प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे 
     
गागाभट्ट व त्याचें घराणें- गागाभट्टाचें घराणें हे मूळचें पैठणचें होते. दुर्गादेवीच्या दुष्काळांत (इ. स. १४६७-७५) पैठण व पुणतांबें येथें मोठी प्राचीन संस्कृत विद्यापीठें होती. त्यांचा आश्रय बंद पडून महाराष्ट्रांतील जीं अनेक पंडित घराणीं देशत्याग करून काशीस जाऊन राहिली त्यांतच गागाभट्टाचेंहि घराणें असावे. सन १४५० च्या सुमारास गोविंदभट्ट नांवाचा विश्वामित्रगोत्री ॠग्वेदी ब्राह्मण (आश्वलायन सूत्री) पैठणास रहात होता. गोविंदभट्टाचा पुत्र रामेश्वरभट्ट याचें पैठणास विद्यापीठ असून तें शिष्यवर्गानें गजबजून गेलेलें असे. या विद्यापीठास गाधिजवंशानुचरित्रांत 'श्रीरामचंद्राच्या सैन्याची छावणी' अशी उपमा दिली आहे. निजामशहानें रामेश्वर-भट्टाचा बहुमान केला होता. पण त्याजवर लवकरच दुष्काळामुळें देशत्याग करण्याची पाळी आली. तो विजयानगरच्या कृष्णदेवरायास भेटून द्वारकेस जात असतां रस्त्यांत त्यास नारायणभट्ट नांवाचा पुत्र झाला (इ. स. १५१४). द्वारकेस शिष्यशाखा व विद्यापीठ स्थापून तो परत पैठणास येऊन चार वर्षे राहून मग काशीस गेला. काशीस गेल्यावर ह्या घराण्यांत अनेक विद्वार पुरुष निपजले. त्यांपैकीं पुष्कळांचे हिंदुधर्मशास्त्रावरील ग्रंथ हल्लीं उपलब्ध आहेत. रामेश्वराचे शिष्य हिंदुस्थानांतील सर्वप्रांतीय होते. रामेश्वर हे रामोपासक होते. गोविंदभट्ट व रामेश्वरभट्ट यांनीं पुष्कळ ग्रंथ लिहिले पण ते हल्लीं उपलब्ध नाहींत. नारायणभट्टाचा लौकिक काशींत मोठा आहे. काशींतील विश्वेश्वराचे मंदिर नारायण भट्टानेंच बांधिलें. नारायण भट्ट काशीस असतां मोठा दुष्काळ पडला तेव्हां भट्टानें भागीरथींत अनुष्ठान करून विपुल पाऊस पाडविला, त्यामुळें मुसुलमान अधिका-यानें त्याचा हा प्रभाव पाहून विश्वेश्वराचें पाडलेलें मंदिर पुन्हां बांधण्याची त्यांस परवानगी दिली असें सांगतात. हा मोठा मीमांसक होता. त्याचे बारा ग्रंथ मार्तंड नांवानें प्रसिद्ध असून त्यांतील मुहूर्तमार्तंत हा स. १५७१ त लिहिलेला आहे. यानें बंगाल व बहार येथील पंडितांना जिंकिले. गया, काशी व प्रयाग या तीन क्षेत्रांत तीर्थविधि कसा करावा याबद्दलचा त्रिस्थळीसेतु नांवाचा ग्रंथ यानें लिहिला. राजा तोडरमल्लाचा व याचा चांगला स्नेह होता. त्यानें बंगालचा सुभेदार असतां बंगालचा (नवद्वीप) विद्यानिवास वंगोपाध्याय व मिथिला येथील इतर विद्वान पंडित यांचा व नारायणभट्टाचा वादविवाद करविला, त्यांत भट्टानें सर्व पंडितांस जिंकिले. याचा धर्मप्रवृत्ति हा ग्रंथ दक्षिणेंत व प्रयोगरत्न गंथ उत्तरेकडे प्रमाणभूत मानितात. प्रयोगरत्नासच नारायणभट्टी नांव आहे. (याचें गुजराथी भाषांतर बडोद्यास झालें आहे). यानें वेदांत विषयांत अनेक संन्याशांशीं वाद करून त्यांनां जिंकिलें. अकबराच्या दरबारीं याची मोठी प्रतिष्ठा होती. त्याचे मुलगे रामकृष्णभट्ट व शंकरभट्ट हे विद्वान असून त्याचे ग्रंथ सर्वमान्य आहेत. तंत्रवार्तिकव्याख्या, ज्योतिष्टोमपद्धति व जीवत्पितृकनिर्णय हे रामकृष्णाचे व द्वैतनिर्णय आणि आचाररत्न हे शंकराचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. प्रख्यात सिद्धांतकौमुदीकर्ता भट्टोजी दीक्षित हा शंकराचा शिष्य होय.
शंकरभट्ट याचा पुत्र नीलकंठभट्ट हा व्यवहारमयूख इत्यादि बारा मयूखांचा कर्ता आहे. रामकृष्णभट्ट दिनकरभट्ट (दिवाकरभट्ट), कमलाकरभट्ट व लक्ष्मणभट्ट असे तीन पुत्र होते. हे तिघेहि मोठे मीमांसक म्हणून प्रसिद्ध आहेत. पैकीं दिनकरभट्टाचे बारा ग्रंथ दिनकरोद्योत संज्ञेचे आहेत. कमलाकरभट्टानें कमलाकर संज्ञेचे बारा ग्रंथ लिहिले. पैकीं निर्णयकमलाकर यासच निर्णयसिंधु असें म्हणतात.

हा ग्रंथ त्यानें स. १६१२ त रचला. याचे पूर्तकमलाकर, शांतिकमलाकर, शूद्रकमलाकर, विवाहकमलाकर हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. लक्ष्मणभट्टाचे आचाररत्न वगैरे ग्रंथ आहेत. कमलाकराचे अनंत, प्रभाकर व श्याम असे तीन पुत्र होते. अनंताचा रामकल्पद्रुम ग्रंथ प्रसिद्ध आहे. वर आलेला नीलकंठभट्ट हा १७ व्या शतकाच्या आरंभ बुंदेलखंडांत सागरवंशी भगवंतदेवाच्या दरबारीं होता आणि त्याच्या आज्ञेवरूनच नीळकंठानें १२ मयूख केले. याचा भाऊ दामोदर यानें द्वैतनिर्णय परिशिष्ट वगैरे ग्रंथ लिहिले. नीळकंठाचा मुलगा शंकर याचे व्रतार्क वगैरे बारा 'अर्क' प्रसिद्ध आहेत.

गागाभट्ट हा दिनकरभट्टाचा पुत्र असून त्याला बापानें गागा असें लाडकें नाव दिलें व तेंच पुढें प्रसिद्ध झालें. त्याचें खरें नांव विश्वेश्वर होतें. त्यानें उत्कृष्ट विद्या संपादन करून आपल्या घराण्याचा लौकिक वाढविला. काशीस राहिल्या वरहि ह्या घराण्याचे शरीरसंबंध दक्षिणेंत होत असत. शिवदिननाथाचा गुरु केसरीनाथ हा गागाचा मामा होता. मीमांसा, न्याय, अलंकार व वेदान्त या विषयांत गागा भट्टाची प्रवीणता विशेष होती. दिनकरोद्योत ग्रंथांत त्याच्या बापानें पुष्कळ विषय सोपे म्हणून सोडून दिले होते त्यांची पूर्तता गागाभट्टाने केली. त्यामुळें हेमाद्रीच्या चतुर्वर्गाचिंता मणींप्रमाणेंच दिनकरोद्योताची योग्यता मोठी आहे. जैमिनी सूत्रांवर गागाभट्टाची टीका आहे. शिवाय न्यायशास्त्रावरील भट्टचिंतामणि व कायस्थधर्मप्रदीप उर्फ गागाभट्टी हे त्याचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. गागाभट्ट शके १५९५ (स. १६७३) त दक्षिणेंत आला व शके १५९६ च्या हिंवाळयांत काशीस गेला असा अंदाज आहे. या सुमारासच बाळाजी आवजीनें गागाभट्टाकडून कायस्थधर्मप्रदीप उर्फ गागाभट्टी रचून घेतला. तो बहुधा शके १५९६ तील ज्येष्ठ शु. १३ व वद्य ९ यांच्या दरम्यान संपूर्ण झाला असावा. छत्रपतींच्या ग्रंथालयांत न्यायाधीश व पंडितराव या पोथीचा उपयोग करीत. कायस्थांचे धर्म आचार व संस्कार बाळाजी आवजीच्या संमत्तीनें गागाभट्टानें ठरवून दिलें. यांत महाराजांच्या राज्यारोहणाचा उल्लेख आहे. यांत वेदमंत्राचे अर्थ संस्कृत अनुष्टुप्छंदांत आणून ठेविले असून सर्व संस्कार अमंत्रक दिले आहेत. राजवाडे यांनां सातारकर महाराजांच्या दप्तरांत एक पोथी सांपडली तींत हा कायस्थधर्मप्रदीप व शिवराजप्रशस्ति अशीं दोन प्रकरणें आहेत. काव्य ह्या दृष्टीनें प्रशस्तांची किंमत तसल्याच इतर प्रशस्तांहून अधिक नाहीं. ती शके १५९५ च्या मार्गशीर्षानंतर रचलेली दिसते. प्रशस्तींत मुसुलमानांचा निर्देश दैत्य शब्दानें केला आहे व महाराजांनीं ब्राह्मणरक्षण व श्रुतिस्मृतिशास्त्रांचा उद्धार केला असें म्हटलें आहे. तसेंच विजापूरकर वहलोल खानाची छाती फोडल्याचा (पराभव केल्याचा शके १५९५ चा) हि उल्लेख आहे.

गागाभट्टाच्या विद्वत्तेसंबंधानें दक्षिणेंत मोठा लौकिक असून दक्षिणेंतील ब्राह्मणवृंदावर त्याची छाप मोठीं होती. त्यास मराठी राज्याचा व दक्षिण पंडितांचा विशेष अभिमान असून शिवाजीचा लौकिक माहित होता. त्याच्या मनांत शिवाजीविषयीं आदर असल्यामुळें त्यानें मुद्दाम दक्षिणेंत येऊन आणि पैठण वगैरे ठिकाणच्या अनेक विद्वानांचें अनुमत घेऊन शिवाजीचा राज्यभिषेक नेटानें पार पाडला, शिवाय महाराष्ट्रराज्यसंस्थापना ही महाराष्ट्रीय पंडिताकडून होण्यांत एक प्रकारें औचित्यहि होतें.

सोळाव्या व सतराव्या शतकांत हिंदुस्थानांतील राजे रजवाडयांच्या व मुसुलमान बादशहांच्या दरबारीं या घराण्यांतील विद्वान पुरुषांस मोठा मान मिळत असून धर्म-कृत्याच्या प्रसंगीं त्यांस बोलावण्यांत येत असे. अद्यापीहि बनारस येथें त्या घराण्यास अग्रपूजेचा मान मिळतो. भट्ट घराण्यास ''ते जनतेचें (सेवा करणारें) घराणें होतें'' असें कै. मंडलिक म्हणतात.

लोकांच्या धर्मव्यवस्थेचे निबंधग्रंथ या भट्टांनी लिहिले म्हणून मोठया धर्मकृत्यांच्या प्रसंगी भट्ट घराण्यांतील पुरुषांस अध्यक्षस्थान देण्याचा रिवाज सर्वत्र आहे. या ग्रंथांत जुन्या स्मृती जमेस धरून व ठिकठिकाणचे आचार संकलित करून त्यांनी व्यवस्थित पद्धती बांधून दिल्या. एकाच घराण्यांत असे एकसारखे विद्वान पुरुष निपजल्याचीं उदाहरणें फारच थोडीं आढळतील. कमलाकर भट्टाचे वंशज कांतानाथभट्ट (मिर्झापूर येथील संस्कृत पाठशाळेचे अध्यापक) यांनी भट्टवंशकाव्य नांवाचा ग्रंथ लिहिलेला आहे.

[मराठी रियासत पूर्वार्ध, स. १९१५; विविधज्ञान विस्तार वर्ष ४५ अ. १२; भा. इ. मं. चतुर्थ संमेलनवृत्त.]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .