प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या   

ताराबाई — थोरल्या शिवाजीचा धाकटा मुलगा राजाराम अटकेंत असतांना (१६८०-१६८९) त्याची पहिली बायको वारल्यावर संभाजीनें त्याचें हंबीरराव मोहिते सेनापति यांच्या ताराबाई नांवाच्या मुलीशीं लग्न लावून दिलें. हिचें सासरचें नांव सीताबाई होतें, परंतु ते लोपून माहेरचेंच ताराबाई हें प्रख्यात झालें. हिचा जन्म स. १६७५ त झाला. संभाजीचा वध झाल्यावर राजारामानें प्रथम विशालगड व मग जिंजी येथें राज्यकारभाराचें मुख्य ठाणें केलें. तेथें ही व हीच्या सवती राजसबाई व अंबिकाबाई या राहत असत. हिला १६९१ त शिवाजी नांवाचा पुत्र झाला. तें ऐकून येसूबाईनें (औरंगजेबाच्या कैदेंतून) राजारामास राज्यावर बसण्याबद्दल व मुलें माणसें जिंजीस, विशाळगडाहून नेण्याबद्दल निरोप पाठविला. त्याप्रमाणें राजारामानें त्यांना जलमार्गानें पाठविलें व मंडळी जिंजीस दाखल झाली. पुढें जिंजीहून राजाराम निघून विशाळगडाकडे आल्यावर या बाया झुल्फिकरखानाच्या हातीं लागल्या होत्या, पण त्यानें त्यांनां कैद न करितां संभाजीचा मेव्हणा गणोजी शिर्के याच्या हवाली केलें व त्यानें त्यांनां विशाळगडीं पोंहोचविलें. राजाराम मरण पावला तेव्हां हिला शिवाजी नांवाचा एक दहा वर्षाचा मुलगा होता. त्याला रामचंद्रपंत आमात्य, शंकराजी नारायण व धनाली जाधव सेनापती यांच्या मदतीनें गादीवर बसवून हिनें राज्यसूत्रें आपल्या हातीं घेतलीं, व राजसबाईस तिच्या संभाजी नांवाच्या मुलासह कैदेंत ठेविलें. प्रथम रामचंद्रपंत या गोष्टीत राजी नव्हता. परंतु त्यामुळें गृहकलह वाढतो ते पाहून त्यानें संमति दिली. पण याचा परिणाम होऊन सरदारांत फांटफूट झालीच.

ताराबाईनें परशराम त्रिंबकास प्रतिनिधि करून त्याच्याकडे सर्व किल्ल्यांच्या बंदोबस्ताचें काम सोपविलें व स्वतः कोणत्याहि एका किल्ल्यांत न राहतां वेळ पडेल त्याप्रमाणें जागा बदलण्याचें ठरविले; याच वेळीं धनाजी जाधव, निंबाळकर, भोंसले, दाभाडे, चव्हाण, वगैरे सरदारांनी मोंगलांच्या मुलुखांत शिरून सर्व ठिकाणाहून चौथाई, सरदेशमुखी व घासदाणा या नांवाखालीं पैसा गोळा करण्याचा क्रम आरंभिला (१७००).

अवरंगझेब मरण पावल्यावर अझीमशहा मोंगल सैन्यासह उत्तरेकडे रवाना होतांच धनाजीनें पुण्याच्या मोंगल फौजदाराचा पराभव केला, चाकण किल्ला सर केला व मागील युद्धांत मोगलांनी घेतलेला मुलूख आपल्या ताब्यांत परत घेण्यास झपाट्यानें सुरूवात केली (१७०७). तेव्हां झुल्फिकरखानाच्या सल्यानें अझीमशहानें शाहूची सुटका केली व तो दक्षिणेंत यावयास निघाला; तेव्हां परसोजी भोंसले, हैबतराव निंबाळकर व नेमाजी शिंदे शाहूस मिळाले. शाहूनें आपण परत आल्याचें वर्तमान ताराबाईस कळविलें. परंतु आपल्या हातची सत्ता सोडण्यास ताराबाई राजी नसल्यामुळें ती शाहू हा कोणी तरी तोतया आहे असें म्हणूं लागली. तिनें रामचंद्रपंत, निळोपंत, धनाजी जाधव, परशराम त्रिंबक शंकराजी नारायण, कान्होजी आंग्रे, व फोंडसावंत यांच्या जवळून स्वामिभक्तीची शपथ घेववून शाहूला तोंड देण्याचें ठरविलें. धनाजी व परशराम त्रिंबक यांची शाहूवर रवानगी झाली. परंतु शाहूनें धनाजीस आपल्याकडे वळवून घेतलें व पुण्याच्या उत्तरेस बावीस मैलांवर खेड कडूस येथें दोन्ही पक्षांत झालेल्या चकमकींत पराभव पावून परशराम त्रिंबक सातार्‍यास निघून गेला (१७०७). पुढें धनाजीच्या मदतीनें चंदन व वंदन व शेखमिर्‍याच्या मदतीनें सातारा हे किल्ले शाहूनें घेतले (१७०७). सातारा हातीं आल्यावर शाहूनें आपल्या स्वतःस राज्यभिषेक करून घेतला (१७०८); व ताराबाई सातार्‍याहून पन्हाळ्याकडे पळून गेली.

पुढें (१७०८-०९) पन्हाळा व विशाळगड हे किल्लेहि शाहूच्या स्वाधीन झाले. यानंतर तो रांगण्यास आला तेव्हां ताराबाई तेथून मालवणास पळून गेली व रांगणा शाहूच्या हातीं पडला व कोल्हापूरहि त्यानें घेतलें. झुल्फिकरखानाचें व शाहूचें सख्य असल्यामुळें, व उत्तरेस जातांना त्यानें मागें दक्षिणच्या सुभेदारीवर ठेवलेल्या दाऊदखान पन्नी नांवाच्या सरदारानें मराठे सरदारांशी तडजोड करून जें शाहूचें स्वामित्व कबूल करतील त्यांनाच फक्त दक्षिणच्या सुभ्यांच्या वसुलाचा चवथा हिस्सा कांही अटींवर देण्याचें कबूल केल्यामुळें ताराबाईचा पक्ष आतां निर्माल्यवत् झाला (१७०९).

पुढें १७१० त पन्हाळ्याच्या किल्लेदारानें तो किल्ला ताराबाईच्या स्वाधीन केला. तिनें वाडकर सांवताच्या मदतीनें आणीक किल्ले घेतले. ताराबाईनें आतां पन्हाळा किल्ला व त्याच्या जवळचेंच कोल्हापूर शहर हीं आपल्या पक्षाचीं कायमचीं राहण्याचीं ठिकाणें केलीं. या वेळीं हिचा पक्ष फार प्रबळ झाला. कारण धनाजी जाधव मेल्यानें व थोरात, निंबाळकर, पांढरे, आंग्रे, खटावकर, चव्हाण, सांवत, पंतअमात्य व प्रतिनिधि ही मंडळी ताराबाईकडे होती. यांनी निरनिराळे टापू व्यापून सातारा ते कोल्हापूर प्रांतात धुमाकूळ घातला. सारांश १७०७-१० पर्यत शाहूची सत्ता सातारा व त्याच्या आसपास ५/२५ मैल इतकीच होती. ही सर्व स्थिति बाळाजी विश्वनाथानें पालटविली. त्यानें सैन्य जमवून ताराबाईशी तोंड दिलें, तसेंच पशुरामपंतास कैदेतूंन काढून त्याला प्रतिनिधिपद दिले; अनेक सरदार नवीन निर्माण केले. ताराबाईकडील कांही सरदार फितवले व शाहूचा पक्ष बळकट केला व शिवाजीस तर वेडा ठरविले. इतक्यांत (१७१२ जानेवारी) ताराबाईचा मुलगा शिवाजी देवीने मरण पावला. त्याच्या मरणानें कोल्हापुरचा राज्यकारभारांत बरीच क्रांति झाली. रामचंद्रापंतानें आतां राजसबाईचा मुलगा संभाजी यास गादीवर बसवून ताराबाई व तिची गरोदर असलेली सून भवानीबाई यांना अटकेंत ठेविलें.  या कामींहि बाळाजीपंताचा हात होता. त्यामुळें संभाजी हा पुढें शाहूचा मिंधा राहिला. परंतु पुढें संभाजी हा शाहूशीं कुरापती काढून भांडूं लागला, त्याला निजामउल्मुल्क, उदाजी चव्हाण वगैरे मंडळीनीं मदत केली. अशा एका लढाईत वारणेतीरी श्रीपतराव प्रतिनिधीनें संभाजीचा पराभव केला व त्याचा सारा जनानखाना कैद केला (१७३०). ताराबाई त्यांत होती; तिला परत पाठवितांना तिनें कोठेंहि (कोल्हापूर किंवा सातारा) कैदैंतच राहावयाचें तर तुम्हांजवळ राहते असें म्हटल्यावरून शाहूनें तिला सातारच्या किल्यांत नजरकैदैंत ठेविलें. ती जर या वेळीं कोल्हापुरास जाती तर पुढें रामराजाची स्थापना सातार्‍यास होती ना; परंतु तेथें तिची सून जिजाबाई (संभाजीची राणी) ही तिची मात्रा चालू देत नसे.

पुढें आपल्यास संतति होत नाहीं असें पाहून शाहू एखादा मुलगा दत्तक घेणार आहे हे ताराबाईस समजलें, तेव्हां मी हें दत्तविधान होऊं देणार नाहीं असें ती म्हणूं लागली. आणि बारीक चौकशी केल्यावर आपला नातु, शिवाजीचा मुलगा रामराजा हा अद्याप जिवंत आहे असें तिनें प्रगट केलें व त्याला दत्ताक घेण्याबद्दल शाहूस आग्रह केला. तेव्हां तें त्यानें कबूल केलें व त्याप्रमाणें रामराजास गादीवर बसविण्यास सांगून शाहू वारला. या कामांत ताराबाई व तिची सून सकवारबाई यांचा तंटा लागला होता. परंतु पेशव्यानें युक्तीनें तें काम तडीस नेलें. सकवारबाई सती गेल्यानें या कार्यांत विघ्नहि राहिलें नाहीं. सकवारनें सती जाण्याबद्दल ताराबाईचाच विशेष आग्रह असावा. पुढें रामराजाला सातार्‍यास (पानगांवाहून) आणल्यानंतर रामराजा हा आपला नातु आहे अशी रघुजी भोसंल्याची व इतर मराठेमंडळाची खात्री करण्यासाठीं ताराबाई सर्वासमक्ष रामराजा बरोबर एका ताटांत जेवावयास बसली (१७५०). रामराजाला लहानपणींच जिजाबाईच्या भीतीनें ताराबाईनें पळवून पानगांवी नेलें होतें. या कामीं रामचंद्रपंत अमात्याची तिला मदत होती. या वेळीं तिचें वय ७० वर होतें. या प्रसंगी मात्र ती पेशव्याशीं मोकळेपणानें वागली.

पण पुढें रामराजास गादीवर बसवून नानासाहेबानें सर्व सत्ता आक्रमिली हें तिला न खपून, ती आपल्या पतीच्या समाधीचें दर्शन घेण्याच्या मिषानें सिंहगडास आली, व रामराजा हा खोटा आहे असें म्हणून आपल्या हातीं अधिकार-सूत्रें घेण्याकरितां पंतसचीवाशीं कारस्थान करूं लागली. तेव्हां पेशव्यानें मोठ्या मुष्कीलीनें तिचें मन वळवून तिला पुण्यास आणलें, व तिची खुशामत करून आपल्या सर्व योजनांत तिची व तिच्या मार्फत रामराजाची संमति मिळविली. यावेळी दिल्लीस गाजीउद्दीन वगैरे दरबारी मंडळी मराठ्यांनां अनुकूल होती व नानासाहेबांचा उद्देश मराठी साम्रज्याचा प्रसार दिल्लीकडे करण्याचा होता, परंतु ताराबाईनें घोळ घालून तो तडीस जाऊं दिला नाहीं.

निजामास मदत करण्याकरितां औरंगाबादेकडे जाण्यापूर्वी ताराबाईने आपल्या पश्चात् कांही कारस्थानें करूं नयें. म्हणून सातारच्या किल्ल्यांत तिचेच लोक ठेवून, व त्यांची सर्व व्यवस्था तिजकडे सोंपवून तिला खूष ठेवण्याचा पेशव्यांनीं प्रयत्‍न केला. अशा वेळीं एकदां ताराबाइनें खडा टाकून पेशव्याच्या दास्यत्वांतून मुक्तता करून घेऊन स्वतंत्र होण्याची रामराजाची कितपत इच्छा आहे हें पाहिले. परंतु आपल्या कारस्थानांत भागीदार होण्यास तो लायक नाहीं, असें आढळून येतांच तिनें दमाजी गायकवाडास निरोप पाठविला कीं, सर्व देशांतील बहुतेक सैन्य तूर्त पेशव्याबरोबर गेलें आहे; तरी यावेळी तुम्हीं येथें येऊन राजाला व सर्व मराठी साम्राज्यास ब्राह्मणांच्या जुलमांतून मुक्त करावें. दमाजी गायकवाड जवळ आल्याचें जेव्हा ताराबाईस समजलें तेव्हां तिनें राजास एकदां किल्ल्यावर येण्याकरितां निमंत्रण देऊन, तेथें तो आला असतां त्यास कैद करून भित्रेपणाबद्दल त्याचीं चांगली निर्भत्सना केली. नंतर तिनें गडाखालीं शहरांत पेशव्यांच्या पक्षाची जी मंडळी होती त्यांच्यावर तोफा डागण्याविषयीं हवालदारास हुकूम केला. नाना पुरंदरे, गोविंदराव चिटणीस वगैरे मंडळी आरळ्याकडे पळून गेली, व तेथें त्यांनी सैन्य जमा केलें. प्रथमत: गायकवाडानें या मंडळीचा नींब येथें पराभव केला; परंतु नाना पुरंदर्‍यानें पुढें लवकरच त्याचा वचपा काढून दमाजीस जोर खोर्‍याकडे मागें हटविलें. इतक्यांत नानासाहेब कर्नाटकांतून परत आला व त्यानें सातार्‍यास टाकोटाक येऊन गेंड्याच्या माळावर गायकवाडाच्या गोटावर हल्ला करून तो लुटला, व दमाजीस कैद करून बंदोबस्तानें पुण्यास पाठविलें. राजा व किल्ला हीं दोन्हींहि आपल्या स्वाधीन करण्याकरितां ताराबाईचें मन वळविण्याचा पेशव्यानें प्रयत्‍न केला. परंतु त्यांत यश येत नाहीं असें पाहून, तो ताराबाईच्या वाटेस न जातां परत औरंगाबादेकडे केला (१७५१).

तो तिकडे गेल्यावर ताराबाईनें पांच सहा हजार मराठे व रामोशी चाकरीस ठेवून वांई व सातारा हे दोन्हीहि जिल्हे कबजांत घेतले. औरंगाबादेहून परत आल्याबरोबर पेशव्यानें सातार्‍यास वेढा देण्यासाठीं बरेंच मोठें सैन्य रवाना केलें (१७५३). पेशव्यांच्या सैन्यापुढें आपला टिकाव लागणार नाहीं, अशी सातारचा हवालदार आनंदराव जाधव यास खात्री वाटत असल्यामुळें, त्यानें राजास ताराबाईच्या कबजांतून काढून नेण्याचें ठरविलें. ही गोष्ट ताराबाईस समजतांच तिनें आनंदरावाचा, व त्याच्या कटांत जे जे कोणी सामील होते त्या सर्वाचा शिरच्छेद करण्याचा हुकूम केला; व आनंदराव जाधवाच्या जागीं बाबूराव जाधव नांवाच्या दुसर्‍या एका माणसाची योजना केली. कर्नाटकांत जाण्यापूर्वी पेशव्यानें ताराबाईस सांगून पाठविलें कीं, तुम्हीं आतां माझ्या स्वाधीन झाला तर राजा व त्याचा सर्व इतमाम तुमच्या ताब्यांत देण्यांत येईल. परंतु ताराबाईने पेशव्यास साफ सांगितलें कीं, तुम्ही अत:पर माझी सत्ता मान्य करण्यास तयार आहां याविषयीं सातार्‍यास येऊन माझी खात्री पटवून दिल्याशिवाय मी तुमचें ऐकणार नाहीं.

पुढें (१७५५) जानोजी भोसले पुण्यांत आला असतां त्यानें, मी पेशव्यांपासून तुम्हांस कांही अपाय होऊं देणार नाहीं असें ताराबाईस आश्वासन दिल्यावर ती पुण्यास आली. तेथें नानासाहेबानें तिचा चांगला आदरसत्कारं करून तिची दिलसफाई करून घेतली. परंतु रामराजास बंधमुक्त करण्यास मात्र ती तयार झाली नाहीं.

शेवटीं १७६१ च्या डिसेंबर महिन्यांत ताराबाई निवर्तली. मरणसमयीं तिचें वय ८६ वर्षांचें होतें. ती जिवंत होती तोंपर्यंत रामराजाचा बंदिवास तिळभरहि कमी झाला नाहीं. अगदी अखेरपर्यंत तिच्या मनांत बाळाजी बाजीराव व सदाशिवरावभाऊ यांच्याविषयीं पूर्ण द्वेष वास करीत होता. पनिपतच्या युद्धाचा दुःखपर्यवसायी शेवट होऊन त्यांत भाऊची आहुती पडली, मागून नानासाहेब शोकानें मरण पावला, तेव्हा मात्र ताराबाईस फार समाधान वाटलें. व आतां मी सुखानें मरेन असें ती म्हणाली [पेशव्यांची बखर; शाहूमहाराजांची बखर; राजवाडे खंड ३, ६, ८].

ताराबाई ही फार महत्त्वाकांक्षी, दीर्घोद्योगी, रागीट, हट्टी व मत्सरी होती. रामचंद्रपंत वगैरे बर्‍याच जुन्या सरदारांच्या मनांत प्रथम शाहूस गादीवर बसवावयाचें होतें, परंतु हिला तें आवडलें नाहीं व आपल्या मुलास राजा करण्याचा हट्ट तिनें तडीस नेला. या कृत्यास प्रतिनिधि (परशुरामपंत) व (शंकराजी नारायण) सचीव ह्यांची मदत तिंने घेतली. एव्हांपासूनच सरदारांत वैमनस्यें वाढलीं व त्याचा परिणाम मराठेशाहीवरील पुढच्या ६० वर्षावर घडला. ताराबाईनेंच मराठी साम्राज्यांत दुहीचें बीज पेरलें. ती दीर्घसूत्री, आपल्या स्वार्थासाठीं वाटेल तें करणारी, करारी, फार संशयी व पेशव्यांचा द्वेष करणारी होती व या कामीं देवानें तिला आयुष्यहि फार दिलें. राजारामापुढें तिचें चालेलें नाहीं. तो मेल्यावर व शत्रू दाराशीं बसला असतां, खर्‍या मुत्सद्दी रामचंद्रपंताचा सल्ला तिनें धुडकावला. एकदां तर संशयावरून तिनें त्याचा अपमान करून त्याच्या पायांत रूप्याची बेडी घातली होती. परंतु तो मात्र शेवटपर्यत तिच्याशी इमानानें वागला. हिच्या कारभारानें शिवाजीनें घालून दिलेल्या लष्करादि एकंदर राज्यव्यवस्थेंतील शिस्त नाहींशी होऊन, एकसूत्रीपणा गेला. येसूबाईसारखी ही नि:स्वार्थी नसून स्वतः तर स्वार्थी होतीच, परंतु तिच्या उदाहरणानें त्यावेळीं सरदारांतहि स्वार्थ बोकाळला. परशुरामपंत हा रामचंद्रपंताचा मत्सर करूं लागला. त्याला प्रतिनिधीपदाची लालूच देऊन तिनें फितविलें.  'शाहूस आणवून राज्यावर बसवावा' असेंच मरेपर्यंत राजारामानें सांगितलें होते, परंतु तें तिनें एकीकडे ठेविलें तिच्या अंगी मुत्सद्दीपणा फारसा नव्हता, मराठी साम्राज्यांत तिनें ५०-६० वर्षे ढवळाढवळ करून कोणासहि स्वस्थता लाभूं दिली नाहीं. संशयी स्वभावानें तिनें आपल्या पक्षाच्या लोकांनांहि निर्धास्त काम करूं दिलें नाहीं. त्यामुळे जुने मुत्सद्दी निरूपयोगी झाले व नव्यांना सढळ वाव मिळाला नाहीं. तिची एकंदर ४० वर्षे कैदेत गेलीं. यावरून तिला अडकवून ठेवणेंच श्रेयस्कर असें राष्ट्रभक्तांस त्यावेळी वाटत असावें असें दिसतें.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .