प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या    
       
त्रिचनापल्ली, जिल्हा— हा मद्रास इलाख्याच्या दक्षिणेस आहे. क्षेत्रफळ ३६३२ चौ.मै. त्रिचना पल्लीचें मूळचें नांव त्रिशिरापल्ली म्हणजे त्रिशिर नांवाच्या राक्षसाचें शहर. त्रिशिर हा रावणाचा भाऊ होता. त्रिचनापल्लीच्या दक्षिणेस पुदुकोटा संस्थान, पश्चिमेस कोइमतूर व मदुरा जिल्हे, उत्तरेस दक्षिण अकीट व सालेम जिल्हे व पूर्वेस तंजावर. कावेरी नदी संबंध जिल्ह्यांतून पश्चिमेकडून पूर्वेस वाहते. श्रीरंगम या ठिकाणीं कावेरीचे दोन फांटे होतात. कावेरीच्या उत्तरेस आणि दक्षिणेस स्फटिक चुनखडी निरनिराळ्या रंगाची विपुल सांपडते. चित्ते आणि अस्वल पुष्कळ सांपडतात. त्याशिवाय दुसरे वन्यपशू नाहींत. त्रिचनापल्लीची हवा एतद्देशीयांनां व इंग्रजांनां सारखीच निरोगी असते. उष्णमान ८४ अंशावर असतें. दरसाल पाऊस ३४ इंच पडतो. पावसाळ्यांत वादळ अगर तुफानें क्वचित होतात. दुष्काळ फार करुन पडत नाहीं म्हटल्यास चालेल. कारण कावेरी आणि कोलेरुन या नद्यांचे मोठे पाट जिल्ह्यामधून वाहतात व त्यांनीं बरीच जमीन भिजते.

इतिहास— त्रिचनापल्लीचा इतिहास पुरातन आहे. ख्रिस्ती शकापूर्वी तिसर्‍या शतकांत अशोक शिलालेखांत चोल नांवाचे राजे राज्य करीत होते म्हणून उल्लेख आहे. त्यांची राजधानी त्रिचनापल्ली होती; व टॉलमीनें चोलांचीं राजधानी उरय्यूर येथें होती असें म्हटलें आहे व उरय्यूर हा त्रिचनापल्लीं शहराचा भाग एक होय. नंतर अकराव्या शतकांत चोलांची राजधानी उरय्यूर बदलून गंगइकांडपूर येथें नेली. सरासरी १३ व्या शतकांत द्वारसमुद्राच्या बल्लाळ राजांनीं त्रिचनापल्ली घेतली. कांहीं दिवस मदुराच्या पांड्यांनीं ती सर केलीं परंतु अखेरीस अल्लाउद्दीनचा सुभेदार मलिकाफर यानें स्वारी केली त्यावेळी विजय नगरचें राजे त्रिचनापल्लीस सत्ताधीश होते. पुढें सोळाव्या शतकांत ज्यावेळेस विजयानगरचें राज्य नामशेष झालें त्या वेळेस मदुराच्या नाईकांनीं त्रिचनापल्ली आपल्याकडे घेतली. या नाईक घराण्याचा मूळपुरष विश्वनाथ यानें त्रिचनापल्लीचा कोट बांधला असें म्हणतात; व १७व्या शतकाच्या मध्यांत चोक्कनाथ नाइकानें आपली राजधानीची जाग मदुराहून त्रिचनापल्लीस आणली. १७३१ सालीं नाईक घराण्याचा शेवटचा पुरुष निपुत्रिक वारला. तेव्हां वारसाचा प्रश्न उत्पन्न झाला. अर्काटच्या नबाबाचा चंदासाहेब या नांवाचा दिवाण होता, त्यानें त्रिचनापल्ली सर करुन राणी मीनाक्षीला विश्वासघातानें बंदींत टाकलें (चंदासाहेब पहा).

यानंतरच्या युद्धांतील क्लाइव्हनें उठविलेला त्रिचनापल्लीचा वेढा प्रसिद्ध आहे. त्रिचनापल्लीस दुसरा वेढा १७५३ सालीं म्हैसूरचा सरदार नंजराज यानें दिला. तो मेजर लॉरेन्स यानें उठविला. पुढें १७५६ सालीं फ्रॅचांनीं उचल घेऊन त्रिचनापल्ली वेढिली. त्याच वेळेस मदुरेहून क्याप्टन क्यालियड या नांवाच्या सरदारानें येऊन तो हटविला. १७५९ सालीं फ्रेंच गव्हर्नर लाली यानें त्रिचनापल्ली घेण्याचा प्रयत्‍न केला परंतु वांदिवाशच्या लढाईंत त्याचा पूर्णपणें पराभव झाला (इ.स. १७६०). यावेळीं महंमद अल्ली कर्नाटकचा नवाब असून त्रिचनापल्ली त्याची राजधानी होती. १७६८ सालापासून हैदरअल्ली व टिप्पू यांच्या स्वार्‍या झाल्या. अखेर ब्रिटिश सत्तेचा दक्षिणहिंदुस्थानांत विजय होऊन त्रिचनापल्ली शहर इंग्रजांच्या ताब्यांत गेलें. त्रिचनापल्ली येथें मराठ्यांचा अंमल वास्तविकरीतीनें इ.स. १७४१ पासून १७४४ पर्यंतच होता. परंतु त्यांनीं तेथील खंडणी वसूल करण्याचा प्रयत्‍न पुढें पुष्कळ दिवस केला होता असें तत्कालीन कागदपत्रांवरून दिसतें. पिरंवलून तालुक्यांत अतिशय जुनीं खडकामधून कोरलेलीं थडगीं कधीं कधीं आढळतात. त्यांत १८६७ सालीं एक अशाच प्रकारचें थडगें आढळलें. त्यांत मानवी हाडांचे तुकडे, सहा इंच रुंदीचें एक मातीचें लहान सुंदर भांडें आणि तलवारीचा अग्रभागहि सांपडला. कांहीं रोमन नाणींहि त्यांसमवेत होतीं. त्रिचनापल्ली, पिरंबलूर, कुलित्तलाइ तालुक्यांत पाषाणाच्या बुद्धाच्या मूर्ती अद्याप अस्तित्वांत आहेत. पांड्या, चोल आणि कोंगू हीं घराणीं त्रिचनापल्ली जिल्ह्यांत जवळ जवळ असल्याकारणानें तेथें अनेक ऐतिहासिक अवशेष सांपडण्याचा संभव आहे. त्रिचनापल्ली येथील खडकावर व श्रीरंगम् येथें सुंदर मंदिरें आहेत. उदयारपलियम येथील जमिनदाराचा राजवाडा ही प्रेक्षणीय इमारत आहे. त्रिचनापल्ली जिल्ह्यांत ९३७ खेडीं आहेत. लो.सं. १९२१ सालीं १९०२८३८ होती. मद्रास इलाख्यांत त्रिचनापल्लीसारखी दाट वस्ती दुसर्‍या ठिकाणीं क्वचित् असेल. या जिल्ह्यांत ५ तालुके असून मुख्य शहरें त्रिंचनापल्ली, श्रीरंगम्, तुरय्यूर, उदहेरपाय्यायम आणि अरैय्यलूर हीं होत. सर्व साधारण बोलण्यांत तामिल भाषा असते. तेलगू व कानडी फार थोडी प्रचारांत आहे. जिल्ह्यांतील सर्वसाधारण लोकांचा उद्योग शेतकी होय. याचें प्रमाण शेंकडा ७३ आहे एकंदर ३६३२ चौ.मै. पैकीं रयतवारी व इनाम जमीन २८२० चौ.मै.; जमिनदारी ६३४ चौ.मै. असून पूर्ण माफीचीं १७८ खेडीं आहेत. खाण्याचीं मुख्य धान्यें तांदूळ, रागी, वरगू आणि चोलम हीं होत.

वहित जमिनीच्या मानानें जिल्ह्याची लो. सं. वाढत्या प्रमाणावर आहे. अद्यापि ३०० चौ.मै. क्षेत्रफळ वहितीला येण्यासारखें आहे. तकवी तगाई सढळ रीतीनें रयतेला दिली जाते. शेतकीकामाकडे बहुधां बैल व रेडे उपयोगांत आणितात. गुरांचा मोठा बाजार अरय्यलूर, तुरैय्यूर आणि मनपराई या ठिकाणीं भरतो. गुरांची पैदास्त चांगली नसते. चांगलीं गुरें सालेम व म्हैसूरहून समयपुरमच्या यात्रेंत विक्रीस येतात. कावेरी व कोलेरुन या दोन नद्यांचे पाट पूर्वीपासून आहेत. सरासरी १६० चौ.मै. जमीनीस पाटाचें पाणी मिळतें. तलावांची संख्या १५९० असून तलाव व विहिरी मिळून २७०० क्षेत्रफळ जमीन भिजतें.

त्रिचनापल्ली जिल्ह्यांत राखीव जंगल ३०५ चौ.मै. आहे. त्यांत साग, शिसू, चंदन आणि बांबू विपुल होतात. तंजावर जिल्ह्यांतील जंगल जवळ लागून असल्यामुळें त्रिचनापल्लीस जंगलकामदारांची कचेरी असून दोन्ही जिल्ह्यांचें जंगल त्याच्याच देखरेखीखालीं असतें.

जिल्ह्यांत उद्योगधंदे फारसे नाहींत. थोडे लोक विणकरी आहेत. ते जाडेंभरडें कापड विणतात. त्रिचनापल्ली शहरांत मात्र रेशमी, सुती व जरीकांठीं बारीक कापड तयार होतें. कुंभकोणंला असेंच कापड निघतें. घोंगड्या, कांबळीं ही लहान लहान खेड्यांतून निघतात. पांढर्‍या लोंकरीच्या सतरंज्या व सकलादी या जिल्ह्यांत बर्‍याच होतात. त्रिचनापल्ली एका कालीं सोन्यारुप्याच्या घडामोडीबद्दल प्रसिद्ध होते. अजूनहि स्थानिक मागणी चांगली आहे. तांब्यापितळेचे पत्रे त्रिचनापल्ली व आसपासच्या गांवीं तयार करतात. गोवानीज तांब्याचीं भांडीं करतात. जिल्ह्यांतील एका गांवीं कांचेच्या बांगड्या दरसाल १२००० रुपयांच्या होतात. इमारती व अस्तित्वांत असलेलीं भव्य मंदिरें यांवरून लोकांच्या कसबाची व कलेची साधारण कल्पना करतां येते. हस्तिदंती काम तर फारच प्रेक्षणीय असून त्यास दिल्ली प्रदर्शनांतून बक्षिस मिळालें आहे. त्रिचनापल्लीस कापूस दाबण्याचा एक कारखाना आहे व कातडी कमावण्याचे कारखाने ६ आहेत. कमावलेलें कातडें सरासरी ५ लाखांचें निघतें व तें इंग्लंडकडे पाठविलें जातें. त्रिचनापल्लीस तंबाखूचे चुट्टे तयार होतात. दरसाल पाऊण लाखाचे चुट्टे परदेशीं रवाना होतात. दिंडिगल तंबाखू वापरतात. जिल्ह्यांतून बाहेर जाणारे व्यापारी जिन्नस, खाण्याचे पदार्थ, डाळी, मिरची, नारळ, केळीं, सुपारी, साखर, कमावलेलीं कातडीं, एरंडीतेल, ढेप, स्लेटीचा दगड व चुट्टे इत्यादि होत. तसेंच बाहेरुन येणारे जिन्नसः— धान्या, डाळी, एरंडी, सरकी, खोबरेल तेल, मिरीं, सुपारी, कच्ची तंबाखू, राकेल तेल, सूत, मीठ इत्यादि. यामुळें त्रिचनापल्ली ही एक महत्त्वाची व्यापारी पेठ बनून गेलेली आहे. व्यापारी लोकांत मुख्यत्वेकरुन चेट्टी, गुजराथी व मारवाड्यांचा भरणा विशेष आहे.

साउथ इंडियन (दक्षिण हिंदुस्थान) रेल्वे जिल्ह्यांमधून गेलेली आहे. तिचा एक फांटा त्रिचनापल्लीवरून ईरोडला गेलेला आहे. तंजावरपासून त्रिचनापल्ली व नंतर ईरोड फांटा १८६२ त सुरु केला आहे; व करुरला (कोइमतूरमधील) १८६६ सालीं तोच फांटा नेलेला आहे.

तालुका— मद्रास, त्रिचनापल्ली जिल्ह्यांतील तालुका. क्षेत्रफळ ५४२ चौ.मै. तालुक्यांतील खेड्यांची संख्या १९३. कावेरी व कोल्हेरून या नद्यांनीं त्रिचनापल्ली पोटविभागाचे बरोबर २ भाग झालेले आहेत. काळीचें उत्पन्न इतर बाबी मिळून १९०३-०४ सालीं ८१३००० रु. झालें होतें.

शहर— मद्रास, इलाखा, त्रिचनापल्ली जिल्ह्यांचे व तालुक्याचें मुख्य ठाणें. कावेरी नदीच्या उत्तरकिनार्‍यावर हें असून मद्रासपासून गाडी रस्त्यानें १९५ मैल व रेल्वेनें २५० मैल आहे. एकंदर लोकसंक्या (१९११) १२०४२२. हें रेल्वेचें महत्त्वाचें स्टेशन असल्यामुळें लोकसंख्येचें मान भराभर वाढत आहे. इंग्रजांकडे त्रिचनापल्ली आल्यावर त्यांनीं आपलें लष्करी मुख्य ठाणें येथें ठेविलें. येथील किल्ला फार मोठा असून तो कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर आहे. कावेरी नदीच्या प्रवाहानें निसर्गतःच बनलेल्या अत्युच्च खडकावर फार प्राचीन काळीं हा गांव बसलेला आहे. या किल्ल्याची उंचीं सुमारें ६०० फूट असून तो १६ व्या शतकाच्या उत्तरार्धामध्यें बांधला असें म्हणतात. पूर्वी या किल्ल्यासभोंवतीं उत्तम तटबंदीचें काम केलें असून खोल खंदकहि खणलेला होता. या किल्ल्याच्या मध्यंतरीं सुमारें २७३ फूट उंचीचा एक उंच खडकाचा सुळका असून, त्याच्या माथ्यावर शिवमंदिर बांधलेलें आहे. या किल्ल्यापासून थोड्याशा अंतरावर ''नबाबाचा राजवाडा'' म्हणून एक मोठी इमारत आहे. ही इमारत सुमारें सव्वा दोनशें वर्षांपूर्वी चोक्कनाइक नामक राजानें बांधिली व तेथेंच अर्काटच्या नबाबांनीं आपलें निवासस्थान केलें; म्हणून त्यास ''नबाबाचा राजवाडा'' असें नांव पडलें आहे. ब्रिटिश सरकारनें या राजवाड्याची १८७३ सालीं दुरुस्ती केली असल्यामुळें तो अद्यापि चांगल्या स्थितींत आहे. सन १८६६ त त्रिचनापल्लीस म्युनिसिपल कमिटी स्थापन झाली. कावेरीचें पाणी शहरांत पुरविलें आहे. किल्ल्याजवळ चंदासाहेबाचें थडगें नादीरशहाच्या मशीदींत आहे. थडग्याभोंवतीचें धातुकाम उत्कृष्ट शिल्पापैकीं आहे. मशिदीवरील घुमट चंदासाहेबानें स्वतः बांधलेला असून त्याचें वन महंमद अल्लीचें थडगें जवळ जवळच मशिदीच्या आंत आहेत. याशिवाय किल्ल्यांत म्यु. कमिटीनें स्वतःकरितां एक दिवाणखाना, बाजार व एक दवाखाना बांधलेला आहे. शहरांत कांहीं बाग व उद्यानें आहेत.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .