प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
          
ग्वाटेमाला, वि भा ग.- या नांवानें सध्यां फक्त ग्वाटेमाला या प्रजासत्ताक राज्याचा व त्याच नांवाच्या शहराचा बोध होतो. पण पूर्वीं हें नांव स्पॅनिश अमेरिकेच्या एका विभागास दिलें होतें. यांत एकंदर पंधरा प्रांत होते. त्यापैकीं चिआपास, सूचीटेपीक्यूस, सॉन्सोनेट हे प्रमुख होत. थोडक्यांत या नांवानें पनामाखेरीज करुन बहुतेक सर्व मध्यअमेरिका व मेक्सिकोचा कांहीं भाग यांचा बोध होत असे. ग्वाटेमाला या शब्दाचा अर्थ 'जंगलाची जमीन' असा कांहीं जण करतात.

ग्वाटेमालाचें प्रजासत्ताक राज्य उ. अ. १३ ४२' ते १७ ४९' व पू. रे. ८८ १०' ते ९२ ३०' यांमध्यें वसलेलें आहे. याची लो. सं. इ. स. १९०३ सालीं १८४२१३४ होती क्षेत्रफळ ४८१९० चौरस मैल आहे.

याच्या उत्तरेस व पश्चिमेस मेक्सिको, ईशान्येस ब्रिटिश हॉन्डुरास, पूर्वेस हॉन्डुरासचें आखात व हॉन्डुरासचें प्रजासत्ताक राज्य, आग्नेयीस सॅल्व्हाडॉर आणि दक्षिणेस पॅसिफिक महासागर आहे. या प्रांताची मेक्सिकोकडील सरहद्द ८ मे इ. स. १८९९ रोजीं भरलेल्या परिषदेंत निश्चित झाली. या प्रांताचे स्वाभाविक पांच विभाग पडतात. (१) पॅसिफिक महासागराच्या किना-यालगतचा सखल प्रदेश, (२) सिएरा मॅड्रेमधील ज्वालामुखी पर्वत, (३)या पर्वतांच्या उत्तरेंस असलेलें पठार (४) अटलांटिक महासागराकडील पर्वत व (५) पेटनचें मैदान.

न द्या.- प्रांतात ब-याच नद्या आहेत. सिएरा पर्वताच्या पश्चिमेकडील भागांत जरी नद्या ब-याचशा आहेत तरी पण त्या लहान आहेत. परंतु पूर्वेकडे ब-याचशा नद्या असून त्या मोठ्याहि आहेत. मॉन्टेग्युआंतील रायोग्रॅन्डौ नांवाची नदी सुमारें २५० मैल लांब असून ती राजधानीपासून जवळ जवळ ९० मैल पर्यंत नौकानयनाजोगी आहे. पॉलोचिक नांवाची १८० मैल लांबीची दुसरी एक नदी असून ती टेलेमान बंदराच्या वरच्या बाजूस सुमारें २० मैल पर्यंत नौकानयनास योग्य आहे. चेक्सॉय, ग्वाडेल्यूप व रायोडीला पॅशन व इतर कांहीं नद्या मिळून उसुमॅसिंन्टा नदी होते.

स रो व रें:- या प्रांतात विस्तृत सरोवरेंहि बरीचशीं आहेत. पेटनचे सरोवर २७ मैल लांब व १३ मैल रुंद आहे. पश्चिमेकडील एका बेटांत फ्लोअर्स नांवाचें सरोवर आहे. त्याच्या कांठावर जोबित्सिनाळची गृहा असून स्थानिक उत्सवासाठीं तें स्थान प्रसिद्ध आहे. या तळ्यांत कॉर्टिस याच्या घोड्याचा दगडी पुतळा अजूनहि दिसतो अशी आख्यायिका आहे याशिवाय तें गोल्फोडलसे नांवाचें एक गोड्या पाण्याचें सरोवर आहें; हें सुमारें ३६ मैल लांब आहे. राजधानींच्या दक्षिणेकडे सुमारें ९ मैलांवर अँमॉहिटलॉन नांवाचें सरोवर आहे. याशिवाय समुद्रसपाटीपासून अजमासें २१०० फूट उंचीवर ग्वीजा नांवाचें २० मैल लांब व १२ मैल रुंद असें सरोवर आहें. तेथें नाना त-हेचे पक्षी असून त्यांतील एका सुंदर पक्ष्याची 'राष्ट्रचिन्ह' म्हणून योजना करण्यांत आली आहे.

ह वा.- समुद्रकिनारा खेरीजकरुन इतर भागांत हवा आरोग्यकारक आहे. समुद्रकांठच्या प्रदेशांत मात्र सांथीचा ताप (मलेरिआ) असतो. मध्यप्रदेशांत पावसाळा मे महिन्यापासून आक्टोबरपर्यंत असतो; समुद्रकिना-यावर मात्र कित्येक वेळा डिसेंबर पर्यंत लांबतो.

येथें सोनें, चांदी, शिसें, कथील, तांबें, पारा, कोळसा, क्षार आणि गंधक वगैरे खनिज पदार्थ सांपडतात. लासक्वेब्राडास येथें सोनें सांपडतें.

इ. स. १९०४ सालीं येथील जंगल सुमारें २०३० चौरस मैल होतें. येथे रबर व ब-याच त-हेचें लांकूड सांपडतें. फळें, धान्य व औषधोपयोगी वनस्पती येथें विपुल आहेत. याशिवाय या प्रांतांत कॉफी, कोको, ऊस, नारिंगें, तंबाखू, नीळ वगैरे बरेच पदार्थ उत्पन्न होतात.

लो क व स्ती.- या देशांत जननाचें प्रमाण अधिक असून मृत्यूचें प्रमाण कमी आहे. यामुळें लोकसंख्या सारखी वाढत आहे. याच प्रमाणें परदेशीं जाणारे लोक देखील येथें थोडे आहेत. १९०३ सालीं येथील लोकसंख्या १८४२१३४ अथवा मध्यअमेरिकेच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश होती. १९१४ सालीं ती २००३५७९ भरली. शेंकडा ६० लोक तद्देशीय रहिवाशी असून बाकींचे लॅटिन्स म्हणून ओळखले जातात. या लोकांची भाषा व रहाणी स्पॅनिश धर्तीची आहे. येथें सुमारें १२००० परदेशीय लोक आहेत. त्यांत युरोपियन, अमेरिकन व ज्यू हे प्रमुख होत. तद्देशीय लोकांच्या संततीपैकीं सुमारें अर्धे व श्वेतवर्णीय संतातीपैकीं सुमारें एकतृतीयांश अनौरस असतात.

येथें सुमारें अठरा भाषा प्रचारांत आहेत. येथील इंडियन लोक मय जातीपैकीं आहेत. सोळाव्या शतकांत मय व क्विशेन ह्या जाती सुधारलेल्या म्हणून गणल्या जात होत्या. बाह्यतः येथील निरनिराळ्या लोकांत फारच थोडा फरक द्दष्टोत्पांस येतो. हे इंडियन लोक साधारणपणें ठेंगणे पण मजबूत बांध्याचे आहेत. यांचें कपाळ अरुंद असून गालाची हाडें पुढें आलेलीं दिसतात व त्याचें केस सडक व काळे असतात. स्वभावातः हे लोक शांताताप्रिय आहेत. परंतु स्थानिक राजकारणांत वारंवार ढवळाढवळ करणा-या अनेक क्रान्त्यांत त्यांनीं भाग घेतला आहे. हे लोक अतिशय धार्मिक आहेत. ते साधारणपणें उधळे, आळशी व जुवेबाज आहेत. सार्वजनिक उत्सव, नाच, गाणें व नाटकें करणारे असे 'बंधुसमाज आहेत.त्यांचीं नाटकें धार्मिक व ऐतिहासिक असतात. त्यांनां बैलांच्या टंकरीचा व कोंबडीं झुंजविण्याचा नाद आहे. ते मानप्रिय असून स्पॅनिश सारंगीवर गातात. गंधकयुक्त अशी पिवळट रंगाची माती खाण्याचा त्यांच्यात प्रघात आहे. पगाराच्या दिवशीं व सणाच्या दिवशीं ते अतिशय दारु पितात.

