विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चांदूर, ता लु का-वर्हाड-मध्यप्रांतांतील. उमरावती जिल्ह्याचा हा आग्नेयीकडील तालुका आहे. उत्तर अ. २०० ३१’ ते २१० १३’ व पू. रे. ७७० ४०’ ते ७८० १८’. क्षेत्रफळ ८५५ चौ. मैल. लोकसंख्या इ. स ( १९११ ) २०४१३३. या तालुक्यांत ४ गांवें आहेत. मंगरूदळस्तगीर, तळेगांवदशासर, चांदूर आणि दत्तापूर. ३९१ खेडीं. पैकीं ८६ ओसाड आहेत.
शेतकी:-कापूस, ज्वारी गहूं. रब्बीचे पीक येथें फारसें नाहीं. पाटबंधार्याचें पाणी या तालुक्यांत नाहीं. विहिरीतून मोटेनें काढून बागाईत करण्याची पद्धत मोडत चालली आहे.
( रे ल्वे ) गां व-चांदूर तालुक्याचें मुख्य ठिकाण. येथील डाकबंगला जुना असून हल्लीं एक सराई बांधलेली आहे. इ. स. १८९५ सालीं कापसाचा बाजार स्थापला. सालीना उत्पन्न सुमारें २००० रूपये. येथें सरकी काढण्याचे कारखाने ५ व रूई दाबण्याचे कारखाने ३ आहेत. आठवड्याचा बाजार दर रविवारीं भरतो. येथील बागेंत संत्रीं चांगल्या प्रकारचीं होतात. जुना गांव रेल्वे स्टेशनच्या दक्षिणेस एक मैल असून फार गलिच्छ आहे. कॉलरा व प्लेग हे रोग येथें नेहमी होतात. तालुक्याचें ठिकाण झाल्यापासून याला बरेंच महत्व आलें आहे. सन १९०८ सालीं लोकसंख्या ५७०० होती. येथें एक लायब्ररी आहे. येथें प्राचीन असें कांहींच नाहीं. परंतु इ. स. च्या सहाव्याशतकांत वाकाटक राजांच्या शिलालेखांत उल्लेखिलेले ‘चंद्रपूर’ हेंच असावें असें म्हणतात.