प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे

खर्डे- मुंबई, अहमदनगर जिल्हा जामखेड तालुक्यंतील एक गांव. उ. अ. १८ ३८' व पू. रें. ७५ २९, लो. सं. (१९११) ७१३३. अहमदनगरपसून हें आग्नेयेस ५६ मैलांवर आहे. इ. स. १७९५ व निजाम व मराठे यामध्यें येथें मोठी लढाई झाली. येथें ५०० वर मोठे व्यापारी, दुकानदार व सावकार आहेत. निजामाचा सरदार निंबाळकर याकडे हा गांव होता. त्याचा सुंदर वाडा अद्याप गांवाच्या मध्यमागीं मोडकळीस आलेला असतो. गावाच्या आग्नेयेस निंबाळकरांनी बांधलेला एक किल्ला आहे किल्ल्याभोंवती एक खंदक आहे. मंगळवारी येथें भरणारा गुरांचा बाजार संबंध जिल्ह्यांत फार मोठा असतो. येथील म्युनिसिपालिटी १८९० त स्थापन झाली.

ख डर्या  ची ल ढा ई- बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनीं व्यवस्था केल्याप्रमाणें, हैद्राबादकर निजामच्या मुलुखांत चौथसरदेशमुखीचा वसूल सालदरसाल घेण्याचा हक्क मराठयांनां प्राप्त झाला होता; हें पेशव्यांनीं लादलेलें ओझें कसेंहि करून निजामला झुगारून द्यावयाचे होतें. पेशवाइंच्या स्थापनेपासून थोरल्या माधवरावांच्या अखेरीपर्यंत मराठे व निजाम यांच्यांत जीं जी युध्दें झालीं, त्या सर्वांचे मूळ कारण हेंच होय. स. १७९४ पर्यंत या चौथसरदेशमुखीची बाकी जवळ जवळ दोन कोटींवर होऊन गेली. या वेळीं टिपूकडील भांडण मिटलें होतें; तेव्हां मराठयांनीं आतां आपल्या मागणीचा लकडा निजामकडें लावला. या कामांत इंग्रजांनी पडून बाकी देण्याची कांही तडजोड करावी असा निजामअल्लीचा हेतु होता, पण इंग्रजांनीं तें नाकारलें. तेव्हां निजामअल्लीचा दिवाण मैनुद्दौला उर्फ मशीरउल्मुल्क यांने त्याला युक्ति सुचविली कीं, मराठे हे तीन कोटी तीस लक्षांचा मुलुख मागतात, तो त्यांनां निमूटपणें देण्याऐवजीं तेवढया रकमेंत फौज जमवून मराठयांशी लढाई देऊन कां पाहूं नये? ही मसलत निजामास आवडली व त्यानें मराठयांच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली. वर्‍हाडच्या उत्पन्नाची वांटणी नागपूरकर भोंसल्यास देण्याचें त्यानें मना केलें; पुण्यास त्याचे लोक येऊन मराठी फौजेंत फितूर करूं लागलें; त्यानें आपल्या कवायती पलटणींची संख्या दोन होती ती वाढवीत वाढवीत तेवीसवर आणून ठेविली; पेशव्यांचे वकील गोविंदराव काळे यांनी दोन कोटी साठ लक्षांच्या बाकीची मागणी केली असतां हैदराबांदच्या दरबारांत निजामनें श्रीमंतांची व नानांची सोंगें आणवून त्यांचा व नानांस उपमर्दकारक भाषा वापरली व त्यांचा उघड उपमर्द केला. याच सुमारास महादजी शिंदे व हरिपत तात्या फडके हे वारल्यानें, निजामनें लढाईची तयारी अधिक जोरानें व निर्भयपणें चालविली. तरी पण दुसरींकडून त्यानें पुणेंदरबारशीं समेटाचीं बोलणीं शेवटपर्यंत चालविलींच होती. निजाम अल्लीनेंच प्रथम युद्धस तोंड लोविलें; बेदर येथें त्यानें स्वतःच्या देखरेखीखाली सैन्याची तयारी चालविली. (८ नोव्हेंबर १७९४). त्याची एकंदर फौज १ लाक्ष १० हजार जमली; तिच्यासह तो बेदरहून निघून मांजरानदीच्या कांठाकांठानें मराठयांच्या सरहद्दीकडे दिसेंबरांत येऊं लागलां. इकडे पेशव्यांनीहि तयारी चालविली. दौलतराव शिंदे पुण्यांत होते; त्यांची फौज हिंदुस्थानांतून आणविण्यास पेशव्यांनी त्यांनां हुकूम सोडला.

नागपूरकर भोसले, होळकर, रास्ते, पटवर्धन, विंचूरकर, मालेगावकर, राजेबहाद्दर, घोरपडे, पाटणकर, प्रतिनिधि वगैरे कित्येक सरदार आपापल्या पथकांसह पुण्यास येऊन दाखल झाले. मुसा रेमू यानें निजामाकरितां कवायती पायदळाची पलटणें तयार केली होती त्याच धर्तीवर पेशव्यांनीहि मि. बॉइड नांवांच्या इंग्रज नोकराकडून कांही पलटणें उभारलीं होतीं. शिद्यांची कांही पलटणे पुण्यास होतीं, ती डिबाईनच्या नजरेखालीं तयार झाल्यामुळें त्यांची तयारी उत्तम प्रकारची होती. त्यांची कवायत गुलटेंकडीजवळ शिंद्यांनीं करून दाखावली, ती पाहून श्रीमंत व नाना हे खूष झाले. गोविंदराव गायकवाडानेंहि आपली फौज पाठविली होती. या खेपेस खुद्द श्रीमंताची स्वारी नानाच्या सह मोहिमेवर निघावयाची होती. यामुळें रावबाजी आनंदवल्लीस होते, ते कांही मसलत करतील म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठीं त्यांना चिमाजी आप्पा व अमृतराव यांच्यांसह तेथून हालवून शिवनेरीस आणून ठेविलें. प्रथम हुजरात गारपिरावर डेरेदाखल झाल्यानंतर ८ डिसेंबरास नाना व १४ डिसेंबरास खुद्द श्रीमंत डेरेदाखल झाले. तुकोजी होळकर हे खानदेशांत थाळनेरास होते, ते १० हजार फौजेसह ११ तारखेस पुण्यास आले. परंतु त्यांची फौज साधारणच होती. परशुरामभाऊ म्हणतात ''फौजेंत जीव नाहीं. गवगवा भारी ऐकण्यांत येतो.'' स्वारीस निघण्यापूर्वीं श्रीमंतांनी जवाहिरखाना, जामदारखाना वगैरे कारखाने व आपले कुटुंब पुरंधर व सिंहगड या किल्ल्यांवर नेऊन ठेविलें. गारपीर, वडगांव, थेऊर या बाजूंस श्रीमंतांचा मुक्काम दीड महिना होता. नंतर सर्व लष्कर एकाच मार्गानें न जातां दाणावैरणीच्या सोयीकरितां निरनिराळया वाटांनीं कूच करीत चाललें होतें. नानांनीं प्रत्येक सरदाराचा सल्ला या मोहिमेंत विचारला होता. तिकडे निजाम बेदराहून धारुरास येऊन तेथून परांडयाच्या बाजूनें कूच करून येऊं लागला. त्याच्या एका टोळीनें जोगाईचें आबें या क्षेत्राचा विध्वंस केला; दुसरीनें बारशी, पानगांव वगैरे गावें लुटिलीं. तेव्हा मराठयायचें पेंढारीहि निजामाचा मुलुख लुटूं लागलें. शत्रूचा रोख पाहून श्रीमंत नगरहून निघून सीनेकडे चालले. वाटेंत खडकत येथें जिवबादादा बक्षी हे हिंदुस्थानांतील शिंद्यांची फौस घेऊन आले. दहा हजार कवायती कंपूवर ते मुख्य असून त्यांच्या हाताखालीं मुसा पेरु (पेरॉ) होता. शिंद्याचें घोडदळ १५ हजार असून तें देवजी गवळयाच्या हाताखालीं होतें. पुढें राघोजी भोंसले हे १५ हजार सैन्यासह येऊन मिळाले. तेव्हां एकंदर मराठी सैन्याची संख्या १ लाख १३ हजार झाली. याशिवाय शिंद होळकर वगैरे सरदारांचें पेंढार होतें तें निराळेंच. विंचरणेवरील मुक्काम होईपर्यंत शिमगी पौर्णिमा आली; त्या पूर्वींच निजामअल्ली वीस पंचवीस कोसांवर येऊन ठेपल. तेव्हां हुजरात व शिंदे, होळकर, भोसले, पटवर्धन वगैरे सरदारांची मिळून ६०।७० हजार फौज १५० तोफांसह एक मजल आघाडीस जाउन राहिली; याप्रमाणें ही फौज दररोज श्रीमंताच्या मुक्कामापासून एक मजल आघाडीस असे. या फौजेचे मुख्य बाबा फडके होते. इतक्यांत निजामानें सल्ल्याचा निरोप गोविंदराव काळयामार्फत पाठविला, त्यांत चौथाईबाकी व ३० लक्षांच्या जहागिरीचे मुद्दे होते. परंतु श्रीमंतानीं एकच उत्तर केलें कीं, मशीरउल्मुल्क यास कारभारावरून काढून कैदेंत ठेवून, नबावानें आमच्या विचारानें कारभार करावां; याशिवाय बाकींच्या कलमांचा फडशा कसा तरी होईल. परंतु या दोन गोष्टी निजामानें साफ नाकारल्या व तो मोहरीचा घाट उतरून खडर्याच्या किल्ल्यानजीक खैरा नदीवर येऊन उतरला. तेव्हा शिंदे व भोंसले यांचा श्रीमंतांस निरोप आला कीं, नबाब खैरा नदीवरून उठून परांडयाच्या रोखें निघुन जाणार. तसें झाल्यास मसलत लांबणीवर पडेल. तरी त्यास अडविण्यास आम्ही सडे त्याजवर जातों. ही मसलत श्रीमंत व नाना यांनां पसंत पडून त्यांनीं परशुरामभाऊबरोबर आणखी फौज व तोफा देऊन त्यांस आघाडीवर पाठवून, फौजेच्या हालचाली व मसलत सर्व भाऊंच्या आज्ञेनुसार करावी असा आघाडीच्या सर्व सरदारांनां हुकूम सोडला. फाल्गुनी पौर्णिमेच्या दिवशीं भाऊ बाबा फडक्यांनां येऊन मिळून त्यांसह वद्य २ स (७ मार्च १७९५) २०।२५ हजार स्वारांसह सज्ज होऊन घोडगांवांस दाखल झाले. नबाब तेथून ३ कोसांवर असल्यानें भाऊ आणखी दीड कोस पुढें गेले. तिकडे निजामाहि तयार झाला. येथेंच शिंदे भोंसल्यांनीं येऊन भाऊंस मिळावें व मग तिघांनीं निजामावर चढाई करावी असा बेत ठरला होता; परंतु सायंकाळपर्यंत ते दोघे आले नाहींत, तेव्हां भाऊ परत निघालें. तें पाहून निजाम त्यांच्या पाठीवर निघाला. भाऊंनी त्याला पाटीवर घेत घेत घोडगांवांपर्यंत आणलें; तों दिवस बुडाला. इतक्यांत शिंदें आले व त्यांनी निजामावर तोफाचा मारा केला; त्यामुळें तो परत आपल्या गोटांत गेला. सर्व रात्र घोडयांवर जिनें ठेवून भाऊ हे त्यांच्या टेहेळणांवर उभे होते. पुढें वद्य ४ रोजीं (९ मार्च) निजाम १ कोस पुढें आला, परंतु मराठयांनीं तोफा सुरू करतांच त्यानें मुक्काम केला. तेव्हां त्याच्या लष्कराभोंवतीं अंतराअंतरावर मराठी फौजा रात्रंदिवस टेहेळणीवर राहिल्या. ता. ११ रोजीं बाबा फडके यांनी निजामावर हल्ला केला परंतु निजामानें तो परतविला, तेव्हां हा आपण मोठाच जय मिळविला असें समजून निजामानें रात्रीं दरबार भरवून नजराणें स्वीकारले. दुस-या दिवशीं बुधवारीं खडर्या ची मोठी लढाई झाली. निजाम खडर्याहून निघून पराडयाकडे जाण्यास निघाला, तें पाहून भाऊ हे फडके, शिंदे, होळकर व भोंसले यांच्यासह त्याच्यावर चालून गेले. त्याचें बुणगें जात होतें इतक्यांत यांनी त्याला गाठलें. शिंदे हे भाऊंच्या डावीकडे होते व भोसले हे उजवीकडे होते. उभयतांकडील सैन्यें सज्ज होऊन उभीं राहिलीं. जवळ एक टेंकडी होती, तिच्यावर जाऊन भाऊ टेहेळणी करूं लागले. इतक्यांत नबाबाकडील सरदार असदअल्लीखान व भारामल्ल हे रेमंडच्या १७ हजार कवायता सैन्यासह भाऊंवर चालून आले. त्यांची व भाऊंची झटापट झाली. त्यांत भाऊंस उजव्या बाहुटयावर व कपाळास तरवारीची जखम झाली. त्यांच्यावर लालखान नांवाच्या एका मुसुलमान सरदारानें त्यांचा घोडा मारून पट्टयानें वार चालविलें. भाऊंनीं पहिले दोन वार आपल्या पट्टयानें चुकविले, पण लालखानाच्या तिस-या वारानें त्यांच्या पट्टयाचा खोवळा तटला व ते निःशस्त्र झाले. इतक्यांत भाऊंचे चिरंजीव आप्पा यांनीं लालखानास, तो भाऊंवर चवथा वार करीत असतांना ठार केलें.परंतु त्याच्या सैन्याच्या मदतीस अफिलखान कर्नूळकर व सलाबतखान एलिचपूरकर हे आले व त्यांनी मराठयांस मागें रेटलें व भाऊ उभे होते ती टेकडीं काबीज केली या लढाईंत विठ्ठलराव पटवर्धन ठार झाले. इकडे मुसा रेमूचीं पलटणें व मोंगलांची इतर फौज यांनी भाऊच्या डाव्या बाजूस शिंदे होते, त्यांवर चाल केली. त्यावेळी शिंद्यांनी मोंगलांवर तोफांचा भयंकर भडिमार केला. पेरों यानें आपल्या ३५ तोफा एका टेंकडीवर ठेवल्या होत्या. तेथून त्यांची सरबत्ती मोंगलांवर केली. त्याच वेळी भोसल्यांकडूनहि बाणांची वृष्टीवर वृष्टी रेमूवर होऊं लागली. असा दोहींकडून मारा हो लागतांच तो मागे हटूं लागला. शिंद्यांकडील लोकांनीं नबाबाचें तोंड माघारें सारलें. तेव्हां मराठे सर्व एक होऊन नबाबावर चालून गेले. 'सरकारची हुजरात सुध्दां चाळीस हजार तरवार उठली! करोली (बंदुकीचा भडिमार) बहुत अपूर्व झाली. बाबाचे लोक बहुतेक मेले.' जीवबादादा यांनीं 'तीनशें तोफाचा खटारा पुढें लावला. आणि बावीस हजार नळी पलटणाची उभी राहिली. एकच तडाखा तोफांचा उसळला. संध्याकाळचा दिवस ६ घटका राहिला. इतक्यांत त्याला (निजामाला) वारा सोईचा होता. धूर आमच्या (मराठयांच्या) लष्करांत येऊं लागला. भाऊंनीं श्रीमंतांचे स्मरण करून वा-याची प्रार्थना केली, तेव्हा वारा तिकडे सरला. मग पानसे यांनीं थोरल्या सतरा ताफा पुढें आणल्या. त्या बहुत मोठया; एक एक तोफेस दोनशें बैल ओढावयास लागत. त्या सुरू झाल्यावर दणाण झाला. तों अस्तमान झाला. मग मशाला व हवाया लागल्या. मग विठ्ठलपंत सुभेदार यांनीं बाणाचें छत करून सोडलें आणि संर्वांनी एकदांच हरहर महादेव करून एकादांच उडया घेतल्या! मोठी लढाई मातबर झाली. मोठी ख्याति झाली! पठाण मागें पाय घेऊं लागले प्रहर रात्र झाली असें पाहून नबाब मागें फिरला मश्रुल्मुलुखहि पळाला.' याप्रमाणें निजामाचा मोड झाला. अंधारामुळें त्याच्या सैन्यांत अधिक गोंधळ माजला. मराठयांनी त्याचा पाठलाग करून पांचसातशें घोडे पाडाव केले. 'श्रीमंतांच्या प्रतापें मोठें यश सरकारच्या फौजेस आलें. शिंद्यांनी शर्थ केली. सकाळच्या चारसहा घटका दिवसांपासून शिंद्यांकडील कंपूची मारगिरी होत होती. ती बारा घटका रात्रीपर्यंत.' इतक्यांत मराठयांच्या पेंढार्‍यांनीं निजामाचें लष्कर चोहोंकडून घेरून लुटून फस्त केलें. 'नवाबाचीं ओझी लादलीं होतीं ती उतरूं पावली नाहींत.' तेव्हां निजाम घाबरून खडर्याच्या गढींत शिरला. त्याच्या तोफा, दारूगोळयाचे २।४ शें छकडे, बाजार वगैरे सर्व लष्कर मराठयांनी रात्रभर लुटलें. 'मोठी दौलत समयानुसार श्रीमंतांचे प्रतापेंकरून पेंचात आली'. दुस-या दिवशीं मराठयांनी गढीस वेढा दिला. आंत निजामाचे अन्नपाण्याशिवाय हाल होऊं लागले. वर सांगितल्याप्रमाणें त्याचा बाजार वगैरे लुटल्यामुळें एक रुपयास अच्छेर धान्य व बारा रुपयांस एक पखाल पाणी मिळूं लागलें. मराठयांनी पुन्हां त्या किल्ल्यावर तोफा डागण्यास प्रारंभ केला. तेव्हां निजामाकडून बोलणें आलें कि, आम्ही तोफा मारीत नाहीं. तुम्हीहि मना कराव्या. तुमच्या मर्जीप्रमाणेंच तहाचा जाबसाल उलगडून देण्यांत येईल. पुढें श्रीमंतांनीं तहाच्या वाटाघाटीच्या वेळीं पुढील मागण्या केल्या. (१) पूर्वीं सदाशिवराव भाऊसाहेबांनी उदगीरच्या लढाईंत जिंकलेला मुलूख होता. त्यापैकीं परांडयापासून तहत तापी नदीपर्यंतचा जितका मुलूख गेल्या ३५ वर्षांत निजामास परत देण्यात आला असेल तो सर्व त्यानें पेशव्यांना परत द्यावा. (२) गंगथडीमध्यें घांसदाण्याचा भोसल्यांचा हक्क आहे, त्याबद्दल भोसल्यास निजामानें ३ लाख १८ हजार रुपये उत्पन्नाचा मुलुख निराळा तोडून द्यावा. तसेंच भोसल्यांची वर्‍हाडच्या वांटणीपैकीं बाकी तुंबली आहे, तीबदल त्यांस निजामानें २९ लक्ष रुपये द्यावे; व पुढें वर्‍हाडांत भोसल्यांचा अंमल पूर्ववत चालू ठेवावा. (३) चौथसरदेशमुखीच्या बाकीबद्दल निजामानें पेशव्यांनां तीन कोटी रुपये द्यावे. (४) मशीरुल्मुल्क यांस पेशव्यांच्या हवालीं करावे. याप्रमाणें कलमें पाठविलीं. तीं शेवटच्या कलमाखेरीज बाकीचीं सर्व निजामानें कुरकूर न करतां मान्य केलीं. मशीरास हवालीं करणें त्याच्या जिवावर आलें. तेव्हां तो दिवाणच आपण होऊन श्रीमंतांच्या लष्करांत आला. श्रीमंतांनींहि त्याचा योग्य तो सत्कार करून कराराप्रमाणें त्यास इतमामानें नजरकैदेंत ठेवलें. मग तहाच्या यादीवर परस्परांची सखलाशी होऊन निजाम भागानगरास गेला व श्रीमंत पुण्याकडे वळले.

मराठ्यांच्या इतिहासांत सवाई माधवराव साहेबांच्या कारकीर्दींत जिच्यामध्यें सा-या मराठे सरदारांनीं भाग घेऊन शत्रूचा पूर्ण पराभव करून मराठयांचे शौर्य सर्वत्र गाजविलें अशी ही शेवटचा लढाई होय. या प्रसंगावर त्या वेळीं शाहीर लोकांनी बरींच कवनें केलीं आहेत. अ‍ॅक्वर्थ व शाळीग्राम यांनीं ती ऐतिहासिक पोवाडे या पुस्तकांत छापिलीं आहेत. अद्यापपर्यंतहि हे वीरसोत्पादक पोवाडे पुणें, सातारा, सोलापूर या भागांत गोंधळयांच्या तोंडून ऐकण्यांत येतात.

या लढाईचें वर्णन ग्रांट डफनें आपल्या इतिहासांत दिलें आहे. त्यांत, निजाम उगीचच्या उगीच पळून गेला, जय मिळाल्याबद्दल मराठयांची फुशारकी अगदीं व्यर्थ होती, सा-या लढाईंत उभयपक्षीं दोनशें सुध्दां माणूस दगावलें नसेल असें म्हटलें आहे. याबद्दल कै. वासुदेवशास्त्री खरे म्हणतात की, ''डफ साता-यास होता, त्या वेळी खडर्याच्या लढाईंत लढलेल्या पुष्कळ लोकांशीं त्याच्या गाठीं पडल्या होत्या. परंतु त्यांची हकीकत साहेबाला खरी वाटली नाहीं. आणि लढाईच्यावेळी इंग्रजांचा वकील हैदराबादेस होता, त्यानें लिहून ठेवलेली हकीकत त्यानें अक्षरशः खरी मानली, त्याचा हा परिणाम होय. मराठे व मोंगल या दोघांविषयीं त्या हैद्राबादेच्या इंग्रज वकिलाच्या मनांत तुच्छबुध्दि होती, तीच डफाच्या लिहिण्यांतहि प्रतिबिंबित झालेली दिसते. [ग्रांट डफ; खरे-ऐति. लेखसंग्रह भा. ९; खडर्या च्या स्वारीची बखर.]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .