प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या

तर्कशास्त्र — प्राचीन तर्कशास्त्रास 'न्याय' म्हणत असत आणि त्याच्या दोन पद्धती प्रचलित होत्या. एक न्याय [पहा] व दुसरी वैशेषिक [पहा]. या दोहोंचें विवेचन अन्यत्र केलेंच आहे. केवळ प्रमाण म्हणून गृहीत धरलेल्या विधानांवरून अनुमानपरंपरा कशी काय काढावी हाहि तर्कशास्त्राचा भाग धरल्यास तोहि प्राचीनांनीं वाढविला होता असें दिसून येईल या ज्ञानांगाचें विवेचन प्राचीनांनीं ''मीमांसा'' या दर्शनांत घातलें आहे. ( विज्ञानेतिहास पृ. २१६-२६ 'मीमांसा' लेख पहा ). म्हणजे प्राचीन भारतीय तर्कशास्त्र जाणावयाचें असल्यास दोन न्याय व मीमांसा या तिहींचा साकल्यानें अभ्यास केला पाहिजे.

अर्वाचीन तर्कशास्त्र म्हणजे शास्त्रीय ज्ञानाचें तर्कशास्त्र होय. हें अजून बाल्यावस्थेंतच आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. अनेक शास्त्रांत संशोधनासाठीं कोणत्या रीती वापरल्या जातात त्याचें पद्धतशीर विवेचन व तदंतर्गत अनुमानपद्धतीचें व्यवस्थीकरण होईल तेव्हां हें तर्कशास्त्र भक्कम पायांवर उभारलें गेलें असें होईल. विज्ञानेतिहास ( पृ. ३-१४ ) यांत शास्त्ररचनेचें-तर्कशास्त्र आणि शास्त्रेतिहास हीं कशीं तयार केलीं गेलीं पाहिजेत या संबंधानें-स्थूल विवेचन केलेंच आहे.

अर्वाचीन तर्कशास्त्र — या लेखांत या विषयाचे दोन विभाग केले आहेत ते (१) तर्कशास्त्राचे प्रश्न, व (२) यूरोपांतील सातत्य हे होत.

(१) प्रश्नविवेचन:— तर्कशास्त्र म्हणजे अनुमान कसें काढावें या प्रक्रियेसंबंधाचें शास्त्र अनुमान म्हणजे काय ? हा यांत महत्त्वाचा विषय होतो. अनुमान म्हणजे अनेक पूर्वविधानें एकत्र करून त्यांच्या पासून जो निर्णय काढावयाचा त्यास हें नाव आहे. एका पूर्वविधानापासूनहि अनुमान काढतां येतें असें मत आहे, पण सूक्ष्मपणें पाहिल्यास तसल्या एका विधानामध्येंच अनेक विधानें अंतर्भूत झालेलीं दिसतात. उदा. सर्व मनुष्यें कांहीं प्राणी असतात; म्हणून कांहीं प्राणी मनुष्य असतात. यावरून हें दिसून येईल कीं, अनुमान निघण्याकरितां निदान दोन विधानें असलींच पाहिजेत. अशीं दोन विधानें एकत्र करण्याचे तीन मुख्य प्रकार आहेत ते :—

(अ) उपमानमूलक (अनॉलॉजिकल) अनुमान, विशेषापासून विशेष (पर्टिक्युलर). उदा. इंग्रज व अफगाण यांचें सरहद्दीवरील युद्ध अनर्थावह आहे; इंग्रज व तिबेटी लोक यांच्या सरहद्दीवरील युद्ध इंग्रज-अफगाण युद्धासारखें आहे; म्हणून, इंग्रज--तिबेटियन युद्ध अनर्थावह आहे.

(आ) प्रत्यक्षसंकलनमूलक ( इंडक्टिव्ह ) अनुमान, विशेषापासून सामान्य ( फ्रॉम पर्टिक्युलर टू युनिव्हर्सल ); उदा. इंग्रज-अफगाणमधील सरहद्दीवरींल युद्ध अनर्थावह आहे; सर्व सरहद्दीवरील युध्दें इंग्रज-अफगाण युद्धासारखीं असतात; म्हणून सर्व सरहद्दीवरील युद्धें अनर्थावह असतात.

(इ) आप्‍तवाक्यमूलक (डिडक्टिव्ह उर्फ सीलॉजिस्टिक) अनुमान, सामान्यापासून विशेष (फ्रॉम युनिव्हर्सल टु पर्टिक्युलर). उदा. सर्व सरहद्दीवरील युद्धें अनर्थावह असतात; इंग्रज-अफगाणांचें हें सरहद्दीवरील युद्ध आहे; म्हणून इंग्रज-अफगाण युद्ध अनर्थावह आहे.

या वरील एकंदर वाक्यांमध्यें तीन मानसिक निर्णय ( जजमेंट ) असून ते तीन पृथक् वाक्यांत सांगितले आहेत; आणि त्यांपैकी दोन एकत्र करून त्यांच्यापासून तिसरें अनुमान काढलें आहे. वरील वाक्यांमध्यें एक 'सामान्यशब्द' ( मेजर टर्म ), एक 'विशेषशब्द ' ( मायनर टर्म ), आणि एक 'संयोगीशब्द' ( मिडल टर्म ) असून, ज्या वाक्यामध्यें संयोगी व सामान्यशब्द आलेले आहेत त्याला 'सामान्यविधान' ( मेजर प्रेमिस ) व ज्या वाक्यामध्यें संयोगी व विशेष शब्द आलेले आहेत त्याला 'विशेषविधान' ( मायनर प्रेमिस ) म्हणतात. वरील उदाहरणांत 'इंग्रज-अफगाण युद्ध' हा विशेष शब्द आहे; 'अनर्थावह' हा सामान्यशब्द आहे; आणि 'सरहद्दीवरील युद्ध' संयोगी शब्द आहे. 'सामान्यशब्द' = स, विशेषशब्द = प, आणि संयोगीशब्द = म अशा संज्ञा योजून वरील तिन्हीं अनुमानें पुढीलप्रमाणें मांडतां येतील.

उपमानमूलक इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह
स आहे. प, स आहे. प्रत्येक म स आहे.
सारखा आहे. प्रत्येक म, स सारखा आहे.   प म आहे.
स आहे. प्रत्येक म, प आहे. प स आहे.

इंडक्टिव्ह ज्ञान व अनुमान या दोहोंत फरक आहे इतकेंच नव्हे तर त्या पद्धती परस्परविरुद्ध आहेत. इंडक्टिव्ह पद्धतींत विशेष विधान सामान्य विधानाला किंवा सिद्धांताला पुरावा म्हणून देण्यांत येतें तर उलटपक्षीं ''डिडक्टिव्ह'' पद्धतींत सामान्य विधान हें विशेष विधानाला पुरावा म्हणून देण्यांत येतें. अशा तर्‍हेचें भाष्य इंग्रज ग्रंथकारांनीं केलेलें आढळतें. पण त्यांत फारसें महत्त्व नाहीं. डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह या दोन्ही स्वतंत्र पद्धती मानण्याचें कारण नाहीं. कांकीं प्रत्यक्ष आणि अनुमान यांचा अनेकदां उपयोग जींत होतो तिलाच पद्धति म्हणतां येईल.

अनुमान व उपमान यांमध्येंहि मोठा फरक आहे, कारण विशेष विधानावरूनच विशेषविधान केलेलें असतें, आणि साधारण सादृश्यावरून निर्णय दिलेला असतो. उपमानामध्यें अनुमानाइतका प्रत्यक्ष पुरावा नसतो. उदा. पृथ्वी व मंगळ या दोन ग्रंहांचें कांहीं बाबतींत सादृश्य पाहून हे दोन्ही ग्रह सर्वच बाबतींत सारखे आहेत असा निर्णय देतात आणि पृथ्वीप्रमाणें मंगळावरहि मनुष्यवस्ती असली पाहिजे असें ठरवतात. अर्थात या निर्णयाला प्रत्यक्ष पुरावा नसल्यामुळें हा निर्णय विश्वसनीय नाहीं. इंडक्टिव्ह अनुमानहि नेहेमीं विश्वसनीय नसतें, कारण त्यांत एक किंवा अनेक विवक्षित उदाहरणांवरून सर्वसामान्य सिद्धांत ठरवण्याचा प्रयत्‍न केलेला असतो. तथापि या तिन्ही तर्कपद्धतींत साम्य असून तिहींचा 'तर्कशास्त्र' या विषयांत अन्तर्भाव होतो.

बिनचुक अनुमानें कशीं काढावीं हा तर्कशास्त्राचा विषय असल्यामुळें त्याची इतर सर्व ज्ञानविषयांनां मदत होते. तथापि तर्कशास्त्राचा निकट संबंध अतींद्रियविज्ञान (मेटॅफिजिक्स) व मानसशास्त्र (सायकॉलजी)  या दोन विषयांशीं येतो; कारण हे तिन्ही विषय म्हणजे मनाच्या व्यापारांचे निरनिराळे प्रकार आहेत. 'अतिंद्रिय विज्ञान' इंद्रियांनां अगोचर पण मनाला आकलन होणार्‍या अशा गोष्टींचा उहापोह करतें; आणि तर्कशास्त्र अनुमानें काढतांना जी मानसिक क्रिया होते तिचा विचार करतें. बिनचुक अनुमानाप्रमाणें चुकीचीं अनुमानें कोणतीं, याचाहि विचार तर्कशास्त्रांत केलेला असतो, त्या भागाला 'हेत्त्वाभास' (फॅलसीज) म्हणतात.

तर्कशास्त्रापैकीं प्रत्यक्ष संकलनमूलक ( इंडक्टिव्ह )  अनुमानपद्धतीला अलीकडील शास्त्रीय संशोधनामुळें विशेष महत्त्व प्राप्‍त झालें आहे, कारण सर्व प्रकारच्या शास्त्रीय संशोधनांत कांहीं थोडक्या प्रत्यक्ष प्रयोगांवरून ( उदाहरणांवरून ) सर्वसामान्य अनुमान किंवा नियम ठरवावयाचा प्रयत्‍न असतो; अशा प्रयत्‍नांत चुका होऊं नयेत म्हणून अनुमानें काढतांनां कोणत्या गोष्टी विशेष लक्षांत ठेवावयास पाहिजेत याबद्दल विस्तृत उहापोह करण्याची पद्धति अलीकडील तर्कशास्त्रज्ञांनीं पाडली आहे. शास्त्रीय संशोधनक्षेत्रामध्यें नुकतांच प्रवेश करूं पाहणार्‍या महाराष्ट्रीय वाचकांनां याची माहिती व महत्त्व विशेष लक्षांत घेणें जरूर असल्यामुळें त्या बद्दल सविस्तर विवेचन ''शास्त्रीकरण'', ''विज्ञानशास्त्र'' या स्वतंत्र लेखांत देत आहों.

भौतिक शास्त्रांप्रमाणें नीतीशास्त्र, राजनीतिशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, यांची प्रगतीहि अलीकडेच होत आहे. हीं शास्त्रें मागसण्याचें कारणहि, तर्कशास्त्राच्या 'इंडस्टिव्ह अनुमान पद्धति' या अंगाची वाढ १७ व्या शतकापूर्वी झाली नव्हती हें होय.

(२) यूरोपांतील सातत्य.- हें आपणांस बरेंच चित्तवेधक दिसतें. तात्त्विक अनुमानपद्धतीचा विकास आपल्यापेक्षां यूरोपांत अधिक झाला असें म्हणतां येणार नाहीं, आणि हेत्वाभासांचें ज्ञानहि यूरोपांत आपल्यासारखेंच वाढलें. किंबहुना असेंहि म्हणतां येईल कीं, तर्कशास्त्राच्या तात्त्विक बाबतींत आजची प्रगति प्राचीन यूरोपांत किंवा हिंदुस्थानांत झालेल्या प्रगतीच्या पेक्षां जास्त झाली नाहीं.

पाश्चात्त्य देशांत तर्कशास्त्राचा उदय प्रथम प्राचीन ग्रीक लोकांमध्यें झाला. व्यवस्थित वादविवाद करण्यासंबंधानें झेनोची प्रसिद्धि झाली. तथापि तर्कशास्त्राच्या वाढीला सोफिस्ट पंथी ग्रीक विद्वानांची मोठी मदत झाली; त्यांपैकी साक्रेटीस हा प्रमुख होय. त्यानें इंडक्टिव्ह तर्कपद्धति या शाखेची विशेष वाढ केली. यानंतर प्लेटोनें नवें डायलेक्टिक् किंवा लॉजिक हा विषय विशिष्ट स्वरूपांत मांडला डायलेक्टिक हें ज्ञानशोधनाचें शास्त्र न म्हणतां बौद्धिक कुस्तीचें शास्त्र म्हणतां येईल.

आरिस्टाटलनें सोफिस्ट व प्लेटो यांच्या परिश्रमाच्या पायावर अनुमानशास्त्राची पद्धत तयार केली, पण तिचा जो उत्तर कालीन विकास स्कूलमेन वगैरेंच्या तावडींत झाला. त्यांत तर्कशास्त्रांत केवळ वादविवादांत हल्ला व प्रतिकार करण्याची कला यांचेंच स्वरूप मिळालें. आपल्याकडेहि तो प्रकार झाल्याशिवाय राहिला नाहीं. ''छल'' ''वितंडा'' असल्या प्रकाराच्या आभासात्मक वादविवादाचे प्रकार तशाच तालमींत निघाले. आघातप्रत्याघाताच्या कार्यासच जेव्हां ही पद्धति उपयोगांत येऊं लागली तेव्हां लॉजिक हें ज्ञानसाधन नसून ती केवळ एक वाद जिंकण्याची कला आहे असें यूरोपांत मानूं लागले. ग्रीकांच्या अलंकारशास्त्राचीहि गोष्ट तशीच आहे. ''र्‍हेटोरिक्स'' या शास्त्राचा जन्महि यूरोपांत ''केस'' जिंकण्यासाठीं लागणारी विद्या या स्वरूपांत झाला, तशीच प्रथम सोफिस्टांची व नंतर स्कूलमेनच्या तावडींत ''लॉजिक'' असतां त्याचीहि गोष्ट होती.

तथापि ''शास्त्र'' या नात्यानें त्या विद्येस स्वरूप, हिंदुस्थानांत तसेंच यूरोपांतहि प्राप्‍त झालें होतें. दोन्ही ठिकाणी तर्कशास्त्राचें स्वरूप केवळ खटला जिंकण्याकरतां तयार केलेली विद्या असें शास्त्रीय ग्रंथकारांनीं मांडलें नसून जगद्विषयक सत्य जाणण्याचें शास्त्र या दृष्टीनेंच त्याचें विकसन मांडण्यांत आलें. आपल्या इकडच्या वैशेषिकांचें तर्कसंग्रहासारखें लहानसें पुस्तक पाहिलें तरी या गोष्टी आपणांस दृश्यमान होतील. जगांतील एकंदर वस्तू आणि कल्पनाविषय हीं एकत्र घेऊन त्यांचें वर्गीकरण करण्याचा प्रयत्‍न, द्रव्यगुणादि गोष्टीचें पृथक्करण, ''लक्षणाची'' बरोबर व्याख्या, व्याप्‍ति-अव्याप्‍तीची कल्पना, ज्ञानाची कारणें शोधण्याचा प्रयत्‍न, कारणांचें साधारण, असाधारण निमित्त असें वर्गीकरण, संबंधाचें वर्गीकरण, या सर्व गोष्टी लक्षांत घेतल्या असतां आपल्याकडील तर्कशास्त्र म्हणजे केवळ वादविवादांत जय मिळविण्याची विद्या या दृष्टीनेंच अभ्यासिलें गेलें होतें असें म्हणतां येणार नाहीं. व आरिस्टाटलच्या ग्रंथाकडे पाहिलें म्हणजें तेंच कबूल करावें लागेल.

आरिस्टाटलच्या हातांत ''लॉजिक'' हें शास्त्र बनलें, व तें पुढें धार्मिक वादविवादाच्या कामीं लागून केवळ वादविवादाची कला बनलें, व सत्यशोधनाकडे याचा उपयोग युरोपांतील मध्ययुगांत कमी कमी होऊं लागला. आपल्याकडेहि तशीच स्थिति झाली. धार्मिक मंडळीस 'घटपटादि खटपट' जुगुप्सात्मक वाटूं लागली आणि ह्यापासून धार्मिक मनोवृत्ती सोडविल्या जाव्यात असें वाटूं लागलें आणि शास्त्रीय अभ्यासाचा उदय होण्याची क्रिया झालीं नाहीं पण ती यूरोपांत झाली. ''लॉजिक'' हें ''सिद्ध करण्याची'' कला नसावी पण ''शोधण्याची कला'' व्हावी म्हणून विचारी मंडळींत प्रयत्‍न झाला आणि त्या प्रयत्‍नाचें फल म्हटलें म्हणजे प्रत्येक शांस्त्रांत शोध करण्याच्या पद्धती निर्माण करण्यांत आल्या. समोर आलेल्या पुराव्यांतील सत्य कसें काढावें याविषयींचे आलेले अनुभव एकत्रित करण्यांत येऊं लागले. आणि प्रत्येक शास्त्राबरोबर त्या शास्त्राची संशोधनपद्धति जुळविण्यांत येऊं लागली. कायद्यामध्यें पुराव्याचा कायदा आहे तो अनुभवाचा समुच्चय आहे. इतिहाससंशोधनामध्यें सत्य शोधण्यासाठीं जे कठोर नियम आज वापरले जातात तेहि अनुभवाचे समुच्चय होत. प्रत्येक अभ्यासक्षेत्रांतील अभ्यास्य वस्तूचें संकींर्णत्व जाणणें आणि संकीर्णत्वामुळें सत्य गूढ कसें होतें हें जाणणें आणि संकीर्णत्व पृथक्करण करून सोपें करणें, व उपलब्ध पुराव्यांतून नियमित सत्य काढणें या क्रिया करण्यासाठीं समाजशास्त्रकार व अर्थशास्त्रकार यांनींहि पद्धती तयार केल्या आहेत. त्या सर्व प्रत्यक्षसंकलन आणि अनुमानपरंपरा याहींकरून संयुक्त आहेत.

अनेक शास्त्रांचा अभ्यास आणि त्यांत संशोधन करण्याची इच्छा यांचा परिणाम याप्रमाणें तर्कशास्त्रावर होत गेला आणि त्या तर्‍हेची प्रवृत्ति उत्पन्न करण्याचें बरेंचसें श्रेय इंग्लंडमधील तत्ववेत्ता बेकन यास आहे. गणिताच्या विकासाचाहि परिणाम तर्कशास्त्रावर होऊं लागली आणि संभवनीयतेची मोजदाद त्याबरोबर होऊं लागला आणि केवळ प्रत्यक्ष तर्क उर्फ एमपिरिक पद्धतीचा उदय झाल्यामुळें केवळ अनुमानपरंपरेनें जें निघेल तेंच सत्य या तर्‍हेच्या आग्रही पद्धतीस बराच आळा बसला. बेकनला त्याची परंपरा चालविणारे इंग्लंडांत जे अनुयायी भेटले ते व्हेवेल, व जान स्टुअर्ट मिल हे होत. त्यांची विचारपद्धति लॉकच्या ''ज्ञान'' विषयक विचारपद्धतीस जुळलेली होती आणि त्यामुळें इंग्लंडचें तर्कशास्त्र आणि इंग्लंडची ज्ञानमीमांस एकमेकांस मिळती झाली. इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह अशी या पद्धतीची नांवें देण्यांसंबंधाची भांडणेंहि झालीं पण त्यांत अर्थ नाहीं. प्रत्येक चांगल्या संशोधनांत प्रत्यक्षावलोकन, त्यावरून अनुमानें, पुन्हां अनुमानानें जें निघेल त्याची प्रत्यक्षानें तपासणी या सर्व क्रिया येतातच.  आणि यामुळें या सर्व क्रियांस एक ग्रंथकार डिडक्टिव्ह म्हणतो व दुसरा इंडक्टिव्ह म्हणतो व दोघेहि उगाच भांडत असतात, असा घोंटाळाहि फार झाला आहे. स्पेन्सरनें असें दाखविलें आहे कीं, शास्त्रीय ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञानाचेंच अनुमानपरंपरेने वृध्दिंगत झालेलें स्वरूप होय.

''लाजिक'' ची इंग्लंडमध्यें वाढ झाली ती केवळ शास्त्रीय ज्ञानाचें हत्यार या दृष्टीनें झाली. पण जर्मनीमध्यें जी वाढ झाली ती विज्ञानशास्त्राचा एक भाग या दृष्टीनें झाली. या पद्धतीचें जर्मन विस्तरण म्हटलें म्हणजे शास्त्रांचें पद्धतशीर वर्गीकरण करण्याचा प्रयत्‍न होय. यांत लायबनिच, बोल्फ, आणि लांबर्ट यांनीं भाग घेतला आणि सिगवाट यानें लाजिक हें पद्धतीचें शास्त्र म्हणून तयार केलें आणि ज्ञान कसें मिळतें, मनाचें स्वरूप काय, यांविषयीं जें खोल विचार करणें झालें त्याची पद्धति आणि ''लाजिक'' च्या पाठीमागें असलेलें ''मानसशास्त्र'' पहाण्याचे प्रयत्‍न होऊं लागले. या तर्‍हेनें प्रयत्‍न करण्यांत बेकन हा प्रमुख होता. यानें लाजिकमध्यें ''तात्कालिक बोध सिद्धान्त'', ( थिअरी आफ अपरसेपशन्स ) घालण्याचा प्रयत्‍न केला. मनांतल्या मनांत होणार्‍या अनुमानपरंपरा व संस्कार हे सर्व ''तात्कालिक बोधाचे अंश आहेत'' अशी त्यानें मांडणी केली. पुढें कांटनें मेटाफिजिक्सचा म्हणजे अतिभौतिक विद्येचा आणि तर्कशास्त्राचा संबंध जोडण्याचा प्रयत्‍न केला. कांटचा प्रयत्‍न मुख्य असा कीं, ज्ञानाचें कारण केवळ बाह्य वस्तु नव्हे.  ''मनोघटनेचा'' ज्ञानाशीं निकट संबंध आहे. ज्ञान हें बाह्य वस्तूचा केवळ परिणाम नसून आपल्या मनाच्या गूढ शक्तींचा परिणाम आहे इत्यादि. याप्रमाणें कांट हा ज्ञानाचीं मूलभूत कारणें पाहून तीं तर्कशास्त्रास जोडण्याची क्रिया करूं लागला. हेगेलनें ही क्रिया फारच जोरानें पुढें नेली आणि त्या क्रियेचें थोड्याबहूत फरकानें संवर्धन करणारे अभ्यासक म्हटले म्हणजे वेरडेर, रोझनक्रंटस, व कूनोफिशर हे होत. परंतु पुढें जर्मनींतच ही ''लाजिक'' ची अतिभौतिक उर्फ मेट्याफिझिकल मांडणी अप्रिय होऊं लागली आणि यांत प्रामुख्यानें कार्य करणारे ग्रंथकार म्हटले म्हणजे उवरव्हेक, ड्रोव्हिश, लोट्स्, बूल, प्रसिद्ध तत्ववेत्ता वुंट आणि प्रंटल हे होत. बूलचें लॉजिकचें गणिती पद्धतीनें पृथक्करण करण्याचें कार्य पुष्कळ झालें आहे. कांट आणि हेगेल यांनीं तर्कशास्त्राचा आणि एकंदर जगाच्या वस्तुज्ञानाचा संबंध जोडण्याचा प्रयत्‍न केला तो भारतीयांस अपरिचित नाहीं. आपल्याकडे तर्कग्रंथांमध्यें अनुमानपद्धतीवर विवेचन जसें सांपडतें तसें मनावर व विश्वांतर्गत वस्तुमात्रावर व कल्पनाविषयावर विवेचन सांपडतें. आणि यामुळें प्राचीन संस्कृत ग्रंथकारांच्या मनोरचनेचें त्यांत थोडेंबहुत साम्य भासल्याशिवाय रहात नाही. ''न्याय'', ''मीमांसा'', ''विज्ञानशास्त्र'', ''शास्त्रीकरण'', ''स्कूलमेन'', ''हेगेल'' इत्यादि लेख पहा. [ संदर्भग्रंथ :- ग्रंथकारांचीं व ग्रंथांचीं नांवें लेखांत आलींच आहेत. ब्राकहाऊस, व ब्रिटानिका या दोन्ही ज्ञानकोशांतील भिन्न प्रकारचे लेख पाहून तुलना करण्याजोगे आहेत. ]

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .