प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या  
 
तुकाराम— हा महाराष्ट्रीय संत व कवि देहू येथें १६०८ सालीं जन्मला.  हा जातीनें शूद्र होता; तरी पण याचा पिढीजात धंदा उदीमपणाचा होता.  तुकारामाच्या पूर्वजाविषयींची माहिती तुकारामाचा शिष्य महिपतीबुवा यानें दिली आहे.  त्यावरून भगवतद्भक्ति ही तुकारामाच्या घराण्यांत फार दिवसांपासून होती असें दिसतें.  तुकारामाच्या बापाचें नांव वाल्होबा व आईचें नांव कनकाई.  तुकारामाला सावजी व कान्हा असे दोघे भाऊ होते.  तुकारामाच्या घरची स्थिति चांगल्या प्रकारची होती.  त्याचें बालपण सुखांत व ऐषारामांत गेलें.  तत्कालीन चालीरीतीस अनुसरून त्याचें लहानपणींच लग्न झालें पण पहिली बायको दमेकरीण असल्यानें त्यानें दुसरें लग्न केलें. याच्या दुसर्‍या बायकोचें नांव जिजाई. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तुकारामाच्या गळ्यांत संसार पडला व कांहीं कालपर्यंत तुकारामानें संसाराचा गाडा चांगल्या तर्‍हेनें हांकला. तुकारामाचा स्वभाव भोळा असल्यानें, त्याला व्यापारांत व इतर व्यवहारांत तूट येऊं लागली. याच सुमारास भयंकर दुष्काळ पडल्यामुळें तर तुकारामाजवळचा सर्व पैसा खर्च झाला; व तो दरिद्री बनला. त्यामुळें त्याच्या मनावर निराशेची छाया पसरली; संसाराचा वीट येऊं लागला; वैताग उत्पन्न झाल्यामुळें त्याचें मन ईश्वरभक्तीकडे लागलें. पुराण, कीर्तन इत्यादिकांची आवड उत्पन्न झाली. त्यानें साधुसंतांचे ग्रंथ वाचण्यास सुरवात केली. अशा रीतीनें सदा सर्वकाळ भगवद्‍भक्तीचा छंद लागल्यावर त्यानें कांहीं काळ एकांतवास पत्करून अनेक ग्रंथ वाचले. त्यामुळें तो थोड्याच दिवसांत बहुश्रुत झाला. नंतर त्यानें गांवांत भजन व कीर्तन करण्यास सुरवात केली. त्याची बायको कजाग असल्यानें ती त्याचा फार छळ करीत असे पण त्यानें तें सर्व निमुटपणें सोसून आपल्या भजनकीर्तनाच्या धंद्यांत व्यत्यय येऊं दिला नाहीं. अशा रीतीनें भजनकीर्तनांत आपला सर्व काळ घालवीत असतां त्याला एका रात्रीं परमेश्वरी दृष्टांत होऊन, रामकृष्ण हरी या पडक्षरी मंत्राची प्राप्‍ति झाली. त्यामुळें कथाकीर्तनांतून या मंत्राचा उपयोग करण्यास त्यानें सुरवात केली. असें सांगतात कीं नामदेवानें व पांडुरंगानें स्वप्नांत येऊन तुकारामास सांगितलें कीं 'नामदेवाची अपुरी राहिलेली शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा तूं पुरी कर' व या आज्ञेप्रमाणें तुकारामानें अभंग रचण्यास सुरवात केली. कथाकीर्तनामधून तो जागच्याजागीं अभंग रचून ह्मणत असे, त्यामुळें कीर्तनाला रंग चढत असे. त्याच्या अभंगांत व कीर्तनांत येणारी इतर वर्णांवरील टीका सहन न होऊन रामेश्वरभट्ट नांवाच्या एका ब्राह्मण पंडितानें तुकाराम हा वर्णाश्रम धर्माविरुद्ध कथाकीर्तन करतो या सबबीवर फिर्याद केली आणि त्या फिर्यादीचा तुकारामाविरुद्ध निकाल होऊन त्याला गांव सोडून जाण्याची शिक्षा देण्यांत आली. त्यामुळें अतिशय वैतागून जाऊन तुकारामानें आपल्या सर्व अभंगांच्या पोथ्या इंद्रायणी नदींत बुडविल्या व एका दगडाच्या शिळेवर तो कांहीं न खातां न पितां स्वस्थ पडून राहिला. अशा रीतीनें १३ दिवस झाल्यानंतर त्याच्या अभंगांच्या पोथ्या फुगून व आल्या व याच सुमारास त्याला देवाचें दर्शन झालें ! तेव्हां तुकारामाच्या योग्यतेची सर्वांची खात्री झाली व रामेश्वरभट्ट हाहि तुकारामास शरण आला व त्याचा शिष्य बनला. त्यामुळें त्यानें कथाकीर्तनाचा व्यवसाय पुढें अखंड चालविला. त्याची कीर्ति चहूं मुलुखीं पसरूं लागली. ही कीर्ति ऐकून श्री शिवाजीमहाराजहि त्याच्या दर्शनास आले. तुकारामाचें कीर्तन ऐकून महाराजांनां संसाराचा वीट आला. पण पुढें तुकारामानें त्यांना उपदेश करून त्यांचें लक्ष्य प्रपंचाकडे वळविलें. अशा रीतीनें भक्तिमार्गाचा उपदेश करण्यांत आपले दिवस घालवून तुकाराम हा शके १५७३ मध्यें सदेह निजधामास गेला. सदेह निजधामास गेला याचा अर्थ कांहीं भक्त, तो जिवंत वैकुंठास गेला असा करतात. पण महाराष्ट्रसारस्वतकार रा. भावे म्हणतात त्याप्रमाणें तुकोबानें ज्ञानेश्वराप्रमाणेच इंद्रायणीजवळ एक समाधिस्थान बांधविलें होतें त्यांत जिवंत समाधि घेतली, हाच खरा अर्थ होय. तुकारामाच्या निधनकालासंबंधीं बराच वाद आहे. (विशेष माहिती रा. पांगरकरांच्या तुकारामचरित्रांत व रा. भावे यांच्या महाराष्ट्र सारस्वतांत पहा).

तुकारामाचे अभंग.— तुकारामाच्या अभंगांची संख्या सहा ते आठ हजारांपर्यंत आहे. अभंगांची बहुतेक रचना मराठींतच आहे. कांहीं पद्यें व्रजभाषेंत आढळतात. अभंगाशिवाय कांहीं थोडे श्लोक पदें, व ओव्याहि यानें रचल्या आहेत. बालक्रीडा नामक एक शंभर ओव्यांचा ग्रंथ तुकारामानें कवित्त्वाच्या सुरवातीस लिहिला. तुकारामाची कवित्त्वशक्ति फार दांडगी होती. त्याची कविता रसाळ व अत्यंत स्फूर्तिदायक आहे. त्याच्या काव्यांत भक्तीची परमोच्च स्थिति दृष्टीस पडते. त्याचे दृष्टांत व उपमा फार मार्मिक व हृदयाला भिडणार्‍या आहेत. थोड्या शब्दांत भरपूर अर्थ व्यक्त करण्याची हातोटी त्याला साधलेली आहे. त्याच्या अभंगांत उपदेश जागोजाग भरलेला आहे. 'उपदेशपरम्हणींची खाण' असें त्याच्या अभंगांसंबंधीचें वर्णन केल्यास तें यथार्थ ठरेल. त्याच्या अभंगांची भाषा साधी, पण जोरदार व परिणामकारक आहे. त्यामुळें त्याचे अभंग अद्यापि महाराष्ट्रीय लोकांच्या मुखामध्यें खेळत आहेत.

तुकारामाची शिकवण.— तुकारामाची शिकवण काय होती हें पहाणें महत्त्वाचें आहे. महाराष्ट्रामध्यें अव्वल इंग्रजीमध्यें धर्मसुधारकांनीं प्रार्थनासमाज स्थापन केला. त्यांनीं व ख्रिस्ती लोकांनींहि कांहीं फरक करून तुकारामाच्या अभंगांचा बराच अंगीकार केलेला आहे. प्रार्थनासमाजिस्ट हे तुकारामाला फार मान देतात. प्रार्थनासमाजिस्टांतील एक प्रमुख व विद्वान गृहस्थ डॉ. भांडारकर यांनीं प्रार्थनासमाजिस्टाला तुकाराम इतका जवळचा कां वाटतो यासंबंधीं कारणें सांगितलीं आहेत तीं— (१) तुकारामानें सांगितलेली पारमार्थिक कल्याणाची वाट ही त्याला प्रत्यक्ष परमात्म्यापासूनच प्राप्‍त झाली होती. (२) तुकोबा हे आपल्या पूर्वीच्या परंपरागत आचाराचा योग्य दिसेल तेव्हां सणसणीत पणानें निशेध करीत व या दृष्टीनें ते धर्मसुधारक होते. (३) देवाविषयीं निष्काम व अनन्य प्रेम व भक्तिपूर्वक त्याचें भजन ही धर्मसाधनें तुकारामानें सांगितलीं आहेत. (४) मनुष्यानें स्वार्थ सोडून परमार्थाची कास धरावी व परार्थ हाच स्वार्थ मानावा अशी तुकोबाची उदात्त शिकवण आहे. (५) सर्वांत मुख्य म्हणजे तुकारामबुवा 'आपली उत्तरोत्तर सुधारणा व्हावी म्हणून आपल्या दोषांचें सूक्ष्मतेनें स्वतः परीक्षण करीत व त्या दोषांतून मुक्त होण्याकरतां देवाची प्रार्थना करीत ! वास्तविक तुकारामबुवांच्या वरील शिकवणींत व इतर भागवतधर्मीय साधुसंतांच्या शिकवणींत विशेष अंतर नाहीं. ''तुकोबाला जातिनिर्बंध पसंत नसे. कोणत्याहि जातीचा माणूस असो, तो वैष्णव झाला कीं, तुकोबा त्याला पूज्य मानीत असे'' असें डॉक्टरसाहेब म्हणतात; पण हें मत पूर्णांशांनें सत्य नाहीं. वैष्णव लोक-म्हणजे भागवतधर्मीय लोक जातिभेद मानतात व ते पाळण्यासाठीं यत्‍नहि करतात. चातुर्वर्ण्य त्यांनां पूर्णपणें मान्य आहे. ते वर्णसंकराच्या विरुद्ध आहेत. भिन्नजातीमधील बेटीव्यवहाराला ते अनुकूल नाहींत. पण या सर्व गोष्टी खर्‍या असल्या तरी या भागवत धर्मी आधुनिक संतांनीं जातिभेद शिथिल केला व परमेश्वरप्राप्‍तीचा मार्ग सर्वांनां सुलभ व मोकळा करून दिला ही गोष्ट तितकीच सत्य व अत्यंत महत्त्वाची आहे. परंपरागत कडक आचार विचारांविरुद्ध यांनीं सौम्यपणानें क्रांति घडवून आणली. तुकाराम हा या क्रांतिकारकांपैकीं एक होता असें म्हटलें असतां चालेल.

तुकारामानें सगुणभक्ति विशेषेंकरून प्रचारांत आणली. परमेश्वर हा निर्गुण व सगुण दोन्हीं प्रकारचा असून सगुण परमेश्वराची भक्ति सर्वांनां सोपी व शक्य आहे असें त्याचें मत होतें. चातुर्वर्ण्य, आश्रम न सोडतां, कुळाचार कुळधर्म न टाकतां घरींच राहून सर्वांनां सारखा आक्रमितां येईल अशा भक्तिमार्गाची शिकवण तुकारामानें दिली. परमेश्वर हा भक्तिसाध्य आहे; फक्त ती भक्ति मात्र अंत:करणांपासून व नि:स्वार्थबुद्धीनें केली पाहिजे म्हणजे प्रेमस्वरूपी परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यावांचून रहाणार नाहीं असें तुकोबानें प्रतिपादन केलें. परमेश्वरप्राप्‍तीसाठीं वेदांचें अध्ययन न केलें तरी चालेल, पुराणांचा गंध नसला तरी हरकत नाहीं फक्त ईश्वराची अखंड भक्ति, व त्याच्या नामाचा सदासर्वकाळ जयघोष, यामुळें ईश्वर प्रत्येकाला वश करून घेतां येतो ही तुकारामाची महत्त्वाची शिकवण होती.

संसारांत राहूनहि पूर्णपणें बैराग्य अंगीं आणतां येणें व परमार्थ साधणें शक्य आहे ही शिकवण सर्व लोकांनां त्यानें दिली. भागवत धर्माचा ज्ञानेश्वरानें पाया घातला; नामदेवानें व एकनाथानीं त्याचा विस्तार केला व तुकारामानें त्याच्यावर कळस चढविला व अशा रीतीनें या चार भगवद्‍भक्तांनीं भागवतधर्माची तेजस्वी ध्वजा फडकावली.

[संदर्भग्रंथ :— ल. रा. पांगारकर-तुकारामचरित्र; बि. ल. भावे-महाराष्ट्र-सारस्वत; डॉ. भांडारकर-धर्मपर व्याख्यानें; संतकविचरित्र माला.]

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .