विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   
    
गुब्बी तालुका- म्हैसूरच्या तुमकूर जिल्ह्मांतील एक तालुका. क्षेत्रफळ ५५२ चौ. मै. लो.सं. (१९११) ९६८२०. गुब्बी (तालुक्याचें मुख्य ठिकाण) व कडाबा ही दोन शहरें व बाकी ३५४ खेडी आहेत. जमीनमहसूल (१९०३-०४) १,९२,०००रू यांतून शिमशा नदी वहाते. यात डागलवाडी टेंकड्या आहेत. जमीन तांबडमातीची उथळ व रेताड आहे.

शहर- गुब्बी तालुक्याचें शहर लो.सं.(१९११) ३४६४. तुमकूरपासून अंतर १३ मैल. हे रेल्वेस्टेशन व व्यापराचें मुख्य ठिकाण आहे. कोमटी व लिंगायत हे व्यापारी आहेत. सुपारीच्या व्यापाराचें हें केंद्रस्थान आहे व येथून नगर, मालनाद, वालाचा पेठ वगैरेकडे सुपारी जाते. तेथे कपडा, घोंगड्या, धान्य आणि विविध जिन्नस यांचा वारंवार होणा-या यात्रांच्या वेळी खप फारच असतो.