प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे 
         
ग्वायना- हें नांव दक्षिण अमेरिकेच्या ईशान्येकडील उ. अ. ८ ४०' ते द. अ. ३ ३०' व पू. रे. ५० ते ६८ ३०' यांवर असलेल्या प्रदेशाला दिलें आहे. याची लांबी केबोडीनोटेंपासून रायोक्साय व रायो नीग्रो या नद्यांच्या संगमापर्यंत १२५० मैल व रुंदी बॅरिमा पॉइंटपासून रायोनिग्रो व अँमॅझॉन नद्यांच्या संगमापर्यंत ८०० मैल आहे. क्षेत्रफळ ६९०००० चौरस मैल आहे. या प्रदेशात व्हेनेझुएलिअन ग्वायना, ब्रिटिश ग्वायना, डच ग्वायना, व फ्रेंच ग्वायना हे प्रदेश आहेत. पैकीं ब्रिटिश, फ्रेंच व डच ग्वायना याचें वर्णन येथें केलें आहे.

इ ति हा स.- १४९८ मध्यें कोलंबसला ग्वायनाचा समुद्रकिनारा दिसला व त्यानें ट्रिनिदाद बेट व पेरिआचें द्वीपकल्प शोधून काढिलें; पुढल्या वर्षीं आर्लेंझो डिओजेडा व अँमॅरिगो व्हेस्पुसी यांनीं शोध लावला. व्हिन्सेंट यानेंझ पिझॉन यानें अँमेझॉन नदीचा शोध लावला. काबीज केलेल्या जहाजांत सापडलेल्या पत्रांवरुन सर वाल्टर रॅले १५९५ मध्यें एलडोरॅडो अथवा 'सुवर्णनगरी' याच्या शोधाकरितां अँमेझॉन नदी उतरुन गेला. इ. सन १५९८ मध्यें प्रथम डच लोक ग्वायनामध्यें आले. १६१३ मध्यें डॅमेरेरा व एसेक्विबोच्या समुद्रकिना-यावर डचांच्या तीन चार वसाहती होत्या. १६१६ मध्यें झीलंडर लोक किक ओवर आल नावांच्या लहानशा बेटांवर वसाहत करुन राहिले होते. ज्यावेळीं डच व्यापारी एसोक्विवो व डेमेरॅरामध्यें ठाणें बसविण्याची खटपट करीत होत याच वेळीं इंग्लिश व फ्रेंच व्यापारी ओयॅपॉक नदीवर कायेली व सुरिनाममध्यें वसाहत करण्याचा प्रयत्न करीत होते. डच ईस्ट इंडिया कंपनीनें एसोक्विवोचा ताबा मिळवून १७९१ पर्यंत या लोकांनीं येथें सत्ता चालविली. १६२४ मध्यें बर्बाइस नदीमध्यें एक डच वसाहत झाली व हीपासून बर्बाइस नांवाची एक स्वतंत्र वसाहत झाली. १६५७ मध्यें झींलडर लोकांनीं पोमेरुन, मोरुका व डेमेरॅरामध्यें व आपला पाय कायमचा रोंविला; व १६७४ मध्यें डच लोक सध्यां ज्याला ब्रिटिश व डच ग्वायना म्हणतात त्या सर्व प्रदेशांत वसाहत करीत होते. १७८१ मध्यें डेमेरॅरा, एसेक्विबो व बर्बाइस या तिन्ही वसाहती ब्रिटिशांनीं घेतल्या. परंतु १७८२ मध्यें फ्रेंचांनीं त्या घेऊन १७८३ मध्ये हॉलंडला परत दिल्या. १७९६ मध्यें ब्रिटिशांनीं पुन्हां या वसाहती घेतल्या व १८०२ पर्यंत त्या आपल्या ताब्यात ठेविल्या व पुन्हा हॉलंडला दिल्या. १८०३ मध्यें ग्रेटब्रिटननें त्या पुन्हां काबीज केल्या व ह्या वेळेपासून ब्रिटिश ग्वायनाच्या इतिहासास सुरुवात झाली.

ब्रि टि श ग्वा य ना.- ब्रिटिश ग्वायना हा दक्षिण अमेरिकेंतील ब्रिटिश लोकांचा मुलूख आहे. हा १८१४-१८१५ मध्यें दिला गेला. याचे बर्बाइस, डेमेरॅरा व एसेक्विबो असे तीन विभाग आहेत. १८४० मध्यें सर रॉबर्ट स्कोम्बर्ग यानें व्हेनेझुएला व ब्रिटिश ग्वायना यांच्यामध्यें एक सरहद्दीची रेषा सुचविली होती. हिला स्कोम्बर्ग लाइन म्हणतात. या हद्दीच्या प्रश्नाचा निकाल आंतरराष्ट्रीय कमिशननें केला व १९०२ मध्यें ब्रिटिश ग्वायना व ब्राझिल यांच्यामधील सरहद्दीच्या प्रश्नाचा निकाल इटलीच्या राजाच्या मध्यस्तीमुळें लागला. ब्रिटिश ग्वायननें क्षेत्रफळ ८९४८० चौ. मैल आहे.

शहरें:- ब्रिटिश ग्वायनाची राजधानी जॉर्ज टाऊन हें शहर आहे. हे डेमेरॅरा नदीच्या उजव्या तीरावर असून याची लोकसंख्या सुमारें ५०,००० आहे. न्यु अँमस्टरडॅम हे बर्बाइस नदीच्या उजव्या तीरावर असून याची लोकसंख्या सुमारें ७५०० आहे. प्रत्येक शहरांत एक मेयर असून कौन्सिल आहे व यांनां कर बसविण्याचा अधिकार आहे. एकोणीस खेडी व स्थानिक स्वराज्याचा हक्क असलेलीं दुसरी दहा क्षेत्रें आहेत. यांचा कारभार खेड्यांतील कौन्सिल व अधिकारी चालवितात.

लोकसंख्या:- १९११ मध्यें येथील लोकसंख्या २९६००० (मूळचे रानटी लोक सोडून) होती. मूळचे रहिवाशी यांची संख्या १३००० होती.

ग्वा य नां ती ल हिं दी म जू रः- या वसाहतींत एकंदर मजूर पुष्कळ आहेत. ईस्ट इंडियन मजूर एकंदर ६०/७० हजार आहेत. आणखी हिंदी लोक यावेत अशी वसाहत सरकारची इच्छा दिसते.

इ. स. १८३८ पर्यंत येथें गुलामगिरीची पद्धत चालू होती. त्यानंतर मुदतबंदीच्या मजुरांची पद्धत चालू होऊन एक प्रकारें गुलामगिरीच चालू ठेवण्यांत आली होती. ही मुदत बंदीची पद्धत इ. स. १९१७ सालीं कायद्यानें नष्ट करण्यांत आली. इ. स. १८३८ सालीं हिंदुस्थानांतील मुदतबंदीचे मजूर घेऊन हिंदुस्थानचें पहिलें जहाज तेथें गेलें. तेव्हांपासून मुदतबंदीच्या कारारावर दरवर्षीं हिंदुस्थानांतून मजूर जात असत व त्यांतील कांहीं लोकांनीं पुढें तेथेंच वस्ती केली. पण इ. स. १९१७ पासून   मुदतबंदीची पद्धत बंद झाल्यामुळें हिंदुस्थानांतून थेट ब्रिटिश ग्वायनांस जाणा-या बोटी बंद झाल्या आणि हिंदुस्थानचा व या वसाहतींचा संबंध तुटल्यासारखा झाला. हल्ली या वसाहतीकडे जावयाचें असल्यास प्रथम इंग्लंडला जावें लागतें व तेथून ग्वायनाची बोट मिळते. कलकत्ता, मुंबईहूनहि ग्वायनाला जाणारी एखादी बोट कधीं काळीं मिळते. हा संबंध पुन्हां जोडण्याची ग्वायनाच्या सरकारची खटपट चालू आहे.

सरकारी मदत घेऊन हिंदुस्थानांतील कांहीं लोकांनीं ब्रिटिश ग्वायनामध्यें राहण्यास जावें अशा अर्थाची एक वसाहतीची योजना हिंदुस्थान सरकारपुढें विचारार्थ ठेवण्याकरिता स. १९१९ अखेर एक ब्रिटिश ग्वायना येथील शिष्ट मंडळ इकडे आलें होतें. इतर ब्रिटिश प्रजाजनांप्रमाणें हिंदी लोकांचा फायदा होईल किंवा नाहीं आणि त्यांचा योग्य दर्जा ठेवण्यांत येईल किंवा नाहीं या प्रश्नांसंबंधीं खात्री करुन घेण्याकरितां व तेथील स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करण्याकरितां हिंदुस्थान सरकारच्या कमिटीनें एक शिष्ट मंडळ ग्वायनास पाठविलें. देशांतर करणा-या हिंदी लोकांस समान राजकीय हक्क आम्हीं खुषीनें देऊं असें वसाहत सरकारनें १९२१ सालीं प्रसिद्ध केलें. १९२२ च्या एप्रिलमध्यें हिंदुस्तान सरकारनें, ग्वायनहून परत स्वदेशीं आलेल्या ११६ हिंदी लोकांना व त्याचप्रमाणें इतर वसाहतींतून परत आलेल्या १६७ इसमांनां पुनः ब्रिटिश ग्वायनास परत जाण्याची मंजूरी दिली. ब्रिटिश ग्वायना सरकारनेंहि लोकांच्या वाटखर्चाची व ते तेथें पोचतांच त्यांच्या निर्वाहाच्या साधनांची हमी घेतली. अशा रीतीनें डॉ. नूनन व बँ. लक्कू यांची योजना १९२४ सालापर्यंत तरी यशस्वी झाली; व त्याच वर्षीं जून महिन्यांत वरील गृहस्थ स्वदेशीं जाण्यास निघाले. हिंदुस्थानांतील प्रतिनिधीनें रिपोर्ट केल्यावर वसाहतीच्या योजनेची शिफारस करण्याचें येथील कायदे कौन्सिलच्या एमिग्रेशन कमिटीनें ठरविलें.

एप्रिल १९२४ मध्यें मजुरांचा मोठा दंगा झाला. तारीख १ एप्रिल १९२४ रोजीं धक्क्यावरील नीग्रो कामक-यांनीं संप केला व दंग्यास सुरुवात झाली. संप करण्याबद्दल व जॉर्ज टाउन येथें जाऊन अधिक वेतन मिळविण्याच्या चळवळींत भाग घेण्याबद्दल डायमंड व प्रॉव्हिडन्स येथील ईस्ट इंडियन मजुरांचें मन चळवळ्या लोकांनीं वळविलें. जबरदस्तीनें दंगे थोपविण्यांत येतील असे जाहिरनामे ठिकठिकाणीं वाचण्यांत आले; तथापि ईस्ट इंडियन मजुरांनीं शहरांत प्रवेश केला. पोलिसांवर हल्ले झालें, त्यावेळीं गोळीबाराचा हुकूम देण्यांत आला, त्यामुळें नऊ ईस्टइंडियन मजूर ठार झाले आणि बारा जणांना जखमां झाल्या.

भौगोलिक रचना:- ब्रिटिश ग्वायनोच भूपृष्ठभागाच्या विशिष्ट लक्षणांवरुन चार भाग करतां येतील (१) सपाट 'हायवाटर' च्या खालचा समुद्रकाठंचा मळईचा प्रदेश;(२)जंगलमय पट्टी,(३)सॅव्हान(४)डोंगराच्या रांगा या देशांत पॅकरैमा व मेरुमे पर्वत या मोठ्या रांगा व कॅनुकू व अँकराय या लहान रांगा आहेत. माऊंट रारैमा माऊंट कुकेनाम, इबालकरिमा, इलुबारिमा, इलुटिपू, वैआकापि आपु हीं उंच शिखरें आहेत.

नद्या.- वैनि, एसेक्विबो, मॅझॅरुनि, कुयुनि, डेमेरॅरा, बर्बाइस, कोरेन्टान, या मुख्य नद्या आहेत. कायेटुर व सिपॅरुनि, बुरोबुरो, रेवा, कुयुविनी, कासीकूडनी या एसेक्विबोला मिळणा-या साधारण नद्या आहेत. पोमेरुन, मोरुका व बरिमा या नद्या अटलांटिक महासागराला मिळतात. अबारी, महैकानी व माहैका या इतर नद्या आहेत.

हवा:- हवा इतर उष्ण देशांप्रमाणें रोगिष्ट नाहीं. हिंवताप सर्वसाधारण आहेत. क्षयरोगहि आहे. देशाच्या आंतील भागांत रात्री थंड व ओलसर असतात. कधीं कधीं अवर्षणें पडतात. दोन पावसाळे व दोन उन्हाळे प्रत्येक वर्षांत येतात. देशाच्या निरनिराळ्या भागांत पाऊस निरनिराळ्या प्रमाणांत पडतो.

राज्यव्यवस्था.- पांच अधिकारी व राजानें निवडलेले तीन मेंबराचें एक कौन्सिल यांच्या सहाय्यानें एक गर्व्हनर राज्यकारभार चालवितो. कायदे करण्याचा अधिकार ''कोर्ट ऑफ पॉलिसी'' च्या हातीं असतो. कोर्ट ऑफ पॉलिसी व सहा जमाबंदी मेंबर यांच्या संयुक्त कोर्टाचें हातीं कर बसवणें व खर्च करणें या बाबी असतात. कोर्ट ऑफ पॉलिसीचा सभासद होण्यास ८० एकर जमीन मालकीची अथवा २१ वर्षांच्या पट्ट्यानें मुदतीच्या मालकीची प्रत्येक इसमाजवळ असली पाहिजे. फडणीसी प्रतिनिधि होण्यास अशाच प्रकारची लायकी अथवा सालिना ८०० पौडांचें उत्पन्न असलें पाहिजे. ज्याच्या जवळ लागवड केलेली तीन एकर जमीन असते अथवा ज्याचें उत्पन्न सालिना ८० पौंड असतें त्या प्रत्येक इसमाला मतदार म्हणून नोंदतात. संस्थानचा वसून १९१७ सालीं ७३६४७३ पौंड असून खर्च ७३३६८९ पौंड होता.

व्यापार व उद्योगधंदे- या देशांतून गुळपेंड, साखर, दारु, गूळ, सागबान, सोनें, लांकडी तक्ते, गुरें हीं बाहेर पाठवितात. हिरे व इतर जवाहीर थोड्या प्रमाणावर सापडतात. १९१७ सालची आयात व निर्गत अनुक्रमें ३२७१०१७ पौंड व ४३१५९३९ पौंड होती. येथें प्रचारांत डॉलर व सेंट हीं नाणीं आहेत. दोन बँका नोटा काढतात.

दळणवळणाचे मार्ग.- समुद्रकिना-यानें व मुख्य नद्यांच्या कांठानें सडका गेलेल्या आहेत या संस्थांतून ८७|| मैल लांबीची रेल्वे जाते. ४५० मैलांच्या नदीमार्गें नौकानयन चालतें व ३२२ मैलाचे रस्ते आहेत. रॉयल मेल स्टीम पॅकेट कंपनीच्या बोटींनीं इंग्लंडहून ब्रिटिश ग्वायनाला सोळा दिवसांत येतां येतें. लंडन व ग्लास्गोहून सरळ मार्गानें एकोणीस दिवसांत प्रवासी येऊं शकतो. कानडा, युनायटेड स्टेट्स, फ्रान्स व हॉलंड येथून नियमितपणें बोटी येतात.

इतिहासः- इ. स. १८०३ मध्यें ह्या वसाहती ब्रिटिशांनीं घेतल्या. या वेळेची स्थिति समाधानकारक नव्हती. साखर जास्त पिकल्यामुळें बाजारांत भाव चांगला येत नव्हता. व नेपोलियन बोनापार्टनें बंदरें बंद केल्यामुळें यूरोपांत माल पाठविण्याची सोय नव्हती व याच सुमारास इंग्लंड व युनायटेड स्टेट्स यांच्यामध्यें लढाई उपस्थित झाल्यामुळें स्टेट्समध्येंहि माल पाठविणें शक्य नव्हतें. यावेळीं इंग्लडांत गुलामगिरी बंद करण्याच्या प्रश्नाचा विचार चालल्याच्या बातम्या नीग्रो लोकांनां कळल्यामुळें त्यांनीं बंड करुन आपल्या मालकांवर हल्ले केले होते. परंतु या बंडाचा लवकरच बंदोबस्त करण्यांत आला व लष्करी मदत मागविण्यांत येऊन नीग्रो लोकांच्या पुढा-यांनां पकडून त्यांची लष्करी कोर्टापुढें चौकशी करण्यांत आली व त्यांनां जबर शिक्षा देण्यांत आल्या.

इ. स. १८२४ पासून १८३८ पर्यंत सर बेंजामिन डि अर्बन हा गर्व्हनर होता. याच्या कारकीर्दींतील मुख्य गोष्ट म्हटली म्हणजे १८३१ मध्यें तिन्ही वसाहतींची एक वसाहत करुन तिच्या बर्बाइस, डेमरेंरा, व एसोक्विबो अशा तीन कौंटी केल्या.

अर्बनच्या मागून १८३३ मध्यें सर जेक्स कार्मायकल स्मिथ गर्व्हनर झाला. यानें जाहीर केलें कीं, राजाच्या मनांतून गुलामांची स्थिती सुधारण्याचा विचार आहे. पण गुलामांनीं कोणत्याही प्रकारचा दंगाधोपा करतां कामा नये. कामन्स सभेनें १८३३ मध्यें दास्यविमोचनाचा कायदा पास केला. मळेवाल्यांना अत्यंत दुःख झालें व गुलामांनां अत्यानंद झाला. देशाची स्थिती फार कष्टमय झाली; परंतू गव्हर्नरनें मोठ्या धोरणानें प्रसंग निभवून नेला व दंगेधोपे उपस्थित झाल्याबरोबर त्यानें स्वतः मोडून टाकले. हा गर्व्हनर १८३८ मध्यें कँप हाऊस येथें मरण पावला.

दास्यविमोचनाच्या नंतरच्या काळांत देशाची स्थिति फार शोचनीय होती. १८५० मध्यें नेमलेल्या कमिशनच्या रिपोर्टावरुन असें आढळून आलें कीं देशाची खरोखरी नासाडी झाली होती; व मजूरलोक बाहेर देशाहून आणल्यामुळें मळे वांचले. १८५३ मध्यें वसाहत थोडी पुढें येऊं लागली व त्या वेळचा गर्व्हनर सर हेन्री बार्कली यानें असें बोलून दाखविलें कीं, देशाची प्रगति समाधानकारक आहे. याच्या कारकीर्दींत कायदेकौंन्सिल व कार्यकारी मंडळ यांच्यामधील तंटेबखेडे मिटले. पण मजूर लोकांचा पुरवठा त्रासाशिवाय झाला नाहीं. १८४७ मध्यें बर्बाइसमधल्या नीग्रो लोकांनीं पोर्तुगीज मळेवाल्यांच्या मालमत्तेवर हल्ला केला व लष्करी साहाय्यानें हीं बंडें मोडण्यांत आलीं. १८६२ मध्यें अशाच प्रकारचे दंगे नवीन गर्व्हनर सर फ्रॅन्सिस हिंक्स यांच्या कर्तबगारीनें मोडण्यांत आले. हळू हळू १८८३ पर्यंत सर्व गोष्टींचा चांगला बंदोबस्त झाला. १८८४ मध्यें साखरेचा भाव देणग्या देऊन उत्पन्न केलेल्या ''बीट साखरे'' मुळें फार उतरला व सबंध वसाहतींतील ब-याच मळ्यांचें फार नुकसान झालें; व फार थोड्या मळ्यांच्या चालकांनीं केलेल्या काटकसरीमुळें व लागवडींच्या व पैदासीच्या शास्त्रीय शोधामुळें काहीं थोडे मळे वांचले.

१८८९ सालीं जॉर्ज टॉऊनमध्यें रहाणा-या पोतृगीज लोकांविरुद्ध तेथील नीग्रो लोकांनीं बंड केलें. बंडाचें कारण एका पोर्तुगीज मनुष्यानें आपला नीग्रो राखेचा खून केला होता व दुस-या एका पोर्तुगीजानें एका नीग्रो पोराला चोरी केल्याबद्दल मारलें होतें. नीग्रो लोकांनीं ओरड केली कीं पोर्तुगीज लोकांनां शिक्षा न होतां नीग्रो लोकांना ठार करतां येतें. म्हणून नीग्रो लोकांनीं सूड उगवला पाहिजे. दोन दिवस सर्व शहरभर अव्यवस्था माजली होती. नंतर पोलीस लोकांनीं हा दंगा मोडला व पोर्तुग्रीज लोकांनां नुकसान भरपाई देण्यांत आली.

१८८४ त व्हेनेझुएला व ग्वायना यांच्यामधील सरहद्दीबद्दल तंटा उपस्थित झाला. अखेरीस या प्रश्नाचा निकाल कसा झाला याचें वर्णन व्हेनेझुएला देशाच्या वर्णनाखालीं आलें आहे. १९०५ च्या शेवटच्या दोन महिन्यांत जॉर्ज टाऊन व डेमेरॅरा नदीच्या पूर्व व पश्चिम किना-यावरील नीग्रो लोकांची बंडाळी झाली. या लोकांनीं मळेवाल्यांच्या घरांवर हल्ले करुन खिडक्या फोडल्या व गोरे लोकांवर हल्ला केला. पोलीस लोकांनां बंडखोरांच्या जमावावर गोळ्या झाडाव्या लागल्या. अखेरीस साफो व डायमंड हीं जहाजें आलीं. बंडखोरांपैकीं पुष्कळ लोकांना पकडून त्यांची चौकशी करण्यांत आली व अशा रीतीनें शांतता पुन्हां प्रस्थापित करण्यांत आली.

ड च ग्वा य ना.- या देशांचें क्षेत्रफळ ४६०६० चौरस मैल आहे. याच्या पश्चिमेस ब्रिटिश ग्वायना व पूर्वेस फ्रेंच ग्वायना आहे. या देशांतील जमीन व उत्पन्न होणारे पदार्थ यांच्याप्रमाणें येथें रहाणारे निरनिराळे लोक यांची वाटणी झाली आहे. इंडियन लोक (कारिब, अँराबाक, वारस) हे सॅव्हानामध्यें अथवा वरचा निकेरी, कोपेनेम व मारोनि यांच्या काठावर मळ्यांपासून फार दूर राहतात. हे लोक मनीऑकच्या शेतांची लागवड करतात व मासे धरतात आणि शिकार करतात. यांची संख्या सरासरी २००० आहे. बुशनीग्रो (मॅरॉन्स) हे बेटें व धबधबे यांच्याजवळ राहतात. यांची संख्या १०००० आहे. सोन्याच्या खाणीवर माणसें व माल पाठविणें, इंडियन लोकांशीं नदीच्या मार्गानें व्यापार करणें व पॅरॅमॅरिवो व मळे यांच्याकडे लांकूड नेणें हे यांचे धंदे होत. पळून गेलेल्या गुलामांचे हे वंशज आहेत व मिशनरी लोक यांच्यामध्यें जाण्यापूर्वीं यांच्या पाखंडवादी धर्मामध्यें ख्रिस्ती धर्माचा संबंध दाखविणारीं बरींच चिन्हें होती. यांच्या मुख्य देवाला ग्रॅन गॅडो (ग्रँडगॉड) म्हणत व त्याच्या बायकोला मेरिआ व मुलाला जेसी किस्ट म्हणत. अँम्युका (वनदेवता) व टोनी (जलदेवता) इत्यादि आणखी देवतांची पूजा हे लोक करीत. डच, पोर्तुगीज व दुस-या कित्येक भाषांचें संमिश्रण होऊन बनलेल्या एका अशुद्ध भाषेवर बसविलेली यांची भाषा आहे. यांच्या नायकांनां ग्रमन अथवा मोठा मनुष्य म्हणतात; परंतु त्या लोकांची सत्ता व याचें भाषाधर्मवैचित्र्य आतां डच व इतर लोकांशीं त्यांच्या झालेल्या दळणवळणामुळें बरेंच नाहीसें झालें आहे. पेरॅमॅरिबो व मळे यांतील लोक, चिनी, जावानीज, हिंदुस्थानी व वेस्टइंडीजमधील मजूर, निग्रो व गोरे लोक हे आहेत. १२४८९ मुसुलमान, २०८५० हिंदु व ८४७ यहुदी आहेत. जंगलांतील निग्रो व इंडियन लोक सोडून १९१८ त येथील लोकसंख्या ९२२८४ होती. यांतील अर्धे लोक पेरॅमॅरिबोमध्यें व बाकीचे जिल्ह्यांत रहातात.

मुख्य वसाहती सुरिनाम नदीच्या खालच्या दरींत किंवा सुरिनाम व पश्चिमेस  सारामाका व पूर्वेस कोमेविने या नद्यांच्या मध्यें केल्या आहेत. देशाचा आंतील भाग बहुतेक लहान लहान टेंकड्यांचा बनलेला आहे. हिटरलँड व टुमकहुमाक या भागांचा अद्याप शोध लागला नाहीं. ग्वायनाच्या इतर भागांप्रमाणें डच वसाहतीचे सखल समुद्रकांठची जमीन सव्हाना, अगम्य जंगल असे नैसर्गिक विभाग आहेत. पेरॅमॅरियो, कोरोनी, सोमेल्शडिज्क, नियू निकेरी व ग्रोविंग्जे येथें हवामानाचे फरक नोंदून ठेवण्यांत येतात. मोठा व छोटा उन्हाळा आणि थोडा पाऊस व जोरांचा पावसाळा असें वर्षाचें ॠतुमान आहे.

व्यापारः- कोको, कॉफी, साखर, तांदूळ, मका व सोनकेळीं हे पदार्थ बाहेर देशीं पाठवितात. बहुतेक मोठे मळे सुरिनाम, कोमेविन, निकेरी व कोटिका या नद्यांच्या खालच्या प्रवाहावर आहेत. वरच्या सुरिनाम, सॅरमाका व मॅरोनी नद्यांच्या खडकांत सोनें सांपडतें. १९०६ त पेरॅमॅरिबो व सोन्याच्या खाणीं यांच्यामध्यें रेल्वेरस्ता सुरु करण्यांत आला. शेतकी हा मुख्य धंदा आहे. १९१७ सालची आयात व निर्गत अनुक्रमें ७६४५९४१ गिल्डर व ८८५२१७० गिल्डर होती.

राज्यकारभारः- ही वसाहत एका गर्व्हनरच्या ताब्यांत आहे. व्हाईस प्रेसिडेंट व राजानें निवडलेल्या तीन मेथरांच्या बनलेल्या कार्यकारी कौन्सिलचा हा गव्हर्नर प्रेसिडेंट असतो. कायदे करणा-या मंडळाला स्टेट्स म्हणतात. यांचे मेंबर नऊ वर्षांकरितां निवडलेले असतात. या वसाहतीचे तेरा जिल्हे केले आहेत. न्याय देण्याकरिता तीन परगण्यांचीं कोर्टें, दोन जिल्हाकोर्टे व पेरॅमॅरिबो येथील वरिष्ठ कोर्ट स्थापन करण्यांत आलीं आहेत. यांचा प्रेसिडेंट व कायमचे मेंबर राजानें निवडलेले असतात. सरासरी उत्पन्न २७६००० पौंड व खर्च ३१७००० पौंड आहे.

इतिहासः- ग्वायनाच्या इतिहासांत डच लोकांच्या इतिहासाचा उल्लेख केलेला आहे. १८२८ व सुरिनाम व वेस्ट इंडिजमधील डच बेटें यांचा राज्यकारभार पेरॅमॅरियो येथें राहणा-या एकाच गव्हर्नराच्या हाती दिला होता. परंतु १८४५ त हे अलग करण्यात आले. १८३६ त गुलामगिरी बंदी करण्यांत आली. मजूर मिळणें मुष्किलीचें झालें व १८७० मध्यें हॉलंड व इंग्लंड यांच्यामध्यें मजूर लोकाचा व्यापार नियमित करण्यासंबंधीं करार होऊन कलकत्याला एक डच सरकारचा एजंट नेमण्यांत आला. या प्रश्नांचा कधींच समाधानकारक निकाल लागला नाहीं. परंतु एकोणिसाव्या शतकांच्या शेवटच्या वीस वर्षांत हॉलंडचें लक्ष वसाहतीकडे जास्त वेधूं लागलें, व सुरिनाम अँसोसिएशन, पेरॅमॅरिबोला येणारी नॅव्हिगेशन कंपनीची सर्व्हिस, वनस्पतींची बाग, भूगर्भशास्त्रविषयक व दुस-या शास्त्रीय मोहिमा, व १८९८ मधील हार्लेम येथील प्रदर्शन वगैरे गोष्टी घडून आल्या.

फ्रें च ग्वा य ना.- ही वसाहत डच ग्वायना व ब्राझील यामध्यें आहे. फ्रान्सचा प्रदेश व नेदर्लंडचा देश यांच्या मधील सीमा १८९१ मध्यें रशियाच्या बादशहानें दिलेल्या निकालान्वयें निश्चित करण्यांत आली. मॅरोनी नदी ही सीमा असावी व आवा अथवा टॅपानाहोनीला मॅरोनीचा मुख्य प्रवाह समजावा अशा ही व्यवस्था होती. १९०५ त मॅरोनी व इटनीमधला प्रदेश फ्रान्सला डच व फ्रेंच सरकार याच्या मधील करारन्वयें मिळाला. सोने काढण्याच्या प्रश्नाचा निकाल फ्रान्स व हॉलंड यांनां मॅरोनी नदीची वाटून देऊन लावण्यांत आला. फ्रेंच ग्वायना व ब्राझिल यांच्या मधील ओयापॉक नदी सीमा, स्विस सरकारनें ठरविली. १८९७ त रायोडिजेनिरो येथे एक करार होऊन फ्रेंच व ब्राझिल प्रदेश यांमधील सीमा ठरविण्यांत आली. फ्रेंच ग्वायनाचें क्षेत्रफळ ३२००० चौरस मैल आहे. लोकसंख्या (१९११) सुमारें ४९००९ आहे. कार्यनी शिवाय सिनामारी, माना, रौरा व अँप्रुएग्यु हीं इतर शहरें आहेत. १८९२ मध्यें फ्रेंच ग्वायनाचे मॅरोनां जिल्हा खेरीज करुन १४ कॉम्यून करण्यांत आले. तीन सेफ्टी बेटें (रॉयल, जोसेफ व हुडायबल), एन्फन्ट पेर्डुबेट व पांच रेमिरे बेटें हीं या वसाहतीपैकीं आहेत.

मुख्य नद्या मॅरोनी व ओयापॅक या आहेत. शिवाय माना, सिन्नामारी, कूरु, ओयॉक या इतर नद्या आहेत. कायेनां हें राजधानीचें शहर ओयॉकच्या मुखाजवळ आहे. व पुढचें अँप्रुएग्यु आहे. वनस्पती व प्राणी ग्वायनांतील इतर भागाप्रमाणेंच आहेत. वनस्पती फार विपुल आहेत. बाकापू, कामुट, चाऊ व इतर ताडाचीं झाडें येथे साधारणपणें उत्पन्न होतात. मॉनिऑक हा मुख्य खाण्याचा पदार्थ आहे, तांदूळ, मका, याम, आरारुट, सोनकेळीं, बनाना व ब्रेडफ्रूट (भाकरीचें फळ) येथें पिकतात. व्हॅनिला हें येथें होणारें रानटी झाड आहेत. या देशांत फार थोडी जमीन लागवडींत आहे.

खाणींतून सोनें काढणें हा या वसाहतींतला मुख्य धंदा आहे. रुपें व लोखंड कित्येक जिल्ह्यांत सांपडतें;  माँटसिनेरीच्या मैदानांत केओलिन सांपडतें व कित्येक ठिकाणीं फॉस्फेट्स सांपडतात. शिवाय कापण्याच्या चक्क्या, दारु गाळण्याचे कारखाने, विटाचे कारखाने व साखरेचे कारखाने आहेत.

व्यापार व दळणवळणाचे मार्गः- दारु, कणीक, कपडे वगैरे जिन्नस बाहेर देशांतून या देशात येतात. सोनें, फॉस्फेट, सागवानी लांकूड, कोको व गुलाबपाणी हे जिन्नस बाहेरदेशीं रवाना होतात. कायेनी हें मुख्य बंदर आहे. मजुरांचा तोटा असल्यामुळें या वसाहतीची भरभराट होत नाहीं. एतद्देशीय मजूर मिळत नाहींत व हद्दपार केलेल्या लोकांनां काम करावयास लावणें फायदेशीर होत नाहीं. जमिनीवरील रस्ते पुष्कळ नाहींत. राजधानी व इतर शहरें यांमधील दळणवळण आगबोटांनेहि चालतें. कायेनी व ब्रेस्ट यांच्या मध्यें समुद्रांतील तारायंत्र आहे.

राज्यकारभारः- या वसाहतीचा कारभार एक कमिशनर-जनरल पहातो. याच्या मदतीला सेक्रेटरी-जनरल, न्याय, लष्कर, धर्मे वगैरे राज्यकारभार खात्यांच्या मुख्य अधिका-यांचें बनलेलें प्रिव्ही कौन्सिल असतें. १८७९ मध्यें सोळा मॅबरांचें एक लोकनियुक्त जनरल कौन्सिल स्थापन करण्यांत आलें. कायेनी येथें अव्वल दर्जाचें एक कोर्ट व एक उच्च प्रतीचें कोर्ट आहे. शिवाय चार जस्टिस ऑफ पीस आहेत. पैकीं एकाला इतर ठिकाणीं सत्ता चालवितां येते. १९१५ त ३३ प्राथमिक शाळा व ७ काँग्रगेशनल शाळा होत्या. धर्मोपदेशकांवर एक अँपोस्टोलिक प्रिफेक्ट मुख्य आहे. सैन्यात एकंदर १५० युरोपियन अधिकारी व सैनिक आहेत. इ. स. १८५२ च्या हुकुमान्वयें येथें कैदी लोकांची वसाहत स्थापन करण्यांत आली.

इतिहास.- १६०४ मध्यें चौथ्या हेनरीनें पहाणी करण्याकरितां पाठविलेल्या सिउर ला रेव्हार्डिरे यानें अनुकूल बातमी आणली. परंतु राजा मरण पावल्यामुळें वसाहत करण्याचे बेत रहित झाले. १६२६ मध्यें रुयेनच्या कांहीं व्यापा-यांनीं सिन्नेसारी येथें वसाहत केली. १६३५ मध्यें अशाच एका टोळीनें कायेनीचा पाया घातला. १६५४ पासून कांहीं वर्षेंपर्यंत ही वसाहत डचांच्या ताब्यांत होती. १६७४ मध्यें ही वसाहत फ्रान्सच्या ताब्यांत गेली व कोलबर्टची राज्यव्यवस्था देशाच्या प्रगतीला विघातक झाली.

१६७३ मध्यें मोंठी आपत्ति आली. मुख्य प्रधान चोसील यानें पाठविलेल्या वसाहतवाल्यांनां अन्न व शेतकीची आउतें मिळत नव्हतीं. १८०० मध्यें व्हिक्टर हुजेसला गर्व्हनर नेमण्यांत आलें व यानें या वसाहतीची चांगली व्यवस्था लावली. परंतु १८०९ मध्यें पोर्तुगीज व ब्रिटिश लोकांनी केलेल्या स्वारीमुळें या गव्हर्नरचया कामाला अडथळा आला.

जरी १८१४ मध्यें फ्रेंच ग्वायना फ्रेंच लोकांनां परत देण्यांत आला होता तरी पोर्तुगीज लोकांनीं ही वसाहत १८१७ पर्यंत सोडली नव्हती. या वसाहतीची चांगली व्यवस्था करण्याचें प्रयत्न करण्यांत आले, परंतु मागें आलेल्या आपत्तीमुळें फ्रान्सांतील लोकमत कलुषित झालें होतें. १८२२ मध्यें साखरेचे कारखाने स्थापन करण्यांत आले; १८२४ मध्यें माना जिल्ह्यामध्यें शेतकीची वसाहत स्थापन करण्यांत आली. दास्यविमोचनामुळें शेतकीचें नुकसान झालें होतें, परंतु आफ्रिकेंतील लोक आणून ही स्थिति सुधारण्यांत आली. १८५५ मध्यें अँप्रुएग्युवर सोन्याच्या खाणीचा शोध लागल्यामुळें देशाच्या आर्थिक परिस्थितींत फरक पडला.

[सं द र्भ ग्रं थ.- ब्रिटिश ग्वायना:- अंडर्सन-काँर्पेंडियम ऑफ जनरल इन्फॉर्मेशन रिलेटिंग टु ब्रिटिश ग्वायना, १९१२; बेले-हँडबुक ऑफ ब्रिटिश ग्वायना; हॅरिसन-ब्रिटिश ग्वायना अँड इट्स रिसोर्सेस; इम् थुर्न-अनंग दि इंडियन्स ऑफ ग्वायना; रोडवे- हिस्टरी ऑफ ब्रिटिश ग्यायना; डच ग्वायना;-पालग्रेव्ह- डच ग्वायना, लंडन १८७६. फ्रेंच ग्वायनावरचे चांगले संदर्भ ग्रंथ फ्रेंच भाषेंत आहेत; ब्रिटननिकामध्यें यावर कांहीं माहिती सांपडेल.].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .