विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गौतम- (१) न्यायशास्त्रकर्ता ॠषि. यास अक्षचरण किंवा अक्षपाद असें नांव आहे. (न्याय पहा). (२) शरद्वत ॠषीलाच गौतम असें म्हणतात. गौतम हा अहिल्येचा पति होय. अहिल्येस इन्द्रानें फसवून नेलें अशी कथा आहे. रजनीचें हरण, सूर्यानें केलें असा वरील कथेचा अर्थ केल्यास अहिल्या म्हणजे रजनी व इन्द्र म्हणजे सूर्य असा अर्थ होतो.