प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे  
        
ग्वाल्हेर सं स्था न.- हें संस्थान सेंट्रल इंडिया एजन्सीचा एक भाग असून त्याचा विस्तार चंबळपासून भिलसापर्यंत व बुंदेलखंड आणि झांशी येथून राजपुताना एजन्सीपर्यंत आहे. याचें क्षेत्रफळ २५०४१ चौ. मैल आहे. संस्थानच्या (१९२१) ३१८६०७५ या एकंदर लोकसंख्येपैकीं शेंकडा ८६ हिंदु, ४ मुसलमान, १ जैन व बाकी इतर जाती असून लो. सं. (१९२१) ८०३८७ आहे. संस्थानांत शहरें २३ असून भिलसा, मोणिया व गुणा हीं धान्याच्या व्यापाराचीं मुख्य केंद्रें आहेत.

रे सि डे न्सी.- सालबाईच्या (१७८२) तहानंतर शिद्यांच्या दरबारीं रेसिडेन्ट नेमला गेला. मात्र वेळोवेळीं त्याच्या अधिकारक्षेत्रांत थोडाबहुत फरक पडलेला आहे. लहान वतनें व ब्रिटिश हद्दींतील रेल्वेवर त्याची देखरेख असते. रेसिडेन्सी हेड्क्वार्टर्सकरितां जागा स्वतंत्र आहे. त्यांतील तीन खेड्यांचा वसुल रेसिडेन्सीच्याच कामाकरितां खर्च होता. ग्वाल्हेर संस्थान हें उत्तरविभाग आणि माळवा अशा दोन विभागांत विभगलें गेलें आहे. एकंदर संस्थानचें उत्पन्न दीड कोटीचें आहे.

ग्वाल्हेरच्या पूर्व, उत्तर व पश्चिमेला मैदान आहे. ग्वाल्हेर, ताबरगड भिंद आणि शिवपूर हे चार जिल्हे यांत येतात. हा भाग ५०० पासून ९०० फूटांपर्यंत उंचीचा आहे. दक्षिणेकडे जमीन झपाट्यानें उंच होत होत पुढें माळव्याचा माळ लागतो. तेथपर्यंत त्याची साधारण उंची १५०० फूट आहे. तिसरा भाग टेंकड्या व द-या मिळून बनलेला अमझरा जिल्ह्यांत असून त्याची साधारण उंची १८०० फूट आहे. विध्याचलाच्या दोन शाखा यांतूनच गेल्या असून त्यांतून ज्या ब-याच नद्या निघतात त्यांत चंबळा, क्षिप्रा वगैरे मुख्य आहेत. पण यांचा शेतीला कांहींच उपयोग होत नाहीं.

विशेषतः उत्तरेकडील जंगलात वाघ, अस्वल वगैरे सर्व जातीचीं श्वापदें सांपडतात. माळावरील हवा साधारण समशीतोष्ण असते. मैदानांत मात्र उन्हाळा अत्यंत कडक असतो. पावसाचें मान साधारण मैदानावर ४० व माळावर ३० इंच आहे. येथील राजघराणें शिद्यांचे आहे. त्यांचा मूळगांव साता-यापासून पूर्वेस १६ मैलांवरील कण्हेरेखेड नांवाचा आहे. तेथची पाटिलकी शिद्याकडे होती. त्यांचा मूळ पुरुष राणोजी हा प्रथम पेशवे यांचा हुज-या होता. पुढें त्याची मल्हारराव होळकराबरोबर उत्तरेकडे रवाननगी झाली. तिकडे त्यानें बरीच कामगिरी केली (पहा). त्याला पांच मुलें होतीं. प्रथम शिद्यांची राजधानी उज्जनी येथे होती. राणोजीच्या मागून जयाप्पा, जनकोजी, महादजी व दौलतराव असे पुरुष अनुक्रमें अधिकारारुढ झाले. महादजी व दौलतराव या दोघांनीं हिंदुस्थानच्या इतिहासांत बरीच प्रमुख भाग घेतलेला आहे. थोरले माधवराव पेशवे वारल्यावर जी गडबड झाली त्या संधीत महादजीनें आपली सत्ता व वैभव यांची बरीच वाढ केली. राघोबादादांच्या निमित्तानें इंग्रज व शिंदे यांच्यांत बरेच वेळां लढाया झाल्या. १७८२ सालीं सालाबाईच्या तहानंतर शिद्यानें पुन्हां उत्तरेकडे सत्तेचा विकास केला, दिल्लीवर छाप बसवली व त्याकरितां इंग्रजी पद्धतीनें कवाईत वगैरे शिकवून सैन्य तयार केलें. थोड्याच दिवसांत वानवडी येथें महादजी वारला. इंग्रजी इतिहासकारांनीं सुद्धा महादजीबद्दल गौरवपरच लिहिलें आहे.

नंतर दौलतराव गादीवर आला. त्यानंतर त्याचें आणि होळकराचें युद्ध झालें. वसईचा तह दौलतराव कबूल करीना म्हणून त्यांचीं व इंग्रजांचीं अनेक युद्धें होऊन शेवटीं सुर्जीअंजनगांव येथें तह झाला. पुन्हां मध्यंतरीं बरीच वाटाघाट व फेरफार होऊन १८१७-१८ मध्यें नवे तह झाले. दौलतरावाच्या मागून पुष्कळच अंदाधुंदी माजली व बायकांचा कारभार झाला. व पुढें इंग्रजी सैन्याच्या खर्चाकरतां बराच मुलूख तोडून द्यावा लागला.

दौलतरावानंतर जनकोजी गादीवर आला. तो तरुणपणींच वारल्यानंतर (१८४३) जयाजीराव गादीवर बसला. १८५२ मध्यें दिनकरराव दिवाण झाला; त्यानें सर्व खातीं व्यवस्थित व संघटित केलीं. १८५७ च्या बंडांत जयाजीरावानें इंग्रज सरकारला स्वतः बरीच झीज व तकलीफ सोसूनहि मदत केली. बंडानंतर जी शांताता झाली तीमुळें संस्थानची सुधारणा करण्यास वाव मिळाला व रेल्वेला सवलती दिल्या गेल्या. १८८६ मध्यें झांशी शहर इंग्रजांनीं घेतलें व त्याबद्दल शिद्यांस ग्वाल्हेर, मोरार व कांहीं खेडीं दिलीं. १८८६ मध्येंच हल्लींचे महाराज माधवराव गादीवर आले व १८९४ मध्यें त्यांनां अखत्यारीचा अधिकार मिळाला. १९०१ मध्यें ते चीनमध्यें लढाईवर गेले होते. ते ब्रिटिश सैन्याचे सन्माननीय ले. जनरल असून केंब्रिजचे एल्एल्. डी. आणि ऑक्सफर्डचे डी.सी.एल् आहेत. त्यांनां २१ तोफांची सलामी आहे. संस्थानचा संबंध थेट हिंदुस्थान सरकारशीं येतो. मजलीस ई-खास नांवाच्या नऊ मंत्रीमंडाळाच्या मदतीनें महाराज स्वतः संस्थानचा कारभार पहातात. हल्लीं (१९२१) महाराजांनीं ग्वालेर नॅशनल असॅब्ली म्हणून एक मंडळ नेमलें आहे.

या संस्थानात ऐतिहासिक महत्वाचीं क्षेत्रें बरींच आहेत. उज्जयिनी तर प्रसिद्धच आहे. शिवाय मिलसा, उदयगिरी, वारो, नरोड, ग्वाल्हेर, चंदेरी, मंदसोर वगैरे ठिकाणीं हिंदु, जैन व मुसुलमान यांच्या धार्मिक व ऐतिहासिक इमारती ब-याच आहेत. त्यांपैकीं पुष्कळ कामें ख्रिस्तीशकाच्या पांचव्या शतकाच्याहि अगोदरचीं आहेत. कांहीं ठिकाणीं बौद्ध स्तूप आहेत. उज्जयिनीजवळ (कालियाडोह) कालियादेह येथें क्षिप्रा नदीच्या पात्रांत बांधलेला राजवाडा व नदीचें पाणी ज्यांत खेळविलें आहे असें विविध प्रकारचें बांधकाम फार पहाण्यालायक आहे.

लोकसंख्येपैकीं १८९९-१९०० च्या दुष्काळानें शेकडा १४ पर्यंत लोकसंख्या कमी झाली. संस्थानांत शहरें २३ आहेत. यांतील ९ मैदानांत व १४ माळावर आहेत. एकंदर गांवें ९५३८ आहेत. लोकसंख्येपैकीं शेकडा अडीच माणसें शिकलेलीं आहेत. क्षेत्रविस्तारामुळें भाषावैचित्र्य बरेंच आहे. शेकडा २५ माळवी भाषा बोलणारें, शेकडा १८ बुंदेली भाषा बोलणारे, शेकडा उर्दु बोलणारे व शेकडा १३ तोवरगडी भाषा बोलणारे आहेत. जंगली लोकांत किराड, मीना व भील हे लोक (दीड लाखावर) आहेत. मैदानांत शेकडा ५७ व माळावर ४७ लोक शेतीवर रहातात. शे. २६ गवळ्याचा धंदा करतात. शेकडा १५ उद्योगधंदे व शेकडा तीन व्यापार करतात.

माळव्यामध्यें उत्कृष्ट प्रतीची शेतजमीन आहे. तोवरगड व भिंडमध्यें साधारण प्रतीची आहे; इतरत्र विंध्याचलाच्या टेकड्या पसरल्यानें तेथील जमीन शेतीला निरुपयोगी आहे. शिवाय जेथें जमीन चांगली तेथें वस्ती पातळ असल्यानें सर्व जमीन लागवडीखालीं येत नाहीं. जमीनीचे (पिकाच्यामानानें) दहा भाग पाडले आहेत. पैकीं थोड्याश्या जमिनींत दोन पिकें निघतात. शेंकडा २२ प्रमाणें जमीन इनाम आहे. सरकारी १९४५४ चौ. मैलांपैकीं ३६१ चौ. मैल जमीन पाण्याखालीं आहे. पाण्याबद्दल शेतक-यांवर फारसा कर नाहीं. गहूं व ज्वारी हें मुख्य पीक असून शिवाय हरभरा, बाजरी, मका, गळिताचीं धान्यें, कापूस, अफू, डाळी, नीळ, ताग वगैरेंची लागवड होते. नवीन लागवड करणारांस ब-याच सवलती मिळतात. सरकार हें सावकारांपेक्षां कमी व्याजानें रयतेस कर्ज देतें.

संस्थानच्या क्षेत्रफळाचा एकनवमांश भाग जंगलानें वेष्टित आहे. जंगलापासून इमारती लांकूड, गवत, लाख, मोह वगैरे पाऊण लाखापर्यंतचें उत्पन्न निघतें संस्थानांत लोखंड  पुष्कळ ठिकाणीं सांपडतें. त्यामुळें पूर्वीं लोखंडाचे कारखाने उत्तम रीतीनें चालत असत. परंतु अलीकडे परदेशी माल जास्त स्वस्त पडूं लागल्यानें स्थानिक धंद्यांचा मागमूस राहिला नाहीं. त्यामुळें नवीन खाणी खोदल्या जात नाहींत. येथील दगड इमारतीकरितां पूर्वींपासूनच प्रसिद्ध आहे. दगडांच्या खाणी चांभारांच्या मालकीच्या आहेत व त्यांनां दर इसमामागें ४ रुपये कर द्यावा लागतो. हल्लीं संस्थाननें खाणींच्याबद्दल पुनः प्रयत्न सुरु केले आहेत (१९२३). तसेंच दगडावरील नक्षीकामास सरकारकडून उत्तेजन मिळालें आहे. सिमीटला लागणारा दगड संस्थानांत मुबलक असल्यामुळें सिमीटचा धंदा हल्ली सुरु झाला आहे. ग्वाल्हेरजवळील बनमोरच्या सिमीटाच्या कारखान्यांत दरवर्षीं ४० हजार टन सिमीट निघतें. अभ्रक, जस्त व लोखंड यांच्या खाणी खोदण्याकडे सरकार लक्ष घालू लागलें आहे.  

संस्थानांत कापूस वटविण्याच्या व सुतच्या गिरण्याहि आहेत. चंदेरी येथें तलम कापड निघतें. मंदसोर येथें चीट निघते. व शिवपूर येथें उत्तम लाखकाम होतें. निरनिराळ्या प्रकारचे एकंदर १९९ कारखाने संस्थानांत आहेत. साबणाचा, चामड्याच्या वस्तु करणा-या व चिनी मातीच्या वस्तू करण्याचा हे तीन कारखाने चांगले चालले आहेत. धान्य, अफू, कपडा, तुप यांची निर्गत होते; तर आयात मालांत हत्यारें, यंत्रसामुग्री, रॉकेल, कागद, लोखंडी सामान हा माल येतो. लष्कर, उज्जैन, मंदसोर, निमच वगैरे व्यापाराचीं मुख्य ठिकाणें आहेत.

संस्थानांत आगगाडी बरीच पसरली आहे. इतर कंपन्यांशिवाय संस्थाननें स्वतःची रेल्वे म्हणून काढली आहे. हल्लीं माळव्यामध्यें नवीन फांटे काढण्याचें काम सुरु झालें आहे. इ. स. १९२३ सालीं आगगाडीचें उत्पन्न एकंदर वसुलाच्या शेंकडा ४५.५६ होतें. सडकाहि ब-याच आहेत. १८८५ मध्यें संस्थानांत पोस्ट सुरू झालें. व्यवस्थेकरिता संस्थानचे दोन (ग्वाल्हेर व माळवा असे) भाग केले आहेत. ग्वाल्हेरंमध्यें ७ जिल्हे व माळव्यांत ४ आहेत. प्रत्येक जिल्ह्याला एकेक सुभा आहे. तेच जिल्हामॅजिस्ट्रेट होते. परगण्याच्या ठिकाणीं कमाविसदार असतो. १८४४ त न्यायकोर्टें सुरु झालीं. प्रांत अदालत हें सेशनकोर्ट असून अपीलें सदर अदालत व शेवटीं खुद्द महाराज यांच्या पुढें चालतात.

संस्थानच्या दीड कोटी उत्पन्नांत (यांतच जहागिरदारांचें अकरा लाखांचें उत्पन्न आहे.) सारा ८५, कस्टम ११, स्टॅम्प २.८ अफू २.८, अबकारी १'४, रेल्वेव्याज २१.३ व रेल्वे नफा ३ लाख असून खर्च एक कोटी तेहतीस लाख आहे. त्यांत ४१ लाख लष्करावर तर अडीच लाख शिक्षणाकडे खर्च होतात. शेतक-यांचे ठाकूर, जहागिरदार, कायमसारा देणारे माफीदार असे वर्ग असून सा-याचें प्रमाण जिराईत जमीनीवर आठ आण्यांपासून सहा रु. पर्यंत व बागायतीवर चार ते चाळीस रु. पर्यंत आहे. नवीन यांत्रिक उपकरणी शेतक-यांनीं सरकारकडून पुरविण्याचा उपक्रम नुकताच (१९२३) सुरु झाला आहे. त्यासाठीं शेतकी प्रदर्शनेंहि भरविण्यांत येतात. 'शिंदा नांगर' नांवाचा नांगर स्वस्त किंमतींत सरकार शेतक-यास देत असतें.

मिठाबद्दल संस्थानचा व ब्रिटिशांचा पुढीलप्रमाणें ठराव झाला आहे. संस्थाननें १९३० टनांपेक्षां अधिक मीठ तयार करुं नये व तें ब्रिटिश मुलुखांत पाठवूं नये; आणि ब्रिटिश मुलखांतलें मीठ संस्थानांत येईल त्यावर (पूर्वीं ब्रिटिश सरकारनें कर घेतलेला असतो म्हणून) संस्थानानें कर बसवूं नये, व यामुळें संस्थानचें जें नुकसान होईल त्याची भरपाई म्हणून इंग्रजांनीं ३.१ लाख रुपये संस्थानला द्यावे. हा ठराव १८७८ मध्यें झाला.

स. १८९९ पर्यंत अनेक प्रकारचें नाणें प्रचारात होतें. हल्लीं सर्वत्र इंग्रजी शिक्का चालतो.

पूर्वींपासून शिंदे हे लष्करी खात्याकडे फार लक्ष देत आले आहेत. जवळ जवळ दहा हजारांपर्यंत लष्कर त्यांच्या पदरीं आहे. पोलिसखातें पूर्वीं लष्करांत समाविष्ट होतें तें १८७४ पासून स्वतंत्र केलें.

जयाजीराव महाराज यांचें शिक्षणाकडे फार लक्ष असे. त्यांनीं शिक्षणावरचा खर्च वाढविला. १८६२ त शिक्षणखातें स्थापन झालें. स. १९२३ त एक आर्टस् कॉलेज, ६६ दुय्यम प्रतीच्या व ७९७ प्राथमिक शाळा होत्या, त्याशिवाय कामगारांच्या शिक्षणाची शाळा, सरदार शाळा, लष्करी शाळा, इंजीनिअरिंग वगैरे शाळाहि आहेत. शिवपुर येथें हल्लीं एक औद्योगिक शिक्षणाची शाळा सरकारनें काढिली आहे. ग्वाल्हेरीस एक नार्मल स्कूलहि आहे. उज्जन येथें व ग्वालेरीस स्त्रीशिक्षकिणींसाठीं शाळा आहेत. भील व अस्पृश्य यांच्याहि शाळा आहेत. खास मराठ्यांसाठीं लष्कर येथें एक हायस्कूल आहे.

जि ल्हा.- उष्कराभोंवतालचा १५१३ चौ. मै. क्षेत्रफळाचा जिल्हा. लोकसंख्या ३,२३,६९३ असून शहरें ३ व ६१४ गांवें आहेत. याचे तीन परगणे आहेत. सा-याचें उत्पन्न ५,१५,००० येतें. अंत्री येथें (रेल्वे स्टेशन जवळच) प्रसिद्ध अधुलफजलची कबर आहे. या जिल्ह्यांत नद्या वगैरे नाहींत. [इंपे. ग्याझे. पु. १२].

श ह र.- ग्वाल्हेर शहर हा शब्द दोन शहरांचा वाचक आहे लष्कर म्हणून ज्याला म्हणतात त्यालाच इंग्रज लोकांनीं ग्वाल्हेर म्हणण्याची चुकीची वहिवाट पाडली आहे. खरें ग्वाल्हेर शहर हें लष्कराच्या उत्तरेला ग्वाल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशीं जुन्या ग्वाल्हेर शहराच्याच जाग्यावर आहे. ग्वाल्हेरचें रेल्वे स्टेशन हें लष्करपासून तीन मैल व ग्वाल्हेरपासून दोन मैल अंतरावर आहे. ग्वाल्हेर, लष्कर व ब्रिगेड मिळून लोकसंख्या १ लाख १० हजार आहे त्यांत हिंदु शेंकडा ७४ व मुसुलमान २३ आहेत. मुसलमानांच्या वेळीं १६ व्या शतकांत ग्वाल्हेर हें माळया सुभ्यांतील ग्वाल्हेर सरकारचें (जिल्ह्याचें) मुख्य ठिकाण होतें. खुद्द ग्वाल्हेर शहर अगदीं लहान पडीत असून त्याला उतरती कळा लागली आहे. पूर्वीं ग्वाल्हेर येथें दगडावर कोरीव व खोदकाम सुबक व नक्षीदार होत असे. अद्यापहि त्याचा हा लौकिक समूळ गेला नाहीं. मुंबईची आग्रारोड सडक होण्याच्या अगोदरचा आग्र्याचा हमरस्ता येथून जात असे. जुन्या शहरांत जिकडे तिकडे मोडके वाडे व पडक्या मशिदी आणि कित्येक इमारती आहेत. त्यांतच प्रसिद्ध तानसेन गवयाची कबर आहे. लष्कर हें १८१० पासून वसलें व राजवाडे वगैरे या भागांतच आहेत. ग्वाल्हेरचा किल्ला हिंदुस्थानांत प्रसिद्ध, मजबूत व महत्वाचा किल्ला होता. हा केव्हां व अर्थात् कोणी बांधला वगैरेचा मागमूस नाहीं. पण इसवीसनाच्या ६ व्या शतकापासून इतिहासांत त्याचा उल्लेख व संबंध बराच येतो. सूर्यसेन नांवाच्या राजाला असलेलें कोड ग्वालीप नांवाच्या साधूच्या प्रसादानें गेलें म्हणून त्यानें त्याच्या नांवानें हा किल्ला बांधला अशी दंतकथा आहे. शिलालेख वगैरेंतून याचा उल्लेख गोपाद्री, गोपगिरी, गोपाचल असा आहे. ग्वाल्हेर हें नांव त्यापासूनच आलें आहे.

६ व्या शतकांत येथें गुप्तांचें राज्य होतें. पुढें हा मिहिरकुलानें घेतला. नंतर तो कनोजच्या राजाकडे गेला. दहाव्या शतकांत येथें रजपुतांचाच अमल होता. महेंद्रचंद्र (स.९५३), महिपाल (११०४), भुवनपाल, मधुसूदन, तोमरवंशीय धीरेंद्रदेव (१४४०) व निलंगदेव (१४१०) वगैरे राजे होऊन गेल्याचें त्या वेळच्या शिलालेखांवरुन दिसतें. पुढें मुसुलमान, मोंगल व अफगाण यांच्या ताब्यांत तो होता. पानिपतच्या घनघोर संग्रमानंतर गोहदकरानें (जाट राणा) त्याला आपलासा केला. पण लवकरच तो महादजी शिंद्यानें आपल्या कबजांत घेतला. मध्यतरीं इंग्रजांनीं मध्यें पडून तो राण्याला परत दिला होता; पण तो पुन्हां शिंद्याकडे आला. १८५८ मध्यें महाराणी लक्ष्मीबाई झांशीवाली हिनें हा काबीज केला होता परंतु पुढें सरह्यूरोज यानें तो राणीपासून परत घेतला पण त्यांतच महाराणीच्या हल्ल्यास तो बळी पडला. १८८६ पर्यंत तो इंग्रजसरकारच्या ताब्यांत होता. पुढें इंग्रज व शिंदे यांनीं ग्वाल्हेर व झांशी यांची परस्परांत अदलाबदल केली.

किल्ल्यामध्यें ऐतिहासिक व पुराण वस्तु ब-याच आहेत. तट मोठा व विशाल असून त्याचे बहुतेक दरवाजे हिंदू पद्धतीचे व एक मुसुलमानी पद्धतीचा आहे. आंत हिंदूंचीं बरींच देवळें असून जैनाचेंहि एक देऊळ आहे. किल्ल्यांत जैनाच्या प्रचंड मूर्ती आहेत. त्यांत एक तर ५७ फुट उंचीची आहे.

मुसुलमानी मशीदी ब-याच आहेत ४ हिंदु पद्धतीचे व २ मुसुलमानी धर्तीचे राजवाडे आहेत. ते फारच सुंदर व मजबूत आहेत. किल्ल्यावर पाण्याचीं अनेक टांकीं आहेत. त्याचें पाणी कधी आटत नाहीं. त्यांपैकीं सूर्यकुंड हें जुनें व प्रख्यात आहे. जोहार नांवाचा जो तलाव आहे तेथें १२३२ मध्यें आपल्या बायकामुलांचा प्रथम जोद्दार करुन मग अजगशहाबरोबर किल्ल्यांतील रजपूत लोक लढले, अशी कथा सांगतात, [इंपे. गाझि. पु.१२; आकिऑलॉजिकल रिपोर्ट, पु.२].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .