प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या

ताजमहाल— ताजमहालची इमारत आपल्या अप्रतिम सौंदर्यानें जगांतील सर्व इमारतींत प्रथमपद पावली आहे. ही इमारत आग्र्यापासून दीड कोसावर यमुनानदीच्या पश्चिमतीरावर आहे. ती बांधण्याच्या कामीं वीसहजार मनुष्यें खपत होतीं. हिंदुस्थानांत शिल्पशास्त्र त्या वेळेस किती उत्कृष्ट स्थितींत होतें, याची उत्तम साक्ष ही इमारत देते. तिच्या एकंदर स्वरूपावर जनानी झांक मारते असें मार्मिक शिल्पज्ञ म्हणतात.

इसवी सन १६०७ मध्यें शहाजहान पंधरा वर्षांचा असतां जहांगीरनें त्याचा निका अर्जुमंदबानू उर्फ मुम्ताजमहाल हिच्याशीं ठरविला. नंतर पुढें पांच वर्षांनीं हें लग्न झालें. ही बर्‍हाणपूर येथें १६३१ सालीं मृत्यु पावली. तिच्या मृत्यूनें शहाजहान इतका शोकग्रस्त झाला कीं आठ दिवसांत तो दरबारास आला नाहीं. बायकोच्या कबरेजवळ जाऊन तो ढळढळा रडे. प्रथम तिचें दफन बर्‍हाणपुरास केलें व नंतर तिचें प्रेत आग्र्यास आणलें. आग्र्याच्या दक्षिणेस राजा जयसिंग याच्या मालकीची एक जागा होती, ती त्याजकडून बादशहानें खरेदी केली: आणि तज्ज्ञ कारागिरांकडून इमारतीचे नकाशे मागविले. त्यांपैकीं एक पसंत करून प्रथम त्याचा लांकडी नमुना तयार करविला. नमुन्याप्रमाणें स. १६३१ च्या आरंभीं इमारतीस सुरुवात झाली, ती स. १६४३ च्या जानेवारींत पुरी झाली. मक्रामतखान व अब्दुलकरीम हे दोघे त्या कामावर मुख्य देखरेख करीत होते. त्या इमारतीस पन्नास लाख रुपये खर्च झाला. आफ्रिडी म्हणतो, इमारतीचा खर्च ९ कोटी १७ लाख झाला आणि खालील गृहस्थ निरनिराळीं कामें पाहत होते :- अमानतखान शिराजी, इता गवंडी, पिरा सुतार, बन्नुहार, झातमल्ल, व जोरावर, इस्मईलखान रूमी ( वरील घुमट व त्याची परांची बनविणार ), रामलाल काश्मिरी बागवान वगैरे. वीस उत्तमोत्तम जातींच्या दगडांचा उपयोग या इमारतीस केला आहे. स. १६४३ त बादशहा ताजमहालांत गेला; आणि एक लाख रुपयांच्या उत्पन्नाचीं तीस गांवें ताजमहालाच्या खर्चाकडे व सभोंवारच्या सराया, दुकानें, बाग यांच्या खर्चासाठीं, लावून दिलीं.

इमारती जवळ बाग आहे तींत जाण्यास विचित्र नक्षीचा दरवाजा लागतो. बागेच्या कडेस ताजमहाल आहे. दरवाजापासून महालापर्यंत सुरूचीं झाडें आहेत; त्यांतून रस्ता जातो त्यांत कारंजी, पाण्याचें लांबट हौद आहेत. यांत निरनिराळ्या रंगाचें दरवाज्याच्या आंत महिरपदार कमानीचे दुजोडी सोपे आहेत. मुख्य महाल, मनोरे व आसपासच्या लहान इमारती यांनां संगमरवरी दगड वापरलेला आहे. तो शुभ्र असून त्यांत थोडीशी काळ्या रंगाची झांक मारते. प्रथम मुख्य इमारतीचा चौथरा ( जोतें ), नंतर पटांगण व पुढें मुख्य वेस लागते. तिच्यावर संगमरवरांत कोरून स्लेटीच्या दगडासारखे काळे दगड बसवून कुराणांतील वाक्यें तयार केलीं आहेत. कमानीच्या पुढच्या कडेला संगमरवरी तोडा घातलेला आहे व भिंतीवर चित्रविचित्र नकस काम आहे.

हिच्यांतून आंत गेल्यावर खालीं खर्‍या थडग्याकडे जाण्याचा प्रशस्त संगमरवरी जिना लागतो व डावीउजवीकडे इतर दालनांत जाण्याचे मार्ग आहेत. या दालनाच्या आंत गेल्यावर आपल्या उंचीनें मनास थक्क करून सोडणारी आंतील जमीन आणि भिंतीवरील नक्षीनें डोळ्याचें सार्थक करून टाकणारी दिव्य सृश्टि नजरेस पडते. येथें प्रकाश अंधुक आहे. जमीनीच्या मध्यभागीं अर्जुमंदबानूचें व त्याच्या उजव्या बाजूस शहाजहानाचें कृत्रिम थडगें आहे. वर जीं थडगीं आहेत तीं कृत्रिम म्हणजे दर्शनीय थडगीं आहेत.  त्यांमध्यें प्रेतें नाहींत. खरीं थडगीं खालच्या मजल्यांत आहेत. वरील थडग्यांभोंवतीं अप्रतिम कौशल्याचें नक्षीदार सोनेरी मखर होतें व त्यांत रत्‍नजडित फुलें व फुलांचें गुच्छ होते. परंतु असें सांगतात कीं, हें मखर औरंगझेबानें मोडून टाकलें. आतांचें साधें संगमरवरी मखरहि फार पाहण्यालायक आहे. जमीनीवर व भिंतीवर फारच सुरेख नक्षीकाम आहे. पांढर्‍या दगडांत नमुना कोरून आंत रंगीबेरंगी खडे बसवून नक्षीचा प्रकार दाखविला आहे. झाडाचें पान मुरडलें तर आंतील बाहेरील रंग भिन्न दिसतो तो प्रकार देखील त्या त्या रंगाचे खडे बसवून दाखविला आहे. फुलें, पाकळ्या, यांचें निरनिराळ्या अवस्थेंमधील निरनिराळे रंग त्या त्या रंगाच्या खड्यांनीं साधले आहेत. कांहीं ठिकाणीं अजूनहि खरे खडे दृष्टीस पडतात.

या इमारतींत आवाजाचा गंभीर प्रतिध्वनि होतो. इमारतीभोंवतीं दालनें असल्यामुळें व त्यांनां खिडक्याहि तशा बेतानेंच ठेविल्यामुळें आंत फारसा उजेड पडत नाहीं. यामुळें आंतील गाभारा ओस न दिसतां गुप्‍त माणसांनीं गजबजल्यासारखा वाटतो.

खालच्या मजल्यांत खरीं थडगीं आहेत. खालीं व वर दोन ठिकाणीं थडगीं बांधण्याची चाल इजिप्शिअन लोकांपासून आलेली आहे. या थडग्याचें काम वरच्या थडग्यांइतकें कौशल्यानें व कुसरीनें गच्च भरलेलें नाहीं; त्यांत साधेपणा जास्त राखिला आहे.

येथून वर चढून पुन्हां पुढच्या दालनांतून माडीवर गेलें असतां दर्शनी थडग्यांचा देखावा दृष्टीनें पडतो. मध्यें कृत्रिम थडगीं, सभोंवतीं प्रशस्त दालनें, व त्यांच्या बाहेर भव्य कमानी अशी बांधणी आहे. चित्रांत जो वाटोळा घुमट दिसतो तो वास्तविक अंडाकृति आहे. हा आकार शिल्पशास्त्रज्ञ फारच पसंत करतात.

मुख्य इमारतीच्या सभोंवतीं चार मनोरे आहेत. प्रत्येकाचा घेर साठ पांसष्ट फूट असावा. बैठकी अष्टपैलू व मनोरे वाटोळे आहेत. ते पांच मजली असून त्यांची उंची निदान दीडशें फूट असावी. मुख्य इमारतीच्या दोन्ही बाजूंनां लहान लहान दोन इमारती असून त्यावरहि घुमट आहे. सर्व भिंतींचे कोपरे छाटून सुंदर नक्षीदार महिरपा तयार करून खिडक्या केल्या आहेत. या इमारतीची यथार्थ कल्पना, प्रत्यक्ष इमारत पाहिल्याशिवाय येणें अशक्य आहे. नुसत्या फोटोनें अगर चित्रानें या लोकात्तर सुंदर इमारतीची कल्पना आणून देऊं पाहणें शक्य नाहीं. ताजमहालासारखी सर्वांगसुंदर इमारत फारच क्वचित् पाहण्यांत येते, ही इमारत फारच प्रमाणशुद्ध कलाकुसरीच्या कामानें भरलेलीं आहे. बांधतांना शहाजहान बादशहानें पाण्यासारखा पैसा खर्च करून ठिकठिकाणीं मनास थक्क करून सोडणारें नक्षीकाम करविलें आहे. ही भव्य, रम्य, प्रमाणशुद्ध व चित्ताकर्षक असून जणूकाय कालच बांधली आहे इतकी ती नवी दिसते.

ताजमहालच्या एका अंगास निमाज पढण्याकरितां एक सोपा आहे. त्यांत ६ हात रुंद अशीं संगमरवरी पांढर्‍या व तांबड्या दगडाचीं आसनें केलेलीं असून, असनांची संख्या एक हजार आहे. यमुनेचा पाट आणून तो एका चार मजली व उत्तम बांधलेल्या विहिरींत जलक्रीडेसाठीं सोडलेला आहे.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .