विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खान जहान- हा अकबराच्या वेळी पंचहजारी असून याला १५७६ मध्यें बंगालचा सुभेदार नेमला होता. याचें मूळ नांव हुसेनकुली बेग असून खान जहान ही त्याची पदवी होती. बंगालचा नबाब दाऊदखान यानें अकबराविरुद्ध बंड केल्यामुळें यानें त्याचा पराभव करून व त्याला ठार मारून त्याचें डोकें आ-यास अकबराकडे पाठविलें. हा टंडा येथें १५७८ त मेला [बील-ओरिसा बॉया-डिक्श].