प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    
     
गौरीशंकर पर्वत- जगांतील सर्वांत उंच असा पर्वत. हें हिमालय पर्वताचें शिखर असून नेपाळांत आहे. त्रिकोणमितीनें अजमावतां ह्यांची उंची २९००२ फूट असावी असें दिसतें. कॅप्टन वुड, मेजर रायडर वगैरे शोधकांच्या एकंदर निरीक्षणावरून हिमालयांतील हेंच सर्वांत उंच शिखर आहे असें साधारणपणें निश्चत झालें आहे. त्रिकोणमितिनियमानुसार सर जॉर्ज एव्हरेस्ट नांवाच्या एका भूगोलज्ञानें या पर्वताचें निरीक्षण इ. स. १८४१ सालीं केलें. या गृहस्थाच्या स्मरणार्थ या शिखराचें नांव एव्हरेस्ट असें ठेविलें गेलें आहे.

गौ री शं क रा रो ह णा र्थ प्र य त्न.- इ. स. १९२१, १९२२ व १९२४ सालीं अनुक्रमें तीनदां गौरीशंकर अथवा एव्हरेस्ट शिखर गांठण्याचे प्रयत्न ब्रिटीश लोकांकडून करण्यांत आले. १६२५ सालीं त्यावर एक मोहीम करण्याचा अमेरिकन व जर्मन लोकांचाहि बेत आहे. हिमालयाच्या तिबेटातील बाजूचे लोक या शिखरास 'चोमोलुंगमा' (देशदेवी) म्हणतात, आणि हिमालयाच्या हिंदुस्थानाकडील बाजूस, एव्हरेस्टला 'नंदादेवी' (देवेश) अशी संज्ञा आहे.

१९२१ ची मोहीम:- कर्नल हॉवर्ड ब्यूरी यानें ही मोहीम केली व तो सिक्कीमच्या मार्गानें दार्जिलिंगहून तिबेटाकडे वळला. तारीख १६ मे रोजीं ही मोहीम निघाली. परंतु बरोबर न्यावयाचीं खेचरें नालायक ठरल्यामुळें ती अल्पकाळ रहित झाली. जुलैमध्यें या मोहिमेंतील डॉ. कैलास नांवाचां इसम मृत्यू पावला. या मोहिमेंच्या हकीगतीवरून असें कळतें कीं, १६५०० फूट उंचीवर रोंगधक नांवाच्या दरींत एक मठ असून त्या ठिकाणीं ३०० ते ४०० पर्यंत साधू व जोगिणी रहातात. कड्याखालील प्रशांत गुहेंत त्यांचें निवासस्थान आहे व तें शिखरांवरून दृग्गोचर होतें. टिंग्रीझोमहून ही प्रवासी मंडळी खोंबू नांवाच्या बर्फाच्या डोंगरांवर गेली. १९००० फूट उंच असलेल्या खोंबू घाटाच्या शिखरास वरील बर्फाच्या डोंगरावरूनच रस्ता गेलेला आहे. टिंग्रीच्या साधारणत: ओसाड अशा प्रदेशांतून ही मोहीम रोंगशाहीदरीकडे गेली. ज्यावर सूर्यप्रकाश पडूं शकतो अशा या दरीचा एक भाग कांटेरी झुडुपें व रानगुलाब यांनीं फुलून गेला होता व सावली असणा-या दुस-या  भागांत साळुंज व भूर्जवृक्ष यांचें अरण्यच बनलें होतें. उपर्युक्त दरींतून खार्ताकडे एक रस्ता आहे. खार्ता सोडल्यावर १५००० फूट उंचीचा संजुम्ल्ला घाट लागतो. तेथून १६००० फूट उंच असलेला चोगला घाट लागतो. या घाटातून निघाले म्हणजे पुढें देवद्वारवृक्ष असलेला प्रदेश दिसूं लागतो. या प्रचंड देवद्वारवृक्षांच्या खोडाचा घेर २० ते २५ फूट असतो. हा प्रदेश सोडला कीं, कामचू दरी लागते. येथील देवद्वारवृक्षांचा घेर वरीलप्रमाणेच असून कांहींचीं उंची १५० फूट असते. त्या ठिकाणचें सृष्टिसौन्दर्य अप्रतिम आहे. अरुण नांवाची दीर ७५०० फूट उंचीवर आहे. व तेथें अनेक वनस्पती व झुडुपें उगवलेलीं असतात. कामाचू दरी, एव्हरेस्ट व मकालू यांच्या बर्फाच्छादित प्रचंड कड्याला अगदीं लागून आहे. व तें स्थान अत्यंत दुर्गम आहे. २६००० फूट उंचीच्या ठिकाणाकडे जाण्याचा एक रस्ता ठरवून ही मोहिम आक्टोबरमध्यें परत फिरली.

या मोहिमेंत बारा हजार चौ. मैल इतक्या टापूची पहाणी करण्यांत आली व या कामीं कर्नल रायडर यानें १९०४ मध्यें तिबेटांत जाऊन केलेले नकाशे उपयोगी पडले. अनेक प्रदेशांचे फोटो घेऊन सर्व पाहणी झाली. ३३ अंशांइतकी थंडी असतांना २३००० फूट उंचीचा प्रदेश आक्रमितां आला. या मोहिमेस एकंदर ५००० पौंड खर्च आला.

१९२२ ची मोहिम:- जनरल ब्रूसच्या नेतृत्वाखालीं ही मोहीम मार्च महिन्यांत ऑक्सिजन वायूचें सर्व साहित्य घेऊन निघाली. प्रवासांत कांहीं वाहतुकीसंबंधीं अडथळे आले नाहींत व ऑक्सिजनच्या मदतीशिवाय २६००० फूट उंचीवर ब्रूस जाऊं शकला ही खरोखर आश्चर्योत्पादक गोष्ट होय. थोडका अवधी व हवामानाची अनिश्चतता अशा अडचणी मुख्य होत्या. नाकातोंडातील लाळ गोठून गेल्यामुळें ऑक्सिजनचा उपयोग करण्याची अडचण आली; परंतु ती ऑक्सिजनच्या यंत्रांस एक रबरी नळी जोडून व ती दातांत धरून ऑक्सिजनचा उपयोग करतां येऊं लागल्यामुळें दूर झाली. एकदां या मोहिमेंत मोठें वादळ झालें व त्या योगानें आपल्या तंबूसह ही प्रवासी मंडळी दुसरीकडे जाऊन आदळली. ऑक्सिजनच्या उपयोगामुलें २७२०० फूट उंचीचें स्थान त्यांनां गांठतां आलें. जुलैमध्यें सात असामी हिमावसरणांत गतप्राण झाले व कडक थंडीमुळें मोहीम मागें फिरली. या मोहिमेची हकीगत जनरल ब्रूस यानें आपल्या 'दि असॉल्ट ऑन माऊंट एव्हरेस्ट १९२२' नामक पुस्तकांत ग्रथित केली असून एडवर्ड अर्नोल्ड हा त्या पुस्तकाचा प्रकाशक आहे.

१९२४ ची मोहिम:- एव्हरेस्टगिर्यारोहणाचा तिसरा प्रयत्न जनरल ब्रूसच्या नेतृत्वाखालीं पुन्हां १९२४ मार्चमध्यें करण्यांत आला. कॅप्टन नोएल यानें या मोहिमेंत सिनेमा फिल्म्स घेतल्या व डॉ. सोमरेव्हेल यानें तिबेटी गाण्याची माहिती मिळविली. सहा जुने व सात नवे लोक या मोहिमेंत असून तीन्ही मोहिमेंत मॅलरी हा गृहस्थ हजर होता. प्रारंभींचा प्रवास यशस्वी झाला; नंतर हवामानांत एकदम फरक पडला. एक असामी ठार झाला व चौघांनीं बर्फमय प्रदेशांतील रस्ता पाहूनच हातपाय गाळले. जूनमध्यें मॅलरी व आयर्व्हिन थंडीमुळें ठार झाले; हे दोन गृहस्थ कदाचित् एव्हरेस्ट नजीक गेले असावे. ही मोहिम जूनमध्यें परतली.

एकंदर निष्कर्ष:- (१) अत्युच्चस्थळीं गेल्यानें मनुष्यावर होणारे परिणाम अनेक स्वरूपाचे आहेत. ऑक्सिजनच्या साह्यानें १९२४ मध्यें २८२२७ फूट उंचीवर जाणें शक्य झालें, ऑक्सिजनशिवाय २८१२८ फूट उंचीचें ठिकाण मनुष्यांस गाठतां आलें. उंच मनुष्य फारसा थकत नाहीं. परंतु खुजा मनुष्य मात्र थकतो. लांबलचक असून ज्याचा पोटाचा आकार लहान आहे असा मनुष्य या मोहिमेला योग्य असतो. फार उंचावरचें हवामानहि अंगवळणीं पडतें, असा अनुभव आहे. तथापि थकवा मात्र अतिशय येतो ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे. अत्यंत उंचीवर असलेल्या प्रदेशांतून जातांना घसा बसतो, तहान लागते व पुढें दर पालागणिक दहा वेळां दम घेणें जरूर असतें. १९२२ च्या मोहिमेंतील अनुभवावरून असें आढळून येतें कीं, मनुष्यास अत्युच्च ठिकाणींहि झोंप लागते. (२) जेथें वनस्पतीहि उगवूं शकत नाहीं अशा उंच ठिकाणीं प्राणी राहूं शकतो. १२००० फूट उंचीवर एक लहानसा काळा कोळी आढळला होता. रोगबक नामक बर्फाच्या डोंगरावर एक करड्या रंगाचा कोळी व कांहीं पतंग आढळले. २१००० फूट उंचीवर एक फुलपाखरूं आढळलें व ३००० फूट उंचीच्या ठिकाणीं एक मधमाधी आढळल्याचें सांगतात. कावळ्यासारखा एक पक्षी २४००० ते २७००० फूट उंचीच्या प्रदेशांतून भरा-या मारतो. १५००० फूट उंचीवर मुंग्या आढळतात. हिमालयावरील वनस्पतीवर उपजीविका करून असणारे सशाएवढे व उंदराच्या किंवा खारीच्या जातीचे प्राणी २०००० फूट उंचीवर आढळतात. खारीहि त्यांच ठिकाणीं आढळतात. २०००० फुटांपेक्षांहि जास्त उंच असलेल्या ठिकाणीं मनुष्याच्या पावलांसारखीं पावलें उमटलेलीं दिसून येतात. केसाळ जंगलीं माणसांची हीं पावलें असावीं असें म्हणतात. तथापि वबून जातीच्या वानरांचीं तीं पावलें असावीं हेंच जास्त संभवनीय दिसतें. (३) १८००० फुटांपेक्षां जास्त उंचीवर वनस्पति असल्याचें आढळत नाहीं. (४) सर जॉर्ज एव्हरेस्ट यानेंच प्रथम एव्हरेस्टची उंची अजमाविली व ती २९००२ फूट आहे असें त्याचें मत आहे. परंतु गौरीशंकर अथवा एव्हरेस्ट शिखरांची उंची अलीकडे घेतलेल्या मापनावरून २९१४१ फूट आहे असें समजतें.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .