विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गुळदगुड- विजापूर जिल्हा. बदामी तालुक्यांतलें एक शहर. उ.अ.१६०३' व पू.रे.७५०४७' याला एक उपनगर आहे. दोन्हीची मिळून लोकसंख्या (१९११) १५२४९. येथें खण, सुती व रेशमी उत्तम कपडा तयार होतो. आसपास दगडाच्या खाणी आहेत. १८८७ पासून म्यु. क. आहे. येथें एक किल्ला आहे. तो १५८० मध्यें इब्राहिम आदिलशहानें बांधला. १७०६ मध्यें शहर बसलें १७९७ मध्यें ते टिपूनें घेतलें. १८२६ मध्यें ते इंग्रजांकडे आलें.