विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे

खरार- बंगाल. मिदानापुर जिल्ह्याच्या घाटाल पोटविभागांतील एक शहर. उ. अ. २२ ४०' व पू. रें. ८४ ४४. लो. सं. (१९११) ८८३९. कांशाचीं व पितळेचीं भांडीं येथे फार होतात. १८८८ त येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. मालमत्तेवरील कराचें उत्पन्न बरेंच मोठें आहे.