विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गोपालपूर- गंजम जिल्ह्याचें मुख्य बंदर. उ. अ. १९० १६' व पू. रे. ८७० ५३'. किना-यानें जाणा-या बोटी येथें लागतात. निर्यात माल मुख्यत : धान्य, कातडीं, ताग, काथ्याचे पदार्थ, गळिताचीं धान्यें वगैरे. मुख्य आयात साखर, कपडा, राकेल, दारू, धातूसामान वगैरे. १९०३-४ सालीं निर्यात व्यापार १४३२००० चा व आयात २५७००० चा झाला. ब्रह्मदेशांत ७४०० लोक गेले व तेथून ८४०० आले. येथें, दोन दीपगृहें आहेत व हें बंदर बहुधा बारा महिने उघडें व चालू असतें. पण दिवसेंदिवस हें बंदर खराब होत आहे. व्यापारहि खालावत असल्यानें तें दुरुस्त ठेवण्याकरितां सरकारहि खर्च करूं इच्छित नाहीं.