प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या   

तारायंत्र — धातूच्या तारेंत विद्युत्प्रवाह सोडून त्याच्या साहाय्यानें पुष्कळ अंतरावर अतिशय वेगानें या यंत्राने सांकेतिक खुणा पाठवितात. या खुणांचा संदेश पाठविण्याकडे उपयोग करितां येतो म्हणून त्यास तारायंत्र म्हणतात. यास विद्युत्संदेशहारक यंत्र असाहि परिभाषिक शब्द आहे. तांब्याची तार किंवा जस्ताची कल्हई केलेली लोखंडी तार पृथ्वीपासून चिनीच्या प्याल्यांच्या योगानें विद्युतदृष्ट्या निरूद्ध असलेल्या खांबावरून नेऊन  दोन स्थळांचा वैद्युतिक संबंध जोडतात. या तारेस विद्युन्मार्ग असें नांव दिलें आहे. बहुतेक ठिकाणीं वीज उत्पन्न करण्याकरितां तारायंत्रात विद्युदघटमोलचा उपयोग करितात. डानिअल्, बायक्रोमेट् किंवा लाकलांशे या नांवानें प्रसिद्ध असलेल्या तीन प्रकारचे विद्युदघट बहुधां वापरतात. याशिवाय ज्यांत विद्युत्संचय करून घेंता येतो अशा प्रकारच्या 'अ‍ॅक्युम्युलेटर' नांवाच्या विद्युत्संचायक साधनांचाहि कित्येक स्थळीं उपयोग करण्याचा प्रघात आहे. बर्‍याच दूर अंतरावर असलेल्या दोन स्थळांचा संबंध घटमालेच्या योगें घडवून आणण्यापेक्षां संचायकाच्या योगानें घडवून आणण्यांत फायदा आहे. कारण त्या योगानें पैशाची बचत होऊन त्रास कमी पडतो. जमीनीवरून तारायंत्रासाठीं तार नेणें सोपें आहे; परंतु समुद्रांतून नेणें फारच कठिण आहे; व या कारणामुळे तारायंत्राचा शोध लागून कित्येक वर्षे लोटली तरी समुद्रांत तार घालण्याचें धाडस कित्येंकांनी केलें नाहीं. या कामांत प्रथमत: बहुतेकांस चांगलेसें यश आलें नाही; परंतु १८५१ सालीं डोव्हरच्या सामुद्रधुनींत तार घालण्यांत आली. हीच समुद्रांतील पहिली तार होय. नंतर कांही वर्षानी इंग्लंड आणि अमेरिका हे दोन देश तारायंत्रानीं निगडित करण्यात आले.

समुद्रांतील तारेची रचना - दोन स्थलांमध्यें शेंकडो किंवा हजारों मैल समुद्र असतो. म्हणून वादळ, लाटा, वारा किंवा समुद्रातील प्राणी यांच्यापासून तारेस धक्का पोहचूं नये म्हणून विशिष्ट पद्धतीनें तार तयार केलेली असतें. तांब्याच्या सात तारा एकत्र करून त्यांची एक दोरी केलेली असते. या दोरीसभोंवतीं गटापर्चा व डांबर यांचे चार पांच थर दिलेले असतात. व त्यांस डांबरांत बुडविलेल्या वांकानें मढवून काढितात. व हे सर्व एकत्र रहावे म्हणून त्यावर डांबर आणि वांक यांनी मढविलेली पोलादी तार गुंडाळतात. या प्रकारे तयार झालेल्या तारेवर खारट पाणी आणि समुद्रांतील मोठाले प्राणी यांचे कांही चालत नाहीं.

मॉर्सचें तारायंत्र - धावडी लोखंडाच्या एकाद्या शलाकेसभोंवतीं रेशमानें गुंडाळलेल्या तारेचे मळसूत्राकार वेढे दिले आणि त्यांतून विद्युत्प्रवाह सोडला तर त्या लोखंडाच्या अंगाची चुंबकशक्ती विलयास जातें. विजेच्या या गुणधर्माचा उपयोग करून मॉर्स यानें एक तारायंत्र तयार केले. त्याची रचना संक्षेपत: पुढें दिल्याप्रमाणें आहे:- विद्युतप्रवाह एका लोंखडी तुकड्यासभोंवार फिरवावा. ह्या लोखंडी तुकड्याशेजारीं एका स्प्रिंगला जोडलेली लहानशी लोखंडी पट्टी ठेवावी. या पट्टीचें एक टोंक सुटें असून त्याला सुईसारखें टोंक असतें. जेव्हां प्रवाह सुरू होतो तेव्हां ती पट्टी आकर्षिली जाऊन वेटोळ्यांत असलेल्या लोहाच्या तुकड्यास चिकटते प्रवाह चालू असतांना सुईच्या टोंकाजवळ एक कागदाची पट्टी सावकाश सरकत जाईल अशी योजना केलेली असते. म्हणून क्षणिक प्रवाहानें कागदी पट्टीवर टिंब उठूं शकतें. जर प्रवाह तत्काळ बंद न करितां कांहीं काळ तसाच सुरू ठेविला तर त्याच्या योगानें रेघ उठतें. अशा रितीनें रेषा आणि टिंबें यांच्या सांकेतिक समुच्चयानें वर्णमाला बसवितां आली आहे. उ.- म्हणजे अ, - ... म्हणजे ब, --.--. म्हणजे क इ. इ. तारखात्यांतील कारकून इतके तरबेज असतात कीं, नुसत्या आवाजावरूनच त्यांनां तार वाचतां येतें. तारेच्या कागदी पट्टीवरील रेषा आणि टिंबें यांकडे त्यांनां बिलकुल पहावें लागत नाहीं.

मॉर्सच्या यंत्रपद्धतीशिवाय दुसर्‍या अनेक तर्‍हा आहेत. त्यापैंकी दोन पुढें दिल्या आहेत. फिरत्या लोहचुंबकाच्या सुईसभोंवार जर विद्युतप्रवाह फिरविला तर सुई उजवीकडे अगर डावीकडे प्रवाहाच्या दिशेच्या उलट सुलट अनुक्रमानें फिरते. असल्या प्रकारच्या चलित सुईचा उपयोग करून एक तारायंत्र बसविलें आहे. या यंत्रात घड्याळाघर ज्या प्रमाणें रोमन आंकडे असतात त्याप्रमाणें चुंबक सुईच्या सभोंवार वर्णमाला बसविलेली असते व त्यायोगानें संदेश पाठवितां येतो. याच यंत्रांत जर डावीकडे सुई वळली तर टिंब आणि उजवीकडे सुई वळली तर रेषा असा संकेत करून संदेश पाठविता येतो. अशा यंत्राच्या तबकडीवर वर्णमाला काढीत नाहींत.

वरिल दोन प्रकाराच्या यंत्रापैकीं पहिल्या यंत्रावरून बातमी वाचणें जरी सुलभ आहे तरी तें यंत्र वापरणें त्रासदायक असून बातमी जलद रीतीनें पाठवितां येत नाहीं. म्हणून वरील यंत्राचा यूरोपांतील बडे लोक घरगुती कामाकडे क्वचित् क्वचित् उपयोग करितात. दुसर्‍या प्रकारचें यंत्र कित्येक ठिकाणीं प्रचारांत आहे. तारायंत्राचे काम सुव्यवत्थित चालण्याकरितां प्रवाह जात आहे किंवा नाहीं हें समजणें अत्यावश्यक आहे; व त्याकरितां गॅलव्हानो मिटरचा म्हणजे चुंबकत्व असलेल्या सुईचा उपयोग करितात.

दुहेरी तारायंत्र - एकाच तारेच्या योगानें एकाच वेळीं बातमी पाठविणें आणि बातमी घेणें हें एकसमयावच्छेदेंकरून ज्या यांत्रिक रचनेमुळें करिता येईल अशी रीत प्रथमत: जी.डब्लू गिंट्ल यानें सन १८५३ सालीं शोधून काढली. त्यानंतर या पद्धतींत अनेक सुधारणा होऊन 'डिफरेन्शिअल' पद्धति आणि 'ब्रिज ' पद्धति अशा दोन महत्त्वाच्या रीती व्यवहारांत चालूं आहेत. या दोन रीतींपैकीं 'ब्रिज' रीत जास्त उपयुक्त आहे म्हणून तिची माहीती पुढें दिली आहे. (आकृति नं. १ पहा ).

व ही ब्याटरी आहे व र हा रिओस्टॅट् आहे (रि ओस्टॅट् म्हणजे वीज जास्त कमी न जातां एका ठराविक प्रमाणांत जाऊं देण्याचें यंत्र ); क हें कन्डेन्सर आहे, म्हणजे विजेचा संचय करण्याचें यंत्र. पृथ्वी म्हणून खूण केलेली तार पृथ्वीस जोडली आहे आणि तार म्हणून निर्देश केलेली तार परस्थळीं पाठवून दिली आहे.

ब ह्या ब्याटरींत उत्पन्न झालेली वीज किल्लींतून जाऊन ड या ठिकाणीं ड प आणि ड च या दोन मार्गांनीं विभागतें. ड प आणि ड च या दोन ठिकाणीं विजेस सारखाच प्रतिरोध व्हावा म्हणून ज्या दोन तारांची विद्युत्प्रतिरोध-शक्ति सारखीच आहे, असल्या तारा बसवितात. ब्याटरीचें दुसरें ध्रुवटोंक पृथ्वीस जोडून तें पुढें कन्डेन्सर आणि रि ओस्टॅट यांस ''समान्तर'' जोडून 'च' या ठिकाणीं जोडलेलें असतें. किल्लीच्या साहाय्यानें विजेचा संयोग अगर वियोग केला तरी प आणि च या ठिकाणीं विजेचा जोर सारखाच रहातो. त्यामुळें तार घेणार्‍या यंत्रावर कांहींच परिणाम घडत नाहीं. परंतु जेव्हां तारेंतून दुसरीकडची बातमी स प या ठिकाणीं दोन मार्गानें विभागते व ड प या मार्गाचा विरोध प, च, पृथ्वी या मार्गापेक्षा भिन्न असल्याकारणानें येणार्‍या विद्युत्प्रवाहाचा परिणाम तार घेणार्‍या यंत्रावर घडतो. याप्रमाणें परस्थळीं जाणार्‍या विद्युत्प्रवाहाचा परिणाम तार घेणार्‍या यंत्रावर न घडतां परस्थलाहून येणार्‍या विद्युत्प्रवाहाचा परिणाम घडतो व त्यामुळें एकाच तारेंने बातमी पाठविणें आणि घेणें या गोष्टी एकसमयावच्छेदेकरून करिता येतात असें दिसून येईल.

चतु:संदेशी तारायंत्र.— यानें एकाच तारेनें एकाच वेळी दोन संदेश पाठविणें आणि दोन संदेश घेणें अशा चार क्रिया करितां येतात. असल्या प्रकारचें यंत्र तयार करण्याचें काम प्रथमत: डॉ. जे. बी. स्टार्क यानें हातीं घेतलें. परंतु एडिसन यालाच व्यापारी दृष्ट्या फायदेशीर पडेल असें यंत्र करण्याचें यश संपादिता आलें. आकृतींत दिलेलें यंत्र हें एडिसन याच्याच सुधारलेल्या पद्धतीपैकीं एक यंत्र आहे. या यंत्रामध्यें एकाच वेळीं एकाच दिशेनें दोन संदेश पाठवितां येणे एवढीच गोष्ट दुहेरीसंदेशयंत्रापेक्षां जास्त आहे व तेवढ्या पुरतेंच त्याचें पुढें वर्णन केलें आहे. बाकीचा भाग दुहेरीयंत्र पद्धतीप्रमाणें समजावा. (आकृति नं २ पहा).

आकृतींतील क आणि ग ह्या बातमी पाठविण्याच्या दोन किल्या आहेत यांच्यापैकीं क नें विद्युत्प्रवाहाची फक्त दिशा बदलतां येते आणि ग नें विद्युत्प्रवाहाचा फक्त जोर बदलता येतो. र आणि ब हीं दोन बातम्या घेण्याचीं यंत्रे आहेत; यांपैकीं र हें ध्रुवात्मक पद्धतीचें आहे. याशिवाय दुहेरी संदेशपद्धतींत दाखतिलेले भाग असतात ते भाग वरिल आकृतींत दाखविले नाहींत. अनेक संदेशपद्धति म्हणून आणखीं एक तर्‍हा आहे. या तर्‍हेनें एकाच तारेंने एकाच वेळीं अनेक संदेश पाठवितां आणि घेतां येतात. परंतु ही पद्धत फारशी व्यवहाराच्या उपयोगी नसल्याकारणानें विशेष उपयोगांत नाही; म्हणून तिचें वर्णन दिलें नाहीं.

स्वयंचलित तारायंत्र.- मॉर्स याच्या पद्धतीनें टिंबें आणि रेषा फार दूरच्या स्थळीं शीघ्र गतीनें हातानें पाठविणें अशक्य आहे असें दिसून आल्या कारणानें वरील प्रकारचें यंत्र शोधून काढलें गेले. १८४६ सालीं बेन यानें एक यंत्र तयार केले; परंतु त्या वेळी त्याचा कोणी उपयोग केला नाही. सध्या व्यवहारांत उपयोगी असलेली यंत्रे याच यंत्राच्या सुधारलेल्या आवृत्या होत. या पद्धतींत कागदाच्या एका पट्टीवर दोहों अंगास भोंक पडतात. डावीकडे किंवा उजवीकडे भोंक असल्यास टिंब किंवा रेषा समजण्याचा संकेत असतो. ही पट्टी यांत्रिक रूळावरून फिरते; व याप्रमाणें फिरत असतांना या छिद्रामुळें यांत्रिक दांड्यांच्या योगानें ठराविक वेळानें प्रवाह बंद होतो किंवा ठराविक वेळानें विरुद्ध दिशेनें सुरू होतो, यामुळें स्थितिविशिष्ट विद्युल्लतेच्या योगानें उत्पन्न होणारी वीज अत्यल्प प्रमाणांत उत्पन्न होते व तार पाठविण्याचें काम शीघ्रपणें करितां येतें.

हस्तलेख संदेशवाहकयंत्र — या यंत्रानें दूरच्या प्रदेशी एखाद्यानें येथें लिहिलेलें जसेंच्या तसें पाठवितां येते. या यंत्रानें पाठविण्याच्या लेखणीच्या गतीचें ९०० अंश करणार्‍या दोन सरळ रेषांच्या गतींत 'पृथक्करण ' केलें जातें. या कामासाठीं तरफांच्या समुदायांचा उपयोग करितात. लेखणी तरफांस जोडलेली असते. उपरिनिर्दिष्ट तरफांच्या योगानें पृथक्करण होऊन उत्पन्न झालेल्या सरळ गतींच्या योगें गतीच्या लांबीच्या मानानें कमीजास्त प्रमाणांत दोन विद्युत्प्रवाह पाठवितात. बातमी घेण्याच्या ठिकाणीं ह्या कमी जास्त येणार्‍या विद्युत्प्रवाहाच्या योगें कमीजास्त प्रमाणांत लोहचुंबकत्व उत्पन्न करून तरफांच्या समुदायास गति देतात. या तरफांच्या समुदायास लेखणी जोडलेली असते. संदेश पाठविण्याच्या ठिकाणच्या तरफांच्या समुदायांप्रमाणेंच संदेश घेणार्‍या तरफांच्या हालचाली होतात. त्यामुळें दुसर्‍या ठिकाणीं जसेच्या तसे हस्तलेख उठूं शकतात.

विद्युत्तारा यंत्रानें चित्रलेखन.— सेलेनियम् नांवाच्या पदार्थावर उजेड पडला असतां तो जास्त प्रमाणावर विद्युद्वहन करितो. ह्या त्याच्या गुणधर्माचा फायदा घेऊन तारायंत्रांने चित्रलेखन करितां येतें. जें चित्र पाठवावयाचें असेल तें कांचेच्या एका नळीवर बसविलेलें असतें. या कामासाठीं फोटोग्राफीचें चित्र उत्तमप्रकारें उपयोगीं पडतें. विद्युद्दीपाचा प्रकाश बाह्यगोल लेन्सानें केंद्रीभूत करून त्या फोटोवर पाडतात. कांचेच्या नळीमध्यें बसविलेल्या त्रिकोणी लोलकाचा आरसा नळीमध्यें फोटोतून शिरलेल्या किरणांस नळीबाहेर पाठवितो. हे किरण एका सेलेनियमच्या ब्याटरीवर पडतात व त्यामुळें प्रकाशाच्या कमीजास्त तीव्रतेच्या प्रमाणांत विद्युत्प्रवाह कमीजास्त असा वाहूं लागतो. कांचेचें वरील नळकाडें एका मळसूत्राच्या योगानें शंक्वाकार फिरत असतें. चित्रयंत्रसंदेश घेण्याच्या ठिकाणीं असल्याच प्रकारचें दुसरें कांचेचें नळकांडे वरीलप्रमाणें फिरत असतें. या नळीवर फोटोग्राफीच्या कांचेवर असलेला प्रकाशग्राही रासायनिक थर बसविलेला असतो व त्याच्या समोर एक विद्युद्दीप असतो. त्या दीपाच्यापुढें भोक पाडलेला असा एक लोखंडी पत्रा बसवितात आणि त्या दीपाच्या आणि पत्र्याच्या दरम्यान अल्युमिनमची झाकणी असते. या झांकणीच्या योगें त्या भोंकातून जाणारा प्रकाश कमीजास्त होतो. ज्या ज्या प्रमाणांत विद्युत्प्रवाह येईल त्या त्या प्रमाणांत त्या भोंकांतून कमीजास्त प्रवाह जाऊन नळीवरील प्लेटीवर मूळच्या चित्राचे भाग उठूं लागतात व थोड्याच वेळांत संपूर्ण चित्र उठतें.

पूर्वेतिहास - इ.स. १८३८ पूर्वी विद्युत्संदेश पाठविण्यास पूर्ण (दुहेरी) तारामंडळाची जरूर होती. पण त्यापूर्वी के. ए. स्टेनहील यानें या दुहेरी तारेच्या ऐवजी एकेरी तार वापरली असतां चालेल असें सिद्ध केलें. दुसर्‍या तारेच्या ऐवजीं त्यानें एकाच तारेचीं टोंकें पृथ्वीला जोडून विद्युन्मंडल पूर्ण केलें. अशा तर्‍हेनें दुहेरी तारेच्या ऐवजी एकेरी तारेनें जर काम भागतें, व विजेचा परत मार्गहि पृथ्वीच्या जोडानें सुलभ होऊं शकतो, तर दोन्हीहि मार्गांचे काम पृथ्वीच्याच जोडानें कां होऊं नये व तारांची जरूर पूर्णपणें कां नाहींशी होऊं नये, असा त्याच्यापुढें प्रश्न आला व एकेवेळीं हेंहि घडून येईल असें त्यानें भाकीत केलें.

मार्स:- यानंतर १८४२ सालीं त्याविषयीं मॉर्सनें कांही प्रयोग केलें. त्यानें एका कालव्याच्या दोन्ही बाजूस दोन दोन धातूचे पत्रे कांही अंतरावर पाण्यांत सोडले, त्यांपैकीं एका बाजूची जोडी त्यानें विद्युद्धटाला जोडली, व दुसर्‍या बाजूची जोडी तारायंत्राच्या ग्राहकाला जोडली.  या व्यवस्थेनंतर पहिल्या पत्र्याच्या जोडींतून जसजसा प्रवाह सोडावा तसतशा खुणा दुसर्‍या पत्र्यास जोडलेल्या तारायंत्राच्या ग्राहकावर येऊं लागल्या. या दोन पत्र्यांमधील अंतर मात्र कालव्याच्या रूंदीच्या चौपट असावयास पाहिजे. या त्याच्या प्रयोगावरून व यापुढें विल्किन्स, हॉयटन वगैरेंच्या प्रयोगावरून बिनतारी तारायंत्राची शक्यता सिद्ध होऊं लागली.

ट्रोब्रिज:- सूक्ष्मध्वनिश्रावकाच्या शोधानें याचा प्रयोग बराच सुलभ झाला. गतिजन्यविद्युद्यंत्र (डायनॅमो), अन्योन्यगामी प्रवाह उत्पन्न करणारें यंत्र किंवा प्रवर्तक वेटोळे (इंडक्षन कॉईल) यांच्या तारांचीं टोकें दोन ठिकाणीं जमीनींत पुरलीं व मध्येंच हें सूक्ष्मध्वनिश्रावक यंत्र ठेवले, तर प्रवाहाची जसजशी घडीमोड करावी तसतसा ध्वनि त्या सूक्ष्मध्वनिश्रावकांस ऐकू येतो, हा पृथ्वीच्या अंगी असलेल्या विद्युद्वाहकतेचा प्रयोग झाला. याशिवाय त्यानें पाण्याच्याहि अंगी असाच विद्युद्वाहकतेचा गुण आहे हें सिद्ध केलें. एका जहाजावर विद्युदुत्पादक यंत्र ठेवून त्याचीं दोन टोंके समुद्रांत सोडलीं व कांहीं तरी चिन्हें दर्शविण्याच्या हेतूनें प्रवाह कमी जास्त सोडूं लागलें, तर त्याच समुद्रांत असलेल्या दुसर्‍या एखाद्या जहाजावर अशा तर्‍हेचे समुद्रांत सोडलेले दोन पत्रे असतील व त्या पत्र्यांना जर शब्दवाहक यंत्र जोडलें तर समुद्रांतून जाणारा विद्युत्प्रवाह त्या पत्र्यांवर येऊन शब्दवाहक यंत्रांत नाद उत्पन्न होता.

यानंतर कांही दिवसांनी म्हणजे १८९१ सालीं दोन दूर अंतरावरच्या विद्युद्रोधित विद्युन्मंडलांत चुंबकीय प्रवर्तन सुरू करून त्या दोन ठिकाणांत संदेशव्यवहार सुरू करतां येईल कीं नाहीं याविषयीं त्यानें प्रयोग केले. या प्रयोगांच्या सिद्धतेनंतर पृथ्वी व पाणी यांच्या विद्युद्वाहकतेशिवाय चुंबकीय प्रवर्तन हे बिनतारी तारायंत्राला तिसरेंच साधन सांपडलें.

प्रीस्ट:- १८८५ मध्यें प्रीस्ट व हीन साइड या दोघांनी विद्युद्वाहकता व चुंबकीयप्रवर्तन या दोहोंच्या साहाय्यानें एक यंत्र तयार केलें. या यंत्रानें प्रत्यक्ष शब्द पाव मैलपर्यंत ऐकूं जात होते व १००० यार्डपर्यंत खुणा केल्या जात असत. यानंतर वलग्भी स्मिथ यानें बिनतारी विद्युतघंटा शोधून काढली.

हा र्टझच्या लहरींच्या शोध.— आतांपर्यंतच्या बिनतारी तारायंत्राच्या शोधांचा भर, जमीन किंवा पाणी यांची विद्युद्वाहकता, या दोहोंचें एकीकरण किंवा स्थिरविद्युत्प्रवर्तन यांवर होता. पण हीं सर्व साधनें विजेच्या ठिणगीच्या योगानें उत्पन्न होणार्‍या विद्युल्लहरींच्या शोधानें मागें पडलीं. धातूच्या चुर्‍यानें भरलेल्या नळीला शब्दवाहक यंत्र जोडलें व तिच्या जवळपास कोठें विद्युत्स्फुल्लिंग पडूं लागलें, तर त्यांचा त्या नळीवर परिणाम दिसूं लागतो; जवळपासच नव्हे तर हा परिणाम पांचशे यार्डपर्यंत दिसतो. साधारण प्रवर्तनाचाच हा परिणाम असावा असा त्यावेळी समज होता पण या विद्युत्स्फुल्लिंगाच्या योगानें जवळपासच्या जागेंत विद्युल्लहरी उत्पन्न होतात हें १८८७ साली हर्ट्झनें प्रयोग करून सिद्ध केलें.

मार्कोनीचें यंत्र:- मार्कोनीनें मुख्यत्वेंकरून या विद्युल्लहरींचाच बिनतारी यंत्राच्या शोधाकडे उपयोग करून घेतला, व त्याच्या करतां १८९४ ते १८९६ च्या दरम्यान विद्युल्लहरींचा शोध लावण्याचें यंत्र किती सुधारून उत्तम करतां येईल याकडेच त्यानें लक्ष्य दिलें. त्यानें स्वतः एक शोधक नळी तयार केली.

व व ही प्लॅटिनमची तार लावलेले प प हे चांदिचे दोन ठोकळे आहेत व या दोन ठोकळ्यांमध्यें शें. ९५ निकेल व शें. ५ चांदी या प्रमाणांत धातूंचा कीस ठेवला आहे व नंतर ही नळी निर्वात केली आहे. ही कांचेची असून हिला धरण्याला म हि मूठ केलेली आहे. पूर्वी तयार केलेल्या कोणत्याहि विद्युल्लहरीशोधकापेक्षां हा फार सूक्ष्म शोधक तयार झाला; पण मार्कोनीचा हेतु केवळ सूक्ष्म शोधक शोधून काढणें एवढाच नसून, त्याच्या योगानें विद्युल्लहरींचा बिनतारी तारायंत्रांत कसा उपयोग होईल हा होता. १८९२ सालीं सर विल्यम क्रूकनें या विद्युल्लहरींचा बिनतारी तारायंत्राकडे उपयोग करतां येईल असें सुचविलें होतें, पण त्या दिशेनें कोणीच प्रयत्‍न केले नाहींत. पुढें जी. मार्कोनी (हा इटालियन शास्त्रज्ञ होय) यानें या दिशेनें प्रयत्‍न केले. त्यानें दोन तर्‍हेचीं यंत्रे शोधून काढलीं :— (१) प्रेषक (संदेश पाठविणारे) व ग्राहक (संदेश घेणारे).

(१) प्रेषक:— या यंत्रांत त्यानें विद्युत्प्रवर्तक किंवा विद्युत्स्फुल्लिंग वेटाळें (म्हणजे ज्याच्या योगानें वित्सिकुल्लिंग उत्पन्न होतील तें) ठेविलें. त्या वेटोळ्याचा एक गोळा त्यानें जमीनीस जोडला व दुसरा अंतरिक्षस्थ तारेस जोडला. प्रवर्तक वेटोळ्याच्या आद्य वेटोळ्यांत त्यानें कमीजास्त प्रवाहाच्या योगें (तुटक तुटक प्रवाह सोडून) खुणा करण्याकरितां एक किल्ली ठेविली. ज्या तर्‍हेनें ही किल्ली दाबावी, त्या तर्‍हेनें ही अंतरिक्षस्थ तार विद्युद्भारहित किंवा सहित व्हावी व त्यामुळें हवेंत विद्युदांदोलनें उत्पन्न व्हावीं, व या आंदोलनांच्या निरनिराळ्या प्रकारावर निरनिराळीं चिन्हें बसविलीं होतीं. ही प्रेषक यंत्राबद्दलचीं माहिती झाली. आतां ग्राहक यंत्राकडे वळूं.

(२) ग्राहक:— या ग्राहक यंत्रांत (आकृति नं. ४ पहा.) त्यानें आपल्या विद्युल्लहरीशोधक नळीचा प्रयोग केला. या नळीचें एक टोंक त्यानें पृथ्वीला जोडलें व दुसरें अंतरिक्षस्थ तारेस जोडलें. या नळीच्या ओळींतच त्यानें एक व्होल्टाचा विद्युद्धट व सूक्ष्मभेद दाखविणारा रिले (टप्पा) ठेविला. स्थानिक वित्द्युदघटाच्या मदतीनें हा रिले बातमी लिहिणार्‍या यंत्राला गति देतो.

वरील यंत्राची क्रिया.— प्रेषक यंत्रांत असलेली किल्ली जशी दाबावी किंवा सोडावी त्याप्रमाणें अंतरिक्षस्थ पडदा विद्युद्भारसहित किंवा रहित होतो आणि त्यामुळें उच्च कंपनसंख्येची विद्युदांदोलनें उत्पन्न होतात. अंतरिक्षस्थ पडद्याला लावलेला विद्युत्स्फुल्लिंग गोळा व जमीनीशीं जोडलेला दुसरा विद्युत्स्फुल्लिंग गोळा हे मिळून विद्युत्संचायक (कंडेन्सर) बनतो. विद्युत्स्फुल्लिंग पडण्यापूर्वी स्थिरविद्युच्छक्तिरेषा एका गोळ्यापासून दुसर्‍या गोळ्यापर्यत वक्र होतात व स्फुलिंग पडला म्हणजे त्या रेषा दूरदूर जांऊ लागतात, या वेळीं त्यांची टोकें पृथ्वीला लागलेलीं असतात. त्या रेषा अशा तर्‍हेनें जात असतांना त्याच्या बरोबर चुंबकीय शक्तिरेषा उत्पन्न होऊन पाण्यांत लाट, धोंडा टाकलेल्या ठिकाणापासून दूर जात असतांना मोठीमोठी होत जाते तशा मोठ्या मोठ्या होत जातात. यालाच विद्युल्लहरी असें म्हणतात. ग्राहकयंत्रावर या चुंबकीय शक्ति उत्पन्न करितात. आणि त्याचा परिणाम विद्युत्शोधकनळीवर व तिला जोडलेल्या निरनिराळ्या सूक्ष्म- भेदपरिणामी यंत्रावर होतो.

वर वर्णन केलेलें यंत्र बसवून व त्यापासून विद्युल्लहरी उत्पन्न करून त्यांच्या साहाय्यानें चिन्हें पाठविणें हा या तारायंत्राचा मुख्य भाग होय. आद्य वेटोळ्यांतील किल्ली फार वेळ किंवा थोडा वेळ दाबून, मोठाली किंवा लहान लहान विद्युल्लहरींचीं आंदोलनें उत्पन्न करून त्यांवर मॉर्सच्या तारायंत्रांतील खुणाप्रमाणें रेषा किंवा टिंबयुक्त खुणा बसविण्याची योजना मार्कोनीनें केली होती. ग्राहक ठिकाणीं विद्युल्लहरीशोधक नळी प्रत्येक आघातानंतर हलवणें जरूर असल्यामुळें ती हलविण्यास संदेशलेखनयंत्राप्रमाणेंच रिलेच्या साहाय्यानें विद्युच्चुंबकीय व्यवस्था केली होती. अशा तर्‍हेनें १८९६ मध्यें पहिल्यानें काम करण्यास समर्थ असें यंत्र तयार केलें. त्या यंत्राच्या साधेपणामुळें त्याचा प्रसार जहाजाच्या कामीं लवकर झाला. १८९९ च्या मार्चमध्यें इंग्लंड व फ्रान्स यांच्यांत सुमारें तीस मैल अंतरापर्यंत हें यंत्र मिनिटास १५ पासून २० शब्दांपर्यत काम करूं लागलें. १९०१ च्या जानेवरींत हें अंतर २०० मैल पंर्यत वाढलें. याच वेळीं त्यानें ग्राहक यंत्रांतहि कांहि सुधारणा केली. ग्राहक, अंतरिक्षस्थ तार व पृथ्वी यांमध्यें जी पूर्वी विद्युल्लहरीशोधक नळी घातली होती, ती काढून त्यानें त्या ठिकाणी एका विशिष्ट तर्‍हेनें आंदोलनाचें रुपांतर करणारें आद्य वेटोळें घातलें, व ही नळी त्याच्या गौण वेटोळ्याच्या टोंकास जोडली.

पुढील सुधारणा.— विद्युल्लहरीतारायंत्र नार्कोनीनें मूर्त स्वरूपात आणल्यावर पुष्कळ लोक काम करूं लागलें. यंत्राचे मुख्य दोन भाग म्हणजे प्रेषक (बातमी पाठविणारे) व ग्राहक (बातमी घेणारे) असे असल्यामुळें ज्या काय सुधारणा होणार त्या यांच्यांतच होणार, तेव्हां प्रथम प्रेषकयंत्राबद्दल विचार करूं. प्रेषक यंत्रांतील मुख्य भाग म्हणजे अंतरिक्षस्थ तार होय. ही तार निरनिराळ्या आकराची असूं शकते. ही कधीं एकटीच सरळ असते तर कधीं तिच्या शेवटीं एक पत्रा असतो, तर कधीं वाकवून तिचा कांही भाग पृथ्वीशीं समांतर केलेला असतो. कधीं कधीं छत्रीच्या आकारांत किंवा शंकूच्या आकारांत एकापेक्षा अधिक तारा असूं शकतात. ही तार किंवा तारा हा एक पडदा व पृथ्वी हा दुसरा पडदा. या दोन पडद्यांच्या योगानें विद्युत्संचायक तयार होतो. हा संचायक विद्युद्भारित करून एकाएकी विद्युद्भार रहित केला जातो व त्यामुळें जोरदार विद्युदांदोलनें सुरू होऊन ते अंतरिक्षस्थ तार व पृथ्वी यांत सारखे फिरत रहातात. अंतरिक्षस्थ तारेभोंवती असणार्‍या विद्युत् व चुंबकीय शक्तींत यामुळें जोराचे फरक होऊं लागतात, व विद्युल्लहरी रूपांत त्यापासून शक्ती दूर दूर जाऊं लागतें. एका घटकेंत अंतरिक्षस्थ तारेवर स्थिरविद्युद्भार असून त्यापासून शक्तिरेषा पृथ्वीपर्यत पसरतात. दुसर्‍या घटकेला त्यावर विद्युतत्प्रवाह दिसूं लागून त्याभोंवती चुंबकीय शक्तिरेषा असतें. हे चल आणि स्थिर परिणाम एकामागून एक त्यावर दिसून येतात. आणि याचा परिणाम असा होता कीं, अंतरिक्षस्थ तारेपासून विद्युतशक्तीच्या अर्धवक्ररेषा निघून चोहोंकडे बाहेर पसरतात व त्याबरोबरच चुंबकीय शक्तीच्या वर्तुलाकृती रेषा वृध्दिंगत होतात. या सर्व क्रियेची तुलना विण्याच्या तारेच्या क्रियेशीं करतां येईल. विण्याची तार एका बाजूस ओढली म्हणजे तिच्यावर जो तणाव बसतो तो तणाव म्हणजे अंतरिक्षस्थ तारेचा विद्युद्भार, तार सोंडणें म्हणजे विद्युभ्दाररहित करणें, व विण्याच्या तारेंने उत्पन्न केलेलीं आवाजाचीं आंदोलनें म्हणजेच बिनतारीं तारायंत्रातील अंतरिक्षस्थ तारेनें उत्पन्न केलेलीं विद्युदांदोलनें होत.  अंतरिक्षस्थ तारेवर विद्युद्भार उत्पन्न करून त्याच्या साहाय्यानें विद्युल्लहरी उत्पन्न करणें हा मुख्य भाग झाला. आतां हा विद्युद्भार कसा उत्पन्न करतां येईल हे पाहू. हा विद्युद्भार उत्पन्न करण्याच्या दोन तीन निरनिराळ्या रीती आहेत.

(१) मागील आकृतींत दाखविल्याप्रमाणें प्रवर्तन वेटोळ्याला जोडलेल्या दोन गीळ्यांवर विद्युत्संभाव्यशक्तीचा फरक वाढूं लागला म्हणजें अंतरिक्षस्थ तारेवर विद्युद्भार वाढूं लागतो व संभाव्यशक्तीचा फरक इतका होतो कीं त्या दोन गोळ्यांत विद्यत्स्फुल्लिंग पडतो. ही मार्कोनीची मूळ पद्धत होय.

(२) दुसर्‍या पद्धतींत अंतरिक्षस्थ तार पूर्णमंडलाला जाऊन प्रत्यक्ष जोडलेली असतें. पूर्णमंडल हें लेडनघट, प्रवर्तक वेटोळें, आद्य वेटोळें व स्फुलिंगावकाश यांचे झालेलें असतें. आद्य वेटोळ्याचें एक टोंक जमीनीला जोडून दुसर्‍या टोंकांवर अंतरिक्षस्थ तार उभी केलेली असतें. पूर्णमंडलांत ज्यावेळी आंदोलने सुरू करावीं त्यावेळीं तत्सदृश आंदोलनें अंतरिक्षस्थ तारेंतहि उत्पन्न होतात; व नंतर त्यापासून विद्युल्लहरीचें विसर्जन होऊं लागतें (आकृति नं ५ पहा.)

उपयोगांत असलेल्या बिनतारी तारायंत्रांत, अंतरिक्षस्थ तार नसून आकृति ६ मध्यें (पहा) दाखविल्याप्रमाणें चरख्यासारख्या तारा लावलेल्या असतात. या तारांची खालचीं टोकें आंदोलनांत रूपांतर करणार्‍या वेटोळ्याच्या गौण वेटोळ्यांतून पृथ्वीशीं जोडलेली असतात. प्रवर्तक वेटोळ्याच्या आद्य वेटोळ्यांत एक किल्ली घालून, आंदोलनें कमीजास्त करणें किंवा पूर्ण थांबविणें या गोष्टी, करतां येतात व आंदोलने ताब्यांत ठेवतां आली म्हणजें नंतर अंतरिक्षस्थ तारेंतून विसर्जन पावणार्‍या विद्युल्लहरीहि आपल्या ताब्यांत ठेवतां येतात.

दूर दूर अंतरावर बिनतारी यंत्रानें संदेश पोहोंचविणे असेल तर विद्युल्लहरी जितक्या जोरदार असतील तितक्या चांगल्या. जोरदार विद्युल्लहरी उत्पन्न करण्याकरतां एक यंत्र रचना तयार करण्यांत आली आहे.

प्रेक्षकयंत्राप्रमाणें ग्राहकयंत्रातहि सुधारणा कराव्या लागल्या. मार्कोनीच्या ग्राहकयंत्राची रचना व क्रिया हीं मागें वर्णन केलींच आहेत पण त्यांत एक न्यून आहे तें हें कीं विद्युल्लहरीशोधक नळी एका विद्युल्लहरीच्या धक्क्यानें विद्युत्प्रवाही झाली म्हणजे मग ती प्रवाहीच राहून नंतर तिच्या योगानें विद्युल्लहरीचा शोध लागणें कठिण होतें व पुन्हां ती पूर्व स्थितीत आणण्याकरतां तिला बारीक बारीक धक्के द्यावे लागतात. ग्राहकयंत्रांत हाच भाग मुख्य महत्त्वाचा असल्यामुळें व मार्कोनीच्या यंत्रांत वरिल न्यून असल्यामुळें या भागाची सुधारणा करण्याकडे पुष्कळ शास्त्रज्ञाचें लक्ष्य वेधलें व पुष्कळ निरनिराळे विद्युल्लहरीशोधक तयार झाले.

समकालिक विद्युत्तरंग तारायंत्र.— वर वर्णन केलेल्या अंतरिक्षस्थ तारेवर वातारवरणांतून आलेल्या कोणत्याहि विद्युल्लहरी येऊन त्यांचा परिणाम खालीं असलेल्या विद्युल्लहरीशोधकावर होईल. या यंत्रास समकालिक विद्युत्तरंगं

यंत्र म्हणतां येणार नाहीं. पण शक्तिग्रहणयंत्र व प्रवर्तनयंत्र घालून एक पूर्ण मंडल तयार केलें तर लघुकालिक विद्युच्चालक शक्तीनें त्यांत विद्युत्तरंग उत्पन्न होतील, आतां फक्त एवढ्याच गोष्टीची जरूर आहे कीं याची पैरवी (कंपनसंख्या- दर सेकंदाला होणार्‍या फेर्‍यांचा दर फ्रीक्वन्सी) संचायक मंडलाच्या पैरवीशी जमली पाहिजे. संचायक मंडलाला त्याची त्याजवरच अवलंबून असणारी स्वाभाविक पैरवी असते क हि संचायकाची ग्रहणशक्ति व ल ही प्रवर्तनशक्ति असेल तर त्याची पैरवी

   या पदसंघातानें (फॉर्म्युला) काढतां येतें. बिनतारी तारायंत्रांत प्रेषक व ग्राहक हे समाकालिक विद्युत्तरंगाचे असावेत. तसे नसतील तर संचायकांत फेरफार करून ते समकालिक विद्युत्तारंगाचे करून घेणें शक्य आहे हें वरील पदसंघातावरून दिसून येईल. ते जर समकालिक विद्युत्तरंगाचे नसतील तर वाटेल त्या विद्युल्लहरी ते ग्रहण करतील व स्पष्ट संदेशाऐवजीं निरनिराळ्या संदेशांचें मिश्रण किंवा कांहीच ऐकूं येणार नाहीं. त्याचप्रमाणें दोन समकालिक आंदोलन होणार्‍या दोन स्वरशूलांपैकीं एकाचीं आंदोलने होत असतां दुसरा जवळ धरला तर त्याच्यांतहि आंदोलनें सुरू होतात, पण तो जर का भिन्नकालिक आंदोलनांचा असेल तर त्याची आंदोलनें होत नाहींत, व त्याचा काल जर फारसा भिन्न नसेल तर त्यांत मोठ्या अडचणीनें आंदोलनें सुरू होतात. अशा तर्‍हेनें नियतकालिक आंदोलनाचें यंत्र असणें जास्त सोयीचें पडतें. व तो तरंगकाल बाकी यंत्रांनां माहीत असला म्हणजे त्यांना आपलें यंत्र त्या नियमित तरंगकालाचें करून घेऊन नेमक्या त्याच यंत्राशी बोलतां येईल; व हीं दोन यंत्रे एकमेकांशी बोलत असतांना बाकी यंत्रानां त्रासहि होणार नाहीं. व त्यांची बातमीहि मधल्यामध्यें त्यांनां घेतां येणार नाहीं.

त्याचप्रमाणें उभ्या अंतरिक्षस्थ तारेंतूस निघणारे विद्युत्तरंग त्या तारेपासून वाटेल त्या दिशेकडे पसरतात, व त्या तारेला केंद्र धरलें तर त्याच्या परिघावर असणार्‍या सर्व विद्युत्तरंगयंत्रांनां बातमी मिळूं शकते. हें टाळण्याकरतां अंतरिक्षस्थ तारेंतून विद्युत्तरंग विवक्षित एका दिशेनें पाठवितां येणें जास्त जरूर आहे.  ते एका दिशेनें पाठवितां येण्याकरता पहिल्यानें परवलीयदर्पणांचा उपयोग केला गेला पण एक हजार फूट लांबी असलेल्या विद्युल्लहरींचे दर्पणाच्या साहाय्यानें परावर्तन करणें म्हणजे एक लक्षांश इंच व्यासाच्या आरशानें दृक्-प्रयोग करण्यासारखेंच होईल,

१९०६ त मार्कोनीनें हा प्रश्न सोडविला, तो असा कीं प्रेषक यंत्राची अंतरिक्षस्थ तार निव्वळ उभी न करतां थोडीशी पृथ्वीशीं समांतर ठेवावी. अशा अंतरिक्षस्थ तारेंतून निघणारे विद्युत्तरंग तारेच्या टोंकाच्या उलट दिशेला जातात.

अटलांटिकपार बिनतारीतारायंत्र:- १९०१ च्या सुमारास बिनतारी तारायंत्रानें सरासरी २०० मैलांच्या अंतरावर बिनतारी तारायंत्रानें मार्कोनीनें संदेश पाठविला; व यानंतर अटलांटिकवर विजय मिळवावा अशी त्याला इच्छा झाली व त्याप्रमाणें त्यानें दक्षिण कार्नवालमध्यें 'पोलधू ' ला एक स्टेशन तयार केलें. ता. १२ डिसेंबर १९०१ या दिवशीं ठराविक वेळी या ठिकाणापासून पाठविलेली एस् या अक्षराची चिन्हें त्याला ऐंकू आलीं. १९०२ च्या फेब्रुवारींत 'फिलाडेल्फिया 'नांवाच्या बोटींत असतांना मार्कोनीला पोलधू पासून १५५० मैलपर्यंत वाचण्याजोगे संदेश व सरासरी २००० मैल. पर्यत मॉर्सचीं चिन्हें घेतां आली. हें वर्षे संपण्याच्या आतच अटलांटिक पार बिनतारी तारायंत्रपद्धति शक्य आहे हें ठरलें.  अटलांटिक पार बिनतारी तारायंत्रपद्धति शक्य नसल्याच्या बर्‍याच कारणांपैकीं एक महत्वाचें कारण म्हणजे पृथ्वीच्या वर्तुलाकारामुळें अटलांटिकची उंची पोलधू व प्रेषक ठिकाण (इंग्लंडमधील) यांच्या उंचीपेक्षां १२५ मैल जास्त आहे. आतां विद्युत्तरंग, तेजोतरंगाप्रमाणें सरळ रेषेंत वहातो व त्याप्रमाणेंच कधीं वक्र होत नाहीं, अशी कल्पना केली तर इंग्लंडमधील स्टेशनापासून निघालेले विद्युत्तरंग अटलांटिकच्या टेंकाडावरून सरळ जाऊन पोलधूवर जमीनीपासून १००० मैल उंचीवर येतील, व हे तरंग, नंतर कोणत्याच अंतरिक्षस्थ तारेनें काय, पण प्रत्यक्ष पतंगाची जरी योजना केली तरी पकडणें अशक्य होईल, अर्थात् बिनतारी तारायंत्रें निरूपयोगी होतील. पण सुदैवानेंच म्हणा हे तरंग आपले आपणच इतक्या उंच न जातां जमीनीकडे धांव घेतात व म्हणून बर्‍याच उंचीच्या अंतरिक्षस्थ तारेची जरूर लागत नाहीं व अटलांटिक पार बिनतारी तारायंत्रानें संदेश पाठविले जातात. तेजोतरंगाप्रमाणें विद्युत्तरंग सरळच जातात असें नसून कधीं कधीं ते त्यांच्या सरळमार्गापासून जवळ जवळ ९७० अंशांपर्यत वळले आहेत हेंहि दिसून आलें आहे.

याप्रमाणें बिनतारी तारायंत्र अथवा विद्युत्तरंगसंदेशवाहक यांच्या योगानें पृथ्वीच्या पाठीवर कोणत्याहि ठिकाणच्या संदेशवहनाच्या कामीं क्रांति घडवून आणली आहे. त्याच्या योगानें हजारों मैल दूर असलेल्या निरनिराळ्या ठिकाणीं ताबडतोब बातमी पोचवितां येते, त्याचप्रमाणें युद्धप्रसंगीं किंवा शांततेच्या वेळीं एका जहाजावरून दुसर्‍या जहाजावर किंवा किनार्‍यापासून जहाजावर बातमी पोहोंचविण्याचें हें एक महत्त्वाचें साधन होऊन बसलें आहे. बिनतारी तारायंत्र जर यशस्वी झालें तर स-तार तारायंत्रे मागें पडतील या आंरभीच्या समजुतीला मात्र आधार न मिळून बिनतारी तारायंत्राचें क्षेत्र व काम तिशिष्ट आहे हें सिद्ध झालें आहें.

हिंदुस्थान.— हिंदुस्थानांतील मुलकी कारभाराच्या बाबीसंबधी, तारायंत्रखात्याची एक स्वतंत्र बिनतारी संदेशवाहक शाखा स्थापन करण्यांत यावी असें १९१९-२० सालीं ठरलें; आणि याचकरितां इंग्लंडाहून पांच तज्ज्ञ अधिकारी हिंदुस्थानांत आणण्यांत आले. हवामानांत मोठा फरक होऊन त्यामुळें ज्या ज्या वेळीं अडथळे उत्पन्न झाले, असे सर्व प्रसंग खेरीजकरून बिनतारीसंदेशगृहांची कामें उत्कृष्ट रीतींने सर्व वर्षभर चाललेलीं होती. ज्या वेळीं खुष्कीनें संदेश वाहनाच्या कामीं अडथळा होई त्या वेळी बिनतारी संदेशवाहक यंत्राचा चांगलाच उपयोग होत असे. मुंबई ते एडन, मुंबई ते सीलोन, कराची ते इराणचें आखात यांमध्यें बिन-तारीसंदेशवाहनकार्य सुरू झालें. ब्रह्मदेश व मलाया द्वीपकल्प यांमध्यें दळणवळण सुरू करण्याची योजना झाली होती परंतु ती लांबणीवर टाकावी लागली; नवीन यंत्रसामुग्री आणण्यांत आली व त्यामुळें संदेशग्राहकगृहांत हवेंतील फरकामुळे जी अडचण उत्पन्न होत होती ती दूर करण्याचे प्रयत्‍न करण्यातं आले.  कराची येथें एक मुलकी व लष्करी शाळा स्थापण्यांत आली व त्यामुळें लष्करी व मुलकी गरजा भागविण्यांचे एक साधन झालें.

सरकारी लष्करी अधिकार्‍यांनी बिनतारी संदेशगृहांचा उपयोग कितपत करावा याबद्दल कांहीं नियम करण्यांत आले आहेत. एखादा ऑफिसर आपल्या अधिकाराच्या नात्यानें जेव्हां त्या यंत्राचा उपयोग करील तेव्हां त्यास परवाना घेण्याची जरुरी नाहीं, मात्र त्यानें डायरेक्टर जनरल याची संमती घेतली पाहिजे. पण खासगी नात्यानें जेव्हा एखादा अधिकारी या यंत्राचा उपयोग करील तेव्हां त्यानें परवाना घेतला पाहिजे.

''साम्राज्य बिनतारी मंडळ'' स्थापन करण्यांत यावें म्हणून एंम्पायार प्रेस यूनिअननें इंग्लंडात खटपट केली व याबद्दल वर्षभर चर्चा चालू होती. परंतु ब्रिटिश पोस्ट ऑफिसनें केलेल्या अडथळ्यामळें या बाबतींत कांहिच होऊं शकले नाही. हिंदुस्थानसरकारची उपर्युक्त योजनेबद्दल पूर्ण सहानुभूति आहे.  परंतु त्याच्या जवळ भांडवल व तज्ज्ञ नाहींत. हिंदुस्थानांत बिनतारी संदेशवाहक यंत्रे उभारण्यांत यावीं म्हणून हिंदुस्थानसरकारनें मार्कोनी-कंपनीशी करारहि केला आहे. परंतु ब्रिटिश पोस्ट ऑफीसचा दुराग्रह गेल्याखेरीज हि मागणी फलद्रुप होईलसें दिसत नाहीं.

बिनतारी संदेशवाहक गृहें १९२३-२४ अखेर एकंदर पंचवीस होतीं. आलाहाबाद, मुबंई, कलकत्ता, दिल्ली, डायमंड, आयलंड, जूटोघ, कराची, लाहोर, मद्रास (तीन स्टेशनें), मेमियो, महू, नागपूर, पेशावर, पुणें, पोर्टब्लेअर, क्वेटा, रंगून (तीन स्टेशन), सँडहेड्स, शिकंदराबाद व व्हिक्टोरीया पॉइंट, अशीं गृहें हिंदुस्थानांत व बाहेर आहेत. रंगून व मद्रास या ठिकाणीं नवीन गृहें बांधण्यांत आलीं व गतीचा वेग वाढावा म्हणूनहि योजना करण्यांत आली. १९२५ सालच्या सुरवातीस, समुद्रावरील जहाजाशी व्यवहार ठेवणारीं सहा समुद्रकिनार्‍यावरील बिनतारी संदेशगृहें होती व आन्तर्देशीय बारा गृहे होंती. पोष्ट व टेलिग्राफ खात्याचीहि तीन गृहें बंगालच्या उपसागरांत होती. १९२१-२२ सालीं, अन्तर्देशीय संदेशगृहांच्या बाबतींत आज तागाईतपणा आणण्याचा विचार करण्यांत आला. आधुनिक दृष्ट्या त्यांत सुधारणा करावी असें ठरलें. आन्तर्देशीय पद्धतीचीं लहान लहान गृहें जोडण्यांत यावीत व अशीं गृहें स्थापन करण्यास स्थानिक सरकारास मुभा असावी असें ठरले. खासगी व्यक्तींनांहि धंद्याकरितां अशी गृहें परवाना घेऊन बांधण्यास मोकळीक असावी असें धोरण स्वीकारण्यांत आलें. १९२२ अखेर, अति खर्चामुळें आन्तर्देशीय योजना अमलांत आणण्याचें काम पुढें ढकलण्यांत आलें. पोष्ट व टेलिग्राफ खात्यानें सध्यां समुद्रकिनार्‍यावरील स्टेशनेंच फक्त उपयोगार्थ मोकळीं ठेविलीं आहेत. आन्तर्देशीय स्टेशनांचा तूर्त उपयोग केला जात नाहीं. रंगून व मद्रासमधील बिनतारी संदेशवाहकाची मात्र गतीच्या बाबतींत प्रगति झाली आहे. जगातींल इतर रेडिओ स्टेशनांशीं जर हिंदुस्थानास आपला संबंध जोडावयाचा तर येथें उत्कृष्ट प्रकारचें संदेशवाहक गृह निर्माण् करण्यांत आलें पाहिजे. मोठ्या अंतराच्या बाबतींतहि प्रयोग सुरू आहेत.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .