विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गाझीपूर तहशील– संयुक्तप्रांत. फत्तेपूर जिल्हा. क्षेत्रफळ २८४ चौ. मै. लो. सं. ९३७५२. खेडीं १४४. शहर नाहीं. साऱ्याचें उत्पन्न १९५०००. इतर कर ३१००० रु. जमीन बहुतेक हलकीच आहे. फत्तेपूर कालव्याचें पाणी येथें येतें. व स्थानिक तळीं व झील (झरे?) यांचा उपयोग करतात. विहिरी क्वचितच दिसतात. १५८ चौ. मै. पैकीं ३९ मैल जमीन पाटाच्या पाण्याखालीं आहे.