प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे  
     
गिनी- भूमध्यरेषेवरील आफ्रिकेच्या पश्चिम किना-याच्या काही भागाचें हे साधारण नांव आहे. हा गिनी किनारा गँबियापासून केपनिग्रोपर्यंत पसरला आहे. गाबून, लोऍंगी, नैर्ॠत्य किना-यावरील पोर्तुगीज मुलुख इत्यादिकांचा समावेश दक्षिणगिनीत होतो. उत्तरगिनी कासामांसी नदीपासून कामेरूनपर्यंत पसरला आहे. पूर्वी उत्तरेकडे केपनुनपासून गिनीची सुरुवात मानण्यांत येई. या नावाची व्युत्पति फार अनिश्चित आहे. तथापि धिनीआ या शहराच्या नांवावरून हे नांव पडले असावे असे म्हणतात. गिनी हे नाव १४ व्या शतकांतील नकाशावर आढळतें. पण १५ व्या शतकाच्या अखेरीस ते साधारण उपयोगांत आलें. गिनीचा किनारा इतका सखल आहे की, तो नाविकांना जवळ आल्याशिवाय दिसत नाही. वाइट ऑफ बैफ्रा येथे मात्र किनारा थोडा उंच व भव्य आहे. हा किनारा अनेकविध वनस्पतींनी नुस्ता फुलला आहे. शुद्र निग्रो वंशाचे रहिवाशी या ठिकाणी रहातात.

प्राचीन व्यापारी उत्तर गिनी प्रदेशास तेथे उत्पन्न होणा-या जिन्नसांवरून नांवे देत असत. सेरालोनपासून पूर्वेस केपपालमासपर्यंत ५०० मैल पसरलेल्या गिनी किना-यास हे व्यापारी ग्रेनकोस्ट असे संबोधीत असत. हें नाव या भागास १४५५ त देण्यांत आलें. कारण या ठिकाणंहून नानाप्रकारची बीबियाणें येत नसल्यामुळें हे नांवहि लुप्त झाले आहे. आयव्हरॉकोस्ट या नावाचा इतिहासहि असाच आहे. दक्षिण गिनीच्या अनेक भागांपैकी गाबूनच्या दक्षिणेस असणा-या व काँगो नदीच्या उत्तरेकडील भागास लोऍंगो हे नांव असे. आतां लोऍंगोचा फ्रेंचकांगोमध्यें समावेश होतो. कांगो नदीच्या दक्षिणेकडील देशात कांगो हेच नाव लावीत. आता कांगो पोर्तुगीज वेस्ट आफ्रिकेचा एक पोटविभाग आहे. १२७० त लॅन्सलॉट मॅलोसेलो हा जिनोआ येथील गृहस्थ क्यानरीज बेटापर्यंत जाऊन पोहोचला. १२९१ त पुनः जिनोआमधीलच कित्येक गृहस्थांनी केपनन ओलांडलें. पण यापलीकडे त्यानी काय केले हे मात्र माहीत नाही. इ.स.१३४६ त कॅटलान येथून कांही प्रवाशी गिनीकिना-यावरील 'सुवर्णनदीच्या'  शोधार्थ निघाले, पण त्यांचें काय झालें ते ठाऊक नाही. १३६४ व १४१० या वर्षांच्या दरम्यान डीपे येथील लोकांनी गिनी येथे पुष्कळ सफरी केल्या असें फ्रेंचांचें म्हणणें आहे. १४०२ त जेन डी बेथेन कोर्ट याने कॅनरीज बेटांच्या दक्षिणेकडील प्रदेश शोधून काढला. शेवटी पोर्तुगॉलच्या प्रिन्स हेनरी यानें नियुक्त केलेल्या नाविकांच्या संघटित प्रयत्नानें गँबियापर्यंतचा किनारा शोधून काढण्यांत आला व पंधराव्या शतकाच्या अखेरीस सबंध गिनी कोस्ट यूरोपियनांच्या परिचयाचा झाला.

पोर्तुगीजगिनी- पश्चिम आफ्रिकेंतील एक पोर्तुगीज वसाहत. ही वसाहत समुद्रकिना-यावर असून केपरोक्झोपासून कांगोच्या नदीमुखापर्यंत पसरली आहे. हिच्या उत्तरेस सेनिगॉलचा कॅसामॅसे हा प्रांत व पूर्वेस व दक्षिणेस फ्रेंच गिनी आहे. वसाहतीचे क्षेत्रफळ १३,९४० चौरस मैल आहे व लोकसंख्या २,८९,००० आहे. येथील हवा रोगकारक आहे. पाऊस फार जोराचा पडतो. येथील जंगलात खजूर, एबनी, मेहोगनी इत्यादी प्रकारची झाडें आहेत. पेरू, ऑपल, नारिंग व आंब्यांची झाडेंहि आहेत. अन्तर्भागांतील लोक बहुतेक मँडिगो व फ्युला या राष्ट्रजातीचे आहेत. बेटें व समुद्रकिना-याजवळच्या भागांत निग्रो राष्ट्रजात राहते. या जातीची कौटुंबिक जीविताविषयीची आदरबुध्दि व पूर्वजाविषयीची धर्मवुध्दि फार जागृत आहे. मँकोआ व कोचीओ यांमधील भागांत मंजक नांवाची जात रहाते. हे लोक फार आस्थेवाईक, हुशार व एकवचनी आहेत अशी त्यांची ख्याति आहे. या लोकांत एक प्रकारची लष्करी जाहागिरीची पध्दत आहे. कोंबड्याची आतडी कापून ती तपासून भविष्य वर्तविण्याचा यांच्यात प्रघात आहे. विसगॉस या बेटावर स्वतंत्र व युध्दविशारद बिडिओगॉस ही राष्ट्रजात रहाते. १४४६ त बुलामा बेट पोर्तुगीज नाविकांनी शोधून काढलें. १७५२ च्या सुमारास पोर्तुगॉलने बिसॅओ येथे वखार घातली. याच्याहि अगोदर म्हणजे १६६९ त पोर्तुगॉलने रायओग्रँडी हें काबीज केले होते. पोर्तुगीज अंमलाखालील मुलखाच्या अर्न्तमर्यादा १८८६ मध्यें फ्रान्सच्या सहकारितेने ठरविण्यांत आल्या. १९००-३ या काळांत सरहद्द आखण्यात आली. १९१७-१८ साली वसाहतीचें उत्पन्न ७,२३,४१८ एस्क्युडो असून खर्च ७,०८,७०० एस्क्युडो होती. १९१७ त वसाहतीची निर्गत २८,८१,१८१ एस्क्युडोची होती भुईमुग, रबर, मेण, हस्तिदंत इत्यादी निर्गत व्यापाराच्या वस्तू होत.

स्पॅनिशगिनी.- याचें क्षेत्रफळ ९४७० चौरस मैल असून लोकसंख्या सुमारें दोन लाख आहे.

फ्रेंच गिनी.- पश्चिम आफ्रीकेतील एक फ्रेंच वसाहत. हिच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर, उत्तरेस पोर्तुगीज गिनी व सेनीगाल, पूर्वेस अपर सेनीगाल व आयव्हरी कोस्ट व दक्षिणेस लायबेरिया व सिएरालिओनी आहे. ही वसाहत पूर्वेस ४५० मैलपर्यत सरळ पसरली आहे व हिची दक्षिणेत्तर रुंदी जवळजवळ ३०० मैल आहे. एकंदर क्षेत्रफळ सुमारें ९५००० चौरस मैल लो.सं.(१९१६) १८०८८९३.

हवामान- किना-यावरील हवामान उष्ण, सर्द व रोगट आहे. मेपासून नोव्हेंबरपर्यत अति पाऊस पडतो. संबध वर्षभर हवेंत फारच ओलावा असतो. नायवर नदीकाठच्या प्रदेशाची हवा साधारण आरोग्यकारक असते.

वनस्पती व प्राणी- समुद्रकिनारा व नदीतीरावरून आंबराया लागल्या आहेत. समुद्रकिना-यावरील महत्वाचें झाड म्हणजे तैलोत्पादक ताडाचे होय. जंगलात रबराची झाडेंहि विपुल आहेत. फुटाजेलनच्या दक्षिणेस सिंह आढळतात. वानरांच्याहि पुष्कळ जाती आहेत. सर्प तर पुष्कळच सांपडतात.

रहिवासी- कोगॉनच्या तीरावर टडोंज व आयओलाज ह्मा प्राचीन निग्रो जाती रहातात. बागा, नालू, लँडुमन व टिमनी या जातीचेंहि येथे वास्तव्य आहे. नुनेझच्या दक्षिण किना-यास व फुटाजालनपर्यंतच्या अन्तर्भागांत सुसा नांवाची जात रहाते. सुसा ही मुसुलमानी जात आहे. बागा व इतर काही जाती वन्य आहेत. गौरकाय असे फारच थोडे लोक आहेत व ते सर्व फ्रेंच आहेत.

शहरें- कोनाकाय, बोके, डुब्रेका, बेंटी, टिंबो व लाबी ही मुख्य शहरें होत. यांपैकी कोनाकाय हें राजधानीचे शहर आहे. याची लोकसंख्या २०,००० आहे नायगरला जाणारी आगगाडी येथूनच निघते.

उद्योगधंदे- येथील जमीन फार सुपीक आहे. रबर, ताडाचें तेल, कापूस, डिंक, भुईमूग हे जिन्नस विशेषकरून येथे होतात. फुटाजालन येथे गुरे पाळणें, विकणें हा धंदा चालतो. कातड्याचा व्यापारहि ब-याच मोठ्या प्रमाणांत चालतो. कापसाचा माल, तांदूळ, तंबाखू ह्या मुख्य आयात वस्तू होत. १९१६ त ९६८९२९१ फ्रॅंकची आयात व १६२४०४८८ फ्रॅंकची निर्यात होती.

इतिहास- गिनी किना-याचा हा भाग पोर्तुगीज शोधकांनी प्रथम पंधराव्या शतकांत शोधून काढला. गिनीच्या इतर भागांतून उचलबांगडी झाल्यामुळे गुलांमाचे व्यापारी १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात येथे येऊन राहिले. १८३८ त फ्रान्सचे लक्ष्य या भागाकडे वेधले. १८५४ त जनरल फेडहरबी याला सेनीगॉलचा गर्व्हनर नेमण्यांत आले. फ्रेंच सत्तेचा पाया मजबूत करण्यासाठी नालु जातीशी १८४८ त तह करण्यांत आला व १८४८ ते १८६५ च्या दरम्यान निरनिराळ्या किना-यावरील जातीना फ्रान्सनें आपल्या संरक्षणाखाली घेतलें. १८८१ मध्यें फुटाजालन येथील मुख्यानें आपला देश फ्रान्सच्या शासनाखाली दिली. १८८२ मध्यें ग्रेटब्रिटनननें फ्रान्सच्या दक्षिणेस मेलाकोरीच्या पात्रापर्यंतच्या प्रदेशावरील हक्क मान्य केला. १८८६ मध्यें पोर्तुगालशी तह होऊन उत्तरसरहद्द ठरविण्यात आली (१८९९). अपर नायगर प्रांत देखील कॉलनीत समाविष्ट करण्यांत आले. १९०४ मध्यें लॉस बेटे ग्रेटब्रिटननें काही अटींवर फ्रान्सला दिली. १८९१ मध्ये फ्रेंच गिनी सेनिगॉलपासून वेगळा करण्यांत आला. गिनीला बरेंच स्वराज्याचे हक्क मिळाले आहेत. तेथीज राज्यकारभार लेफ्टनंट-गर्व्हनर पहातो. ब-याचशा भागावर एतद्देशीय संस्थानिक नेमण्यांत आले आहेत. अर्थातच फ्रेंच अधिकार्‍यांची त्यांच्यावर देखरेख आहे.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .