विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गिलगांव जमीनदारी- मध्यप्रांत चांदा जिल्हा. क्षेत्रफळ ६० चौरस मैल पैकी ३४ मैल जंगल असून त्याची पहाणी झाली नाही. पूर्वेस खुटगांव आणि पोटेगांव जमीनदारी. दक्षिणेंस पैमुरंदा, उत्तरेस आणि पश्चिमेस खालसा भाग. ही बरीच जुनी आहे. हीत एकंदर खेडी २२, पैकी ७ ओसाड आहेत. एकंदर उत्पन्न २००० रू, टाकोळी ७५रू. व इतर कर ४३-११-०. घराणें राजगोड. जमीनदार पैका बापु. इस्टेट साधारण ब-या स्थितीत आहे.