प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या
 
तात्या टोपी — १८५७ सालच्या बंडांत प्रसिद्धीस आलेला पुढारी. १८५९ सालीं एप्रिल महिन्याच्या ७ व्या तारखेस तो पकडला जाऊन १८ व्या तारखेस त्यास फांशी दिलें. तो कर्‍हाडा ब्राह्मण असून जवळ येथील ( जि. नगर रहिवाशी होता तो पुण्यास पेशव्यांच्या तोफखान्यांत नोकर होता. पुणें सोडून तीस वर्षे मध्यहिंदुस्थानांत शिंदे व निरनिराळ्या संस्थानिकांच्या पदरीं त्यानें तोफखान्यावर नोकरी पत्करिली होती. तोफखान्यावरील अधिकारी म्हणून त्याचें तोफखाने हें आडनांव पडलें. पुढें त्यास नानासाहेब पेशव्यानें आपल्या पदरीं ठेविलें. बंडाच्या सुरवातीच्या वेळीं तो नानासाहेबाच्याच पदरीं ब्रह्मावर्त येथें काम करीत होता. १८५७ च्या आक्टोबरच्या १० व्या तारखेस, आग्रा शहरीं कर्नल ग्रेथडच्या फौजेवर ज्या आठ हजार बंडवाल्यांनीं हल्ला चढविला त्यांचा तात्या हाच सेनापति होता. त्याचप्रमाणें झांशी येथें राणी लक्ष्मीबाई हिलाहि तात्या मदत करण्याकरितां आला होता, परंतु जनरल रोझनें त्याचा पराभव केल्यामुळें त्यास पळून जावें लागलें. पुढें तात्या, राणी लक्ष्मीबाई, बांद्याचा नबाब, रावसाहेब पेशवे वगैरे पुढारी ग्वाल्हेरवर चाल करून गेले व जयाजीराव शिंद्याचा पराभव करून त्यांनीं तें शहर आपल्या ताब्यांत घेतलें. पण पुढें ग्वाल्हेर इंग्रजांनीं घेतलें. बेटवाच्या लढाईच्या वेळीं तात्याच्या हाताखालीं २२,००० बंडवाल्यांची फौज होती. इतकी मोठी फौज इतरत्र कोणत्याहि वेळीं त्याच्या हुकुमाखालीं नव्हती. बंडाच्या प्रारंभींच तात्यानें इंदुरास सैन्य फितविण्याचा प्रयत्‍न केला होता. तेथून त्यानें सागरच्या किल्ल्यावर हल्ला करून तो बळकट किल्ला काबीज केला व सात महिने ताब्यांत ठेविला होता. ( १८५८ फेब्रुवारी ).

तात्या जर दक्षिणेंत जाता व आपल्या चातुर्यांनें त्यानें इंग्रजांविरुद्ध दक्षिण उठविली असती तर आमची सत्ता कायमची नाहींशीं झालीं असती असें एका इंग्रजानेंच म्हटलें आहे. तात्या फार पाताळयंत्री, धूर्त, शूर व धाडशी होता. मात्र त्याच्या हाताखालील फौज बिन कवायतीची व पोटभरू असल्यानें त्याचा परभव होई. तरी पण त्यानें इंग्रजी सेनापतीचा एकदोनदां पराभव केला होता व सर रोज सारख्या सेनापतीसहि आपल्या चलाखीनें चकित करून सोडलें होतें. बंडाचा बींमोड झाल्यानंतर जवळच्या दोनतीनशें लोकांनिशीं त्यानें मोठमोठ्या मी मी म्हणविणार्‍या सेनापतींनां दोन वर्षे आपल्या मागें रखडवीत लावून खडे चारले. शेवटीं नर्मदाकांठच्या एका जंगलांत पदरच्या लोकांपैकीं एकानें विश्वासघात करून त्याला पकडून दिलें. [बील; म्यालेसन; माझा प्रवास.]

तात्यास मुबेरी येथें पकडलें असतां त्यांनें आपली स्वतःची सर्व हकीकत इंग्रज अधिकारी मीड याच्या पुढें सांगितली. ती मॅलेसनच्या 'हिस्टरी ऑफ दि इंडिया म्युटिनि, भा. ३' (परिशिष्ट १ लें) मध्यें छापलेली आहे. तिचा त्रोटक सारांश पुढीलप्रमाणें :-

''माझें नांव तात्या व वडिलांचें नांव पांडुरंग. नगर जिल्ह्यांतील पातोडे महालांतील जवळें हें माझें मूळचें गांव. त्यानंतर फिरत फिरत मी ब्रह्मवर्तास नानासाहेब पेशव्याजवळ नोकरीस राहिलों. १८५७ च्या मे महिन्याच्या प्रारंभीं कानपूरच्या कलेक्टरानें मला आणि नानासाहेबांना भेटीला बोलावून स्वतःचें रक्षण बंडवाल्यांपासून करण्याबद्दल विनविलें, व नानासाहेबांनीं तें कबूल केलें परंतु दोनच दिवसांनीं बंडवाल्यांनीं आम्हांस कैद केलें व नानासाहेबांचा कानपूर येथील वाडा लुटला. पुढें बंडवाले आम्हा दोघांनां घेऊन दिल्लीकडे निघून गेले. त्यांनीं आम्हांला बंडाचा पुढाकार घेण्याबद्दल आग्रह केला परंतु प्रथम आम्ही तें नाकारलें. नानासाहेबानें जनरल व्हिलर यास अलाहाबाद येथें पोहोंचविण्याबद्दल खटपट केली. पुढें चाळीस नावा तयार करून कानपूरच्या सर्व यूरोपियन लोकांस सुखरूपपणें गंगापार करीत असतां बंडवाल्यांनीं आमचें न ऐकतां नावांवर हल्ला करून त्यांतील यूरोपियनांची कत्तल केली. या कृत्यास आमची दोघांची संमति नव्हती. त्यानंतर चार दिवसांनीं नानासाहेब आपल्या आईचें श्राद्ध करण्याकरतां ब्रह्मावर्तास गेले तेव्हांहि ते बंडवाल्यांच्या कैदेंतच होते. बंडवाल्यांनीं फत्तेपुरावर हल्ला केला तोहि नानासाहेबांच्या संमतीशिवायच केला. कानपूर येथें बंडवाल्यांचा पराभव झाल्यावर आम्ही ब्रह्मवर्तास गेलों आणि आमच्या मागें बंडवाले आले. तेथून नानासाहेब, बाळासाहेब, रावसाहेब, मी आणि आमचीं बायकामाणसें असे सर्वजण फत्तेपुरास गेलों. तेव्हां बंडवाल्यांनीं ब्रह्मावर्त येथील नानासाहेबांचा वाडा लुटला. त्यानंतर शिवराजपुर येथें ४२ व्या तुकडीनें नानासाहेबाची मदत मागितली, तेव्हां मला त्यांनीं पाठविलें. आम्हीं ब्रह्मावर्तास गेलों परंतु तेथें आमचा पराभव झाला. नंतर श्रीमंतांच्या आज्ञेनें मी मोरार येथें जाऊन तेथल्या पलटणींनां घेऊन काल्पीस आलों. या सैन्याचे अधिपती बाळासाहेब झाले. नंतर मी कानपुरास गेलों. तेथील लढाई ११ दिवस चालली होती. तेथें आमचा पराभव झाल्यावर आम्ही शिवराजपुरास लढाई दिली पण तेथेंहि आह्मांस हार खावी लागली. तेथून गंगापार होऊन आम्ही खैरा येथें राहिलों. नंतर रावसाहेब यांच्या हुकुमावरून मी काल्पीला गेल्यावर नानासाहेबानें मला चरखारीस पाठविलें.

अकरा दिवस लढाई करून मी चरखारी तेथील राजापासून काबीज केलें व तिकडे रावसाहेब काल्पीला गेले. ह्यावेळीं बाणपूर, शहागड व आणखी तीन ठिकाणचे राजे मला येऊन मिळाले. इतक्यांत झांशीच्या राणीचें मदत करण्याबद्दल मला पत्र आलें व रावसाहेबाची संमति घेऊन मी झांशीस गेलो. दुसर्‍या दिवशीं लढाईस तोंड लागलें परंतु तींत आमचा पराभव झाला व आम्हीं काल्पीस गेलों. आमच्या मागून त्याच रात्रीं लक्ष्मीबाई आल्या व रावसाहेबाजवळ झांशी लढविण्यासाठीं फौज मागूं लागल्या. त्याप्रमाणें मला रावसाहेबांनीं राणीबरोबर पाठविलें. वाटेंत आह्मी कुंच येथें लढाई दिली. परंतु तींत आमचा पराभव झाला. तेव्हां मी चिरकी येथें माझ्या मातापितरांस भेटण्याकरितां गेलों व राणी लक्ष्मीबाई काल्पीस गेली. काल्पी येथें रावसाहेबांनीं इंग्रजांस तोंड दिलें परंतु तेथेंहि त्यांचा पराभव झाला. म्हणून ग्वाल्हेरास जाण्यासाठीं सर्व मंडळी गोपाळपूर येथें जमली. तेथेंच मीहि त्यांना येऊन मिळालो. ग्वाल्हेरीस आल्यावर जयाजीराव शिंदे यांनी अडथळा केल्यामुळें त्याचा पराभव करून आह्मी ग्वाल्हेरीचा किल्ला घेतला. नंतर काल्पी आणि शिरपूर येथील इंग्रज पलटणी आमच्यावर चाल करून आल्या व चार पांच दिवस युद्ध होऊन आमचा पराजय झाला. या लढाईंत लक्ष्मीबाई गोळी लागून पडल्या. आम्ही रात्रीं जावरा-अलिपूर येथें मुक्काम केला. तेथें थोडीशी चकमक उडून चंबळा उतरून आम्हीं टोंक येथें गेलों. तेथील नबाबाचा पराभव करून नंतर भिलवाडा येथें गेलों व तेथून कोट्रावरून पाटणास गेलों. यावेळी बांदेवाला व कुमौनवाला नबाब हे दोघेहि आमच्या बरोबर होते. पाटणाच्या राजाचा पराभव करून आम्हीं त्याच्यापासून खंडणी वसून केली. आणि दर एक स्वाराला दरमहा ३० रु. आणि दर एक पायिकाला दरमहा १२ रु. याप्रमाणें तीन महिन्यांचा पगार वाटला. तेथून आम्हीं राजगड मार्गानें सिरोंज येथें गेलों. सिरोंजहून इसागडावर हल्ला करून आम्हीं तें घेतलें. रावसाहेबाच्या हुकुमावरून मी चंदेरीस गेलों. चंदेरीहून मनगौळी जकळोमवरून सुलतानपूर येथें मी आलों. वाटेंत इंग्रज पलटणीच्या व आमच्या चकमकी होतच होत्या. सुलतानपुरास रावसाहेब मला येऊन मिळाले. तेथून ललितपूर, कजूरिया, तालभाट, राजगड इत्यादि गांवावरून नर्मदा उतरून कौगांव बत्ती येथें आलों. मध्यंतरी कंदुळ येथील इंग्रज सरकारच्या कचेर्‍या आमच्या सैन्यानें रावसाहेबाच्या आज्ञेविरुद्ध जाळून टाकल्या. कौगांव येथील होळकराच्या एका रिसाल्याला सामील करून घेऊन आम्ही गुजराथकडे वळलों व वाटेंत तारायंत्राच्या तारा तोडून टाकिल्या, परंतु इंग्रजांची एक तुकडी आमच्यावर रवाना झाली आहे असें कळल्यामुळें आम्हीं पुन्हां नर्मदेकडे वळलों. चिखलीस नर्मदा उतरून राजपुराच्या राजाचा पराभव करून आम्ही छोटा उदेपूरास गेलों व तेथें इंग्रजांच्या सैन्याचा पराभव केला. तेथून देवगड बारीवरून बासवाडा टाकून आम्हीं सालमीर येथें गेलों व तेथें एक दिवस मुक्काम करून उदेपुरास जाण्यास निघालों असतां मध्येंच इंग्रज भेटल्यामुळें पुन्हां भिलवाड्याकडे परतलों. तेथून प्रतापगडास जाऊन व इंग्रजांनां तोंड देऊन, मंदसोरवरून झिटापूर, छप्राबारोद, व नहरगड येथें गेलों. तेथील राजा मानसिंग आम्हांस मिळला. परंतु तेथून देवासकडे जात असतांना तो आम्हांस सोडून गेला. मध्यंतरी इंग्रजांचा पराभव करून आम्ही मारवाडकडे चाललों. वाटेंत देवगड बारीपासून माझी व रावसाहेबाची बोलाचाली होऊन मी यापुढें तुमच्याबरोबर पळत फिरणार नाहीं व वेळ आल्यास निघूनहि जाईन असें स्पष्ट बजाविलें. पुढें परोन येथें मी त्यांनां सोडलें. त्यावेळीं रावसाहेबांच्या बरोबर ६००० सैन्य होतें. आणि माझ्याबरोबर १ स्वंयपाकी ( रामराव ), १ शागीर्द, ( नारायण ) आणि १ मोतद्दार ( गोविंद ) येवढाच काय तो परिवार होता. पुढें दोन मजला झाल्यावर गोविंद मला सोडून गेला. परोनच्या जंगलांत मला राजा मानसिंग भेटला. त्यानें मला रावसाहेबांना सोडल्याबद्दल दोष दिला. परंतु त्यांच्याबरोबर पळत फिरण्याचा मला कंटाळा आला असें मी त्यास सांगितलें. यावेळीं रावसाहेब पाटणावरून सिरोंजास गेला असें मला समजलें. मी बातमी काढली असतां रावसाहेब तेथें नसून इमामअल्ली, वर्दी मेजर, फिरोजशाहा, अंबापाणीवाला नबाब आणि अदील महंमद हे आठ नऊ हजार सैन्यासह तेथें असल्याचें समजलें. त्यांनीं मला मदतीस बोलाविलें. यावेळीं राजा मानसिंग हा आपल्या गांवीं जातो असें मला सांगून महुदीया येथें मेजर मीड याला शरण गेला होता व त्यानें त्याला माफी केली होती. मानसिंगास मी वरील इमाम अल्लीनें मदतीस बोलाविलें आहे असा निरोप कळवून मी पुढें काय करावें असा त्यास सल्ला विचारला. तेव्हां तिसर्‍या दिवशीं रात्रीं तो स्वतःच माझयाकडे आला व माझ्याशीं इतर गोष्टी बोलूं लागला. तेव्हां मी त्याला पुन्हां सल्ला विचारला असतां, सकाळीं काय तें नक्की सांगतों असें त्यानें उत्तर दिलें. त्यानंतर मी निजण्याकरतां गेलो व मला झोंप लागली असतां मानसिंगानें विश्वासघात करून मला पकडलें व त्यानें मला इंग्रजांच्या (मेजर मीड) हवालीं केलें'' याप्रमाणें तात्याटोपीनें आपली हकीकत ता. १० एप्रिल १८५९ रोजीं मुबेरी गांवीं इंग्रज अधिकारी मेजर मीड यास सांगितली.

तात्याला पकडून देण्याबद्दल मानसिंगास वार्षिक १ हजारांचें वर्षासन इंग्रजांनीं करून दिलें तें अद्याप चालत आहे ( टाईम्स १७-३-१८९९ ).

तात्यांचा मुलगा पांडुरंगराव हा नानासाहेब पेशव्याबरोबर नेपाळांत गेला होता. त्याचे चारीहि मुलगे ( वडील बळवंतराव ) पुढें नानासाहेबांच्या बायकामंडळीबरोबर राणीगंज येथें रहात असत. त्यांनीं पेशव्यांच्या या मंडळींनां मातृवत मानून यावज्जन्म त्यांच्या सेवेंत आपलें जन्म खर्चिलें.

तात्याची जबानी इंग्रज लष्करी अधिकार्‍यांनीं त्यांनां पकडून कैदेंत टाकल्यावर घेतली असल्यामुळें, ती सक्तीच्या खुषीनें घेतली असण्याचा बराचसा संभव आहे. अर्थात् तींतील मजकुराची ग्राह्याग्राह्यता इतर पुराव्यावरून ठरवावी लागेल.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .