प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   
   
गांजा व भांग,- या झाडास संस्कृतमध्यें विजया; लॅटिनमध्यें कॅनॅबिस सेंटिव्हा, इंग्रजींत इंडियनहेंप, हिंदुस्थानींत भंग, गांजा, सबझी, इत्यादि नांवे आहेत. हें झाड रानटी स्थिथींत अनेक ठिकाणी सांपडत असल्यामुळें याचें मूलस्थान नक्की समजत नाहीं.

'भंग शब्दाचा उल्लेख अथर्ववेदांत असून तेथें त्याचा 'पवित्र' गवत या अर्थी उल्लेख सांपडतो. सोम, कुश, भंग, जव व सह या हवनीय वनस्पतींत भांग आहे. याचा औषधी म्हणून उल्लेख प्रथम सुश्रुतांत आहे. (८ व्या शतकांपूर्वी). नंतरच्या चार शतकांत रोप म्हणून भांगेचा उल्लेख संस्कृत कोशांत आहे. १० व्या शतकांत भांगेचा मादक गुण माहीत झाला आवा. परंतु १४ व्या शतकांत तो खात्रीनें माहीत होता. १० व्या शतकांत 'इंद्राशत' (इंद्राचें अन्न) हा शब्द प्रथम वाङ्मयात आढळतो. भागेच्या उत्पत्तीसंबंधी एक पौराणिक कथाहि प्रचलित आहे. ती ही कीं, देवांनीं समुद्रमंथन केलें त्यावेळीं अमृताच्या रूपानें भांगेची उत्पत्ति झाली. 'बॉवर मॅनस्किप्ट' मधील औषधी भागात भांगेच्या उल्लेख नाहीं. ही हस्तलिखित प्रत ८ व्या शतकाच्या अखेरीस वाळवंटांत गडप झालेल्या कुच (खोतानमधील) शहरीं सांपडली. हाच वैद्यकावरील सर्वांत जुना असा उपलब्ध ग्रंथ असावा.

कैलासवासी डॉ. नणेश कृष्ण गर्दे पुणें, यांनीं हेंपड्रग्स कमीशनपुढें खालील साक्ष दिली होती. ''प्राचीन हिंदु वाङ्मयात भांगेच्या मादक गुणांविषयीं बिलकूल उल्लेख नाही. पाणिनी म्हणतो कीं हें रोप शेतांत पिकत असे. यापासून वाख निघत असे असें मनुस्मृति व कौषीतकी ब्राह्मणांत लिहिलें आहे. पुढील संस्कृत टीकाकार व कोशकार भंग म्हणजे शन असा अर्थ देतात, हें सण रोप बंगाली सण असून यापासून वाख निघतो. याची फार प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत माहिती असावी.'' गांजा व चरस याला संस्कृत भाषेंत शब्द नाहीं. सर्व शब्द नवीन बनविलेले आहेत. असें डॉ. पार्करचें मत आहे.

गु ण ध र्म व उ प यो ग.- भांगेपासून मुख्यतः तीन प्रकारचें उत्पन्न होतें. त्यासंबंधीं वेगळा विचार केला आहे. आंतील सालः- हिचा उपयोग दोर, दोरखंड व जांडें भरडें कापड तयार करण्याकडे करितात. खाद्य बी:- याच्यापासून तेल काढतात. मादक पदार्थः- यापासून भांग, चरस व गांजा हीं तयार होतात. व यांत राळेसारखा पदार्थ व बाष्पभावी तेल असतें.

भांगेचें बीं पक्ष्यांना दाणा म्हणून घालतात, व हिंदुस्थानांत दुभत्या गाईला ह्या बिया द्याव्या असें म्हणतात. यांचे तेलहि निघतें.

तेलः- भांगेच्या बियांतून शेंकडा १५ ते २५ प्रमाणांत फिकट व शुद्ध तेल निघतें. प्रथम याचा रंग हिरवट पिवळा असून नंतर तें हवेंत ठेविलें तर त्याचा फिक्केपणा जातो. याची चव चांगली नसून वास साधारण असतो. याचें विशिष्टगुरुत्व .९२५ पासून. ९३१ पर्यंत असतें. व हें १५० वर घट्ट होतें. याच्या अंगीं सुकविण्याचे गुणधर्म आहेत. इंग्लंडमध्यें रंगात हें टाकीत नाहींत. परंतु यूरोपखंडातील ज्या देशांत हें विशेष प्रमाणांत होतें त्या देशांत याचा रंगांत उपयोग करतात. या तेलाचा दिव्यांत जाळण्याकडे उपयोग करीत असून त्याचा मऊ साबण होतो. पुष्कळदा आळशीच्या तेलांत या तेलाची भेसळ सांपडते. ढेप गुरांना घालतात. संयुत्तच् संस्थानांत एकराला २० ते ४० वुशेल बीं तयार होतें. झाड पिकण्यापूर्वीच कापणी करतात. नाहीं तर त्याच्यापासून नुसत्या बिया निघतात. या बिया फार दिवस राहिल्यास पेरण्याच्या कामी येत नाहींत. म्हणून फक्त एकच वर्षभर त्या ठेवितात. रशियांत दरवर्षी ५ लक्ष टन बियांची पैदास होते.

वा खा ची भां ग, (लागवड केलेली व रानटीं रोपें:)– हिंदुस्थानांत भांगेची लागवड दोन कारणांसाठीं करतात  (१)    मादक पदार्थांचा पुरवठा व (२) वाख. हिंदुस्थानच्या सपाटीच्या प्रदेशांत भांगेंत मादक द्रव्य लवकर तयार होतें. परंतु वाख चांगलासा होत नाहीं. कांही रोपांत  मादक द्रव्य कडक व जास्त प्रमाणांत असतें. हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशापेक्षां मैदानांत झालेली भांग अधिक चांगली समजतात. वाखासाठीं भांगेची लागवड वायव्य हिमालयांत करीत असून मादक पदार्थांसंबंधीं तेथें विशेष पर्वा करीत नाहींत. कोठें गांजा, कोठें चरस व कोठें भांग यांकडे लक्ष देतात. सिंधमध्यें या रोपांपासून चांगला वाख निघून भांगहि बरीच उत्पन्न होते.

भांगेचें झाड सुमारें तीन हात उंच वाढतें. यास तुरे येतात त्यांस गांजा म्हणतात. तो सुकविल्यावर जो चुरा राहतो त्यास भांग म्हणतात. भांग वाटून पितात. गांजा चिलमींतून ओढल्यानें व घोटा पिण्यापासून मनुष्यास निशा येते. याची लागवड अहमदनगर, सातारा आणि खानदेश जिल्ह्यांत व मध्यप्रांतांत नेमाडांत होते. याची लागवड कैफी पदार्थांकरितां करितात. कोंवळ्या पाल्याची भाजी करितात. नेपाळांत याच्या वाखाच्या पिशव्या व दो-या करतात. डोंगरी लोक याची पांघरुणें तयार करितात. बीं खातात व त्याचें तेल काढितात, किंवा पक्ष्यांनां खावयास घालितात. याच्या लागवडीस खोल, काळी भुसभुशीत जमीन, कोरडी हवा व पाऊस थोडा पण वरचेवर पडणारा पाहिजे. गांजासाठीं जमीन एक वेळ नांगरतात व वरचेवर कुळवून तयार करितात.  दर एकरीं शेणखत सुमारें १५-२० गाडयांपर्यंत देतात. पेरणी जून-जुलई महिन्यांत करितात. बीं दर एकरीं सुमारें  ८-१० पौंडपर्यंत पेरितात. ओळीमध्यें अंतर अडीच ते तीन फूट असतें. रोपें नऊ इंच उंच झाल्यावर पातळ करितात. या पिकाला एक खुरपणी व दोन तीन कोळपण्या देतात. सप्टेंबर आक्टोबर महिन्यांत रोजच्या रोज नर झाडें उपटून काढावीं लागतात. जर स्त्रीकेसर व  नरकेसर यांचा संयोग होऊं दिला तर कैफाचें प्रमाण कमी पडतें. फूट व्हावी म्हणून बुंध्याजवळ झाडें जराशी मुरगळतात. म्हणजे झाडें ठेंगणीं होऊन फूट जास्त होते. पुढें पाऊस कमी पडल्यास २।३ पाणी द्यावीं लागतात. पीक तयार झालें म्हणजे फुलांचे गोंडे काढतात व खळयांत नेऊन रात्रभर ठेवतात. दुस-या दिवशीं त्याचे लहान लहान ढीग करतात. व फुलांचे शेंडे मध्यें आणून ते ढीग रोज पायानें थोडथोडा वेळ चार दिवस मळतात. या तुडवण्यांत फुलें चेपलीं जाऊन जो पदार्थ तयार होतो त्याला गांजा म्हणतात व लहान फांद्या, पाला व तुटलेली फुलें यांच्या मिसळीला भांग असें म्हणतात.

बाजारांत मिळणारीं सुकीं पानें ही एक तऱ्हेची पूड असून तिला सिद्धि म्हणतात. हींत फक्त पानांचे तुकडे अथवा तुरे असतात व कित्येक वेळां बियाहि असतात. याला कित्येक वेळां पत्ति म्हणतात. भांग शब्द फार व्यापक असून तो फक्त पानांनांच लावतात असें नाहीं. सपाटीच्या प्रदेशांत व डोंगराळा भागांत रानटी झाडांपासून सिद्धि काढतात. परंतु बहुतकरून सर्व ठिकाणीं घराजवळच लहान तुकडयांत भांगेची अर्धवट लागवड केलेली सांपडते. या पानांची बारीक भुकणी करून तिच्यापासून वस्त्रगाळ पेय तयार करतात व त्यांत चव येण्यासाठी पुष्कळ वेळां सांखर, मसाला, वेलदोडे, कलिंगडाच्या बिया किंवा दूध घालतात. या पेयाला निरनिराळीं नांवें आहेत. ती अशीं:- बंगालः- भंग, सिद्धि. संयुक्तप्रांतः- सिद्धि, थंडाई. मध्यप्रांतः- घोटा. सिंधः- घोटा, तडहल, पंग. मद्रासमध्यें अशाच तर्‍हेच्या पेयाला रामरस अथवा रामरसम् असें म्हणत असून पुण्याकडे ज्वारी व भांगेपासून केलेल्या पेयाला भोज म्हणतात. वाईट वास पेयाला येऊं नये म्हणून त्यांत कस्तुरी किंवा इतर सुगंधी पदार्थ घालतात व जास्त मादक व विषारी होण्यासाठी त्यांत अफू, धोत्र्याच्या बिया, सोमल, बचनाग, कुचला इत्यादि विषारी पदार्थ टाकतात. कित्येक तांदूळ व ज्वारी यांचीं मुळें मुद्दाम घालतात. भांग व मद्यार्क यापासून तयार केलेल्या पेयाला लुत्की नांव असून मुद्र नांवानें त्याचा बलुचिस्तान व पंजाबमध्यें उपयोग होतो. या पेयांत भांग, अफू, मद्यार्क व धोत्रा असतो. याच्या पेयापासून माजून नांवाचा गोड पदार्थ करतात व तो सर्व ठिकाणीं खातात. बाबरनें आपल्या आत्मचरित्रांत स्वतः माजूम किती वेळां खाल्ला हें लिहिलें आहे.

च र स- थंड व रुक्ष देशांत लाविलेल्या भांगेचीं पानें, दांडे, तुरे व फलें यांवर एकसमयाच्छेदेंकरून दिसणारा राळेसारखा पदार्थ म्हणजे चरस होय. हा भांग व गांजा यांच्यापेक्षां जास्त परिणामकारक असतो. सर्व वायव्य हिमालयांत म्हणजे नेपाळपासून तुर्कस्तानपर्यंत विशेष प्रकारचा मादक पदार्थ म्हणून चरस तयार करतात.

काश्मीर व कुल्लूमधून चरसाचा पुरवठा होतो. चरस व गांजा कसे तयार होतात याची खरी हकीकत अद्यापि चांगली कळली नाहीं. प्रेन म्हणतो कीं एकदा चरस पृष्ठभागावर दिसूं लागला व त्या ठिकाणीं पक्का बसला म्हणजे बियाच्या वाढीपासून त्यावर कांहीच परिणाम होत नाहीं.

दक्षिण हिमालयांतील चरस व मध्य आशियांतील चरस यांत एवढाच फरक आहे कीं, पहिला झाड हिरवें असतांनाच तें तोडण्यापूर्वी काढतात; आणि दुसरा सुकलेल्या झाडापासून घेतात. मध्यआशियांतील चरसांत धूळ व झाडाचे इतर भाग यांचें मिश्रण असल्यामुळें शुद्ध हिंदी चरसाला जास्त किंमत येते. कांही चांगल्या जातीचा चरस मात्र औषधींत घालतात. चरस हा भांग व गांजा यांच्या पेक्षां जास्त अपायकारक आहे. तयार झालेल्या मालांत पान नसलें तर त्याला जास्त किंमत येते. रंग व वास यांवर गांजाची किंमत अवलंबून असते. गांजाचे तीन प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणें:-

चापट गांजा:- जमिनीपासून ६ इंच भाग सोडून रोपाचा दांडा कोयत्यानें कापतात. नंतर टोंके एकत्र बांधून ती रोपें बांबूवर ठेवितात व ती कारखान्यांत घेऊन जातात. नंतर तुरे एकामागून एक जमिनीवर ठेवितात व त्यांना पायाखालीं इतकें तुडवितात कीं, पक्की चिकटलेलीं फुलांचीं टोकें व लहान पानें एक होऊन चापट होतात. देठांच्या लांबीच्या डोक्याच्या आकारावरून मग त्यांना मोठा चपटा, फांदी चपटा इत्यादि नांवे देतात. त्याच्या गांठी करतात.

गोल गांजा.- वरची डोकीं न तुडवितां ती पायाखालीं घालून वळवितात. ती चिकटून बसत नाहींत, आणि त्यांना गोल आकार येतो. गोल गांजाची लहान लहान पेंडकी तयार करतात.

चुर (बारीक) गांजा अथवा रोटा. लहान फांद्यापासून काढलेले तुकडे तुकडे अथवा फुलांचे शेंडे हे चापट अथवा गोल या दोन्हीं गांजापासून निघत असून यांनां 'चुर' म्हणतात. छाटण्याच्या वेळेस त्याचे तुकडे फार निघतात. बंगाली गांजाला इतर प्रांतांत 'बलचुर' म्हणतात. बलुचर हें एका खेडयाचें नांव असून तेथें प्रथम गांजा झाला असा समज आहे. ग्वालेर व मध्यप्रांत येथील गांजाला 'पथर' नांव आहे. गांजा तयार केल्यानंतर राहिलेला केरकचरा 'भांग' म्हणून विकतात

औ ष धी व रा सा य नि क गु ण ध र्म- गांजानें वेड लागतें हा समज अतिशयोक्तिरूप आहे. असें हेंपड्रग्स कमीशनच्या रिपोर्टांत लिहिलें आहे. गांजाचा नियमित उपयोग केला तर कोणताहि नैसर्गिक तोटा होत नाहीं. शुद्ध व नियमित प्रमाणांत हें औषध घेतलें तर उन्मादवायू उत्पन्न होऊन त्यापासून बुद्धिभ्रंश होईल असा गुणधर्म यात फारच थोडा असतो अथवा मुळीच नसतो असें म्हटलें तरी चालेल. कोणत्याहि तर्‍हेच्या भांगेचा उपयोग केला तर मानसिक अस्थैर्य वाढतें. यामुळें मन दुर्बळ होऊन मनुष्य वेडा होण्याचा संभव असतो एवढें मात्र खरें आहे. हेंपड्रग्स कमीशन बसलें होतें. त्या सालीं हिंदुस्थानांतील पागलखान्यांत भांगेमुळेंच खरोखर वेडे झालेले असे फत्तच् शेंकडा ७.३ लोक होते. भांगेनें आलेल्या वेडेपणावर उपाय होण्यासारखा असून या मादक पदार्थाची आसत्तिच् होत नसल्यामुळें हे घेणें एकदम बंद केली तर चालण्यासारखें असतें व बंद केल्याबरोबर गुण दिसूं लागतो.

व्या पा र व स र का री क रा चें उ त्प न्न.– गांजासाठीं या झाडांची लागवड करावयाची असल्यास हिंदुस्थानां परवाना घ्यावा लागतो. शिवाय मुदतीनें पिकाची तपासणी होऊन उत्पन्नाचा अंदाज करण्यांत येतो. व्यापाऱ्यास माल विकण्यास कांही आडकाठी नसते. परंतु माल विकल्यावर तो मुद्दाम केलेल्या सरकारी कोठारांत अथवा सरकारनें नेमलेल्या गोदामांत ठेवितात. या गोदामास दोन किल्ल्या असून एक किल्ली सरकारी अधिकाऱ्याजवळ असते व दुसरी शेतकऱ्याजवळ असते. येथून माल नेतांना ठरीव कर द्यावा लागतो व शेतकऱ्याचा अंदाज व विक्रीपत्र याला धरून नेलेल्या मालाची नोंद ठेवितात. घाऊक व किरकोळ दोन्ही व्यापाऱ्यांना परवाने घ्यावे लागतात. गांजाचा सर्व व्यापार अधिकाऱ्यांच्या नजरेखालीं चालतो. चरसासंबंधीं सर्व आयात मालाला मणाला कमीत कमी ८० रु. कर द्यावा लागतो. पसंत केलेल्या कोठारांत चरस ठेवात व तेथून तो नेतांना पुन्हां कर द्यावां लागतो. शक्य तेथें भांगेवर सुद्धां कर लादतात. विक्री व व्यापार यानां कायदा लावतात. परवाना तल्याशिवाय यापैकीं कोणताहि मादक पदार्थ लागवड केल्यास अथवा विकल्यास गुन्हा समजला जातो.

तिन्ही मादक पदार्थांना वेगळाले परवाने घ्यावे लागत असून किरकोळ विकणाऱ्यानें लहान मुलांस अथवा वेडसर मनुष्यास हा पदार्थ विकण्याची मनाई असते. हा पदार्थ एका वेळीं किती विकावयाचा अथवा एका मनुष्यानें किती जवळ बाळगावयाचा याविषयीं मर्यादा ठरविलेली आहे. हा पदार्थ जुना झाल्यास खराब होतो असा व्यापारी व याचे सेवन करणाऱ्या लोकांचा समज आहे. अफूच्या बाबतींत मात्र याच्या उलट असतें. वरील कारणामुळेंच यूरोपांत भांगेवर केलेले प्रयोग बरोबर वठले नाहींत.

क्षे त्र फ ळ व म ह सू ल.- हेंपड्रग्स कमिशन रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यावर हिंदुस्थासरकारनें आपला ठराव केला. त्यावेळीं (१८९५) भांगेच्या लागवडीचें क्षेत्रफळ ६००० एकर होतें. त्यानंतरची माहिती येणेंप्रमाणेः-

वर्ष लागवडीचें क्षेत्र एकर करमहसूल पौंड
१९००-१ ४०९६ २०१३४४
१९०१-२ २४९६ २१३२२४
१९०२-३ १९४० २२५३५२
१९०५-६ २६४५+
४१९ (देशी संस्थानें)

वरील आकडयांवरून लागवडीचें क्षेत्रफळ एकसारखें कमी होत असून उत्पन्न वाढत चाललें आहे असें दिसतें. सरकारी कायदें व अधिकाऱ्यांची अंमलबजावणी यामुळें वरील उत्पन्न वाढलें असावें असें उघड दिसतें.

किं म त व क र.- भांग व त्याचे इतर प्रकार यांच्या कींमतींत इतका फरक ओ कीं, तिचे आंकडे देण्यांत विशेष फायदा नाहीं. मालाचा दर्जा, तयार करण्याची रीत, कर वगैरे गोष्टीवर त्याची किंमत अवलंबून असते. एका शेराच्या किरकोळ किंमतीचा तक्ता हिंदुस्थानसरकारनें प्रांतिक सरकारांकडे पाठवून त्या किंमतीबरोबर दर ठेवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलें. त्यांतील कांही किंमती येणेंप्रमाणें:-

पदार्थांचे नांव प्रांत दर शेरास कमींत
कमी किंमत रु.
 दर शेरास जास्तीत
जास्त किंमत रु.
 गांजा  आसाम  १५  ४०
 ''  मुंबई  ६ आणे  ५
   पंजाब  ४  १५
 ''  बंगाल  ३५  ४०
   पंजाब  २ आणे  ८ आणे
 ''  बंगाल  १  ६

करांमुळें वरील किंमतींत फरक असेलच. परंतु पदार्थांच्या दर्जाप्रमाणेंहि हा फरक बराच असावा. कारण दोन प्रांतांत होणाऱ्या मालांत फरक तर आहेच; परंतु एकाच प्रांतांतील दोन जिल्ह्यांतील मालांतहि फरक असतो.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .