूगः- ही पेंड सर्व पेंडींत जास्त पोषक असते. ही सर्व ठिकाणी गुरांनां चारतात. तेल काढतांना शेंगदाण्यांत करडई मिसळतात. या पेंडीला बुरसा लवकर चढतो. सरकीची पेंडः- ही सर्व पिकांना चांगली असते. गुरांनां सरकीपेक्षां सरकीची पेंड उत्तम. खोब-याची पेंडः- ही बहुतेक गुरांना चारतात; पण ती खंवट झाली म्हणजे खताकडे उपयोग करण्यास हरकत नाहीं. हींत शेंकडा तीन नायट्रोजन असतो. निंबाची पेंडः- ही गुराथेंत व सातारा जिल्ह्यांत मिळते. ही कडू असते. या पेंडीनें वाळवी कमी पडते. या पेंडींत शेंकडा ५ पर्यंत नायट्रोजन असतो. उंडी- ही कोकणांत मिळते. हिचा खताकडे जुजबी उपयोग होतो. मोहा:- ही गजराथेंत मिळते. पंचमहाल जिल्ह्यांतहि थोडया प्रमाणानें गुरांनां चारतात. ही पेंड देऊन ताबडतोब ऊंस लावल्यास पेराचे डोळे भरतात. ऊंस उगवून आल्यावर ती दिल्यास वाईट परिणाम होत नाहीं.

पेंडींतील मुख्य पोषक द्रव्ये नायट्रोजन हें होय. त्याची वर्गवारी पुढीलप्रमाणें आहे. तुलनेकरितां शेणखत, सोनखत, मेंढयांचें खत, घोडयाची लींद व कृत्रिम खतें वगैरेंचे आंकडे दिले आहेत.

खताचें नाव नायट्रोजन
शेंकडा
बाजारभाव दर टनास
रु. आ. पै
नायट्रोजन दर पौंडास
रु. आ. पै.
 शेणखत  ०.७  ६- ८-०  ०- ५- ६
 सोनखत  १.०  ११- ४-०  ०- ८-०
 मेंढयांचें खत  १.०  ११- ४-०  ०- ८-०
 घोडेखत  ०.५  ५- ८-०  ०- ८-०
 एरंडीची पेंड  ४.०  ६५- ४-० ०- ११-८ 
 करडई  ६.५  ९३- ४-०  ०- १०-३
 भुईमूग पेंड  ७.०  ६५- ४-०  ०- ६-८
 कारळा पेंड  ५.०  ४२- १२-०  ०- ६-८
 सरकी ”  ५.०  ४६- १२-०  ०- ६-८
करंजी ” ४.० ३७- ४-० ०- ६-८
मासळी ७.० ८४- ०-० ०- ८-७
कसाईखान्यांती रक्त वगैरे १०.० १६०- ०-० ०- ११-५
सल्फेट ऑफ अमोनिया २०.० २६५- ०-० ०- ९-७
नायट्रेड ऑफ सोडा १४.० २८०- ०-० १- ०-०
नायट्रेड ऑफ पोटॅश १२.० १६८- ०-० ०- १०-०
नायट्रेड ऑफ लाईम १३.० २००- ०-० ०- ११-०


कृ त्रि म ख तें.- सर्व तर्‍हेच्या पिकांस मुख्यत्वेंकरून तीन पोषक द्रव्यांची जरूरी असते. तीं नायट्रोजन, पोटॅश व फॉस्पेरिक अ‍ॅसिड हीं होत. या तिन्हींपैकीं हिंदुस्थनांतील जमिनींत नायट्रोजन द्रव्याचा फार तुटवड आहे. अशीं एक किंवा दोन पोषक द्रव्यें असणारी खतें यांस कृत्रिम खतें म्हणतात. अशा खतांचा उपयोग यूरोप, अमेरिका वगैरे ठिकाणीं फार प्रमाणानें होत असून तिकडील शेतीचें उत्पन्न बरेंच वाढलें आहे. आपले इकडे जेथें यूरोपियन मळेवाले आहेत अशा ठिकाणींच फक्त कृत्रिम खतांचा उपयोग होऊं लागला आहे. अशीं ठिकाणें सीलोन, म्हैसूर, कूर्ग, आसाम, बहार, बंगाल वगैरे होत. हल्ली सर्वमान्य जें शेणखत त्याचा पार तटवडा भासूं लागला आहे आणि ज्या ठिकाणीं पाऊस पुरेसा पडतो किंवा कालव्यावर पिकें करतात तेथें हें खत फारच महाग होत चाललें आहे. नीरा कालव्यावर जेथें जास्त बागाईत आहे तेथें तर वाळलेलें शेणखत व मेंढयाबकर्‍यांच्या लेंडया या बाहेर गांवांतून पोत्यांत भरून विकण्यास येतात. दर पोत्यास ४ ते ६ आणे किंमत पडते. ज्या ठिकाणीं उंसाच्या पिकाला दर एकरीं ५०।६० गाडया खत द्यावें लागतें तेथें खत देणें फार खर्चाचें झालें आहे. पैसे असले तरी सुध्दां खत मिळत नाहींसें झालें आहे. शेणाच्या ब-याच गोव-या सर्पणाकरितां लावतात. व जेथें सर्पणाचा तुटवडा आहे तेथें हें सर्पण वापरणे बंद होणें शक्य नाहीं. जेव्हां शेणखत मिळेनासें झालें तेव्हां लोक सहजच पेंड, मासळी, हाडाची पूड, खाटकाच्या येथील रक्त वगैरेचा उपयोग करूं लागले. पण जसजसा पेंडीचा, मासळीचा वगैरे जास्त खप होऊं लागला तसतशीं खतें महाग होऊं लागली गळिताच्या धान्याच्या पेंडी येथें जास्त प्रमाणांत होऊं लागल्याशिवाय पेंडीचे भाव उतरत नाहींत. ज्या अर्थी शेणखताची महर्घता होऊं लागली आहे, पेंडीचा व मासळीचा भाव वाढूं लागला आहे, हांडांनां परदेशांत जास्त किंमत येऊं लागली आहे त्याअर्थी हिंदुस्थानांत कृत्रिम खतांचा प्रसार झाल्याशिवाय गत्यंतरच नाहीं. ह्या खतांकरितां हिंदुस्थान देश सर्वस्वी यूरोपवर अवलंबून राहील; कारण हिंदुस्थानांत सांपडणारी खतें म्हणजे उत्तरहिंदस्थानांत सांपडणारा हलक्या दर्जाचा सुराखार, मध्यप्रांतांत फारच थोडया प्रमाणावर तयार होणारें सलफेट ऑफ अमोनियाचें खत व दक्षिण हिंदुस्थानांत सांपडणारे फॉस्फरिक अ‍ॅसिडचे खनिज पदार्थ होत. (असें जरी आहे तरी नायट्रेट तयार करण्याचे कारखाने इकडे निघण्यासारखे आहेत.) बाकी सर्व खतें बाहेरूनच येतात, व पुढें दिलेल्या आंकडयांवरून हें प्रमाण वर्षानुवर्ष वाढतच आहे असें दिसून येईल.

सन. टन.
१९०९।१० ८६३
१९१०।११ १३३९
१९११।१२ ३७७४
१९१२।१३ ५४००
१९१३।१४ ८२३४


कृत्रिम खतांची आयात बहुतेक कलकत्ता व मद्रास या बंदरांतच झालेली आहे. सन १९१३।१४ सालची कृत्रिम खतांच्या आयातीची छाननी केली तर खालीं नमूद केलेलीं खतें आलीं असें दिसून येईल. (१) सल्फेट ऑफ अमोनिआं २२६ टन; पैकीं शेंकडा ८० मद्रासेस खपला. (२) नायट्रेट ऑफ सोडा २८० टन; (३) नायट्रेट ऑफ लाईम ६०३ टन; हें सर्व मद्रास इलाख्यांत खपलें. (४) नायट्रोलिम १२३॥ टन. (५) फॉस्फेट्स् (बेसिक स्ल्याग खेरीज); सुपर फास्फेट्स ८५० टन; (६) बेसिकस्ल्याग १८७४॥ टन. हें बहुतेक मद्रासेस खपलें. (७) पोटॅश खतें १८७९ टन बहुतेक मद्रासेंत खपलीं. (८) मिसळलेली वगैरे खतें २३९० टन; सर्व कलकत्यांत उतरलीं गेलीं. वरील खतांपैकी पहिलीं चार नायट्रोजन द्रव्य पुरविणारीं आहेत. सल्फेट ऑफ अमोनिया या खताचा हिंदुस्थानांत जास्त उपयोग होण्याचा संभव आहे. हें खत कोळशाच्या खाणी व धुराचे कारखाने वगैरे जेथें आहेत तेथें तयार करतां येतें. मुंबई इलाख्यांत हें खत तयार होण्याची सोय दिसत नाही. मुंबई येथील गॅसवर्क्समध्यें प्रयत्न करण्यांत आले होते. परंतु खत तयार करण्यास लागणारा खर्च परवडत नसल्यामुळें हें खत करण्याचें काम बंद झालें. मध्यप्रातांत सांकची येथें टाटाच्या लोखंड व पोलादाच्या प्रचंड कारखान्यांत सल्फेट ऑफ अमोनियाचें खत तयार होऊं लागलें आहे; परंतु माल फार थोडा तयार होतो. बंगाल्यांत सुध्दां हें खत तयार होतें, तथापि याचा खप जसजसा वाढेल तसतसें या खताकरितां सर्वस्वीं बाहेरील देशांवर अवलंबून रहावें लागेल. मद्रास इलाख्यांत याचा प्रसार बराच झाला आहे व मुंबई इलाख्यांतहि कांहि पिकें या खतानें फायदेशीर पडूं लागलीं आहेत. नायट्रोजनयुक्त खतांपैकीं हें खत जास्त महत्वाचें आहे. चांगल्या नमुन्यांत शेंकडा २० टक्केपावेतों नायट्रोजन असतो. याचा परिणाम हें खत स्वतंत्र रीतीनें अगर इतर खतांशीं मिसळून दिल्यास तीन चार आठवडयांत पिकांत फरक दिसून येतो. पिकें हिरवीं गार दिसूं लागून जोरांत वाढू लागतात. ज्या जमिनींत चुना व फॉस्फेट्स भरपूर आहेत तेथें हें खत देणें चांगले. तृणधान्यासारख्या पिकांनां हें खत दर एकरी. १- हंड्रेडवेट पुरें आहे. हल्लीं हें खत इतर खतांशीं मिसळून चहाचे मळेवाले जास्त प्रमाणांत उपयोगांत आणितात. हें उंसाला पेंडी वगैरे इतर खतांबरोबर मिसळून दिल्यास उत्पन्न जास्त येतें, असें साधारणपणें मुठा व नीरा कालव्यांवरील प्रयोगांत सिद्ध झालें आहे.

उंसाला या खताचें दर एकरी प्रमाण पुढीलप्रमाणें आहे. ३०-३५ गाडया शेणखत सरी काढण्यापूर्वीं देणें. ३३६ पौंड सल्फेट ऑफ अमोनिया यापैकीं ११२ पौंड पहिली खुरपणी झाल्यानंतर व २४ पौंड ऊंसबांधणीच्या वेळीं. १२०० पौंड करडीची अगर २४०० पौंड एरंडीची पेंड हें खत ऊंस बांधणीच्या वेळीं देणें.

देशावरील मिरच्या वगैरे इतर बागाईत पिकांनाहि हें खत इतर खतांबरोबर मिसळून दिल्यास चांगला परिणाम होतो.

मिरच्या:- मिरच्या लावण्यापूर्वीं ३ टन शेणखत व मागाहून दर एकरीं सल्फेट ऑफ अमोनिआ ६० पौंड, सुपरफॉस्फेट २२४ पौंड, सल्फेट ऑफ पोटॅश १८० पौंड. या खतांचे मिश्रण करून पीक उभें असतांना थोडें तीन वेळ द्यावयाचें.

कांदे.- प्रथम दर एकरी १० टन शेणखत; मागाहून दर एकरीं ३७५ पौंड सल्फेट ऑफ अमोनिया; तीन वेळ वरखत द्यावयाचें. नायट्रेट ऑफ सोडयाचा उपयोग सल्फेट ऑफ अमोनियासारखाच होतो.

लसूनणघासः- प्रथम दर एकरी ४ टन शेणखत व मागाहून सुपर फॉस्फेट २४३ पौंड व सल्फेट ऑप आमोनिया १५ पौंड यांचें मिश्रण दिल्यास पीक चांगलें येतें.

केळीः- रेताड जमीन, रहाटाचें पाणी (जि. ठाणें). १०० केळींच्या झाडांना खालील प्रमाणांत खत फायदेशीर आहे. एरंडीची पेंड ४०० ते ४५० पौंड. सल्फेट ऑफ पोटॅश ७० पौंड. सुपर फास्फेट ८० पौंड या सर्वांचें मिश्रण करून पहिले तीन महिने दरमहा थोडथोडे देणें.

नायट्रेट ऑफ पोटॅश- यांत नायट्रोजन व पोटॅश हीं दोन्ही पोषक द्रव्यें आहेत. हें उत्तर हिंदुस्थानांत व बहार, संयुक्तप्रांत व मद्रास इलाख्यांत तयार करितात. यांत शेंकडा १३ आणि १४ नायट्रोजन. ४०-४६ पावेंतों पोटॅश असतो. याचा स्फोटकद्रव्यें तयार करण्याकडे विशेष उपयोग होत असल्यामुळे तें महाग विकतें.

नायट्रेट ऑफ सोडा.- हें खत दक्षिण अमेरिकेंत चिली प्रांतांत सांपडतें. यांत शेंकडा १५.५ नायट्रोजनचें प्रमाण असतें. हल्लीं चार पांच वर्षे याचा उपयोग बंगाल व आसाम येथें वाढत्या प्रमाणावर होऊं लागला आहे. लढाईपूर्वीं मुंबई येथें याचा भाव दर टनीं २१० रुपये होता. नायट्रोजन देणा-या व सर्वांत लवकर द्राव्य स्थितींत येणा-या खतांपैकीं नायट्रेट ऑफ लाइम खेरीजकरून याचा पहिला नंबर लागतो खत दिल्यापासून ८-१० दिवसांनीं पीक हिरवेंगार दिसूं लागतें. व जोरास लागतें. या खतांत दोन अवगुण आहेत. पहिला हें खत दमट हवेंतील ओलावा तात्काल शोषण करून घेतें व दुसरा हें खत दिल्याबरोबर जर जोराचा पाउस पडला तर तें पाण्याबरोबर वाहून जातें. याकरितां खत दिल्यावर चार दोन दिवस पाऊस पडणार नाही अशी उघाडी पाहून खत द्यावें.

ज्या पिकांस सल्फेट ऑफ अमोनियाचा उपयोग होतो त्या सर्वांस हें खत उपयोगाचें आहे. हें खत बंगाल्यांत भाताला फायदेशीर पडतें. या खताचा इतर खतांशीं मिसळून काळया जमिनींत बागाइतांत व तंबाखूला चांगला उपयोग झाला आहे. दर एकरीं मिश्रणाचें प्रमाणः-

नायट्रेट ऑफ सोडा २८५ पौंड.  सुपर फॉस्फेट ३३६ पौंड. सल्फेट ऑफ पोटॅश २२४ पौंड. बटाटयालाहि याचा चांगला उपयोग होतो.

ज्या ठिकाणीं पाऊस खात्रीचा आहे व जेथें पाण्याची सोय आहे अशा ठिकाणीं कापसाला पुढील खताचा चांगला उपयोग होता. शेणखत; दर एकरीं १५ गाडया. कृत्रिम खत- दर एकरीं नायट्रोट ऑफ सोडा १७० पौंड, सुपर फास्फेट ११२ पौंड, सल्फेट ऑफ पोटॅश १५० पौंड.

नांगरटीच्या पूर्वीं दर एकरीं दोन टन शेणखत, नंतर बीं पेरण्याच्या वेळीं २०० पौंड सुपर फास्फेट व पीक दोन महिन्यांचें झालें म्हणजे १३५ पौंड नायट्रेट ऑफ सोडा द्यावा. या खतानें पीक लवकर तयार होतें असा अनुभव आहे.

नायट्रेट ऑफ लाइम.- हें खत विजेच्या योगानें हवेंतील नायट्रोजन घेऊन तयार करितात. या खताचा नायट्रेट ऑफ सोडयाप्रमाणेंच उपयोग होतो. हें खत हवेंतील ओलावा लवकर शोषण करून घेतें. या खतांत शेकडा ११.५ नायट्रोजन असतो. या खताला दर टनाला १४० रुपये पडतात. खतांत भेसळ पुष्कळ असते म्हणून खात्रीशिवाय हें खत घेऊं नये. याचा अद्यापि फारसा प्रसार झालेला नाहीं.

नायट्रोलिम- (कालशियम सायनामाइड) हें कृत्रिम खत अगदीं नवीन आहे. हें इ. स. १९०८ साली पहिल्यानें प्रचारांत आलें. हें खत हवेंतील नायट्रोजन घेऊन तयार करितात. यांत चुना बराच असतो. या चुन्याचा जेथें जास्त पाऊस पडतो, अगर जेथें जमिनींत ओलावा रहातो अशा ठिकाणीं जास्त उपयोग आहे. या खताचा सल्फेट ऑप अमोनियापेक्षां पिकांनां जरा उशिरा उपयोग होतो. या खतांत शेंकडा १०,१२ टक्के व कित्येक वेळी १५ पावेतों नायट्रोजन असतो. लढाइपूर्वीं कलकत्यास या खतास दर टनी २०० रुपये किंमत होती. यांत कित्येक वेळां भेसळ असते. या खताचा खप हिंदुस्थानांत झपाटयानें होत आहे. इ. स. १९१३-१४ सालीं मद्रास बंदरांत हें खत १२३ टन आलें. इ. स. १९१५ सालीं कलकत्यास हें खत १३०० टनावर चहाच्या मळेवाल्यांत खपलें. या खताचा वरखताच्या कामीं फारसा उपयोग होत नाहीं. तें झाडांच्या भोंवतालची जमीन खोल खणून त्यांत घालावें व खड्डा परत भरून टाकावा. इतर पिकांकरितां हें खत सुमारें एक महिना बीं पेरण्यापूर्वीं घालावें. हें खत दर एकरी १५० पौंड घालावें. याचें मिश्रण सुपरफॉस्फेटबरोबर दिल्यास पिकांना चांगलें मानवतें.

फॉस्फेट्स.- फॉस्फेट व बेसिक यांचा उपयोग हल्लीं सिलोन, दक्षिणहिंदुस्थान, बंगाल व आसाम येथें युरोपियन मळेवाले चहा, कॉफी वगैरे पिकांना करतात. हें खत इतर पिकांना देण्याची अद्यापि फार वहिवाट नाहीं. तथापि मुंबई इलाख्यांत सुपरफॉस्फेट जेव्हां इतर कृत्रिम खतांशी मिसळून तांबखू, बटाटे, मिरच्या, कांदे, लसूणघास व केळीं या पिकांना दिला तेव्हां त्याचा चांगला परिणाम झालेला आहे. काळया जमीनींत नायट्रोजनच्या खालोखाल फॉस्फेट व नायट्रोजनयुक्त खतें जेव्हां मिसळून वापरण्यांत येतात तेव्हां त्यांचा चांगला उपयोग होतो.

फॉस्फेरिक अ‍ॅसिड पुरविणारी खतें.- सुपर फॉस्फेट ऑफ लाईम.- हें खत फॉस्फरिक खडकाचा भुगा करून त्यावर सल्फ्युरिक अ‍ॅसिड घालून तयार करतात. हे खडक इतर देशांत पुष्कळ सांपडतात. हिंदुस्थानांत यमुना नदीच्या कांठी कांहीं भागांत हे आढळतात.

डिझॉल्व्हड् बोन्स:- हें खत वरच्याप्रमाणेंच आहे. पण यांत हाडांच्या ५ भाग पिठावर एक भाग अ‍ॅसिड घालून तयार करितात. हें एकरी १ ते २ हंड्रेडवेट्स द्यावें.

हाडे:- यांत शेंकडा चार नायट्रोजन, पन्नास फॉस्फेट ऑफ लाइम व चोवीस फॉस्फरिक अ‍ॅसिड असतें.

बेसिक स्लॅग- बेसिक स्लॅग नांवाचें फास्फरिक अ‍ॅसिड पुरविणारें खत लोखंडापासून पोलाद तयार करीत असतां जो फास्फरस् बाहेर पडतो तो चुन्यांत धरतात. नंतर त्याचें खत तयार करितात. हें एकरी ५ हंड्रेडवेट्सपावेंतों द्यावें. यांत शेकडा १५ ते १७ पावेतों फॉस्फरिक अ‍ॅसिड असतें.

पोटॅश खतें:- आपल्याकडे पोटॅश मिळणारें खत म्हटलें म्हणजे चुलींतील, गिरण्यांतील, रेल्वेंतील (लाकडे जाळतात तेथील)  व गुर्‍हाळांतील राख होय. परंतु ही राख फारच थोडी उपलब्ध असते. या खतापासून बटाटे, मिरची, वांगी, टमाटे वगैरे पिकांना जास्त फायदा होतो. हें खत एकरीं २ ते ४ हंडेडवेट्सपर्यंत द्यावें. जगामध्यें पोटॅश खताचा मोठा साठा म्हणजे जर्मनींतील स्टॅस्फर्ड येथील खाणी होत. लढाई सुरू झाल्यापासून हें खत येणें बंद झालें आहे. इ. स.१९१४ सालीं दक्षिण हिंदुस्थनांत हें खत १९०० टन आलें. हें खत इतर खतांशी मिसळून दिल्यास चांगला उपयोग होता. देशावर तंबाखूला व रेताड जमीनींत वसई वगैरेकडे केळींच्या पिकाला या खताचा चांगला उपयोग होतो. गोवा प्रांतांत नारळीच्या झाडांना हें खत मानवतें. २५ पौंड शेणखत, २ पौंड पेंड, २॥ पौंड हाडांची पूड, १ पौंड सल्फेट अगर म्यूरिएट ऑफ पोटॅश व अर्धा पौंड साधें मीठ या सर्वांच्या मिसळींचे खत दर झाडास द्यावे.

ही जर्मन खतें निरनिराळ्या नांवांखालीं मिळतात. कायनीट, यांत शेंकडा १२-१२॥; म्यूरिएट ऑफ पोटॅश, यांत ५० ते ५७; सल्फेट ऑफ पोटॅश, यांत ४४ ते ५२; सिलव्हानाईट पोटॅश, यांत १६ ते १७ टक्के पोटॅश असतो.

अलीकडे पोटॅश खताची खाण अ‍ॅबिसीनिया येथें सांपडली आहे. त्या खाणींत ८५००९० टन खत मिळेल असा अंदाज आहे. त्यांत पोटॅशचें शेंकडा प्रमाण ५५ असतें.

एक टन केळीच्या खुंटांत १८८ पौंड घनपदार्थ असतो व त्यात पोटॅश शेंकडा १३.७ अगर अजमासें पॅसिफिक किना-यावर सांपडणा-या केल्प नामक तणाच्या २/३ असतो. केळयाच्या सालींत सर्व पोटॅश शेंकडा १.०५ असून घनपदार्थांत ९.०३ पौंड पोटॅश असतो.

समुद्रांतील शेवाळ.- या खताचा त्यांतील पोटॅशकरितां विलायतेकडे जास्त प्रयोग उपयोग करितात. लढाई सुरू झाल्यापासून पोटॅश तयार करण्याचे तिकडे मोठमोठे कारखाने उभारण्यात आले आहेत. काहीं काहीं शेवाळीच्या जातींत तर शेंकडा ५.२० पावेतों पोटॅश व थोडा नायट्रोजन सांपडतो. शिवाय त्यांत फास्फेट्स, चुना, मॅग्नीशिया व साधें मीठहि असतें. हें खत बीट, असपरागस् वगैरे पिकांनां चांगलें मानवत असून शिवाय त्याच्या अंगीं कृमिनाशक गुण आहे. आपल्याकडील समुद्रकिनारीं कांहीं भागांत शेवाळ सांपडतें.

केल्प नांवाच्या शेवाळीच्या जातींत पोषकद्रव्यें जास्त प्रमाणावर असतात. केल्पच्या एक टन खतांत ४.६ पौंड नायट्रोजन, १.२ पौंड फॉस्फेरिक ऍसिड व ६.२ पौंड पोटॅश असतो.

राखः- प्रत्येक शेतक-याला मिळण्याजोगें दुसरें खत म्हटलें तर 'राख' होय. राखेंत फॉस्फेट्स, पोटॅश, चुना, मॅग्नीशिया व गंधक हे पदार्थ कमी जास्त प्रमाणानें असतात. यात पोटॅश हा महत्वाचा आहे. उंसाच्या रानांत खंडोगणती राख मिळण्याजोगी असते. खतांतील खड्डयांत राख न मिसळतां ती जर वेगळी ठेविली तर त्या खतापासून साधारण सर्व पिकांस फायदा होतो. यांतील द्रव्यें द्राव्यस्थितींत असतात. राखेंत क्षार असल्यामुळें पिकांस नुकसान करणा-या   किडयांचा नाश होतो. राखेच्या खताचा द्विदल धान्यांस त्याप्रमाणेंच बटाटे, मिरच्या, वांगी, टमाटे वगैरे पिकांस चांगला फायदा होतो. लांकडाच्या राखेंत शेंकडा १ ते ५ भाग पोटॅश असतो.

काजळीः- मोठमोठया कारखान्यांत उंच चिमण्यांतून काजळी धरते, ती गोळा करून तिचा खताकडे परदेशात उपयोग करितात. या काजळींत शेंकडा २ ते ३ पावेतों अमोनिया असतो. या खाताचा पोषक द्रव्याऐवजी कृमींचा नाश करण्यांत जास्त उपयोग होतो. हें खत कांद्याच्या तरवांत तिकडे मुद्दाम वापरतात. दर एकरीं सुमारें १० हंड्रेडवेट पावेतों हें खत द्यावें.

चुना:- आपलेकडील जमिनींत चुन्याचा अंश पिकांना पुरेसा आहे. चुना जमिनीस दिला असतां तो पिकांस पोषक द्रव्य पुरवून शिवाय याचा परिणाम जमिनींतील झाडपाल्यावर व तिच्या पोतावर होतो. चिकण जमिनी ढिसूळ होतात. व रेताड जमिनी बांधल्या जातात. चुना दरएकरीं १ ते २ टनपावेतों द्यावा.

शिरगोळे (जिप्समद्य लँडफ्लास्टर).- यांत गंधक व चुना हे दोन पदार्थ असतात. जिप्सम् कच्छ, काठेवाड व पंजाब प्रांतातील कोहाट जिल्ह्यांत विशेष आढळतो. पुणें जिल्ह्यांतहि हा थोडा थोडा आढळतो. इकडे याचे खडे भाजून त्याचा चुना भिंतीला लावण्यास उपयोगांत आणितात. अमेरिकेंत व कानडांत हें खत कडदण धान्यांच्या पिकांनां देतात. शिवाय याची पूड गुरांच्या मागें गोठयांत टाकितात. या पुडीच्या अंगी मुतांतील अमोनिया ओढून घेऊन तो राखून ठेवण्याची शक्ति आहे.

मीठः- आपण मीठ खातों तेंच कांही जातींच्या पिकांना अगदीं अवश्य आहे. ताड, माड, आंबे, कोबी इत्यादि पिकांना जमिनींत मीठ घातल्यास पीक जास्त येतें. गोवा प्रांतांत दर दोन वर्षांनीं भातखांचरांत मिठाचें खत देतात. या देशांत मिठावर कर असल्यामुळें शेतकर्‍यांनां खताप्रमाणें याचा उपयोग करणें फारच अशक्य आहे. कोंकणप्रांतात चांगल्या मिठांत कांही दुसरे पदार्थ मिळवून तें खाण्याच्या नालायक बनवून माफक दरानें शेतकर्‍यांनां खताच्या उपयोगाकरितां विकलें जातें. मिठाच्या योगानें झाडाची वाढ खुंटते व देंठ बळकट होऊन पीक जोमदार येतें. यांच्या योगानें कीटक मरतात व तणे कमी होतात. दर एकरी भाताच्या पिकास ४००-८०० पौंड पावेतों मीठ द्यावें.

भाजलेली मातीः- कारवार जिल्ह्यांत कांहीं कांहीं ठिकाणीं माती भाजून तिचा खताकडे उपयोग करितात. या मातीचें खत ऊंस व भाजीपाला याला देतात.

मिश्र खतः- हें खत म्हणजे अठरा धान्यांचें कडबोळें होय. या खतांत प्राणिजन्य व वनस्पतिजन्य जें जें काहीं मिळेल तें एकवट करून खत तयार केलेलें असतें. कोंबडीं, बदकें यांची विष्टा, झाडपाला तणें, शेतांतील व गांवांतील केरकचरा, शिंपा, हाडें, राखुंडा जें काय सापडेल तें एकवटून ढीग करवा. पहिल्यानें जमिनीवर मातीचा थर द्याव. त्यावर झाडपाल्याचा थर आंथरून त्याच्यावर वरील प्रकारचे थराआड थर देऊन ढीग झाला म्हणजे त्याजवर मुतारी अगर पुरेसें पाणी टाकून तो ओला ठेवावा; व तो ढीग दर दोन महिन्यांनी दोन तीन वेळ परतावा. अशा रीतीनें तो चांगला कुजला म्हणजे शेतांत घालण्याला योग्य होतो. ढिगाची रुंदी ४ फूट, लांबी ७ फूट व उंची सुमारें ३-४ फूट असावी.

सांडपाणीः- मैलामातींत, कचर्‍यांत वगैरे मिसळून त्याचा शेताकडे उपयोग करणें हें शेतकी दृष्टया फार चांगलें आहे. परंतु शहरांतील घाण काढून त्याचा चांगला उपयोग कसा करावा हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे. हल्ली बहुतेक सर्व शहरांतील सर्व घाण धुवून नदींत, ओढयांत अगर समुद्रांत जाते. समुद्रांत जाते त्याचा जास्त विचार करण्याचें कांहीं कारण नाही. परंतु नदींत अगर ओढयांत सोडणें फार धोक्याचें आहे. कारण लोक त्यांतीत पाणी पितात व म्हणून त्यापासून नानातर्‍हेचे रोग होण्याचा संभव आहे. असें होऊं नये म्हणून शहरांतील सांडपाणी स्वच्छ करून तें लांब नेऊन त्या पाण्यावर पिकें करावी.

या शुद्ध पाण्यावर पुणें येथें प्रयोगक्षेत्रांत ऊंस, लसूणघांस, गिनीगवत, कडवळ, सुरण, हळद, कांदे व इतर भाजीपाला उत्तम येतो, असा अनुभव झाला आहे. या पाण्यांत खताचा अंश असल्यामुळें केव्हां नुसतें साधें पाटाचें पाणी द्यावें लागतें. अहमदाबाद व कराची येथें सांडपाणी शुद्ध न करितां तसेंच शेतावर नेऊन सोडिलें जातें व तेथेंहि कडवळ, उत्तम भाजीपाला, वगैरे पिकें रेताड जमीनींत चांगलीं येतात. कराचीला मका, गिनीगवत, हरळी, वगैरेंचें उत्पन्न फारच येतें. पुणें येथील म्युनिसिपालिटीकरितां सांडपाण्यावर पिकें करण्याचे प्रयोग शेतकीखात्यानें सन १९०५।३, १९०३।४ व १९०४।५ या सालीं पुणेनजीक मांजरी येथें केले. या प्रयोगांत मिक्सिंग् टँक सॅप्टिक टँक, बॅक्टीरिया बेड्स् व सँड फिल्टर्स हीं बांधलीं होतीं. या प्रयोगाला लागणारा मैला व मूत पुण्यापासून सात मैलांवर शेत होतें तेथें नेण्यांत येई. मुंबई येथील प्रयोगावरून असें ठरविण्यांत आलें होतें कीं, एक मनुष्यापासून रोज ६ औंस मैला व ४० औंस मूत उत्पन्न होतें. या आंकडयांवरून व प्रत्येक माणूस रोज २० गॅलन पाणी वापरतो असें धरून खत मिक्सिंग टँकमध्ये तयार करीत. दर खेपेस १४ गॅलन मैला, १७०० गॅलन मूत हीं तलावांत टाकून एकंदर मिश्रण ५००० गॅलन होईल इतकें पाणी मिसळीत. हें पाणी तयार झालें म्हणजे तें सेप्टिक तळयांत सोडून तेथें तें २४ तास ठेऊन नंतर पिकाला देण्याकरितां सोडीत. परंतु त्या पाण्याला थोडीशी घाण येई. दुस-या प्रयोगांत सेप्टिक तळयांतील पाणी २४ तासानंतर पुन्हां बॅक्टीरिया बेड्स्मध्यें २ तास राहूं देत व नंतर शेतांत सोडीत. यांतील पाणी जास्त स्वच्छ होई व त्याला घाण येत नसे. सेप्टिक टँकमध्ये आल्ब्युमिनाइड नायट्रोजनचा अमोनियाकल नायट्रोजन बनतो. तेंच पाणी बॅक्टरीया बेड्समध्यें ठेविलें म्हणजे अमोनियाचे नायट्रेटस् तयार होतात. सन १९०५ सालीं प्रसिद्ध झालेल्या सुवेझ फार्मच्या रिपोर्टावरून खालीं दिलेले आंकडे फक्त सेप्टिक टँकमधून एकदम शेतांत पाणी नेऊन त्यावर केलेल्या पिकांचे आहेत. या आकडयावरून मुतारीच्या पाण्यावर बहुतेक सर्व तर्‍हेचीं पिकें होतात असें सिद्ध होतें.

सुवेझ फाम-सांडपाण्यावरील पिकें
साल  सांडपाणी एफ्लुअंट
दर एकरीं गॅलन्स 
 एफ्लुअंट किती
वेळां दिलें 
 साधें पाणी किती
वेळां दिलें 
   दर एकरीं  पिकांचें नांव. 
उत्पन्न वजन पौंड   उत्पन्न रुपये खर्च रुपये 
 १९०२।०३  २०,५८,०००  ३०  ७  ७९८८ ऊं.९६७८ गूळ  ४८७  २९१ नवा उंस 
 १९०३.०४  १५,०७,४९५  २६  १२  ५९१२४” ७५२३ ”  ३८० १५७  खोडवा उंस 
 १९०४.०५  ५,६१,९३५  १०  ९  ३५१७
२९३०
१३८ ९४  १/२मिरची
१/२आलें
 
 १९०२.०३  ११,९५,१००  १३  ३  ३१६०७
 १५१
१६५  कांदे
 १९०२.०३  ४,३७,५००  ५  २  ३६४७ १२२ ११०  भुईमूग 
 १९०३.०४  ९,३८,८७०  १२  ३  २८४७० १२२  १२५
 हळद
१९०३.०४ १४,५१,०६४ १६ २३९२७  १५२ ८१   रताळीं

 
याशिवाय चा-याची पिकें या पाण्यावर करण्यांत आलीं. त्यांचे दर एकरीं उत्पन्न (पौंडांत) दिलें आहेः-

लसूण घास, ४१३३०; गिनी गवत, ५६३०८; निळवा (कडवळ), ४४८१६; सॉरगम (कडवळ), ५५३३२; (मका) कडवळ (उतावळी), ५५१९२;

रा ब व त्या च्या ऐ व जी ख तें.- भाताचें रोप तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक राब भाजून रोप तयार करणें व दुस-यात राबांऐवजीं तरव्यात खत घालून रोप तयार करणें. ज्या ठिकाणीं रोप तयार करण्याकरितां शेण, डहाळ (झाड झुडपांच्या लहान लहान फांद्या), गवत, पाचोळा वगैरे पसरून जमीन भाजतात त्यास राब करणें असें म्हणतात. ही राब करण्याची पद्धत कोंकण, मावळ, डांग वगैरे ज्या ठिकाणीं पाऊस पुष्कळ पडतो तेथें प्रचलित आहे. कित्येक ठिकाणीं शेळया व मेंढया बसवून त्यावर रोप तयार करितांत. दक्षिण व उत्तर कोंकणांत कोठें कोठें तरव्याच्या ठिकाणीं उन्हाळ्यांत गुरें बांधितात. सुरत, अमदाबादजवळ फक्त शेणखतावर रोप तयार करण्याची चाल आहे. कर्नाटकांत व उत्तर गुजराथ प्रांतांत जेथें जेथें ‘परभात’ करण्याची पद्धत आहे तेथें सबंध शेतालाच शेणखत देतात. दक्षिण कोंकणांत वेंगुर्ले, मालवणकडे काहीं ठिकाणीं मासळीवरहि रोप तयार करण्याची पद्धत आहे. दिवसानुदिवस भाजावळीकरितां पुरेसा राब मिळेनासा झाला आहे. उत्तरकोंकणांत राबाच्या उपयोगाकरितां मालकीचे नंबर असत. ते तोडून उध्वस्त झाले व जंगलाचा नाश झाला. राबाकरितां पुरेसा टहाळ मिळेनासा झाला. कुमरी अगर ढाली पद्धतीच्या लागवडीमुळें बरींचशी रानें जागोजागीं नाहीशी झाली. राब करण्याचें चारपांच प्रकार आहेत, त्याच्या पैकीं मुख्य दोन आहेत. एक टहाळाचा व दुसरा शेणाचा. शेणाचा राब सर्वांत उत्तम. परंतु शेण जाळल्यानें एक अतिउपयुक्त अशा पोषक द्रव्याचा नाश होतो. भातशेतीकरितां राब करणें अवश्यक व फायदेशीर आहे असें प्रत्ययास आलें आहे. डॉ. मॅन साहेब पुणें शेतकी कॉलेजचे प्रिन्सिपाल यांनीं दोनतीन वर्षे यासंबंधी प्रयोग करून पाहिले. ते म्हणतात राब भाजण्यापासून तरव्यावर मुख्य परिणाम म्हटला म्हणजे अर्ध्या इंचापासून एक इंचापर्यंत जमीन भाजणें हा हाये. ती चांगली तापल्यामुळें तिचा पोत सुधारतो व पोषक द्रव्यें जास्त द्राव्य स्थितींत येतात. भाजावळीचा शेंकडा ६० हिस्से परिणाम पोत सुधाण्याकडे होतो. पोत सुधारला म्हणजे जमिनींतून पाण्याचा झिरपा होऊन रोपटयांनां त्यापासून अपाय होत नाहीं. राब न मिळेल तर जमीन भाजण्यास उपाय डॉ. मॅन साहेब सुचवितात तो असा:- ज्या ठिकाणीं रोप तयार करावयाचें असेल तेवढया सर्व तुकडयांत राब पसरण्याच्या ऐवजीं ठिकठिकाणी मातीचे ढीग करून ते भाजून काढिले असतां बरीचशी फुकट जाणारी उष्णता वांचवितां येईल व तेणेंकरून कार्यभाग साधून राबहि कमी पुरेल. हल्लींची तरवे भाजण्याची पद्धत पाहिली तर ती मार्च महिन्यापासून ते मे महिनाअखेर (फाल्गून, चैत्र, वैशख) पावेतों चालू असते. डॉ. मॅन म्हणतात, रोपांवर चांगला परिणाम होण्यास तरवे भाजल्यापासून निदान सहा आठवडयांच्या आंत त्यांत बीं टाकलें पाहिजे. जसजसे जास्त दिवस होत जातील तसतसा भाजावळीचा उपयोग कमी होत जातो. हल्लींची भाजावळ पाहिली तर ती नांवाला राहिली आहे. कारण टहाळ किंवा गोव-या पुरेशा मिळत नाहींत व भाजावळहि फार निष्काळजानें करतात. राबाच्या पूर्वीं कित्येक ठिकाणीं जमीनहि हालवीत नाहींत व जळल्यावर राखहि इकडे तिकडे वा-यानें उडून जाते. एकदा जमीन भाजून काढिली पाहिजे म्हणून ती पाहिजे त्यावेळीं वेळ सांपडेल तेव्हां भाजून काम उरकून घेण्याची पद्धत पडली आहे.

शेतकी खात्यानें १० वर्षेपर्यंत राब करून व राबाऐवजीं इतर खतें वापरून भाताचें आवण तयार करण्यासंबंधानें प्रयोग लोणावळें (पुणें जिल्हा), रत्‍नागिरी व अलिबाग येथें केले, व अनुभवानें असें ठरलें कीं, रोपटयाला राबाची जरूरी आहे. परंतु ज्या ठिकाणी राब मिळत नाहीं त्या ठिकाणी राबाइतक्या, किंबहुना त्यापेक्षां कमी खर्चांत इतर खतें वापरून राबाइतकींच कित्येक वेळां राबाहून अधिक जोमदार रोपें तयार करतां येतात. अशा तर्‍हेची उपयुक्त खतें, तीं वापरण्याचें प्रमाण व त्यांचा राबाशीं तुलनात्मक खर्च खालील कोष्टकांत दिला आहे.

खताचा प्रकार गुंठयास खत

पौंड

गुंठयास खर्च किती
रु. आ. पै
एक गुंठयातील रोप
गुंठयास पुरेल
 मासळी  ३०  १-४-०  ७
 पेंड  ५०  १-४-०  ७ ३/४
 सल्फेटऑफ अमोनिआ  १२  १-८-०  ८ १/५
 सोनखत  २ गाडया  २-०-०  ६
 शेणाचा राब  १००० शेण
४०० ताजें गवत
१०० बारीक गवत
 ×३-०-०  ६ १/२
 टहाळ  ५०० टहाळ
३५० जाडें गवत
८० बा० गवत
 ×२-२-०  ५


(×) यांत गुसती वाहून आणण्याची मजुरी धरली आहे. राखशेण व टहाळ यांना किंमत द्यावी लागत नाहीं.

ज मि नी ला ख त दे ण्या च्या प द्ध ती.- जमिनीस जें खत घालावयाचें तें फार विचार करून घातलें पाहिजे. सर्व जमिनी एकाच प्रकारच्या नसतात. काहीं कठीण, कांही मऊ, कांही चिकण, कांही रेताड, कांही चुनखडीयुक्त तर कांही दलदलीच्या अशा असतात. जमिनींमध्यें अनेक प्रकार असल्यामुळें त्यांत निरनिराळीं द्रव्यें निरनिराळया प्रमाणांत असतात. याकरितां खत देणें तें जमिनीस व तिजवर होणा-या पिकांस योग्य असें व पाहिजेल तेवढेंच दिलें पाहिजे. असें न केल्यास जमिनीस अगर तिजवर होणा-या पिकास बिलकुल फायदा होणार नाहीं. हिंदुस्थानदेशांत उन्हाचा ताप विशेष असल्यामुळें जमिनींतील सेंद्रिय द्रव्यें हळुहळु नाहीशीं होतात. तीं वनस्पतींच्या वाढीस व पोषणास जरूर असल्यामुळें ती जेणेंकरून जमिनींत जतन होतील असे उपाय अवश्य योजले पाहिजेत. चिकण जमीन असल्यास तिच्यांत सेंद्रिय द्रव्यें फार हळुहळु कजतात; कारण अशा जमिनींत हवेचा प्रवेश लवकर होत नाहीं. तसेंच असल्या जमिनीच्या अंगी कोणतेंहि शोषून घेतलेलें द्रव्य राखून ठेवण्याची विशेष ताकद असते; रेताड अगर खडे असलेल्या जमिनींत राखून ठेवण्याची शक्ति फारच कमी असते; म्हणून अशा जमिनींत खत थोडथोडें पुष्कळ वेळां दिलें पाहिजे. परंतु ज्या जमिनीच्या अंगीं दिलेलें खत पुष्कळ काळपर्यंत राखून ठेवण्याची शक्ति असते. अशा जमिनीस एकदां खत दिलें म्हणजे तें लागोपाठ तीन वर्षे होणा-या पिकांस उपयोगीं पडतें. याकरितां काळया (चिकण) व मध्यम काळया जमिनीस तिची लागवड करण्यापूर्वीं बरेच दिवस अगोदर जरी शेणखतासारखें खत दिलें तरी त्यापासून तोटा होत नाहीं. शेणखत शेतांत नेण्यापूर्वीं तें बाहेर काढून त्याचा खड्डयाजवळ ढीग करावा. तें चांगलें कुजलें असेल तर त्याचा ढीग घट्ट दाबून ठेवावा, म्हणजे त्यांतील पोषक द्रव्यें हवेंत वायुरूपानें उडून जाणार नाहीं. जर तें चांगलें कुजलें नसेल तर तो ढीग न तुडवितां पोकळ ठेवावा व कुजण्यास सुरुवात झाली म्हणजे तो तुडवावा. तो कोरडा असल्यास त्यांत थोडें पाणी टाकावें. जर १०० पौंड शेणखत घेतलें तर त्यांत पंच्याहत्तर पौंड पाणी असतें व बाकी राहिलेल्या वाळलेल्या २५ पौंड खतांत दीड पौंड सत्वांश असतो; यामुळें हें खत तयार करण्याला, वाहून नेण्याला, पसरण्याला व जमिनीत मिसळून टाकण्याला जास्त खर्च लागतो. परंतु हा खर्च व्यर्थ होतो असें समजूं नये. कारण या खताच्या अंगीं दुसरे गुण असल्यामुळें चिकण जमिनींत हें खत घातल्यास ती भुसभुशीत होते व हलक्या जमिनींत ओलावा राहतो. शेणखतांतीत पोषक द्रव्यें पिकांना ताबडतोब मिळत नसून ती थोडथोडीं लागतील त्याप्रमाणें मिळत असतात. शेणखताचा उपयोग दोन तीन वर्षेपर्यंत होत असतो.

जमिनीला शेणखत दर एकरीं ४०।५० गाडया दिल्यास तें कुजत असतांना जमिनीची उष्णता १०।१५ अंशापर्यंत वाढते व ही उष्णता सुमारें महिना दीड महिन्यापर्यंत टिकते. यामुळें एखाद्या वर्षी पेरणीच्या वेळीं जमीन खताऊन जर वेळेवर पुरेसा पाऊस पडला नाहीं तर पीक जळूं लागतें व बिनखतावलेल्या जमिनींत तें बरें येतें. असें होऊं नये म्हणून कोरडवाहू जमिनींत खत द्यावयाचें असल्यास तें उघाडीच्या दिवसांत पीक पेरण्याच्या अगोदर सुमारें तीन महिने खत देऊन जमीन नांगरून टाकावी. म्हणजे खताचा परिणाम पिकावर वाईट होणार नाही. सोनखत ऊंस, विलायती गवत (घास), भाजीपाला वगैरे पिकांस फार मानवतें. या खताचें साधारणपणें दर एकरीं प्रमाण १५ गाडया असावें. उसाला तें ८० गाडयांपर्यंत देतात. एका गाडीला सरासरीनें ३।४ रुपये पडतात. पेंडीचें खत द्यावयाचें असेल तेव्हा पेंड चुन्याच्या घाणींत घालून मळावी व नंतर सरीखत द्यावें. हें खत उंस, केळीं, आले, हळद, मिरच्या, कांदे वगैरे पिकांना चांगलें मानवतें. उंसाला हें खत दर एकरी शेणखताशिवाय एक ते दीड टनपावेतों देत असून इतर पिकांनां अर्धा टनपर्यंत देतात.

पाण्यात त्वरित विरघळणारी खतें- नायट्रेड ऑफ सोडा, सल्फेट ऑफ अमोनिआ व सुपरफॉस्फेट हीं होत. हीं खतें बारीक करून फक्त जमिनीवर पसरून टाकण्याची काय ती मेहनत आहे. ज्या खतांत द्राव्य होण्याची शक्ति कमी आहे तीं खतें (सल्फेट ऑफ अमोनिया व सुपर फॉस्फेट) पेरणीपूर्वीं सुमारें एक महिना शेतभर पसरून कुळवावीं. केव्हां केव्हां जमिनींत पीक उभें असतांना खत देतात त्याला 'उपरीखत' 'वरखत' असें म्हणतात. अशीं थोडीं खतें जमिनींत घालणें असल्यास तीं दुप्पट तिप्पट राखेंत, रेतींत अगर मातींत मिसळून घालावीं. म्हणजे थोडें खत पुष्कळ जमिनीला पुरेल. नायट्रेट ऑफ सोडा व नायट्रेट ऑफ पोटॅश हीं खतें जमिनींत लवकर विरघळणारीं असल्यामुळें पीक उभें असतांना जेव्हां पाहिजे तेव्हांस द्यावीं. बाकी पोटॅश व फॉस्फेटिक खतें यांतील द्रव्यें जमिनीला शोषण करून राखून ठेवण्याची शक्ति असते. याला अपवाद हलकी जमीन, अति पाऊस अगर पाटाचें अतिशय पाणी हे आहेत.

इंग्लंड, जर्मनी वगैरे देशांत फार करून कृत्रिम खताचा जास्त उपयोग करतात. कारण ते देश थंड आहेत व जी खतें पिकांना तत्काळ शोषून घेतां येतील अशीं खतेंच त्यांनां तेथें उपयोगांत आणावीं लागतात. शेणखत, केरकचरा वगैरे खतांचे रूपांतर होण्यास जास्त वेळ लागतो, यामुळें हीं खतें देऊन शिवाय कृत्रिम खतांचा जास्त उपयोग करतात. याशिवाय शेतांत फेरपालटीनें गुरें बांधणें, मेंढया बसविणें, सरीखत देणें, बुडकें खत देणें वगैरे खत देण्याचे अनेक प्रकार आहेत.

ख त दे ण्या चें प्र मा णः- हें प्रमाण जमीन, हंगाम, पिकें, पाणभरती किंवा कोरडवाहू यांजवर अवलंबून असते. चिकण जमिनीला ताजें शेणखतहि चालते. रेताड असल्यास कुजलेलें खत असावें. पावसाळयात शेणखत, सोनखत वगैरे चांगलीं. रब्बी पिकांनां पेंडी वगैरे चांगल्या. पाणभरती पिकांनां जास्त खत चालतें.

पिकें व त्यांनां घालावयाच्या शेणखताचें दर एकरीं प्रमाण
पीक खताच्या गाडया
जोंधळा, बाजरी
गहूं ५-१०
भात १५-२०
बागाईत पिकें ३०-४०
ऊंस ४०-६०
वरील पिकांना कृत्रिम खतें घालावयाचें दर एकरी प्रमाण (हंड्रेडवेट)
खतें हंड्रेडवेट्
सल्फेट ऑफ अमोनिया १-१।
नायट्रेट ऑफ सोडा १-१॥
सल्फेट ऑफ पोटॅश १-२
सुपरफॉस्फेट २-३
   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .