प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे      

गॅरिबाल्डि, गियुसेपे (१८०७-१८८२)- या इटालियन देशभक्ताचा जन्म नाइस येथें झाला. कारकुनी पेशाच्या शिक्षणाचा त्रास चुकविण्याकरितां तो लहानपणीं घरांतून पळून गेला पण पुढें तो बंदरावरील व्यापारधंद्यांत आपल्या बापाचा मदतनीस म्हणून त्याच्याकडे जाऊन राहिला. सार्डिनियन आरमारखात्यांत काम करीत असतांना त्यानें आपल्या मित्रासह युरिडीस नावाचें जहाज हस्तगत करून मॅझिनीचा पिडमाँट येथें प्रवेश होण्याच्या सुमारास जिनोआचा शिलेखाना काबीज करण्याचा कट केला. परंतु हा बेत उघडकीस आल्यामुळें त्यास देहान्त शिक्षा फर्मावण्यांत आली. पण १८३६ त तो दक्षिण अमेरिकेंत पळून गेला व त्यास ब्राझिलविरुद्ध बंड पुकारणा-याकडून कांही पत्रें आलीं. शेवटीं तो पकडला जाऊन त्याचे फार हाल करण्यांत आले. परंतु स्वतंत्र होतांच त्यानें ब्राझिल विरुद्ध लढाई पुकारून पोर्टोअलेग्रो काबीज केलें. हें युद्ध चालू असतां त्याचें लग्न झालें व अँनिटा हिजपासून त्यास पुढें तीन मुलें झालीं. रोसासच्या सैन्याशीं लढत असतांना अँडमिरल ब्राउन यानें त्यास हैराण केलें. त्यावेळीं दारूगोळा सांपडल्यामुळें जहाजास आग लावून पुढें १८४६ मध्यें युरुगुएच्या स्वातंत्र्यप्राप्तीस मदत करून व तेथील सर्व मानमरातबाचा त्याग करून राज्यक्रातीच्या चळवळीची बातमी ऐकतांच तो इटलीस परत आला.

नाइस येथें १८४८ सालीं परत आल्यानंतर चार्लस अलबर्ट यांस तो जाऊन मिळाला व तीन हजार स्वयंसैनिक गोळा करून त्यानें युद्धाची तयारी केली. परंतु अपयश आल्यामुळें तो स्वित्सर्लंडमध्यें पळून गेला. तेथून रोम येथें आल्यावर प्रजासत्ताक राज्यानें त्याची फ्रेंच सैन्याविरुद्ध लढण्याबद्दल नेमणूक केली. परंतु रोमचा पाडाव झाला व चार हजार स्वयंसैनिकांनां घेऊन तो व्हेनिस येथें गेला. फ्रान्स, आस्ट्रिया, स्पेन व नेपल्स यांनीं त्याचा पाठलाग सुरू केला पण आपल्या कौशल्यानें त्यानें सर्वांस चकविलें. गॅरिबाल्डि, त्याची बायको अँनिटा व कांही अनुयायी या सर्वांनां एका अरण्याचा आश्रय करावा लागला. आस्ट्रियन लोक त्यांचा पाठलाग करीत होतेच. कांहीं अनुयायांनां पकडून ठार करण्यांत आलें व त्याची बायको अँनिटा ही मेली. टस्कनि, पिडमाँट वगैरे देशांतून जातां जातां तो शेवटीं अमेरिकेस गेला. न्यूयार्क येथें कांहीं दिवस राहून व पैसे मिळवून तो फिरून १८५४ सालीं इटलीस आला. १८५९ त पुनः युद्ध उपस्थित झालें व त्यांत आस्ट्रियनांचा पराभव करून त्यानें अल्पाइन देशांस स्वातंत्र्य मिळवून दिलें.

वरील युद्ध चालू असतांना त्याला काउंटस रेमाँडीची फार मदत झाली होती. परंतु काहीं कारणामुळें या बाईंशीं लग्न करण्याचे टाळून तो इटलीकडे वळला. कॅप्रेरा येथें जाऊन, क्रिस्पि व बर्टानी यांच्या साह्यानें सिसिलीवर स्वारी करण्याचा त्यानें बेत ठरविला. मारसालाच्या स्वारींत मदत करण्याचें आश्वासन त्यांस इंग्रजांकडून मिळालें होतें. त्यानंतर 'सालेमी' येथे त्यास डिक्टेटर (अनियंत्रित प्रतिनिधि) नेमण्यांत आलें. पॅलेरमो येथें नीट बस्तान बसल्यानंतर नेपल्सची मुक्तता करून रोमवर चाल करून जाण्याकरितां त्यानें सैन्याची जमवाजमव केली. परंतु हा बेत काव्हूरच्या अनुयायांस पसंत नव्हता. इटालियन साम्राज्यास सिसिली देश ताबडतोब जोडावा अशी त्यांची इच्छा होती. परंतु तीस न जुमानतां त्यानें मिलॅझो येथील निएपोलिटन यांचा पराभव केला. पुढें गुप्तपणें, सार्डिनियांतील अरॅन्सी बॅकडे तो निघून गेला. त्याठिकाणीं बर्टानी हा पोपच्या संस्थानाविरुद्ध स्वारी करण्याच्या बेतांत होता. पॅलेरमाकडे जाण्याचा त्या सैन्यास काव्हूरनें भाग पाडलें. पेसिना येथें परत आल्यानंतर, गॅरिबाल्डीस दुसरा व्हिक्टर इमॅन्युएल याचें पत्र आलें. त्यांत त्यानें नेपल्सचें राज्य घेण्यापासून परावृत्त होण्याचा त्यास उपदेश केला होता. परंतु अखेर नेपल्सवर स्वारी करून तो त्या स्वारींत विजयी झाला. मार्चेस, अम्ब्रिया व अब्रूझी वगैरे ठिकाणें मध्यंतरी इटालियन सैन्यानें घेतलीं होती. शेवटी दोन्ही सिसिलींचा समावेश इटालियन साम्राज्यांत करण्यांत आला. नेपल्समध्यें व्हिक्टर इमॅन्युएलचा प्रवेश होत असतांना गॅरिबाल्डि त्याच्याबरोबर होता.

नाइस फ्रान्सला दिल्यामुळें व इटालियन सरकारनें त्याच्या अनुयायांची योग्य काळजी न घेतल्यामुळें रागावून गॅरीबाल्डीनें राजकारणांत प्रवेश करून घेतला. १८६१ सालीं त्याचें व काव्हूरचें भांडण झालें. विक्झिओनें समेटाचा प्रयत्न केला. गॅरिबाल्डीविरुद्ध असलेलें एक पत्र सिऑल्डिनीनें प्रसिद्ध केल्यामुळें त्यांची द्वंदयुद्धापर्यंत पाळी आली. परंतु ती गोष्ट टळली. नंतर २९ जुन १८६२ त तो पॅलेरमो येथें गेला. रोमवर हल्ला होणार असें दिसतांच रेट्टाझी यानें सिऑल्डिनी याजबरोबर सैन्य देऊन त्यास गॅरिबाल्डीवर पाठवून दिलें. युद्धांत गॅरिबाल्डीस कैद करण्यांत आलें परंतु युद्धतहकुबी झाल्यामुळें त्याची मुक्तता झाली व तो कॅप्रेरा येथें पुन्हां परत आला.

१८६४ मध्यें तो लंडन येथें गेला. तेथें त्याचें मोठें स्वागत करण्यांत आलें. इंग्लंडहून पुनः तो कॅप्रेरा येथें आला. १८६६ मध्यें पुनः लढाई उपस्थित होतांच त्यानें बेसिया सर करण्याकरितां लष्कराची तयारी केली. मॉटेसॅलो, लोड्ररोने, डार्सो, काँडिनो, अँम्पोला, बेझेक्का वगैरे ठिकाणीं त्यानें ऑस्ट्रियन लोकांचा पराभव केला. ट्रेंट घेण्याच्या सुमारास त्यास सेनापति लॅमरमोरा यानें परत फिरण्यास सांगितलें. पुनः कॅप्रेरा येथें परत आल्यानंतर रोमवर चाल करून जाण्याचा त्याचा विचार ठरला. १८६७ मध्यें तो सैन्य घेऊन पोपच्या मुलुखांत शिरला परंतु त्यास इटालियन सरकारनें कैद केलें. पुनः हाच प्रयत्न करून पाहतांना त्यास फिगलाइन येथें पकडण्यांत आलें. नंतर तो फ्रेंचांस जाऊन मिळाला. व त्यानें, थॅटिलॉन, अ‍ॅटन व डिजॉन येथें जर्मन सैन्याचा पराभव केला. व्हार्सेलिसच्या सभेचा तो सदस्य म्हणून निवडून आला परंतु फ्रेंचांशीं न पटल्यामुळें त्यास कॅप्रेरा येथें परत यावें लागलें. त्याची लोकप्रियता इतकी वाढत गेली कीं, ४०,००० पौंड देणगीदाखल व २००० पौंड पेन्शन म्हणून त्यास नजर करण्यांत आले. तेव्हां ही देणगी व पेन्शन घेण्याचें त्यानें नाकारलें. परंतु पुढें त्यास या दोन्ही गोष्टी स्वीकाराव्या लागल्या. रोममध्यें येणा-या पुरामुळें जें नुकसान होतें तें टाळण्याकरितां टायब- रचें धरण बांधावें म्हणून त्यानें फार श्रम केले. नंतर त्यानें पुनः आपलें लग्न करून घेतलें. १८८० सालीं मेन्टाना स्मारकाच्या उत्सवासाठीं तो मिलन येथें गेला होता. १८८२ मध्यें नेपल्स व पॅलेरमो या ठिकाणी सिसिलियन व्हेपर्सच्या उत्सवाकरितां तो निघाला होता परंतु आजारी पडल्यामुळें जाणें राहिलें. ता. २ जून १८८२ रोजीं कॅप्रेरा येथें त्याचें देहावसान झालें आणि सर्व इटालियन राष्ट्रशोकसांगरांत बुडून गेलें.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .