प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या    
     
तेलगू वाङ्‌मय— तेलगू या शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधानें तेलंगणांत एक आख्यायिका प्रचलित आहे. तिचा उल्लेख पुष्कळ एतद्देशीय ग्रंथकारांनीं आपल्या ग्रंथांत केला आहे. मामीडी व्यंकय्या म्हणून मच्छलीपट्टम येथील एका विद्वान् ग्रंथकारांनें आपल्या तेलगू भाषेच्या कोशाच्या प्रस्तावनेंत सदर आख्यायिकेचा उल्लेख केला आहे. शिवाय ''आंध्र कौमुदी'' वगैरे तेलगू ग्रंथांत ह्याच आख्यायिकेस विशेष महत्त्व दिलें आहे. तेलगू भाषेंचें मुळचें नांव ही ज्या देशाची भाषा आहे त्याचें नांव त्रि-लिंगम्, अथवा शुद्ध तेलगू भाषेंत म्हणावयाचें झाल्यास, मोडोगा-लिंगम् म्हणजे तीन लिंगांच्या मधील प्रदेशाची भाषा असें आहे. तेलगू हा त्रिलिंग याचा अपभ्रंश नसून त्रिकलिंग याचा अपभ्रंश आहे असें रा. राजाराम रामकृष्ण भागवत हे वि. विस्तारांत म्हणतात.

तेलगू हा शब्द ''तेलू'' ह्या विशेषणापासून निघाला असावा असा देखील कदाचित संभव आहे. कारण, तेलू म्हणजे सुंदर, पांढरा असा अर्थ होतो, आणि हें विशेषण बहुतकरून तेलंगणच्या लोकांचीं इतर देशाच्या लोकांशीं तुलना करतांनां लाविलें असल्याचें संभवतें, असें रा. शंकर सायन्ना परशा हे म्हणतात.

तेलगू भाषा द्राविडी भाषासंघांतील आहे हें आजचें भाषाशास्त्र सांगतें. तथापि जुन्या ग्रंथकारांनीं इतर प्राकृत भाषांप्रमाणें तेलगू ही देखील संस्कृतचें अपत्य म्हणून धरली होती. उदाहरणार्थ—

तल्ली संस्कृतम्ब-एल्ला भाषलाकुन
दानिवलना गोंता गाना बडिये ।
गोंता दान गलीगे-नंतुयुनेकर्मे
तेलगू भाषनगा विनुतिकेक्के ॥

अर्थ— संस्कृत ही सर्व भाषांची माता होय, प्राकृत भाषा ही तिजपासून उत्पन्न झाली आहे. कांहीं भाषा प्राकृत भाषेपासून निघाल्या आणि त्या सर्व एक होऊन त्यांपासून तेलगू भाषा उत्पन्न झाली.

तेलगू भाषेंतील शब्दांसंबंधानें व्याकरणदृष्टीनें ४ मुख्य भेद आहेत ते असे— तत्सम, तद्भव, देशी व ग्राम्य. तत्सम म्हणजे संस्कृतसम. संस्कृत शब्द जशाचा तशा घेऊन त्यास तेलगू प्रत्यय लावून जो शब्द योजिला जातो त्यास तत्सम म्हणतात. आतां दुसरा प्रकार तद्भव हा होय. संस्कृतांतून किंवा प्राकृतांतून अपभ्रंश होऊन तेलगूंत आलेले शब्द तद्भव होत. तद्भव शब्दांपैकीं निम्मे शब्द संस्कृत भाषेंतील शब्द होत व बाकीच्या निम्या शब्दांहून थोडेसे अधिक शब्द महाराष्ट्र प्राकृत भाषेंतील होत. तेलगू तद्भव शब्द हे केवळ संस्कृत भाषेंतील होत. तेलगू तद्भव शब्द हे केवळ संस्कृत भाषेंतील अथवा ज्या सहा प्राकृत भाषा आहेत त्यांच्या पासून निघालेले असावे असें वाटतें. तेलगू भाषेंतील सुद्ध शब्द कोणते व तद्भव शब्द कोणते हें ओळखणें कित्येकदां कठिण पडतें. तेलगूंतील शब्दसंग्रहापैकीं एकचतुर्थांश शब्द तद्भव आहेत. देशी म्हणजे इतर कोणत्याहि देशांतले नसून केवळ तेलंगी देशांतलेच शब्द. ग्राम्य शब्द म्हणजे प्राकृत जन भाषणांत जे ग्राम्य शब्द वापरतात ते. ग्राम्य शब्द ग्रंथांत अनुकरणाकरितांहि योजण्याचा पूर्णपणें निषेध आहे. ग्राम्य किंवा अलाक्षणिक (व्याकरणाविरुद्ध) शब्दप्रयोग भाषेंत होऊं न देण्याविषयीं तेलगू भाषालक्षणवेत्ते फार काळजी घेतात. आंध्रदीपिका नामक तेलगू व्याकरणाचा कर्ता मामीडी व्यंकय्या ह्यानें आपल्या व्याकरणांत निरनिराळे पंचवीस शब्द घेऊन त्यांपैकीं शुद्ध तेलगू शब्द कोणते व अशुद्ध तेलगू शब्द कोणते हें दाखविलें आहे. शुद्ध तेलगू शब्दांस ''अच्चा तेलगू'' म्हणतात. व जे अशुद्ध तेलगू शब्द भाषेंत मिसळले आहेत त्यांस ग्राम्य तेलगू म्हणतात. तेलगू भाषेचा प्रसिद्ध वैय्याकरण नन्नयभट्ट होय आणि त्यानें आपला व्याकरणग्रंथ संस्कृतमध्यें लिहिला आहे.

तेलगू कवींनीं सर्व संस्कृत वृत्तें घेतलीं आहेत; पण विशेषतः ते संस्कृतवृत्तांपैकीं शार्डूलविक्रीडित, मत्तेभविक्रीडित, उत्पलमाला व चंपकमाला हीं चार वृत्तें वापरतात. संस्कृत वृत्तें जरी घेतलीं आहेत तरी त्यांत तेलगू लोकांनीं प्रास व यति असे दोन आपलेच नियम घालून दिले आहेत. तेलगू कवितेस अंत्य यमकांची शृंखला नाहीं. तेलगू पद्यांच्या चारी चरणांस प्रास पाहिजे, व प्रत्येक चरणास यति पाहिजे. म्हणजे श्लोकाच्या चारहि चरणांचें द्वितीयाक्षर एकच व्यंजन पाहिजे. स्वरभेद असल्यास चिंता नाहीं. या पहिल्या चरणाचें दुसरें अक्षर जर ''क'' असेल तर बाकीच्या चरणांचें द्वितीयाक्षर कच्या बाराखडीतलेंच पाहिजे; दुसरें कोणतेंहि द्वितीयाक्षर जर जोडाक्षर असले तर बाकीच्या चरणांचीं द्वितायाक्षरें याच जोडाक्षरांच्या बाराखडींतल्यापैकीं पाहिजेत. यति म्हणजे विश्रामस्थान— चरण वाचतांनां थांबण्याची जागा. पण तेलगू यतीचा असा नियम आहे कीं, थांबून पुन्हां ज्या अक्षरापासून वाचावयाला सुरुवात करावयाची तें अक्षर व चरणाचें पहिलें अक्षर हीं समोच्चरणाचीं (सारख्या उच्चाराचीं) पाहिजेत; पण दोन्हीं ठिकाणीं प्रासाप्रमाणें एकच अक्षर पाहिजे असा कडक नियम नाहीं. कित्येक अक्षरांकरितां दुसरीं कित्येक अक्षरें यतिस्थानीं राहूं शकतात व अशा अक्षरांत यतिमैत्री आहे असें म्हणतात; उदाहरणार्थ च,छ,ज,झ,श,ष,व, स या अक्षरांत यतिमैत्री आहे. प्रत्येक सर्गाच्या पहिल्या चार अक्षरांत परस्पर यतिमैत्री आहे. तसेंच इतर तलेगू छंदः शास्त्राविषयीं बरेच बारीक नियम आहेत.

तेलगू देशांत फार प्राचीन काळापासून काव्यें किंवा इतर ग्रंथ कोणास तरी अर्पण करण्याची चाल आहे. ही चाल इतकी प्राचीन व अखंडित चालत आलेली आहे कीं, कोणासहि अर्पण केलेलें नव्हे असें एखादें तरी तेलूग काव्य सांपडेल किंवा नाहीं याची शंका आहे. या अर्पणक्रियेला तेलंगी कवि ''अकंति करणें'' असें म्हणतात. अंकिताचे दोन प्रकार आहेत— (१) नराकित व (२) देवांकित. कित्येकांनीं आपलीं काव्यें धनादिकांच्या लोभानें मनुष्यांस अंकित केलीं आहेत. व कित्येकांस तें न आवडून त्यांनीं तीं शिव, विष्णु इत्यादि देवांस अर्पण केलीं आहेत.

काव्यास प्रारंभ करण्याची सर्वं कवींची तर्‍हा सारखीच आहे. काव्य नरांकित करावयाचें असेल तर प्रथम दोन चार श्लोकांत देवाचें वर्णन करुन, असा देव कृतिभर्ता (ज्यास कृति अंकित केली असेल त्यास कृतिभर्ता म्हणतात.) जो अमका अमका त्यास कल्याण देवी, अशी प्रार्थना करावयाची. नंतर मी एक काव्य करण्याच्या विचारांत असतां कृतिभर्त्यानें अमुक प्रकारच्या सभेंत बसून मला बोलाविलें व माझी विशिष्ट शब्दांनीं स्तुति करुन ''एक काव्य करुन मला अर्पण करा'' अशी माझी प्रार्थना केली असें सांगावयाचें. नंतर कृतिभर्त्याच्या वंशाचें व वाटल्यास आपल्याहि वंशाचें वर्णन करावयाचें. पुढें कृतिभर्त्याचीं षष्ठयंत विशेषणें (''अमक्याचा'' अशा स्वरुपाचीं विशेषणें) दोन चार पद्यांत आणून त्याच्यापुढें (अमक्या गुणविशिष्टाच्या) अभ्युदयपरंपराभिवृद्धीकरितां रचावयाच्या काव्याचा प्रारंभ असा-असें म्हणून मूळ कथेस सुरुवात करावयाची. प्रत्येक काव्यांत हा सर्व प्रकार असावयाचाच. या पद्धतीमुळें कृतिभर्त्याच्या काळावरून कवीचा कालनिर्णय करण्यास तेलगू इतिहाससंशोधकांस फार सोपें जातें व या पद्धतीनेंच हजारों राजांच्या व प्रसिद्ध पुरुषांच्या वंशावळी अजरामर झाल्या आहेत.

काव्याच्या प्रारंभीं जसा हा सर्व विधि असतो, तसा काव्याच्या प्रत्येक सर्गाच्या शेवटीं व आरंभी एक विधि करावयाचा शेवटीं एक दोन श्लोकांनीं व सर्गाच्या प्रारंभीं एका श्लोकानें कृतिभर्त्यास संबोधावयाचें. या पद्यांतली सर्व पदें संबोधनांत असावयाचीं. कृतिभत्यानें आपणांस कृति अर्पण करण्यास कृतिकत्याची स्तुति केली असें जरी प्रत्येक काव्यांत वर्णिलेलें असतें तरी प्रत्येक काव्याविषयीं कवीस विनवणी केली जातेच असें नाहीं. कवि अगोदर मूळ काव्य रचितो. नंतर त्या काव्याचें रंगाधिरोहण होतें. (सभेंत काव्य वाचण्याच्या प्रसंगाला रंगाधिरोहण म्हणतात.). काव्य ज्याच्या नांवानें अंकित करावयाचें असेल तो मालक मोठी सभा भरवितो. तेथें मोठमोठे कवी व विद्वान येतात, त्या सर्वांच्या पुढें तें काव्य वाचलें जातें. सभेंतील प्रत्येकास त्या काव्यावर टीका करण्याचा अधिकार असतो. प्रत्येकानें काढलेल्या आक्षेपास उत्तर देण्याची जबाबदारी कवीकडे असते. अशा रीतीनें सर्वांचें समाधान होऊन तें काव्य जर निर्दोषी ठरलें तर कृतिभर्ता ते स्वीकारतो व कवीची चांगली संभावना करतो. इतक्या बिकट कसोटींतून उतरावें लागत असल्यामुळें काव्यांत कोणत्याहि प्रकारचे दोष न राहूं देण्याविषयीं तेलगू कवीस फार जपावें लागत असे हें खरें आहे; पण आक्षेपक जर सांप्रतच्या कित्येक पंडितंमन्य मराठी टीकाकारांप्रमाणें परोत्कर्षासहिष्णु असेल, तर उत्तम उत्तम काव्यकारांचाहि सभेंत पराभव होऊन त्यांस आपल्या काव्यांसह निमूटपणें सभेंतून उठून जावें लागत असे. प्रत्येक संस्थानिकाच्या दरबारीं (मग तो लहानसा जमीनदार कां होईना) एक तेलगू कवि असावयाचाच. अशा कवीस त्या संस्थानाचा आस्थानकवीश्वर म्हणतात. सध्यां देखील ही चाल विजयानगर, बोब्बीली, गद्वाल (मोंगलाईंतील) इत्यादि तेलंगणी संस्थानांत पाळली जाते. या उत्तम पद्धतीमुळें उत्तम काव्यें निर्माण झाली व अन्यथा अप्रसिद्ध रहाणार्‍या राजांचीं नावेंहि अजरामर झालीं.

संस्कृतांतील चंपूकाव्याप्रमाणें, आंध्रकाव्यें गद्यपद्यांनी युक्त करतात. आंध्र भाषा व तिच्या छंदःशास्त्राचे कडक नियम असे आहेत, कीं मध्यें गद्य घातल्याशिवाय पूर्वापार पद्यांचा संबंध जुळून वर्णनपूर्ति होऊंच शकत नाहीं. गद्याशिवाय एखादें काव्य रचल्यास त्याच्या नांवांतच तें निर्वचन आहे असें अभिमानानें सांगतात. उदाहरणार्थ तिक्कनकृत निर्वचनोत्तर रामायण. आंध्र लोकांस शतकें रचण्याचा छंद फार आहे. या भाषेंत कमींत कमी पांच सहाशें शतकें असतील. हीं बहुतेक शतकें ईश्वरस्तुतिपर आहेत. कांहीं इतर विषयांवरहि आहेत. प्रत्येक शतकांत शंभर पद्यें असावयाचीं. ध्रुपदाप्रमाणें प्रत्येक पद्याच्या शेवटीं तेच ते शब्द येतात. उदाहरणार्थ— दाशरथीशतकाच्या प्रत्येक पद्याच्या शेवटीं ''दाशरथी करुणापयोनिधि'' हे शब्द व वीरभद्र शतकाच्या प्रत्येक पद्याच्या चतुर्थचरणीं करुणाकर वीरभद्र कारण्यनिधि'' असे शब्द येतात. प्रत्येक शतकांत, केकावलीप्रमाणें, निरनिराळ्या तर्‍हांनीं त्या त्या देवाचा धांवा केलेला असतो. कित्येक शतकें भक्तिरसानें थबथबलेलीं असतात तर कित्येक इतर विषयांवरहि असतात. उदाहणार्थ, सुमतिशतक म्हणून प्रत्येक सुमतीस संबोधिलेलें एक शतक आहे. त्यांत प्रत्येक पद्याच्या शेवटीं ''हे ! सुमति'' असें संबोधन असून, त्यांत लहान मुलास उत्तम बोध आहे. हें शतक लहान मुलांकडून पाठ करविलें जातें. कुमारीशतकहि फार प्रख्यात आहे. त्यांत मुलींस बोध केलेला आहे. शतकें काव्यांत गणलीं नसल्यामुळें ही अंकित करण्याची पद्धत नाहीं.

शतककार व पदें रचणारे यांस सोडून (कारण यांस प्रबंध रचणार्‍यांच्या इतका मान नाहीं) काव्य-प्रबंध-रचणार्या कवींची संख्या कमींत कमी दोनशें आहे. याशिवाय कित्येक मोठमोठ्या कवींचीं काव्यें नष्ट झाली आहेत. उदाहरणार्थ, भीमकवि व अमरेश्वर या दोघांस त्यांच्या अप्रतिम काव्यांबद्दल पूर्व कवींनीं स्तविलें आहे. पण यांचें एकहि काव्य आज उपलब्ध नाहीं. नष्ट समजलीं जाणारीं कित्येक काव्यें आजकाल शोधकांच्या परिश्रमानें उपलब्ध होत आहेत. तेलंगणांत कोठेंहि न सांपडणारी-तस्मात नष्ट समजलीं जाणारीं-तीन चार उत्तम काव्यें कांहीं दिवसांमागें तंजावरास सांपडलीं. त्या तामीळ (द्रविड) देशांत तेलंगी काव्यें असण्याचें कारण काय अशी सहज शंका येईल. कृष्णदेवरायाच्या वेळीं सर्व द्रविड देश आंध्रांनीं जिंकला होता. तेव्हां तेथें आंध्र सुभेदार ठेवण्यांत आले. त्या नायकांनीं केलेला हा ग्रंथसंग्रह होय. त्याप्रमाणें आंध्र सारस्वत फार अवाढव्य असल्यामुळें येथें सर्व कवींविषयीं त्रोटक माहिती देणें शक्य नाहीं व आवश्यकहि नाहीं. म्हणून मुख्य मुख्य कवींचें व त्यांच्या काव्यांचें वर्णन येथें दिलें आहे.

नन्नय भट्ट— हा आंध्र भाषेचा आद्यकवि. याचा ख्रि. श. च्या ११ व्या शतकाच्या प्रारंभी राजनरेंद्राच्या सभेंत फारच गौरव झाला. यानें राजनरेंद्राच्या विनंतीवरुन तेलगूंत महाभारत रचण्यास प्रारंभ केला व अरण्यपर्व अर्धें रचून तो निवर्तला. महाभारताचीं हीं पहिलीं तीन पर्वें त्यानें राजनरेंद्रासच अर्पण केलीं. नन्नयभट्टास शब्दानुशासन अशी पदवी आहे. याचें कारण असें कीं ज्याप्रमाणें पाणिनि, पतंजल्यादि सूत्रकारांनीं गीर्वाणभाषा सुसंस्कृत व नियमबद्ध करून संस्कृत बनविली, त्याचप्रमाणें नन्नयभट्टानें आंध्रशब्दचिंतामणी नामक व्याकरण रचून तेलगू भाषा नियमबद्ध केली.

नन्नयभट्ट जरी आद्यकवि मानला जातो तरी त्याच्यापूर्वी निदान हजार वर्षांपासून तरी आंध्र कवित्व चाललें असावें असें त्याच्या काव्यावरूनच व्यक्त होत आहे. त्याचें काव्य प्रौढ वृत्तांनीं, यमकप्रासादि शब्दालंकारांनीं, उत्तम अर्थालंकारांनीं व आंध्र व्याकरणाच्या कोणत्याहि नियमास बाध न आणतां अप्रतिहत गतीनें वहात जाणार्‍या शब्दप्रयोगांनीं इतकें सुशोभित आहे कीं, कालिदासाच्या किंवा भारवीच्या वेळीं संस्कृत भाषा ज्या स्थितींत होती. त्याच स्थितींत नन्नयाच्या वेळीं आंध्र भाषा होती असें कोणत्याहि भाषाशास्त्रज्ञास कबूल करावें लागेल.

तिक्कनसोमयाजी— नन्नयभट्टानंतर झालेल्या कवींत अतिविख्यात, आणि वर्णनशैलीविषयीं व ग्रंथबाहुल्याविषयीं सर्व आंध्र कवींत श्रेष्ठ असा कवि हाच होय. यास ''कवि ब्रह्म'' असें नांव आहे. हा कवि नेल्लूरचा राजा जो मनुमसिद्धि त्याच्या सभेंत तेराव्या शतकाच्या मध्यकालीं होता, आजपर्यंत याची केवळ कवि या नात्यानेंच ख्याति होती. पण यास अर्पण केलेल्या व नुकत्याच तंजावरास सांपडलेल्या आंध्र दशकुमारचरित्रावरून हा मनुमसिद्धीचा प्रधानहि होता व फार राजकार्यकुशल होता असें सिद्ध झालें आहे. यानें यज्ञ केल्यामुळें यास सोमयाजी म्हणत असत. याचीं उपलब्ध असलेलीं काव्यें दोन  एक निर्वचनोत्तर रामायण व दुसरें विराटपर्वापासून स्वर्गारोहणापर्यंत भारताचीं पंधरा पर्वे. पहिलें काव्य यानें मनुससिद्धीस अर्पण केलें व दुसरें नेल्लूर येथील हरिहरनाथ नामक देवास अर्पिलें.

सोमयाजीची वर्णनशैली फारच सुरेख आहे. संस्कृत भारतापेक्षां तेलगू भारत प्रत्येक बाबतींत श्रेष्ठ झालें आहे, असें के.व्ही. लक्ष्मणराव म्हणतात. युद्धवर्णनांत सोमयाजीची बरोबरी करणारा कवि दुसर्‍या कोणत्याहि भाषेंत झाला नसेल. सोमयाजी उभयभाषात (संस्कृत व आंध्र) प्रवीण होता म्हणून तो नेहमीं आपणास उभयकविमित्र म्हणवून घेत असे. त्याचें एखादें पद्य पाहिल्यास तें संस्कृत पदांनीं भरलेलें दिसावयाचें; दुसरें एखादें पद्य पाहिल्यास त्यांत देश्य शब्दच दिसावयाचें. सोमयाजीकृत भारत वाचतांनां नेहमीं मोरोपंताच्या भारताची आठवण होते.

एर्राप्रग्गड— हा तिसरा आंध्र कवि, कोंडुविडु राज्याचा अधिपति जो अनवेमारेड्डि त्याचा आश्रित होता. हरिवंश नांवाचें उत्तम काव्य करुन एर्राप्रग्गड कवीनें या राजास अर्पण केलें, पण हा कवि या हरिवंशाकरितां विशेष प्रख्यात नाहीं. तर यानें भारतारण्यपर्वाचा राहिलेला जो भाग तो रचिला म्हणून याची फार ख्याति आहे. यास ''प्रबंध परमेश्वर'' अशी पदवी आहे. याला आंध्र वाङ्‌मयांत फार मान आहे. मागील दोन कवींप्रमाणें हाहि आंध्र भाषेंस सर्वस्वी आधारभूत आहे.

नाचनसोम— हा ''उत्तरहरिवंश'' काव्याचा कर्ता. यास ''सर्वज्ञ'' म्हणतात. याची कविता इतकी प्रौढ आहे कीं, कोणी कोणी यास वरील कवित्रयापेक्षांहि अधिक मानतात. हरिवंशकाव्य-विशेषतः त्यांतील उषाकन्याप्रकरण इतकें सुरेख वठलें आहे कीं तें एकदां हातीं घेतल्यास खालीं ठेववतच नाहीं. प्रौढता, अर्थगौरव,पदलालित्य इत्यादि सर्व गुण याच्या काव्यांत पदोपदीं दृष्टीस पडतात. कालिदासाची प्रसन्नता, भारवीचा भारदस्तपणा, दंडीचें पदलालित्य व जगन्नाथपंडिताचा प्रसाद इतके सर्व उत्तमोत्तम गुण नाचनसोमाच्या काव्यांत एकत्र झाले आहेत. नाचनसोम हा चवदाव्या शतकाच्या शेवटी होऊन गेला.

श्रीनाथ— ह्याला आंध्र भाषेंत फार मान आहे. हा पंधराव्या शतकारंभी राजमहेंद्री येथील रेड्डी राजांच्या आश्रयास होता. यानें आपलीं सर्व काव्यें राजमहेंद्रीच्या राजांस व त्यांच्या मंत्र्यांस अर्पण केलीं आहेत. याच्या सर्व काव्यांत ''आंध्रनैषध'' हें फार प्रख्यात आहे. याचें दुसरें विख्यात काव्य काशीखंड हें वीरभद्र रेड्डी या राजास यानें अर्पण केलें आहे. या कवीचें ''वीथिनाटक'' (सडकेवरचें नाटक) या नांवाचें एक लहानसें पण चमत्कारिक काव्य आहे. यांत कवि रस्त्यावर उभा राहून तेथून येणार्‍या जाणार्‍या बायकांचें वर्णन करतो. याला राजांचा व त्यांच्या प्रधानांचा पूर्ण आश्रय असल्यामुळें हा फार सधन होता.

बम्मनपोतराज— हा वरील कवीचा मेहुणा. साधु तुकारामाप्रमाणें हा मोठा निरिच्छ भगवद्भक्त होता. याचें प्रसिद्ध काव्य श्रीमद्भागवत होय. के.व्ही. लक्ष्मणराव यांच्या मतें या काव्यांतील प्रल्हादचरित्र, गजेंद्रमोक्ष, रुक्मिणीकल्याण इत्यादि प्रकरणें केवळ अद्वितीय आहेत. संस्कृत भागवतापेक्षां आंध्र भागवत फारच रम्य झालें आहे. संस्कृत भागवत पुराणशैलींत आहे व आंध्र भागवत प्रबंधशैलींत आहे. हा ग्रंथ सर्व भक्तजनांस व रसिकांस अत्यंत पूज्य आहे; तरी वैय्याकरणांनीं व साहित्यशास्त्रज्ञांनीं यास बहिष्कार घातला.

नन्नयभट्ट, तिक्कनसोमयाजी, एर्राप्रग्गड, नाचनसोम, श्रीनाथ, बम्मन पोतराज, इत्यादि कवींस पूर्वकालीन कवी म्हणतात. या वेळेपर्यंत म्हणजे पंधराव्या शतकापर्यंत जे आंध्र कवी होऊन गेले त्या सर्वांनीं संस्कृत ग्रंथांत अनुसरूनच भांषातररूपानें काव्यें रचिलीं, स्वतंत्र काव्यें रचिलीं नाहींत. हीं भाषातरें शब्दशः नाहींत. ज्या दृष्टीनें मोरोपंतकृत महाभारतास संस्कृत भारताचें भाषांतर म्हणतां येईल त्याच दृष्टीनें हीं आंध्र काव्यें संस्कृत ग्रंथांचीं भाषातरें होत. कालिदासकृत कुमारसंभव व ज्या पुराणाच्या विस्तृत कथानकास अनुसरून तें रचलें आहे त्यांत जो फरक दिसतो, तोच आंध्रभाषांतरांत व मूळ संस्कृत काव्यांत आहे असें म्हणतां येईल. आंध्र काव्यें कथानकपरंपरेसंबंधानेंच भाषातरें होत असें म्हणतां येईल. बाकी तीं स्वतंत्र काव्येंच म्हणण्याला हरकत नाहीं.

कृष्णदेवराय— हा विजयानगरचा महाप्रतापी राजा इतिहासांत फार प्रसिद्ध आहे. यानें इ.स. १५०९ पासून १५३० पर्यंत राज्य केलें. हा राजा आंध्र व संस्कृतांत फार प्रवीण होता. यानें तेलगूंत ''आमुक्तमाल्यदि'' किंवा ''विष्णुत्तित्तीय'' या नांवाचें महाकाव्य रचिलें. इ.स. १५१५ मध्यें कृष्णराय कलिंगदेश जिंकण्याकरिता निघाला. रस्त्यांत आंध्रमधुमयन (विष्णु) क्षेत्र नांवाचा एक पर्वत आहे. त्या पर्वतावर विष्णुदर्शनास राजा गेला व त्या रात्रीं तेथेंच राहिला. रात्रीं विष्णूनें स्वप्नांत येऊन तेलगूंत एक काव्य कर व मला अर्पण कर अशी आज्ञा केलीव नंतर राजानें हें काव्य रचिलें असें या काव्यांतच सांगितलें आहे. या काव्यांत कवीचें उभयभाषाप्रावीण्य उत्तम रीतीनें व्यक्त होत आहे हें खरें. पण यामुळें काव्य येथून तेथून नारिकेलपाकांत उतरलें आहे. फार मेहनत घेऊन वाचणार्‍यास हें काव्य फार आनंददायक आहे यांत संशय नाहीं. कृष्णदेव राजास आंध्र भाषेविषयीं फार अभिमान असे. यानें आपल्या महाकाव्यांत स्वप्नांतल्या देवाकडून ''देशभाषलंदु तेनुगु लेस्सा'' म्हणजे ''सर्व देशी भाषात तेलगू श्रेष्ठ होय'' असें वदविलें आहे.

अल्लसान्नि पेद्दन्ना— कृष्णरायाच्या सभेंतील सर्व कवींत हा अग्रगण्य होय. ''मनुचरित्र'' नामक प्रख्यात प्रबंध रचून यानें राजास अर्पिला व त्याच्यापासून ''आंध्रभाषापितामह'' अशी पदवी मिळविली. राजास याच्याविषयीं फार पूज्यबुद्धि होती. एकदा सभेंत यानें राजाच्या सांगण्यावरून बत्तीस चरणांची कविता कशी असावी या विषयावर एक उत्पलमालिका एकदम रचिली.

मनुचरित्रांत स्वारोचिष मनूच्या उत्पत्तीची कथा आहे. ही लहानशी कथा मार्कडेयपुराणांतून घेऊन त्यावर हें महाकाव्य रचलेले आहे. आंध्र विद्यार्थ्यांस शिकाव्या लागणार्‍या पंचकाव्यांत हें पहिलें काव्य आहे. रघुवंश किंवा कुमारसंभव यांच्या बरोबरीची याची योग्यता आहे.

नंदितिम्मना— हा पारिजातापरहण नामक मधुर काव्याचा कर्ता. हें काव्य यानें कृष्णरायास अर्पण केलें आहे. हा कवि सुंदर कवित्वाविषयीं फार प्रख्यात आहे. कृष्णरायकालीन सर्व कवींत ''मुद्दुपुलुकु'' म्हणजे '' गोड बोलणारा'' म्हणून याची फार ख्याति होती.

परिजातापहरण काव्यांत असा कथभाग आहे कीं, एकदां कृष्ण रुक्मिणीच्या महालांत तिच्याबरोबर द्यूत खेळत बसला होता. इतक्यांत कलहभोजन मुनि-नारद यांची स्वारी तेथें प्राप्‍त झाली. त्यानें नंदनवनांतून आणलेलें एक पारिजाताचें पुष्प कृष्णास दिलें. तें कृष्णानें रुक्मिणीस दिलें. त्यावर मुनि रुक्मिणीस म्हणाले ''तुझ्या सर्व सवतींपेक्षां कृष्णास तूंच अधिक प्रिय आहेस हें आतां यावरुन स्पष्ट होत आहे. सत्यभामेस मी नवर्‍याची आवडती असा जो गर्व होता तो आतां पार नाहींसा होईल.'' असें बोलून नारद चालते झाले. हा सर्व प्रकार तेथें असलेल्या एका दासीनें सत्यभामेंस कळविला. तेव्हां ती रागवून मलिनवस्त्र परिधान करून कोपगृहांत जाऊन निजली. नंतर कृष्ण तिच्या मंदिरांत गेला. नेहमींप्रमाणें भामा केलीगृहांत नसल्यामुळें तो कोपगृहांत गेला. तेथें त्या दंपतीचा झालेला प्रणयकलह कवीनें इतक्या स्वाभाविक व गोडरीतीनें वर्णिला आहे कीं तसलें वर्णन कोणत्याहि भाषेंत अजरामर झालें असतें. कितीहि समजावून सांगितलें तरी जेव्हां भामेचा कोप जाईना तेव्हां कृष्णानें तिला साष्टांग नमस्कार केला; तरी ती शांत न होतां त्यास वामपादानें दूरसारती झाली ''एका पारिजात पुष्पाची बिशाद ती काय; तुझ्याकरितां नंदनवनांतून पारिजात पुष्पांचा वृक्षच आणीन'' असें शेवटीं जेव्हां कृष्णानें कबूल केलें तेव्हां तिचा राग शांत झाला. नंतर तिला बरोबर घेऊन कृष्ण स्वर्गास गेला व इंद्रादिकांशीं युद्ध करुन पारिजात वृक्ष घेऊन आला अशी या सुरस काव्यांतील कथा आहे.

या काव्याच्या उत्पत्तीविषयीं एक मजेदार गोष्ट आहे. एकदां कृष्णरायाची राणी जी चिन्नादेवी ती कांहीं कारणाने रायावर रागावली. रायानें तिला पुष्कळ समजाविलें पण ती शांत झाली नाहीं. राय शेवटीं तिच्या पायीं पडला तरी त्यास धुडकावून लावून ती तेथून चालती झाली; हा सर्व प्रकार जरी प्रणयकलहसंबंदीं होता तरी, नमस्कार केल्यावरहि आपणांस लाथ मारून निघून गेल्यामुळे तिचा रायाला फार राग आला व त्यानें त्या दिवसापासून तिच्याशीं बोलणें सोडून दिलें. अशा रीतीनें कित्येक दिवस गेल्यावर ही गोष्ट प्रस्तुत कवि जो तिम्मन्ना त्यास समजली. तेव्हां त्यानें राजाचा राणीवरचा राग जाण्यास हें काव्य रचिलें. त्यांतला कृष्णसत्यभामेचा प्रेमकलह, विशेषतः भामेकडून पायीं नत झालेल्या कृष्णास झालेली संभावना वाचून कृष्णराय उमजला; काव्यांतला तोच भाग सुंदर स्वभावोक्तींनीं भरलेला आहे अशी त्यानें कवीची तारीफ केली.

धूर्जटि— हा एक रसिकशिरोमणि महाकवि आहे. याची ग्रंथसंख्या जर फार असती तर यास आंध्र भाषेचा मिल्टन म्हणण्यास कांहीं हरकत नव्हती. सर्वसाधारण किंवा तुच्छ वाटणार्‍या विषयांचें सर्वांस अत्यंत चित्ताकर्षक होईल असें वर्णन करण्यांत हा फार कुशल होता. अरण्यांतल्या भिल्लभिल्लिणीचें तसेंच त्यांच्या झोंपड्याचें फारच सुंदर वर्णन याच्या काव्यांतून आढळतें. मिल्टनच्या कवितेप्रमाणेंच याची कविता देखील फार गंभीर व उदात्तरसपूर्ण असते. पण याच्या कवितेची संख्या फारच थोडी आहे. हा मोठा शिवभक्त होता. मोठा भक्त व कवि अशी याची प्रख्याति होती. ''याची कविता अतुलितचातुरीमहिमान्वित असते'' असें कृष्णदेवरायानें म्हटलें आहे. कवितेंतील गुणावगुण ओळखण्यांत हा मोठा कुशल असल्यामुळें यास रसिकाग्रणीहि म्हणत. पण वारवनितेशीं संबंध असल्याशिवाय रसिकता प्राप्‍त होऊं शकत नाहीं अशी जुन्या लोकांची चमत्कारिक समजूत असल्यामुळें हा वेश्यांगनालोलुप होता अशी दंत कथा पडली आहे. पण हा भक्तीविषयीं फार प्रख्यात असल्यामुळें या दंतकथेवर सबळ प्रमाणाशिवाय आमचा विश्वास बसूं शकत नाहीं.

मादयगारिमल्लन्ना— पारिजातापहरण कर्त्याचें व याचें कवित्व अगदीं एकसारखें आहे. याच्या काव्यांत आणखी एक असा विशेष आहे कीं इतर काव्यांत ज्याप्रमाणें हा अमुक एक भाग इतर भागापेक्षां उत्तम असें दाखविण्यास त्रास पडतो त्याप्रमाणें याच्या काव्यांत सर्व भागापैकीं कमी सुंदर भाग कोणता हें शोधून काढणें मोटें मुष्किलीचें काम आहे. म्हणजे पहिल्यापासून तो शेवटपर्यंत एकसारखी सुंदर शैली आहे. म्हणून कित्येक भागांच्या सौंदर्याविषयीं प्रख्यात असलेल्या पारिजातापहरणकारापेक्षां हा कवि विशेष प्रशंसनीय होय यांत संशय नाहीं. या कवीच्या काव्याचें नांव राजशेखरचरित्र. हा कवि मुक्कुतिम्मन्नाइतका विख्यात झाला नाहीं याचें कारण हेंच की पारिजातापहरणाप्रमाणे यानें आपलें काव्य कोणा मोठ्या राजास अर्पण केलें नाहीं. हें काव्य अनेक वेळां वाचलें तरी तें हातीं घेतल्याबरोबर पुन्हां वाचल्याशिवाय रहावतच नाहीं असें के.व्ही.लक्ष्मणराव म्हणतात.

आंध्र कवींच्या अनेक सुदंर आंध्रकाव्यांविषयीं येथें एक सांगितलें पाहिजे कीं यांतल्या काव्यरचनेइतकें कथानक सुंदर अन्यत्र नसतें. या कविश्रेष्ठांस जर सर वाल्टर स्कॉटच्या काव्यांतल्या कथानकाप्रमाणें उत्तम कथानकें मिळालीं असतीं तर हीं काव्यें सार्‍या जगांत अद्वितीय झालीं असतीं असें म्हणणें अथीशयोक्तांचें होणार नाहीं. या कवींचीं कथानकें म्हटलीं म्हणजे पुराणांतील राजे, राजकन्या, देवासुर, यक्ष राक्षस यांच्या कथा होत असेंहि के.व्ही. लक्ष्मणारावांनीं आपलें मत नमूद केलें आहे.

रामभट— यानें सकलकथासारसंग्रह नामक काव्यरचिलें. हें यानें कृष्णरायाच्या आज्ञेवरून सुरु केलें. त्या वेळच्या कवित्वाच्या मानानें हें काव्य विशेष प्रशंसनीय आहे असें नाहीं. रामाभ्युदय नामक आणखी एक काव्य यानें रचिलें आहे, तें चांगलें उतरलें आहे.

रामराज भूषण— हा जातीचा भाट. याची जात सांगण्याचें कारण असें कीं आंध्र भाषेंत ब्राह्मणेतर प्रख्यात कवि हा एकटाच. याला रामराजभूषण असेंहि दुसरें नांव आहे. याचे प्रख्यात ग्रंथ-वसुचरित्र, हरिश्चंद्रनलोपाख्यान व नरस भूपालीय. यापैकीं वसुचरित्र फारच प्रख्यात आहे. हें आंध्रकाव्यपंचकांतलें एकआहे. हें सर्व तर्‍हेनें माघकृत शिशुपालवधाच्या तोडीचें आहे. पदोपदीं श्लोकांत संपूर्ण श्लेष साधल्याशिवाय कवीच्यानें राहवलें नाही. यांतील वर्णनें फार आल्हादकारक, रसभावादि यथायोग्य आहेत. या काव्यांतील पद्यें म्हणजे साहित्यशास्त्रांतल्यां रसप्रकरण, भावप्रकरण, अलंकारप्रकरण, इत्यादिकांकरितां तयार केलेलीं उत्तम उदाहरणेंच कीं काय असा भास होतो. याचें दुसरें काव्य हरिश्चंद्रनलोपाख्यान हें संपूर्ण द्वयर्थी काव्य आहे. या काव्यांत हरिश्चंद्राची व नलाची अशा दोन कथा आहेत. असलीं काव्यें क्लिष्ट असतात व विशेष रम्य नसतात हें खरें. पण शद्वार्थज्ञानजिज्ञासु विद्यार्थ्यांच्या सोईकरितां प्रौढ वाङ्‌मयांत असलीं एक दोन तरी काव्यें असलीं पाहिजेत. या कवीचा तिसरा ग्रंथ नरसभूपालीय होय. हा साहित्यशास्त्राविषयींचा ग्रंथ आहे. नरसराजनामक संस्थानिकास अर्पण केल्यामुळें या ग्रंथांस हें नांव पडलें आहे. हा ग्रंथ मुख्यतः ओरगल येतील विद्याधर कवीनें केलेल्या प्रतापरुद्रीय नामक साहित्यग्रंथाच्या आधारें रचिला आहे.

पिंगली सुरन्ना— हा कवि मुख्यतः राघवपांडवीय नामक संपूर्ण द्वयर्थी काव्याबद्दल प्रख्यात आहे. या राघवपांडवीय काव्यांत रामाची व पांडवांची अशा दोन कथा वर्णिल्या आहेत. या काव्याशिवाय या कवीचीं कलापूर्वोदय व प्रभावतीप्रद्मुम्न अशीं दोन काव्यें आहेत. या काव्यांची रचना पारिजातापहरण व राजशेखर चरित्र या काव्यांच्या धोरणावरच आहे. म्हणूनच हीं काव्यें देखील रसिकप्रिय झालीं आहेत. रायानंतर हा साठ सत्तर वर्षांनीं उदयास आला. राघवपांडवीय या काव्याचा असा चमत्कार आहे कीं, हें द्वयर्थी असूनहि क्लिष्ट नाहीं. मोरोपंत समजण्यास मराठीचें जितकें ज्ञान पाहिजे तितकें तेलंगीचें असलें म्हणजे या काव्याचे दोनहि अर्थ समजतात. हें काव्य अक्लिष्ट असल्यामुळेंच या काव्याची व या कवीची आंध्रदेशांत फारच ख्याति आहे.

तेन्नालि रामकृष्ण— या कवीस रामलिंग असेंहि नांव आहे. हा पांडुरंगविजय नामक काव्याचा कर्ता. पदगुंफनाविषयीं याची विशेष ख्याति आहे. कविजनांत हा कवि जरी पांडरंगमाहात्म्याविषयीं प्रख्यात आहे तरी सामान्यजनांत तकल्या व थट्टेखोर म्हणून याची ख्याति आहे. रोज कोणाची तरी थट्टा फजिती केल्याशिवाय यास चैनच पडत नसे. कित्येक प्रसंगीं राजपुत्र व राजकन्या यांचीहि थट्टा करण्यास यानें मागेंपुढें केलें नाहीं. राजाच्या दरबारीं अप्पयादीक्षित व ताताचार्य असे दोघे विद्वान होते. रामकृष्ण हा अप्पयादीक्षितांचा शिष्ण होता. ताताचार्यांच्या शिष्यांनीं आपले गुरु दीक्षितापेक्षां अधिक पूज्य असें म्हटलें म्हणून रामकृष्णांनीं त्यांची फजिती केली. याच्या काव्यांत अर्थकाठिण्य फार आहे अशी सामान्य जनांची समजूत आहे, पण ती खरी नव्हे. त्या कालच्या कवित्वाप्रमाणेंच याचेंहि कवित्व फार हृदयरंजक आहे.

नृसिंह कवि— हा कवि कर्णरसायन नामक मांधातृ-चरित्राचा कर्ता. हा कृष्णरायाचा समकालीन होता. हा आपलें सुंदर काव्य घेऊन रायास अर्पण करण्याच्या उद्देशानें विजयनगरास गेला व राजाची भेट करविण्याविषयीं मनुचरित्राचा कर्ता जो अलतान्नि पेदन्ना त्याची प्रार्थना करूं लागला. पण याच्या सुंदर काव्यापुढें आपलें काव्य फिक्कें पडेल अशी यास भीति पडल्यामुळें त्यानें रायाची व नृसहिंकवीची भेट करून दिली नाही. अशा रीतीनें उद्विग्न झालेल्या त्या कवीनें खाण्यास कांहीं नसल्यामुळें जातां जातां त्या काव्यांतली एक कविता विकली. हें काव्य इतकें सुंदर होतें कीं ह्या कवीच्या मरणानंदतर कांहीं कारणानें रायास ती कविता समजली तेव्हां असलें उत्तम काव्य आपल्या हातून गमाविलें म्हणून रायास वाईट वाटलें. या कवीची काव्याच्या प्रारंभी अशी प्रौढी आहे की ''माझ्या काव्यांतील शृंगारवर्णन ऐकून यति विट झाल्याशिवाय राहणार नाहीं व वैराग्यवर्णन ऐकून विट यति झाल्याशिवाय राहणार नाहीं.''

कुमारधूर्जटि— हा मोठ्या धूर्जटीचा नातू. यानें कृष्णदेवरायविजय नामक ऐतिहासक काव्य रचलें आहे. या काव्याची संपूर्ण शुद्ध प्रत कोमासहि मिळाली नाहीं. हें काव्य या दृष्टीनें उत्तमच आहे. पण इतिहासकारांसहि याचा उपयोग होण्याचा संभव आहे. यांत कित्येक अतिशयोक्तीचे भाग आहेत हें खरें. पण फेरिस्तादिक इतिहासकारांनीं लपविलेला इतिहासाचा कांहीं भाग यांत आहे असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं.

वैंकय्या— यानें रामराजीय उर्फ नरपतिविजय नामक काव्य रचिलें. हें काव्य इतिहासकारांस उपयोगांचें आहे. यांत कृष्णरायांचा जांवई रामराजा जो तालीकोटच्या लढाईंत पडला त्याचें व त्याच्या पूर्वजांचें चरित्र वर्णिलेलें आहे.

अहंकिगंगाधर— हा तपतीसंहारणोपाख्यानाचा कर्ता यानें आपलें काव्य गोललोंढा ज्यास महाराष्ट्र लोक गोवळकोंडे म्हणतात— तेथींल नवाब जो इब्राहीम मुल्क त्यास अर्पण केलें आहे. याचा वडील भाऊ गादीवर असतां त्याच्या भीतीनें हा रामराजाच्या आश्रयास विजयनगरास जाऊन राहिला. तेथें रामराजभूषण इत्यादि आद्य कवीची व याची मैत्री जमून यानें आंध्रभाषेचा अभ्यास केला. तेव्हांपासून हा आंध्र भाषेचा व आंध्र कवींचा मोठा आश्रयदाता बनला.

मोल्ला— ही आंध्र भाषेतील एक कवयित्री आहे. ही जातीची कुंभारीण. पण हिची कविता मात्र ब्राम्हणासहि लाजविण्यासारखी आहे. शुद्ध भाषा लिहिण्यांत ही पंतांस हार जाणारी नव्हे. शुद्ध भाषा व स्पष्ट विचार हे हिचे विशिष्ट गुण आहेत. शार्दुलादि सर्व प्रौढ वृत्तांचा तिनें उपयोग केलेला आहे. हिचें रामायन ''मोल्लरामायण'' या नांवानें प्रसिद्ध आहे.

बालसरस्वती— हा एक मोठा वैय्याकरण व कवि होता. याचें विशेष प्रख्यात असें काव्य म्हटलें म्हणजे ''राघव यादवपांडवीय'' हें होय. हें संपूर्ण त्र्यर्थी काव्य आहे. यांत रामायणाची, महाभारताची व भागवताची अशा तीन कथा आणिल्या आहेत. या कवीचें चंद्रिकापरिणय नांवाचें एक काव्य आहे. तें निजामशाहींतील परितियाल येथील वेंकटाद्रि राजास अर्पण केलें आहे.

''राघवयादवपांडवीय'' हें काव्य दोन अर्थ करण्यांत विशेषं क्लिष्ट नसून तिसरा अर्थ करण्यांत बरेंच क्लिष्ट असें आहे. असलें काव्य रचणें फार श्रमाचें व विद्वतेचें काम आहे यांत संशय नाहीं.

कूचिमंचितिम्मकवि— अठराव्या शतकाच्या प्रारंभीं झालेला हा एक मोठा कवि होय. इतर कवींपेक्षां याची ग्रंथसंख्या फार आहे. आजपर्यंत याचे ग्रथ मिळाले आहेत ते— रुक्मिणीपरिणय, राजशेखरविलास, सिंहशैलमाहात्म्य, नीलसुंदरीपरिणय, रसिकजनमनोभिराम, सर्पपुरमाहात्म्य, शिवलीलाविलास, शुद्धांध्ररामायण व लक्षणसारसंग्रह.

वरील ग्रंथांपैंकीं शेवटचा ग्रंथ व्याकरणछंदोविषयावरचा ग्रंथ आहे. शुद्धांध्ररामायणांत पहिल्यापासून शेवटपर्यंत एक संस्कृत (तत्सम) शब्द सांपडावयाचा नाहीं. ग्रंथांत तद्भव व देश्य शब्दच असावयाचे. शुद्धांध्र काव्यास आंध्रभाषेंत पहिल्यापासूनच फार महत्त्व आहे. असलें काव्य रचणें फार विद्वत्तेचे काम आहे. असल्या कवीस शुद्धांध्रकोश व तद्भवाचे नियम इत्यादिकांची चांगली माहिती पाहिजे. भाषावेत्यांस याचा विशेष अभ्यास करावा लागतो.

कूचिमंचिजग्गकवि— हा कूचिमंचि तिम्म कवीचा धाकटा भाऊ. हा उत्तम प्रकारचा कवि म्हणून प्रख्यात आहे. या कवीचें शापकवित्वाविषयीं एक काव्यच आहे. या काव्याचें नांव चंद्ररेखाविलाप. या काव्याच्या उप्तत्तीची कथा कांहींशीं चमत्कारिक आहे. विजयनागरच्या राजाचा मेहुणा जो नीलाद्रिराजा त्यानें या कवीस बोलावून आपली वेश्या जी चंद्ररेखा तिला नायिका कल्पून आल्यावर एक काव्य रचण्यास त्यास सांगितलें. त्यावर कवीनें चंद्ररेखाविलास नामक शृंगारपरकाव्य रचून आणलें. पण राजानें त्याची योग्य संभावना केली नाहीं. त्यामुळें कवीस फार राग येऊन त्यानें तें काव्य फाडून टाकलें व चंद्रशेखरविलाप नामक दुसरें एक काव्य रचिलें. ह्या काव्यांत त्या राजाची खूप निंदा केली आहे. याशिवाय या कवीचं सुभद्रापरिणय व सोमदेवराजीय अशीं दोन काव्यें आहेत. चंद्रशेखरविलाप नामक काव्य एकंदरींत म्याकफ्लाकने व ''डान्सिअड'' इत्यादि काव्यांप्रमाणें एक थट्टेचें काव्य आहे.

मुद्दुपळनि— ही कवयित्री राधिकासांत्वन नांवाच्या काव्याची कत्रीं. ही जातीची वेश्या. ही तंजावर येथील प्रतापसिंहमहाराजाच्या पदरची वेश्या होती असें समजतें. तंजावरचा प्रतापसिंह इ.स. १७६५ च्या सुमारास मरण पावला. म्हणून ही इ.स. १७६० च्या सुमारास तंजावरास होती असें वाटतें. ही संगीत, साहित्य व भरतशास्त्रांत फार प्रवीण होती. हिचें राधिकासांत्वन काव्य फार गोड आहे. पण जातीची वेश्या असल्यामुळें सभ्य गृहस्थांस व कुलीन स्त्रियांस वाचण्यास अयोग्य अशीं वर्णनेंहि हिनें आपल्या काव्यांत केलीं आहेत. एकंदर हिचें कवित्व फार प्रशंसनीय आहे. संस्कृत व आंध्र शब्द जणू काय हिच्या ताब्यांत आहेत.

हिच्या काव्यांतून उदाहरणादाखल संबोधनप्रचुर व संस्कृतशब्दभूयिष्ठ एक असें पद्य मत्तेभविक्रीडित वृत्तांतील उतरून घेतो—

यमुनातीरविहार । हारसदृशोद्यत्कीर्तिसंभार । भा—
रमणीयाकृतिभार । मारसिकताप्रावीण्यसंसार । सा—
रमरंदोक्तिविचार । चारणमदप्रख्यातविस्तार । ता—
रमहीभुत्समधीर । धीरमुनिवाराधार । राधारता ।

तीरगोंडवेंकम्मा— ही एक ब्राह्मणी कवयित्री. ही लहानपणींच विधवा झाली. तेव्हांपासून ही ईश्वरभजनांत वेळ घालवीत असे. हिचे सांप्रत दोनच ग्रंथ उपलब्ध आहेत. (१) वेंकटाचलमहात्म्य व (२) राजयोगसार. वेंकटाचल महात्म्यांत गिरीच्या बालाजीची कथा मोठ्या सुंदररीरतीनें वर्णिलेली आहे. राजयोगसारांत भागवतपुराणांतर्गत कपिल देवहूतासंवाद वर्णिलेला आहे. हिच्या कवितेचा उत्पलमाला वृत्तांतील थोडासा मासला येथें देतो.

रामनृपाल । घोरतररावणशौर्यविफाल । भव्यसुश्राम-सुरार्ययोगिजनतापसपाल । कृपालवाल । श्रीभूमिसुतात्मलोल । परिपूर्णसूकीर्ति विशाल । इत्यादि इत्यादि.

सुभद्रम्मा— हिनें जरी कोणतेंहि काव्य रचिलें नाहीं तरी हिचीं बरींच शतकें प्रसिद्ध आहेत. रघुनायकशतक, केशवशतक, कृष्णशतक व राघवरामशतक हीं हिचीं शतकें होत. हिचा जन्म इ.स. १८८१ त झाला. ही राजा गोडे नारायण गजपति यांची आत होय. हिची उत्पालमाला वृत्तांतील एक कविता देतों.

श्रीरमणीकळत्र । सरसीरुहनेत्र । जगत्पवित्र । सत्सारसवृंदमित्र सुरसन्नुतिपात्र । नरेंद्रपुत्र । शृंगारसमगत्रगात्र । जनकर्मविदारण कृच्चरित्र । श्रीनारदमौनिगीतचरणा । रघुनायक । दीनपोषक । (के.व्ही. लक्ष्मणराव, वि.ज्ञा. पु. ३२)

तेलगू गाण्याचा नमुना— तेलगू पदें ऐकण्याला फार गोड असतात. पण त्यांचा अर्थ ती भाषा नं कळणारांनां समजणारा नसल्यानें अर्थासहित कांहीं पद्यें दिलीं आहेत. वीरमेडपि नगरींत ब्रह्मनायनाचा पुत्र बालचंद्र हा बापाला मदत करण्यास लढाईवर जाण्याची परवानगी असावी म्हणून अयितम्मा नामें आपल्या आईची विनवणी करूं लागला. परंतु तत्क्षणींच पुत्रवियोगांचें चित्र डोळ्यासमोर उभें राहिल्यानें त्या माउलीच्या हृदयांत कालवाकालव सुरु होऊन व तज्जन्य दुःख तिला सहन न होऊन तिनें रडून रडून आकांत केला. तेव्हां बालचंद्रानें आपल्या पूज्य मातेचें खालील शब्दांनीं शांतवन केलें.

''निवेरुंगनि धर्ममेनेरुंगुदुने । प्राकृतभामल पगिदिबल्केदवु । वेर्रितनंवेल वीरुनिपतिकि । गायमनित्यंबु कल्मिहुळक्कि । जलबुद् बुधविधंबु क्षणभंगुरमुलु । षट्चक्रवर्तुलु सकल भूपतुलु । चरिनिब्रह्मेन्द्रादि सर्व देवतलु । भूतंबुलैदुनु बोलियुचुनुंडु । शौर्यसत्कीर्तुलु समयवेन्नटिकि । सकलपुराणमुल् सद्धर्मकथलु । नीति शास्त्रंवुलु नीवेरुंगुदुवु । पौरुषाधिकतचे ब्रतुकुटलेस्स । जननमरणमुलु जनुलकुनिक्का मालयंबुननुन्न नडविलोनुन्न । दप्पक तार्कोनु तथ्यंबुगानु (दध्यंबुगानु) पुण्यलोकंबुनु पोन्दु मार्गमुल । तिनिपिंतुने तल्लि विशदंबुगानु । सज्जनसंगति संसार मेडल । गुरुवुबोधिंचिन गुरिमीदमनसु । निलिपिनरणमोंदु निश्चयुडोकडु । प्राज्य साम्राज्य संरक्षण मंदु । धनरणम्मुन रोम्मुगायानोंद । मनसुचलिंपक मरणंबुनोन्दु । शौर्यपराक्रमसंपन्नडोकडु । वीरलिद्दरु लेस्स विनुवीधिकेगि । यादित्य मंडलं बरुदारजिंचि । पोयि पुण्यंबुल भूमिजेंदुदुरु । मोदटि कार्यमु बूनू मुख्यतलेदु । शौर्यंबुचे माकु संपाद्य मगुनु ।''

अर्थ— तुला कळत नाहीं. तो धर्मच मला कळतो ग आई । अडाणी बायांसारखे उगीच काय बोलतेस. वीरपतीला वेड कोठलें ? काया अनित्य आहे. जीवित, श्रीमंती, पैसा अडका हा सर्व मिथ्याभास आहे, हे सर्व पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणें क्षणभंगुर आहेत. सारे षट्चक्रवर्ती राजे गेले; ब्रह्मा, इंद्र आदिकरून सकल देवता, तशींच हीं पंचमहाभूतें लयाला जाणारीं आहेत. शौर्य गाजवून सत्कीर्ति मिळवून मरण आलें तर त्याला शाश्वति आहे. सर्व पुराणें, सद्धर्मकथा, नीतिशास्त्रें तूं जाणतेस, पौरुषाधिक्यानें जगणें बरें. मनुष्याला जन्मरण हीं चुकावयाचीं नाहींत, मग तो एखाद्या रानावनांत असो, का एखाद्या लहानशा सांदीकोपर्‍यांत असो. ह्यांतलें सार तूं जाण म्हणजे झालें. आई, मला तूं पुण्यलोकप्राप्‍तीचे मार्ग विशद करून सांग. या संसारांत सज्जनसंगति लागून गुरुपदेशाप्रमाणें गुरुला मन अर्पण करून मरण प्राप्‍त करुन घेणारा खात्रीनें एकादाच सांपडतो. असा प्राणी फार विरळा. तसेच अनेक साम्राज्यांच्या संरक्षणाच्या कामीं मोठमोठाल्या रणसंग्रामांत मनाची चलबिचल न होऊं देता छातीठोकपणें शत्रूला तोंड देऊन शौर्य पराक्रम गाजवून मरण संपादन करणारा पुरूषहि एकादा दुसराच. हे दोन्हीं प्रकारचे लोक गगनमार्ग आक्रमून आदित्यमंडळ बरोबर जिंकून पुण्यभूमीवर वस्ती करतात. तूर्त आपल्या दृष्टीनें पाहिलें असतां पहिल्या प्रकाराला प्राधान्य देतां येत नाहीं. आपल्याला शौर्यसंपादनाकडेच पाहिलें पाहिजे. अशा प्रकारें शांतवन केलें.

एक वीरपत्‍नी आपल्या पतीला रणांगणावर जाण्यास निरोप देत आहे—

''रतिराज सौन्दर्य रणरंगधीर । कमलबांधवतेज करुणाल-वाल । विनतात्मजुनिलावु वेसनीकु गलगु । सामीरि सममैन साहसम्बब्बु । गृष्णुनि केनयैन कीर्ति घटिल्लु । रविकांतियुतुडवै रंजिल्लुर्चुडि । यलराजु पगदीर्पु मनुजुल तोड । पटुतर विक्रम प्रौढिम मेरय । श्रीगिरलिगुंबु जेन्नकेशवुडु । वरमुलोसंगग वर्घिल्ल गलरु । शास्त्रच बिजयंबु समकूरु मीकु । नीयायुघमु वडि निच्चुसुजयमु । कलियुगंबुन मीकु घनपूजल मरु ।''

अर्थ— ''हे रतिराजसुन्दरा, रणरंगधीरा, कमलबांधव तेजा, करुणालया, गरुडाचें अतिचापल्य तुला लाभो ; हनुमन्तासारखे अचाट पराक्रम तुजकडून घडोत, कृष्णाप्रमाणें तुझी कीर्ति होवो. रविकांतियुत होऊन सर्वांनां आनंद देऊन अलराजाच्या कलहाचा शेवट लाव । मनुजांबरोबर पटुतर पराक्रम करुन आपली मर्दुमकी गाजीव. श्रीगिरिलिंगाचा व केशवाचा तुमच्यावर वरदहस्त असला म्हणजे तुमची फत्ते होईल, शत्रूवर तुम्हाला जय मिळेल, तुमच्या आयुधांनां लवकर यशप्राप्ति होईल; मग कलियुगांत तुम्हाला सर्व भजूं लागतील.''

दुसर्‍या तेलगू संमेलनाच्या आरंभीं म्हटलेल्या पद्यांत पुढील तेलगू राष्ट्रगीतें होतीं—

अन्निर्देशमुलंदु नान्धनिर्मितमुलौ,
वस्तुजाम्मुलु वरलुचुण्ड.
अन्निर्देशमुलंदु नान्ध्रुलशौर्यामि,
विमल तें जंबुतो वेलुगुचुण्ड,
अन्निर्देशमुलंदु नाध्रुमाषायेषिं,
यद्भुतंबुगनाट्या माडुचुण्ड.
अन्निर्देशमुलुंदु नान्धुलसुगुणालि,
परमप्रशंसनु बडयुचुण्ड ॥

अर्थ— सर्व देशांत आंध्रनिर्मित वस्तुजातांचा (आन्ध्रांनीं तयार केलेल्या वस्तूंचा) प्रसार होवो. सर्व देशांत आन्ध्राशौर्याग्नि विमल तेजानें प्रकाशमान होवो; सर्व देशांत आन्ध्राभाषा (रुपी) योषिता (स्त्री) अद्भुत नृत्य करो; सर्व देशांत आन्ध्रांच्या श्रेष्ठ गुणांची परम प्रशंसा होवो.

गांचु सौभाग्यमेन्नडु गल्गुनोक्को,
यंचुदमितो निरीक्षिंचे नाध्रमात ।
नल्लिकोंरिक नेरवेंर्चि  धन्युलगुडु,
अमलसुगणसान्दुलार । यो यांध्रुलार ॥
 
अर्थ— अहो, अमलगुणसंपन्न आन्ध्रजनहो । आपल्याकडे उत्सकतेनें पहात असलेल्या आन्ध्रामातेच्या इच्छा पूर्ण करून आपण धन्य झालों हें बघण्याचा सुदिन आपणांस केव्हां येईल.

रत्‍नम्मुलनुराज रत्‍नम्मुलनुगत्र, यांध्रमातकुजय-मगुनुगात । संघसंस्कर्तल सद्वक्तलनुगन्न, यांध्रमातकुजय-मगुनुगात । विद्यानुरक्तुल विविधभक्तुलगन्न, यांध्रमाताकुजयमडुनुगात । मानवन्तुलनु विज्ञानवन्तुलगन्न, यांध्रमाताकुजय-मनुगुगात ॥

अर्थ— जी रत्‍नगर्भा आंध्रमाता राजरत्‍नें प्रसवली, त्या आंध्रमातेचा जयजयकार असो, ज्या आंध्रमातेच्या उदरीं संघसंस्कर्ते व सद्वक्ते निर्माण झाले, त्या आन्ध्रामातेचा जयजयकार असो; ज्या आंध्रमातेच्या उदरीं नाना प्रकारचे भक्त व विद्यानुरक्त विभूती जन्मास आल्या, त्या आन्ध्रमातेचा जयजयकार असो; ज्या आन्ध्रामातेनें अनेक मानी पुरुषांनां व ज्ञानवंतानां जन्म दिला; तिचा जयजयकार असो.

तेलगूंच्या वाङ्‌मयासंबंधानें विचार करतां आपल्यापुढें अनेक प्रकारची दृष्टि उत्पन्न होते. संस्कृत भाषेंत जी महत्वाची ग्रंथरचना झाली तींत आंध्रांनीं काय भर घातली ही तेलगूंच्या ग्रंथरचनाशक्तीची मोजदाद करण्याची एक बाजू झाली व त्यांनीं स्वकीय भाषेंत ग्रंथरचना काय केली हें पाहणें ही दुसरी बाजू झाली. या दोन्ही बाजूंनीं माहिती दिली म्हणजे तेलगू राष्ट्राचें वाक्कौशल्य बर्‍याच अंशीं दिल्यासारखें होईल. श्रौतसंस्थांमध्यें शाखाभेद उत्पन्न होत होता त्या कालापासून आंध्रांची कामगिरी देतां येते हें आंध्र राज्यांतील आपस्तंबाच्या उदाहरणावरुन देतां येईल. द्राविडांत अनेक आचार्य होऊन गेले. दक्षिणेंत नवीन अनेक विचारपद्धती उत्पन्न झाल्या आणि त्यांचा प्रसार उत्तरेकड झाला. प्रसंगीं असले जे मोठे कार्यकर्ते पुरुष होऊन गेले त्यांनीं देशीभाषेंत जरी संवाद आणि व्याख्यानें दिलीं असलीं तरी ग्रंथरचना संस्कृतमध्यें केली. अनेक द्राविड आणि आंध्र पंडित जन्मानें जरी दक्षिणेकडले असले तरी त्यांचें कार्यक्षेत्र उत्तरेकडेच झालें. वल्लभाचार्यांचें उदाहरण अशांतलेंच आहे. तेलगु वाङ्‌मयाचे जे इतिहास आज प्रसिद्ध आहेत त्यांत तेलगूंतील धार्मिक, बौद्धिक व सामाजिक चळवळींचा व संस्कृत व देशी वाङ्‌मयांशीं अन्योन्याश्रय दिला नाहीं व जे इतिहासकार झाले आहेत त्यांस एखंदर भारतीय वाङ्‌मयाशीं क्वचितच परिचय असतो, आणि त्यामुळें त्यांस आपल्या वाङ्‌मयांतील नाविन्यहि चांगल्या तर्‍हेनें मांडतां येत नाहीं. दक्षिणेकडे आर्य संस्कृतिसंवर्धन जें संस्कृत ग्रंथांमार्फत झालें त्याचें विवेचन हा प्रकृत विषय नसल्यामुळें केवळ तेलगु भाषेंतीलच वाङ्‌मयाकडे वळतों.

तेलगूवाङ्‌मयाची भारतीय वाङ्‌मय दृष्टीनें योग्यता— तेलगू ग्रंथांत केवळ रामायण महाभारतादि पौराणिक ग्रंथापेक्षां नावीन्य काय आहे याचा शोद भारतीय वाङ्‌मय या दृष्टीने परीक्षण करतांना प्रथम झाला पाहिजे. या दृष्टीनें पहातां या वाङ्‌मयांत चार क्रिया झालेल्या दृष्टीस पडतात त्या येणेंप्रमाणें (१) पौराणिक कथासूत्रसंबद्ध, पण स्वतंत्र काव्यरचना; (२) स्थानिक इतिहासपर ग्रंथरचना; (३) नवलकथा किंवा ऐतिहासिक कादंबरी या दृष्टीनें ग्रंथरचना; (४) केवळ सामाजिक काव्यरचना. या दृष्टीनीं पाहिल्यास तेलगू लोकांच्या कवींचें विषयस्वातंत्र्य नजरेस येतें. अलसानी पेदन्नाचें स्वारोचिषमनुचरित्र जरी पुराणमूलक आहे तरी पुराणांतील तो अप्रसिद्ध विषय घेऊन त्यावर चरित्रग्रंथ गुंफिला आहे. स्थानिक देवतांवरील माहात्म्यग्रंथ सामान्यतः बरेच रडके असतात. पण धूर्जटीचें ''कलदृष्टिमाहात्म्य'' याची गणना काव्यग्रंथांत होते. ''वसुचरित्र'' हा देखील पुराणसंबद्ध पण कविस्वातंत्र्य दाखविणारा ग्रंथ होय. जितकी पुराणांतील कथा अपरिचित व दुय्यम प्रकारची तितकें कविस्वातंत्र्य जास्त ही गोष्ट तेलगू कवींनीं चांगली ओळखलेली दिसते. ''प्रभावती प्रदुमन'' या पिंगळी सुरन्नाच्या नाटकरुपी काव्याची गोष्ट अशीच आहे. यांत इंद्र व मातलि यांचा संवाद दिला आहे. तेन्नाली रामकृष्ण या विनोदी व्यक्तीस महाराष्ट्रांत प्रतिस्पर्धीच कोठें आहे ? सर्व परिचित विषय आंध्रकवींनीं सोडले असे नाहीं, पण त्यांतहि कांहीं वैयक्तिक कवित्व करण्यास साधन म्हणून वापरले आहेत. उदाहरणार्थ कृष्णराधासंबंध घ्या. मृदुपळिनि या वेश्येच्या ''राधिका सांत्वन'' या काव्यांत सभ्य स्त्रीपुरुषांस वाचण्यास अयोग्य असे प्रसंग व वर्णनें अनेक आहेत, असा आक्षेप तिच्यावर जे करतात तेच तिच्या भाषेच्या मोहकतेसंबंधानें व भाषाप्रभुत्वासंबंधानें पुरावा देतात. भाषेचे खेळ करणारी, मोहक काव्य करणारी आणि त्यांत अतिप्रसंग करणारी वेश्या कवियित्री कोणत्याहि भाषेस लाज आणणारी नाहीं. पुराणांतील व्यक्ती घेऊन त्यांच्या चरित्रास काल्पनिक कथांच्या पुरवण्या जोडल्याचीं उदा. हरणें तेलगू वाङ्‌मयांत अनेक आहेत. उदाहरणार्थ चेन्नमाचे चारुचंद्रोदय हें काव्य घ्या. यांत कृष्णास रुक्मिणीपासून चारुचंद्र नांवाचा मुलगा झाल्याचं कल्पिलें आहे आणि त्याचें पद्मकार राजाची मुलगी कुमुद्वती हिजबरोबर लग्न लावलें आहे. व्यंकट नरसय्या यानें देव माला चरित्र म्हणून जो प्रबंध लिहिला आहे त्यांतहि त्यानें तोच प्रकार केला आहे. ''वज्रदंत'' राक्षसाच्या नाशासाठीं देवमालाला ब्रह्मदेवानें उत्पन्न केलें आणि देवमालानें राक्षसाचा नाश केल्यावर देवांनां त्यास एक शहर व स्त्री दिली असा कथाभाग त्यांत आणिला आहे. मयासुराची कन्या शांता कल्पून तिचा सूर्याबरोबर विवाह लावणारें भानुकल्याण काव्य याच कोटींत घालतां येईल. ''ऐरावत चरित्रांत गांधारीनें इंद्राच्या ऐरावतास नैवेद्य दाखवितांनां कुंतीस बोलाविलें नाहीं त्यामुळें कुंतीचा अपमान झाला. तेव्हां कुंतीनें मुलांजवळ तक्रार केली. अर्जुनानें इंद्रास ऐरावत पाठविण्यास भाग पाडलें, व त्यावेळीं गांधारीस बोलावून तिला लाजविलें अशी कथा यांत आहे. यांत न बोलाविण्याबद्दल व्यक्तीचा अपमान कसा होतो, त्याचें उट्टें व्यक्तीनें कसें काढावें हा प्रकृत विषय असून त्याची मांडणी करण्यासाठी पौराणिक नांवांची जोड दिली आहे. भद्रराज चरित्रांत व्यंकटाचार्य कवीनें राजाच्या अद्भुत पराक्रमाच्या गोष्टी पुराणांतून न घेता स्वयंकल्पनेनें रचल्या आहेत. चंद्रभानुचरित्र हें कृष्णाचा सत्यभामेपासून झालेला मुलगा चंद्रभानु याच्या चंद्ररेखेवरील प्रीतिविषयीं काव्य आहे. रसानक विजयांत वृषपतीची पत्‍नी तारा हिचा चंद्रानें उपभोग घेतला त्यामुळें जी लढाई झाली तिचें वर्णन आहे.

याप्रकारचीं अनेक उदाहरणें देतां येतील. या तर्‍हेच्या अनेक गोष्टीचें अवलोकन करतां असें दिसतें कीं या पौराणिक कथांमध्यें कथित कथेचें देशी भाषेंत निरूपण हा हेतु प्रधान नसून वाटेल त्या विषयावर कविता करावी, वाटेल तें कथानक तयार करावें आणि तें कसेंतरी आणि कोणत्यातरी पौराणिक व्यक्तीस चिकटवून द्यावें असा त्या कवींचा हेतु दिसतो; आणि याचें कारणहि निराळें असावें. संस्कृत ग्रंथाचें ज्ञान म्हणजे पांडित्य, स्वतंत्र कविता करणारांनीं संस्कृत भाषेशीं परिचय दाखविला पाहिजे एवढेंच नव्हें तर संस्कृत ग्रंथांमुळें जे विषय सोंवळे झाले आहेत त्यांवरच कविता झाली पाहिजे अशा पंडितवर्गाच्या आग्रहांत कविसंघ सांपडला असावा आणि अशा परिस्थितींत त्यांनीं आपला वैयक्तिक काव्यगुण पूर्ण बद्ध होऊं न देतां पांडित्यानें उत्पन्न केलेल्या मनोवृत्तीशीं तड जोड केली असावी अशा तर्‍हेचा बौद्धिक इतिहास या सर्व प्रयत्नांत दडलेला दिसतो. पुराणांचें विस्तरण करावें, त्यास वाटेल तीं कथासूत्रें जोडून आपला काव्यगुण दाखवावा आणि नंतर केवळ काल्पनिक ग्रंथरचना करावी, व तशीच कविताशक्ति अर्वाचीन वीरांच्या किंवा आश्रयदात्यांच्या स्तुतीस किंवा चरित्रवर्णनास लावावी असा क्रम तेलगू कवींनी आचरला होता.

पुराणांतील अत्यंत अप्रसिद्ध व्यक्ती किंवा त्यांच्या संबंधीव्यक्ती घेऊन आपल्या कवितेस आणि कल्पनाशक्तीस निरंकुश ठेवून काव्य करण्याची पद्धति व निव्वळ रोमान्ससारखी रचना करण्याची पद्धति या दोहोंमध्यें एका प्रकारापासून दुसर्‍या प्रकारापर्यंत नेणारे कथाग्रंथ इतके विविध व इतक्या थोडथोड्या फरकानें दूर जाणारे आहेत कीं या दोहोंमधील भिन्नत्व दाखविणारी रेषा अस्पष्ट होते.

आतां स्थानिक इतिहासपर ग्रंथरचनेकडे वळूं. चरित्रग्रंथ काव्यस्वरूपांत लिहिले गेल्यामुळें ऐतिहासिकत्व बरेंच कमी होण्यास अवकाश असतो आणि त्यामुळें त्या पुस्तकास ऐतिहासिक ग्रंथ म्हणण्यापेक्षां ऐतिहासिक कादंबरीचें स्वरूप येतें; तसेंच ज्या देशांत इतिहासलेखन पद्धतशीर नाहीं त्या देशांतील चरित्रस्वरुपीं काव्यें खरोखर ऐतिहासिक पुरुषासंबंधानें आहेत कीं केवळ काव्यहेतूसाठीं कोणी काल्पनिक पुरुष घेतला आहे हें देखील समजेनासें होतें. असें जरी आहे तरी तेलगूमधील चरित्रकाव्यग्रंथ ऐतिहासिक शोधकांनीं विवेचिले पाहिजेत. तेलगूंतील प्रसिद्ध चरित्रग्रंथ म्हणजे कृष्णरायचरित्र होय. हा विजयानगराच्या सतराव्या नरपतिरायाच्या कृष्णराया नांवाच्या दासीपुत्राच्या कारकीर्दीचा कविताबद्ध इतिहास आहे. हें काव्य असंगडी काशीपतीचा मुलगा धूर्जटी याचें होय. तसेंच रामराजचरित्र हेंहि महत्त्वाचें चरित्रकाव्य होय. हें वेंकय्यानें लिहिलें म्हणून सांगितलेंच आहे. यांत मुसुलमानांशीं झालेल्या लढायांचें वर्णन आहे. जंगमकलज्ञान हाहि महत्त्वाचा लिंगायत ग्रंथ आहे. यानें बिज्जल व बिज्जलोत्तर राजे यांचें चरित्र वर्णिलें आहे. कतामाराज हा चरित्रग्रंथ, वारंगळचा नाश झाल्यानंतर मांडलिक राजांत जी यादवी चालली होती तिचा द्योतक आहे. पालनाडवीर चरित्र यामध्यें दोन जमीनदारांची कोंबड्याच्या झुंजीवरून झालेली लढाई वर्णिली आहे. नवचोलचरित्र, हा जंगमग्रंथ वीरशैव चळवळ चोलराजांपर्यंत नेऊन भिडविण्याच्या उद्देशानें लिहिला आहे. अशाच तर्‍हेचा व बसवेश्वर कलंज हा ग्रंथ होय, याचाहि हेतु प्रचाराचा दिसतो. कांहीं चरित्रग्रंथ किंवा ऐतिहासिक काव्यग्रंथ ''वंशावळी'' असें विनयशील नांव धारण करीत आहेत, त्यांपैकीं ''नंदाल कृष्णम्मा वंशावळी'', ''बल गुट्टी वारु वंशावळी'', ''काशीखंड मोलू वुना रेड्डीवार वंशावळी'' व करकालापुडी गोपाळ चायकाराव वंशावळी, या वंशावळ्या प्रसिद्ध आहेत. दुसरी राजकुलचरित्रें म्हणजे तंजावररायचरित्र (मदुरेच्या नायकांचें) व त्रिचनायल्लीरायचरित्र; हीं चरित्रें वंशावळीच्या पलीकडे फारशीं गेलेलीं नाहींत. माकराज बोम्माराज चरित्र हेंहि एका जमीनदारावरील काव्य होय. रंगरावचरित्र, मा. बुसीच्या बोविलीवरील हल्ल्याचें वर्णन करतें. सिंहलद्वीपावर तेलगू राज्य कांही दिवस होतें त्यामुळें तेथील राजेहि चरित्रविषय झाले आहेत.

या बर्‍याच चरित्रग्रंथांवरून एक विशिष्ट सामाजिक स्थिति मनांत भरते. विजयानगरचें राज्य भारतीय संस्कृतीचें महत्त्वाचें केंद्र झालें होतें आणि त्यामुळें राज्याचें संस्कृतिवर्धक कार्य कांहीं तरी महत्त्वाचें आहे, राजानें कवींस व पंडितांस उत्तेजन दिलें पाहिजे ही कल्पना त्या राज्याशीं संबंद्ध असलेल्या मोठ्या जमीनदारांत बरीच वाढली असली पाहिजे, आणि तिचा परिणाम असा झाला कीं, राज्यनाशानंतरहि दक्षिणेकडील जमीनदार, पाळेगार वगैरे मंडळी कवींस आश्रय देऊं लागली आणि आपली वंशचरित्रें लिहवून घेण्यास उद्युक्त झाली. यावरून तेथील जमीनदारांचा वर्ग मराठा जमीनदारांपेक्षां अधिक सुशिक्षित दिसतो. रामदेवरावाचें राज्य गेल्यानंतर मराठे जमीनदार चोहोंकडे होते पण त्यांनीं आपल्या पदरीं कवी ठेवून चरित्रें लिहिण्यास उत्तेजन दिलें नाहीं.

धार्मिक चळवळींतील पुरुष हे काव्यनायक करण्यास तेलगू ग्रंथकारांनीं कमी केलें नाहीं. बसवेश्वरचरित्र, पंडिताराध्यचरित्र, यमुनाचारी (यामुनाचार्य) चरित्र, नारायण जिआराकथा, शंकरचरित्र (शंकराचार्यांवर), इत्यादि चरित्रग्रंथ यांची साक्ष देतील. अमुक्तमाला हें संतचरित्र, ज्यांत अलवारांपासून यामुनाचार्यांपर्यंत हकीगत आहे व याचें कर्तृत्व महाकवि अलसानी पेदन्नास देण्यांत येत आहे एवंच हाहि भाग तेलगू ग्रंथांतील विचार करण्याजोगा आहे. यांत नाविन्य काय आहे हें पाहिलें पाहिजे. धार्मिक कथा कानडीवरून किंवा दुसर्‍या भाषेंतील ग्रंथांवरून घेऊन पु्न्हां त्यांत स्वतःची काल्पनिक भर घालून लिहिल्या तर त्यांत कवनस्वातंत्र्य या दृष्टीनें जरी त्यांची किंमत कमी होते, तरी भाषांतरास जितकें व्यापक पौराणिकेतर क्षेत्र शोधलें असेल त्या मानानें त्याची किंमत ठरविण्यास हरकत नाहीं.

आतां केवळ कल्पित कथांकडे जाऊं. पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टी आणि केवळ काल्पनिक गोष्टी यांतील भिन्नत्वदर्शक रेषा सहज सांपडणार नाहीं, आणि एका प्रकारापासून दुसर्‍या प्रकारापर्यंत संक्रमण फारच स्वाभाविक तर्‍हेनें झालें आहे हें मागें सांगितलें आहेच. प्रेमाची कथा कोणत्या तरी राजामध्यें आणि राजकन्येमध्यें प्रसंग उत्पन्न करुन करावी हा काल्पनिक कथानकाचा सामान्य नमुना आहे. पण प्रसंगीं व्यभिचारिणी, प्रसंगीं वेश्या यांसहि कथाविषय केलें आहे. या प्रकारचीं प्रमुख आख्यानें म्हटलीं म्हणजे भोगिनीदंडक, केयुराभाऊचरित्र, रुक्मांगदचरित्र, चंद्रिकापरिणय इत्यादि होत. भोगिनी दंडक ही सर्वज्ञ सिंगम अथवा सिन्हभूप याच्या भोगिनी नामक एका स्त्रीवर असलेल्या प्रेमाची हकीगत आहे. केयुराभाऊ चरित्र हें कलिंग देशाचा राजा केयुराभाऊ याचें लग्न, म्हगनकांवती म्हणून लाट अथवा लाड देशाची राजकन्या हिच्याबरोबर झालें, अशा संविधानकावर माचन्न कवीनें लिहिलें आहे. सां धाताचरित्र (नृसिंहकृत), यांत सूर्यवंशी राजा मांधाता याचें कुंतल देशची राजकन्या विमलांगी हिच्याबरोबर लग्न होतें. राजनीति (जगन्नाथकृत). हें नांव दाखवितें त्याप्रमाणें यांत वर्णन नसून कनकशेखर आणि कनकरेखा यांचा विवाह वर्णितें. रुक्मांगदचरित्र यांत रुक्मांगद राजाचा विवाह विंध्यावळी राजकन्येबरोबर झाला त्याचें वर्णन (मल्लन्नाकृत) आहे. चंद्रिकापरिणय हेंहि त्याच प्रकारचें रोमान्समध्ये मोडेल असें काव्य आहे. याचा कर्ता माधवराज हा राजकारणांतील मनुष्य असून तो जातीचा वेलमा होता. स्त्री चरित्राचे अनिष्ट मासले म्हणून किंवा वेश्यासं कविता विषय करून जीं कांहीं काव्यें लिहिण्यांत आलीं त्यांत सारंगधर चरित्र, हंसविसंति, चंद्ररेखाविलाप, रुपावतीचरित्र इत्यादि येतील. सारंगधरचरित्र, राजमहेंद्रीच्या राजमहेंद्र राजाचा मुलगा सारंगधर याची सावत्र माता चित्रांगी ही त्यावर आसक्त होते, व तो तिची निर्भत्सना करतो त्यामुळें ती राजाकडून त्याला शासन करविते वगैरे हकीकत चामकुरी व्यंकटपति कवीनें या काव्यांत लिहिली आहे. हंस विसंतींत (ले. अगाला नारायण) हंसानें विष्णुदास नांवाच्या एका गृहस्थाच्या गैरहजेरींत त्याच्या स्त्रीस गोष्टी सांगून तिचें मन व्यभिचारापासून परावृत्त केलें इत्यादि गोष्ट आहे. रुपावतीचरित्र यांत व्यंकटगिरीचा मुसलीरावा याचें एका रुपवती नामक नृत्यांगनेवर मन बसतें तत्संबंधीं हकीकत चिंकटपल्ली लक्ष्मीराजा यानें लिहिली. चंद्ररेखा विलाप (कवि जगन्नाथ) या काव्यामध्यें नीलाद्रीराव व चंद्ररेखा नामक नृत्यांगना यांच्या प्रेमाची हकीकत आहे. विद्यावटीमंजरींत (कवि शेषाचल पोळीगार कृत) एका नृत्यांगनेच्या मदुरामराजा याच्यावरील प्रेमाची हकीकत दिली आहे. कांहीं ऐतिहासिक स्वरूपाचे विषय काव्य विषयच झाले नाहींत तर त्या विषयांच्या विशिष्ट स्वरुपामुळें तेलगू जनतेवर परिणामकारी झालेले दिसतांत. विष्णुवर्धन राजानें एका वैश्यकन्येवर बलात्कार केला आणि त्यामुळें तिनें व तिजबरोबर अनेक कुटुंबांनीं जो अग्निप्रवेश केला त्याचें वर्णन देणारीं तिमय्यासति, व गुरुवय्या यांचीं कन्यकापुराण कन्यकाचरित्र या नांवाचीं पुस्तकें आहेत. जेथें तिनें अग्निप्रवेश केला तेथें देवालय बांधलें आहे. त्यास कन्यकापरमेश्वरी म्हणतात; ही वैश्यांची देवी आहे.

केवळ सामाजिक विषयावर काव्यहि तेलगूंत आहे, एवढेंच नव्हे तर तेलगू वाङ्‌मयाचा सुवर्णकाल  येण्यापूर्वी देखील अशा प्रकारची काव्यरचना झाली होती, यास श्रीनाथाचें वीथिनाटक (सडकेवरचें नाटक) साक्षीभूत आहे. यांत कवि उभा राहून रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या बायकांचें वर्णन करतो. यांत पंधराव्या शतकांतल्या सर्व तेलगू स्त्रियांच्या (ब्राह्मणांपासून अस्पृश्यापर्यंत) पेहेरावांचें व दागिन्यांचे सुरेख वर्णन आहे.

तेलगू कवींची याद पाहिली असतां तींत अनेक महत्वाचे राजकारणी पुरुष दिसतात. म्हणजे वाङ्‌मयाच्या सेवेला लागलेला वर्ग महाराष्ट्रांतील वर्गापेक्षां अधिक उच्चप्रकारचा दिसतो. आणि यामुळें विषयाचें विविधत्व, अनुभवमूलक लेखन इत्यादि गोष्टींत तेलगू वाङ्‌मय जुन्या मराठी वाङ्‌मयापेक्षां, काव्यदृष्टीनें अधिक श्रेष्टतेचें ठरेल यांत शंका नाहीं.

गीर्वाणविषयक जागृति— गेल्या पंचवीस वर्षांत तेलगू समाजांत वाङ्‌मयविषयक बरीच जागृति झाली आहे. या चळवळीस तत्रस्थ महाराष्ट्रभाषाभिज्ञ आणि महाराष्ट्रीय लेखकहि कांहीं अंशीं कारणीभूत आहेत. स्वदेशी चळवळीच्या काळीं बिपिनचंद्र पाल यांच्या व्याख्यानांचाहि परिणाम आंध्र तरुणांच्या मनावर झाला; परंतु तो कमी टिकला. राजकीय बाबतींत तरुण आंध्रांची मनोवृत्ति राष्ट्रीयपक्षास अधिक मिळती असते. औद्योगिक बाबतींतहि त्यांची थोडीफार चळवळ चालू आहे. सध्यां जास्त तीव्रतेनें राजकीय मतें व्यक्त करणारांशीं ते सहकारिता करतात. वाङ्‌मय सुधारावयाचें, परंतु त्याबरोबरच ज्या भाषेंत तें असतें ती भाषाच सुधारावयाची अशी एक रीत असते; तिकडे या आंध्रांचें लक्ष्य वेधलें आहे. त्याबरोबरच आंध्र प्रांत (तेलगू भाषा बोलणारा) हा स्वतंत्र करावा व तेलगू भाषेंतून उच्च शिक्षण मिळावें अशी प्रांताभिमानाची चळवळ त्यांच्यांत सुरु आहे; स्वतंत्र युनिव्हर्सिटी ते मिळवीत आहेत. तामीळ लोक कांहीं काळ या चळवळीच्या विरुद्ध होते. या चळवळीस ते ''आंध्रोद्यममु'' म्हणतात. आंध्रांचा स्वतंत्र राजकीय विभाग व्हावा यापेक्षां व्यापक आंध्रहितसंवर्धनाच्या हेतूसाठीं ही चळवळ आहे.

तेलगूवाङ्‌मयाचे अग्रणी राजमहेंद्रीचे कै. वीरेश लिंगम् पंतुलु होत हे तेलगू पंडित म्हणून प्रख्यात होते. त्यांच्या इतका प्रचंड तेलगू लेखक सार्‍या आंध्रांत (त्यांच्या वेळीं) नव्हता. यानीं प्रहसने, निबंध वगैरे ४० च्या वर लिहिले होते; म्हणून यांनां अर्वाचीन तेलगूचा निर्माता म्हणत. कांहींनां हें म्हणणें पसंत नाहीं. पंतुलु मूळचे आराध्य ब्राह्मण असून पुढें ब्रह्मो झाले. हे सुधारकाग्रणी व स्त्रीशिक्षणाभिमानीहि होते. यांचें एक आत्मचरित्र प्रसिद्ध झालें आहे. त्यांत कांहीं आत्मप्रशंसेच्या व कांहीं तत्कालिन, सामाजिक व राजकीय इतिहासाच्या गोष्टी आल्या आहेत; स्वदेशी चळवळीच्या काळीं (१९०६-०८) आपण कितपत राजनिष्ट होतों त्याचें प्रदर्शन त्यानीं या पुस्तकांत केलें आहे. त्यांच्या पाकत्वाखालीं असलेल्या एका अज्ञान मुलीच्या बाबतींत यांच्या चारित्र्यावर शिंतोडा उडाल्यामुळें त्यांच्या शेवटच्या वर्षांत त्यांजवरील सार्वजनिक विश्वास कमी झाला.

तेलगू भाषेंत ''आंध्रपत्रिका'' नांवाचें एक दैनिक आहे व साप्ताहिकें मात्र बरींच आहेत. ''कृष्णापत्रिका'स' या साप्ताहिकानें राजकीय विषयावर उहापोह करून तेलगूस राजकीय विषयावर वादविवाद करणारी भाषा बनविली असें पत्रिकेचे चहाते म्हणतात. मासिकांत आंध्रभारती हें प्रमुख आहे. तेलगूंत स्त्रीसंपादिकाहि दिसत असून त्यांनीं कांही मासिकें चालविलीं आहेत. ''हिंदुसुंदरी'' ची संपादिका श्री. बालात्रपु शेषम्मा व सावित्रीची संपादिका श्री पुलुगुर्ता लक्ष्मीनरसीमांबा या त्यांत अधिक विश्रुत आहेत. तेलगू देशांत धंदेवाल्या नाटककंपन्या फारशा नाहींत; नाट्यसमाज मात्र आहेत. त्यांत बल्लारीची सरसविनोदिनी सभा आणि मद्रासची सुगुणविलाससभा, या प्रमुख आहेत. पहिलीचे अध्यक्ष रावबहादूर गौड म्हणून महाराष्ट्रीय गृहस्थ होते. या समाजाकडून नवीन नाटकरचनेस उत्तेजन मिळतें. यांचा मुख्य नाट्यलेखक राजारामराव तोरगड (हा गौडांचा जांवई) आहे. तेलगू गीर्वाणाच्या उन्नतीसाठी ''विज्ञानचंद्रिकामंडळी'', ''आंध्र साहित्य परिषद'' यांसारख्या संस्था खटपट करीत आहेत. पहिली संस्था गुंतूर येथें पांच गृहस्थांनीं स. १९०६ मध्यें काढली. तिचा उद्देश पाश्चात्य ज्ञान स्वभाषेंतून पसरविण्याचा आहे. हिनें अब्राहाम लिंकचनें चरित्र हें पहिलें पुस्तक प्रसिद्ध केलें. संस्थेचें कार्यालय प्रथम हैदराबादेस कै.आर.व्ही. रंगराव यांच्या येथें होतें, हल्ली १९०८ पासून मद्रासेस डॉ. लक्ष्मीपति यांच्याकडे आहे. या संस्थेनें प्रसिद्ध केलेल्या पहिल्या २३ पुस्तकांत १२ शास्त्रीय, ५ ऐतिहासिक, ४ चरित्रें व दोन ऐतिहासिक कादंबर्‍या आहेत. या संस्थेचे संपादक कै.के.व्ही. लक्ष्मणराव होते. ते पूर्वी मराठींत लिहित असत; पुढें त्यांनीं तेलगूंत लिहिण्याचा प्रघात पाडला व महाराष्ट्रीय इतिहास व कल्पना यांचा तिकडे प्रसार करण्यास प्रारंभ केला. त्यानीं शिवाजीचें चरित्र लिहिलें आहे. त्याचप्रमाणें रा. कोमुरी वीरभद्रराव यांनीं आंध्रचरितं हा एक महत्त्वाचा व भाषांतर करण्याजोगा ग्रंथ लिहिला आहे, या मंडळीच्या ग्रंथांनां लोकाश्रय चांगला आहे; मद्रास युनिव्हर्सिटीच्या शिक्षणखात्याकडून आश्रय मिळतो. त्यामुळें ग्रंथांच्या हजारों प्रती काढून स्वल्प किंमतीत देण्यास परवडतें. शास्त्रीय ग्रंथांच्या तर ९।९ हजार प्रती खपल्या आहेत. या संस्थेनें वाङ्‌मय, इतिहास व भौतिकशास्त्रें या विषयांत निरनिराळ्या ठिकाणीं स्त्रीपुरुषांच्या परीक्षा घेऊन व त्यांनां बक्षिसें आणि प्रमाणपत्रें देऊन मॅट्रिक पास न झालेल्यांनां एक सोय करून दिली आहे. के.व्ही. लक्ष्मणराव, डॉ.लक्ष्मीपती व रा. काळेश्वरराव (बेझवाडा) इत्यादि मंडळींच्या खासगी प्रयत्‍नानें तेलगू ज्ञानकोश (आंध्र विज्ञानसर्वस्वमु) तयार करण्याचें व छापण्याचें काम चालू आहे. आंध्रसाहित्यपरिषद ही रा. जयंति रामय्या पंतलु यांच्या यत्‍नानें स्थापली गेली. यानीं विशेषेंकरुन ''शासनें'' छापण्याकडे या संस्थेचें बल लावलें आहे.

तेलगू भाषेंत ग्राम्य व ग्रांथिक असे प्रकार (मराठीपेक्षां जास्त) असल्यानें मध्यंतरी भाषेंत कोणता प्रकार जास्त प्रचारांत आणावा याबद्दल वाद माजून ग्राम्य प्रयोगांस थोडासा प्रवेश मिळाला. या परिषदेच्या तर्फे तेलगू भाषेचा कोश तयार होत आहे. याला सरकारनें मदत देऊं केली होती, पण परिषदेनें ती नाकारली. याशिवाय इतिहाससाधनें वगैरे साहित्य मासिकद्वारां पसिद्ध होत असतें. पिठापुरम् येथील एक श्रीमन् जमिनदार वाङ्‌मयाचे मोठे अभिमानी आहेत. याप्रमाणें आंध्र लोक कांहीं बाबतींत महाराष्ट्राच्यापुढें आहेत तर बर्‍याच बाबतींत मागें आहेत. त्यांच्यात लो. टिळक, ना. गोखले, न्या.रानडे यांच्यासारखे सर्वराष्ट्रीय पुढारी अद्यापि झाले नाहींत. आपल्या सामाजिक परिस्थितीची झळ ते वाङ्‌मयचळवळीस लागूं देतात. त्यांच्यांत वैदिकी (भिक्षुक) व नियोगी (गृहस्थ) असे दोन वर्ग असून ते परस्परांचा मत्सर करतात. वास्तविक हे दोघेहि अद्वैतमतानुयायी असतां (गुंतूरचे) नियोगी आपल्याला ''देवाद्वैती'' म्हणवून, वैदिकांनां ''असुराद्वैती'' म्हणतात; एवढेंच नव्हे तर जातिभेदाचा काव्याभिज्ञतेसहि स्पर्श झाला आहे. वैदिकी व नियोगी यांतील दोन्ही पक्ष आपलें कवित्व वरिष्ठ दर्जाचें मानून विरुद्ध पक्षाचें कनिष्ठ होय असें म्हणत. कोप्पुरपुबंधु व शतावधानी या दोन भिन्न जातींच्या कवींनां अग्रस्थान देण्यासाठीं प्रत्येकाच्या जातीनें मिरवणुकी वगैरेहि काढल्या होत्या. (महाराष्ट्रसाहित्यपत्रिका व. २. अं. ३-४; डॉ. केतकर यांचा लेख)

आंध्राचा भाग बराचसा निजामच्या राज्यांत असल्यामुळें आंध्र वाङ्‌मयासहि बराचसा धक्का पोंहोचला आहे. निजामचें राज्य स्थानिक देशी भाषांच्या उत्कर्षास अपकर्षक आहे. या राज्यांत महाराष्ट्रीय, कानडी व तेलगू ह्या तीन भाषांचे लोक आहेत व या तिन्हीं भाषांच्या विकासास या राज्यानें व्यत्यय केला आहे. मराठीपेक्षां तेलगू भाषेस हा व्यत्यय अधिक भासत असला पाहिजे कां कीं इतर लोकांपेक्षां तेलगूंचीच संख्या यांत अधिक आहे.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .