प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
 
खासगीवाले- यांचें मूळ उपनांव लिमये असून हे रत्‍नागिरीजिल्ह्यांतील मौजे करले येथील राहणारे होत. यांचा मूळपुरुष भानमानी नांवाचा होता. त्याचा पुत्र बाळाजी, त्याला गणेश व कृष्ण अशीं दोन मुलें होतीं. कृष्णाजी हे कोंकणांतून घांटावर आले. त्यांच्याचबरोबर इचलकरंजीकरांचे मूळपुरुष नारो महादेव व पटवर्धन घराण्याचे मूळपुरुष हरभट हेहि निघाले होते. कोल्हापूरजवळ जोतिबाच्या डोंगरावर देवापुढें तिघांनीं शपथा घेतल्या कीं, ज्याच्या अभ्युदय प्रथम होईल त्यानें बाकीच्या दोघांस सांभाळावें. नारोपंतास कापशीकर सेनापति यांनीं आश्रय दिल्यावर त्यांनीं या दोघांनां आपल्याजवळ ठेविलें. कृष्णाजी व गणेश यांचीं मुलें शिवराम व जिवाजी हीं नारोपंताकडे होतीं. त्यांना नारोपंतांनीं पेशव्यांच्या इकडे नोकरीस पाठविलें. श्रीमंतांनी त्यांस मौजे पाडळीची कमावीस (स. १७३०) व सातारच्या सरकारी वाडयाचें काम (स. १७३१) सांगितलें. वरील काम शिवरामपंतांनीं चांगलें केल्यामुळें बाजीरावसाहेबांनीं त्यांस आपलें खासगीचें काम सांगून (१७३२) पुण्याच्या शनिवारवाडयाचेंहि काम सुपूर्द केलें. पुढें १७४१ त शिवरामपंत काशीस गेले; त्या नंतर त्यांचे भाऊ जिवाजीआण्णा हे खासगीचा कारभार पाहूं लागले. शिवरामपंत हेच खासगीवाले घराण्याचे मूळ संपादक होत. ते काशीहून परत येऊन (१७४२) पंढरपुरास राहिले व तेथें त्यांनीं पांडुरंगाची एक चांदीची मूर्ति करून देवाचें संस्थान स्थापून (१७४८) त्याच्या खर्चाबद्दल पेशव्यांकडून पंढरपूर तालुक्यांतील कौठळी गांव इनाम मिळविला. हल्लीं आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशीस याच पांडुरंगमूर्तीचा रथोत्सव होतो. खासगीवाल्यांचें हें खासगत देवस्थान असून त्यास सालीनां साडेसहा हजारांचें उत्पन्न आहे. शिवरामपंतांची बहीण ही परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या मुलाला दिली होती. शिवरामपंतांचा वडील मुलगा रघुनाथ हा तरुणपणीं वारला, तेव्हां त्याचा मुलगा शिवराम यांस राघोबादादा पेशवे यांनीं खासगीचीं वस्त्रें दिलीं (१७७३). सवाईमाधवरावांच्या कारकीर्दीत शिवरामभाऊस अंबारीसहित हत्तीचा मान मिळाला. तोपर्यंत वर सांगितल्याप्रमाणें जिवाजीपंतअण्णा हेच खासगीचा कारभार पाहत असत. हे घोडयावर बसणारे फार पटाईत होते. निजामानें धाडलेल्या एका मस्त घोडयावर यांनीं स्वारी भरून त्याला नरम केल्याच्या व यांच्या दांडग्या आहाराच्या व अचाट शक्तीच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. थोरल्या शिवरामपंताचा दुसरा मुलगा गोविंदराव तात्या यांनीं बराच नावलौकिक मिळविला. त्यांनीं सोळाव्या वर्षीच खासगीची समग्र माहिती मिळविल्यानें नानासाहेब पेशव्यांनीं त्यांस इंग्रज, होळकर, भोंसले, निजाम यांच्याकडे वकिलीच्या कामावर नेमिलें होतें. यांनांहि स्वारांचा सरंजाम व तैनात मिळाली असून, जुवाठी, हिपर्गी, पाढेठाण हीं इनाम गांवें व पैठणचें कुळकर्ण मिळालें होतें. राघोबादादा व थोरले माधवरावसाहेब यांच्यामधील मध्यस्थी हेच करीत असत. यांनीं पेशव्यांच्या बरोबर ब-याच मोहिमा केल्या. हे. इ. स. १७७२ मध्यें वारलें. यांचे सख्खे भाऊ हरिपंत हे पानपतांत पडले. गोविंदरावांनी पुण्याचें रामेश्वराचें देऊळ बांधलें. यांची बायको सती गेली. यांनां नीळकंठ नावाचा मुलगा झाला. त्याला दोन पुत्र गोविंद व हरि म्हणून होते. नीळकंठराव यांचीहि स्त्री सती गेली. गोविंद नीळकंठ यांस १७९२ त हत्ती मिळाला. हे खडर्याच्या लढाईंत हजर होते. यांच्यावर पुढें यांची गैरमर्जी होऊन त्यांनीं यांचा अर्धा सरंजाम व साडेचोवीस हजारांची जहागीर आणि साडेसहा हजारांची खासगीची नेमणूक श्रीमंतांनी जप्त केली. गोविंदपंत १८४५ त वारले. यांनीं शुक्रवार पेठेंत रामेश्वराजवळ (पुण्यास) विष्णूचें एक देऊळ बांधलें. शिवराम रघुनाथ यांचा भाऊ नारोपंत यांस सवाई माधवरावांनीं शिवरामाच्या मृत्यूनंतर खासगीचीं वस्त्रें दिलीं होतीं. गोविंद नीळकंठाचा मुलगा नीळकंठ नांवाचा असून त्यांच्यावर १८३८ त बंडचा आरोप आला होता; ते त्यांतून १८४० त मुक्त होऊन १८५९ त वारले. गोविंद नीळकंठास हरिपंत नांवाचे एक भाऊ होते. त्यांना माधवराव नांवाचा पुत्र झाला. या माधवरावांनां एकंदर आठ अपत्यें झालीं. त्यांतहि काशीनाथपंत तात्या हे पुण्याच्या म्युनिसिपालिटीचे सभासद, पुणें येथील पर्वतीसंस्थानचे व पंढरपूरच्या देवस्थानकमेटीचे एक पंच होते. ते धार्मिक प्रवृत्तीचे असून गणोशोत्सवांत लो. टिळकांच्याबरोबर त्यांनीं प्रथम प्रथम भाग घेतला होता. पंचहौद प्रकरणांत हे व श्री. बाळासाहेब नातू हे प्रमुख होते. हे सन १९१९ त वारले. यांचे वडील चिरंजीव गोविंदराव हे दामोदरगुरू नांवाच्या प्रख्यात मल्लविद्याविशारदाचे शिष्य होते. हे स. १९०० मध्यें वारलें. यांचे धाकडे भाऊ हरिहरराव उर्फ नानासाहेब हे हल्लीं विद्यमान असून पंढरपुरास रहात असतात. जिवाजीपंतअण्णांचे वंशज अश्व विद्येंत निष्णात असून त्यांनां शिंगवें वगैरे गांवचें उत्पन्न आहे. यांच्या जागेंतच हल्लींच्या न्यू पूना कॉलेज व नूतन मराठी विद्यालय या संस्थांच्या इमारती आहेत. थोरल्या कृष्णाजीपंतास शिवरामपंताशिवाय रामचंद्र, ज्योतिपंत व बाळाजी असे तीन पुत्र (शिवरामास दत्तक घेतल्यानंतर) झाले. त्यांच्या वंशजांस खासगीवाले हे नांव न मिळतां लिमये याच आडनांवानें ते हल्लीं प्रसिद्ध असून त्यांच्या शाखा सोलापूर, तासगांव, रामदुर्ग या भागांत आहेत. [श्री. हरिहर काशीनाथ खासगीवाले यांनीं पाठविलेल्या माहितीवरून].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .