प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

ज्योतिःशास्त्र -  सूर्य, चंद्र, ग्रह, तारे इत्यादि आकाशांत संचार करणारे पदार्थ म्हणजेच दिव्यपदार्थ अथवा ज्योतियांच्या वास्तविक व भासमान स्थिती व गती, आणि त्यांची स्वरूपें, आकार, वजनें व घटना, अवस्था इत्यादि गोष्टी याविषयीं अवलोकन व अनुमान यांवरून होणारें ज्ञान ज्याच्या विवेचनाचा विषय असतो तें शास्त्र ज्योतिःशास्त्र होय.

आ का श गो ल व त्या चें प रि भ्र म ण.- रात्रीं आपण उघड्या जागीं उभं राहून सभोंवार पाहूं लागलों तर आपल्यावर सर्वत्र आकाशाचा घुमटाकार अर्धगोल पसरलेला दिसतो. त्याच्या अंतः पृष्ठास असंख्य चांदण्या लकटलेल्या दिसतात. तो अर्धगोल वर्तुळाकार रेषंत भूपृष्ठास लागलेला दिसतो तिला क्षितिजवृत्त (आ. १, उपूदय) म्हणतात. कोठेंहि व कधींहि भूपृष्ठाचा प्रेक्षकास दिसणारा भाग वर्तुल मर्यादित दिसतो. यावरून भूगोलाकार आहे असें निष्पन्न होतें. आकाशगोलाचा अत्युच्च बिंदु (आ.१, ख) खस्वस्तिक होय. त्यास खमध्य किंवा खशिखर असेंहि म्हणतात. खस्वस्तिकापासून प्रेक्षकापर्यंत काढिलेली रेषा ही पतनदिशा होय. अर्थात् ती भूपृष्ठास लंब असते व म्हणून ती वाढविली तर भूमध्यांतून जाते.

अनेकवार लक्षपूर्वक आकाशाकडे पाहत गेलें तर असें दिसून येतें कीं आकाशाचा अर्धगोल हा त्यावर लकटलेल्या चांदण्यासहित एखाद्या अदृष्ट आंसभोंवतीं फिरत असावा. प्रत्येक चांदणी आकाशांतील एका विशिष्ट बिंदूंसभोंवतीं सुमारें २४ तासांत एक प्रदक्षिणा करिते व तिचीं त्या बिदूपासून व इतर चांदण्यापासून जीं अंतरें एकदां दिसतात तीं कमी जास्त होत नाहींत. आतां इतक्या असंख्य चांदण्यासहित आकाशगोल पृथ्वीभोंवतीं फिरतो अशा कल्पनेपेक्षां पृथ्वीच आपल्या आंसाभोंवतीं फिरत असावी ही कल्पना अधिक साधी व आधुनिक शोधांप्रमाणें खरी ठरलेली अशी आहे. समजा कीं, पृथ्वी एका अक्षांभोंवतीं फिरत आहे (आ.२, अ-अ अक्षः) प्रेक्षक (प्र) यास पृथ्वीच्या अक्षाच्या दिशेंत केव्हांहि भिन्नता आढळणार नाहीं. अर्थात ज्या अतिदूरस्थ चांदणींतून ही अक्षदिशा जात असेल ती चांदणी प्रेक्षकास आकाक्षगोलावर स्थिर दिसेल. ही चांदणी म्हणजे ध्रुवाची तारा होय. (अक्षदिशा जरी नेमकी या तारेंतून जात नाहीं तरी बरीच जवळून जाते.) आकाशगोलाच्या पृष्ठावर चांदण्या लकटलेल्या दिसतात त्या खरोखरी अतिदूर व भिन्न भिन्न अंतरावर असून आकाशगोल हा केवळ दृष्टीचा आभास आहे. परंतु तो एक खरोखरीचा गोल असें मानणें चांदणयांच्या दिशा (वास्तविक स्थानें नव्हे.) दर्शविण्यास सोयीचें होतें. अक्षदिशेंत असलेली ध्रुवाची तारी (ध) ही मानीव आकाश गोलार्धावर जेथें दिसेल त्या स्थलास (ध्रु) आकाशगोलावरील ध्रुव तारास्थान म्हणतां येईल व तें स्थान पृथ्वी आपल्या अक्षाभोंवतीं फिरत असतांहि प्रेक्षकास दिसेल. आतां दुसरी एखादी (त) तारका घेतली तर तिच्याहि अतिदूरपणामुळें, प्रेक्षक पृथ्वीबरोबर फिरत असतां तिच्या वास्तविक दिशेंत फरक दिसणार नाहीं. म्हणजे आकाशगोलावरील ध्रुवाचें स्थान व तारकेचें स्थान (थ) यांच्या दिशांतील कोन (ध्रुपथ) (म्हणजेच त्या स्थानांमधील गोलय अंतर) नेहमीं कायम राहील. अर्थात् तारका ध्रुवस्थानाभोंवती वर्तुलमार्गानें फिरत असलेलीं दिसेल.

ख स्व स्ति क व ख ध्रु व सं बं धीं वृ त्तें व स ह नि र्दें श क.- एखाद्या गोलावरील कोणताहि बिंदु मध्यस्थानीं कल्पून काटकोनात्मक गोलीय त्रिज्येनें गोलावर वर्तुळ काढिलें तर त्यास गोलावरील बृहद्वृत्त म्हणतात. व दिलेल्या बिंदूस व त्यांतून जाणार्‍या गोलव्यासाच्या दुसर्‍या टोंकाच्या बिंदूस त्या बृहद्वृत्ताचीं ध्रुवें म्हणतात. काटकोनाखेरीज इतर कोनाएवढ्या गोलीय त्रिज्येनें काढलेल्या गोलावरील वृत्तांस लघु वृत्तें म्हणतात. या सर्व वृत्तांचे मध्यबिंदू ध्रुवगामी गोलव्यासावर असतात बृहद्वृत्ताचा मध्य गोलमध्यच असतो व त्याचा व्यास गोलव्यासाएवढाच असतो. लघुवृत्तांचे व्यास गोलव्यासापेक्षां लहान असतात व लघुवृत्तें बृहद्वृत्तांस समान्तर असतात. एका बृहद्वृत्ताच्या ध्रुवांतून जाणारे कोणतेंहि बृहद्वृत्त दिलेल्या बृहद्वृत्तांस व तत्समांतर लघुवृत्तांस लंब असतें अशा वृत्तांस त्या बृहद्वृत्ताचीं लंबवृत्तें म्हणतात. दोन लंबवृत्तांत सांपडलेल्या बृहद्वृत्तचापाची कोनात्मक लांबी व त्या लंबवृत्तामधील ध्रुवबिंदूपाशीं झालेला कोन हे समान असतात. आकाशगोलावरील खस्वस्तिक व ध्रुव यांतून जाणारें बृहद्वृत्त (आ. १, उ ध्र ख द) हें याम्योत्तरवृत्त होय. तें क्षितिजास जेथें मिळतें त्यांतील ध्रुवापासून अधिक जवळचा बिंदु हा उत्तरगोलार्धावरील प्रेक्षकाच्या क्षितिजाचा उत्तर बिंदू (आ.१.उ) व दूरचा दक्षिणबिंदू (आ.१ द.) होय. दक्षिणगोलार्धावरील प्रेक्षकासंबंधीं याच्या उलट नांवें असतात. दक्षिणोत्तर (द प्र उ) रेषेस प्रेक्षकापासून काटकोनांत काढिलेसी रेषा (पू.प्र. प.) पूर्वापर रेषा होय. ही क्षितिजास जेथें मिळते त्यांतील जिकडून तारे उगवतात तिकडील बिंदु पूर्वबिंदु (आ.१, पू.) होय व दुसरा पश्चिम बिंदु (आ. १, प) होय. पूर्व, पश्चिम व खस्वस्तिक यांतून जाणारें बृहद्वृत्त पुर्वापरवृत्त किंवा समवृत्त होय.

क्षितिजवृत्ताचा ध्रुव खस्वस्तिक होय. तत्संबंधीं लघुवृत्तें, क्षितिजसमांतरवृत्तें किंवा समोन्नतवृत्तें होत. तसेंच तत्संबंधीं लंबवृत्तें, दिगंशवृत्तें किंवा ऊर्ध्वाधरवृत्तें होत. एखाद्या (आ. १, त) तारकेंतून काढिलेलें दिगंशवृत्त क्षितिजवृत्तास जेथें मिळतें (आ. १,थ) त्या बिंदूच्या तारकेपासून जें कोनात्मक अंतर (त थ) तें त्या तारकेचें उन्नतांश होत व तारकेचें खस्वस्तिकापासून कोनात्मक अंतर (ख त) तिचे नतांश होत. तारकेचें दिगंशवृत्त व क्षितिजवृत्त यांच्या छेदबिंदूचें उत्तरबिंदू (उ) पासून अंतर (उय) तारकेचे दिगंश होत, व ते छेदबिंदू पूर्वेस किंवा पश्चिमेस असल्यास पूर्व किंवा उत्तर दिगंश होतात. तारकेचे दिगंश व उन्नत्तांश (किंवा नताश) कळले म्हणजे तिचें आकाशगोलावरील स्थान आपणांस कळतें. स्थान निश्चित करणार्‍या मानास निर्देशक म्हणतात. दिगंश व उन्नतांश हे तारकेचे सह- निर्देशक होत. आकाशगोल फिरत असतां तारकांचे हे सहनिर्देशक क्षणोक्षणीं बदलतात. खध्रुवाचें बृहद्वृत्त हे विषुववृत्त होय. हें (आ. ४) दोन्ही ध्रुवांपासून अर्थातच समान अंतरावर असतें. पृथ्वीचा अक्ष व आकाश गोलाचा अक्ष समान दिशेंत असतात म्हणून भूमध्यवृत्त व विषुववृत्त हीं वृत्तें समान्तर पातळ्यांत असतात. तेव्हां भूमध्यवृत्त वाढवीत वाढवीत गेलें तर अतिदीर्घ त्रिज्येच्या आकाशगोलावरील विषुववृत्तांशीं एकरूप होऊल. भूमध्यवृत्त व क्षितिजवृत्त यांच्या पातळ्यांमधील कोन पृथ्वीचा अक्ष व उर्ध्वाधर रेषा यांच्यामधील कोना (आ. २- अ ख म) बरोबर असतो. म्हणजे ९००- प्रेक्षक स्थलाचें अक्षांश इतका असतो. तोच कोन अर्थात् खस्वस्तिक खध्रुव यांच्यामधील कोनात्मक अंतरा (खध्रु) बरोबर असतो, म्हणजे ९००- ध्रुवाचे उन्नतांस इतका असतो. म्हणून, ध्रुवाचे उन्नतांश= प्रेक्षक स्थलाचे अक्षांश.

खध्रुवसंबंधीं लघुवृत्तें हीं विषुवसमांतरवृत्तें किंवा समक्रांतवृत्तें होत. तत्संबधीं लंबवृत्तें हीं ध्रुवगामीवृत्तें किंवा कालांशवृत्तें होत. पूर्वेकडून डोक्यावरून पश्चिमेकडे अशी आकाशगोलाच्या दैनिक परिभ्रमणाची दिशा होय. आकाशांतील एखादी तारका (त) घेऊन तिचें कालांशवृत्त काढिलें तर जेव्हां ती तारका याम्योत्तरवृत्तावर असेल तेव्हां ते कालांशवृत्त याम्योत्तरवृत्ताशीं एकरूप असेल. पुढें आकाशगोलाच्या भ्रमणामुळें कालांशवृत्त याम्योत्तरवृत्तास सोडून पश्चिमेकडे सरकत जाईल व एक पूर्ण परिभ्रमण झाल्यावर पुन्हां याम्योत्तरवृत्ताशीं एकरूप होईल. कोणत्याहि वेळीं तारकेचें कालांशवृत्त व याम्योत्तरवृत्त यांमधील याम्योत्तरवृत्तापासून पश्चिम दिशेनें मोजलेला कोन (खध्रुत) त्या तारकेचे त्यावेळचे कालांश होत, व तिचें ध्रुवापासून कोनात्मक अंतर (ध्रुत) ही तिची ध्रुवच्युति होय. तारकेचें स्थान सांगण्याचा ध्रुवच्युति व कालांश सांगणें हा दुसरा प्रकार होय. तारकेचे कालांश आकाशगोलाच्या परिभ्रमणामुळें ०० पासून ३६०० पर्यंत एका पूर्ण परिभ्रमणांत वाढतात. या परिभ्रमणकालास एक नक्षत्रदिन म्हणतात. त्याचे २४ तास, एका तासाची ६० मिनिटें, एक मिनिटाचे ६० सेकेंद; अथवा ६० घटिका, १ घटिकेचीं ६० पळें, १ पळाचीं ६० विपळें असे विभाग पडतात. आकाशगोलाचा परिवेग सदा सम असल्यामुळें कालांशांचीं वाढ दर ताशीं १५० याप्रमाणें होते. म्हणून कालांश कोनपरिमाणांत न सांगतां कालपरिमाणांत सांगण्याची चाल आहे. उदाहरणार्थ ७५० कालांश असें न म्हणतां ५ तास म्हणतात. विषुववृत्तावर वसंत संपात म्हणून एक बिंदू आहे. तो काय हें पुढें कळेल. सध्यां आपण तो बिंदू म्हणजे विषुववृत्तावरची एक तारका असें समजूं व तिला आदितारका (स) म्हणूं. या आदितारकेच्या कालांशवृत्तापासून पूर्व दिशेनें मोजलेलें दुसर्‍या कोणत्याहि (च) तारकेचें जें अंतर (खध्रुव) ते तारकेचे विषुवांश होत, व तारकेंतून काढिलेल्या कालांशवृत्तावर विषुववृत्तापासून तारकेपर्यंत मोजलेलें जें अंतर (तय) तें तारका विषुववृत्ताच्या दक्षिणेस किंवा उत्तरेस असेल त्याप्रमाणें तारकेची दक्षिण किंवा उत्तरक्रांति होय. विषुवांश व क्रांति सांगणें हा सहनिर्देशक सांगण्याचा तिसरा प्रकार होय.

ना क्ष त्र का ल द र्श क व वि षु वां  शा न य न.- कोणतीहि तारका याम्योत्तरवृत्तावर आली म्हणजे तिचा मध्योरोह झाला असें म्हणावें. आदितारकेच्या मध्यारोहकालास ता. मि. से. दाखविणारें व एका नाक्षत्रदिनांत २४ तास दाखविणारें जें घड्याळ त्यास नाक्षत्रकालदर्शक म्हणतात. कोणत्याहि (त) तारकेच्या मध्यारोहकालीं आदितारकेचे कालांश हे त्या (त) तारकेचे विषुवांश होत. अर्थात त्या (त) तारकेचा नाक्षत्रकालदर्शकानें दर्शविलेला मध्यारोह हा त्या तारकच्या विषुवांशांचें कालपरिमाणात्मक मान झालें. यावरून, (त) तारकेचे विषुवांश= (त) तारकेच्या मध्यारोहाचा नाक्षत्रकाल. (त) तारकेचे कालांश = आदितारकेचे कालांश- (त) तारकेचे विषुवांश.

आदितारकेच्या कालांशास याम्योत्तरवृत्ताचे विषुवांश म्हणतात. म्हणून
(त) तारकेचे विषुवांश= याम्योत्तर वृत्ताचे विषुवांश (त) तारकेचे कालांश. याप्रमाणें मध्यारोकालीं कालदर्शकावरून तारकेचे विषुवांश आणितां येतात.

आकाशगोलावरील असंख्य तारकांचीं परस्परसापेक्ष अंतरें व ध्रुवस्थान दीर्घकालपर्यंत निश्चल किंवा बहुतेक निश्चल राहत असल्यामुळें तारकादिकांची यादी करातांना विषुवांश व क्रांति बहुतांशीं स्थिर असे स्थाननिर्देशक देण्याचाच प्रघात आहे.

म ध्या रो ह द र्श क व क्रां त्या न य न.- नाक्षत्रकालदर्शकाच्या साहाय्यानें कोणत्याहि तारकेचे विषुवांश ठरवितां येतात असें वर सिद्ध झालें आहे. विषुवांशसंबंधीं दुसरा सह निर्देशक ठरविण्यास तारकेच्या मध्यारोहकालीं तिचें उन्नतांश मापितात. मध्यारोहकालचे हे उन्नतांश काढण्याचें साधन मध्यारोहदर्शक यंत्र हें होय. यांतील दुर्बीण एका पूर्वपश्चिम अक्षाभोंवती याम्योत्तरवृत्ताच्या पातळींत फिरते. त्याच पातळींत एक कोनमापकवृत्त असून दुर्बिणीची दिशा ऊर्ध्वाधररेषेशीं किंवा दक्षिणोत्तररेषेशीं मध्यारोहदर्शनकालीं कोणता कोन करते हें त्या कोनमापकवृत्तावरून कळतें. म्हणजे मध्यारोहकलाचे तारकेचे नतांश किंवा उन्नतांश कळतात. आतां, मध्यारोह खस्वस्तिकाच्या दक्षिणेस असेल तर तारकची क्रांती= तारकेचें विषुवृत्तापासून लंबांतर.

=विषुववृत्ताचें खखस्तिकापासून लंबातर- तारकेची मध्यारोहकालचे नतांश.
=प्रेक्षकस्थलाचे अक्षांश- तारकेचे म. का. नतांश.

शेवटच्या वजाबाकीचें फळ धन किंवा ॠण असेल त्याप्रमाणें क्रांति उत्तर किंवा दक्षिण समजावी.
मध्यारोह खस्वस्तिकाच्या उत्तरेस असेल तर

तारकेची क्रांति = प्रे. स्थं. अक्षांश + तारकेचे म. का. नतांश. याप्रमाणें तारकेची क्रांति आणण्याची पद्धति आहे.

क्रां ति वृ त्त, वृ त्सं बं धीं स ह नि र्दे श क.- आकाशगोलाची लांकडी किंवा धातूची लहानशी प्रतिमा करावी तिच्यावर खध्रुवसंबंधीं सर्व वृत्तें काढावी व निरनिराळ्या अनेक लहानमोठ्या तारकांचीं, वेधानें आणलेल्या विषुवांश व क्रांति या निर्देशकावरून येणारीं स्थानें दर्शवावीं. अशा खगोलावर प्रत्येक दिवशीं सूर्याच्या मध्यारोहकालीं वेध करून त्याचे विषुवांश व क्रांति आणून त्याचें त्या दिवशीचें स्थान खगोलावर दर्शवावें. असें प्रतिदिनीं करीत गेल्यास असें दिसून येईल कीं, हीं सूर्याची सर्व स्थानें खगोलावरील एका बृहदवृत्तावर असतात व सूर्य प्रतिदिवशीं बृहदवृत्तावर पूर्व दिशेनें सुमारें १ अंश चळतो. म्हणजे तारकांसंबंधीं सूर्याची स्थिति निश्चल राहत नाहीं तर तारकासमूहांतून सूर्य पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करितो. सूर्याचा प्रवास आकाशगोलावरील ज्या वृत्तावरून होतो त्यांस क्रांतिवृत्त म्हणतात [आ. ५ पहा]. क्रांतिवृत्त व विषुववृत्त एकमेकांस ज्या दोन बिंदूंत छेदितत त्यांस संपातबिंदू म्हणतात. त्यांतील ज्या बिंदूंतून जातांनां सूर्य दक्षिणेकडून विषुववृत्ताच्या उत्तरेस जातो तो वसंतसंपात व दुसरा शरत्संपात होय. याच वसंतसंपाताच्या स्थानीं तारका मानून तिला आपण वर आदितारका म्हटलें आहे. वस्तुतः संपातस्थानीं अशी नेमकी तारका नाहीं. संपातबिंदूपासून ९० अंश अंतरावर असलेल्या क्रांतिवृत्तावरील बिंदूंपैकीं वसंतसंपाताच्या पूर्वेकडील तो दक्षिणायनारंभ बिंदु व दुसरा उत्तरायणारंभबिंदु होय.

आकाशगोलावरील क्रांतिवृत्ताच्या ध्रुवास कदंब म्हणतात (हा बहुधा विषुववृत्ताच्या उत्तरेकडील क्रांतिवृत्ताचा ध्रुव घेतात). कदंबासंबंधीं लंबवृत्तांस कदंबगामीवृत्तें म्हणावें. याच वृत्तांवर तारकांचीं क्रांतिवृत्तापासून लंबातंरें मोजतात. एखाद्या तारकेचें कदंबगामीवृत्त क्रांतिवृत्तास जेथें छेदितें त्या बिंदूचें वसंतसंपातापासून जें कोनात्मक अंतर (पूर्व दिशेनें मोजिलेलें) त्यास त्या तारकेचा सांपतिक भोग (सथ) म्हणतात. तारकेचें क्रांतिवृत्तापासून जें लंबांतर तें त्या तारकेचा शर (तळ) होय. भोग व शर सांगणें हा तारकेचे सहनिर्देशक सांगण्याचा चवथा प्रकार होय. सूर्य व ग्रह हे बहुतेक क्रांतिवृत्ताच्या मार्गानेंच प्रवास करीत असतात. म्हणून त्यांचें सहनिर्देशक या चवथ्या प्रकारानें सांगण्याचा प्रघात आहे. भोग व शर हे प्रत्यक्ष वेधानें कळणें कठिण असल्यामुळें विषुवांश व क्रांतीवरून गणितानें ते काढतात. क्रांतिवृत्तांशीं विषुववृत्ताचा जो कोन होतो त्यास क्रांतिवृत्ताचें तिर्यक्त्व म्हणावें. तें २३० २७’. ८२६-०.” ४६८; (इ. स. १९००) इतकें आहे.

संपातबिंदूचें क्रांतिवृत्तावरील स्थान स्थिर नाहीं. त्यास पूर्वेकडून पश्चिमेकडे अत्यंत मंदगति आहे. ही गति दरवर्षास ५०” २४८ + ०.०००२२२ (इ. स. वर्ष- १९००) इतकी आहे. यामुळें सुमारें २६००० वर्षांत संपाताचें क्रांतिवृत्तांतून एक परिभ्रमण होतें. या संपाताच्या गतीस संपातचलन किंवा अयनगति असें म्हणतात. क्रांतिवृत्ताचे ३०० चे १२ विभाग करितात. त्यांस राशि अशी संज्ञा आहे. त्याचप्रमाणें क्रांतिवृत्ताचे १३० २०’ ते २७ विभाग करतात त्यांस नक्षत्र अशी संज्ञा आहे.

रासिविभाग किंवा नक्षत्रविभाग वसंतसंपातामध्यें आरंभ मानून केल्यास त्यांस सायनराशि किंवा नक्षत्र म्हणतात. क्रांतिवृत्तावरील एखाद्या निश्चल बिंदूपासून त्यांचा, आरंभ मानिल्यास त्यांस निरयनराशि किंवा नक्षत्र म्हणतात व निश्चलबिंदु आणि वसंतसंपात यामंधील अंतरास अयनांश म्हणतात. भारतीय ज्योतिषांत रेवती नक्षत्रांतील योगतारा (म्हणजे तिच्या लंबवृत्ताचें व क्रांतिवृत्ताचें छेदस्थल) आरंभीं मानिली असून अयनांश स. १९२५ च्या आरंभीं १८० ४९’ ३६” इतके होते. तथापि आरंभस्थान व अयनांश यांच्याबद्दल बराच मतभेद असून कांहीं विद्वानांच्या मतें चित्रानक्षत्राच्या योगतारेसमोरील बिंदु आरंभस्तानीं मानावा असें आहे.

सू र्या ची दै नि क ग ति.- आकासगोलाचें परिभ्रमण चालू असतां सूर्यबिंबाचा मध्य क्षितिजावर पूर्वेकडे आला म्हणजे सूर्योदय, त्याचा मध्यारोहकाल हा मध्यान्ह, पश्चिमेकडील क्षितिजावर येणें हें सूर्यास्त व क्षितिजाखालील मध्यारोह काल ही मध्यरात्र होय. दिवस व रात्र या दोहोंस अहोरात्र म्हणतात. एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंतचा काल सर्वदा सारखा असत नाहीं. या कालाचें जें सरासरीचें मान त्यास सावनदिवस म्हणतात किंवा दोन मध्यान्हामधील कालाच्या सरासरी मानास मध्यमसावनादिवस म्हणतात. सूर्य सुमारें १० इतका प्रतिदिवशीं क्रांतिवृत्तांत पूर्वेकडे ढळतो, म्हणून एका मध्यान्हकालापासून आकाशगोलाची १ फेरी पूर्ण झाली तरी मध्यान्हकाल येत नाहीं. तो आकाशगोल आणखी १० पश्चिमेकडे फिरल्यावर येतो. या कारणामुळें सावनदिवस व नाक्षत्रदिवस हे कालविभाग सारखे नाहींत. मध्यम सावन दिवसाचे तास, मिनिटें, सेकंद हे विभाग करितात ते प्रसिद्ध आहेत. (१) नाक्षत्र दिवस म्हणजे मध्यम सावनमानाचे २३ ता. ५६ मि. ४. ०९० से. (२) म. सावन दिवस म्हणजे नाक्षत्रमानाचे २४ ता. ३ मि. ५६. ५५६ सेकंद.

सू र्या ची वा र्षि क ग ति.- क्रांतिवृत्ताची वसंतसंपातासंबंधानें एक पूर्ण फेरी करण्यास सूर्याला जो काल लागतो तें सांपातिक वर्षमान होय व निश्चल आरंभ बिंदूसंबंधानें एक पूर्ण फेरी करण्यास लागणारा काल हें निरयन किंवा नाक्षत्र वर्षमान होय. संपात प्रतिवर्षी सूर्यगतीच्या उलट दिशेस सरकत असल्यामुळें सांपातिक वर्षमान नाक्षत्रवर्षमानापेक्षां किंचित् लहान आहे. त्याचीं मध्यमसावनमानें खालीं दिलीं आहेत. सांपातिकवर्ष= ३६५. २४४४००८ दि. - ०.००००००००६२४ (इ. सन-१८५०) दि. नाक्षत्रवर्ष ३६५. २५६३५८२ दि.

 
क्रांतिवृत्त विषुववृत्ताशीं २३० २७’ अंश इतका कोन करितें यामुळें सूर्य क्रांतिवृत्ताच्या मार्गानें फिरत असतां क्रांति सारखी बदलत असते व तीं कधीं उत्तर तर कधीं दक्षिण असते. तिचें दक्षिण किंवा उत्तर परममान क्रांतिवृत्ताच्या तिर्यक्त्वाबरोबर (म्हणजे २३०२७’ सुमारें) असतें.

सूर्याचे विषुवांश व क्रांति यांचे पुढें दिल्याप्रमाणें वर्षांत फेरबदल होतात. [आ. ६ पहा.]

 तारीख  विषुवांश  क्रांति
 मार्च २१ (वासंतिक विषुवान)  ००  ००
 मार्च २१ ते जून २२  ०० ते ९००  ०० ते २३० २७’ (उत्त.)
 जून २२ (दक्षि. आरंभ)  ९००  २३० २७’ (उत्तर)
 जून २२ ते सप्टेंबर २३  ९०० ते १८००  २३० २७’ ते ०० (उत्त.)
 सप्टेंब. २३ (शरद् विषुवान)  १८००  ००
 सप्टेंबर २३ ते डिसें. २२  १८०० ते २७००  ०० ते २०३ २७’ (द.)
 डिसें. २२ (उत्त. आरंभ)  २७००  २३० २७’ (द.)
 डिसें. २२ ते मार्च २१  २७०० ते ३६००  २३० २७’ ते ०० (द.)

मार्च २१ व सप्टें. २३ या सुमाराच्या ज्या क्षणीं क्रांति ०० होत त्या क्षणास वासंतिक व शारद विषुवान् म्हणतात. व जून २२ व डिसेंबर २२ य सुमारच्या ज्या दोन क्षणीं क्रांति परम मानाची असते त्यांस दक्षिणायनारंभ व उत्तरायणारंभ म्हणतात. कारण डिसेंबर २२ पासून जून २२ पर्यंत सूर्य उत्तरेकडे ढळत असतो व जून २२ पासून डिसेंबर २२ पर्यंत तो दक्षिणेकडे ढळत असतो.

सूर्याची ध्रुवच्युति ९००- सूर्यक्रांति (उ) किंवा ९०० + सूर्यक्रांत (द.) तेव्हां सूर्याची कमीत कमी ध्रुवच्युति ९००-२३० २७’ =६६० ३३’ (दक्षि.का.) व सूर्याची जास्तीत जास्ती ध्रुवच्युति ९०० + २३० २७’ =११३० २७’ (उत्त. का.)

पृ थ्वी चे पां च क टि बं ध.- आतां प्रेक्षक स्थलाचे अक्षांश जर ६६० ३३’ पेक्षां अधिक असतील (आ. ७ पहा.) तर सूर्याचा दैनिक मार्ग दक्षिणायनारंभकालीं व त्याच्या आधीं व मागून कांहीं दिवस सतत क्षितिजावरच असेल. म्हणजे तितके दिवस सूर्य मुळींच मावळणार नाहीं. तसेंच उत्तरायणारंभकालीं व त्याच्या आधीं व मागून कांहीं दिवस तो मार्ग सतत क्षितिजाखालीं असेल; म्हणजे तितके दिवस सूर्य उगवलेलाच दिसणार नाहीं. या दोन प्रकारच्या कालास संततदिन आणि संततरात्रि असें म्हणतात. संतत दिन व संततरात्रि यांमधील कालांत सूर्योदय-सूर्यास्त विभिन्न दिनरात्री होत असतात. दोन्ही विषुवदिवशीं सूर्य मार्गाचा निमा भाग क्षितिजाखालीं व निमा वर असतो; म्हणून दिनमान व रात्रिमान समान असतात. संतत दिनानंतर प्रथमतः दिनमान रात्रिमानापेक्षां मोठें व नंतर हळू हळू कमी होत जाऊन रात्रिमानाएवढें व नंतर आणखी कमी होऊन रात्रिमानापेक्षां लहान होतें व मग संतत रात्रीस सुरुवात होते. ही स्थिति अक्षांश ६६० ३३’ ते ९०० या भूभागांत होते. यांत सूर्यकिरण क्षितिजाशीं नेहमींच लहान कोन करितात म्हणून त्या भागास सूर्याची उष्णता फार कमी प्राप्त होते व संततरात्रींत मुळींच प्राप्त होत नाहीं. यामुळें पृथ्वीच्या या भागास शीतकटिबंध असें म्हणतात. असे भाग उत्तर व दक्षिण या दोन्ही गोलार्धात आहेत. प्रेक्षक स्थल २३० २७’ ते ६६० ३३’ या अक्षांशवृत्तांच्यामध्यें कोठे असेल (आ. ८ पहा) तर दैनिक सूर्य मार्ग वर्षांत कोणत्याहि दिवशीं कांहीं भाग क्षितिजावर व कांहीं खालीं असा असेल.

मात्र सूर्याचा मध्यारोह केव्हांहि खस्वस्तिकाच्या उत्तरेस असणार नाहीं; तो दक्षिणेस कललेला असेल. अर्थात सूर्य अगदीं डोक्यावर असा कधींच येणार नाहीं. उत्तरायणांत दिनमान वाढतें व दक्षिणायनांत उत्तरेंत असें असेल. एकंदरींत या भागांत सूर्याचे किरण लंबरूप असे कधींच नसतात. म्हणून या भूभागास समशीतोष्णकटिबंध म्हणतात. असे भाग उत्तर व दक्षिण या दोन्ही गोलार्धांत आहेत. प्रेक्षकस्थल जर ०० ते २३० २६’ या अक्षांशवृत्तांमध्यें असेल [आ. ९ पहा]. तर दैनिक सूर्यमार्ग वरच्याप्रमाणेंच प्रतिदिनीं दुभागला जाईल. सूर्याचा मध्यारोह अगदीं खस्वस्तिकासन्निध केव्हां तरी होतो व बरेच दिवस सूर्य त्यापासून मध्यारोहकालीं फार दूर नसतो. यामुळें या भागांत सूर्याचे किरण बरेंच दिवस जवळ जवळ लंबरूप असतात. म्हणून हा भाग सर्वांत अधिक तापतो. या भागास उष्णकटिबंध म्हणतात. दक्षिण व उत्तर गोलार्धांतील हे विभाग एकास एक लागून आहेत. प्रत्यक्ष ध्रुवस्थानीं अर्धें वर्ष दिवस व अर्धें वर्षे रात्र अशी स्थिति असते. तसेंच प्रत्यक्ष भूमध्यवृत्तावर नेहमींच दिनमान व रात्रिमान समसमान असतात.

ॠ तु मा न.- वासंतिक विषुवदिनाच्या सुमारास पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रिमान समसमान असतें. नुकताच हिवाळा झालेला असतो. त्यामुळें, सूर्याच्या उन्हाची प्रखरता बेताची व सुखद असते. म्हणून या कालास वसंतॠतु म्हणतात. नंतर पुढें उन्हाची प्रखरता वाढत्या दिनमानामुळें व अधिकाधिक लंबरूप सूर्यकिरणामुळें वाढत जाऊन दक्षिणायनारंभकाळीं व त्यापुढें कांहीं दिवस ती फारच होते. हा काळ उन्हाळ्याच्या होय. नंतर दिनमान उतरतें, व उन्हाळ्यांत हवेंत सांचलेली पाण्याची वाफ वातावरण निवत चालले म्हणजे पुन्हां जलरूप होऊन शारदसंपाताच्या सुमारास व त्याआधीं पावसास सुरुवात होते. हा पावसाळा होय. या पुढें दिनमान रात्रिमानापेक्षां कमी होतें व सूर्यकिरण अधिकाधिक कलते होत जातात. म्हणून वातावरणांत उष्णाता फारच थोडी राहून उत्तरायणारभीं व त्याच्या आधीं व पुढें कांहीं दिवस हिवाळ्याचा काळ असतो. ॠतूंचें हें सामान्य विवेचन झालें. देशाच्या विशिष्ट परिस्थितीमुळें ॠतुचक्रांत फार मोठे फरक पडतात. भारतीय ज्योतिषांत ॠतु ६ असून वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर अशीं त्यांचीं नांवें आहेत.

पृ थ्वी चें सू र्या भों व ती प रि भ्र म ण.- पृथ्वी आपल्या आंसाभोंवतीं गिरक्या घेत एका ठिकाणीं स्थिर असून सूर्य पृथ्वीभोंवतीं एक वर्षांत पूर्ण प्रदक्षिणा करितो ही सूर्याच्या दृश्य गतीवरून प्रथमतः सुचणारी कल्पना होय. कोपर्निकसाच्या कालापर्यंत हीच शास्त्रांत रूढ होती. नंतर सूर्य स्थिर असून पृथ्वी सूर्याभोंवती फिरते ही कल्पना कोपर्निकसानें काढली. दोन्ही कल्पनांप्रमाणें सूर्याच्या दृश्य गतींत कांहीं फरक पडत नाहीं. तेव्हां या दोहोंपैकीं कोणती खरी हा बरेच दिवस वादाचा प्रश्न होता. परंतु आतं एका मागून एक अशीं अनेक प्रमाणें मिळून सूर्याच्या स्थिरत्वाची कल्पना निर्विवाद खरी ठरली आहे. केप्लरनें अनेक वर्षांच्या वेधावरून या कल्पनेस पुष्टि दिली. पृथ्वीच्या गतीसंबंधानें त्यानें दोन नियम सिद्ध केले; ते असे.

पहिला नियम:- पृथ्वीचा मार्ग म्हणजे तिची कक्षा क्रांतिवृत्ताच्या पातळींत दीर्घवर्तुलाकार अशी असून त्या दीर्घवर्तुलाच्या एका केंद्रांत सूर्य आहे.

दुसरा नियम:- पृथ्वीचें सूर्यापासून अंतर म्हणजे तिचा मंदकर्ण पृथ्वी सूर्याभोंवती फिरत असतां समानकालांत समान क्षेत्रें निर्मितो.

हे दोन नियम स्थापण्यास केप्लरनें सूर्याचा भोग व बिंबव्यास यांचे प्रतिमध्यान्हीं वेध घेऊन त्यांवरून प्रतिमध्यान्हीचे मंदकर्ण (क) व भोग (अ) हे काढिले ते असे. पृथ्वीपासून सूर्य ज्या मानानें दूर किंवा जवळ असेल त्यामानानें बिंबव्यास (ब) लहान किंवा मोठा असेल. म्हणजे क बिंबव्यासावरून याप्रमाणेंक ची सापेक्ष किंमत समजते. आतां दीर्घवर्तुळाचा केंद्र व बृहदक्ष यांच्यासंबंधानें दीर्घवर्तुळाचें समीकरण 

[प= पार्श्वकर्ण, क= मंदकर्ण, भ= भोग (बृहदक्षापासून), च =च्युति] असें होय. अनेक वेधांनीं प्राप्त झालेल्या क व भ च्या कोणत्याहि दोन मध्यान्हींच्या किमती या समीकरणांत क व भ ला दिल्या तर त्यावरून प व च यांच्या ज्या किंमती निघतात त्या कोणत्याहि दोन मध्यान्हींच्या किंमतीवरून त्याच त्या येतात. अर्थात् क व भ च्या वेधप्राप्त किंमतींनीं दीर्घवर्तुळाच्या समीकरणाची पर्याप्ति होते. म्हणून पृथ्वीची कक्षा दीर्घवर्तुळ असून सूर्य तिच्या केंद्री आहे हें सिद्ध झालें. आतां लागोपाठ दोन मध्यान्हींचे क व भ हे क१, भ१, क२, भ२ असे आहेत. तर एक दिवसांत मंदकर्णानें व्यापिलेल्या क्षेत्राची अंतिसंन्निध किंमत


ही होय. क्षेत्राची किंमत प्रतिदिवशीं तीच तीच येते. यावरून दुसरा नियम सिद्ध होतो. या समीकरणांतून मिळणारी च्युतीची किंमत ०.०१६७८३६ म्हणजे सुमारें १/६ येते. म्हणजे भूकक्षेचें दीर्घवर्तुळ जवळजवळ वर्तुळाकार आहे.

सूर्याचे लघुतम व महत्तम बिंबव्यास अनुक्रमें ३१’ ३२” व ३२’ ३६” होत. लघुतम बिंब असतें तेव्हां महत्तम मंदकर्ण असतो. त्यावेळीं पृथ्वी स्वकक्षेचया उच्ची आहे असें म्हणतात. तसेंच महत्तम बिंब असतां लघुतम मंदकर्म असतो व त्यावेळीं पृथ्वी नीची आहे असें म्हणतात. उच्च व नीच स्थानें ही बृहदक्षाचीं अग्रें होत. म्हणून बृहदक्षास नीचोच्च रेषाहि म्हणतात. नीचोच्च रषा स्थिर नाहीं. तिला मंद गति आहे. पृथ्वीच्या गतीची जी दिशा त्या दिशेंतील गतीला मार्गगति व उलट दिशेंतील गतीला वक्रगति अशीं नांवें आहेत. नीचोच्चरेषेला वार्षिक सुमारें ११” मार्गगति आहे व संपातरेषेस वार्षिक ५०” वक्रगति आहे. म्हणून संपातरेषा व नीचोच्च रेषा यांमधील कोन प्रतिवर्षी १’ १’ (सुमारें) असा वाढतो. नीचोच्चासंबंधीं पृथ्वीच्या पूर्ण प्रदक्षिणेस लागणार्‍या कालांस केंद्राश्रित वर्ष म्हणतात. याचें मान नक्षत्रवर्षापेक्षां ४ मि. ३९.१२ सेकंद अधिक आहे.

पृथ्वीच्या मध्यापासून सूर्याची (किंवा कोणत्याहि खस्थ पदार्थाची) दिशा व प्रेक्षकस्थलापासून दिसणारी दिशा यांतील अंतरास सूर्याचें (किंवा त्या स्वस्थ पदार्थाचें) लंबन म्हणतात. आतां भूमध्य (भू), रवि (र) व प्रेक्षक (प्र) या त्रिकोणावरून

चं द्र ग ति.- चंद्राचा आकाशांतील दृश्य मार्ग आकाशावरील एक बृहद्वृत्त होय. हें क्रांतिवृत्ताशीं ५० ८’ इतका (सुमारें) कोन करितें. या दोन वृत्तांच्या छेदबिंदूस राहु व केतु अशीं नांवें आहेत. चंद्राचा भोग ०० पासून ३६० वाढण्यास जो काल लागतो त्यास (म्हणजे नक्षत्रासंबंधीं पूर्ण परिभ्रमणास) नाक्षत्रमास म्हणतात. चंद्राचा भोग- सूर्याचा भोग यास तिथ्यंश म्हणतात. तिथ्यंश० पासून ३६० पर्यंत वाढण्यास जो काल लागतो त्यास सामान्यतः चांद्रमास म्हणतात. तसेंच राहूसंबंधीं भोग ३६०० नीं वाढण्यास लागाणारा काल हा पाताश्रति मास होय. या मासांचीं मध्यम सावन मानें अशीः-

सांपातिक नाक्षत्रमास (मध्यम मान)
२७ दि ७ ता. ४३ मि. ४. ६८ सेकंद निरयन ना. मा. (म. मान.) २७ दि. ७ ता. ४३ मि. ११.५४५ से. चांद्रमास (मध्यम मान) २९ दि. १२ ता. ४४ मि. २. ८६४ से. पाताश्रित मास (म. मान) २७ दि. ५ ता. ५ मि. ३५. ८१ से.

चांद्रमासाचे शुक्ल व कृष्ण असे २ पक्ष असतात. प्रत्येकांत १५ तिथी, असतात. एक तिथि म्हणजे तिथ्यंश १२० नीं वाढण्यास लागणारा काल शु. प्रतिपदेंत ०० पासून १२० पर्यंत, व शु. द्वितीयेंत १२० ते २४० पर्यंत, असें तिथ्यंश वाढतात.

पौर्णिमेस तिथ्यंश १८०० असतात म्हणजे सूर्य व चंद्र आकाशगोलावर जवळ जवळ समारोसमार म्हणजे १८०० अंतरावरील शरसूत्रावर असतात. अमावास्येस तिथ्यंथ ३६०० किंवा ०० असतात. म्हणजे सूर्य व चंद्र एकाच शरसूत्रावर असतात. चंद्रमार्ग क्रांतिवृत्तांशीं तिरकस असल्यामुळें पौर्णिमा अथवा अमावास्येच्या वेळीं चंद्रसूर्य अगदीं समारोसमोर किंवा अगदीं एकत्र नसतात. ज्या वेळीं चंद्र राहु किंवा केतूजवळ असेल त्या वेळीं त्याचा शर अल्प असतो. अशा वेळीं पौर्णिमा असली तर सूर्यानें पाडिलेली पृथ्वीची छाया चंद्रावर पडून चंद्रग्रहण होतें व अमावास्या असली तर चंद्र सूर्याच्या आड येऊन, सूर्यग्रहण होतें. ग्रहणासंबंधीं विशेष माहिती ‘ग्रहण’ या शब्दाखालीं दिली आहे. चंद्र पृथ्वीभोंवती फिरत असतां त्याचें सूर्याभिमुख अंग प्रकाशित असतें या प्रकाशित अंगाचा पूर्ण भाग पौर्णिमेस पृथ्वीसन्मुख असतो. म्हणून त्या दिवशीं चंद्रबिंब पूर्ण असतें. अमावास्येस प्रकाशित अंग पृथ्वीपराङ्मुख असतें. त्या दिवशीं चंद्र दिसत नाहीं. अमावास्येनंतर प्रकाशित अंगाचा थोडथोडा भाग द्दग्गोचर होत जातो. पौर्णिमेस सर्व प्रकाशित भाग दिसतो. नंतर तो कमी कमी होत जाऊन अमावास्येस पार नाहींसा होतो. चंद्रबिंबाच्या प्रकाशित भागास चंद्राची कला म्हणतात. चंद्राची अंतराकालांतील वास्तविक गति पृथ्वीच्या सूर्यसंबंधीं गतीप्रमाणेंच दीर्घवर्तुलाकार कक्षेंत असते व त्या दीर्घवर्तुलाच्या केंद्रीं पृथ्वी असते. चंद्राचा मंदकर्ण (भू. चंद्ररेषा) समान कालांत समान क्षेत्रें आक्रमितो. चंद्राच्या कक्षेची नीनोच्चरेषा मार्गगतीनें चंद्रकक्षापातळींत फिरते. तिच्या एका नाक्षत्रभ्रमणास ३२३२.५७५ दिवस लागतात. चंद्रकक्षा व भूकक्षा यांच्या पातळ्यांची छेदरेषा ही पातरेषा होय. ही वक्रगतीनें भूकक्षापातळींत फिरते. तिच्या एका नाक्षत्रभ्रमणास ६७९३.३९१ दिवस लागतात. चंद्रकक्षेची च्युति ०. ०५४९१ (सुमारें१/१८) इतकी आहे. अर्थात चंद्रकक्षा जवळ जवळ वर्तुळाकार असते. चंद्राचें क्षैतिजलंबन ५७’ २”. ७०७ आहे. यावरून सूर्य व पृथ्वी यांचें अंतर ज्या पद्धतीनें काढलें त्या पद्धतींनें चंद्र व पृथ्वी यांचें अंतर २,३८,८४० मैल येतें. हें पृथ्वीच्या व्यासार्धाच्या सुमारें ६ पट व सूर्य व पृथ्वी यांच्या अंतराच्या सुमारें ४०० व्या भागाइतकें आहे. चंद्राचा व्यास २,१६२ मैल आहे.

ग्र हां च्या ग ती.- सूर्य व चंद्र यांखेरीज तारकासमूहांतून भ्रमण करणारे दूसरे दिव्य गोल म्हणजे ग्रह होत. हे बुध, शुक्र, मंगळ, लघुग्रह, गुरु, शनि, प्रजापति (युरनेस किंवा हर्शल) व वरुण (नेप्चुन) हे मुख्यतः असून त्यांचे बहुतेकांचे एक किंवा अनेक उपग्रह आहेत. शिवाय कांहीं धूमकेतूहि नियमितपणें संचार करणारे आहेत. चंद्रसूर्य व बुधादि ग्रह यांच्या भासमान गतींतील मुख्य फरक हा कीं चंद्रसूर्याचा भासमान भोग नेहमीं वृद्धिंगत होतो. म्हणजे त्यांची भासमान गति मार्गी असते. परंतु ग्रहांची भासमान गति कधीं मार्गी तर कधीं वक्री असते. ग्रहभोग-रविभोग या अंतरास इनान्तर म्हणतात. इनांतर शून्य असतां रवि व ग्रह यांची युति झाली असें म्हणतात. इनांतर १८० ०  
असतां रवि व ग्रह यांची वियुति झाली असें म्हणतात. दोन लागोपाठ होणार्‍या युती किंवा वियुती यांमधील कालास युत्यंतर्गत भ्रमणकाल म्हणतात. ग्रहांच्या अंतरालांतील वास्तविक गतीसंबंधीं केप्लरनें अनेक वर्षांच्या परिश्रमानें शोधून काढलेले सिद्धांत असेः-
पहिला सिद्धांत:- ग्रहकक्षा दीर्घवर्तुलाकार असते व तिच्या केंद्री सूर्य असतो.
दुसरा सिद्धांत:- ग्रहाचा मंदकर्ण (रवि व ग्रह यांस जोडणारी रेषा) समान कालांत समान क्षेत्रें आक्रमितो.
तिसरा सिद्धांत:- ग्रहांच्या नाक्षत्र  (सूर्य मध्यस्थ प्रेक्षकाचे संबंधीं) भ्रमणकालांचे वर्ग त्यांच्या मध्यमांतरांच्या (सूर्यापासून सरासरी पद्धतीनें निघणार्‍या ग्रहाच्या अंतरांच्या) घनांच्या प्रमाणांत असतात.

भ्र हा जर ग्रहाच्या नाक्षत्रभ्रमणकाल आणि व हें वर्षमान घेतलें तर मध्यममानानें एक दिवसांत ग्रहाच्या मंदकर्णाची गति व ३६०/ भ्र व पृथ्वीच्या मंदकर्णाची  ३६०/ व इतकी होईल. म्हणजे ग्रह व पृथ्वी यांच मंदकर्णामदील कोन ३६००/भ - ३६०० /व इतक्या अंशांनीं वाढेल. हें अंतर ३६०० वाढण्यास लागणारा काल युत्यंतर्गतभ्रमणकाल य होय. अर्थात्  १/भ्र – १/व =१/ य यावरून य माहीत झाल्यावर भ्र कळतो.

अंतरकालांत ग्रहकक्षा निश्चित करण्यास ६ मूलमानें माहीत असावीं लागतात. तीं- (१) कक्षेचा बृहदक्षार्ध; म्हणजेच ग्रहाचें सूर्यापासून सरासरीपद्धतीचें मध्यमांतर (२) च्युति; ही उच्चमंदकर्ण- नीचमंदकणर्ण/ २ X मध्यमांतर इतकी असते. (३) उत्पातभोग. ग्रहकक्षा व भूकक्षा यांच्या पातळ्यांची छेदरेषा ही पातरेषा होय. पातरेषा ही ग्रहकक्षेस उत्पात व अवपात अशा दोन बिंदूंत छेदिते. जेथें ग्रह भूकक्षेच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो तो उत्पातबिंदु. उत्पातबिंदूचा भोग तो उत्पातभोद. (४) नीचभोग, हा उत्पातभोग +उत्पातदिशा व नीचदिशा यांतील कोन असा मिश्र कोन असतो. (५) कक्षातिर्यक्त्व- ग्रहकक्षा व भूकक्षा यांच्या पातळ्यांमधील कोन. (६) नीचस्थितिकाल, ग्रह नीचीं असण्याची एक वेळ.

पुढील विवरणांत सर्वत्र कोन हे चापीय मानांत घेतले आहेत. वृत्तपरिधि व व्यास यांचें गुणोत्तर ३.१४१५९ असतें. याब्ददल अ ही संज्ञा योजूं. चापीयमानचा (आ. १० पहा.) एकक म्हणजे त्रिज्यातुल्य चापासमोरील वृत्तमध्यस्थकोन यांत ५७० १७’ ४५” =३ ४३७’ ४५”= २०६२६५” असतात. ३६०० अंशाचें चापीयमान २ व होय. दिनात्मक भ्रमणकालानें २ व ला भागिलें म्हणजे ग्रहाची मध्यमदिनगति येते. म्हणजे ग्रह समपरिवेगानें स्वकक्षेंत फिरतो असें मानल्यास त्याची ज्या परिवेगानें त्याच भ्रमणकालांत एक पूर्ण फेरी होईल तो परिवेग मध्यमदिनगति होय. या गतीनें येणारें ग्रहाचें स्वकक्षेंतील स्थान मध्यमग्रहस्थान होय. व कक्षंतील त्याचें वास्तविक स्थान मंदस्पष्टग्रह होय. मंदस्पष्टग्रहापासून कक्षेच्या बृहदक्षावर काढिलेली लंब रेषा बृहदक्षास व्यास कल्पून काढिलेल्या वृत्तास ग्रहाच्या बाजूलाच ज्या बिंदूंत छेदिते त्याची ‘कक्षामध्यगदिशा व बृहदक्षदिशा यांतील कोनास च्युतमंदकेंद्र म्हणतात. मंदकर्ण (स्पष्ट ग्रहाचें सूर्यगत अंतर) व बृहदक्ष यांतील कोनास स्पष्टमंदकेंद्र म्हणतात. मध्यमग्रहांची सूर्यगत दिशा व बृहदक्ष यांतील

उ= उज्च, न= नीच, म =कक्षामध्य, र= कक्षाकेंद्र, ग= ग्रह, घमन= ई, गरन= फ , सरन= म .

कोनास मध्यममंदकेंद्र म्हणतात. पुढील विवरणांत खालील अक्षरसंज्ञा योजिल्या आहेत. अ= बृहदक्षार्ध, ल= लघ्वक्षार्थ, च= च्युति, उ= उत्पातभोग न= नीचभोग. त= कक्षातिर्यक्त्व, नी= नीचस्थितिकाल, ग= मध्यमदिनगति. भ्र= भ्रमणकाल, इ =च्युतमंदकेंद्र, फ= स्पष्टमंदकेंद्र, म= मध्यममंदव्रेच्द, भ= स्पष्टग्रहभोग, क= मंदकर्ण, द= नीच स्थितिकालापासून दिवस. भुज =भुजज्या, कोभु= कोभुजज्या, मील= मीलन किंवा स्पर्शरेषा.

प्रथमतः ग २ अ/ भ्र (१)

तसेंच शंकुछिन्न भूमितीवरून


(३), (४) आणि (६) या समीकरणांवरून मध्यम मंदकेंद्र म दिलें असतां च्युतमंदकेंद्र इ व इ वरून स्पष्टमंद केंद्र फ आणि मंदकर्ण क हे काढितां येतात.

च्युति च ही सर्व ग्रहकक्षांची बहुधा लहान अपूर्णांकच असते म्हणून वरील सूत्रांवरून फ आणि क च्या किंमती वर्धमान च घातयुक्त अनंतपदमालेच्या रूपानें देतां येतात. च च्या तृतीयघातापर्यंत त्या पदमाला खालीं दिल्या आहेत.

मील (भ०-उ)= मील (फ+ ज -उ) कोभु त (९)

मील श०= मील त भु ज (भ०-३) (१०)

याप्रमाणें भ० आणि श० कळतात. भू आणि चंद्र याचे भोगशर काढण्यास वरील समीकरणें पुरीं होतात.

रविमध्यस्थ ग्रहावरून भूमध्यस्थ ग्रह काढतात तो असा:-

आकृतीत [आ. १२] र= रवि, भू =पृथ्वी, ग= ग्रह, गघ= क्रां. वृ. पातळीवर लंब, रस, भूस= संपातदिशा. म्हणून

सरघ= भ०, गरिघ= श०

सभूघ= भ= भमध्यस्थ भोग; गभू=ग श= भूमध्यस्थशर आतां जर रवीचा भोग भ असेल तर. भूरघ= भ- भ+ १८०; रभूघ= (ञ-भ). तसेंच रग= क, भूग= ख= भूमध्यस्थ कर्ण (चलकर्ण); र- भू= क. तेव्हां रगध व भूगध या त्रिकोणांवरून ख भुज श= क भुज श० (११)

व रगभू या त्रिकोणावरून ख कोभु श कोभु (भ- भ)= क कोभु श० कोभु (भ०- भ)+ क (१२) ख कोभु श भुज (भ-भ)= क कोभु श०X भुज (भ०- भ) (१३) (११), (१२), (१३) यांवरून, भ, श, ख हे कळतात.

भूमध्यस्थ भ नेहमीं वाढत नाहीं. कधीं वाढतो तेव्हां ग्रह मार्गी आहे व कधीं कमी होतो तेव्हां ग्रह वक्री आहे असें म्हणतात.

का ल सा ध न.- समीकरण (७) वरून ग्रहाचा परिवेग (उच्चवर्ग व अधिक मोठे घात उपेक्षून).

इतका येतो. अर्थात ग्रहगति क्रांतिवृत्तांत सम परिवेगानें होत नाहीं.

कालसाधनासाठीं क्रांतिवृत्तांत सम परिवेगानें फिरणारा मध्यम रवि व चल परिवेगानें फिरणारा स्पष्ट रवि [हे आ. नं. १३ मध्यें र व म० या अक्षरांनीं दाखविले आहेत] यांतून विषुववृत्तावर लंबरूप क्रांतिसूत्रें काढावीं. यांपैकीं र हा याम्योत्तर वृत्तावर आल म्हणजे स्पष्ट मध्यान्ह होतो. संपात स पासून सम= सम० घेऊन जो म बिंदू होतो त्यास विषुववृत्तस्थ मध्यम रवि म्हणतात. हा म जेव्हां याम्योत्तर वृत्तावर येतो तेव्हां  मध्यम माध्यान्ह होतो. र, म०, आणि ख यांची क्रांति सूत्रें विषुववृत्तांस ल, व आणि म या बिंदूंत छेदितात. लम हा स्पष्ट रवि आणि मध्यम रवि यांच्या कालांशांतील फरक होय या फरकाची जी कालात्मक किंमत तिला वेलासंस्कार म्हणतात. हा संस्कार वम आणि वल या कालांशांच्या कालात्मक किंमतींतील फरकावर अवलंबून असतो.

जर भ हा सूर्याचा भोग (मध्यम) असला तर एका सेकंदांत वेलासंस्कार= ९० भुज (भ)+ ४५२ कोभु (भ) - ५९२ भुज (२भ) (१५). घड्याळ लावण्यास स्पष्ट सूर्य याम्योत्तर वृत्तावर आल्याबरोबर घड्याळांत वेलासंस्काराइतकी वेळ दाखवावी. म्हणजे व्यवहारोपयोगी मध्यमकालदर्शक घड्याळ झालें.

ल घु ग्र ह, उ प ग्र ह आ णि धू म के तू.- लघूग्रह हे मंगल व गुरू यांच्या कक्षांमधील अंतरकालांत सूर्याभोंवतीं भ्रमण करणारे अनेक लहान ग्रह होत. यांच्या शोधाचा इतिहास थोडा चमत्कारिक आहे. तीन ह्या संख्येपासून दुपटीनें वाढत जाणार्‍या संख्यांची पंक्ति पहिल्या ठिकाणीं ० मांडावी जसें:-
 ०, ३, ६, १२, २४, ४८, ५६, १९२
या प्रत्येक संख्येंत ४ मिळविले म्हणजे
४, ७, १०, १६, २८, ५२, १००, १९६

अशी पंक्ति तयार होते. हे आंकडे, बुध, शुक्र, भू, मंगळ, - गुरू, शनि- या ग्रहांच्या कोटिमैलात्मक अंतराचेच स्थूलमानाचे आंकडे येतात ही गोष्ट बोड नामक ज्योतिष्यानें निदर्शनास आणिली. त्यावरून मंगळ व गुरू यांच्या मध्यें सूर्यापासून २८ कोटी मैल अंतरावर एखादा ग्रह असावा व शनीच्या पुढें सूर्यापासून १९६ कोटि मैल अंतरावरहि एखादा ग्रह असावा, व त्याच्याहि पुढें आणखी ग्रह असावे अशी कल्पना उदय पावली. स. १७८१ मध्यें हर्शलला प्रजापति ग्रह सांपडला व तो जवळ जवळ १९६ कोटि मैलांवर आहेहि. यामुळें वरील कल्पना बळावली. सन १८०१ मध्यें पिआझीला एक ग्रह सांपडला तो २६ कोचटि मैल अंतरावर आहे असें सिद्ध झालें. त्याचें नांव सीरीझ ठेविलें व तोच पूर्वीं न सांपडलेला ग्रह होय असें प्रथमतः सर्वांस वाटलें. परंतु पुढें तितक्याच अंतरावर दुसरे अनेक ग्रह बहुधा प्रतिवर्षीं सांपडूं लागले. त्यांची संख्या आतां ७०० वर गेली आहे. हे सर्व लहान गोल आहेत. एका मोठ्या ग्रहाचे कांहीं कारणानें तुकडे होऊन त्याचा तो भुगा त्या ग्रहाच्या कक्षेंत पसरून सूर्याभोंवतीं फिरत असावा अशी आतां या लघुग्रहासंबंधीं कल्पना बनली आहे.

बुध व शुक्र यांखेरीज सर्व ग्रहांभोंवतीं फिरणारे जे ग्रह आहेत त्यांस उपग्रह म्हणतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह होय. त्याच्या गतीचें वर्णन मागें आलेंच आहे. मंगळास २, गुरुस८, शनीस १०, प्रजापतीस ४ व वरुणास १ असे उपग्रह आजपर्यंत माहीत झाले आहेत. हे बहुतेक लहान पण कांहीं चंद्राएवढे व एक थोडा पृथ्वीहून लहान असे आहेत.

धू म के तू.- हे अतिदीर्घवर्तुळकक्षेंत व क्रांतिवृत्तांशीं बर्‍याच तिरप्या असलेल्या पातळींत फिरणारे बहुतेक वायुमय असे दिव्य पदार्थ होत. हे जसजसे सूर्याजवळ येतात तसतसे त्यांस सूर्याच्या उलट दिसेला तेजोमय फवारे अनेक प्रकाराच्या आकारांचे फुटूं लागतात. यांस शेंडेनक्षत्र असेंहि म्हणतात; यांपैकीं कांहीं सूर्यमालेंत कायमचे नियमित रीतीनें भ्रमण करणारे आहेत व कांहीं अतिदूर प्रदेशांतून येऊन सूर्यास वळसा घालून पुन्हां अति दूर प्रदेशांत गडप होतात. सूर्यमालेंत कायम झालेले प्रमुख धूमकेतू, हॅले व एन्के यांचे धूमकेतू होत. सूर्याभोंवतीं लघुग्रह व कायमचे धूमकतू व ग्रहाभोंवतीं उपग्रह केप्लरच्या नियमानुसार भ्रमण करतात.

गु रु त्वा क र्ष ण.- प्रख्यात जगद्वंद्य गणिती न्यूटन यानें असें सिद्ध करून दाखविलें कीं, केप्लरचे नियम हे एका सार्वत्रिक नियमाचे परिणाम होत. तो नियम सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा नियम होय. तो असा: कोणतेहि दोन द्रव्यकण एकमेकांस एकमेकांकडे आकर्षितात. एकाचें दुसर्‍यावर आकर्षण व दुसर्‍याचें पहिल्यावर आकर्षण हीं दोन्हीं समान असतात व त्या कणांस सांधणार्‍या रेषेच्या दिशेंत असतात. हें अन्योन्याकर्षण दोन्ही कणांच्या द्रव्यांच्या गुणाकारांशीं सम प्रमाणांत असतें व त्यांमधील अंतराच्या वर्गांशी व्यस्त प्रमाणांत असते. न्यूटननें असेंहि दाखविलें कीं, दोन गोलांमधील वरील नियमानें होणारें आकर्षण तितक्याच द्रव्याच्या व मध्य बिंदुस्थानीं ठेविलेल्या दोन कणांमधील आकर्षणाइतकें असतें. सर्व ग्रह आकारानें गोल आहेत. तेव्हां ते कण आहेत असें मानण्यास हरकत नाहीं. न्यूटननें गणितानें असें सिद्ध केलें कीं केप्लरचा दुसरा नियम हा प्रत्येक ग्रहावर सूर्याचें आकर्षण आहे व दुसरें कोणतेंहि नाहीं या गोष्टीचा परिणाम होय व पहिला नियम हा तें आकर्षण ग्रहाच्या सूर्यगत अंतराच्या वर्गाशीं व्यस्तप्रमाणांत असतें या गोष्टीचा परिणाम होय. व तिसरा नियम हा या दोन्ही परिणामांवरून आपोआप प्राप्त होतो. ग्रहांचीं एकमेकांवर जीं आकर्षणें होतात त्यामुळें त्यांच्या कक्षा स्थिरदीर्घवर्तुळाकार राहत नसून त्यांत सूक्ष्म बदल होत जातो. त्यांच्या उच्चनीच रेषा व पातरेषा यांस गति उत्पन्न होते. हे जे सूक्ष्म फरक होतात त्यांस विचलनें म्हणतात. हीं विचलनें गणितानें ठरविणें व तीं प्रत्यक्ष वेधानें निश्चित झालेल्या विचलनाशीं तंतोतंत जुळणें यांतच न्यूटनच्या महान् शोधाची खात्रीलायक प्रतीति मिळते.

ता र का.- आकाशांत असंख्य तारका दिसतात असें आपण म्हणतों. परंतु नुसत्या डोळ्यांनीं आपणास फक्त ६ ते ७ हजारच तारका दिसतात. ऑपेराग्लासमधून सुमारें १ लाख दिसतात. जगांतील मोठ्या दुर्बिणीतून १० कोटी तारका दिसूं शकतात. सर्व तारकांचे अनेक पुंज कल्पिले आहेत व त्यांस नांवें दिलीं आहेत. त्यांची माहिती ‘नक्षत्रपद्धति व तारकापुंज’ यावरील लेखांत पहावी. तारकांच्या तेजाप्रमाणें प्रती लावितात. १ ल्या प्रतीची म्हणून जिला प्रमाण मानितां येईल अशी तारका रोहिणीची मुख्य तारका होय. दुसर्‍या प्रतीच्या तारकेच्या २. ५१२ पट तेज १ ल्या प्रतीच्या तारकेचें असतें. याच प्रमाणांत तिसर्‍या, चवथ्या वगैरे प्रती लावण्यांत येतात. साहाव्या प्रतीपर्यंत तारका डोळ्यांनें दिसूं शकतात. तारकासंबंधानें त्यांची गति, अंतरें, घटना, अवस्था इत्यादिक माहिती ‘नक्षत्रें’ व ‘विश्वसंस्था’ या लेखांत पहावी. ‘वेधशास्त्र’ याखाली वेधासंबंधीं माहिती पहा.

 

ज्यो ति ष प दा र्थ वि ज्ञा न (आस्ट्रोफिजिक्स)- आकाशांतील ग्रहतारे कशाचे बनले आहेत यासंबंधाचें नवें शास्त्र बनलें आहे. नुसत्या डोळ्यांनीं किंवा दुर्बिणीनें ग्रहांची पहाणी करून ही माहिती मिळणें शक्य नसल्यामुळें १९ व्या शतकापर्यंत यासंबंधीं कांहीं कळणें शक्य नव्हतें. पण स्पेक्ट्रोस्कोपी, फोटोग्राफी व फोटोमेट्री या तीन अलीकडील कलांच्या योगानें ऑस्ट्रोफिजिक्स हें शास्त्र निर्माण झालें आहे. या शास्त्रांत जे मुख्य सिद्धान्त आहेत ते येणेप्रमाणें:-

(१) आकाशस्थ ग्रहतारे हे आपली पृथ्वी ज्या द्रव्यांची बनली आहे त्यांचेच बनलेले आहेत. रसायनशास्त्रांत ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांचेच ते बनले असून त्यांत लोखंड, कॅल्शियम व हायड्रोजन हीं मूलद्रव्यें (एलेमेंटस) मुख्य आहेत. पृथ्वीवरील सर्व मूलद्रव्यें ह्या सूर्यादि ग्रहतार्‍यांत आहेत किंवा नाहींत, याबद्दल अद्याप निश्चित सांगता येत नाहीं.

(२) हे आकाशस्थ गोल घनरूप किंवा द्रवकूप आहेत अशी जी समजूत होती ती खोटी असून ते सर्व वायुरूप स्थितींत आहेत हें सिद्ध झालें आहे. खुद्द सूर्य सुद्धां इतर ग्रहतार्‍यांपेक्षां अधिक अविरल स्थितींत असला तरी तोहि वायुरूपच आहे, घनरूप नाहीं. मंगळ मात्र पृथ्वीप्रमाणें घनरूप असून लहानलहान गोलहि घनरूप असावे असा संभव आहे.

(३) तिसरी सिद्ध झालेली गोष्ट ही कीं, विश्वांतील या मोठाल्या गोलांच्या अंतर्भागांतील उष्णमान फारच मोठें आहे. तें इतकें कीं सांप्रत उपलब्ध असलेल्या पृथ्वीवरील साधनांनीं आपणांस तितकें उष्णमान येथें उत्पन्न करणेंहि शक्य नाहीं.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .