प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे     
     
गुल्म, निदान.- गुल्म म्हणजे आमाशयापासून गुदद्वारापर्यंत हाताच्या स्पर्शानें समजणारी गांठ. संस्कृत भाषेंत गुल्म शब्दाचा अर्थ शेंड्याकडे विस्तार असलेल्या लहान लहान झाडांचा एकवट दिसणारा समुदाय असा आहे. यासच जाळी असें मराठीत नांव आहे. या अर्थावरून पोटांत दोषामुळे अशीच जी जाळी बनतें तीस गुल्म नांव दिले आहे. ही वरून हाताला गांठीसारखी लागते म्हणून हिला गांठ असें म्हटलें आहे. परंतु शरीरांत इतर ठिकाणी म्हणजे गळ्याला वगैरे ज्या गांठी होतात त्यांत आणि या गांठीत फरक आहे. तो असा-  शरीरांत इतर ठिकाणी झालेल्या गांठी पिकतात, गुल्म पिकत नाही. इतर गांठी बहुतेक मांस, व मेद यांच्या बनतात. गुल्म दोषांनी व रक्तधातु यानेंच बनतो.

ह्या गुल्म संज्ञक गांठी आंतड्याच्या आंतल्या भागांतच प्राय: होतात परंतु कित्येकवेळां आंतड्याच्या बाहेरच्या बाजूसहि होतात. त्यास बहिमार्गगत गुल्म म्हणतात. अंतमार्गातील किंवा बहिर्मागातील गुल्मांची लक्षणें सामान्यतः सारखीच असतात. हे गुल्म आठ प्रकारचे आहेत; ते वात, पित्त कफ, वातपित्त, कफपित्त, कफवात, सन्निपात व रक्तज, (आर्तव दोषानें स्त्रियांस होणारा) हे होत.

ताप, वांती किंवा अतिसार इत्यादी रोगांची अथवा पंचकर्मे (ओकारी, रेचक, बस्ती दोनप्रकारचे [निरूह, अनुवासन]  आणि नस्य) यांनी क्षीण झाल्यावर वातकारक पदार्थ खाण्यानें, भूक लागली असतां थंडपाणी पिण्यानें, जेवल्यानंतर पाण्यांत पोहणें वगैरे, लंघन, शक्ति कमी करणारी व शरीरास खिळखिळी करणारी कामें केल्यानें, बळेंच ओंका-या काढल्यानें किंवा वातादिकाचे आलेले वेग थांबवून न धरल्यानें, शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें स्नेहन अगोदर व स्वेदन न करितां रेचक औषध घेतल्यानें किंवा शोधन औषध घेतल्यावर लगेच विदाही व कफकारक (कफ पाझरवणारे-स्पंदन) पदार्थ खाल्यानें, महास्त्रोतांतील म्हणजे आमाशय व पक्वाशय यांतील वाताधिक दोष वेगवेगळे, दोन दोन किंवा तीन्ही एकत्र अथवा रक्तासहित कुषित होऊन वरचा व खालचा दोन्ही मार्ग बंद करून हातास लागणारा वर उचलेला गांठीसारखा गुल्मं नावाचा रोग उत्पन्न करितात. हा उत्पन्न होण्यापूर्वी पोटांत शूळ होऊ लागतो. हा गुल्मरोग आमाशय किंवा पक्काशय (आंतडा) यांत कोठेहि जरी होतो तरी ह्मदयाजवळचा भाग, पोटाच्या कुशी, बेंबीच्या जवळचा प्रदेश मूत्राशय यांत विशेषें करून होतो.

वायू अमूर्त असल्यामुळें त्याची गांठ कशी होते अशी कोणास शंका येईल याचें उत्तर असें आहे की, धातुक्षयानें किंवा कफ, मल व पित्त यांनी मार्ग बंद केल्यानें वायु कोठ्यांत घर करून रूक्षतेमुळें कठीण होतो. तो स्वस्थानी म्हणजे पक्वाशयांत असल्यास स्वतंत्रपणें दूषित होतो आणि परक्या स्थानी म्हणजें आमाशयांत असंता पित्तकफाच्या तंत्रानें दूषित होतो तो एकेठिकाणी गोळा झाल्यामुळें (थोड्या जागेंत पुष्कळ वायु चेंडूप्रमाणें साठल्यामुळें) साकार किंवा कठीण नसूनहि कठिण भासतो व हाताला गांठीसारखा लागतो म्हणून त्या सांठलेल्या वायूस वातगुल्म म्हणतात. या वातगुल्मांत मान व डोके यांत शूळ, ताप, पानथरी, आंतड्यांत कुजबुजणें, सुईने टोचल्यासारखें दुखणें, मलावरोध, वरचेवर दम लागणें, इंद्रिये ताटणें, तोंडास कोरड, कृशता, अग्नि अनियमित होणे, त्वचा, डोळे, नखें वगैरे रूक्ष व काळी पडणें आणि वायूच्या चंचलपणामुळे गुल्माचा आकार व स्थान वाढणें, कमी होणे व वेदना, यांचा कोणत्याच प्रकारचा नियम नसणें, आणि गुल्म मुंग्या आल्याप्रमाणें स्फुरण पावणें व त्यांत टोंचणे ही लक्षणे होतात. पित्तगुल्मांत दाह, आबंट ढेंकर, मूर्छा, जुलाब, घाम, तहान, ताप, त्वचा हिरवी होणें, गुल्मास स्पर्श सहन न होणें, गुल्म तापणें, दुखणें, पेटल्यासारखी होणें ही लक्षणें होतात. कफगुल्मांत अंगावर ओले वस्त्र पांघरल्यासारखे वाटणें,  अरूची, अग्निमांद्य, हिवताप, पडसें, आळस, मळमळ, खोकला येणें, त्वचा, नखें वगैरे पांढरी होणें आणि गुल्म खोल, कठिण, जड व स्तब्ध असून त्यावर हात ठेवला आसतां रोग्याला न कळणें व वेदना कमी होणें ही लक्षणें होतात. गुल्म बहुतकरून ज्या दोषापासून उत्पन्न होतात ते त्या दोषांच्याच स्थानांत असतात. आणि त्या दोषांच्या पूर्वोक्त प्रकोपकाळी त्यांत शूळ होऊं लागतो. द्वंद्वज गुल्म तीन आहेत. त्यांत दोन, दोन, दोषांची लक्षणें होतात. सान्निपातिक गुल्मांत तीव्र शूळदाह होतो, तो लवकर पिकतो. आणि कठीण व उंच असतो. तो असाध्य आहे.

रक्तगुल्म फक्त बायकांस होतो. जी स्त्री ॠतुकाळी बाळंपणांत किंवा कांही योनिरोग झाला असता वातूळ पदार्थ खाते त्यामुळे वायू कुषित होऊन तो दर महिन्यास सांचलेले आर्तव (विटाळ) गर्भाशयांत कोंडून ठेवितो. त्या योगानें पोट फुगते आणि मळमळ, डोहाळे, स्तनांत दूध येणें, अशक्तता वगैरे गर्भारपणाची लक्षणें प्रगट होतात. पुढें त्या सांचलेल्या रक्तांत वायूचा संसर्ग झाल्यामुळे तिला वात गुल्माची आणि रक्त हे पित्तापासून बनतें म्हणून पित्तगुल्मांची लक्षणें होतात. ती पुढीलप्रमाणें-

पोटांत दुखणें, ताठणें, दाह, अतिसार, तहान, ताप वगैरे याशिवाय गर्भाशयांत दुष्ट रक्त जमून त्यांत फार शूळ होतो. योनीतून स्त्राव होतो. त्यास घाण येते. योनींत टोंचण होते. वेदना होतात. आणि ती स्फुरण पावते. गर्भारपणाची सर्व लक्षणें या रक्तगुल्मांत होत असल्यामुळे पुष्कळ वेळां गर्भ किंवा गुल्म यांचा निश्चय करणें कठिण जातें. परंतु पुढील लक्षणांवरून बारकाईनें गुल्माचा निश्चय करतां येतो.

गर्भ जसा आपल्या अंगानी (हात, पाय, डोके, वगैरे) पोटांत इकडे तिकडे चळवळ करतो त्याप्रमाणें रक्तगुल्म, त्यास अंगे नसल्यामुळें हालचाल करू शकत नाही. परंतु त्यांत शुळ होतो. तो एकच गोळा असलेला कधी कधी स्फुरण पावतो. याशिवाय गर्भानें जसें पोट वाढतें तसे यांत न होतां गुल्मच वाढतो.

सर्व गुल्म ज्या एक किंवा अनेक दोषांपासून उत्पन्न होतात, त्यांच्याच आश्रयानें राहतात. म्हणून ते फार दिवसांनी पिकतात किंवा मुळीच पिकत नाहीत. कारण पिकण्यास तिन्ही दोषांची जरूर असतें. पोटांत गळूं (विद्रधी) झालें असता प्रथम गुल्माचा भास होतो. परंतु विद्रधी दुष्ट रक्तानें होत असल्यामुळें लौकर पिकतो. यावरून गुल्म व विद्रधी यांतील भेद स्पष्ट होतो. मागें सांगितल्याप्रमाणें अंतर्भागगत गुल्म व बर्हिगत गुल्म यांची लक्षणें प्राय: जरी सारखी असली तरी कांही लक्षणे निराळी असतात ती येणें प्रमाणे.-

अंतर्गत (आतड्याच्या आंतील) गुल्मांत मूत्राशय, कुशी, हृदय व कौलू यांत वेदना होतात, अग्नि मंद होतो; शरीराची कांती नाहीशी होते. शक्ती क्षीण होते आणि मळमूत्रदिकांचे वेग बंद होतात. बर्हिगत गुल्मांत ह्यांच्या उलट लक्षणें होतात. वस्ति, हृदय, वगैरे कोष्टागांत किंचित् शूळ उत्पन्न होतो. गुल्माच्या जागेवरील त्वचेचा रंग बदलतो व ती जागा बाहेरून अधिक उंच दिसतें. फार ढेंकर येणें, मलावरोध थोडे जेवलें तरी पोट भरल्यासारखें वाटणें. भरपोट जेवण सहन न होणें, आतंड्यात कुजबुजणे, पोटांत गुरगुरणें, पोट फुगणें व अग्निमांद्य ही लक्षणें गुल्म होण्यापूर्वी होतात.

या गुल्मांतच आनाह या नांवाचा विकार फार होतो. वरून व खालून वायूचा अवरोध झाल्यानें पोट अतिशय फुगतें, आंत गुरगुरतें व अत्यंत तीव्र वेदना होतात ही त्या आनाहाची लक्षणें होत.

जो गुल्म थोडा थोडा क्रमानें वाढत जाऊन मोठा झाला, (सर्व पोटभर पसरला) व ज्याच्यावर शिरांची जाळी झाली असून कांसवासारखा उंच दिसूं लागला तसेच अशक्तपणा, अरूचि, मळमळणें, खोकला, ओंकारी, अस्वस्थता व ताप, तहान, झांपड आणि पडसें ही लक्षणें दिसूं लागली तो गुल्म असाध्य असतो.

गुल्म झालेल्या रोग्याचे हात, पाय, हृदय व बेंबी यांस सूज असून ताप, दमा, ओंकारी व अतिसार ही लक्षणें झाली तर गुल्म असाध्य असतो. दमा, पोट दुखणें, तहान, अन्नद्वेष व गुल्मांची गांठ एकदम नाहीशी होणें व दुर्बलपणा येणें ही लक्षणें झाली असतां गुल्मरोगी वांचत नाही.

चिकित्सा.- सर्व प्रकारच्या गुल्मांवर लंघन, वमन, विरेचन, स्वेदन, घृतपान, बस्ती, अरिष्टें, पथ्यभोजन आणि रक्त काढणें व डाग देणें हे उपचार आहेत. रूक्ष व शीतसेवनापासून उत्पन्न झालेल्या वातिक गुल्मांत मळाचा खडा, वायूचा अवरोध व तीव्र वेदना ही लक्षणें असल्यास त्यावर तेलांचा उपयोग करावा. खाण्यांत, पिण्यांत, वस्तीच्या द्वारें व अभ्यंगानें तेलाचा उपयोग केल्यानें शरीर स्निग्ध झाल्यावर शेकावें. पोटफुगी, वेदना, ताठणें आणि वायू व मळ यांचा अवष्ठंभ हे विकार असतां विशेष शेकावें. तें स्निग्ध झालेल्या रोग्याची स्त्रोते मऊ करून वायु व मळ यांचा अवष्टंभ मोडून गुल्म नाहींसा करतें. सामान्यतः सर्व गुल्मांवर व विशेषेंकरून बेंबीच्या वरच्या गुल्मावर स्नेहपान हितकर आहे. पक्काशयांतील गुल्मावर बस्ति आणि इतर भागी पोटांतील गुल्मावर स्नेहपान व बस्ति हे दोन्ही उपाय हितकर आहेत. वातगुल्मांत वायु व मळ यांचा अवष्टंभ असून अग्नि प्रदीप्त असल्यास स्निग्ध व उष्ण अशी पैष्टिक अन्नपानें द्यावी आणि वरचेवर स्त्रेह पाजावा. वातगुल्मांत कफपित्ताचें पाठबळ असल्यास निरूह व अनुवासन वस्ती द्यावे. बस्तिकर्म उत्तम गुल्मनाशक आहे. कारण तें प्रथम वायूस त्याच्या स्वस्थानांत म्हणजे पक्वाशयांत जिंकून गुल्माचा त्वरित नाश करितें म्हणून वरचेवर निरूह व अनुवासन बस्ती दिले असतां वातज पित्तज व कफज गुल्म बरे होतात. वातगुल्मांत कफ वाढून अग्नीस मंद करून जर तो अरूचि, मळमळ, जडत्व व झांपड हे विकार उत्पन्न करील तर रोग्यास वमन द्यावें.

वातगुल्मांत कफाचें पाठबळ असल्यास एरंडेल तेल सुरेच्या निवळीबरोबर आणि पित्ताचें पाठबळ असल्यास दुधांतून प्यावें. वातगुल्मांत पित्त अतिशय वाढून त्यापासून दाह उत्पन्न झाल्यांस अनुलोमन करणारें स्नेहयुक्त रेंचक द्यावें. यापासूनहि दाह शमन न झाल्यास रक्त काढावें. कोंबडा, मोर, तित्तिर यांच्या मांसाचा रस, भात, मद्य, औषधांनी तयार केलेले तूप, बेताचें उष्ण, पातळ व स्निग्ध अन्न ही सर्व वातगुल्मावर पथ्यकारक आहेत.

स्निग्ध व उष्ण सेवनानें उत्पन्न झालेल्या पित्तगुल्मावर रेचक द्वितावह आहे. रूक्ष व उष्ण सेवनापासून झालेल्या पित्तगुल्मावर तिक्तघृत, वासाघृत ही घृतें द्यावीं.

दाह फार होत असेल तर शीतवीर्य औषधें वाटून तुपांत कालवून लेप द्यावा. गुल्माच्या पूर्वरूपांत विशेषतः पित्तगुल्मांत शूळ व अग्निमांद्य ही झाली असल्यास रक्त काढावें. गुल्माची मुळेच कापली गेली म्हणजे त्यांचा पाक न होता ते नाहीसे होतात. कारण आतले रक्त नासूनच पाक होतो. तेच नासकें रक्त काढून टाकलें म्हणजे त्यापासून होणारा व्याधी नाहीसां होतो. रेच होऊन रोग्यास ग्लानी आली असल्यास जांगल मांसरसांनी त्याची तृप्ति करून तो हुशार झाला म्हणजे शिल्लक राहिलेला विकार काढून टाकण्यासाठी घृताचें सेवन चालू ठेवावें. रक्त व पित्त अतिशय वाढल्यामुळें किंवा त्यावर आरंभी औषधोपचार न झाल्यामुळे गुल्म पिकण्याच्या बेतावर आल्यास त्यावर पित्तविद्रधीप्रमाणें चिकित्सा करावी.

कफगुल्मांत प्रथम रोग्यास वमन द्यावें. तो वमन ओकारीचें औषध देण्यास योग्य नसल्यास उपास करवावे, नंतर कडू, उष्ण व तिखट औषधें पेयादि क्रमांत योजून त्यानें अग्नि प्रदीप्त करावा. खोल किंवा वर उभारलेला बधिर, टणक, स्थिर व आनाहादिकांनी युक्त अशा गुल्मांचे शोधनानें शमन करावें. कफगुल्मावर तीळ, एरंड्या, अळशी व मोह-या यांचा लेप करून लोखंडाचें भांडे किंचित् तापवून शेकावें. या उपायांनी स्वस्थानापासून सुटलेल्या कफगुल्माचें स्निग्ध रेचकें व दशमुळांच्या काढ्याचे बस्ती देऊन शोधन करावें. ''दंती हरीतकी'' या नांवाचें औषध यावर चांगले आहे. घर करून बसलेला मोठ्या घेराचा, टणक, बधिर, जड व मासांत खोल असलेला असा गुल्म क्षार, अरिष्टें व डाग यांनी बरा करावा. हे उपाय एक दिवस किंवा दोन दिवस किंवा तीन दिवस मध्ये सोडून शरीराची शक्ति वाढविण्याकडे व दोषांचा जोर कमी करण्याकडे लक्ष्य पुरवून करावे. क्षार आपल्या क्षारत्वानें मांसरस दूध व तूप खाणा-या  मनुष्याच्या मधुर व स्निग्ध कफास तोडून त्याच्या आशयास फोडून खाली पाडतो. अग्नि मंद होऊन अरूची उत्पन्न झाली असतां संवयीच्या मद्यांबरोबर स्नेहयुक्त भोजन करण्यास स्त्रोतांचे मार्ग मोकळे होण्याकरितां जुनी आसवें व अरिष्टें द्यावी.

वरील उपयांनी कफगुल्म बरा न झाल्यास स्थिरगुल्मावर डाग द्यावा. वैद्यानें गुल्मावर शेंवटपर्यंत वस्त्र घालून बेंबी, बस्ति, आंतडी, हृदय पोटावरील रोमराजी यांस बचावून तापवून लाल केलेल्या वाणानें किंवा लोखंडाच्या डहाणीनें किंवा टेंभुर्णीच्या जळक्या लांकडाने फार जोरानें न दाबता डाग द्यावा. नंतर आग कमी झाल्यावर व्रणाप्रमाणें थंड लेप वगैरची योजना करावी.

स्त्रीस रक्तगुल्म झाला असता बाळंत होण्याच्या वेळी, म्हणजे नऊ महिने लोटल्यानंतर, तिचें स्नेहन स्वेदन करून तिला स्निग्ध रेचक द्यावें. स्त्रियाच्या रक्तगुल्मावर व रजोदर्शन बंद झालें असल्यास विटाळ आणणारी औषधें द्यावी. रक्तपित्तनाशक क्षार मध व तुप यांतून चाटावे. लसूण तीक्ष्ण मद्य व मत्स्य हे पदार्थ खावयास द्यावे.

दशमुळांच्या काढयांत दूध, गोमूत्र व क्षार घालून त्याचा उत्तरबस्ति द्यावा. म्हणजे योनिद्वारें पिचकारी मारावी. यांपासून योनीद्वारां रक्तस्राव न झाल्यास गुल्म फोडावा. गुल्मरोगांत जुन्या साळीचा भात, कुळीथ, जांगलमांस, शेवगा, चित्रक, मुळा या भाज्या, हिंग, डाळिंब, ताक, तूप व तेल हे पदार्थ खावे. पाणी कमी किंवा मुळीच पिऊ नये. दह्यांची निवळ ताक, किंवा मद्य यांचाच उपयोग करावा. मिताहार करावा व बेताचा व्यायाम करावा व कोणत्याहि वेगाचें धारण करू नये. पाण्याच्याऐवजी द्राक्षासव अगर कुमारीआसव (योगरत्नाकरोक्त) यांचा उपयोग करावा.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .