विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    
      
गोचीड- हा प्राणी गुरें व कुत्रें यांच्या अंगावर सांपडतो. उवा, गोचडी, माकडाची गोचीड आणि पक्ष्यांची गोचीड हे वस्तुतः निरनिराळ्या वर्गांतील प्राणी होत. या सर्वांमध्यें कांहीं गोष्टी सारख्या आहेत. अंड्यापासून त्वरित् उत्पत्ति, रुपांतराचा अभाव, आकार एकसारखा जलद वाढत जाणें व कातडीचे थर वाढत जाणें या क्रिया सर्वोसच होतात. विविध प्राण्यांवर ज्या गोचिडी होतात ते खरोखर निरनिराळ्या जातींचे प्राणी असतात.