प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
 
खानदेश जिल्हा:- हा मुंबई इलाख्याच्या मध्यभागांतील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत व नर्मदा नदी असून पूर्वेस वर्‍हाड प्रांत व निमारचा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या दक्षिणेस सातमाल चांडोर व अजंठा हे डोंगर असून पश्चिमेस बडोदें संस्थान व रेवाकांठा जहागीर आहे. नैॠत्येस नाशिक जिल्हा आहे.

भौगालिकवर्णन- दख्खनच्या पठाराचा खानदेश हा अगदीं उत्तरेकडील भाग होय. खानदेशांतील मुख्य नदी तापी ही होय. ती सातपुडा पर्वतांत बैतुलाजवळ उगम पावून, पूर्वखानदेश व पश्चिम खानदेश या जिल्ह्यांतून वहात जाऊन सुरतेजवळ खंबायतच्या आखातास मिळाली आहे. या शिवाय गिर्ना, बोरी, पांजरा या लहान लहान नद्या खानदेशांत आहेत. निमारपासून नंदुरबारपर्यंतचा १५० मैलांचा टापू सपाट मैदान असून त्यांतील जमीन उत्तम मळीची आहे. या टापूंत पुष्कळ संपन्न शहरें व खेडीं आहेत. या शहराच्या व खेडयांच्या सभोवार अंबराया व बागा आहेत या टापूच्या उत्तरेकडील प्रदेश उन्नत आहे. खानदेशचा मध्यभाग व पूर्वभाग बहुतेक सपाट असून तो सुपीक नाहीं. उत्तर भाग वा पश्चिम भाग डोंगराळ असून त्यांत गर्द अरण्यें आहेत. या भागांत भिल्लांची वस्ती असून ते आपला उदरनिर्वाह जंगलांतील कंदमुळावर करतात. खानदेशमध्यें मुख्यतः चार डोंगराच्या रांगा पसरलेल्या आहेत. उत्तरेस सातपुडा पर्वताची रांग नर्मदा व तापी यांच्या मधून गेली आहे. या पर्वतावर तोरणमालचें इतिहासप्रसिद्ध पठार असून त्याची उंची ३३०० फूट आहे. तसेंच पंचपंडु नांवाचें एक शिखर असून तें समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंच आहे. आग्नेयेस हत्ती डोंगराची रांग आहे. दक्षिणेस सातमाल, चंडोर अगर अंजरा या डोंगराची पसरली असून या रांगेमुळें खानदेश व दख्खनपठार हीं अलग झालीं आहेत. पश्चिमेस खानदेश व गुजराथ यांनां विभक्त करणारी पश्चिमघाट पर्वताची उत्तर टोंकाकडील रांग आहे. अर्व व गाला या टेंकडयांमुळें खानदेश व नाशिक हे पृथक झालें आहेत. सातपुडा पर्वत व तापी नदी यांच्यामधील टापूंतील जमीन पुळणी आहे. याशिवाय टेंकडयावर व तापी नदीच्या दर्‍यांखोर्‍यांत बॅसाल्ट पाषाण सांपडतो. बर्‍हाणपुराहून पांच मैलांवर चुलखन खेडयाच्या ईशान्येस, एक मैलावर खडूचे दगड सांपडतात. पण या ठिकाणशिवाय खानदेशांत दुसरीकडे कोठेंहि खडूचा दगड सांपडत नाहीं. खानदेशांत चार ऊन पाण्याचे झरे असून त्यापैंकीं तीन चोपडें गांवांत व एक शिरपूर गांवांत आहे. खानदेशमध्यें अनेक प्रकारचीं झाडें झुडपें होतात. तापी नदीच्या खोर्‍यांत मोठमोठीं जंगलें असून त्यांत वृक्षांची समृद्धि आहे. त्याचप्रमाणें सातपुडा पर्वतामध्येंहि प्रचंड अरण्यें आहेत. या ठिकाणीं अंजन व शाल झाडांचें वैपुल्य आहे. शिरपूर व चोपडयाच्या आसपासच्या भागांत साग मुबलक सांपडतो. शाहडाच्या जंगलांत खैरांची झाडें विपुल असून अखातीमध्यें अंजन झाडांची समृध्दि आहे. पश्चिम घांटांच्या माथ्यावरहि अंजन वृक्षांची रेलचेल असून, सावड्याच्या आसपास गर्द वृक्षराजी आहे. खानदेशांत सामान्यतः वड, पिंपळ, पळस, महू, आम्र, उंबर व टेंभुर्णीं इत्यादि झाडें आहेत.

खानदेशमध्यें हिंस्त्र पशूंची समृध्दि आहे. वाघ, चित्ता, अस्वल, लांडगा, गवा, सांबर, हरिण, नीलगाय, गझेल इत्यादि पशू पुष्कळच सांपडतात. खानदेशच्या उत्तर भागांत पूर्वीं हत्ती फार सांपडत असत. ब्रिटिशराज्य सुरू झाल्यापासून खानदेशमधील वाघांची संख्या हल्लीं फारच कमी झाली आहे.

ह वा मा न.- खानदेशांतील प्रदेश उंचसखल असल्याकारणानें, ठिकठिकाणचें हवामान भिन्न आहे. पश्चिम भागांतील टेंकडयांच्या टापूंत व सातपुडयाच्या पर्वतांत पर्जन्य खूप पडतो. पण खानदेशच्या मध्य व दक्षिण भागांत पर्जन्याचें मान फार कमी आहे. तरी पण खानदेशांत दुष्काळ फारच क्वचित पडतो. खानदेश जिल्ह्यांत वार्षिक पर्जन्यमान २०-४५ इंच आहे. आक्टोबर ते जानेवारी महिन्यापर्यंत खानदेशची हवा फार चांगली असते. पण उन्हाळ्यांत हवा फारच उष्ण असते. खानदेशांतील पूर्व व मध्य भागांतील हवा चांगली आहे पण पश्चिमेकडील हवा अधिक उष्ण असल्यानें त्या भागांतील लोकांनां हवेचा त्रास फार होतो.

क्षे त्र फ ळ व लो क सं ख्या- खानदेख हा १९०६ पूर्वीं एकच जिल्हा होता पण १९०६ सालापासून खानदेशचे पूर्व व पश्चिम असे दोन जिल्हे करण्यांत आले आहेत. पूर्व खानदेशाचें क्षेत्रफळ १९१५ सालीं ४५२५ चौरसमैल व पश्चिम खानदेशचें क्षेत्रफळ ५५२५ चौरस मैल होतें. १९२१ सालीं  पूर्व खानदेशची लोकसंख्या १०,७५,८३७ व पश्चिम खानदेशची ६४१८४७ होती.

मु ख्य श ह रें- पूर्वखानदेशमध्यें अमळनेर, भुसावळ चाळिसगांव, चोपडा, एरंडोल, जळगांव, जामनेर, पाचोरा रावेर व यावल असे १० तालुके व पारोल, एदलाबाद व भडगांव हे तीन पेटे आहेत. पश्चिमखानदेशांत धुळें, नंदुरबार, पिंपळनेर, शाहाडा, शिरपूर, सिंदखेड व तलोदे असे ७ तालुके व नवापूर पेटा आहे. पूर्वखानदेशचें जळगांव व पश्चिम खानदेशचे धुळें हें मुख्य ठिकाण आहे. पूर्व खानदेशांत अमळनेर, भुसावळ, चाळीसगांव, चोपडा, धरणगांव, एरंडोल, जळगाव, पारोल, नसिराबद रावेर इत्यादि प्रमुख शहरें व पश्चिम खानदेशांत धुळें, नंदुरबार, तलोदें, शाहाडा इत्यादि शहरें आहेत.

खानदेश जिल्ह्यांत शेंकडा ९० लोक हिंदू असून मुसुलमान, जैन व ख्रिश्चन लोक फार थोडे आहेत. मुसुलमानांची संख्या १९११ सालीं खानदेशांत सव्वालाख होती.

भा षा.- तापीच्या उत्तरेकडील खानदेशी मुलखांत शेतकरी लोक गुजराथी भाषा बोलतात; व सर्व जिल्ह्यांत हीच व्यापारी भाषा आहे. पण खानदेशाच्या पश्चिम व दक्षिण भागांत मराठी भाषा प्रचारांत आहे. कचेर्‍यांतून व शाळांतून मराठी भाषा प्रचारांत आहे. खानदेशांतील लोकांची घरगुती भाषा खानदेशी असून ती मराठी, गुजराथी, नेमाडी, हिंदुस्थानी इत्यादिकांचें मिश्रण आहे. खानदेशी भाषेला अहिराणी असेंहि नांव आहे.

जा ती - खानदेशांतील मुख्य जाती म्हणजे कुणबी, भिल्ल महार, मराठा, माळी, कोळी, ब्राह्मण, वाणी, तेली, सोनार, रजपूत, धनगर, वंजारी, न्हावी, चांभार, सुतार, शिंपी व मांग या होत. ब्राह्मणांच्या १३ पोटजाती आहेत. त्यांतील १० जाती मराठी भाषा बोलतात. बाकीच्या तीन जातींनां मराठी कळतें पण ते ती बोलत नाहींत. या पोटजातींत बेटीव्यवहार होत नाहीं.

कुणबी, गुजराथी व वाणी या जातीचे लोक मुख्यतः शेतकीवर आपला उदरनिर्वाह करतात. बहुतेक व्यापारी लोक मारवाडी, गुजराथी अगर भाटिया हे आहेत. खानदेशांत अनार्य लोकांची संख्या पुष्कळ आहे. हे लोक एके ठिकाणीं कायमची वस्ती करून कधींच रहात नाहींत. पोलीस शिपायांत व खेडेगावांतील शिपायांत भिल्लांचा भरणा आहे. महार लोकांचा धंदा मजुरीचा आहे. निरधी लोकांची वस्ती सातमाल टेंकडीच्या आसपास असून ते फार भयंकर व क्रुरकर्मी लोक आहेत. वंजारी लोकांपैकीं कांहीं लोक व्यापारी आहेत पण बहुतेक लोक नेहमीं टोळयाटोळयांनी भटकत असतात. त्यांचा धंदा गवत अगर लांकडे विकण्याचा असतो. खानदेशांतील पुष्कळसे मुसुलमान हे मूळचे हिंदूच असून ते मुसुलमानांनीं जुलमानें बाटविल्या मुळें जे पूर्वीं मुसुलमान झाले त्यांचे वंशज आहेत. याशिवाय पठाण लोकांचीहि येथें बरीच वस्ती आहे. या मुसुलमानांतील पुष्कळ लोक शेतकीचा धंदा करतात. ख्रिश्चन लोकांपैकीं रोमन कॅथॉलिक व अँग्लिकन या दोन पंथांचे लोक खानदेशांत आहेत. त्यांची धुळें, भुसावळ व धरणगांव या ठिकाणीं ख्रिस्तालयें आहेत. नंदुरबार येथें स्कँडिनेव्हियन अमेरिकन मिशनरीची संस्था असून धुळयास चर्च मिशनरी सोसायटीची संस्था आहे. अमेरिकन अलायन्स मिशनच्या संस्था भुसावळ, जळगांव, पाचोरा व चाळिसगांव या ठिकाणी आहेत. यांशिवाय तापी व्हॅली रेल्वे इंडस्ट्रियल मिशनची संस्था नवापूर येथें असून पेनियल निशनची संस्था धरणगांव येथें आहे.

शि क्ष ण.- १९११ च्या खानेसुमारींत पूर्व खानदेशामध्यें ५०२९३ लोक साक्षर असलेले आढळून आले. त्यांपैकीं ३१२८ लोकांना इंग्रजी लिहितां वाचतां येत होते. पश्चिम खानदेशमध्यें साक्षर लोकांची संख्या २४२७० असून त्यापैकीं १३७३ लोकांनां इंग्रजी लिहितां वाचतां येत होतें. मुंबई इलाख्यांतील सर्व जिल्ह्यांतील साक्षरतेच्या दृष्टीनें खानदेशचा बारावा नंबर लागतो. १९०३-४ त ५३८ शाळा असून त्यापैकी १ हायस्कूल, १२ माध्यमिक शाळा व ४०१ प्राथमिक शिक्षणाच्या शाळा होत्या धुळें येथें ट्रेनिंगस्कूल व औद्योगिक शाळा आहे. १९०३-४ सालीं खानदेशांत शिक्षणावर एकंदरीत सवादोनलाख रुपये खर्च झाले. १९०३-४ सांलीं खानदेशमध्यें २० दवाखानें, एक इस्पितळ व दोन वैद्यकीयशिक्षणाच्या संस्था होत्या.

ज मी न.- खानदेशांतील जमीनीचे काळी, पांढरी, खारन व बर्की असे चार प्रकार आहेत. तापीच्या खोर्‍यांतील जमीन काळी आहे. खानदेशांत बहुतेक सर्व भागांत रयतवारी पद्धत अमलांत आहे. इनाम जमीनीचें प्रमाण शेंकडा २ आहे. खानदेशांत ज्वारी, बाजरी व कापूस हीं मुख्य पिकें आहेत. त्यांच्या खालोखाल गव्हाचें उत्पन्न आहे. विशेषतः तापीच्या खोर्‍यांत गव्हाचें पुष्कळ उत्पन्न आहे. याशिवाय तूर, हरभरा, उडीद, कुळीथ, मूग इत्यादि धान्येंहि येथें पिकतात. तीळ व जवस यांचा तेल काढण्याच्या कामीं उपयोग करतात. उंसाचें पीक फारच थोडया ठिकाणीं होतें.

पा ळी व ज ना व रें.- खानदेशांतील गाई व बैल फार सुरेख असतात. वर्‍हाड व निमार जिल्ह्यांतून यांची पैदास होते. पश्चिम खानदेशांतील खिलारी बैल दख्खनमध्यें फार प्रसिद्ध आहेत. उन्हाळ्यांत या गुराढोरांचे फार हाल होतात व त्यामुळें तीं अगदीं रोडकीं बनतात. खानदेशांतील घोडें अगदींच खुजे असतात. घोडयांची चांगली निपज व्हावी यासाठीं धुळें, चाळीसगांव येथें सिव्हील व्हेटरनरी खात्यानें दोन वळू मुद्दाम ठेविले आहेत.

पा णी पु र व ठा.- जमीनीला पाणी मिळण्याची सोय मुख्यतः कालव्यांच्या द्वारें केलेली आहे. गिर्ना व पांजरा या नद्यांना बांध घालून तेथून कालवे नेण्यांत आले आहेत. याशिवाय पुष्कळशा तलावांचें पाणीहि कालव्यांच्या द्वारें नेण्यांत आलें आहे. खानदेशांत अशा प्रकारचें चार कालवे असून त्यामुळें जवळ जवळ २०,००० एकरांनां पाणी मिळतें. तरीपण कालव्यांचें पाणी फारच थोडया जमीनीला मिळतें. बहुतेक सर्व जमीन पावसावरच अवलंबून असतें. खानदेशांत १९०३-४ साली विहिरींची संख्या २७०३१ इतकी होती.

जं ग ल.-  जंगलाच्या बाबतींत कानडाच्या खालोखाल मुंबई इलाख्यांत खानदेशचा नंबर लागतो. पूर्वीं जंगल संरक्षणाचा कायदा नसल्यानें भिल्ल लोकांनीं या जंगलांची बरीच नासाडी केली. पण हल्लीं जंगलसंरक्षणाचा कायदा सुरू झाल्यानें जंगलाची वाढ बरीच झाली आहे. १९०३-४ सालीं सरकारच्या ताब्यांत २१६८ चौरस मैल जंगल होतें व गुरांनां चराऊ रानें २८४ चौरस मैलांचीं होतीं. महूच्या फुलांचें उत्पन्न या जंगलांत फार होतें. याशिवय साग, बाभूळ इत्यादि झाडेंहि मुबलक आहेत. १९०३-४ साली खानदेशांतील जंगलांचे उत्पन्न २.३ लाख रुपये झालें. खानदेशांतील जंगलखात्याचे दोन भाग पाडण्यांत आले असून प्रत्येक भागावर एक एक अधिकारी नेमण्यांत आला आहे.

ख नि ज सं प त्ति.- खानदेशांतील खनिज संपत्ति फारच अल्प आहे. इमारतीला लागणारे दगड चोहोंकडे सांपडतात. वाघूर नदीच्या पात्राजवळ एक इमारतीला उपयोगी दगडांची खाण आहे. कंकर हा खनिज पदार्थ पुष्कळ ठिकाणीं सांपडतो. याच्यापासून चांगला चुना तयार करतां येतो. विटा तयार करण्याला लागणारी मातीहि या जिल्ह्यांत मुबलक सांपडते.

उ द्यो ग धं दे.- खानदेशांतील उद्योगधंदे विशेष महत्वाचे नाहींत. पूर्व व पश्चिम खानदेशांत सरकी काढण्याच्या व गठ्ठे बांधण्याच्या १७५ गिरण्या आहेत. जळगांव येथें ८७४ सालीं स्थापन झालेली एक कापडाची गिरणी आहे. लोंकरी जाडी भरडी ब्लँकेटें खानदेशांत सर्वत्र तयार होतात. भुसावळ येथें रेल्वेचे मोठमोठे कारखाने आहेत. अंमळनेर येथेंहि एक सुताची गिरणी आहे. अंमळनेर, फैनपूर व जळगांव हीं शहरें विणकामाबद्दल प्रसिद्ध आहेत.

आ या त नि र्ग त- खानदेशांतून कापूस, धान्य, लाख, लोणी, नीळ इत्यादि माल बाहेर जातो. विशेषतः कापूस तर मोठया प्रमाणांत बाहेर जातो. आयात मालांत मीठ, मसाला, धातू, साखर हे जिन्नस प्रमुख होत. पश्चिम खानदेशांत धुळें व पूर्वखानदेशांत जळगांव व भुसावळ या व्यापाराच्या मुख्य पेठा आहेत. याशिवाय जत्रांमध्ये व धार्मिक उत्सवप्रसंगीं मोठे बाजार भरतात.

द ळ ण व ळ णा चे मा र्ग.- ब्रिटिश अंमलापूर्वीं खानदेशांत बांधीव रस्ते नव्हते म्हटले तरी चालेल. पण ब्रिटिश अंमलानंतर मुंबई ते आग्रा हा रस्ता बांधण्यांत आला. हा रस्ता मालेगांव, धुळे व शिवापुर या गांवावरून गेला आहे. या सडकेच्या बाजूनें झाडें लावण्यांत आलेलीं आहेत. जी. आय. पी. रेल्वेचा फांटा नायडोंगरी ते भुसावळपर्यंत असून तेथून जबलपुराकडे एक व नागपूरकडे एक असे दोन फांटे फुटलेला आहेत. या शिवाय चाळीसगांव ते धुळे, जळगांव ते अमळनेर असे दोन छोटे फांटे गेले आहेत. तापी नदी व्हॅली रेल्वेचा फांटा सुरत ते अमळनेरपर्यंत गेलेला आहे.

रा ज्य व्य व स्था.- खानदेशची व्यवस्था तीन सिव्हिलियन व दोन डेप्युटी कलेक्टर यांच्या मार्फत चालविली जाते. जिल्हा न्यायाधीश व जज्जाची कचेरी धुळें येथें आहे व सर्व जिल्ह्यांत १० सबार्डिनेट न्यायाधीशांचीं कोर्टें फौजदारी गुन्हे चालविणारीं ५० मॅजिस्ट्रेट कोर्टे आहेत. चोरी, दरवडा व घरेफोंडे हे गुन्हे या जिल्ह्यांत विशेष घडतात. या जिल्ह्यांतील २१ शहरांस म्युनिसिपालिटया आहेत. जिल्ह्यांत पोलिसठाण्यांची संख्या १९०३-४ सालीं ३७ होती. शिपायांची संख्या १६३६ होती. या शिपायांच्यावर चार इन्स्पेक्टर, तीन असिस्टंट व एक जिल्हापोलिससुपरिंटेडंट असे अधिकारी असतात.

धुळें येथें मोठा तुरंग असून त्यांत ४५० कैद्यांची सोय होऊं शकते. या शिवाय या जिल्ह्यांत २३ लहान तुरुंग व २१ अंधारकोठडया आहेत.

सन १८८६ मध्यें खानदेशमधील जमिनीच्या मोजणीचें काम सुरू झालें व तें १९०४ सालीं संपलें. याच्या पूर्वीं १८५२ मध्यें एकदां जमीनीची मोजणी झाली होती. त्यांपेक्षां या मोजणीच्यावेळीं शेकडां ४ प्रमाणानें लागवडीची जमीन वाढली असें आढळून आलें व त्यामुळें दर वर्षीं ३१ ते ४० लाखापर्यंत अधिक उत्पन्न येऊं लागलें. १९०३-४ मध्यें खानदेशांतील जमीनमहसूल ४८,६०,००० रुपये होता व एकंदर उत्पन्न ६७,५९,००० इतकें होतें.

इ ति हा स.- खानदेशाच्या प्राचीन इतिहासाला ख्रि. पू. १५० या वर्षांपासून सुरवात होते. याच्यापूर्वीं एके ठिकाणीं खानदेशांतील तोरणमाल व अशरिगड यांचा उल्लेख आलेला आहे. तोरणमाल व अशरिगड येथें अश्वत्थाम्याचें स्थान आहे. ख्रिस्ती शतकापूर्वीं औंधच्या रजपूत राजघराण्याचे वंशज खानदेशवर राज्य करीत होते ही गोष्ट निःसंशय आहे. ख्रि. पू. १५० सालच्या एका शिलालेखावरून वरील विधानाला ऐतिहासिक पुराव्याची जोड मिळाली आहे. रजपूत घराण्यांनीं दोन तीन शतकें खानदेशवर आपलें स्वामित्व गाजविल्यार आंध्रांनीं खानदेश जिंकून घेऊन तो आपल्या ताब्यांत आणला. नंतर कांहीं काळांनीं पश्चिमेकडील क्षत्रपांनीं आंध्र राजाला येथून हुसकावून लावलें. पांचव्या शतकांमध्यें चालुक्यवंशीय राजांचा खानदेशवर अंमल बसला. अल्लाउद्दीन खिलजीनें १२९५ सालीं खानदेशवर स्वारी केली. त्यावेळीं खानदेश हा चव्हाणवंशीय राजाच्या ताब्यांत होता.

अल्लाउद्दीन खिलजीनें खानदेशवर स्वारी केल्यापासून तो १७६० मध्यें अशीरगडचा किल्ला मराठयांनी जिंकीपावेतों, खानदेश हा मुसुलमानी वर्चस्वाखालीं होता. दिल्ली येथें जें मुसुलमानी घराणें राज्य करीत असे त्या घराण्यांतील राजे खानदेशवर आपला सुभेदार नेमीत असत. महंमद तघलकाच्या कारकीर्दीत, खानदेशाची व्यवस्था एलिचपूर येथें असणा-या सुभेदाराकडून पाहिली जात असे. इ. स. १३७०-१६०० यांच्या दरम्यान खानदेश हा फरुकी घराण्यांतील राजांच्या ताब्यांत होता. हा फरुकी राजे जरी आपल्याला गुजराथच्या सुलतनाचे मांडलीक म्हणवीत तरी ते जवळ जवळ स्वतंत्रच असत. इ. स. १५९९ सालीं अकबरानें जातीनें खानदेशवर स्वारी केली व अशीरगड जिंकून घेऊन तेथील शहा बहादूरखान यास कैद करून किल्ल्यांत पाठविलें. खानदेश हा या वेळेपासून अकबराच्या राज्यांत मोडूं लागला. अकबरानें या प्रदेशाचा कारभार पाहण्याकरितां आपला मुलगा दानियाल यास सुभेदार नेमलें. याच्या नावांवरून कांही काळपर्यंत खानदेशला दानदेश हें नांव पडलें. १७ व्या शतकाच्या मध्यकालांत खानदेशची भरभराट झाली होती. दख्तनमधून वर हिंदुस्थानांत जाण्याचा व्यापारी मार्ग खानदेशमधून जात असल्यानें खानदेश सधन बनला होता.

१६७० मध्यें शिवाजीमहाराजांनीं आपला अधिकारी खानदेश येथें पाठवून चौथाई वसूल केली. पुढें त्यांनीं साल्हेरचा किल्ला जिंकला. शिवाजी, संभाजी व औरंगझेब या तिघांनींहि आपल्या अमदानींत खानदेशवर स्वारी केली. इ. स. १७२० मध्यें निझामउल्मुल्क यानें खानदेश आपल्या राज्याला जोडला. १७६० मध्यें निजामाला मराठयांनीं हांकलून लावलें व पेशव्यांनीं खानदेश आपल्या ताब्यांत घेऊन त्या मुलुखापैकीं काहीं भाग शिंदे व होळकर यांनां जहागीर दिला. इ. स. १८०२ मध्यें होळकरांच्या सैन्यानें खानदेश लुटण्यास आरंभ केला. रावबाजी यांच्या बेबंद कारभारामुळें खानदेशांत जिकडे तिकडे अव्यवस्थेचें साम्राज्य माजलें होतें. पुढे १८१८ मध्यें खानदेश हा ब्रिटिशांच्या ताब्यांत आला. पुढें कांही वर्षांनीं भिल्ल लोकांनीं बंडाचे निशाण उभारलें पण अलपिष्टन साहेबानें तें मोडून टाकलें. औटराम यानें भिल्लांनां पोलीसखात्यांत नौक-या देऊन त्यांचीं पथकें बनविलीं. १८५२ व १८५७ मध्यें पुन्हां भिल्लांनीं बंडें केलीं पण ती ताबडतोब मोडण्यांत आलीं.

खानदेशमध्यें, 'हेमाडपंती' पद्धतीचीं दगडीं देवालयें, तळीं, विहिरी जिकडे तिकडे दृष्टीस पडतात. 'हेमाडपंत' याला खानदेशमध्यें गवळीराजा असें म्हणतात. अशा हेमाडपंती इमारती खानदेशमध्यें ३९ असून त्यांपैकी ३१ देवळें, ६ पायर्‍यांच्या विहिरी व २ तळीं आहेत. या इमारती १३ व्या शतकांतल्या किंबहुना कांही त्याच्या पूर्वींच्याहि आहेत असें वाटतें. या हेमाडपंती इमारती मोठमोठया दगडांच्या असून हे दगड चुना न लावतां जोडण्यांत आलेले असतात. कांही कांहीं इमारतींचे दगड तर फारच मोठे असतात. या हेमाडपंती इमारतींशिवाय खानदेशमध्यें कांही मुसुलमानांच्या वेळच्या इमारतीहि आहेत. त्यामध्यें सर्वांत प्रसिद्ध म्हणजे फरकांडे येथील हलते मनोरे होत. चाळिसगांव तालुक्यांतील पितळखो-यामध्यें बौद्धकालीन एक चैत्य व कांहीं विहार आढळतात. पण ते हल्लीं जीर्णावस्थेंत आहेत. हा चैत्य व हे विहार ख्रि. पू. २ शतकांमधील असावे असें दिसतें. खो-याच्या पायथ्याशीं पाटण नांवाचें एक ओसाड खेंडे आहे. या खेडयांत कांहीं देवालयें व शिलालेख आहेत. प्रसिद्ध भास्कराचार्य ज्योतिषाचा नातू येथें रहात असे. त्याचें ज्योतिषविषयक विद्यापीठ येथें होतें. वाघळी येथें दहाव्या शतकांतील एक महादेवाचें मंदिर असून त्या मंदिराच्या भिंतीवर तीन शिलालेख आढळतात.

खानदेशाला कन्ह (कृष्ण) देश असेंहि प्राचीन नांव आहे. अश्मक म्हणून जो प्रांत महाभारतांत येतो तोच खानदेश असें कांहीचें म्हणणें आहे. खानदेशांत ख्रिस्ताच्या पहिल्या शतकांत अहीर नांवाचे राजे होते. यांनांच हल्लीं तिकडे गवळी राजे म्हणतात. प्रख्यांत अजिंठयाचीं लेणीं खानदेशांत खानदेशवर्‍हाडच्या सरहद्दीवर आहेत.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .