प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   

गंजम, जि ल्हा.- (छत्रपुर) हा मद्रास इलाख्यांतला सर्वांत उत्तरेकडचा जिल्हा असून बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यानें वसला आहे. याचें क्षेत्रफळ ४८३५ चौरस मैल आहे. याच्या उत्तरेस ओरिसा व कांही संस्थानें, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि पश्चिमेस विजगापट्टम जिल्हा आहे. बहुतेक भाग डोंगराळ व खडकाळ आहे तरी पण इतस्ततः दरीखोरीं व सुपीक सपाट जमीनीहि आहेत.

या जिल्ह्यांत पूर्वघांट जात असून त्यामुळें मालिया (टेंकडया) व मैदानें असे याचे दोन स्पष्ट विभाग झाले आहेत. समुद्रापासून घांटापर्यंत जास्तींत जास्त अंतर ५० मैल व कमीत कमी १५ मैल आहे, आणि याच ठिकाणीं त्याची सर्वांत जास्त उंच शिखरें आहेत. ती बरूव्हा जवळ असून त्यांची नावें सिंगाराझु आणि महेंद्रगिरी अशीं आहेत. दोहोंची उंची ५००० फुटांच्या जवळ आहे. देवगिरी शिखर (४५३५) यांच्या खालोखाल उंच आहे. मालिया (टेंकडया) या एजंटच्या ताब्यांत असल्यामुळें त्यांना गंजम एजन्सी असें म्हणत. ह्या भागांत रानटी लोकांची वस्ती असल्यामुळें कलेक्टरला जादा अधिकार असतात.

या जिल्ह्यांत तळीं व सरोवरें क्वचितच दिसतात. परंतु कोठें कोठें गोडया (तंपरास) व कांही खाऱ्या (सागरम्) पाण्याचीं तळीं आढतात. उत्तरेच्या बाजूला चिल्का हें सर्वांत मोठें सरोवर आहे.

या जिल्ह्यांत तीन नद्या असून त्यांचा उपयोग कालवे काढून शेतीकडे करतात. ॠषिकुल्या ही जिल्ह्याच्या उत्तर भागांतून वहाते. महानदी आणि गोदाहद्दो या हिच्याच शाखा आहेत. वंशधर आणि लांगुल्य या थेट दक्षिण मर्यादेपर्यंत वहात जाऊन चिकाकोलजवळ समुद्रास मिळतात. लांगुल्य ही शेवटचे ३० मैलपर्यंत गंजम जिल्ह्याची दक्षिण मर्यादाच आहे.

या जिल्ह्यांत किनाऱ्यापासून आंत गेल्यावर मोठया झाडांचीं अरण्यें आहेत व तेथें पाऊसहि पुष्कळ पडतो. गंजम जिल्ह्यांत शिकारहि साधारण बरी आहे. अस्वलें आणि तरह फार असून लांडगें, चित्ते व वाघ हेहि आढळतात. डोंगराच्या उतारावर हरिणाच्या वर्गांतले म्हणजे सांबर, चित्रळ व भुंकणारे आणि जंगली जातीचे हरिण आढळतात. नीलगाईसुद्धां क्वचित् याच उतारावर दिसतात. मैदानांत काळवीट आढळतात पण चार शिंगांचे काळवीट, गवा व रानडुकर हीं कमीं व विरळ आहेत. जंगली कुत्रे फार भयंकर आहेत व ते जमावानें श्वापदांवर हल्ले करतात.

किनाऱ्यालगतची हवा थंड व निरोगी (आरोग्यकारक) आहे व जिल्ह्यांतील बहुतेक शहरें याच भागांत वसलेलीं आहेत. खुद्द गंजम शहर मात्र मलेरियाचें माहेरघर आहे; व म्हणून तेथून जिल्ह्याचें मुख्य ठाणें केव्हांच उठविलें गेलें आहे. मालिया (टेंकडया) व बाजूचा भाग नेहमीं मलेरियानें दूषित असतो. येथें हिवाळा फारच वहारीचा जातो. व पावसाळा चांगलाच असतो. सरासरी पावसाचें मान ४५ इंच असून पाऊस पडण्याचे दिवस ५९ भरतात.

इतिहास.- गंजम हा पूर्वीच्या कलिंगाचा एक भाग होता. २६० व्या वर्षी मौर्य राजा अशोक यानें हा जिंकून घेतला. नंतर कांहीं दिवस वेंगीच्या आंध्र राजांच्या ताब्यांत हा असावा. हे दोघेहि बौद्ध होते. अशोकानें चौगडा येथें एक शासन खोदून (आदेश) ठेवलें आहे.

इ. स. च्या ३ ऱ्या शतकांत आंध्र राजांच्या जागीं कलिंगांचे गंगवंशीय राजे आले. यांचें कालमान व त्यांच्या वेंगीच्या चालुक्याशीं असलेला संबंध याविषयीं कांहीच निश्चित सांगता येत नाहीं. पण चालुक्यांनीं सुद्धां गंजमच्या कांहीं भागावर तरी सत्ता गाजवली असावी. दहाव्या व अकराव्या शतकाच्या दरम्यान चोल राजांनीं वेंगी व कलिंग देश जिंकले तेव्हां त्यांतच गंजम अगर त्याचा पुष्कळसा भाग आला होता व महेंद्रगिरीवर प्रसिद्ध चोल राजा राजेंद्र याचे विजयाचे दाखले सांपडतात. चोलांची कलिंगावरील सत्ता किती काल व कितपत होती याविषयीं संशयच आहे. याच सुमारास गंगराजांची दुसरी एक शाखा उदयास आली व प्रथमतः चोलांचे मांडलीक म्हणून व नंतर स्वतंत्रपणानें त्यांनीं चार शतकेंपर्यंत कलिंगावर राज्य केलें. त्यांनीं आपली राज्यमर्यादा दक्षिणोत्तर बरीच विस्तृत केली पण शेवटीं त्यांनां केवळ अंतःकलहास बळी पडावें लागलें. पंधराव्या शतकांत तत्कालीन प्रधान गजपती घराण्याच्या मूळ संस्थापकानें, आपल्या राजाचा वध करून तक्त बळकावलें. जिल्ह्याचा बराच भाग अद्याप गजपती घराण्याकडेच आहे. १५७१ च्या सुमारास गोवळकोंडयाच्या कुतुबशहानें त्यांनां अधिकारच्युत केलें. पावणेदोनशेंपेक्षां जास्त वर्षेंपर्यंत चिकाकोलच्या मुसुलमानांनीं येथें अमंल गाजविला. त्याचें स्मारक म्हणून फक्त एक मशीद आज त्या गांवी अवशिष्ट आहे.

१६८७ मध्यें औरंगझेबानें गोंवळकोडयाच्या राजांस आपलें मांडलिकत्व कबूल करावयास लावलें व त्यानंतर चिकाकोलच्या सुभेदारांची नेमणूक दक्षिणचा सुभेदार करू लागला. दख्खनच्या सुभेदारांनां फ्रेंच लोकांनीं दिलेल्या मदतीबद्दल १७५३ मध्यें त्यांनां सुभेदाराकडून जो मुलुख मिळाला त्यांत चिकाकोलसरकारचा व गंजमचा समावेश झाला होता. १७५७ मध्यें तेथें व्यवस्था करण्याकरितां बुसी आला होता; परंतु मद्रासेस मदतीकरितां म्हणून त्याला लालीनें बोलावल्यामुळें तो परत गेला. त्यानंतर क्लाईव्हनें फोर्ड याजबरोबर बरेंच सैन्य देऊन पाठवलें. त्यानें फ्रेंच अधिकाऱ्यांचा पराभव करून त्यांचें मुख्य ठिकाण मच्छलीपट्टत हें १७५९ च्या जानेवारींत घेतलें. त्यानंतर दक्षिणेच्या सुभेदारानें फ्रेंचांची बाजू सोडून इंग्रजांशीं तह केला. फ्रेंचांस या भागांत वसाहत करूं न देण्याचें कबूल केलें. १७६५ मध्यें बादशाही फर्मानानें हा तह पक्का होऊन सुभेदाराशीं झालेल्या १७६६ मधल्या दुसऱ्या तहानें सगळा उत्तरसरकार प्रांत इंग्रजांच्या पदरीं पडला.

इलाख्यांतील सर्व भागांत गंजममध्येंच स्थिरस्थावर होण्यास फार वेळ लागला. सुमारें ७० वर्षेपर्यंत तेथें कांहीतरी गडबड होतीच. पूर्वी गंजमचा विस्तार पुंडी नदीपर्यंत होता व या मुलुखांत बरेच जमीनदार ३० किल्ले व ३२००० सैन्य बाळगून होतें. यांनीं आपसांतील भांडणें व शेजारच्या खेडयांवर हल्ले चालवून सर्वत्र पुंडाई माजवून मागितलेला दंड व खंडणी देण्याचें ते नाकारीत. त्यांच्यावर पुष्कळ वेळां स्वाऱ्या करून त्यांनां कह्यांत ठेवावें लागे पण ही शांतता कायमची व खात्रीची नसे.

१८०३ मध्यें गंजम जिल्ह्याला पार्लाकिमेडीच्या जमिनदारीसह चिकाकोल पोटविभाग जोडण्यांत आला. या भागांत १८१२ पासून १८३२ पर्यंत अशांतताच होती व तिचें कारण म्हणजे तेथील अकरा छोटेखानी संस्थानिक अथवा जमीनदार यांची आपसांतील दुही व भांडणें हें होय. या संस्थानिकांस बिसोई  ह्मणत. यांनां पूर्वीच्या जमिनदारानें कित्येक खेडीं बहाल केलीं होतीं. कारण सावरा जातीच्या डोंगरी लोकांचा बंदोबस्त करून त्यांचे सपाटीवरील लोकांवर येणारे छापे बंद करण्याचें त्यांनी कबूल केलें होतें. ही अट तर विसोई यांनीं पाळली नाहींच पण स्वतः त्यांनींच पुंडपणा आरंभला आणि खेड्यापाड्यांस सतावून सोडलें. १८१६ मध्यें जयपूरकडून ४।५ हजार पेंढार लोटलें व सर्व प्रदेश जाळून पोळून फस्त केला. १८३२ मध्यें बिसोई लोकांनीं बरीच पुंडाई माजविल्यामुळें रसेल यास त्यांच्यावर नेमून त्यांचा बंदोबस्त करण्यांत आला. लवकरच खोंड लोकांतील नरमेधाची चाल बंद पडली.

१८३९ मध्यें स्वतंत्र कायदा पास होऊन गंजमच्या कलेक्टरला गव्हर्नरचा एजंट हा किताब व डोंगरी मुलुख व लोक यांजवर विशेष अधिकार मिळाले. त्या वेळच्या परिस्थितीचें व त्यावेळच्या गंजमचें वर्णन रसेलच्या लेखांत व मिरिआ एजंटच्या रिपोर्टांत वाचावयास सांपडतें.

जौगडा येथील शिलालेखाशिवाय वर्णनीय अशा प्राचीन वस्तू म्हणजे कित्येक पुरातन देवळें व कित्येक शिल्पशास्त्रीय व खोदकाम यांचे उत्कृष्ट नमुनें येथें असून कलिंग घराण्याच्या पूर्वेतिहासावर प्रकाश पडणारे लेखहि आढळतात. यांपैकीं श्रीकुर्म येथील वैष्णवपंथी मठ व मुखलिंग येथील शिवमंदिर ही दोन फार प्रसिद्ध आहेत.

लोकवस्ती.- लोकसंख्या १९२१ च्या खानेसुमारींत १८,३५,५६२ भरली. जिल्ह्यांत शहरें फक्त ९ असून वेरामपूर, चिकाकोल आणि पार्लाकिमेडी येथें म्युनिसिपालिटया आहेत. शहरें मैदानावर वसलीं असून तेथील खेडींहि टेंकडयावरील खेंडयांपेक्षां मोठीं आहेत. एकंदर खेडीं ६१४५ आहेत. सपाट मुलुखांत शेंकडा ९६ हिंदू आहेत. एजन्सीपट्टयांत शेंकडा ६६ च्या वर वन्य हिंदू आहेत. सखल प्रदेशांत वस्ती दाट असून टेंकडयांकडे विरळ आहे. सपाटीवर दक्षिणेकडे तेलगू व उत्तरेस उरिया भाषा प्रचलित असून एजन्सीपट्टयामध्यें खोंड भाषा चालते व तेथेंहि दक्षिण भागांत मालियासावरा भाषेचा बराच उपयोग होतो. या जिल्ह्यांत मुसुलमान व ख्रिश्चन फारच कमी आहेत. मैदानावर बहुधा तेलगू व उरिया जातीचेच लोक आढळतात. तेलगूपैकीं शेतकाम करणारे कापु लोक (सुमारें दीड लाख) पुष्कळ असून त्यांच्या खालोखाल कलिंग (एक लाख) लोक येतात. कलिंगांची एवढी मोठी वस्ती दुसऱ्या कोणत्याहि जिल्ह्यांत नाहीं. उरिया जातींत ब्राह्मण बरेच असून एकंदर लोकवस्तीशीं त्यांचें प्रमाण जवळजवळ ८ पडतें.

उपजीविकेचें साधन सामान्यतः शेतीच असून सपाटीवर शेंकडा ६६ शेतकी कामांत गुंतलेले असून त्यांपैकीं बहुतेक शेतीचे मजूर आहेत. एजन्सीपट्टयांत बहुतेक सर्व लोक शेतीवरच रहात असून विणकामावर रहाणारे थोडे लोक आहेत.

जिल्ह्याच्या ४८३५ चौरस मैलांपैकीं ५२९८७० एकर जमीन रयतवारी व लहान इनामी गांवांतील लागवडींतील व संबंध इनामी एकर १९५९९८ आहेत. एजन्सी पट्टा, जमीनदारी व इनाम जमीन यांविषयीं सविस्तर माहिती संकलित नाहीं. तांदूळ व रागी हीं दोन मुख्य धान्यें होतात.

जंगलः- या जिल्ह्यांतील बहुतेक जंगलें इनाम जमिनींत आहेत आणि सरकारी ताब्यांतहि जी जंगलें आहेत तींहि दुर्गम असल्यामुळें जंगलखात्याचा कायदा इकडे फारसा लागू केलेला नाहीं.

गंजममध्यें म्हणण्यासारख्या खाणी नाहींत. बोयिराणीजवळ थोडेसें मँगेनीज सांपडतें. गुमसूर तालुक्यांत व पार्लाकिमिडी येथें अभ्रक, अँन्टिमनी व कुरुंद हीं सांपडतात. पण व्यापार करण्याइतका पुरवठा नाहीं. किनाऱ्यानें हुमा, सुरदा, नौपाडा आणि कलिंगपट्टम् येथें मीठ तयार करण्याचीं सरकारी मीठागरें आहेत.

व्यापार आणि दळणवळणः- शेतीशिवाय मुख्य उद्योग म्हणजे विणकामाचा होय. सपाटीवरील बहुतेक सर्व खेडयांतून सामान्य तऱ्हेचा कपडा विणला जातो व बेरामपूर येथें रेशमी कापड तयार होतें.

गंजमचा निर्यात व्यापार मुख्यतः धान्य, कमावलेलीं कांतडीं, गळिताचें धान्य, हळद, लांकूड, खारे मासे आणि नारळ यांचा चालतो. मुख्य आयात माल म्हणजे तांदूळ, कपडा, कांचसामान, धातू व धातूसामान, मातीचें तेल, मसाल्याचे पदार्थ व गोण हा होय. गोपाळपूर, कलिंगपट्टम् व वारुव्हा हीं तीन बंदरें असून पहिलीं दोन मोठीं व परदेशाशीं व्यापार करणारीं आहेत.

बंगाल नागपूर रेल्वेची ईस्ट कास्ट शाखा जिल्ह्यापासून दक्षिणोत्तर गेली असून नौपाडा येथून पार्लाकिमेडि जमीनदारींत एक अरुंद शाखा गेली आहे. येथून मिठागरापर्यंत एक फांटा काढला आहे.

१७६६ मध्यें इंग्रजांनीं हा जिल्हा आपल्या ताब्यांत घेतला. तेव्हां जमीनदारी व हवेली असे यांतील जमीनीचे दोन भाग होते. कंपनीच्या हुकूमावरून एका अधिकाऱ्याची नेमणूक होऊन १८०४ मध्यें हा जिल्हा कायमधाऱ्याच्या पद्धतीखालीं आणला गेला. जमीनदारांनां त्यांच्या वतनांची कायम धाऱ्यानें सनद देण्यांत आली व हवेली जमीन लिलावानें जास्तींत जास्त किंमतीस विकण्यांत आली. जमीनदार व खासगी लोक यांच्याकडे कायम धाऱ्याची बाकी फुगत चालली व १८०९ ते १८५१ च्या दरम्यान सर्व जमीन पुन्हां सरकारांत आली. त्याचे बेऱ्हामपूर, चिकाकोल व गुमसूर हे तीन तालुके करण्यांत आले. चिकाकोलमध्यें इ. स. १८१७ मध्यें जमिनीची पाहणी व विभागणी करून रयतवारी पद्धत सुरू करण्यांत आली. तथापि १८७८ पर्यंत हल्लींची समाधानकार व्यवस्था करणें शक्य झालें नाहीं. १८६६ मध्यें सर्व सरकारी तालुक्यांतून मोजणी व १८७५ मध्यें आकारणी सुरू होऊन १८७८ मध्यें काम पुरें झालें. १९०६ मध्यें पार्लाकिमेडी एजन्सीमधील १२२ खेडयांस लोकलबोर्डाचा कायदा लावण्यांत आला. चिकाकोल, पार्लाकिमेडी व बेऱ्हामपूर येथें म्युनिसिपल कमिटी आहे. चिकाकोल, बेऱ्हामपूर व गुमसूर येथें तालुकाबोर्डे आहेत. व तीन डिस्ट्रिक्ट बोर्डे आहेत. मात्र एजन्सी पट्टयावर यांचा ताबा नाहीं.

शिक्षण- जिल्ह्यांतील सपाटीच्या प्रदेशाचा नंबर इलाख्यांत शिक्षणाच्या बाबतींत १७ वा आहे. दर दहा हजारी ६ व ८ लोकांना लिहितां वाचतां येतें. तसेंच दर १० हजार लोकांत शेंकडा फक्त १२५ सांनां (पुरुष १२३ व स्त्रिया २) इंग्रजी येतें. तेलगू लोकांत इंग्रजी शिक्षण जास्त असून देशी भाषा शिक्षणांत उरिया लोक वरचढ आहेत.

श ह र.- (छत्रपूर) जिल्ह्याचें पूर्वीचें मुख्य ठाणें. उ. अ. १९  २३' व पू. रे. ८५  ५' असून ॠषि कुल्या नदीच्या मुखाजवळ वसलें आहे. येथून मुख्य सडक व ईस्ट- कोस्ट रेल्वे जाते. लोकसंख्या (इ. स. १९०१) ४३९७. शहर व किल्ल्याचा अवशिष्ट भाग ही उंचावर असून पूर्वी येथें बराच व्यापार चालत असे. येथील किल्ला इ. स. १७६८ मध्यें मराठयांच्या हल्ल्यापासून बचाव करून घेण्याकरितां बांधलेला होता. इं. स १८१५ मध्यें येथें तापाची भयंकर साथ आली; तिनें पुष्कळ युरोपियन आणि एतद्देशीय यांचा संहार केला. तेव्हांपासून जिल्ह्याचें मुख्य ठिकाण बेऱ्हामपूर येथें नेण्यांत आलें व यामुळें शहराचें महत्व बरेंच कमी झालें. येथील कित्येक सुंदर इमारती कालगतीनें पडून गेल्या व कित्येक तर पाडून टाकण्यांत आल्या. पूर्वी हें बंदर होतें, पण व्यापार बंद झाल्यानें व तोंडाशीं गाळ बसत चालल्यानें १८८७ पासून ते बंद करण्यांत आलें. येथून ओरिसामध्यें तांदूळ फार जातो.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .