प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या

तवॉय, जिल्हा — खालच्या ब्रह्मदेशांत, तेनासेरीम विभागांतील एक जिल्हा. क्षे. ५३०८ चौ. मै. मर्यादा: उत्तरेस अमहर्स्ट जिल्हा; दक्षिणेस मर्गुई; पूर्वेस सयामची सरहद्द आणि पश्चिमेस बंगालचा उपसागर. तवॉय नदीच्या कांठच्या लागवडीचा भाग व समुद्रकिनार्‍याची अरुंद पट्टी सोडली असतां, हा सर्व जिल्हा खडकाळ व डोंगराळ आहे. डोंगराच्या रांगा सामान्यतः दक्षिणोत्तर जातात. मुर्गुई जिल्ह्याच्या सरहद्दीवर मैनमोलेतकत ( ६८०० फूट ) हें जिल्ह्यांतील सर्वांत उंच शिखर असून नवलबो शिखर त्याच्या खालोखाल आहे. दक्षिणेकडे तेनासेरीम व उत्तरेकडे तवॉय ह्या मुख्य नद्या आहेत. पैकीं पहिली उन्हाळ्यांत नाव्य नसते; दुसरींतून तवॉय गांवापर्यंत लहान जहाजें व पुढें ४० मैलापर्यंत नावा चालू शकतात. ह्या जिल्ह्यांत औषधी वनस्पती पुष्कळ आहेत असें म्हणतात. लवंग, एरंडीं, सार्सापरिला वगैरेंचीं झाडेंहि पुष्कळ आहेत. कित्येक वनस्पतींपासून रंग तयार करतां येतात. हत्ती, गेंडा, वाघ, चित्ता, त्सिन, सांबर, मलायी, अस्वल, डुकर व पांच सहा प्रकारचे हरीण वगैरे रानटी पशू येथें आढळतात. डोंगरांत ओरँग-ओटँगहि आहेत असें म्हणतात. नद्यांमध्यें सुसरी व समुद्रकिनार्‍यावर कांसवें दिसतात. समुद्रावरील वार्‍यांच्या योगानें उन्हाळ्यांतील उष्णता कमी होत असल्यामुळें जिल्ह्याची हवा एकंदरींत सुखावह आहे. समुद्रकिनार्‍याच्या इतर भागांप्रमाणें या जिल्ह्यांतहि पाऊस पुष्कळ म्हणजे वार्षिक सरासरी २२८ इंचपर्यंत पडतो.

इतिहास:- हा जिल्हा निरनिराळ्या काळीं, सयाम, पेगु व आवा येथील राजांच्या मुलुखांत मोडत असे; परंतु त्याचा प्राचीन इतिहास चांगलासा उपलब्ध नाहीं. सयामी लोक हे येथील पहिले रहिवाशी असावेत; परंतु आराकानी लोकांची वसाहत फार प्राचीन काळापासून होती असें म्हणतात. ह्या देशासंबंधीच्या सर्वांत प्राचीन लेखांत असें म्हटलें आहे कीं, इ. स. १२०० त ब्रह्मी राजा नरपदिसिथु यानें जेता म्हणून न येतां धर्मगुरु या नात्यानें इकडे येऊन क्वेदौंगच्या उपसागरांत क्येथलुट हें गांव वसविलें. त्याच राजानें तवॉय पॉइंटवर एक देऊळ बांधलें असें सांगतात. अगदीं अलीकडील काळापर्यंत या देशावर सयामी लोकांच्या स्वार्‍या होत होत्या. १७५२ सालीं तवॉयचा राजा स्वतंत्र झाला; परंतु नंतर लवकरच ( १७५७ ) तो पुन्हां सयामच्या हातीं गेला.

१७५९ सालीं ब्रह्मी राजा अलौंगपया यानें हा देश घेतला; परंतु तो राजा लवकरच मरण पावला. स. १८६० पासून यंदाबोचा तह ( १८२६ ) होईपर्यंत, अंतःकलह व सयामी लोकांच्या हल्ल्यामुळें जिल्ह्याचें अतिशय नुकसान झालें; अखेर पहिल्या ब्रह्मी युद्धांत सर आर्चिबोल्ड कँबेल याच्या हाताखालीं सैन्य पाठवून हा जिल्हा इंग्रजांनीं आपल्या ताब्यांत घेतला. १८२९ सालीं मौंगदा (पूर्वीचा सुभेदार) यानें बंड केलें होतें परंतु तें लवकरच मोडण्यांत आलें. तेव्हांपासून हा जिल्हा इंग्रजांकडेच असून त्यांत पूर्ण शांतता नांदत आहे.

प्राचीन अवशेष:- तवॉयच्या दक्षिणेस कांहीं मैलांवर शिन्मोक्ती नांवाचें प्रख्यात देवालय आहे. देवालयांतील मूर्ति, तिच्या जवळ असलेला एक पाषाण व वडाचें झाड हीं सर्व हिंदुस्थानांतून समुद्रमार्गानें वहात गेलीं असा लोकांचा समज आहे. तवॉय नदीच्या उजव्या तीराला, तवॉय पॉइंटवर शिनमौ नांवाच्या देवळांत बुद्धाचा दांत आहे असें म्हणतात. याशिवाय या जिल्ह्यांत एकंदर २९ जुनी देवालयें आहेत. जुन्या तवॉय किंवा म्योहौंग गांवाचे अवशेष हल्लींच्या गांवाच्या उत्तरेस कांहीं मैलांवर आहेत. लो. सं. ( १९२१ ) १५६७८६. मागील दशकांत वाढ शें. १५.९. उत्तर आराकान, मर्गुई व सालवीन हे जिल्हे वगळले असतां, तवॉय जिल्ह्याइतकी विरळ वस्ती खालच्या ब्रह्मदेशांतील दुसर्‍या कोणत्याहि जिल्ह्यांत नाहीं. शें. ९६ लोक बौद्धधर्मी व शें. २ ख्रिस्ती असून बाकीचे वन्य हिंदू, मुसुलमान किंवा हिंदू आहेत. शें. ९५ लोक ब्रह्मी भाषा ( तवॉयी नांवाची पोटभाषा ) बोलतात; व डोंगराळ भागांत करेन भाषा बरीच चालते. शें. ५९ लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर होतो.

शेती:— तांदूळ हें या जिल्ह्यांतील मुख्य पीक होय. कापूस, सण ( ताग ), वेलदोडे, तंबाखू व कॉफी ह्यांची लागवड फारच थोडी होते.

जंगल:- जंगलांत होणारीं महत्त्वाची झाडें :- थिंगन - याची उंची २५० फुटांपर्यंत असून होड्या बांधण्यास त्याचा फार उपयोग करतात; पिंगडो, पदौक व कोक्को यांच्या लांकडाचा नक्षीकामाकरितां अमेरिका व इग्लंड या देशांत फार खप होतो; आणि पिनम व अनम्, रेवंदसार, कापूर व काजू हीं झाडेंहि पुष्कळ आहेत. या जिल्ह्यांत थोडेंबहुत कथील सांपडतें; व समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार केलें जातें.

व्यापार व दळणवळण:- तवॉय शहरचें रेशमी कापड व लुंगी हीं सर्व ब्रह्मदेशभर प्रसिद्ध आहेत. शहरांत तांदुळाच्या व इमारती लांकडाच्या पांच गिरण्या आहेत; व त्या गांवांत मातीचीं भांडीं आणि धातुकामहि होतें. जिल्ह्याचा बहुतेक व्यापार तवॉय शहर व सिनब्यूबिनमधून होतो. तांदूळ, मीठ, व इमारती लांकूड हे निर्गत जिन्नस आहेत. तवॉय शहरापासून म्यित्त गांवावरून सयामी सरहद्दीपर्यंत जाणारा रस्ता हा जिल्ह्यांतील मुख्य रस्ता होय. त्याशिवाय तवॉयपासून सिनब्यूबिन आणि येब्यूपर्यंत, व बुम्यबकिनपासून गौंगमगनपर्यंत रस्ते आहेत. पक्क्या रस्त्याची एकंदर लांबी १९५ मैल आहे. तवॉय नदींतून नावा चालतात रंगून व मुर्गुई यांच्या दरम्यान जाणारी बोट सिनब्यूबिन येथें नदीच्या मुखाजवळ लागते व तेथून तवॉय शहरापर्यंत पडावामधून उतारू व माल हीं नेलीं जातात.

तवॉय शहर ही एकच म्युनिसिपालिटी आहे. एकंदर ब्रह्म देशाच्या मानानें या जिल्ह्यांत शिक्षणाचा प्रसार कमी आहे. १९०१ सालीं शें. ३१.२ पुरुषांनां व शें. ४.४ स्त्रियांनां लिहितां वाचतां येत होतें. १९०३-०४ सालीं जिल्ह्यांत ६ दुय्यम, ६३ प्राथमिक व १६९ बालशिक्षणाच्या शाळा होत्या. तवॉय शहरांत एक रुग्णालय आहे; व तवॉयनदीच्या मुखाजवळ, रीफ बेटावर २५ फूट उंचींचे दीपगृह असून आकाश स्वच्छ असतां तें १२ मैलांवरून दृग्गोचर होतें.

तालुका.— खालच्या ब्रह्मदेशांत तवॉय जिल्ह्यामधील एक तालुका. क्षे. फ. २३४० चौ. मै. लो. सं. ( १९०१ ) ३३८१८. यांत तवॉय हें जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण आणि ६४ खेडीं आहेत. तवॉय खेरीज दुसरें महत्वाचें गांव ईशान्येस सयामच्या सरहद्दीवरील म्यित्त हें होय. ब्रह्मदेश व सयाम यांच्या दरम्यान होणार्‍या व्यापाराचीं नोंद तेथें केलीं जाते.

शहर- खालच्या ब्रह्मदेशांत याच नांवाच्या जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. हें तवॉय नदीच्या डाव्या तीराला, तिच्या मुखापासून ३० मैलांवर व समुद्र किनार्‍यापासून ७ मैलांवर आहे. हल्लींचें तवॉय शहर १७५१ सालीं स्थापन झालें. १८२४ सालीं इंग्रजांनीं या शहरावर सैन्य पाठवून तें आपल्या ताब्यांत घेतलें. लो. सं. ( १९०१ ) २५०७४.

या शहराचा व्यापार रंगून, मुर्गुई आणि कलकत्ता व स्ट्रेट्स सेटलमेंट यांशीं चालतो. परंतु तो फारसा मोठा नाहीं. तांदूळ, रेशमी कापड, मीठ, इमारती लांकूड, व ( घरें शाकारण्याकरितां उपयोगांत येणारीं ) दाणीचीं पानें हा माल बाहेर जातो आणि तंबाखू, कापड, साखर, राकेल, सूत वगैरे जिन्नस येथें बाहेरून येतात.

रेशमी कापड विणणें हा शहरांतील मुख्य धंदा असून मातीचीं भांडीं, सुती कापड, व सोन्याचांदीचें काम थोडेंबहुत होतें. येथील म्युनिसिपालिटी १८८७ सालीं स्थापन झाली. तिचें १९०३-०४ सालचें उत्पन्न ३९००० रु. होतें.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .