विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खेज्री.- बंगाल इलाख्यांतील मिदनापूर जिल्ह्याच्या कोंटाइ तालुक्यांतील खेडें. हें हुंगळी नदीच्या कांठी वसलेलें आहे. याची लोकसंख्या १९०१ सालीं १४५७ होती. या ठिकाणीं पूर्वीं हुगळी नदींत येणारीं जहाजें नांगरत असत. हें यूरोपियन लोकांचें दफनस्थान होतें.