प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   

ख्रिस्त येशू- ऐतिहासिक दृष्टया पहातां ख्रिस्ती संप्रदायसंस्थापक जीझस याचें चरित्र फार थोडें माहीत आहे. करण तत्कालीन ज्यू व रोम इतिहासकारांच्या ग्रंथांत त्याच्या चरित्राला फारसें महत्व दिलेलें नाही. अर्वाचीन काळांत ख्रिस्ताचें विश्वसनीय चरित्र जाणण्याची इच्छा फार वाढली आहे, पण ती पुरी होण्याच्या मार्गांत दोन अडचणी आहेत. पहिली अडचण पुराणमतवादी लोकांच्या मनांतील पूर्वग्रह आणि दुसरी विश्वसनीय साधनांचा अभाव. ख्रिस्ताच्या चरित्राची माहिती मिळण्याचीं साधनें ख्रिस्ताच्या शिष्यांपैकीं चौघांनीं लिहिलेलीं 'गॉस्पेल' नांवाचीं चार पुस्तकें आहेत. हे चार शिष्य अनुक्रमें मॅथ्यू, मार्क, ल्यूक व जॉन हे होत. या पुस्तकांच्या हल्लीं उपलब्ध असलेल्या स्वरूपावरून पहातां त्यांपैकीं एकांतहि प्रत्यक्ष डोळयांनीं पाहिलेल्या माणसानें लिहिलेली अशी एकहि गोष्ट नाहीं. सेंट जॉनचें गॉस्पेल हें लेखकानें स्वतः पाहून लिहिलेलें आहे असा सामान्य समज आहे, पण तें अधिक अर्वाचीन असावें असें संशोधकांचें मत आहे. आणि हें गॉस्पेलहि चरित्राचें ऐतिहासिक साधन या नात्यानें अयोग्यच आहे. कारण तें कल्पित गोष्टींनी भरलेलें आहे. शिवाय या चार गॉस्पेलांत आजपर्यंत फार फरक झाले आहेत, आणि त्यांत शिष्यांना वाटेल तशा प्रकारचा अर्थ लावून ख्रिस्ताचें चरित्र लिहिलें आहे. शिवाय त्यांत ख्रिस्ताचें चरित्र संगतवार नसून मध्यें मध्यें बरींच खिंडारें आहेत. त्यामुळें या गास्पेल ग्रंथावरून आपणस निश्चयात्मक माहिती मिळूं शकत नाहीं.

च रि त्र.- येशू या ज्यूडिया प्रांतांतील बेथ लेहेम येथें ज्यू लोकांचा राजा हेरॉड दि ग्रेट आणि रोमन बादशहा ऑगस्टस सीझर यांच्या कारकीर्दींत जन्मला. त्याचा बाप जोसेफ हा सुतार होता. येशू हा आपल्या आईच्या गर्भी तिच्या कौमार्यवस्थेंतच राहिला असा समज आहे. त्याच्या आईचें नांव मेरी. ही 'व्हर्जिन मेरी' या नांवानें प्रसिद्ध आहे. ज्यू लोकांचा राजा हेरॉड याला पौरस्त्य देशांतील विद्वान लोकांनीं असें भविष्य सांगितलें होतें कीं, इस्त्रायल लोकांचा अधिपति बेथ लेहेम येथें उत्पन्न होईल. ह्या भविष्यकथनानें घाबरून जाऊन हेरॉडनें दोन वर्षांचीं व त्याहून लहान वयाची सर्व अर्भकें मारून टाकविलीं. तथापि जीझसच्या आईबापांनां या भावी आपत्तीबद्दल स्वप्नांत दृष्टांत झाला होता. व त्या सूचनेवरून तीं जीझसला घेऊन ईजिप्तमध्यें पळून गेलीं होतीं. पुढें हेरॉड राजा मरण पावल्यानंतर जीझसचे आईबाप परत येऊन गॅलिली प्रांतांतील नाझारेथ शहरीं राहिले. जीझसला लहानपणांतच ज्यू लोकांचें धर्मशास्त्र शिकविण्यांत आलें होतें; आणि या ग्रंथासंबंधीं त्याचें ज्ञान व अर्थ लावण्याची हुषारी पाहून त्याचे शिष्य थक्क होत असत. तो वयांत आल्यावर त्याला जॉन दि बॅपटिस्ट यानें बप्तिस्मा दिला. त्यावेळीं एक खबूतर आकाशांतून खालीं उतरून जीझसच्या नजीक आलें व हा परमेश्वराचा पत्र आहे अशी आकाशवाणी झाली! त्यानंतर जीझसनें चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास करून चिंतन करण्यांत घालविल्या.

जीझसनें वयाच्या तिसाव्या वर्षी धर्मप्रचारक म्हणून कामास सुरुवात केली असा समज आहे. त्यानें प्रथम गॅलिली समुद्राच्या किना-यावरील कॅपरनम शहरीं उपदेशाचें कार्य आरंभिलें. नंतर तो इतर शहरांत गेला, परंतु तेथें त्याला धर्मश्रद्धा फारशी आढळून न आल्यामुळें तो गॅलिली प्रांतांतील लहान सहान गांवांतहि हिंडला. याप्रमाणें फिनिशिया आणि समरिया यांच्या सरहद्दीपर्यंत फिरून त्यानें धर्मापदेशाचें कार्य केलें व त्याचवेळी अनेकांचे अनेक रोगहि बरे केले. त्यामुळें त्याच्यावर श्रद्धा बसून पुष्कळ लोक त्याचे अनुयायी बनले. हा ख्रिस्ताच्या धर्मोपदेशाचा काळ एक वर्षाहून कांहीं अधिक होता असें कित्येक म्हणतात, तर तो सुमारें तीन वर्षांचा होता असें इतर म्हणतात. धर्मोंपदेशाच्या या कार्यामुळें ज्यू धर्मोपाध्याय वृद्ध गृहस्थ यांच्या मनांत मत्सर उत्पन्न होऊन ते त्याचा द्वेष करूं लागलें. आणि अखेर त्यांनीं त्याला कैद करून त्या वेळा ज्युडियाचा प्रोक्यूरेटर पाँटियस, पायलेट (इसवी सन २६-३६,) याच्याकडे चौकशीकरितां पाठविलें. यावेळीं रोमन बादशहा टायबेरिझ सीझर (इ. स. १४-३७) राज्य करीत होता. जीझसविरुद्ध मुख्य आरोप असा होता कीं, तो स्वतःला ''ज्यू लोकांचा राजा'' म्हणवितो. स्वतः पायलेट जीझासवर आरोप शाबीद करण्यास नाखूष होता. परंतु जीझसला आरोपी ठरवून क्रुसावर फांशी दिलाच पाहिजे अशी ज्यू लोकांनीं फार ओरड केली. तेव्हा स्वतःची लोकप्रियता नष्ट होईल अशी भीति वाटून पायलेटनें येशूला मरणाचि शिक्षा सांगितली. तेव्हां जीझसला निळया रंगाचे कपडे चढवून व त्याची फजिती करण्याकरितां त्याच्या डोक्यावर कांटेरि मुकुट चढवून त्याचा अपमान करीत करीत व त्याच्या अंगावर थुंकत थुंकत शिपायांनीं व लोकांनीं मिळून त्याला वधस्थलापर्यंत नेला आणि तेथें त्याच्या अंगावरील सर्व कपडे काढून ठेऊन एका क्रुसवर त्याच्या शरीरांत खिळे ठोकून इतर दोन आरोपींबरोबर त्याचा प्राण घेण्यांत आला. येशू हा ''ज्यू लोकांच्या'' परमेश्वराचा धांवा करीत करीत मरण पावला. त्याच्या शवावर दगडी थडगें बांधण्यांत आलें. असें सांगतात कीं त्याला फाशीं दिलेल्या क्रॉसवर पाँटियस पायलेटस यानें जे. एन. आर. जे. (म्हणजे येशू नाझारेथी, राजा, ज्यूचा) हीं अक्षरें लिहून ठेवलीं होतीं.

ख्रि स्ता चा उ प दे श.- ख्रिस्तानें केलेल्या उपदेशास विशिष्ट उपपत्तीचें निश्चित स्वरूप नाहीं, किंवा फार विचारपूर्वक ठरलेलीं धार्मिक तत्वेंहि त्यांत नाहीत. त्याचा सर्व उपदेश त्याला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांतील सत्य गोष्टींनीं भरलेला आहे. त्यानें मोझेईक कायद्याला नांवें ठेविलीं नाहींत तर त्या कायद्याचा धर्मोपाध्यायांनी व वृद्ध लोकांनी जो संकुचित अर्थ केला होता त्याबद्दल त्याचें सर्व भांडण होतें. ज्यू लोकांच्या ओल्ड टेस्टॅमेंटमधील वचनांवर निरुपयोगी म्हणून हल्ला न करतां त्याच वचनांचा अधिक योग्य असा अर्थ सांगण्याचा त्यानें प्रयत्न केला. तसेंच त्या धर्मग्रंथांतील केवळ शब्दावर जोर न देतां त्यांच्या मूलभूत उद्देशांकडे लक्ष्य देण्याविषयीं त्यानें लोकांनां उपदेश केला. देवदूत आणि सैतान यासंबंधीच्या येशूच्या दृष्टांतांना ओल्ड टेस्टॅमेंटचाच आधार होता. ख्राइस्ट म्हणजे परमेश्वराचा पुत्र अशी पदवी त्यानें अगदीं नाखुषीनें व ब-याच वर्षांनंतर घेतली.

येशूच्या उपदेशांतील मुख्य गोष्टी सुप्रसिद्ध ''डोंगरावरील व्याख्यान'' या भागांत दृष्टांतरूप कथांत आलेल्या आहेत. त्यानें सांगितलेल्या दृष्टांतरूप कथा अगदीं अशिक्षित लोकांच्या मनावर फार परिणाम करीत असत. येशूनें धर्माच्या क्षेत्रांत व्यक्तिविषयक देव या गोष्टीला फार महत्व दिलें आहे. देव म्ह. आकाशांतील बाप असा उल्लेख तो नेहमीं करतो. ईश्वर आणि मनुष्यप्राणी यांच्यामधील संबंध दोन मनुष्यप्राण्यांतील परस्पर प्रेमासारखा आहे. मनुष्यांनीं स्वर्गांतील देवाच्या राज्यांत प्रवेश होण्याकरितां खटपट करणें हें मनुष्यजातीचें धार्मिक ध्येय आहे. या स्वर्गांतील राज्यांत नम्रपणा, दयाळुपणा, मनाचा पवित्रपणा आणि कळकळ या गुणांना फार मान असतो. आणि उलट गर्व, ढोंगीपणा द्रव्याचा गैरवाजवी लोभ या दुर्गुणांची फार निंदा करण्यांत येते. येशूनें मुख्यतः गुन्हेगार लोक आणि समाजबहिष्कृत लोक यांना उपदेश करण्यावर भर दिला आहे. त्यांना तो ''इस्त्रालयचीं चुकलेलीं मेंढरें'' असें संबोधितों. त्यानें संपत्ति आणि सामाजिक दर्जा यामुळें उत्पन्न होणारे भेदभाव यांकडे दुर्लक्ष करून सर्वांनां सारखेपणानें लेखिले आहे. मोझेसच्या दहा आज्ञांचा त्यानें थोडक्यांत दोहोंमध्यें समावेश केला आहे. त्या दोन आज्ञा, ईश्वराबद्दल प्रेम आणि आपल्या शेजा-याबद्दल प्रेम ह्या होत. त्यानें लोकांनां असा कळकळीचा उपदेश केला आहे कीं, शत्रूंनांहि क्षमा करावी, दान देणें तें गुप्तपणानें द्यावें आणि ईश्वरांची प्रार्थना करणें ती जाहीर ठिकाणीं मोठयानें ओरडून न करतां कोणाला न समजेल अशा रीतीनें करावी. तसेंच प्रार्थना सोप्या शब्दांत करावी. साध्या प्रार्थनेचा नमुना म्हणून ''दी लॉर्डस् प्रेअर'' या नांवाची एक येशूची प्रार्थना प्रसिद्ध आहे. त्यानें सांगितलेल्या दृष्टांतरूप कथांमध्यें, बी पेरणारा आणि बी, खडकावर बांधलेलें घर, मोहरीचें बी आणि मूर्ख कुमारिका या कथा फार प्रसिद्ध आहेत.

अ द् भु त च म त्का र- जीझसनें अनेकांचे रोग बरे केले. माणसांनां लागलेलीं भूतपिशाच्चें नाहींशीं केलीं आणि मृतांनां पुन्हां सजीव केलें अशा तर्‍हेच्या गोष्टी बायबलांत आहेत. पण या सर्व गोष्टी केवळ श्रध्देमुळें झाल्या असें तो म्हणतो. याशिवाय दुस-या कित्येक चमत्कारांच्या गोष्टी आहेत. त्यांपैकी कांहीं पुढीलप्रमाणें:- जीझसनें थोडेसे पाव आणि मासे एवढया अन्नानें शेंकडों लोक जेऊं घेतले; एका विवाहभोजनाच्या प्रसंगीं पाण्याची दारू बनविली आणि मोठें वादळ झालें असतां समुद्रावर तो चालत गेला. जीझसनें आपल्या हयातींत मूर्तिपूजकांनां ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्याचा सुव्यस्थित प्रयत्न सुरू केला नव्हता. त्यानें फक्त ज्यू लोकांच्या वागणुकींतील गोष्टींचें अंतरंगपरीक्षण केलें. तथापि त्यानें आपल्या १२ शिष्यांनां ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करावा याबद्दल सूचना दिल्या होत्या. इतकेंच नव्हे तर कित्येकांचें मत असें आहे कीं, त्यानें स्वतः सत्तर शिष्य धर्मोपदेशाच्या कार्याकरितां पाठविले. हिब्रू भविष्यकथनासंबंधानें जीझसनें असें जाहीर केलें होतें की, ''स्वर्गांतील राज्यांत अब्राहाम ऐझॅक व जेकब यांच्याबरोबर भोजन करण्याकरितां पूर्वेकडील व पश्चिमेकडील देशांतील पुष्कळ पुण्यवान पुरुष येतील. जीझसला क्रुसावर चढवून ठार मारल्यानंतर तिस-या दिवशीं (ईस्टरसंडे) तो थडग्यांतून बाहेर आला आणि एका ढगामधून वर स्वर्गांत गेला. त्याला क्रुसावर चढविला तेव्हां सर्व आकाश ढगांनीं व्याप्त झालें होतें आणि येरूशेलम येथील देवालयावरील आवरण पायथ्यापासून शेंडयापर्यंत फाटून गेलें असें सांगतात. जीझसचे अगदीं आरंभीचे अनुयायी ज्यू लोकांपैकीं होते. ते जीझस हा डेव्हिड राजाचा अनौरस वंशज होता असें मानीत असत. इतर धर्मांतील लोकांनीं ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर ते जीझस परमेश्वराचा अवतार होता असा उपदेश करूं लागले. सेंटजॉनच्या गॉस्पेलमध्यें जीझस परमेश्वराचा अवतार होता अशी जी उपपत्ति सांगितली आहे आणि जी उपपत्ति दुस-या शतकांत ग्रीक चर्चनें मान्य केली होती ती तिस-या शतकांत रोमन बिशपांनीं त्याज्य ठरविली. कारण तीमुळें अनेकेश्वरीमताचा पुरस्कार होतो असा त्यांचा आक्षेप होता. तथापि हीच उपपत्ति पुढें अधिकाधिक मान्य होत गेली. आणि ती निसा येथें इ. स. ३२५ मध्यें चर्च कौन्सिलनें मान्य केली. आणि तिलाच पुढें कॉन्स्टंटिनोपल येथें ३८१ मध्यें चर्च कौन्सिलनें कायमची मान्यता दिली.

ख्रि स्ता चें का र्य- कर्मवादाच्या विरुद्ध आरण्यकीय ब्रह्मवेत्यांनी जी चळवळ केली तीप्रमाणेंच येशूची चळवळ होती. कदाचित् त्या चळवळीचा प्रेरक हेतु राजकीयहि असूं शकेल. ही गोष्ट मागें सविस्तर वर्णन केली आहे. (बुध्दात्तर जग पृ. २५,२९,३३). यहुदी लोकांनां त्यांच्या विधिविषयक धार्मिक कल्पनांमुळें जगाच्या धडपडींत अपयश येतें ही जाणीव असून शिवाय या विधिविशिष्ट धर्म अध्यात्मिक उन्नतीस कारक होत नाहीं. आणि ही अध्यात्मिक उन्नति अधिक महत्वाची आहे असें त्यास वाटत असावें. शिवाय बोलून चालून तो सुताराचा मुलगा, त्यामुळें त्यास यहुद्यांच्या उपाध्यायांच्या भिक्षुकी उत्पन्नाचें रक्षण करावें ही आस्था नसणार. उलट त्याविषयीं त्यास तिटकाराच असणार. यामुळें त्याचे राज्यकर्ते व भिक्षुक हे दोन्ही शत्रु बनले आणि भिक्षुकांच्या लावालावीचें निमित्त होऊन त्यास शासनतंत्राकडून मरणाची शिक्षा झाली. या संप्रदायाला जर पालसारख्या प्रचारकी भिक्षुकी अकलेचा मनुष्य मिळाला नसता तर येशूचें नांव तरी आज ठाऊक असतें किंवा नाहीं याविषयीं संशयच आहे. ['खैस्त्य' पहा].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .