प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    
   
गात्रोपघात- याचा प्रचारांतील अर्थ हलवण्याची इच्छा असतांना हातपाय वगैरे अवयवांची चलनशक्ति नष्ट होणें, असा आहे. परंतु वैद्यकीय दृष्टीनें पहातां, स्पर्शज्ञान, रुधिराभिसरण, इत्यादि शक्ती नष्ट होणें या लक्षणाचा गात्रोपघातांतच समावेश केला पाहिजे. यास स्वतंत्र रोग न समजतां स्नायू किंवा मज्जास्थानांच्या ठिकाणीं विविक्षित व्याधी अगर इजा होऊन अगर वातामुळें तात्कालिक त्यांची क्रिया बंद होऊन (उदाह. उन्माद रोगांत) हें लक्षण रोग्यास होतें असें समजावें. हा रोग कधीं एक दोन स्नायूपुरता असतो. व कधी अर्धांगांसहि होतो व कधीं छाती अगर कमरे खालील सर्वांगास होतो. तो कां व कसा होतो हें समजण्यास मज्जातंतू, मेंदू व पृष्ठवंशरज्जुपासून निघून कोणत्या मार्गानें  स्नायूंत शिरतात व कोणत्या मार्गानें स्पर्शसंवेदना-शीतोष्णादि भावनांचें मेंदूस ज्ञान होतें या इंद्रियविज्ञानशास्त्रांतील भागाचें मनन लक्षपूर्वक केलें असतां समजेल; तें येथें देणें शक्य नाहीं. परंतु पुढील रोगलक्षणें संभवतात ती अशीं:- (१) मेंदूच्या वरील भागास रोग अगर इजा झाली तर इच्छाशक्तिपूर्वक स्नायूंची चलनशक्ति नष्ट होते (२) मेंदूचा खालील भाग वरीलप्रमाणें विकृत झाल्यास चलनशक्ति नष्ट होऊन शिवाय स्नायू क्षीण होऊन बारीक होऊ लागतात. या रोगांचे अनेक भेद आहेत. मेंदूंत विकृतीमुळें होणाऱ्या रोगांपैकीं अर्धांगवाताचें वर्णन पूर्वी दिलेंच आहे (अर्धांगवायु पहा). बाकीच्या मुख्य प्रकारांचें त्रोटक वर्णन पुढें दिलें आहे.

पृष्टवंशांतील मज्जास्थानें बिघडून होणारे रोग (पंगुवायु) कारणेः- पृष्ठवंशरज्जूंतील चलन अगर स्पर्श, वेदनादि संदेशवाहकमार्ग रोगामुळें अगर दुखापतींमुळें त्या पृष्ठवंशरज्जूंतील भागांत दाह सुरू होऊन त्याच्या खालील भागांत ह्मणजे छाती अगर कमरेखालील दोन्ही बाजूंचें सर्वांग लुलें पडतें; चलनशक्ति व त्यांतील स्पर्श, वेदना शीतोष्णादि ज्ञान रोग्यास नसतें. इच्छाशक्ति नसल्यामुळें न कळत लघवीस व शौचास होतं. स्नायुपोषण अनैच्छिक  रीतीनें आपोआप होणें बंद झाल्यामुळें अंथरुणांत पडून राहिल्यामुळें शय्याक्षतें होण्याची प्रवृत्ति असते. तथापि पृष्ठवंशरज्जूंचा थोडा भाग बिघडला असल्यास स्नायू फारसे क्षीण होत नाहींत. या प्रकारचा पंगुवायु, मग तो रोगामुळें होवो अगर अपघातामुळें पाठीचा कणा दुखावून होवो – बराहोण्याचा संभव असतो. त्यासाठीं रोग्यास उताणें निजवून दररोज त्याचे हातपाय चोळून परिचारकाकडून त्याच्या चलनक्रिया बळेंच करीत जाव्या. स्वच्छता राखून शय्याक्षतें होऊ देऊ नयेत. मूत्र कोंडून नंतर नकळत वाहूं लागण्याचें अगोदर दिवसांतून दोनतीन वेळां मूत्रशलाकेनें लघवी काढीत जावी. म्हणजे इष्ट हेतु साध्य होईल.

बा ल पं गु त्व रो ग.- लहान मुलांमध्यें वरील रोगांसारखा रोग आपोआप झालेला पहाण्यांत येतो. कांही देशांत तर सांथीप्रमाणें पुष्कळ मुलांनां एके काळी हा रोग होतो, व तेथें सांथ नसली तर हा रोग नेहमीं वारंवार आढळतो व यावरून एखाद्या विविक्षत रोगजंतूमुळें हा संसर्गकारीरूपानें रोग होत असावा. या रोगांत पृष्ठवंशरज्जूंतील गाभ्याच्या मध्यभागी शिंगाच्या आकाराचीं धूसरवर्ण मज्जास्थानें असतात. तीं विकृत होऊन अंग लुलें पडतें. हा रोग क्वचित् मोठ्या माणसांतहि होतो. मुलाची एकाएकी प्रकृति बिघडते. परंतु कदाचित् त्याचा एखाददुसरा हात अगर पाय अंमळ लुला, अशक्त झाला आहे इकडे कोणाचें लक्ष न जाईल इतकी थोडी विकृति प्रथम होते. नंतर एकदम ज्वर, ओकारी, आंचके येणें आणि मुलास बोलतां येईल इतके वय असल्यास हातपाय बधिर होऊन मुंग्या येत असल्याचें त्यास कळतें. व ज्या अवयवास असें होतें तो पुढें लुला पडतो. येणेंप्रमाणें एकापेक्षां अधिक अवयवहि लुले पडतात. परंतु त्यांत विशेष हा असतो कीं, त्यांची चलनशक्ति नष्ट झाली तरी स्पर्श, वेदना, शीतोष्णज्ञान शाबूत असतें. कांही विविक्षित स्नायूंचा समूह अगर एकाच बाजूचा हात व पाय अशा रीतीनें लुला पडला तरी त्यांत अर्धांगवाताप्रमाणें अगदीं बरोबर निम्में अंग निखालस निर्जीव झाल्याप्रमाणें स्थिति होत नाहीं. हे विकृत स्नायू तीव्र रोग असल्यास भराभर क्षीण होतात व त्यांना विजेची पेटी लाऊन संवेदना होत नाहीं. सौम्य रोग असल्यास फक्त एखादा स्नायूचा समूह- हाताचा किंवा पायाचा- लुला पडून ते स्नायू बारीक व क्षीण होतात; पण नष्ट झालेली चलनशक्ति परत येण्याची बरीच आशा असते. त्याबरोबरच रक्ताभिसरणक्रिया मंदगतीनें चालल्यामुळें तो लुला भाग काळवंडलेला,तेजोहिन व थंडगार होतो. आंतील हाडांचें व मांसाचें पोषण न झाल्यामुळें त्यांची वाढ खुंटून दुसऱ्या बाजूच्या हात अगर पायापेक्षां तो आंखुड होतो. यामुळें व स्नायूचा हाडावरील दाब कमी होऊन हाडें वांकडीं होऊन त्यांना निरनिराळ्या प्रकारचें व्यंगत्व येतें. या रोगांत नकळत लघवीस अगर शौचास होत नाहीं. किंवा शय्याक्षतेंहि पडत नाहींत व बहुधा रोगी दगावत नाहीं. रोगास प्रारंभ झाल्या दिवसापासून एक महिन्यानें क्षीण झालेले स्नायू चोळण्यास सुरवात करावी. म्हणजे त्यांतील रुधिराभिरणक्रिया वाढून व्यंगत्व कमी होईल. त्याचा उपयोग न झाल्यास शस्त्रवैद्यास दाखवून व्यंगत्व हरण करावें.

व र्ध मा न क्षी ण स्ना यु स्तं भ.- या रोगास २५ ते ४५ वर्षांच्या सुमारास आरंभ होऊन प्रथम हाताचे तळवे, करांगुली व अंगठ्याखालीं जे मांसल उंचवटे आहेत ते, झिजून क्षीण होण्यास सुरुवात होते. हा रोग पुरुषांत विशेष आढळतो. याचें कारण वरील रोगाप्रमाणेंच आहे. परंतु हा रोग अतिसावकाशपणें येतो व बरा होत नाहीं.क्रमाक्रमानें बोटें व हात यांचें मांस कृश होऊन ते अवयव बारीक होतात. नंतर बाहु, खांदा, छाती यांची गति सावकाश पणें होते. हे स्नायू क्षणमात्र एकदम थरथरतात हा एक यांतं विशेष आहे. लघवी व मलशुद्धीच्या क्रिया बिघडत नाहींत. कफ, फुप्फुसदाह होऊन श्वसनशक्तीचा ऱ्हास झाल्यामुळें मृत्यू येतो. कित्येकांना पुढील प्रकारचा जिव्हौष्ठस्तंभरोग होऊन मरण येतें.

जि व्हौ ष्ठ स्तंभ.- पुढील क्रिया करणाऱ्या स्नायूंना संदेशवाहक मेंदूतील मज्जातंतू बिघडून बोलणें, गिळणें, आवाज उत्पन्न करणें व चर्वणक्रिया, या क्रिया एकाएकीं दुबळ्या होतात किंवा अगदीं बंदहि पडतात. चाळीस ते साठ उमरीच्या माणसामध्यें असा रोग हळूहळू आलेला दृष्टीस पडतो. प्रथम तालव्य व्यंजनाचा उच्चार करतांना जरा बोबडेपणा वाटतो. नंतर पवर्गांतील ओष्ठस्थान असलेलीं अक्षरें उच्चारतांना बोबडेपणा दिसतो. नंतर तालुस्थानाचा मागील भाग लुला पडल्यामुळें बोलणें गेंगाणें- नाकांतील स्वरांत येतें; यानंतर जीभ लटकी पडत गेल्यामुळें तिच्या योगानें घांस घशांत लोटतां न येऊन अन्न गिळतां येत नाहीं. व मग तें अन्न गालफडांत सांचून बसतें. तसेंच तो घांस घशांतील गिळण्याच्या स्नायूंनीं चटकन् पकडून गिळण्याची क्रिया आपोआप सुरू व्हावी, परंतु त्यांमध्येंहि जडत्व आल्यामुळें तसें कांही एक न होता उलट तें अन्न नाकपुड्यावाटें- अन्न पातळ असल्यास- परत येतें. यापुढें कंठांतील स्नायूंनां जडत्व येऊन भाषण अगदींच अस्पष्ट येऊं  लागून अन्न गिळण्याची फार पंचाईत पडूं लागते. कंठांतील  स्नायूचें स्पर्शज्ञान कमी होऊन अन्न अगर पाण्याचे थेंब श्वासनलिकेंत जाऊन खोकल्याचा ठसका सुरू होतो. यानंतर चर्वणक्रियेच्या स्नायूंना स्तंभ होऊन ते लुले पडतात व मागाहून श्वसनक्रियेचे स्नायू लुले पडून रोगी मधून मधून गुदमरतो. रोग्यास शुद्धि अगदीं चांगली असते. स्नायू लुले पडून तोंड वावळें दिसतें  व मनोविकार विशेष नाजूक स्थितींत असल्यामुळें रोग्यास रडें अगर हसूं चटकन येतें. व त्यावरून रोग्यास चळ लागल्याचा संशय येतो; पण वस्तुतः तसें कांही नसतें. चेहऱ्याचा खालील भाग विकृत होतो; पण वरील भाग नीट असतो. या रोगांत अन्नकण श्वसनमार्गांत शिरल्यामुळें फुप्फुसदाह होऊन मेंदूंतील महत्वाचीं स्थानें बिघडल्यामुळें थोड्या दिवसांत रोगी दगावतो. तथापि प्लेगच्या तापांत कांहीं रोग्यांना अशा प्रकारचा स्तंभ होऊन फक्त बोबडेपणाचें व्यंग राहून ते रोगी बरींच वर्षे जगल्याचीं उदाहरणें दृष्टीस पडतात.

हातपायास हलविणारे मज्जातंतू बिघडून होणारा गात्रोपघात मज्जातंतुदाह होऊन एखादा स्नायु, स्नायूंचा समूह, किंवा संबंध हात अगर पाय अगर अवयव लुला पडणें संभवनीय असतें. याचें उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अर्दित वायूमध्यें चेहऱ्याचे स्नायू हलविणाऱ्यास मज्जातंतूवर दाब पडून दाह उत्पन्न होऊन एका बाजूचा चेहरा वांकडा होतो हें होय. वातप्रकृतीच्या माणसास गारठा बांधून अगर वारा फार लागल्यामुळें असें होतें. तसेच कुबडीच्या साहाय्यानें चालणाऱ्या माणसांमध्यें कुबडीचा दाब मज्जातंतूवर पडल्यामुळें हात लुला पडतों हें दुसरें उदाहरण. पोटांत नकळत शिसें जाऊन तेलाचें रंग देणाऱ्या लोकांना विषबाधा होते; कारण या रंगांत शिशाचे क्षार असतात व त्यापासून मनगट लुलें पडतें. वातप्रकृतीच्या माणसास ओल्या जागेवर बसून अगर गारटयानें मांडींतील मज्जातंतूचा दाह होऊन ऊरुस्तंभ नांवाचा वायु होतो.
 
ह स्त पा द म ज्जा तं तु दा हः- रक्तदोषामुळें अगर शिसें, सोमल, अति मद्यपान, मधुमेह, घटसर्प, बेरीबेरी इत्यादि रोगांचें विष रक्तांत भिनून त्यामुळें या प्रकारचा जो दाह होतो त्याचीं सामान्य लक्षणें पुढे दिलीं आहेतः– अगोदर शरीरांत कांही व्याधिं असून त्यांत दीर्घकालीन बेसुमार दारूच्या व्यसनाची भर पडून रक्त दुषित होतें. रोग फार तीव्र असल्यास रोग्याच्या छाती अगर कमरेखालील दोन्ही कडचा भाग लुला पडतो. परंतु पृष्ठवंशरज्जुदाहामुळें पंगुवायु होऊन शौचमूत्राच्या क्रियेवर रोग्याचा दाब रहात नाहीं. तसें लक्षण या रोगांत रोग्यास भ्रम झाला तरच होतें; एरवीं होत नाहीं. दुसरा फरक हा कीं त्या रोगांत त्या स्नायूंचें स्पर्शज्ञान नष्ट होतें. पण या रोगांत स्नायू दाबले तर ते फार दुखतात; व ते स्नायू क्षीण होऊन बारीक होतात. कांही रोग्यांमध्यें पायमोजें घातले असतां पायांचा जेवढा भाग आच्छादला जातो तेवढया भागांतील स्पर्शज्ञान व वेदनासंवेदनज्ञान नष्ट होतें. रोग अधिक तीव्र झाल्यास याच प्रकारचा लुलेपणा हातांनांहि येतो; व हृदयहि दुर्बल होतें. व शरीरांतील इतर स्नायूहि केव्हां लुले पडतील याचा नेम नसतो. मानसिक स्थितीहि फारच बिघडून रोग्यास चित्तभ्रम व भुरळ पडते. त्यास काळवेळ हें कांहीच कळेनासें होऊन ओळखीच्या माणसास भलतेंच माणूस समजण्याचा भ्रम होतो. विशेष चमत्कार हा कीं, रोग्यास अगदीं लहानपणच्या गोष्टी आठवतात परंतु नुकत्या घडलेल्या गोष्टींचें विस्मरण पडतें.

मि थ्या स्ना यु पु ष्टि स्तं भः- जन्मतः कांही आनुवंशिक संस्कारामुळें मज्जास्थानांत कांहीहि विकृति न होतां एकाच कुटुंबातील माणसें वयाच्या ठराविक वेळीं या रोगामुळें स्नायुदर्बलतेमुळें लुलीं होतात. कित्येक कुटुंबांत पुरुषांनां मात्र हा रोग होतो. कधीं मुलांनां व मुलींना हा रोग होतो. तरी पण एकंदरींत स्त्रियांपेक्षां पुरुषांनां होणें अधिक संभवनीय असतें, व स्त्रिया फक्त हा आनुवंशिक रोग पुढील पिढीस सादर करतात. रोग्याचें वय स्नायुसमूह व स्नायुपुष्टि अगर क्षीणता यांच्या मानानें या रोगाचे अनेक पोटभेद केले आहेत. या रोगांत ध्यानांत ठेवण्यासारख ख्य गोष्ट म्हटली म्हणजे जरी स्नायु पुष्ट दिसले तरी वस्तुतः त्यांतील संकोचन पावणारे तंतू क्षीण व कमी झालेले असतात; व वसा व इतर निरर्थक तंतुवृद्धि होऊन अवयव विनाकारण पुष्ट दिसतो; व त्यावरून ह्या रोगाचें नांव सार्थ आहे असें म्हणावें लागतें. वयपरत्वें (१) बालस्नायुस्तंभ व (२) युवास्नायुस्तंभ असे याचे दोन भेद पाडतात.

मुलांमध्यें बाह्यतः स्नायू क्षीण किंवा अतिपुष्ट असे दोन्ही भिन्न प्रकार भिन्न रोगांत नजरेस पडतात. अगोदर स्नायू क्षीण होऊन पुढें मुलांस अशक्तपणा आला म्हणजे कार्यकारणसंबंध लक्षांत येतो. परंतु मूल जन्मतः ढुंगण, मांडया, पोटऱ्या, दंड वगैरे भीमसेनाप्रमाणें पुष्ट असून त्याचा निःशक्तपणा आईबापांच्या लक्षांत आल्यानें त्यास फार आश्चर्य वाटतें. मूल उभें राहूं लागलें म्हणजे सावधगिरीनें पाय बरेच फाकटून उभें रहातें. चालतांना फेंगडत व फरफरडत चालतें; वारंवार आपटतें; एकदां पडलें म्हणजे पुनः उठण्यास त्यास अडचण पडते व हात भुईवर टेंकून जपून पुनः उभें रहातें. उभें रहातांना गुडघा, कंबर वगैरे ठिकाणी हात ठेवून तोल संभाळून सावधगिरीनें उभें रहातं. हा रोग असाध्यच आहे व असलीं मुलें मध्यम वयापर्यंत सुद्धां वाचत नाहींत.

कं प वा यु.- हा रोग मनुष्यास उतारवयाच्या सुमारास होऊन त्यांत मुख्य लक्षणें म्हणजे स्नायूंचा अशक्तपणा, कंप ताठरपणा, उभे रहाण्याची व चालण्याची विशिष्ट तऱ्हेची ढब हीं होत. प्रथम अशक्तपणा येऊन एका हातासच कंप सुटता. कातगोळ्या वळतांना जसें मनुष्य आंगठा व तर्जनी हालवितो किंवा पंखवाज हळूहळू एकसारखा वाजवितांना जशीं बोटें हलतात तशाच प्रकारचा कंप एका हातास सुरू झाल्यानंतर कांहीं दिवसांनीं दुसऱ्या हातांस, व नंतर पायाच्या घोट्याच्या ठिकाणीं कंप सुरू हातो. कांहीं रोग्यांचें मस्तक कंपामुळें सदा हलत रहातें. हा कंप दर सेकंदास सुमारें पांच झटके या वेगानें येतो हा कंप झोपेंत अगदी थांबतो. चालण्याची व उभे रहाण्याची ढबहि चमत्कारिक असते. रोगी मान खालीं घालून जवळ जवळ अंतरावर पावलें टाकीत प्रथम सावकाश व नंतर झपझप वेगानें व अंमळ धांवल्याप्रमाणें तुरतुर चालतो. चेहरा जसें एखादें चित्र अगर पुतळा शुन्यदृष्टि असतो तद्वत् दिसतो; परंतु त्या रोग्याची बुद्धि शाबूत असते. रोगी पुष्कळ वर्षे जगतो पण त्यावर उपाय फारसे चालत नाहींत म्हटलें तरी चालेल. फक्त हातपाय आंखडूं नयेत म्हणून दररोज दुसऱ्याकडून त्यांचें चलन करवून व चोळून घेऊन बरें वाटतें. वरील कित्येकप्रकारचें स्तंभ- रोग एकत्र दिलें आहेत. त्यांची चिकित्सा कांही ठरीव सामान्य धोरणावर करावयाची असते. त्याची माहिती पुढें दिली आहे.

(१) रोग्यास बिछान्यांत निजवून ठेवावें; व मलमूत्रादींचें विसर्जन नियमितपणें होत जाईल अशी तजवीज राखावी.त्याचप्रमाणें रोग्याची हृदयक्रिया, श्वसनक्रिया व पुरेसें अन्न यांत बिघाड न होईल अशी व्यवस्था ठेवावी. औषधें व उत्तेजक पदार्थ द्यावेत किंवा नाहीं याचें ज्ञान डॉक्टरास नाडीवरून होतें. पडून राहिल्याने फुप्फुसदाह होण्याचें भय असतें. याचें एक मुख्य कारण रोग्याच्या घशाच्या ठिकाणीं बधिरता उत्पन्न झाल्यामुळें त्यास अन्नपाणी घालते वेळीं दोहोंचे कण श्वसनमार्गानें श्वसनलिकात लोटले जातात व त्या बधिरत्वामुळें ते आगंतुक कण ठसका येऊन बाहेर खोकून पडावे तसें कांही एक न होतां फुप्फुसदाह उत्पन्न करितात. या दुखण्याच्या आरंभीं जर नाडी भरलेली व सशक्त असेल तर एकदां जुलाबचें औषध देऊन कोठा साफ करावा. नाडी अशक्त असली तरी नियमितपणें मळशुद्धि होणें जरूर आहे. लघवी कोंडेल अशी वेळ येऊ देऊं नये. त्यासाठीं मूत्रनलिकेचा उपयोग जरूर तर अगोदरच करणें चांगलें. पण ती शलाका जंतुरहित राहील अशी काळजी घेणें जरूर आहे. नाहीं तर मूत्राशयांत जंतूंचा प्रवेश होऊन मूत्रशयदाहरोग उत्पन्न होतो. रोग्याची पाठ दररोज तपासून त्यास येथें अगर अन्य ठिकाणीं दाब पडून शय्याक्षतें न पडतील अशी खबरदारी घ्यावी. ती होण्याची खूण म्हणजे त्या भागावरील त्वचा स्वच्छतेच्या अभावामुळें कुजूं लागते. म्हणून दाब पडत असलेल्या जागीं अगोदरपासून कोलनवाटर किंवा स्पिरीट रोज चोळून तींत काठिण्य आणावें. त्वचा कुजण्याचें पूर्वचिन्ह पाठ किंवा कुल्ला या जागीं त्वचेवर लाल डाग दिसूं लागतो. असें झालें म्हणजे झिंकऑक्साइडची पूड अगर मलम त्या जागीं लावून त्या जागीं भार न येईल अशा नवीन स्थितींत रोग्यास निजवावा. किंवा अंगठीप्रमाणें वर्तुळाकार अशा गिरद्या त्या जागीं रोग्याखालीं ठेवाव्यात. रोग्यास कधीं शेकावें लागतें व रोग्याचें स्पर्शज्ञान कमी अगर  नष्ट झाल्यामुळें शेकतांना फोड उठेपर्यंत शेकलें तरी त्यास कळत नाहीं व अशा तऱ्हेनेंहि शय्याक्षतें पडतात. यासाठीं शेकण्यांकरतां ज्या बाटल्यांचा उपयोग करावयाचा त्यांवर नेहमीं गरम कपडा गुंडाळून मग शेकीत जावें. असे फोड शेकतांना उठले तर ते बरे होण्यास जड जातात. छातीखालील दोन्ही बाजूंचें सर्वांग लुलें पडल्यास दोन्ही पायांत हातांनीं विणलेले जाड लोंकरीचे मोजे घालावेत. नंतर दोन्ही पायांवर त्याच्या लांबीच्या आकाराची चौकट ठेवून चौकटीवरून पांघरुणें घालावीत. म्हणजे पांघरुणाचा सदा भार पायावर पडून पाऊल लुलें पडतें तें पडणार नाहीं. रोगाची प्रथमावस्था संपतांच लगेच परिचारकाकडून हातापायाच्या चलनक्रिया बळें करविण्याच्या उद्योगास लागावें. व त्याचवेळीं ते अवयव चोळविण्याचा परिपाठ ठेवावा. काहीं रोग्यांनां विजेची पेटी लावून फायदा होतो पण पेटीपासून वेदना होतात व खरोखर उपयोग चोळणें व कृत्रिम चलन यापेक्षां अधिक होतो किंवा नाहीं याचा वानवाच आहे. म्हणून निदान मुलांचे बाबतींत हा उपचार मुळीच करूं नये. हात अगर पाय परिचारक हलवीत असतां ती क्रिया आपण होऊन बुध्द्या करीत आहे.  शा भावनेनें रोग्यानें त्यांत मन व लक्ष घालून हौसेनें या क्रिया कराव्यात व करून घ्यावा. म्हणजे तुटलेले मज्जामार्ग दुरुस्त होऊन अगर नवीन मार्ग निर्माण होऊन मेंदू व स्नायू यांचा पूर्ववत् संबंध जडून चलनादि व्यापारांचे संदेश स्नायूंना पोंचल्यानें रोगी हिंडू फिरूं लागतो.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .