प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे  
     
गीता- महाभारतांतील सर्व बोधप्रद भागांत जर एखाद्याची ख्याति व लोकप्रियता अतिशय वाढली असेल तर ती भगवद्वीतेचीच होय. श्रीमद्वगवद्वीता हे आजच्या धर्म ग्रंथातील अतिशय तेजस्वी व निर्मल रत्न आहे. भगवद्वीता म्हणजे ईश-काव्य. भरतखंडामध्यें भगवद्गीतेसारखा अतिशय मौल्यवान लोकप्रिय ग्रंथ क्वचितच सापडेल. वैष्णव पंथाच्या भागवत धर्माच्या लोकांचे भगवद्गीता हें पवित्र धर्मशास्त्र आहे इतकेंच नव्हे तर भारतीय धर्मांतील प्रत्येक पंथातील लोकाचा हा भक्तिग्रंथ आहे. कल्हण (राजतरेगिणी ५; १२५) नांवाचा इतिहासकार काश्मीरचा राजा अवंतिवर्मन् याची अशी गोष्ट सांगतो की, इ.स.८८३ मध्यें जेव्हा अवंतिवर्मन् राजा मरण्याच्या पंथास लागला तेव्हा त्यानें भगवद्गीतेचे अथपासून इतिपर्यंत वाचन करविलें व विष्णुपदांचे चिंतन करून मोठ्या आनंदानें प्राण सोडला. केवळ अंवतिवर्मन् राजालाच मरणसमयी आत्मशांति मिळाली आहे. आज हिंदुस्थानांत भगवद्गीता मुखोद्गत असणारे पुष्कळ शिकलेले लोक सांपडतील अद्यापीहि गीतेच्या हजारो हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत.

आवृत्या व भाषांतरें- इ.स.१८०९ मध्यें कलकत्ता शहरी प्रथम भगवद्गीता छापली. तेव्हांपासून हा ग्रंथ छापला गेला नाही असें कंचितच एखाददुसरें वर्ष सांपडेल. भगवद्गीतेचे भाषांतर हिंदुस्थानांतील सर्व प्रचलित भाषांत केलेलें सांपडतें. युरोपखंडामध्यें गीतेचे भाषांतर प्रथम इंग्रजीमध्यें चार्लस विलकीन्सनें इ.स.१७८७ मध्यें लंडन शहरी प्रसिध्द केलें. आगस्ट विल्महेल्म व्हॉन श्लेगल यानें प्रथम भगवद्गीतेची बिनचूक आवृत्ति प्रसिध्द केली व नंतर त्याच आवृत्तीला लॅटिन भाषांतर जोडण्यांत आलें. त्याच आवृत्तीवरून विले्हल्म व्हॉन हम्बोल्टनें गीतेंचे पारायण केलें. हा ग्रंथ त्यास इतका आवडला की, त्याने लुक्रेशीअस, पॅरमेनाइडस् व ऐपिडोक्लीस यांच्यापेक्षा भगवद्गगीता ग्रंथ फार महत्वाचा आहे असें ठरविले इतकेच नव्हे तर आज सर्व देशांच्या उपलब्ध वाड्.मयामध्ये महाभारत महाकाव्यासारखे सुंदर व तत्वज्ञानानें ओथंबलेले महाकाव्य सांपडत नाही असे त्यानें स्पष्टपणें नमूद केले आहे. या काव्याचा विलहेल्म व्हॉन हम्बोल्ट यानें फार बारकाईनें १८२५-२६ साली बर्लिनच्या ऍंकेडमीकमध्यें विचार केलेला आहे. या काव्याचें जर्मन भाषेंमध्येंहि अनेकवार भाषांतर झालें आहे. इ.स.१८३४ मध्यें सी. आर, एस, पीपर; १८६९ मध्ये लॉरिन्सर व १८७० मध्यें बी बॉपस बर्गर यांनी भाषांतर केले. अत्यंत शुध्द भाषांतर आर. गावें व पी. डॉयसेन यांचे आहे.

प्रसंग व उपदेश- भीष्मपर्वामध्यें महायुद्धाचें वर्णन सुरू होण्यापूर्वीच भगवद्गीतेला अचानक प्रारंभ होतो. उभय पक्षांकडील योध्दे जेव्हां युध्द करण्यास प्रवृत्त होऊन एकमेकांसमोर उभे राहिले तेव्हां श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला; व युद्धाच्या इच्छेने उभे राहिलेले कौरव व पांडव वीर त्याला दाखविले. तेव्हा अर्जुनाने वडील, आजें, गुरू, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे व आपले हितकर्ते हे दोन्ही सैन्यांत उभे आहेत असें पाहिलें, तेव्हा अर्जुन करूणेनें अत्यंत पीडित झाला. आपल्याच आप्तांबरोबर युध्द करावयाचा विचार मनांत येताच अर्जुनाच्या शरीरास कंप सुटून रोमांच उभे राहिले. ज्यांच्या हिताकरितां लढावयास तयार झालें पाहिजे असे जे स्वजन त्यांचा घात करणे मूर्खपणाचें आहे व त्यापासून पाप मात्र लागेल असें त्यास वाटलें. तेव्हा कृष्णानें अर्जुनाचा साशंकपणा व मनाचें दुबळेपण पाहून त्याची निर्भर्त्सना केली. तेव्हा अर्जुनानें  ''युद्धामध्ये जय मिळवून काय फायदा? व माझे कर्तव्य काय आहे हें मला समजत नाहीसें झालें आहे तरी निश्चर्यकरून कल्याणकारक असेल तें मला सांगा'' अशी श्रीकृष्णाची प्रार्थना केली. नंतर श्रीकृष्णानें परिणामाकडे लक्ष न देता युध्द करण्यांस उभें रहाणें हें प्रत्येक वीर पुरूषाचें कर्तव्यकर्म आहे अशी अर्जुनाची खात्री करून देण्याकरितां उत्तरादाखल अतिशय तत्वज्ञानानें भरलेलें भाषण केले. श्रीकृष्ण म्हणालें-''तूं गोष्टी तर सांगतोस पांडित्याच्या आणि जे शोक करण्यास योग्य नाहीत अशांबद्दल शोक करीत बसला आहेस. पण जे खरे पंडित (आत्मज्ञानी) आहेत ते मेलेल्याचाहि शोक करीत नाहीत, आणि जिवंताचाहि शोक करीत नाहीत. कारण मी पूर्वी केव्हाहि नव्हतों किंवा तूहि कधी नव्हतास किंवा हे राजेहि नव्हते असें नाही व आपण सर्वजण यापुढें कधी असणार नाही असेंहि नाही. आपण नित्य आहों. या सांप्रतच्या देहास जशा बाल्य, तारुण्य व वार्धक्य या तीन अवस्था येतात व जातात तशीच आत्म्याला दुस-या देहाची प्राप्ति होते. परंतु या अवस्थांतरामुळे किंवा देहांतरांमुळे आत्मा अनित्य असेल असली भूल ख-या पंडिताला पडत नाही. या नित्य अविनाशी व अप्रमेय आत्म्याचा उपाधिभूत जो देह तो विनाशी आहे, या करितां हे भारता तूं युध्दपराड्.मुख होऊ नकोस. जो असें समजतो की आत्मा मारणारा आहे, तसेंच जो आत्मा मरणारा आहे असें समजतो ते दोघेहि अज्ञानी आहेत. कारण हा कोणांस मारीतहि नाही व कोणाकडून मारलाहि जात नाही. हा आत्मा कधीहि जन्मत नाही व कधीहि मरत नाही, किंवा हा मागे आस्तित्व पावला नसून पुनः मृत्यू पावणार असेहि नाही. कारण हा जन्मरहित, नित्य, शाश्वत व अनादि आहे आणि शरीराचा वध झाला तरी ह्माचा वध होत नाही. जसा पुरुष जीर्ण झालेली वस्त्रे टाकून दुसरी नवी घेतो, तसा आत्मा जुनी शरीरें टाकून नव्या शरीराशी संगत होतो ह्मा आत्म्याला शस्त्रें तोडीत नाहीत, याला अग्नि जाळीत नाही, याला भिजवीत नाही व याला वारा सुकवीत नाही. आत्मा अशा  प्रकारचा आहे असें समजल्यावर शोक करणें योग्य नाही. आत्मा ही कोणत्याही देहांत असला तरी तो कधी वध पावत नाही. म्हणून कोणाहि भूतांच्याबद्दल शोक करणें तुला योग्य नाही. धर्मयुद्धाहून क्षत्रिय वीराला दुसरें कांहीहि कल्याण नाही. पार्था, यद्दच्छेनें प्राप्त झालेला युध्दप्रसंग म्हणजे स्वर्गाचे उघडलेले द्वारच होय. असलें युध्द भाग्यशाली क्षत्रियांनांच प्राप्त होतें. जर तू धर्मयुद्धाचा त्याग करशील तर मरणापेक्षाहि अति दुःखकर अशी तुझी अपकीर्ति होईल. जर तूं युद्धांत जय पावलास तर पृथ्वीचें राज्य भोगशील. एवंच उभयपक्षी युध्द इष्टच आहे म्हणून अर्जुना युद्धाविषयी निश्चय करून ऊठ. कृष्णानें योद्धा या नात्यानें केलेले भाषण व पुढें धर्मगुरू व परमेश्वर या नात्यानें केलेले भाषण यामध्ये वरवर पहाणा-याच्या द्दष्टोत्पत्तीस असंबध्दता येते. काही ठिकाणी तर भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाशी परमेश्वर या नात्यानें केलेलेंच भाषण आढळून येतें. भगवद्गीतेंतील कर्मयोगावरील विवेचनांतील अतिशय उच्चतम पराकाष्ठेचे तत्व म्हटलें म्हणजे फलाची इच्छा टाकून जय किंवा अपजय याचा विचार न करता नेहमी विहित कर्म करावें हें होय. कारण असल्या प्रकारचें निष्काम कर्म ऐहिक संसाराचा परित्याग, कर्म व संन्यास या तत्वांमध्ये समविष्ट झालेले जे उच्चतम नीतितत्व (कर्मयोग) त्या तत्वांत अंशतः तरी समाविष्ट होते. संन्यासमार्ग व कर्मयोग यांमध्ये वरवर पहाणारास जो विरोध दिसतो. तो वास्तविक तसा नसून मोक्षशास्त्रदृष्टया हे दोन्हीहि एकच व समान फलदायी आहेत हें दाखविण्याचा गीतेमध्यें प्रयत्न केलेला आढळतो. गीतेचे मत मात्र कर्मयोगाकडे निःसंशय झुकलेले दिसते. वस्तुतः कृष्णांनी भगवद्गीतेंत मोक्ष मिळविण्यास कर्ममार्ग व ज्ञानमार्ग अथवा कर्मसंन्यास आणि  कर्मयोग हे शक्य नाही व तो केला असे म्हणणें (म्हणले कर्मे न करता जगणें) ढोंगीपणाचें आहे. कारण प्रकृति सत्व-रज-तम या त्रिगुणांनी युक्त असल्यामुळें कर्म हें नैसर्गिक व आवश्यक आहे. म्हणून मनुष्याला फक्त निष्काम बुध्दीनेच कर्म करणें शक्य आहे. जसा धुरानें अग्नि, मळानें आरसा व गर्भाशयानें गर्भ आच्छादिलेला असतो. तसें हे शुध्द ज्ञान ज्ञान्याचें नित्य वैर करणा-या कारानें झाकून टाकलें आहे. म्हणून निष्काम बुध्दीनें कर्म करणारा ज्ञानमार्गाचें जे उच्चतम ध्येय त्याप्रत पोचतों. चौथ्या अध्ययांतील ३६ व्या श्लोकात ज्ञानानें अतिशय पापीहि तरेल अशी महती भगवद्गीतेंत वर्णिलेली दिसते.

अपिचेदासि पापेभ्य: सर्वेभ्य: पापकृत्तमः।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यासि॥

भगवद्गीतेंत प्रसंगी जो ऐहिक संसाराचा त्याग करून ध्यानस्थ होऊन ज्ञान संपादन करतो तो योगी असें म्हटलें आहे. योगी हा शीत, उष्ण, सुखदुःख तसेंच मानापमापमान ही सारखी मानतो. व आपलें मन स्थिर ठेवतो, माती, दगड व सोने ही सारखी समजतों; मित्र व शत्रू आप्त व परकी यांच्या ठिकाणी व साधूच्या ठिकाणी तशीच पाप्यांच्या ठिकाणीहि समबुध्दि ठेवतो. साधकानें एकांतवासांत एकाग्र होऊन आपल्या नासाग्री द्दष्टि ठेवावी. निवार्‍यांत ठेविलेला दिवा हालत नाही. हीच पुरातन उपमा आत्मविषयक योग करणा-या स्थिरचित्त झालेल्या योग्याला लागू पडते.

उपनिषदांमध्यें मोक्ष व ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यास चिंतन व ध्यान एवढेच कायते दोन मार्ग सांगितले आहेत. परंतु भगवद्गगीतेमध्ये आणखी एक तिसरा भक्तिमार्ग सांगितला आहे. अर्जुनानें जेव्हा श्रीकृष्णाला ज्याला आपलें चित्तसंयमन करितां येत नाही तो नाश पावतो काय? असा प्रश्न विचारला तेव्हा श्रीकृष्ण म्हणालें बा पार्था ! जो कोणी शुभकर्म करूं लागला. तो दुर्गतीला किंवा हीन गतीला कधी जात नाही. ज्यानें कर्तव्य बजावलें आहे तोच केवळ नव्हे तर योगभ्रष्टहि मरणानंतर फिरून पवित्र व श्रीमंत पुरूषांच्या कुलांत जन्मास येतो व बरेच जन्म घेतल्यानंतर योगी बनतो. निखिल योगी जनांतहि जो आपला अंतरात्मा माझ्या ठिकाणी ठेवून श्रध्देनें मला भजतो तोच मला सर्व योग्यांत श्रेष्ठसा वाटतो. भक्तिमार्गानें खरा मोक्ष मिळतो. व ब्रह्मज्ञान उत्पन्न होतें, हेंच तत्व वारंवार श्रीकृष्णानें शिकविलेले आढळतें. ईश्वरावरील श्रध्देनं व भक्तीनें योग्याच्या पुण्यकर्माला व सद्गुगुणाला महती मिळते. भगवद्गीतेतील नैतिक शिक्षणाचें वर्चस्व किंवा सार ज्याला टीकाकार रहस्य असें म्हणतात ते अकराव्या अध्ययाच्या पंचावन्नाव्या श्लोकांत आहे ते असें की सर्व कर्मे परमेश्वराची होत या बुध्दीनें कर्म करणारा व परमेश्वरपरायण संगविरहित व सर्व भूतांच्या ठायी निवैंर असा जो परमेश्वराचा भक्त तो हे पांडवा मला येऊन पोंचतो.

ईश्वराशी तादाम्त्य हेंच उच्चतम ध्येय किंवा मोक्ष आहे असें भगवद्गीतेंत सांगितलें आहे. ईश्वराशी तादात्म्य किंवा ब्रह्मस्वरूपी लीन होणें म्हणजे जीवात्म्याला परमात्मस्वरूपी बनविणें व चिरकाल ईश्वराच्या सन्निध राहणें होय.

हे ध्येय संपादन करण्याचे तीन मार्ग आहेत. पहिला कर्ममार्ग, दुसरा ज्ञानमार्ग व तिसरा भक्तिमार्ग. हे तिन्हीहि मार्ग एकच आहेत असें दाखविण्याचा प्रयत्न गीतेंत केलेला आहे. व तो पुष्कळ अंशी सफलहि झालेला दिसतो. कर्ममार्गाची व भक्तिमार्गाची सांगड जुळते व भक्तिमार्गानें ज्ञानमार्गाची प्राप्ति होते म्हणून तीनहि मार्ग एकच आहेत. अशा रीतीनें भगवद्गीतेंतील एकंदर उपदेशाची एकवाक्यता करतां येतें. ईश्वराच्या अस्तित्वाच्या कल्पनेशिवाय ईश्वर सर्वत्र भरलेला आहे अशा उपनिषदांतील ब्रह्मात्मवादांतील तत्वांचा उल्लेख मधून  मधून सांपडतो. सगुण-मूर्तिपूजा किंवा अवतारी पुरुषाची श्रध्देनें भक्ति करणें हा मार्ग अज्ञानी लोकांकरितां आहे, व ईश्वर सर्वत्र भरलेला हें तत्व ज्ञानी व ॠषी वगैरे लोकांकरिता आहे; व ईश्वराचें अवतारद्दष्ट आस्तित्व, व ईश्वर सर्वव्यापित्व ह्मा दोन्ही लोकपरिचित तत्वांचे ऐक्य अथवा परमात्मा व इहलोकी मानवरूप धारण करणारा जीवात्मा किंवा अवतारी पुरुष सगुणेश्वर हे दोन्ही एकच आहेत, अशा तर्‍हेची तत्वें जशी इतर ग्रंथातून सांपडतात तशी भगवद्गीतेंतहि सांपडतात. व अशा रीतीने 'सगुणोपासना व निर्गुणोपासना या परस्परविरोधी भासणा-या तत्वांची भगवद्गीतेंत सुसंगति लावलेली आहे. श्रीकृष्ण आपणास परमात्मा व विश्वकर्ता ज्यांत म्हणवितो असे श्लोक भगवद्गीतेंत एकामागून एक आलेले आढळतात, व त्या श्लोकामध्ये वेदांतीन व उपनिषदांतील व त्याप्रमाणेंच ब्रह्म व परमात्मा-याविषयीची तत्वें वर्णलेली दिसतात. यावरूनच भगवद्गीता हें वेदांततत्वानुसार रचलेंले एक निर्गुण भक्तीचें काव्य असावें व नंतर त्यास वैष्णवांनी सगुण भक्तीचेंहि समर्थन करणारें काव्य बनविलें असावें' असें कांही पाश्चात्य विद्वानांचे म्हणणें आहे.

गार्बेच्या मतें भगवद्गीता प्रथम सगुण भक्तीचेंच एक काव्य असावें असें आहे व हें मत सिध्द करण्याचा गार्बेने केलेला प्रयत्न कित्येकांच्या मते सफल झाला आहे.

ईश्वर सर्व चराचरांत भरलेला आहे असे सर्वभूतात्मैक्यदर्शक श्लोक भगवद्गीतेंतून सहज निवडून काढतां येतात. भगवद्गीतेंतील सातशें श्लोकातील निदान एकशें सत्तर श्लोक गार्बेच्या मतें ब्राह्मणी धर्मानुसार व वेदांततत्वानुसार मागाहून घातलें असावेत. जर गार्बेनें छापलेली भगवद्गगीता वाचली तर त्यांत बारीक अक्षरांत लिहिलेले श्लोक वगळले तर बिलकुल विसंगतपणा अगर तुटकपणा दिसून येत नाही. उलट कांही ठिकाणी असे बारीक टाइपांत छापलेले श्लोक वगळले तर तुटकपणा नाहीसा होतो असें विटरनिट्झनें म्हटलें आहे. याच्या उलट होल्ट्झमन नांवाच्या एका विद्वानानं गीता ही परमेश्वर हा निर्गुणानिराकार व ज्ञानगम्य आहे या मताचें प्रतिपादन करणारी आहे असें म्हटलें आहे; व त्यानें गीतेंतील सगुण परमेश्वरासंबंधीचे जे श्लोक आहेत ते प्रक्षिप्त म्हणून ठरविले आहेत. अशा प्रकारची ही पूर्णपणें परस्परविरूध्द व धाडशी विधानें द्दष्टीस पडतात. मोकळ्या मनानें व बारबाईनें जर मूळ भगवद्गीता हा ग्रंथ वाचला तर आपणास आशिया व यूरोपखंडात भगवद्गगीतेची प्रशंसा व तिजविषयांचा आदर इतका कां दिसून येतो यांचे कित्येकांना आश्चर्य वाटतें त्याचा उलगडा होईल. पण आत्मविद्येची गुट व पवित्र तत्वें थोडक्यात पण असंदिग्ध रीतीनें सांगून त्यांच्या आधारें मनुष्यमात्रास आपल्या आध्यात्मिक पूर्णावस्थेची म्हणजें परमपुरूषार्थाची ओळख करून देणारा आणि त्याबरोबरच भक्तीची ज्ञानाशी व अखेर या दोहोंचीहि शास्त्रतः प्राप्त होणा-या व्यवहाराशी सोपपत्तिक व सुंदर जोड घालून संसारांत भांबावून गेलेल्या यतीस शांति व निष्काम कर्तव्याचरणास प्रवृत्त करणारा यासारखा दुसरा बालबोध ग्रंथ संस्कृतातच काय पण जगांतील इतर वाड्.मयांतहि सांपडणे दुर्मिळ होय. या द्दष्टीनें याची या जगांत प्रशंसा झाली ती अगदी योग्यच आहे.

बोधलिंग म्हणतो की भगवद्गीतेंत ज्याप्रमाणें उच्चतम सुंदर विचार ग्रथित केलेले आढळतात, तशीच दोषस्थळें, असंबध्दता, पुनरूक्ति, अतिशयोक्ति, विक्षिप्तपणा दिसून येतो. पण केवळ काव्य या द्दष्टीनें जरी आपण त्याचें परीक्षण केलें तरी सुद्धां तत्वज्ञानाची गूढ तत्वें इतक्या सुलभ व प्रासादिक भाषेंत समजून सांगणारा दुसरा ग्रंथ नाही, असें म्हणण्यास कांही हरकत नाही. गीता ग्रंथ कांही काव्यद्दष्टीनें लिहिला नाही हें उघड आहे. पण बायबलची भाषा जितकी प्रासादिक आहे त्यापेक्षा गीतेंतील भाषा अधिक प्रासादिक आहे हे कोणालाही कबूल करावें लागेल. यूरोपीय पंडित व हिंदुस्थानांतील भाषाशास्त्रज्ञ यांच्या मते केवळ विचारप्रागल्य व अगाध ज्ञान भगवद्गीतेंत दिसून येतें म्हणूनच या ग्रंथाचा लैकिक सर्व यूरोपखंडात भरतखंडात झाला असें नाही तर या ग्रंथात काव्यसौदर्य भाषेचा जोरदारपणा, सुंदर उपमा, पावित्र्य व गांभीर्य सापडतें व ग्रंथाविषयी पूज्यबुद्धि असल्यानें वाचकाचें मन वळतें व त्यायोगेच सर्व जगभर या ग्रंथाची थोरवी वाढली आहे.

आज ज्या स्वरूपांत भगवद्गीता ग्रंथ उपलब्ध आहे त्या स्वरूपांतच पहिल्या शतकापासून आजतागायत हा ग्रंथ वेदांत, तत्वज्ञान व धार्मिक कल्पना यांच्या सांठ्यासारखा होता असे नाही व त्यामुळेंच भरतखंडामध्ये अतिशय लोकप्रिय धार्मिक ग्रंथ म्हणून नांवाजला गेला असेंहि नाही. तो ग्रंथ प्रथम विशिष्टमतप्रधान असून नंतर अनेकमतसंगतिपर बनला असावा असें वाटते. एका संशोधकानें सिध्द केल्याप्रमाणेंच प्राचीन भगवद्गीता ग्रंथ सांख्य तत्वानुसार रचिला असेल. सांख्ययोगांत प्रकृति आणि पुरुष यांमधील पूर्ण भेद सांगितला आहे. आत्म्याचें विविधत्व व प्रकृतीचें नित्यत्व व अनावलम्बित्व त्यांत मानले आहे. हें सर्व विश्व मूलप्रकृतीच्या विकृतीपासून उत्पन्न झालें आहे. व उपनिषदांप्रमाणेंच प्रकृतिपुरुषांच्या यथार्थ ज्ञानानेंच मोक्ष प्राप्त होतो असें यांत मानिले आहे. उपनिषदांतील एकेश्वरवादतत्वाशी ही सर्व तत्वें बिलकुल जुळत नाहीत. परंतु वेदांततत्वज्ञान्याला भगवद्गीतेंत वेदांततत्वे द्दष्टींस पडतात सांख्य व योग यांच्या यांतील विवेचनांत बरेंच साम्य सांपडतें. दोन्हीही पंथाची मूलतत्वें जवळ जवळ एकच आहेत. मानसशास्त्र, तर्कशास्त्र, अध्यात्मविद्या व ज्ञानसंपादन सांख्ययोगांत जास्त लागतें. व योगामध्यें विशिष्ट प्रकारचें आचरण करावें लागतें. भगवद्गीतेंत ''कर्तव्यकर्मानुसार योग्य आचरण करणे'' यास ''योग'' म्हटले आहे व सांख्य म्हणजे यथार्थ ब्रहज्ञान संपादन करणें होय.

भगवद्गगीता- काव्य हा एक कर्मयोग शिकण्याला मुख्य ग्रंथ आहे. सांख्ययोग हें एक उत्कृष्ट प्रकारचें तत्वज्ञान आहे असें भगवद्गीतेंतच काय पण सर्व महाभारतात कथन केलेंले आहे. काही ठिकाणी भगवद्गीतेंत योग म्हणजे केवळ आचार-नीतिशास्त्र होय असें दिसते. परंतु भारतीय वाड्.मयाचें योग म्हणजे मन एकाग्र करून ब्रह्मचिंतन करणें किंवा ध्यानैकाग्रतेनें समाधि लावणें असे मानलेंले आहे. भैतिक स्थल शरीरांतून जडात्म्याला सोडवून विव्यश्वापी जो परमात्मा त्याशी तादात्म्य पावण्यास लावण्याविषयी जे मार्ग कथन केले आहेत ते योग शब्दांत समाविष्ट होतात. योगमार्गाचा सांख्याप्रमाणे वेदांताशीहि निकट संबध आहे. सर्व धर्माच्या लोकांची, योगी म्हणजे सज्जन लोकांनी ठरविलेली सर्वोत्कृष्टपणाची अनुकरणीय प्रतिमा किंवा एक नमुनेदार यंत्र अशी कल्पना आहे. आजच्या भगवद् गीतेस सांख्य किंवा वेदांत पक्षाचा ग्रंथ न म्हणतां अनेकमतसंगतिपक्षाचा ग्रंथ म्हटल्यास अधिक योग्य होईल. भगवद् गीतेंत जरी वेदांतील यज्ञयागादि आचार वर्णन केलेले नाहीत व त्यापासून मुक्ति मिळते असें जरी कथन केले नाही तरी वैदिक पध्दतिनुसार ठरविलेले यज्ञ व त्यांच्यासंबधी वेदांतसूत्रे घालून ब्राह्मणी यज्ञांची गीतेंत शिफारस केलेली आढळते. सर्व प्रकारचे तत्वज्ञानी व निरनिराळ्या पंथाचे लोक भगवद्गीतेकडे का ओढ घेतात हें वरील गोष्टीवरून सहज लक्षांत येतें. एखाद्या ब्रह्मावर विचार करणा-याची जितकी महती भगवद्गीतेच्या दृष्टीनें आहे तितकीच महति एखाद्या कर्मठ ब्राह्मणाला सुद्धा भगवद्गीतेंत दिलेली आहे. महाभारतांतील इतर सर्व तत्वज्ञान शिकवणारे बोधप्रद भाग भगवद्गीतेप्रमाणेंच महत्वाचे आहेत. सांख्ययोग व कर्मयोग यांचीच तत्वें प्रामुख्यानें भगवद्गीतेंत बारकाईने वर्णिलेली आढळतात व उच्चतम ज्ञान मिळविण्यास हेच दोन मार्ग आहेत अशी शिफारस केलेली आहे. महाभारतांत उद्योगपर्वामध्यें एकेचाळीस ते शेचाळीस या अध्यायांतून सनत्सुजातानें प्रातिपादिलेली तत्वें बहुतेक वेदांतपर आहेत व अनुगीता हें भगवद्गीतेचेंच एक अनुकरण आहे. हा ग्रंथ मागाहून लिहिला गेला व यांत ब-याच तत्वांची भेसळ केलेली आहे. भगवद्गीतेशी तुलना करितां तत्वज्ञानानें भरलेल्या भारतांतील इतर भागांपैकी कोणताहि भाग काव्यदृष्टया कमी प्रतीचा ठरेल.

भगवद्गीता ग्रंथाची अल्पावधीतच लोकमान्यता झाल्यामुळें त्याचें अनुकरण सर्वत्र होऊ लागावें यांत आश्चर्य नाही. अशा प्रकारची अनुकरणप्रियता आपल्याला सर्वत्र आढळून येते. कालिदासाच्या मेघदूताचें अनुकरण करून नेमदूत, काकढूत, पिकदूत इत्यादि अनेक काव्यें लिहली गेलेली आढळतात, तीच स्थिति गीतेसंबधीहि दृष्टीस पडतें. खुद्द महाभारतांतच शांतिपर्वान्तर्गत मोक्षपर्वाच्या कांही फुटकळ प्रकरणांत पिंगलगीता, शंपाकगीता, मंकिगीता, बोध्यगीता विचख्युगीता, हारीतगीता, वृत्रगीता, पराशरगीता व हंसगीता अशी नांवे दिलेली असून अनुगीतेच्या एका भागांस ब्राह्मणगीता, अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, उत्तरगीता, कपिलगीता, गणेशगीता, देवगीता, पांडवगीता, ब्रह्मगीता, भिक्षुगीता, यमगीता, रामगीता, व्यासगीता, शिवगीता, सुतगीता, सूर्यगीता वगैरे दुस-याहि गीता प्रसिध्द आहेत. अवधूत, अष्टावक्र वगैरे गीता कोणत्या पुराणांतील आहेत अथवा पुराणांतील नसल्या तर त्या स्वतंत्र रीतीनें कोणी व केव्हा रचिल्या याचा पत्ता लागत नाही. तथापि हे सर्व ग्रंथ भगवद्गीता सर्व मान्य झाल्यावरच रचिले गेले असें उघड दिसतें.

गीता कालनिर्णय- कोणत्याहि ग्रंथाचे बहिरंग व अंतरंगपरीक्षण असे सामान्यतः दोन भाग पडतात. अंतरंग परीक्षण हा भाग या दोहोंत अधिक महत्वाचा असला तरी बहिरंगपरीक्षणाचें महत्व काही कमी आहे असें नाही. गीतेच्या बाबतींत तर हे बहिरंगपरिक्षण फार महत्वाचें आहे. बहिरंगपरीक्षणांत गीताकालनिर्णयाचा प्रामुख्यानें अंतर्भाव करणें जरूर आहे. गीताकालनिर्णय झाल्यास गीतेंतील अंतरंगावर पुष्कळच प्रकाश पडण्यासारखा आहे. गीता ही ख्रिस्ती शकानंतर रचिली गेली असावी असें बहुतेक पाश्चात्य विद्वान् व त्याप्रमाणेंच आपल्या इकडील कांही विद्वानाचे मत आहे. गीता जितकी अर्वाचीन ठरेल तितकी ठरविण्याचा या पाश्चात्य विद्वानांचां हेतुपुरःसर प्रयत्न असतो हे डॉक्टर लॉरिन्सर अगरडे व्हिडा यांच्या ग्रंथावरून दिसून येतें. गीता अर्वाचीन ठरवून नंतर तीत ख्रिस्ताची भक्तिमार्गाचा गीतेवर फार परिणाम झाला आहे. असें ठरविण्याचा या विद्वानांचा प्रयत्न असतो. पण सुदैवानें गीता ही कांही झालें तरी ख्रिस्ताच्या पूर्वी रचिली गेली असल्याचें अनेक प्रमाणांनी सिध्द करतां येतें. डॉ.भांडारकर, कै.तेलंग इत्यादी विद्वानांनी हल्लीच्या गीतेचा काल ख्रिस्ती शकापूर्वी ठरविला आहे. हल्ली नुकतीच जी भासाची नाटकें सांपडली आहेत त्यावरून देखील हेंच अनुमान द्दढ होतें. भासकवीचा काल अगदी अलीकडे ओढला तरी ख्रिस्तोत्तर दुस-या शतकाच्या पुढें नेतां येत नाही हे निर्विवाद आहे. त्याच्या कर्णभार नाटकांत बारावा श्लोक पुढीलप्रमाणें आहे.

हतोऽपि लभते स्वर्गं जित्वातु लभते यश:।
उभे बहुमते लोके नास्ति निष्फलता रणे॥

हा श्लोक गीतेंतील 'हतो वा प्राप्स्यसि स्वर्गे' या श्लोकाशी समनार्थक आहे. भासाला महाभारताचा पूर्ण परिचय होता हें त्याच्या नाटकांवरून दिसून येतें; त्याअर्थी वर लिहिलेला श्लोक रचतांना त्याच्या डोळ्यापुढें गीतेचा श्लोक असावा असें अनुमान करतां येतें; पण सर्वांत बलवत्तर प्रमाण म्हणजे बौधायन गृह्मशेषसूत्रांत 'देशाऽभावें द्रव्याऽभावे साधारणे कुर्यान्मनसा वाऽर्चयेदिती । तदाह भगवान्॥ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भत्तच्युपह्मतमश्रामि प्रयतात्मन इति॥ असा गीतेंतील नवव्या अध्यायांतील २६ वा श्लोक 'यथाह भगवान्' म्हणून स्पष्ट घेतला आहे. त्याचप्रमाणे याच गृह्मशेषसूत्राच्या तिस-या प्रश्नाच्या शेवटी 'ॐ नमो भगवमे वासुदेवाय' हा द्वादशाक्षरी मंत्र जपला म्हणजे अश्वमेघाचे फल मिळतें असे स्पष्ट म्हटले आहे. यावरून बौधायनाच्या पूर्वी गीता व वासुदेवभक्ति सर्वमान्य झालेली होती असें दिसते. याशिवाय बौध्दग्रंथामध्ये गीतेंतील श्लोकांशी सद्दश अशी कोणती वाक्यें आढळतात व मूळ बौध्दधर्म हा निवृत्तिपर असतांना गीतेच्या शिकवणीमुळे लोकप्रिय झालेल्या कर्मयोगाची छाप कशी पडलेली आहे हे लो.टिळकांनी आपल्या गीतारहस्यांत सप्रमाण सिध्द केलेलें आहे. या वरील सर्व प्रमाणावरून गीता ही ख्रिस्तीशकापूर्वी तीन शतके तरी अस्तित्वांत होती असें निर्विवाद सिध्द होते.

गीता ही उपनिषदें व वेदान्तसूत्रें यांच्याप्रमाणेंच धार्मिक तत्वज्ञानाची पूर्ति करणारा ग्रंथ या नात्यानें प्रस्थानत्रयीमध्यें गणली जाऊ लागल्यामुळें वैदिक धर्माच्या निरनिराळ्या संप्रदायाच्या आचार्यांनी आपापल्या संप्रदायाची वेदमूलकता व प्रामाण्य सिध्द करण्यासाठी गीतेंवर भाष्यें लिहिण्यास सुरुवात केली. याशिवाय इतर पुष्कळ पंडितांनीहि स्वतंत्र रीतीनें गीतेवर भाष्यें लिहिली आहेत. पण हल्ली असलेल्या गीतेवरील भाष्यांमध्यें व टीकांमध्ये बहुतेक भाष्यें व टीका सांप्रदायिक आचार्यांच्या अगर पंडिताच्या आहेत. या संप्रदायांपैकी अतिशय प्राचीन संप्रदाय म्हणजे शंकराचार्यांचा होय. यानंतर रामानुजाचार्यांनी गीतेवर एक भाष्य दहाव्या शतकांत लिहिले. त्यांत त्यांनी शंकराचार्यांच्या अद्वैत मताचें खंडण करून विशिष्टाद्वैत मताचें प्रतिपादन केले आहे. रामानुजाचार्य हे भागवतधर्मी असल्यामुळे भागवत धर्मात विशिष्टद्वैत मत शिरण्यास यांचेच ग्रंथ कारणीभूत झाले आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. यानंतर द्वैती संप्रदायाचे प्रसिध्द प्रवर्तक मध्वाचार्य उर्फ आनंदतीर्थ यांनी 'भगवद्गीता तात्पर्यनिर्णय', 'भगवद्गीताभाष्यविवरण' इत्यादि ग्रंथ लिहून जीव व शिव हे दोन्हीहि भिन्न असून त्यांचे पूर्ण ऐक्य होणें शक्य नाही असे तत्व प्रतिपादन केले. वल्लभाचार्यांनी १५ व्या शतकांत शुद्धाद्वैत मताचें प्रतिपादन करण्यासाठी गीतेवर भाष्य लिहिले. रामानुजाचार्यानंतर पण मध्वाचार्यांच्या पूर्वी होऊन गेलेले निबांर्काचार्य यांनी जो संप्रदाय काढला त्या संप्रदायांतील केशव काश्मीरिभट्टाचार्य यांनी 'तत्वप्रकाशिका' नांवाची एक टीका लिहिली आहे. या संप्रदायास 'द्वैताद्वैती संप्रदाय ' हे नांव देता येईल. यांच्याशिवाय गीतेवर इतर भाष्य पुष्कळच आहेत. त्यापैकी श्रीधराची सुबोधिनी, हनुमद्भाष्य; आनंदाची 'स्वात्मानंदविवर्धिनी' जयतीर्थाची 'प्रमेयदीपीका' व 'न्यायदीपिका, 'जगध्दराची 'गीतार्थदीप' टीका, नीलकंठाची 'भावदीपिका', मधुसूदनाची 'गूढार्थदीपिका, 'राघवेंद्रकृत 'भगवद्गीतार्थसंग्रह' वनमालीकृत 'गूढार्थचंद्रिका', विज्ञानभिक्षुकृत। गीतेवरील टीका; वेदान्तचार्यांची 'भगवद्गीतातात्पर्यचंद्रिका', शंकरानंदाची 'भगवद्गीतात्पर्यबोधिनी', क्षीरस्वामीकृत 'सुबोधिनी', सदानंद व्यासकृत 'भावप्रकाश' सूर्यपंडितकृत 'परमार्थप्रभा', श्रीकृष्णनंदस्वामीकृत 'गीतार्थपरामर्श' इत्यादी टीका प्रसिध्द आहेत यांशिवाय निरनिराळ्या भाषांत टीका व भाष्यें झाली आहेत ती वेगळीच. मराठींत ज्ञानेश्वरमहाराजांनी गीतेवर भावार्थदीपिका नांवाची एक टीका लिहिली आहे. हीसच ज्ञानेश्वरी असे म्हणतात. वारकरी पंथाचा हा सर्वात महत्वाचा व परमपूज्य ग्रंथ होय. त्यांत त्यांनी गीतेने भक्तिपर विवरण केले आहे. याशिवाय वामनपंडिताची 'यथार्थदीपिका' नावांची गीतेंवर एक ओवीबध्द विस्तृत टीका असून त्यानें गीतेंचे समश्लोकी भाषांतरहि केले आहे. महानुभावांनाहि गीता मान्य आहे परंतु त्यांनी त्यांतील तत्वाचें आपल्या संप्रदायानुरूप निराळें प्रतिपादन केले आहे. त्यांनी ''संभवमि युगेयुगे'' याचा अर्थ चार युगांत ईश्वराचे चार अवतार होणार आहेत. पैकी दत्त, हंस व कृष्ण हे अनुक्रमे कृत, त्रेत आणि द्वापार युगांत होऊन गेले असून कलियुगात प्रशांत हा अवतार व्हावयाचा आहे असे प्रतिपादलें आहे. अलीकडे गीतेवर गद्य व पद्य अशा टीका थोड्या फार झाल्या आहेत. पद्यात्मक टीकेंत बाबा गर्दे कृत 'पंचदशी' विष्णुबुवा ब्रह्मचारीकृत 'भगवद्गीता यथार्थ बोधिनी' (यथार्थदीपिकेंचे गद्य स्वरूप) इत्यादि अनेक टीका प्रसिध्द झाल्या आहेत. गद्यात्मक टीकेमध्ये कै. लो.टिळक यांच्या गीतारहस्याला अग्रस्थान देणें जरूर आहे. गीतारहस्यावर टीका करण्याच्या निमित्तानें य.व्यं. कोल्हटकर यांनी गीताधर्म हे पुस्तक लिहिले आहे. परशुराम गोंविद चिंचाळकर उर्फ गोंविदसुत यांनी रहस्यनिरीक्षण पुस्तक लिहिले आहे. याशिवाय चि.गं. भानूकृत भगवतद्गीता (षडाध्यायी-प्रथम, द्वितीय, तृतीय व उपसंहार), सातवळेकर कृत 'भगवद्गीतासार', गुंजीकरकृत 'भगवद्गीता सुबोधचंद्रिका' हंसकृत 'भावार्थसारगीतासुधा' इत्यादि टीका प्रसिध्द आहेत. समाजशास्त्र व नीतिशास्त्र द्दष्टया गीतार्थविववरणाचा प्रयत्न म्हणून पाश्चात्य तत्वज्ञानादि शास्त्राचे गीतेंत मूळ दाखविण्याचा गीताभाष्यांत रा.शं.रा. राजवाडे यांनी प्रयत्न आरंभला आहे. गीतारहस्याचा व तदनुरोधानें गीतेचा अभ्यास करण्याकरतां नुकतेंच कै. लो. टिळक यांचे नातू ग.वि.केतकर यांनी 'गीता-धर्म-मंडळ' स्थापन केलें आहे.

[संदर्भग्रंथ.गॉवें-इंट्रोडक्शन टु दि भगवद्गीता-मॅकीकनकृत इंग्लिश भाषांतर (१९१८ मुंबई); हॉपकिन्स-दि ग्रेट एपिक;रिलिजन्स ऑफ इंडिया; वेबर-इंडिया स्टुडिओ; बार्थ-रिलिजन्स ऑफ इंडिया; होल्ट्झमन् 'दि महाभारत ऍंड इट्स पार्ट्स' न्या तेलंग-'गीता' (सेक्रेड बुक्स ऑफ दि ईस्ट सीरिज): सीतानाथ तत्वभूषण-कृष्ण ऍंड गीता; डॉ.भांडारकर-'शैविझम, वैष्णविझम ऍंड अदर सेक्ट्स'; चि.वि.वैद्य-'महाभारताचा उपसंहार'; बा. गं. टिळक-श्रीमद्गवद्गीतारहस्य (चतुर्थ आवृत्ति १९२३); डॉ.कुर्तकोटी-'हार्ट ऑफ दि गीता'; प्रो. डॉयसेन-'फिलासफी ऑफ दि उपनिषद्स'; फरूकहर-'रिलिजन्स ऑफ इंडिया';]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .