विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गंगापूर- (१) हैद्राबाद संस्थानांतील औरंगाबाद जिल्ह्याचा एक नैॠत्येकडील तालुका. क्षेत्रफळ ५४६ चौ. मै. लोकसंख्या (१९११) जहागिरींधरून ६४,६७२, खेडीं २००. जहागिरी १५. गंगापूर मुख्य ठिकाण. जमीन रिगर जातीची आहे.
(२) राजपुतान्यांतील जयपूर संस्थानाच्या गंगापूर नामक निझामत व तालुक्याचें मुख्य ठिकाण. जयपूर शहराच्या आग्नेयीस ७० मैलांवर हें आहे. लोकसंख्या (१९११) ५७८०. येथें ३ शाळा आहेत.
(३) संयुक्तप्रांतांतील बनारस जिल्ह्याची एक पश्चिमेकडील तहशील. हिचा बनारस इस्टेटमध्यें समावेश होतो. क्षेत्रफळ ११८ चौरस मैल लो. सं. (१९०१) ८८३१. खेडीं २८९. वर्णानदीच्या दक्षिणेकडील प्रदेश सुपीक आहे.