प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या     

तुघ्लक घराणें (१३२१-१३८८)— गुलाम घराण्यांतील सुलतान बल्बन याजपाशीं तुघ्लक घराण्याचा मूळ संस्थापक ग्यासुद्दीन हा पूर्वी गुलाम होता. पुढें स्वपराक्रमानें तो मोठ्या योग्यतेस चढला. अल्लाउद्दीन खिलजीच्या वेळेपासून मोंगल वगैरे लोकांशीं लढून त्यानें सरहद्दीचें संरक्षण केल्यामुळें, त्यास गाजी मलिक व गाजीबेग असें नांव मिळालें. शेवटचा खिलजी राजा मुबारिक याच्या नंतर त्याचा दिवाण खुश्रू हा पातशहा झाला होता. तो मूळचा हिंदु असल्यानें हिंदूंचें प्राबल्य पातशाहींत जास्त झालें. तेव्हां मुसुलमान लोकांनीं ग्यासुद्दिनास पंजाबहून बोलावून आणलें व खुश्रूवर चढाई करून त्यास ठार मारले. याप्रमाणें ग्यासूद्दिनानें गादी बळकावली (१३२१). गादीवर आल्यानंतर त्यानें व्यापार वाढविला, कुराणाच्या आधारानें मूळच्या चालींस अनुसरून नवीन कायदे केले; मुसुलमानांवरील शेतसारा कमी केला व हिंदूंवर मात्र जबर बसविला, व मोंगलांचा उपद्रव होऊं नये म्हणून सरहद्दीचा चांगला बंदोबस्त केला. त्यानें दिल्लीजवळ तुघ्लखाबाद नांवाचा एक लहानसा किल्ला बांधिला. तो त्याच ठिकाणीं रहात असे. त्यानें लखनौच्या नासिरुद्दीनचा पराभव करून बंगाल आपल्या ताब्यांत आणला. तिकडून तो परत आल्यावर अफगाणपुर येथें त्याच्या स्वागतासाठीं तयार केलेला लांकडी मंडप एकाएकीं मोडून त्याच्याखालीं सांपडून तो मेला. हें कृत्य त्याचा मुलगा उलुघखान यानें केलें असें म्हणतात १३२५.

मुहंमद शहा.— ग्यासुद्दीन मेल्यावर त्याचा वडील पुत्र जूनान उर्फ उलुघखान नानें मुहंमद असें नांव धारण करून तख्त बळकाविलें ( १३२६ ). त्यानें राज्यावर येण्यापूर्वी वरंगळ घेऊन तेथील राजास कैद करून दिल्लीस पाठविलें व संबंध तेलंगण काबीज केलें ( १३२१ ) मुहंमद याचें अचाट कल्पनांचा पुरुष असें टोपण नांव पडलें होतें. त्याच्या कल्पना फार विक्षिप्‍त असत. तो चांगला शिकलेला होता. फारशी कवितांची त्यास अभिरुचि होती. तो वक्ता, लेखक, शूर व गणिती असून आरबी भाषेंतहि निष्णात होता. मद्यास तो स्पर्शहि करीत नसे. परंतु तो स्वेच्छाचारी, खुनशी, धर्मवेडा, क्रूर व उतावळा होता. वृथा मनोरथांच्या सिद्ध्यर्थ त्यानें भलतेच उपाय योजिल्यामुळें त्याच्या राज्याची अत्यंत दैना झाली. व्यावहारिक ज्ञान व परिस्थिति न ओळखणारा असल्यामुळें त्याच्या बुद्धिमत्तेची व विद्‍वत्तेची हानि झाली. त्याच्या कारकीर्दीचा इतिहास म्हणजे त्याच्या चुक्यांचेंच वर्णन होय.

उतावीळपणें आपल्या विक्षिप्‍त सुधारणा तो लोकांवर लादीत असे. त्यामुळें लोक असंतुष्ट होऊन बंडाळी करीत तेव्हां निर्दयपणें तो त्यांनां शिक्षा करी. यामुळें त्याला सर्व कृत्यांमध्ये अपयश आलें त्याच्या कारकीर्दीत एकसारखीं बंडें झालीं व ती त्यानें क्रूरतेनें मोडून टाकलीं; त्याचा भाऊ व दोनतीन पुतणे यांनीं बंडें केल्यावरून त्यानें त्यांचे अत्यंत हाल करून त्यांनां ठार मारिलें त्यामुळें सर्व प्रजा त्याला कंटाळून गेली. मरणसमयीं त्याचें सर्व राज्य मोडकळीस आलें. एकदां आपल्या विक्षिप्‍तपणाच्या लहरींत देवगड ही राजधानी करण्याचें ठरवून त्यानें एकदम दिल्लीच्या सर्व लोकांस देवगडास जाण्यास फर्माविलें. दिल्लीहून देवगड ७०० मैल दूर असल्यानें वाटेंत लोकांचे फार हाल झाले. पुष्कळ लोक वाटेंत मेले, देवगडास गेल्यावरहि कित्येक लोकांचा नाश झाला (१३३९). ही स्थिति पाहून त्यानें सर्व लोकांस पुन्हां दिल्लीस परत बोलाविलें. परंतु एकदां मोडलेला मेळ पुन्हां बसला नाहीं. त्यानेंच देवगडास दौलताबाद हें नांव दिलें. अनेक संकटांत सांपडल्यामुळें मुहंमदानें सोन्याच्या नाण्यांऐवजीं तांब्यांचीं व तांब्याऐवजीं चामड्याचीं नाणीं चालविण्याचा हुकूम केला, परंतु यामुळें खोटीं नाणीं निघालीं व लोक सरकारी वसूल, या बनावट चलनांत भरूं लागले, त्यामुळें सरकारचें सर्वस्वी नुकसान झालें. परदेशांतून माल येण्याचें बंद झाल्यामुळें व्यापार बसला; या नाण्यांस कोणीं विचारीनासें झालें व किंमत फार वाढली. अखेर खजिन्यांतील सोनें खलास झाल्यामुळें तिजोरी बंद करावी लागली.

चीन देश जिंकण्यासाठीं त्यानें एक लाख फौज पाठविली होती परंतु ह्या फौजेचे वाटेंत हाल होऊन तीस अपयश घेऊन परत फिरावें लागलें; त्यांतच अतिवृष्टीमुळें व थंडीवार्‍यामुळें फौजेचा नाश झाला (१३३७). तुर्कस्तान व इराण हेहि देश जिंकण्यासाठीं ह्यानें एक फौज तयार केली होती; तीस एक वर्ष बसवून पगार द्यावा लागला; नंतर तिला रजा दिली, तेव्हां ते बेकार लोक सर्व देश उध्वस्त करूं लागले.

मुहंमदाच्या हातून एकहि काम शेवटास गेलें नाहीं; ह्यामुळें त्याचा स्वभाव क्रूर बनला. शिकारीच्या राखीव रानांत कोणी परवानगीशिवाय गेल्यास तो भयंकर शिक्षा करी. देशांत दुष्काळ पडून लोकांची दैना झाली परंतु त्यानें जमीनसारा दसपट वाढविला; यामुळें सर्व लोक जमीनी सोडून पळून गेले, व त्या ठिकाणीं मोठालीं अरण्यें झालीं (१३४४) आपला दसरा बसविण्यासाठीं त्यानें पुष्कळवेळां निरपराधी लोकांची कत्तल केली. यामुळें जिकडे तिकडे बेबंदशाही होऊन सुलतान चिडून जाऊन आपल्याच लोकांशीं लढूं लागला. याचवेळीं मुसुलमानांस हांकून देण्यासाठीं दक्षिणेंतील हिंदुराजांनीं कट केला व बहामनी राज्य आणि विजयानगरचें राज्य यांची स्थापनाहि या सुमारास झाली. मुहंमद स्वतः दक्षिणेस आला, परंतु गुजराथेंत बंड झाल्याचें समजल्यामुळें तो तिकडे गेला. तेथून सिंधच्या बंडखोर राजाची खोड मोडण्यासाठीं तो टठ्ठा येथें गेला व तेथेंच तो आजारी पडून मरण पावला (२० मार्च १३५१).

याच्या कारकीर्दीत बंगाल व कर्नाटक प्रांत मुसुलमानांच्या हातून गेले; बहामनी राज्याची स्थापना झाली. याप्रमाणें त्याच्या राज्याचे तुकडे झाले व सर्वत्र बंडें होऊन सरकार व प्रजा निर्धन बनली. अब्न अब्दुल्ला मुहंमद इब्नबतूता हा इतिहासकार १३३३ सालीं हिंदुस्थानांत आला, तो मुहंमदच्या दरबारीं सुमारें १३४२ पर्यंत होता. पुढें त्याला त्यानें चीनमध्यें वकील म्हणून पाठविलें. त्यानें तत्कालीन हकीकत लिहिली आहे; तींत तो म्हणतो कीं, लोकांवर उपकार करणें व त्यांच्यावर तलवार चालविणें या दोन्ही गोष्टी एकदम करणारा मनुष्य या सुलतानाशिवाय दुसरा कोणी सांपडणार नाहीं. त्याच्या हातून द्रव्य मिळवून दुःखनिवारण झालेला भिकारी, आणि त्याच्यात हातून शिक्षा झालेल्या इसमाचें प्रेत, अशांची जोडी त्याच्या वाड्याच्या दारांत नेहमीं दृष्टीस पडे. परकी लोकांवर त्याची बहाल मर्जी असे. विद्वानांस त्याचा आश्रय असे; तथापि हिंदु लोकांवर याची वक्र दृष्टीच होती. त्यानें ईजिप्‍तच्या खलिफाकडून आपणांस वस्त्रें व सुलतान ही पदवी मिळविली (१३४३). बगदादच्या खलिफाचा एक वंशज मोठ्या मानमरातबानें आपल्या दरबारीं बाळगला होता.

फिरोज शहा — मुहंमद मरण पावल्यावर हिंदुस्थानांत शांतता झाली. एखादा आजार येऊन गेल्यावर जसा हळू हळू बरा होतो, किंवा वादळ मोडल्यावर जशी सर्वत्र शांतता होते, तसा प्रकार राज्यांत झाला. मुहंमद यास मूल नसल्यामुळें त्याचा चुलतभाऊ फिरोजशहा ( तिसरा ) गादीवर बसला. त्यानें ३७ वर्षे राज्य केलें. फिरोजचा जन्म १३०९ सालीं झाला. त्याची आई रजपूत होती. महंमदानें त्याला उत्तम शिक्षण दिलें होतें. फिरोजनें महंमदाच्या चुका प्रत्यक्ष पाहिलेल्या असल्यामुळें त्या टाळून त्यानें आपलें राज्य चालविलें.

फिरोज दयाळू होता. मुहंमदानें ज्यांचा छळ केला होता त्यांचा शोध करून त्यांचें नुकसान त्यानें भरून दिलें व समाधान करणारे लेख त्यांच्यापासून लिहून घेऊन ते मुहंमदच्या थडग्यांत पुरून टाकिले. त्यानें शांततेनें राज्य केलें; लढाया करणें व दूरदूरचे प्रांत जिंकण्यांत व्यर्थ पैसा व श्रम खर्च करणें त्याला आवडत नसे. राज्य लहान कां होईना पण त्याची व्यवस्था उत्कृष्ठ ठेवण्यांतच तो भूषण मानी. त्यामुळें स्वतंत्र झालेले सुभे परत घेण्याचा त्यानें फारसा प्रयत्‍न केला नाहीं. दक्षिणेंत ब्राह्मणी राज्याची स्थापना अगोदरच झाली होती; तसेंच बंगालप्रातहि स्वतंत्र झाला होता. एक दोनदां बंगाल प्रांत परत घेण्याचा त्यानें प्रयत्‍न केला होता, परंतु त्यांत त्याला यश आलें नाहीं (१३५३). त्यानें ठठ्ठावर स्वारी केली; तींत त्याला अनेक संकटांशीं झगडावें लागलें, तथापि सरतेशेवटीं त्यानें सिंधप्रांत जिंकून तेथील राजास दिल्लीस आणिलें ( १३६१ ).

फिरोजच्या यशस्वी कारभाराचें बरेंचसें श्रेय त्याचा वजीर मकबुलखान यास आहे. हा मूळ हिंदु असून तेलंगणाचा रहिवाशी होता. त्याचें मूळचें नांव कंबू होतें. महंमदाच्या वेळीं त्यानें चांगले काम केलें असून फिरोजची तर त्यावर फार मर्जी होती. त्यानें या वजिराच्या प्रत्येक मुलामुलीस दरसाल एक हजाराचें वेतन करून दिलें.

फिरोजनें प्रजाहिताचीं अनेक कामें केलीं. त्यानें मशीदी, पाठशाळा, धर्मशाळा, किल्ले, शहरें, दवाखाने, तलाव, पूल, वगैरे बांधिले. याशिवाय त्यानें अनेक मोठमोठे कालवे बांधून शेतीची सुधारणा केली. हें काम उत्तर हिदुस्थानांत त्याच्यावेळेपर्यंत कोणीहि केलें नव्हतें. त्यामध्यें सतलज-झझ्झर, जमना-अबसीन हे कालवे प्रख्यात आहेत. पडित जमिनी लागवडीस आणून व कायमचा शेतसारा ठरवून राज्याचा वसूल वाढविला प्रजेची दाद घेण्यासाठीं ती नेहमीं राज्यांत हिंडे. मुस्तघल्ल ( जमीन भाडें ), जझारी ( खाटिकांवरील कर ), रोझी ( व्यापार्‍यांवरील कर ) इत्यादि नाना प्रकारचे जुलमी कर त्यानें बंद केल्यामुळें लोक सधन झाले ( १३७९ ). नवीन शहरें वसवून त्यांस नांवें देण्याचा त्याला विशेष नाद होता. तो गादीवर बसल्यानंतर प्रथम दिल्लीस गेला, त्यावेळीं त्याला पुत्र झाला या आनंदाच्या स्मरणार्थ त्यानें फत्तेबाद शहर वसवून मुलाचें नांव फत्तेखान ठेविलें. अयोध्या प्रांतांत जोनपूर नांवाचें एक नवीन शहर व दिल्लीनजीक फिरोजाबाद नांवाचें शहर स्थापिलें व बदाऊनजवळ फिरूजगड किल्ला बांधला ( १३८२ ). तो फिरोजाबादेस रहात असे. त्याला बागबगीच्यांचाहि शोक असल्यानें त्यानें एकंदर १२०० बाग तयार केले. या बागांपासून दरसाल एक लाखाचें उत्पन्न येई. त्याच्या या सुधारणांनीं राज्याच्या उत्पन्नांत सव्वा कोटीची वाढ झाली. राज्याचा एकंदर वसूल दहा कोटी होता. नोकरांस उत्पन्नें तोडून दिलेलीं होतीं, स्वतंत्र पगार ठरविलेले नव्हते, म्हणून त्याच्या पश्चात् राज्याचे तुकडे झाले. त्याला मद्यप्राशनाचा बराच नाद होता. हिंदु धर्माविषयीं त्याच्या मनांत द्वेष होता. तो कट्टा मुसुलमान असल्यानें प्रत्येक काम तो कुराणाचा आधार घेऊन करी. हिंदूंची मूर्तिपूजा त्यानें बंद केली. पूर्वीच्या सुलतानांनीं जिझिया कर ब्राह्मणांस माफ केला होता, तो यानें पुन: बसविला. तो परधर्माचा द्वेष्टा होता; यामुळें हिंदु लोकांस तो प्रिय झाला नाहीं.

फिरोज वृद्ध झाल्यावर त्यानें सर्व राज्यकारभार मक्बुल मेल्यामुळें त्याच्या खानजहान नांवाच्या मुलास वजीरी देऊन त्याच्या हातीं दिला, परंतु फिरोजचा मुलगा महंमद व हा वजीर यांचें वांकडें असल्यामुळें, महंमदानें त्या वजीरास ठार मारलें ( १३८७ ) व सर्व कारभार आपल्याकडे घेतला आणि नाशिरुद्दीन पदवी धारण केली. परंतु त्याच्यानें राज्याची जोखीम न निभल्यामुळें व सर्वत्र बंडाळा माजल्यामुळें वृद्ध फिरोजनें स्वतःकडे पुन्हां राज्यकारभार घेतला. यानंतर तो थोड्याच दिवसांत मरण पावला ( १३८८ ).

फिरोज आपल्या गुलामांस उत्तम शिक्षण देऊन त्यांनां जोखमेचीं कामें देई. त्याच्यापाशीं अशा प्रकारचें गुलाम १ लक्ष ८० हजार होते. या गुलामांतून उत्तम उत्तम कारागीर तयार झाले; या गुलामांचें एक निराळेंच खातें असे. त्याच्या कारकीर्दीचे वृत्तांत अनेक लोकांनीं लिहीलेले आहेत. त्याच्या मरणानंतर हिंदु लोकांनीं उचल खाल्ली; त्यांस बाटलेल्या गुलामांनीं मदत केली. एकीकडे प्रांतिक कामदार स्वतंत्र होत होते, व दुसरीकडे, हिंदु लोकहि डोकें वर काढूं लागले. अशा प्रकारच्या दुहेरी अडचणींत तुघ्लकांचें राज्य सांपडलें.

शेवटचे राजे.— फिरोजनंतर त्याचा नातू ग्यासुद्दीन गादीवर बसला, परंतु लवकरच त्याच्या भावांनीं व चुलतभावांनीं त्याचा वध केला. नंतर कांहीं दिवस दिल्लीस अंदाधुंदी चालू होती. दरबारी मंडळीनीं फिरोजचा मुलगा महंमद यास १३९० सालीं गादीवर बसविलें. तो स. १३९४ त मरण पावला. त्याच्या पश्चात् त्याचा पुत्र हुमायून उर्फ सिकंदर तख्तावर बसला; परंतु तो एकाएकीं मरण पावल्यावर त्याचा भाऊ दुसरा महंमद हा गादीवर बसला. राज्यकारभार पाहण्यास कोणीहि लायक मनुष्य नसल्यामुळें चोहोंकडे दंगे सुरू झाले. बंगाल, लाहोर, पंजाब, गुजराथ, माळवा वगैरे प्रांत स्वतंत्र झाले (१३९७) व दिल्लींत यादवी माजली. दिल्लीतील या भानगडी ऐकून तैमूरलंग हा प्रचंड सेनेसह दिल्लीवर चालून आला (१३९८).

दिल्लीस तैमूरची व महंमदची लढाई झाली; तैमूर विजयी झाला, व महमद गुजराथेंत पळाला. तैमूंरनें दिल्लींत सर्वत्र कत्तल करून अगणित लूट करून १५ दिवसांनीं परत प्रयाण केलें. तो गेल्यावर दिल्लीस दोन महिने अंदाधुंदी होती. वजीरानें राजसत्ता स्वतः बळकावली; परंतु पुढें तो एका लढाईत ठार झाला (१४०५) व महंमद पुन्हां गादीवर आला. त्याच्या व तैमूरचा मुलतानचा सुभेदार खिजरखान याच्या नेहमीं चकमकी होत. अखेर महंमद हा हालअपेष्टेंत मरण पावला (१४१२). हा या घराण्याचा शेवटचा राजपुरुष होय. त्याच्या मागून दिल्लीचा कामगार दौलतखान लोदी यानें राज्य बळकाविलें. परंतु त्याचा पराभव करून खिजरखान गादीवर आला व त्यानें सय्यद घराण्याची स्थापना केली (१४१६). [लेनपूल. पु. ३; बील; माबेलडफ; एलफिन्स्टन; फेरिस्ता; तारीखी मुबारकशाही; इलियट डॉसन. पु. १; तारीखी फिरूझशाही; तुह फतुल किराम.]

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .