प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे      
 
गर्भविज्ञान- मातेच्या गर्भाशयांत गर्भसंभव होऊन ती बाहेर पडेपर्यंत त्याची जी वाढ होते व मातापितरांच्या रूप, आकाराशीं साम्य होत जातें त्याचें विशेष परीक्षण म्हणजें गर्भविज्ञान होय. पण या विषयाचा व्याप यापेक्षां विस्तृत आहे. बारीक व मोठया सर्वच प्राण्यांचे गर्भ उत्पत्ति पासून झपाटयानें वाढून त्यांच्या आकाररूप रचनेंत विलक्षण बदल होत जातो. या स्थितीमध्यें त्या गर्भास स्वतंत्र आयुष्य नसतें व त्यास आपलें भक्ष्यहि मिळवितां येत नाहीं. म्हणून तो गर्भ गर्भाशयांत असतो अगर तो बाहेर पडून अंड्या मध्यें स्वस्थ पडून रहातो. मात्र डांस वगैरे कांही कीटकांच्या गर्भास स्वतंत्रपणें जगण्याची पात्रता असल्यामुळें ते पूर्ण वाढ होईपर्यंत त्या स्थितींत असतात व त्यांस स्वतंत्रपणें जगण्या पुरती इंद्रियें असतात, या शेवटच्या प्रकारास सचेतन गर्भ असें नांव देऊं. हलक्या प्राण्याच्या गर्भाचें रूपांतर होऊन पूर्ण वाढ होईपर्यंत जे फरक होत जातात त्याची कांही बाबतींत फरक असलेली अन्य प्रतिमा म्हणजे मानवी गर्भाचें होणारें स्थित्यंतर होय व म्हणून मानवी प्राणी श्रेष्ठ असला तरी त्याच्या गर्भविज्ञानशास्त्राच्या अभ्यासासाठीं त्याची हीन प्राण्यांशीं गर्भविज्ञान संबंधीं तुलना करावी लागते. ''जन्म होईपर्यंत होणाऱ्या स्थित्यंतरांचें ज्ञान'' हीहि या विषयाची व्याख्या पुरेशी होत नाहीं. कारण, मूल जन्मलें तरी नुसत्या वाढीखेरीज त्याच्या शरीरांत पुष्कळच फेरफार व्हावयाचे असतात. त्याचप्रमाणें बेडूक अगर कोंबडीच्या पिलांचीहि स्थिति असते. तें पिलूं उपजल्या बरोबर हिंडू फिरूं व दाणे टिपूं लागतें तरी त्याचा पिसारा व अवयव पूर्ण वाढ झालेल्या कोंबड्याप्रमाणें नसतात. हाच प्रकार बहुतेक अन्य प्राण्यांविषयीं असतो. ''जन्मापासून तारुण्यावस्थेपर्यंत होणाऱ्या फेरबदलाचें प्राण्यांचें शरीरविज्ञान''अशी जरी व्याख्या घेतली तरी पुनः मानवप्राणी व इतर उच्च कोटींतील प्राणी वगळले असतां तारुण्यावस्था म्हणजे कोणती हें निश्चित करणें अवघड आहे. प्रजोत्पादनक्षमता येणें हें त्या अवस्थेचें लक्षण म्हटलें तरी हें सामर्थ्य प्रगट झाल्यानंतरहि वाढ व बदल शरीरांत होतात असें कांहीं जलचर प्राण्यांच्या परीक्षणावरून दिसतें येणेप्रमाणें कोणतीहि व्याख्या केली तरी तिला बरेच अपवाद सांपडतात व म्हणून गर्भसंभवापासून मृत्यूपर्यंत प्राण्यामध्यें जे जे फेर बदल होतात त्यांचें ज्ञान ही व्याख्याच विशेष सयुक्तिक ठरते. हक्सले याच्याहि मतें हीच गोष्ट अनुभवास येते कीं मृत्यूपर्यंत प्राण्यांत वाढीचे अगर जरेचे बदल होत असतात व वाढ कोणत्या वर्षी थांबते व जरेमुळें होणारे बदलहि केव्हां थांबतात हें सांगतां येत नाहीं. या दोहोंच्या दरम्यान पूर्ण वाढीचा काळ धरला पाहिजे. प्रजोत्पादन दोन प्रकारांनीं होतें. एक जननेंद्रिय संयोगापासून व दुसरा या क्रियेविरहित होणारें प्रजोत्पादन. पहिल्या प्रकारांमुळें अनेक व्यक्ती जन्मास येतात ऐवढेंच नव्हे तर व्यक्तींचे विविध प्रकारहि जन्मतात. परंतु दुसऱ्या प्रकारामुळें ज्या जातीच्या प्रथम व्यक्ती आहेत त्याच व्यक्तीच्या संततीनें त्या जातीची वाढ होते. त्यांत व्यक्तीवैचित्र्य व विविधता हे गुण आढळत नाहींत.पहिल्या प्रकारामध्यें जननेंद्रियपेशी नर आणि मादी या दोन जातींच्या असतात व त्यांना रेतपेशी व अंडपेशी म्हणतात. रेतपेशींमध्यें चलनवलन व अंडपेशींत पोषण क्षमता हे धर्म असतात व या दोहोंचा पूर्ण संयोग होऊन एक नवीन संयुक्त पेशी तयार होणें म्हणजेच अंडपेशीची सफलता अगर गर्भसंभव (नवीन व्यक्ति तयार होणें) होय.ही व्यक्ती कांहीं पोषाणाच्या सांठयानें समृद्ध व आकारानें अंडपेशीप्रमाणें असते खरी परंतु तीमध्यें रेतपेशी असल्यामुळें नवीन व्यक्तीमध्यें उभयपेशीचे गुणधर्म तिच्या वाढींत दिसून येतात.

यानंतर गर्भाची वाढ व्हावयाची परंतु ती ठरीवक्रमानें होण्यास अनुकूल परिस्थिती पाहिजे. त्याशिवाय मात्र ती होणार नाहीं, उलट गर्भपात होतो. झाडाचें बीं हवा व ओलावा न लागेल अशा स्थलीं ठेविलें तर त्यापासून वृक्ष, व फलें यांचा उद्भव होणें अशक्य आहे. त्या बीजाला जमीन,पाणी, हवा इत्यादि अनुकूल परिस्थितीमध्यें ठेविलें तरच त्याची वाढ होते.तसेंच गर्भ वाढीस लागण्याचा व प्रसव होण्याचा निसर्गाचा जो ठरीव मार्ग व प्रकार आहे त्यास अनुसरून वाढ होते. त्यांत बदल करतां येत नाहीं.गर्भवृद्धीबरोबर बाह्य परिस्थितीहि आपोआप बदलून गर्भवृद्धीस ध्दीस मदत करीत असते असें हर्बर्ट स्पेन्सरचें सुद्धा मत आहे. कांहीं मर्यादेपर्यंत परिस्थितींत इष्ट बदल केल्यानें गर्भवृद्धीस मदत होते, परंतु अनिष्ट बदल झाल्यास उलट प्रकार व गर्भपातहि होतो. या गोष्टी ध्यानांत ठेऊन पक्षी वगैरे प्राणी पिंजऱ्यांत ठेवून हे प्रकार पहातां येतात. कांहीं जलचर प्राण्यांचें मात्र कांही मर्यादेच्या बाहेर येणें प्रमाणें परीक्षण करणें शक्य नसतें. कांही प्राणिशास्त्रवे त्यांनीं हीनप्राणीप्रजोत्पादनाचें एक नियमबद्ध शास्त्रचबनविलें आहे.

रेतस्खलनाच्या वेळीं जरी लक्षावधी रेतपेशी बाहेर पडत असल्या तरी गर्भसंभव होण्यासाठीं एकच रेक्तपेशीची व एकच अंडपेशीची जरूरी असते. अंडाशयांत सर्व जन्मांत ७०,०००अंडपेशी उत्पन्न होण्याची पात्रता असते. त्यांपैकी १५ ते४५ वयापर्यंत म्हणजे ३० वर्षांत फक्त ४०० अंडपेशी पक्क होऊन प्रतिमासीं स्त्रियांच्या रजाबरोबर २.४ जातात; यांपैकी फारच थोडया गर्भसंभवांत सांपडतात असा अंदाज केला आहे.अंडपेशीची सफलता अथवा गर्भसंभव कसा होतो हें वर सांगितलेंच आहे. या संयुक्त पेशींच्यामध्यें आणखी एक मध्यबिंदु उत्पन्न होतो व त्याचें कारण रेतपेशी होय. नंतर हे दोन्ही मध्य बिंदू जवळ व संयुक्त होऊन विभागत जाऊन त्या पेशींची संख्या वाढून त्यांचा एक गोळा बनतो.मानवी व इतर श्रेष्ठ प्राण्यांत यापुढील फेरबदल मातेच्या गर्भाशयांत होतात व त्यामध्यें ही गर्भसंभव झालेली पेशी या स्थितींत लहान असते व मातेच्या शरीरांतून पोषक द्रव्य गर्भास मिळत असतें. परंतु हे पुढील फेरबदल पक्ष्यादि प्राण्यांत मातेच्या शरीराबाहेर व्हावयाचे असले तर पोषक द्रव्याचा बराचसा सांठा असलेलें अंडें बाहेर पडतें. हा साठा म्हणजे पिंवळा बलक होय. या बलकावर एक जीवनपेशीचा पांढरा ठिपका असतो व तेंच पुढें अंडें फोडून बाहरे निघणारें पिलूं होय. त्याचें, भोंवतालच्या पौष्टिक बलकावर वाढ व पोषण होत असतें. वर सांगिल्याप्रमाणें असंख्य पेशींचा गोळा बनल्यानंतर त्यास आकार प्राप्त होऊन त्यास नळीचा पोकळ आकार येतो.प्रथम याची एकच थराची बनलेली रचना असते. परंतु नंतर ते दोन थर होतात. यांपैकीं बाहेरील थरास गर्भबाह्यास्तर व आंतील थरास गर्भांतरास्तर म्हणतात. कांही काळानंतर या दोहोंमध्यें आणखी एक थर उत्पन्न होतो त्यास गर्भमध्यास्तर म्हणतात. यावेळीं गर्भाच्या मधील नळीचा आकार वाढतो. गर्भमध्यास्तर या नळीच्या दोन्ही बाजूंस चिकटून नंतर त्याचे दोन पापुद्रे होऊन बाहेरील गर्भबाह्यस्तराशीं संलग्न होतो. या थरांची वाढ होत असतांना मधील नळी पूर्ण होण्यास गर्भाच्या वरील म्हणजे मानेच्या बाजूस आरंभ होतो. या नळीमध्यें मज्जासंस्थेची मध्य नलिकाकार पोकळी असते. याशिवाय गर्भमध्यास्तराच्या दोन पापुद्य्रांतील पोकळी आणि गर्भांतास्तरांतील आंत्रपोकळी अशा दोन पोकळी असतात. नंतर नलिकाकार गर्भास दोरीनें आवळल्याप्रमाणें कारकोचा पडून एक वरचा भाग (गर्भ) व एक खालील भाग (गर्भानुबंधी) बनतो. वरील म्हणजे गर्भाच्या पुढील भागास शीर्षपुट व गर्भाच्या मागील भागास पुच्छपुट म्हणतात. शीर्षपुटामध्यें याच वेळीं बनलेलें आद्यांत्र, पुच्छपुटा मध्यें अंतांत्र व या दोहोंमध्यें मध्यांत्र असतें. जेथें करकोचा पडून गर्भाचे दोन भाग झालेले दिसतात तेथें भावी बेंबी असते व हे बेंबीचें छिद्र गर्भावस्थेंत बराच काळ उघडें असून त्या वाटें मध्यांत्र आंतडयाच्या भागांशीं जोडलें जातें. गर्भमध्या स्तराच्या पोकळीपासून हृदयावरण व अंत्रावरण या पोकळी निर्माण होऊन थोडया अवधींत एकमेकांपासून अलग होतात.मज्जानलिकेची पोकळी बंद होण्याच्या अगोदर गर्भांतास्तराच्या खालील भागापासून मानेपर्यंत काठिण्य येत जाऊन तो भावी अस्थिपंजराचा कणा बनतो व नंतर मणके तयार होऊन त्याची पोकळी बंद होते. हे गर्भाचे मूलभूत तीन थर आहेत. त्यांपासून सर्व शरीर व इंद्रियें बनतात व म्हणून निरनिराळया लहान मोठया प्राण्यांतील कोणता भाग अथवा इंद्रिय कसा बनला असावा व त्याचें कार्य काय असावें याचा वाद सुरू झाला असतां त्याचा निकाल देणारें हे थर म्हणजे गर्भविज्ञानशास्त्रांतील वरिष्ठ कोर्टच मानलें गेलें आहे. कारण तो वादग्रस्त भाग अमुक थरापासून बनतो असें प्रयोगानें अगर परीक्षणानें सिद्ध करून दिलें म्हणजे त्याच्या शरीरांतील कार्याविषयी संदेहच उरत नाहीं. यूरोपीय शास्त्रज्ञानामध्यें हें नवीन वाढतें शास्त्र असल्यामुळें असे प्रश्न
वारंवार उद्भवतात. या तीन थरांपासून जे शरीराचे भाग निर्माण होतात असे असेः-

ग र्भा त स्त रा पा सू नः- (१) शरीराची बाह्यत्वचा,कोंडा, खवले इत्यादि. (२) मेंदु, कणा, व शरीरांतील सर्व प्रकारची मज्जासंस्था व तंतू. (३) नाककानादि पंचेंद्रियांची आंतील रचना व अंतस्त्वचा. (४) मुखांतील अंतस्त्वचा व दांतांच्या मिन्याचें शुभ्र कवच. (५) नाकांती अंतस्त्वचा. (६) त्वचेंत असणाऱ्या स्वेदपिंडांतील आस्तरण.तसेंच मुख व नाकांतील ग्रंथीतील आस्तरण. (७) स्वेदपिंडांतील स्नायू व डोळयांतील कनीनिका (बाहुली स्नायू.

ग र्भ म ध्या स्त रा पा सू नः- सर्व अस्थी आणि सर्व प्रकारची संधाय रचना. (२) स्वेदपिंडांमधील स्नायूखेरीज इतर सर्व प्रकारचे स्नायू. (३) सर्व प्रकारच्या शिरा, धमन्या, रक्तवाहिन्या व रसवाहक कोष व प्लीहा.(४) मूत्राशय व मूत्रमार्गाच्या अंतस्त्वचेखेरीज सर्व इतर मूत्रमार्ग व जननेंद्रियें. या थराच्या आंतील पापुद्य्रापासून अंतर्मार्गाची तंतुमय व स्नायुमय रचना सर्व रक्ताभिसरणसंस्था आणि लघवी व जननेंद्रियें बाहेरील पापुद्रयापासून शरीराच्या बाह्यबाजूची (यांतच त्वचेचा समावेश होतो.) अस्थिमय, तंतुमय व स्नायु मय रचना.

ग र्भ बा ह्य स्त र.- (१) दांतांपासून गुदद्वारापर्यंत सर्व अंतस्त्वचा. तसेंच सर्व पिंडाच्या आंतील सर्व अंतस्त्वचा (यकृत. प्यांक्रिया वगैरे). (२) श्वासमार्गाच्याआंतील सर्व अंतस्त्वचा. (३) कानांतील कर्णनलिका व पडद्याच्या आंतींल अंतस्त्वचा (४-५) थायराइड ग्रंथीच्या आणि थायसन कप्प्यांतींल अंतस्त्वचा. (६) मूत्राशय व मूत्रमार्गाच्या छिद्राजवळील भाग वगळून तेथील इतर सर्व अंतस्त्वचा. या तीनहि थरांवरून व त्याच्या निश्चित रचने वरून अनेक वादग्रस्त मुद्दे मिटवितां येतात असें वर म्हटलें आहे खरें; परंतु समुद्रांतील स्पंज व इतर प्राण्यांच्या गर्भा विषयीं विचार कर्तव्य असतां यासहि अनेक स्पष्ट अपवाद आढळून येतात. त्याचप्रमाणें मज्जासंस्थेचा नलिकाकार रचनेनें आरंभ होतो व त्याचें वरचें टोंक वळून त्याचा पुढचा मेंदू बनतो या दोन्ही क्रियांमध्यें मानवीप्राणी व गोगलगाय इत्यादि हीन प्राणी यांच्या या भागांच्या गर्भावस्थेंतील रचनेमध्यें फरक असतो. मानवी प्राण्यांत मेंदु, पृष्ठवंश व इतर सर्व मज्जासंस्था गर्भबाह्यास्तरापासून होतात. परंतु कांहीं इतर प्राण्यांत मेंदु व पृष्ठवंशाखेरीज इतर मज्जारचना अन्य थरापासून निर्माण होतात. असल्या व याहून सूक्ष्म व रुक्ष मुद्यावर तज्ज्ञ शास्त्रज्ञांत वाद चालतात. परंतु त्यांचा येथें विशेष विस्तार न करतां फक्त मानवी गर्भाच्या पुढील स्थित्यंतरांचें वर्णन करून हा विषय संपवूं.

ग र्भ वे ष्ट णें:- गर्भसंभव होऊन गर्भाशयांत गर्भ येऊनपोंचल्यावर भोंवतालची गर्भाशयांतस्त्वचा सुजल्याप्रमाणें जाड झालेली असते व त्या पोकळीच्या बुडाशीं तो गर्भ जरासा रुतून व चिकटून बसतो व त्याच्यावरील या अंतस्त्वचेच्या वेष्टणानें तो खालीं व वर आच्छादला जातो. या वेष्टणामुळें गर्भाशयाचा अंडाशयाशीं संबंध जोडणारी दोन्ही बाजूंचीं छिद्रें झांकलीं जाऊन या गर्भवेष्टणाचे तीन भाग होतात, ते असेः- (१) तलवेष्टण म्हणजे गर्भ व गर्भा शयाचा तळ यामधील वष्टेण (२) द्विगुणीभूत वेष्टण म्हणजे गर्भ व गर्भाशयाची पोकळी यामध्यें आडवें असलेलें वेष्टण (३) गर्भाशयाच्या इतर भागांस चिकटलेल्या वेष्टणास वास्तविक वेष्टण ह्मणावें. त्याशिवाय गर्भ वाढून त्याच्या भोंवती आणखी दोन गर्भवेष्टणें थोडया दिवसांनी तयार होतात. गर्भवेष्टणाच्या बाहेरील पापुद्य्रास गर्भमध्यवेष्टण म्हणतात व त्यामध्यें रक्तवाहिन्यायुक्त शेंडे असतात ते गर्भाशयाच्या तलवेष्टणांत व मध्यवेष्टणांत घुसतात. याच्या आंत गर्भांतर्वेष्टणनामक गर्भास वेढून टाकणारें पिशवीसारखें व सगळीकडून बंद असलेलें वेष्टण असतें. व तें गर्भाच्या बेंबीशीं गर्भास चिकटलेलें असतें. त्यामध्यें जो द्रवपदार्थ असतो त्यांत गर्भ तरंगतो. नाभिरज्जुनामक रक्तवाहिन्यायुक्त बंधनानें गर्भ मध्यवेष्टणाशीं जोडलेला असतो.या रज्जूस र्भांतर्वेष्टणाचा आवरणासारखा उपयोग होतो.शिवाय या रज्जूमध्यें धार, पोषणकोष व आंत्रनलिकेशीं संबंध जोडणारी नलिकाहि असते. गर्भाच्या वाढीबरोबर गर्भाशय मध्यवेष्टणाचीहि वाढ होऊन गर्भाशयाची पोकळी भरून जाते आणि तल व वास्तविक वेष्टण चिकटून दोन्ही एकजीव होतात. या जाड थरामध्यें पिंड असतात. परंतु त्यांत रक्तवाहिन्यायुक्त गर्भमध्यवेष्टनाचे शेंडे मात्र घुसत नाहींत हे सर्व थर स्पंजाप्रमाणें जाड होत जातात व प्रसूतिसमयीं येथेंच वेष्टणें सुटण्यास आरंभ होतो.

गर्भाशयाच्या तळाशीं बराच फेरबदल होऊन रक्त सांठणाऱ्या मोठमोठया स्पंजाप्रमाणें पोकळ जागा निर्माण होऊन त्यांत गर्भमध्यवेष्टणाचे रक्तवाहिन्यायुक्त शेंडे घुसतात आणि याचीच वार बनते. या रक्तवाहिन्या गर्भाच्या पश्चिम आंतडयाकडून येतात; व येथील वेष्टणास (अ‍ॅलेन्टॉइस) म्हणतात. वार या इंद्रियाच्या योगानें गर्भाचें पोषण व मलविसर्जन या क्रिया चालतात. गर्भ बाहेर येण्याच्या वेळी वारेची लांबी ७-८ इंच व वजन १ पौंड असतें. गर्भाशयधमनी त्यांत शुद्ध रक्ताचा पुरवठा करते व तिच्या जोडीची शीर अशुद्ध रक्त घेऊन जाते. येथील स्पंजाप्रमाणें रक्ताच्या मोकळया व मोठया फटींत गर्भाच्या रक्तवाहिन्याचे शेंडे घुसल्यामुळें माता व गर्भ यांचे रक्त प्रवाह मिश्र न होतां झिरझिरीत रक्तवाहिन्यांच्या पडद्यांतून शुद्ध प्राणवायु व अशुद्ध कॅर्बानिक अँसिड वायु आणि लघवी इत्यादि द्रव्यांची अदलाबदल होते. गर्भाचें रक्त नाभिरज्जूच्या योगानें वारेंत जातें व तेथून तें मातेच्या रक्तांतील शुद्ध वायू शोषतें व विषारी द्रव्यें बाहेर टाकतें. गर्भांतवेंष्टणजल हें गर्भ व माता यांच्या रक्तवाहिन्यातून द्रव पदार्थ झिरपून बनतें. त्यांत नैट्रोजनयुक्त पदार्थ लघवी, क्षार व गर्भ मोठा झाल्यावर त्याचें मूत्र असतें त्याचें कार्य गर्भास आसरा देऊन धक्का न लागूं देणें हें होय.

येथपर्यंतची गर्भाची वाढ व यापुढील फेरबदल विहंगम दृष्टीनें व दर महिन्याचें वर्णन केल्यानें तें आटोपशीर होऊन हा विषय समजण्यास सुलभ जाईल.

प हि ला म हि ना.- बारा दिवसांच्या सफलित संयुक्त पेशीचा व्यास ३/८ इंच व गर्भाची लांबी एक दोरी असते. तिसऱ्या आठवडयानंतर वरील व्यास २/३ इंच व गर्भाची लांबी दोन दोऱ्या होते. गर्भांतरवेष्टण तयार होतें व पोषणकोषा-पासून गर्भास पोषण मिळतें. गर्भाची पाठ वक्राकार होते. व मस्तकाचा निदर्शक जाडपणा तयार होतो. गर्भरक्तवाहिन्यांचा संबंध गर्भमध्यवेष्टणाशीं जडूं लागतो. चवथ्या आठवड्यानंतर गर्भपेशीचा व्यास ७/८ इंच असून वजन २० गुंजा असतें व आतां वक्राकार झालेल्या गर्भाची लांबी १/४ इंच असते. डोळे, कान व छातींतील इंद्रियें बनण्यास नुकताच आरंभ झाल्याच्या खुणा दिसतात. तसेंच झाडास फुलाची बारीक कळी यावी तशा चार कळया दिसतात. त्या भावी हातापायांच्या निदर्शक होत. लहान आकाराचा पोषणकोष असतो. गर्भांतवेंष्टण फुगलेलें व मध्यवेष्टणास चिकटून एकजीव झालेलें नसतें.

दु स रा म हि ना.- या कालाच्या शेवटीं गर्भपेशी १ ३/४ इंच व्यासाची असून व गर्भाची सरळ लांबी ३/४ इंच असते. पोषण कोष लहान असून एका धाग्यास लोंबता असतो.भावी वार तयार होण्याच्या जागीं पेशवर्धन सुरू होतें गर्भाची नाळ सरळ असते. गर्भांतर्वेष्टण बरेंच फुगलेलें व बाहेरील गर्भमध्यवेष्टणास चिटकलेलें असतें. बेंबीचें छिद्र बहुतेक मिटलेलें असून त्यांतील आंतडें किंचित् दिसतें. खालील जबडा व गळपट्टीच्या हाडामध्यें दाढर्य येऊं लागतें. मुख व नाक हीं ओळखतां येतात. मूत्रपिंड तयार होतात.

ति स रा म हि ना.- या महिन्याच्या शेवटीं गर्भपेशी चार इंच लांब असते व वार तयार होते. गर्भमध्यवेष्टणांतील रक्तवाहिन्यांचे शेंडे हें लक्षण कमी होऊं लागतें व ते साधें वेष्टण होतें गर्भाच्या नाळीची लांबी वाढते. व ती पिवळण्यास आरंभ होतो. गर्भाची लांबी सुमारें चार साडेचार इंच असते व वजन सुमारें अडीच तोळे असतें. डोकें आणि छाती यामधील भाग, मान, मुख आणि नाक यांमधील टाळू या रचना तयार होऊन ओंठहि पूर्ण बनतात व त्यांनीं तोंड मिटलें जातें. जननेंद्रियें संदिग्ध स्वरूपांत निर्माण होतात.परंतु लिंगभेददर्शक अवयव तयार नसतात. बेंबीमध्यें किंचित अडकलेलें आतडें उदरांत जाऊन बसतें. नखें व बोटें यांसुद्धां हातपाय तयार होतात; बहुतेक हाडांत दाढर्य येण्यास ठरीव स्थानीं आरंभ होतो.

च व था म हि ना.- याच्या अखेरीस गर्भाची लांबी साडेपांच इंच व वजन सुमारें तीन औंस असतें. स्त्रीपुरुषभेद दर्शक अवयव स्पष्ट तयार होतात. डोक्याच्या कवटीच्या हाडांमध्यें दाढर्य येण्यास आरंभ झाला असला तरी त्यामधील सांध्यामध्यें फटी व त्याच्या कोपऱ्यांत अपुऱ्या अस्थी असल्यामुळें अस्थिकोनरंध्रें दिसतात. गर्भाच्या लांबीपैकी एक चतुर्थांश मस्तकानें व्यापला जातो. शरीरावर किंचित् लव दिसण्यास प्रारंभ होतो. हातापायांमध्यें चळवळ करण्याची प्रवृत्ति सुरू होते. तिसरा महिना पुरा होण्याच्या किंचित् अगोदर गर्भपात होण्याबरोबर गर्भ पाहिला तर हातापायांतील चळवळ दृष्टीस पडते.

पां च वा म हि ना.- याच्या अखेरीस गर्भाची लांबी नऊ इंच व वजन सुमारें अकरा औंस भरतें. शरीरावर तैल युक्त चिकट स्निग्धता येण्यास आरंभ होतो. गर्भाच्या आकारापेक्षां अद्याप गर्भांत वेष्टणजल अधिक असतें. यावेळीं उपजलेल्या गर्भांत हस्तपादादिकांचें चलनवलन जोरानें सुरू असतें व तें कांही तासपर्यंत टिकतें.

स हा वा म हि ना.- याच्या शेवटीं गर्भाची लांबी बारा इंच व वजन चोवीस औंस भरतें. भिंवया व पापण्याचे केंस तयार होतात. शरीरांत जेथें वसा असावी अशा ठिकाणीं ती तयार होऊं लागते. परंतु ती थोडी असल्यामुळें एकंदरीत त्वचेस अंमळ सुरकुत्या पडलेल्या असतात. लघु आंत्रामध्यें पिंवळा मळासारखा पदार्थ असतो व काळसर रंगाचा तसलाच पदार्थ महांत्रांत बनण्यास नुकताच आरंभ होतो. डोक्यावरील केंस लांब होतात.

सा त वा म हि ना.- याच्या शेवटीं गर्भाची लांबी सव्वा फूट व वजन पंचेचाळीस औंस भरतें. पापण्या उघडया असतात. एका बाजूचें अंड (पुरुष गर्भ असल्यास उदरांतून खाली अंडाशयांत उतरतें. नखें जाड होऊं लागतात पण अग्रापर्यंत त्यांची वाढ व्हावयाची असते.अठ्ठावीस आठवडे पूर्ण भरल्याखेरीज उपजलेला गर्भ जगावयाचा संभव फारसा नसतो असें बहुमत आहे. याच्या अगोदर उपजलेलीं मुलें कांहीं तास अगर दिवसच फक्त जगतात. यास अपवादात्मक अशीं लहान मुलें जगल्याचीं उदाहरणें खरीं आहेत. पण त्यांतील गर्भाधानात्मक व त्याच्या अगोदरचा रजोदर्शन काल यांची माहिती आई बापांनीं जशी दिली असेल त्यावरून वर मोजलेलीं हीं उदाहरणें आहेत.

आ ठ वा म हि ना.- याच्या अखेरीस साडेसोळापासून सतरा इंचापर्यंत गर्भाची लांबी व वजन साडेचार पासून सतरा पौडांपर्यंत असतें. वसावृद्धि झाल्यामुळें सुरकुत्या जाऊन गर्भ पुष्ट दिसतो. अंडाशयांत एकच अंड उतरलेलें व तेहि बहुधा डाव्या बाजूचें असतें. यावेळीं उपजलेलीं मुलें चळवळ करण्यांत जरा मंद व बरींचशीं झोपाळू असतात. तशीं पुरे दिवस भरलेलीं मुलें नसतात. त्यांची विशेष निगा राखली नाहीं तर पूर्ण मास भरलेल्या लेकरांपेक्षां या लेंकरांतील मृत्युसंख्येचें प्रमाण अधिक असतें.

न व वा म हि ना.- याच्या अखेरीस जन्मलेल्या मुलाची लांबी २१ इंच व सात पौंड वजन भरतें. या कालापूर्वी उपजलेलीं मुलें वर्णानें यावेळीं जितकीं लाल दिसतात तसें हें नसतें;तर त्याचा वर्ण अंमळ पांढुरकाच गोरा असतो. हातापायांच्या नखांची पूर्ण वाढ होऊन हाताचीं नखें तर आणखी वाढून पुढें आलेलीं असतात. डोक्यावरील केंस एक दोन इंच लांब वाढून त्यांचा काळा रंग असतो. अंडाशयांत यावेळीं दोन्ही अंड उतरलेले असतात. याच्या अगोदर बेंबी कटिराच्या बाजूकडे खालीं असते ती यावेळीं शरीराच्या साधारण मधोमध येते. म्हणजे खऱ्या बिंदूपेक्षां ती फक्त पाऊण इंच खालीं असते. प्रसूतीस वेळ लागला तर मुलाचें तोंड व शरीर काळें निळें होतें. व तें मूल मुळीच अथवा फारसें रडत नाहीं. पण तसें नसलें तर उपजतांक्षणीं मोठ्यानें ''टयाहां टयाहां'' करीत रडतें व एकसारखें हातपाय हलवितें. थोडया वेळानें त्यास लघवी व हिरव्या पिंगट काळसर रंगाची मलशुद्धि होते.

वर दिलेल्या वजनापेक्षां एक दोन पौंड अधिक वजनाचीं मुले जन्मल्याचीं पुष्कळ उदाहरणें घडतात. पांच पौंडांपेक्षां कमी वजन असलेलें मूल जगण्याचा संभव एकंदरीनें कमी असतो, परंतु अशी मुलें जगल्याचीं उदाहरणेंहि कांही थोडीं थोडकीं नाहींत. या वजनाचें मूल अपुऱ्या मांसाचें जन्मलें तर तें जगण्याचा संभव अधिक असतो. दहा पौंड वजनाचीं मुलें क्वचित जन्मतात व त्याहून फारच क्वचित बारा पौंड वजनहि आढळण्यांत आलें आहे. बारापासून पुढें पंधरा व अठरा पौंड वजनाची मुलें झाल्याचा लेखी वृत्तांत विश्वसनीय डाक्टरांच्या हातचा आहे. पण हीं मुलें मृत उपजलेलीं अगर शस्त्रप्रसूतीनें व तींहि मृतावस्थेंत काढलेलीं होती. साडे चोवीस इंचापर्यंत गर्भाची लांबी नमूद आहे. मुलाचें वजन मुलीच्यापेक्षां उपजतांच जास्त असतें.मातेच्या मागाहूनच्या प्रसूतीमध्यें तिच्या लेंकरांचें उपजतां वेळचें वजन वाढतें. याचें कारण पंचवीस ते पस्तीस वयाच्या दरम्यान मातेस अधिक वजनाचीं मुलें होतात. या वयानंतर उपजलेल्या मुलांचें वजन पुनः कमी कमी होऊं लागतें.शस्त्रप्रसूतीची अवश्यकता कटिर प्रदेश चिंचोळा व निरुंद असल्यास अधिक असण्याची भीति असत. मूल उपजल्यानंतर दोन तीन दिवस म्हणजे मातेच्या स्तनांत दुग्धोत्पत्ति नीटशी होईपर्यंत मुलाचें उपजत वजन कांहीसें कमी होतें नंतर तें पुनः पूर्ववत होऊन यथाक्रमानें वाढत जातें. उपजत लेकरांची मोठी संख्या अजमावून पहातां मुलें आणि मुलीं यांचे परस्पर तुलनात्मक प्रमाण १०६ मुलगेः १०० मुली असें पडतें.

मूल उपजण्यापूर्वी गर्भामध्यें रक्ताभिसरण कसें होतें: वारेंतून शुद्धरक्तवाहक शीर निघते तिला नाभिशीर ह्मणतात. ती यकृतांतील आडव्या भेगेंत प्रवेश करून नंतर तिच्या दोन शाखा होतात. यापैकीं थोरली शाखा यकृत धमनीशीं संयुक्त होऊन यकृतास शुद्ध रक्ताचा पुरवठा करते व धाकटी शाखा अधस्थ महत्तम शिरेमध्यें प्रवेश करिते.ह्मणजे शरीरांतील रक्तांत प्रवेश होण्यापूर्वी गर्भाच्या शुद्धरक्तास यकृतपिंडांतून प्रथम जावें लागतें. आणि गर्भावस्था वृद्धिंगत होतांना हें रक्ताभिसरणाचें प्रमाण वाढत जातें.हृदयाचें ऊर्ध्वस्थक्षिणपुटामध्यें याप्रमाणें शुद्ध व अशुद्ध अशा मिश्र रक्ताचा प्रवाह अधस्थ महत्तम शिरेच्या वाटें येतो. त्या रक्ताचा वारेंतून निघून हातापायांतील रक्तवाहिन्यांवाटें येणारा भाग व यकृतमार्गें येणारा भाग (म्हणजे रक्त) अशा रीतीनें ऊर्ध्वस्थ दक्षिणपुटांत येतो. गर्भाच्या आरंभावस्थेंत हा प्रवाह ऊर्ध्वस्थ दक्षिणपुटांतून गर्भावस्थेंत
असलेल्या लंबवर्तुलाकार छिद्रांतून ऊध्वर्स्थ वामपुटांमध्यें एका पडद्यानें लोटला जातो व त्यातून तो अधस्थ वामपुटांत लोटला जातो. व त्यातून तो अधस्थ वामपुटांत लोटला जातो. शरीराच्या डोकें वगैरेंवरील अवयवांतील अशुद्ध रक्त ऊर्ध्वस्थ महत्तम शिरेवाटें ऊर्ध्वस्थ दक्षिणपुटांत प्रवेश करून नंतर अधस्थ दक्षिणपुटांत व तेथून फुप्फुसधमनींत जातें. त्यांपैकीं अल्प भाग फुप्फुसांत जाऊन बहुतेक रक्त धमन्याकार नाडींतून वामस्कंधधमनीच्या उगमाजवळ महत्तम धमनींत प्रवेश करतें व नंतर खालील हातपाय वगैरे भागांत तें जातें. तात्पर्य हें कीं या आरंभावस्थेमध्यें हृद्दक्षिणपुटांत शुद्ध व अशुद्ध रक्तप्रवाहांचे मिश्रण होणें पडद्याच्या योगानें घडत नाहीं ही मौज आहे. तसेंच हात, दंड, मान व शिर यांस शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. व कमरेखालील भागास बहुतेक अशुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. म्हणून या अवस्थेंतील गर्भाचें डोकें इतर भागांपेक्षां मोठें दिसतें. गर्भावस्थेंतील मध्य कालापासून हा प्रकार बदलतो. दक्षिणपुटांतील पडदा बारीक होतो व छिद्राचा पडदा अधिक मजबूत होतो. म्हणून अधस्थ महत्तम धमनींतून येणाऱ्या शुद्ध रक्ताचा कांहीं भाग हृद्दक्षिणोर्ध्वस्थपुटांत स्थिर होतो आणि तो धमन्याकार नाडीमार्गें महत्तम धमनींत प्रवेश करतो. म्हणजे असें घडूं लागल्यापासून गर्भशरीराच्या खालील भागास अशुद्ध रक्ताच्या ऐवजीं मिश्र रक्त मिळूं लागल्यामुळें या कालापासून खालील शरीरास अधिक पुष्टि येते. मान, डोकें, हात यांनां पूर्वीप्रमाणें शुद्ध रक्त मिळणें चालूं असतेंच.

मू ल उ प ज ल्या नं त र व री ल र क्ता भि स र ण प्र का रा म ध्यें हो णा रें फे र ब द ल.- पहिला श्वासोच्छ्वास सुरू झाल्याबरोबर फुप्फुसांत हवेचा प्रवेश होतो; व नंतर फुप्फुस धमन्या मोठया होऊन त्यांतून खूप रक्त फुप्फुसांत शिरूं लागतें व तें पुन्हां ऊर्ध्वस्थ वामहृत्पुटांत परत येतें व म्हणून तेथील पोकळींतील दाब वाढतो. याच सुमारास वार सुटून मोकळी झाल्यामुळें तींतील रक्ताभिसरण बंद पडतें म्हणून नाभीच्या शिरेमधील प्रवाह थांबल्यामुळें ऊर्ध्वस्थ दक्षिणहृत्पुटांतील दाब कमी होतो. या दोन्ही कारणा मुळें अधस्थ वामहृत्पुटांतील दाब उजवीकडील हृत्पुटापेक्षां अधिकच असतें. तेथे जें दीर्घवर्तुळाकार छिद्र दोन्ही ऊर्ध्वस्थ हत्पुटांमध्ये असतें त्याचा पडदा बंद होतो व उजव्या पुटांतील रक्तप्रवाह थेट डाव्या पुटामध्यें पूर्ववत् जाईनासा होतो शिवाय अधस्थदक्षिणपुटांतील रक्त फुप्फुसांत क्षणोक्षणीं खेंचलें जाऊं लागल्याबरोबर धमन्याकार नाडींतील दाब कमी होतो व नंतर त्या नाडीचा आकरहि क्रमाक्रमानें बारीक होऊन तींतील पोकळीहि कांही दिवसांनीं बुजून जाते. तींतील रक्त गोठल्याशिवाय हें सर्व घडतें. दीर्घवर्तुळाकार छिद्राच्या मुखाशीं जो पडदा असतो त्याच्या कडा चिकटतात व एकमेकांशीं जुळून येतात. यानंतर कांहीं दिवस छिद्र जरी मिटलेलें नसलें तरी त्यांतून गर्भावस्थेप्रमाणें रक्तप्रवाह जाऊ शकत नाहीं. तें पुढें जर न मिटलें तर मुलाचा वर्ण काळवटलेला असतो. धमन्याकार नाडींतून अधस्थ महत्तम धमनी मध्यें रक्तप्रवाह जाईनासा झाल्याबरोबर त्या महत्तम धमनींतील दाब कमी होतो. नाभिधमन्यांतील रक्त गोठून त्यासुकून बारीक होतात व नंतर बुजतात.

ग र्भा ती ल य कृ ता चें का र्य.- हें अतिशय महत्वाचें असतें हें रक्ताभिसरण त्यांतून होतें यावरून लक्षांत येईलच. गर्भाच्या आकराच्या मानानें गर्भावस्थेंत या पिंडाचा आकार पुष्कळच मोठा सतो.यावेळीं शर्कराहि तेथें अधिक प्रमाणांत असते. यकृताचें मधुशर्करासंचयाचें कार्य गर्भावस्थेंत विशेष जोरानें चालत असावें. हा पिंड तयार होण्यापूर्वी हें कार्य वार अगर दुसऱ्या एखाद्या भागाकडून होतें असा संभव दिसतो. पांचव्या महिन्यापासून यकृता मध्यें पित्ताची उत्पत्ति होऊन तें आपलें कार्य करूं लागतें.

ग र्भा ची म ज्जा सं स्था.- जन्मापर्यंत मेंदूंतील मज्जा पेशी अगदींच बाल्यावस्थेंत असतात. परंतु त्यापासून मधूनमधून चलनवलनात्मक शक्तीचे वेगप्रवाह सुटत असावे असें गर्भाच्या हालचालीवरून व मातेच्या उदरास व शरीरास स्पर्श केल्यानें होणाऱ्या गर्भाच्या हालचालीवरून वाटतें. येणेंप्रमाणें मानव गर्भविज्ञानांत प्राधान्येंकरून इतर प्राण्यांच्या गर्भतुलनात्मक गर्भविज्ञानाचीहि माहिती दिली आहे. या विषयाला हल्लींचें शास्त्रीय व व्यवस्थित स्वरूप गेल्या शंभर सवाशें वर्षांतच आलें आहे. तथापि या आरंभीं रुक्ष व नीरस वाटणाऱ्या वर्षांतच आलें आहे. तथापि या आरंभीं रुक्ष व नीरस वाटणाऱ्या विषयाची लालसा यूरोपस्थ पंडितां मध्यें किती जुनी आहे. याचा अति संक्षिप्त इतिहास मनोरंजक व अनुकरणीय असल्यामुळें तो थोडासा या पुढें दिला आहे. अति प्राचीन ग्रीक तत्ववेत्ता आरिस्टॉटल व यूरोपीय वैद्यशास्त्राचा आद्य ॠषि गॅल यानें अंडयांतील व इतर प्राण्यांतील गर्भावस्थेचें बरेच दिवस निरीक्षण केलें होतें. मागाहूनच्या पंडितांनीं त्याच्या शोधांत थोडी भर टाकली. परंतु सूक्ष्म दर्शक यंत्राचा शोध निघाल्यापासून सूक्ष्मगर्भ रचनेचा अभ्यास करतां येऊं लागल्यामुळें त्यांत झपाटयानें प्रगति झालीं. तों पर्यंत म्हणजे १७ व्या शतकापर्यंत आपल्याकडील शारीर व वैद्यशास्त्रविषयक उपपत्तीमध्यें कल्पनाप्राधान्यच विशेष असे. कारण निरीक्षणाचीं साधनें तेव्हां नव्हतीं. रक्ताभिसरण शोधून काढणारा हार्व्हे यानेंच वरील अंडयांतील गर्भाच्या व इतर गर्भांच्या स्थित्यंतराचें वर्णन अधिक शास्त्र शुद्ध रीतीनें केलें. सूक्ष्मदर्शक यंत्राच्या मदतीनें या ज्ञानांत अधिक भर टाकणारा बलोना येथील मालपिधी हा व दुसरा ग्राफ हे दोघे पंडित होत. यांनीं शारीरशास्त्रांत शोध लावले असल्यामुळें शरीरांतील कांहीं सूक्ष्म रचनेस त्यांचीं नांवें दिलीं आहेत. अठराव्या शतकांत हॉलर नामक महापंडितानें (इ. स. १७५७-१७६६) इंद्रियविज्ञानशास्त्रावर मोठा ग्रंथ लिहून या विषयांत शोधांची भर टाकली व डार्विनच्या उत्क्रांतितत्वाच्या प्रास्ताविक उपपत्तीचा शोध यानें लावला असें म्हणण्यास हरकत नाहीं. वूल्फ नामक पंडित १७३३-९४ च्या दरम्यान होऊन गेला. त्याच्या नांवा वरून गर्भाच्या कांही रचनेस नांव दिलें गेलें आहे. गर्भावस्थेंतील आंत्रोत्पक्तीवर शोध लावून प्रसिद्ध केला; त्याकडे कोणी इतर शास्त्रज्ञ लक्षहि देईनात व त्यावर विश्वास ठेवीनात.परंतु प्रसिद्ध शास्त्रज्ञ व अज्ञेयवादी हेकेल यानें त्या शोधास अनुमति देऊन त्या लेखाचें जर्मन भाषेंत भाषांतर केल्यावर आधुनिक गर्भविज्ञानशास्त्राचा आद्य संस्थापक असें त्यास इतर पंडित म्हणूं लागले. १७७५ सालीं विल्यम हंटर व त्याचा बंधु यांनीं मानवी गर्भावस्था यावर एक उत्कृष्ट व सचित्र ग्रंथ तयार केला. त्यानें या शास्त्रासंबंधीं व शारीरविज्ञान व इंद्रियविज्ञानशास्त्रासंबंधीं प्रेक्षणीय व दुर्मिळ नमुन्यांचें व चिजांचें खाजगी कायम संग्रहालय केलें होतें व त्यांतील प्रत्येक वस्तूची वर्णनात्मक सुचीहि छापून तयार केली होती.हें संग्रहालय अमोल ठेवा म्हणून मानलें जातें हें युक्तच होय.याशिवाय वर निर्देश केलेला जर्मन पंडित हेकेल यानें व दुसऱ्या पुष्कळ शोधकांनीं १७८९ पासून १८१६ याच्या दरम्यान या ज्ञानांत भर टाकली.

बेयर नामक एक शोधक होऊन गेला; त्यानें आपल्या आत्मचरित्रांत प्यांडर या १७९४-१८६५ च्या दरम्यान हयात असलेल्या मित्राचा व शोधक गृहस्थाचा गौरवपूर्वक उल्लेख करून त्या दोघांपूर्वी डॉलिंजर नामक पंडितानें अर्धवट लावलेल्या शोधांचें अर्धवट काम लायक माणसाच्या अभावीं बंद पडलें होतें तें पुढें चालविण्यास हा मनुष्य योग्य आहे अशी खात्रीं करून देऊन त्याच्या गळयांत तें काम घातलें व प्यांडरनेंहि आपली जबाबदारी ओळखून नवीन शोध लावून ही जबाबदारी पार पाडली. प्यांडर व बेयर हे जर्मनींत वर्झबर्ग या गांवीं असत. बेयर हा डॉलिंजर नामक पंडितासाठीं प्रेतविच्छेदकाचें काम करीत असे व तो डॉलिं जरबरोबर तुलनात्मक रीरविज्ञानाचा अभ्यास करी.म्हणून प्यांडरच्या शोधाच्या कामीं तो लायक असूनहि त्यांत मन घालण्यास त्यास तितपतच फुरसत मिळे व तेवढें अल्प लक्ष तो त्या शोधांत घाली. व म्हणूनच प्यांडरनें तें शोधाचें काम सोडल्यावर १८१९ सालीं बेयर यानें ते शोध पुढें सुरू ठेविलें. कोनिंग्सबर्ग येथील विद्यापीठामध्यें बरडाक व रथके या दोघा महान् योग्यतेच्या पंडितांचा तो सम कालीन व समानव्यवसायी होता. बरडाकच्या नांवावरून मज्जासंस्थेंतील कांही रचनेस त्याचें नांव दिलें आहे. शोधका वरून शरीररचनेस नांव देण्याची यूरोपांत चालच दिसते.येथे नामनिर्देश न केलेले असे अनेक शोधक होऊन गेले व त्यांनी या ज्ञानांत आपआपली भर आणून टाकली आहे बेयर यास आधुनिक शास्त्रज्ञच समजतात. यानें १८३९ च्या सुमारास या विषयावर मोठा ग्रंथ लिहिला आहे. त्यांतील विशेष हा कीं त्यांतील शोधांची माहिती फार बिनचूक, पूर्ण मतें व उपपत्ति असलेलीं, सर्वांना पटणारी व पूर्ण शोधाअंती दिलेली अतएव अत्यंत विश्वसनीय अशी असे. त्याच्या कृतींत दोष राहिला तो हा कीं, मूलभूत ज्या ज्या प्राथमिक नाना पेशीपासून शरीराचे भाग व इंद्रियें बनतात तें अति सूक्ष्म रचना वर्णन त्या ग्रंथांत व त्याच्या पूर्वीच्या ग्रंथांत नाहीं. हें बिकट काम लीज येथील श्वॉन या पंडितानें १८३९ सालीं तयार करून या मूलभूत पेशींतील उद्भिज्ज या प्राणिकोटींत साम्य कसें आहे हें उघड करून दाखविलें. यानें प्रचलित केलेलीच उपपत्ति अद्याप या व प्राणिशास्त्राच्या पाठशालांतून चालूं आहे. यानंतर कॉलिकर आणि मेचीन कॉफ् या महान् शोधकांनीं पेशवर्धनक्रिया ही मूलजीवन पेशीपासून होऊन व तीहि नानाप्रकारानें होऊन त्यापासून इंद्रियादि शरीराचे भाग तयार होतात हें सिद्ध केलें. उपरिनिर्दिष्ट श्वॉन याच्या ग्रंथाचें इंग्रजींत भाषांतर इ. स. १८४७ त सिडनहॅम सोसायटी नामक संस्थेसाठीं हेनरी स्मिथ या गृहस्थानें केलें. बर्लिन येथील व्हॉन पुरकिंजे याचें नांव मेंदूंतील कांहीं प्रकारच्या मज्जापेशीस दिलें आहे. त्यानेंहि गर्भसंभव होताच सफलित संयुक्त पेशींत होणाऱ्या बदलाचा शोध लांविला. वर गर्भाचीं प्रतिमासास अनुसरूच स्थित्यंतरें
दिलीं आहेत त्यांविषयी बरेच शोध १८२० ते १८४० च्या दरम्यान भराभर लावले. यांत प्रिव्होस्ट व डयूमास यांनीं बरेच श्रम केले. व त्याचप्रमाणें म्यूलर व दुसऱ्या अनेकांनीं लहानमोठे ग्रंथ प्रकाशित करून गर्भविज्ञानवृद्धि केली असें म्हणण्यास हरकत नाही. १८५० पासून पुढें लहानमोठे शोध पुष्कळ शोधकांनीं इतके लावले कीं, नाम निर्देश कोणाचा करावा व कोणास वगळावें हें लेखनमर्यादे मुळें अवघड झालें आहे. ससा, कुत्रा, गिनीपिग व हरिण या प्राण्यांवर प्रयोग व निरीक्षण करून हे शोध लागले. रथके यानें याच काळांत सर्प व सरपटणाऱ्या प्राण्यांतील गर्भविज्ञाना संबंधीं शोध लाविले व रेमॅक यानें बेडूक व कोंबडा यांच्या संबंधी शोध लाविले. पुढें १८५९ मध्यें हक्स्ले यानें अस्थि पंजरसहित व अस्थिपंजररहित प्राण्यांमध्यें गर्भसंभवा नंतर जे तीन थर होतात त्यांतील साम्य दाखविलें. कारण यापूर्वी यांत कांहींहि साम्य नाहीं असेंच मत रूढ होतें.इ. स. १८५९ या सालीं डार्विनचा नानाप्राणिविशेषोत्पत्ति पद्धति'' हा प्रसिद्ध ग्रंथ निर्माण झाला. जीवनपेशीच्या शोधानें जी नवी क्रांति या शास्त्रांत घडविली तिला पुष्टिदायक अशी उपपत्ति या ग्रंथांत कथन केली आहे. व त्यामुळें शारीरशास्त्र, गर्भविज्ञानशास्त्र व तत्संबंधीं इतर विषयांची परस्पर संगति लावणें कठिण जात होतं तें या ग्रंथानें सुलभ झालें. या ग्रंथाच्या मतें प्राण्याच्या गर्भावस्थेंतील रचनेचा व स्थितीचा आपण तपास लावला तर त्याच्या पूर्वपिढीचा इतिहास व त्या जातींतून 'उत्क्रांतितत्वानें' बदल होत जाऊन उत्तरोत्तर नवीन पिढींत 'मर्कटाचा मानव' या म्हणीप्रमाणें हळूहळू स्थित्यंतरें कशीं होत जातात हें स्पष्ट होतें. त्यामुळें प्राणिजातिवर्गीकरण करणें अधिक शास्त्रशुद्ध होतें. गर्भावस्थेंत नर व मादी कशी उत्पन्न होतात हें आपणांस कळत असल्याचा आंव कांहीं बेजबाबदार व अशास्त्रीय ग्रंथकार आपल्या प्रजोत्पादन या विषयावरील ग्रंथांत आणतात व मनाप्रमाणें स्त्री अगर पुरुष संततीवर उपायहि ते सुचवितात.परंतु वरील सर्व जगमान्य शोधकांच्या मतानें ही गोष्ट आज पर्यंत सिद्ध झालेली नाहीं. म्हणून वाचकवर्गानें त्यावर विश्वास तितपतच ठेवावा. वरील इतिहास देण्याचें कारण यूरोपीय पंडित किती चिकाटीनें या व अशा विषयाची कास धरतात हें मनन करून आपल्या देशांत जुन्या चिकित्सा पद्धतीचें पुनरुज्जीवन करतांनां आधुनिक शोधांनां डोळयांपुढें ठेवून पूर्वपरंपरा व नवीन युग यांचा मिलाफ करावा; आपल्या देशास हल्लीं मानवेल व पटेल अशी चिकित्सापद्धति व अध्ययन व अध्यापनमार्ग रूढ करावेत. जुन्याचा अगर नव्याचा फाजील अभिमान धरूं नये.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .