विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खर्जी.- वर्हाड-मध्यप्रांत. भंडारा जिल्हा. अर्जुनीच्या उत्तरेस ही एक लहानशी जमीनदारी आहे. हींत दोन खेडीं असून एकंदर क्षेत्रफळ ४३०० एकर व लोकसंख्या १३०० आहे. देवगडच्या बखत बुलंदेने प्रतापगड किलज्याचा किल्लेदार अमरसिंग यास इनाम दिली. पुढें राघोजीरावानें त्याच्या नातवाकडेच ही जमिनदरी ठेवलीं. उत्पन्न २००० रुपये. टाकोळी ६०० रुपये. येथें एक मोठा तलाव नुकताच बांधण्यांत आला आहे.