मु ख्य श ह रें.- ग्वाटेंमाला हें शहर राजधानीचें असून १९१० सालीं येथील लोकसंख्या ९०००० होती. याशिवाय इतर प्रमुख शहरें, क्वेझॅलटेनँगो, टोटोनिकॅपम, कोबॅन, सोलोला व एक्विंटला हीं होत. लिव्हिंग्जटन हें बंदर आहे.

नौ का न य न व द ळ ण व ळ णा चीं सा ध नें.- न्यूयॉर्क, न्यू आर्लिन्स हॅम्बर्ग वगैरे ठिकणांशीं ग्वाटेमालाचें दळणवळण आगबोटींनीं होतें. मोठमोठीं शहरें एकमेकांशीं रस्त्यांनी जोडलेलीं आहेत. आणि ह्या रस्त्यांची डागडुजी वगैरे करिता प्रत्येक पुरुषानें दोन पेसॉस दिले पाहिजेत अगर त्याऐवजीं चार दिवस काम केलें पाहिजे असा नियम आहे. कित्येक सडकाहि आहेत. पण बहुतेक माल खेचरांच्या पाठीवरुन नेतात. सर्व आगगाडीचें रस्तें इ. स. १८७५ पासून बांधण्यांत आले आहेत. मध्यअमेरिकेची सार्वराष्ट्रीय रेल्वेसंस्था १९२१ सालीं स्थापण्यांत येऊन तिच्या वतीनें ग्वाटेमाला रेलवे (१९५ बैल), ग्वाटेमाला सेंट्रल रेलवे (१३९ मैल) वगैरे गाड्या देशांतून जातात. ग्वाटेमाला 'टपाल' संघात इ. स. १८८१ सालीं सामील झालें. येथील सर्व ध्वनिवाहक यंत्रें (टेलीफोन) खाजगी मंडाळांच्या मालकीची आहेत. १९१७ त ४२३ पोष्ट ऑफिसें, ४३३७ मैलांच्या तारा व ५३१ मैलांचे टेलिफोन होते.

व्या पा र व धं दे.- येथें कच्चे पदार्थ विपुल आहेत. पण त्यांत वाढ होण्यास अजून बरीच जागा आहेत. पण त्यांत वाढ होण्यास अजून बरीच जागा आहे. या देशांत लढाया, क्रांत्या व आर्थिक आपत्ती वारंवार येत असल्यामुळें पुरेसे भांडवल मिळत नाहीं. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीं या देशाचा निर्गत व्यापार मुळींच नव्हता. इ. स. १८२५ ते १८५० च्या दरम्यान येथून किरमिजी रंगांकरितां बरीच वनस्पति निर्गत होत असे पण शास्त्रीय पद्धतीनें तयार केलेल्या रंगापुढें तिचा टिकाव न लागल्यामुळें पुढें हा व्यापार बंद पडला.

या व्यापाराची जागा लवकरच कॉफीच्या व्यापारानें भरुन काढली. परदेशीय व्यापाराच्या चढाओढींत कापसाचा व निळीचा व्यापार टिकाव धरुं शकला नाहीं.

इ. स. १८९४ च्या जमिनीच्या कायद्याप्रमाणें येथील जमिनीचे कित्येक भाग विक्रीकरितां काढले होते. परदेशीय लोकांस जमिनी फुकट देण्यांत आल्या. मळेवाल्यांकडे नोकर असलेल्या इंडियन लोकांची स्थिती गुलामगिरीच्या तोडीची आहे. कारण मळेवाले मजूरास पैसे अगाऊ देतात. हे  लोक आपली कमाई तात्काळ खर्च करुन टाकतात व पुढें कर्ज काढतात आणि या कर्जाची फेड नोकरी करुन करावयाची असते.

येथें दारुचे, साखरेचे व तंबाखूचे कारखाने आहेत. या शिवाय कापसाचे व लोकरीच्या कापडाचेहि कारखाने आहेत. १९१७ सालची आयात व निर्गत अनुक्रमे १७९८३१४ व १५६१९४६ पौंड होती.

जमाबंदी- १९१८ सालीं नॅशनल असेब्लीनें एक बँक (नॅशनल बँक) उघडली. याखेरीज खासगी मोठ्या ४ बँका येथें आहेत. १९१७-१८ सालची जमाबंदी व खर्च अनुक्रमे १३५४७१५८५ डॉलर व १३१४१३२१८ डॉलर होता.

रा ज्य व्य व स्था.- इ. स. १८७९ सालीं येथील राज्यव्यवस्था ठरविण्यांत आली. ह्यावर इ. स. १८८५, १८८७, १८८९ व १९०३ या सालीं तींत सुधारणा करण्यात आली. या कायद्याप्रमाणें कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रीय सभेस देण्यांत आला आहे. या कायदेकारी मंडळांत ६९ प्रतिनिधी असतात (प्रत्येक २००००स एक याप्रमाणें); ते चार वर्षांकरितां लोकांनीं निवडलेले असतात. या निवडणुकींत मताधिकार सर्वांनां असतो. या मंडळाचा अध्यक्षहि याचप्रमाणें निवडलेले असतात. या निवडणुकींत पुन्हां उमेदवार म्हणून उभा राहुं शकत नाहीं. त्याला सहा मंत्र्यांची मदत असते. यांपैकीं प्रत्येकजण निरनिराळ्या खात्याचा मुख्य असतो. याशिवाय त्यास १३ जणांचें राष्ट्रीय सल्लागार मंडळ (कौन्सिल ऑफ स्टेट) मदत करण्यारितां असतें. यांतील कांहीं सभासद अध्यक्षानें व कांहीं कायदेकारी मंडळानें नेमिले असतात.

स्था नि क रा ज्य व्य व स्था.- यांत एकंदर २१ खाती असतात. प्रत्येक खात्यावर एक वेगळा अधिकारी असतो. याचे निरनिराळे जिल्हे पाडलेले असतात. प्रत्येक जिल्ह्यावर मेयर (अध्यक्ष) असतो. त्याला मदत करण्याकरितां एक मंडळ असतें. हें मंडळ आणि अध्यक्ष लोकांनीं निवडलेला असतो.

न्या य खा तें.- येथील दिवाणी अधिकार सदर अदालतीस दिलेला आहे. यांत एक सर न्यायाधीश व याला मदतीस म्हणून चार लोकनियुक्त न्यायाधीश दिलेले असतात. या सहा अपील कचे-या असून प्रत्येकीवर लोकनियुक्त तीन न्यायाधीश असतात.

याशिवाय येथें एकदंर २६ कनिष्ठ दर्जाच्या कचे-या आहेत. या प्रत्येकीवरील न्यायाधिशांपैकीं एक अध्यक्षानें व दोन वरिष्ठ कोर्टाच्या सरन्यायाधिशानें नेमलेले असतात.

ध र्म आ णि शि क्ष ण.- रोमन कॅथोलिक हा प्रचलित धर्म येथें आहे. १८९३ सालीं लोकसंख्येपैकीं शेंकडा ९० लोकांना लिहितावाचतां येत नसे; शेंकडा २ लोकांस फक्त वाचतां येत असे आणि शेंकडा ८ लोकांस लिहिता व वाचतां येत असे. मुलांना ६-१४ वर्षें वयापर्यंत प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचें आहे. १९१७ सालीं येथें एकंदर १९४२ सरकारी शाळा होत्या; पैकीं १८ किंडरगार्टन, ४९२ मुलांच्या प्राथमिक व ५१६ मुलींच्या प्राथमिक शाळा, ३४ मुलींसाठीं ट्रेनिंग शाळा, ४९ मजुरांसाठीं रात्रीच्या शाळा, ३ कलाशिक्षणाच्या शाळा व ३१७ खेड्यांतील शाळा होत्या. उच्च प्रतीचें शिक्षण राजधानीतील दोन राष्ट्रीय संस्थांतून दिलें जातें. या शिवाय धंदेशिक्षणाकरितां (उदा. कायदा, वैद्यक, यंत्रशास्त्र) खाजगी संस्था आहेत. १९१८ त ग्वाटेमाला विश्वविद्यालयाची स्थापना झाली.

सं र क्ष ण.- श्वेतवर्णीय व मिश्र लोकांकरितां लष्करी शिक्षण सक्तीचें आहे. अठरा तें तीस वयाचा पुरुषांस चालूं लष्करांत सामील करण्यांत येतें व तीस ते पन्नास वयाच्या पुरुषांस राखीव सैन्यांत सामील करण्याची पद्धत येथें आहे.

इ ति हा स.- हा देश स्पॅनिश लोकांनीं इ. स. १५२२ व १५२४ च्या दरम्यान काबीज केला. या लोकांनीं येथें रोमन कॅथोलिक धर्माचा  प्रसार केला व स्पॅनिश भाषा प्रचारांत आणिली.

प्रारंभीं या देशांत निराळ्या पक्षांचे लोक होते. त्यांत संयुक्त प्रजासत्ताक राज्यपद्धतीच्या विरुद्ध असलेला एक पक्ष आस्तित्वांत होता. त्यानें संयुक्त प्रजासत्ताक राज्यपद्धति उलथून पाडून लोकसत्ताक राज्यपद्धति अस्तित्वांत आणिली. संयुक्त प्रजासत्ताक राज्यपद्धतीच्या पुरस्कर्त्यांनीं ती अमलांत आणण्याकरितां अनेक वेळां प्रयत्न केले. पण ते अयशस्वी झाले. इ. स. १८५१ सालीं येथें एक नवीन त-हेची राज्यव्यवस्था अमलांत आली व तीप्रमाणें कॅरेरा यास अध्यक्ष नेमले व पुढें इ. स. १८५४ मध्यें कॅरेरा यानें आमरण अध्यक्ष असावें असें ठरलें.

कॅरेरा यास आपलें पद अढळ राखण्याकरिता लढावें लागलें पण शेवटीं तोच यशस्वी झाला. कॅरेराच्या मागून सेनापती केने हा अध्यक्ष झाला. पण इ. स. १८७० च्या सुमारास उदारमतवादी पक्ष प्रबल होत चालला व शेवटी रुफीनो बॅरिऑस (१८३५-१८८५) यास १८७३ सालीं अध्यक्ष निवडण्यात आलें. जरी त्यानें शिक्षण, आगगाड्या व उद्योगधंदे यांस अनेक प्रकारें मदत केली व मेक्सिकोची सरहद्द ठरविली तरी पण त्याची कारकीर्द लोकांस दुःखकारकच झाली. याच्यामागून मॅन्युअल बॅरिआस हा  अध्यक्ष झाला. या वेळीं तात्पुरती शांतता झाली पण शेवटीं खून व क्रांती हे हेतू असणारे कट झाले.

इ. स. १८९२ सालीं जोसे मेरिआ रीना बॅरिऑस यास अध्यक्ष निवडण्यांत आलें. पण ता. ८ फेब्रवारी १८९८ रोजीं तो मारला गेला. उपाध्याक्ष सेनॉर मॉरेल्स हा अध्यक्ष झाला; पण त्याच वर्षीं इस्ट्रडा कॅब्रेरा यास १९०५ पर्यंत अध्यक्ष निवडलें. कॅब्रेरा यानें शिक्षण व व्यापाराची वाढ केली आणि दळणवळणाच्या साधनांची सुधारणा केली.

इ. स. १९०५ पासून १९११ पर्यंत त्यास पुन्हां अध्यक्ष निवडलें पण त्यामुळें बराच असंतोष माजला. माजी अध्यक्ष बॅटिलास यानें सॅनँफ्रँन्सिस्को येथील कित्येक साहसी लोक जमा केले व १९०६ सालीं मेस्क्सिकोमधून ग्वाटेमालावर स्वारी केली. बॅटिलॉस यानें चांदीचें नाणें प्रचारांत आणण्याचा आपला मनोदय प्रकट केला व त्यामुळें त्याला ब्रिटिश व जर्मन रहिवाशांची सहानुभूति मिळाली. बॅटिलॉसच्या लोकांनीं ऑकास हस्तगत केलें; पण कॅब्रेरा यानें आपली जागा यत्किंचिताहि न सोडतां कित्येक जय मिळविले. पण अमेरिकन अध्यक्ष रुझवेल्ट व मेक्सकोचा अध्यक्ष डिआझ हे मध्यें पडल्यामुळें ता. १९ जुलै रोजीं तात्पुरती लढाई थांबली. शेवटीं ता. २८ सप्टेंबर रोजीं कायमचा तह करण्यांत आला. या तहांत लढाईच्या भागांत व्यापार व नौकानयनससंबंधीं सुधारणा करण्याची अट होतीः आणि यापुढें कोणत्याहि भानगडीचा निकाल संयुक्त संस्थान व मेक्सिको यांच्या मध्यस्थीनें लावण्याचें ठरलें.

[संदर्भग्रंथ.- सरकारी रिपोर्ट; ब्रिग्हॅम-ग्वाटेमाला; कीन-सेंट्रल अँड साऊथ अमेरिका; विंटर-ग्वाटेताला अँड हर पीपल टु डे, बोस्टन १९०९]

श ह र.- हें ग्वाटेमाला प्रजासत्ताक संस्थानाची राजधानी आहे. हें शहर सुमारें ५००० फूट उंचीच्या अफाट पठारावर वसलेलें असून याची एकंदर लोकसंख्या सुमारें ९०००० आहे. 'काऊ' नांवाची नदी या पठारावर आडवी वहात जाते. या पठाराच्या कडेकडेने ब-याच खोल द-या असून त्याच्या पलीकडे चोहोंबाजूस उंच पर्वतओळी आहेत. पर्वतांतील सर्वांत उंच अशीं शिखरें दक्षिण बाजूस आहेत. व्यापाराच्या द्दष्टीनें हें शहर महत्वाचें आहे. मुख्यतः कॉफीचा व्यापार येथें चालतो. याखेरीज रेशीम, सूत, सिगारेट्स, काडी जिन्नस, दारु वगैरेसंबधीं बरेच कारखाने आहेत. परदेशाचा व्यापार बहुतेक जर्मनांच्या हातीं असतो. शहराचे रस्ते रुंद व व्यवस्थिम असे असून रस्त्यांच्या कडेकडेनें शोभेकरितां व सोयीकरितां मोठीं झाडें लाविलीं आहेत. शहराच्या आसपास बरींच खेडीं वसलेलीं आहेत. घरें प्राय: एकमजली असून मजबूत व सोयीचीं अशीं आहेत. घरांभोंवतीं बगीचें खेळण्याच्या जागा वगैरे असतात. येथील ''प्लाझा मेयर'' नांवाचें मोकळें मैदान पाहण्यासारखें असून येथें ख्रिस्ती देवालय, सरकारी कचे-या, टांकसाळ वगैरे इमारती आहेत. ''रीफार्मा पार्क'' व ''प्लाझा डी ला कांकर्डिया'' हे दोन रमणबाग (अगर पार्क) प्रसिद्ध आहेत. शहरांत शालागृहें, रुग्णालयें, अनाथवसतिगृहें, पदार्थसंग्रहालय वगैरे आहेत. येथील नाटकगृह मध्यअमेरिकेंत अप्रतीम असें आहे.

येथील दोन किल्ले (कॅस्टेलो गेटॅमोरोस व कॅस्टेलो डीसान जोसे) प्रेक्षणीय आहेत. शहरांत विजेचे दिवे, टेलिफोन वगैरेंची सोय केलेली आहे. वाढतें महत्व व नगररचना या द्दष्टीनें हें शहर मध्यअमेरिकेंतील ''पॅरिस'' समजलें जातें.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .