प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या
   
तानाजी मालुसरे — हा मराठा ताजीचा असून शिवाजीचा परम विश्वासु असा बाळमित्र होता. प्रतापगडाखालीं जावळी खोर्‍यांतील उमराठें हें याचें राहाण्याचें गांव. लहानपणापासून हा शिवाजीबरोबर अनेक संकटांच्या प्रसंगांत होता.  त्याला किल्ले घेण्यांतहि हा पुष्कळ उपयोगी पडला. अफजलच्या प्रसंगांत हा शिवाजीबरोबर भेटीच्या मंडपांत गेला होता व पुढें यानेंच अफजलच्या सय्यद बंडा नांवाच्या अंगरक्षकास छाटून टाकिलें ( १६५९ ). पुढें शाहिस्तेखानाच्या छाप्यांत जीं १०/१२ माणसें शिवाजीबरोबर खानाच्या तंबूंत धाडसानें घुसलीं, तींत हा एक होता (१६६३ ). आग्र्यास शिवाजी गेला, त्यावेळीं याला बरोबर नेलें होतें ( १६६६ ). तेथून स्वदेशीं परत आल्यावर लगेच शिवाजीनें आपले मोंगलास दिलेले किल्ले परत घेण्याची मोहीम आरंभिली. तींत कोंडाणा घेण्याची कामगिरी याच्याकडे आली. यावेळीं तानाजी हा बारा हजार हशमा ( पायदळा ) चा सुभेदार होता. त्याला पालखीचा व पांच कर्ण्यांचा मान होता. राजमाता जिजाबाईच्या मनांत कोंडाणा किल्ला घेण्याचा विचार आला; कारण तो किल्ला पुण्याच्या तोंडाला व जेजुरीच्या बारीला असल्यानें तेवढ्या प्रांतावर देखरेख राही. जिजाबाईनें शिवाजीला सांगून गड लवकर घेण्याची व्यवस्था केली. गड घेण्यास तानाजीशिवाय दुसरा सरदार योग्य दिसेना कारण गडावर या सुमारास उदेभान नांवाचा शूर किल्लेदार औरंगझेबाकडील होता. हा मूळचा राठोड रजपूत असून पुढें बाटून मुसुलमान झाला होता. त्याच्या हताखाली रजपूत सैन्य बरेंच होतें.

तानाजी या वेळीं आपल्या गांवीं होता. त्याच्या रायबा नांवाच्या मुलाचें लग्न माघ वद्य षष्ठीस ठरलें होतें व लग्नाच्या हळदीचा सभारंभ चालू होता. इतक्यांत राजदूत येऊन त्यानें शिवाजीचा निरोप कळविला. त्याबरोबर सरकार कामगिरीमुळें तानाजीनें लग्न पुढें ढकललें. आपला भाऊ सूर्याजी, मामा शेलार, मकाजी दादाजी, रुपाजी काटकर वगैरे शूर सरदार व गांवांत जमली तेवढी फौज घेऊन तानाजी ताबडतोब राजगडास येऊन राजास भेटला. शेलार मामानें सांगितलें कीं, आधीं लग्न उरकून मग कामगिरीवर जाऊ; तेव्हां तानाजी म्हणाला आधीं लगीन सिंहगडचें करूं मग रायबाचें. तसेंच उदेभानाच्या पराक्रमाबद्दल कोणी सांगितलें असतां त्यानें उत्तर केलें 'आम्हीं शूर मर्द क्षत्री (य) नाहीं भिणार मरणाला.'

शिवाजीनंतर तानाजी जिजाबाईला भेटला; तिनें त्याला म्हटलें माझा शिवाजी थोरला व तानाजी धाकटा मुलगा आहे; मला कोंडाणा घेऊन दे. त्यानें कबूल करून रायबाला शिवाजीच्या स्वाधीन केलें व म्हटलें कीं, जर कोंडाण्याहून परत आलों तर मी त्याचें लग्न करीन, जर गेलों व तिकडे मेलों तर तुम्ही त्याचें लग्न करा. अशी निरवानिरव करून तानाजी-सुभेदार बरोबर एक हजार पायदळ घेऊन निघाला.  आनंदबारीला येऊन तेथें सैन्य ठेवून रात्रीं सुभेदार आपण स्वतः कोंडाण्याचा भेद काढण्यासाठीं पाटलाचा वेष घेऊन गडाच्या पश्चिमेकडील कोळ्यांच्या चौकीवर गेला. तेथें त्यानें आपण साखरखेड्याचे पाटील असून पुण्यास सरकारी वसूल भरण्यास गेलो होतों, तिकडून आतां परत जात असतां वाघानें अडविल्यामुळें येथें आलों असें सांगून पहारेकरी कोळ्याजवळ पानसुपारी मागितली. पुढें आपल्यापासले अफूचे व माजुमाचे विडे हळूच त्यांनां दिले त्यामुळें ते झिंगले. नंतर त्यांचा नाईक खंडोजी याला कंठी कडीतोडे देऊन सुभेदारानें फितून करून खरी हकीकत सांगितली. तेव्हां त्यानें गडावरील माहिती दिली. उदेभानाजवळ १८०० पठाण व रजपूत असून तो स्वतः फार बळकट व शूर असल्याचें सांगितलें. चांदवडी रुपाया दोन बोटांनीं दाबून चपटा करणें व पहार वळविणें हे त्याचें सहजकृत्य आहे असें समजलें. तसेंच गडाचा सरनोबत सिद्दी हिलाल हा व उदेभानाचे १२ पुत्र हेहि शूर असल्याचें कळलें. तरीपण पूर्वेच्या (नैऋत्य ?) बाजूस डोणागिरी नांवाचा एक अगदीं उभा कडा तुटलेला आहे तिकडून सोल (सांखळी, दोराची शिडी) लावून तटावर चढतां येईल. याप्रमाणें माहिती मिळवून तानाजी फौजेंत परत आला. येतांना किल्ला घेतल्यावर कोळ्यांनां बक्षिसें व खंडोजीला सरदारी देण्याबद्दल हातचा लेख त्यानें लिहून दिला होता. एक हजारं फौजेसह सुभेदार किल्ल्याच्या कल्याण दरवाजाखालीं आला. ती रात्र माघ वद्य नवमीची असल्यानें अंधार फार होता व गडाच्या आसपास झाडीहि दाट होती. सुभेदारानें आपली यशवंती घोरपड घेऊन तिच्या कमरेस सांखळी बांधून तिला त्यानें ठरविलेल्या कड्याच्या वर चढविलें; परंतु ती परत आली. या अपशकुनाकडे दुर्लक्ष्य करून त्यानें पुन्हां तिला वर चढविलें. इतक्यांत शत्रूची घस्त त्या बाजूस आली. तिला खालीं गलबल ऐकूं आल्यावरून शोध करितां खंडोजी कोळ्यानें सांगितलें कीं वाघानें गाय पकडल्यानें लोक गडबड करीत आहेत. तें ऐकून घस्त परतली.

नंतर प्रथम सुभेदार तोंडांत पठ्ठा धरून अंबाबाई व शिवाजी यांनां नमस्कार करून साखळदंड धरून वर चढला. त्याच्या मागून शेलारमामादि पन्नास मावळे वर चढले. त्यांच्या नंतर आणीक लोक चढूं लागले, इतक्यांत साखळदंड तुटला; तेव्हां शेलारमामा घाबरला. परंतु सुभेदारानें त्याला धीर दिला. पुढें दरवाजावर आपले लोक ठेवण्यासाठीं सुभेदारानें पुणें बाजूकडील पहिल्या दरवाजावर जाऊन तेथील पहारेकर्‍यांवर एकाएकी हल्ला करून त्यांनां तोडून काढलें व दरवाजा ताब्यांत घेऊन दुसर्‍या व तिसर्‍या दरवाजांवर जाऊन तेथील पाहरेकरी कापून तेहि काबीज केले. यामुळें गडबड झाली तेव्हां किल्ल्यावरील फौज जागी झाली. पण अंधार्‍या रात्रीमुळें तिला कोठें काय चाललें आहे हें समजेना व इतक्या बंदोबस्ताच्या जागीं शत्रू आले असतील ही कल्पनाहि करवेना. उदेभानास हकीकत समजल्यावर त्यानें चंद्रावळ नांवाचा लढाऊ हत्ती मावळ्यांवर सोडला; त्याचे सोंडेंत पांच पट्टे होते. सुभेदार थोडासा थकला होता. इतक्यांत हत्तीनें त्याच्यावर मोहरा केला. दोघांची झटापट चालली; सुभेदारानें प्रथम महाताला गारदा केलें व मग हत्तीची सोंड पट्टयानें उतरविली तेव्हां हत्ती पळून गेला. नंतर गडाचा सरनोबत सिद्दी हिलाल यानें जमविलें तितकें सैन्य घेऊन सुभेदारावर हल्ला केला. या वेळीं सुभेदार कल्याणदरवाज्याकडे जात होता; कारण सांखळी तुटल्यावर सूर्याजीनें खालीं असलेल्या सर्व सैन्यासह त्या दरवाज्याजवळ जमावें व आपण तो आंतून उघडतो असें सुभेदारानें सांगितलें होतें. सिद्दीचें व सुभेदाराचें द्वंद्वयुद्ध होऊन त्यांत सुभेदारानें त्याला कत्तल केलें.

तेव्हां उदेभानाचे प्रमुख सरदार व १२ पुत्र सुभेदारावर चढाई करून आले. परंतु सुभेदार व त्याचे लोक यांनीं त्यांचीहि खांडोळी केली. अखेर उदेभान सुभेदाराच्या अंगावर आला. त्यानें प्रथम तानाजीस नांवाजून त्याला औरंगझेबाची चाकरी करण्यास बोलाविलें तें त्यानें नाकारलें. या वेळीं तानाजी हा लढून लढून दमला होता; उदेभान ताजातवाना होता. दोघांची लढाई जुंपल्यावर सुभेदार जास्त थकत चालला. उदेभान शूर होता व दारू, अफू वगैरेंच्या अंमलानें बेहोश झाला होता. त्यामुळें सुभेदाराचा हात लटका पडून त्याला जखमा होऊं लागल्या व डाव्या हातची ढालहि तुटली. तेव्हां शेल्यानें हात बांधून त्याच्यावरहि त्यानें वार घेतले; पुढें तोहि हात तुटला; तरीपण तो लढत होता. अखेर उदेभानाच्या एका वारानें तानाजी मरणोन्मुख होऊन पडला; पण त्यानेंहि तेवढ्यांत उदेभानला ठार केलें. याप्रमाणें दोघांच्या हातानें एकमेक पडले. तेव्हा ८० वर्षांच्या शेलारमामानें अंगावर आलेल्या शत्रूशीं लढत लढत कल्याणदरवाजा जवळ केला व तेथील पहारा कापून दरवाजा उघडून सूर्याजीस सैन्यासह आंत घेतलें;

सूर्याजीचा व सैन्याचा धीर खचूं नये म्हणून सुभेदार पडल्याचें शेलारमामानें गुप्‍त ठेविलें. नंतर सूर्याजीनें किल्ल्यावरील मोंगलसैन्याचा पुरा फडशा पाडून किल्ला काबीज केला ( ४ फेब्रु. १६७० ) व त्याबद्दलची खूण म्हणून गवताच्या गंजीस आग लावून पांच तोफा केल्या; त्या रायगडी शिवाजीनें ऐकल्या. पुढें मामानें सूर्याजीला सुभेदाराची खरी हकीकत सांगितली. नंतर सकाळीं सुभेदाराच्या प्रेतास अग्निसंस्कार केला. शिवाजीस व जिजाबाईस सारी हकीकत ऐकून फार दुःख झालें. राजानें दहा दिवस डोईस मंदील काढून पांढरा पटका बांधला व 'गड आला पण सिंह गेला' असे उद्‍गार काढून कोंढाण्याचें नांव सिंहगड ठेविलें; रायबाचें लग्न स्वतः लाविलें. तानाजीचा सेनापतीचा अधिकार सूर्याजीस दिला व सरंजाम रायबाला दिला व डोणजें गांव इनाम दिलें. तानाजीची ही कामगिरी शिवाजीच्या इतिहासांत अवर्णनीय होऊन गेली. या वीररसप्रधान प्रसंगावर त्यावेळींच पोवाडे रचले गेले व अद्यापीहि हा प्रसंग महाराष्ट्रांतील कवींनां वर्ण्यविषय होऊन बसला आहे. तानाजीची समाधि, उदेभानाचें थडगें, तानाजीचा हात तुटलेली जागा, डोणागिरीचा कडा वगैरे ठिकाणें सिंहगडावर पाहण्यासारखीं आहेत. [तुळशीदासाचा पोवाडा; सप्‍तप्रकरणात्मक चरित्र; शिवदिग्विजय]

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .