विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    

गणेश वेदांती- हा महाराष्ट्रीय ब्राह्मण असून मराठयांच्या तर्फे अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला याच्या दरबारीं वकील होता. पानिपत झाल्यानंतर रणांगणावरील मराठयांच्या बाजूचया शवांचा र्और्ध्वदेहिक संस्कार यानें व काशीराज पंडित यानें फार परिश्रम घेऊन केला. सुजानेंहि त्या कामी यांनां मदत केली. हा दयार्द्र व परोपकारी असल्यानें याला वेदांती हें टोपण नांव पडलें असावें. [इतिहास संग्रह; जुन्या ऐतिहासिक गोष्टी. भा. ३; मराठी रियासत मध्यविभाग. ३].