प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या   
        
त्रिदोष— त्रिदोष या शब्दांत दोन पदें आहेत. त्रि आणि दोष. त्रि म्हणजे तीन आणि दोष म्हणजे दुष्ट करणारे (बिघडविणारे). आर्यवैद्यकांत दोष या नांवानें समजले जाणारे तीन पदार्थ आहेत. त्यांचीं नांवें वायु, पित्त व कफ अशीं आहेत. शरीरांत कोणतहि बिघाड होतो तो प्रथम दोषांमध्यें होतो व हे दोष म्हणजे वायु, पित्त व कफ हे बिघडले म्हणजे शरीरांतील इतर पदार्थ जे धातू (सात) व मल ह्यांस बिघडवितात. म्हणून धातू व मल यांस बिघडणारे अशा अर्थानें (दूषयंति इति दोषाः) वायु, पित्त व कफ यांस दोष हें नांव मिळालें.

वास्तविक आर्यवैद्यकांत वायु, पित्त व कफ हे बिघडले नसतील तेव्हां शरीराची सुस्थिति कायम राखणारे पदार्थ आहेत व तेव्हां त्यांस (म्हणजे दोषांस) त्रिधातु असें म्हणतात (शरीरधारणाद्धातवः). दोष व धातु हे दोन्ही शब्द सहजीं पुष्कळ ठिकाणीं समानार्थदर्शक म्हणून वापरले आहेत. पण प्रत्येकाचा खरोखर शब्दार्थ निराळा आहे. त्रिधातु समस्थितींत असतां शरीरांतील क्रिया (इंग्रजी वैद्यकाप्रमाणें इंद्रियविज्ञानप्रतिपादित) करणारे अतएव आरोग्य कायम राखणारे स्थूल व सूक्ष्म शक्तिमान असे पदार्थ आहेत; व विकृत शरीराचेंहि मूलकारक तेच पदार्थ आहेत. आयुर्वेदांतील वाङ्‌मयांत दोष व धातू हे शब्द पुष्कळ ठिकाणीं समानार्थ योजले आहेत. पण त्यांत इंगित इतकेंच दिसतें कीं जे धातू समस्थितींत असतां शरीराचें धारण-संवर्धन करतात तेच धातू दुष्ट झाले तर शरीरांत रोग उत्पन्न करण्यास कारणीभूत होतात (य ए व देहस्य समाविवृध्यै त एव दोषा विषमावधाय).

आतां हे दोष म्हणजे कोणते पदार्थ आहेत तें पाहूं. अगदीं सोप्या शब्दांत दोष म्हणजे कोणते पदार्थ हें सांगावयाचें तर असें सांगतां येईल कीं सप्‍तधातू म्हणजे रस, रक्तमांस मेद, अस्थि, मज्जा व शुक्र आणि मल (पुरीष, मूत्र, घाम इत्यादि), यांशिवाय शरीरांत जे पदार्थ आहेत ते दोष होत. ते सूक्ष्म व स्थूल अशा दोन्हीं प्रकारांनीं शरीरांत असतात. अन्नपचनाच्या वेळीं अन्नामध्यें जेव्हां कफ व पित्त यांचें मिश्रण होतें त्यावेळीं या दोन दोषांचें स्वरुप स्पष्ट दिसतें. तीन दोषांपैकीं कफापेक्षां पित्त व पित्तापेक्षां वायु जास्त सूक्ष्म असतो. म्हणून वायूचें स्वरुप शरीरांत कोठेंच डोळ्यांनीं दिसत नाहीं. त्याचें (वायूचें) अस्तित्व त्याच्या कार्यावरुनच सिद्ध आहे. आर्यवैद्यकवाङ्‌मयाशीं अगदीं अपरिचित अशा लोकांच्या कानावर वरील दोष या शब्दाचा शरीरांतील मलरूपद्रव्यें असा अर्थ नेहमीं पडतो. आणि वरील अर्थच प्राधान्येंकरुन त्यांच्या मनांत वागत असल्यामुळें ते त्रिदोषतत्वाचें आकलन करुं शकत नाहींत. वायु या शब्दाचा अर्थ किती व्यापक आहे हें चरकसंहितेच्या सूत्रस्थानांतील बाराव्या अध्यायांतील एक उतारा खालीं देत आहे त्यावरून कळून येईल.

''वायुस्तंत्रयंत्रधरः प्रवर्तकश्चेष्टानां उच्चावचानां नियंता प्रणेताच मनसः सर्वेंद्रियाणामुद्योगरः । सर्वेंद्रियार्थानां अभिवोढा, सर्व शरीरधातुव्यूहकरः, संधानकरः शरीरस्य, प्रवर्ताकोवाचः, प्रकृतिः स्पर्शशब्दयोः, श्रोत्रस्पर्शनयोर्मूलं, हर्षोत्साहयोर्योनिः । समीरणः अग्नेः दोषसंशोषणः । क्षेप्ता बहिर्मलानां, स्थूलाणुस्त्रोतसां भेत्ता, कर्ता गर्भाकृतीनां, आयुषोनुत्तिप्रत्ययभूतो भवति अकुपितः ।''

शरीर धारण करणें, सर्व इंद्रियांनां आपापल्या विषयांकडे प्रवृत्त करणें, इंद्रियविषयांचें ज्ञान मनाला कळविणें, शरीरांतील धातूंची रचना करणें, शरीर जुळवून ठेवणें, वाणीचें प्रवर्तन करमें, हर्ष व उत्साह उत्पन्न करणें, शब्दज्ञान व स्पर्शज्ञान यांचें कारण, अग्नीचें प्रेरण करणें, मलांनां बाहेर टाकणें, स्थूल व सूक्ष्म स्त्रोतसांचें भेदन करणें, गर्भाला आकृति देणें, इत्यादि कार्ये चांगल्या स्थितींत असलेला वायु करतो असा वरील उतार्‍याचा सारांश आहे. यावरुन वायु, पित्त व कफ हीं शरीरांतील तत्वें किती व्यापक आहेत तें कळून येईल. वायु, पित्त व कफ म्हणजे त्रिदोष यांचीं विशेष स्थानें, ते अविकृत असतां शरीरसंवर्धक असणारीं त्यांचीं कार्ये, व विकृत असतां शरीरविघातक होणारीं त्यांचीं कामें या सर्व गोष्टींची विशेष सविस्तर माहिती ज्ञानकोश ग्रंथांत वायु, पित्त व कफ या शब्दांच्या विवरणांत दिली आहे ती पहावी.

त्रिदोषपद्धति नीट न समजल्यामुळें या पद्धतीवर आजपर्यंत अनेक लोकांनीं आक्षेप घेतले आहेत. या आक्षेपकांपैकीं कै. डॉ. गर्दे हे प्रमुख आहेत. त्यांनीं त्रिदोषपद्धति विरुद्ध आपलें म्हणणें सार्थ अष्टांगहृदय (वाग्भट) ग्रंथाच्या प्रस्तावनेंत सविस्तर मांडलें आहे. त्यांच्या आक्षेपांस अनेक लोकांनीं अनेक वेळां उत्तरें दिलीं आहेत. डॉ. गर्दे यानीं वैद्यकांतील वायु, पित्त व कफ या शब्दांच्या अर्थाचा विपर्यास केला आहे. त्यांच्या मतें वायु म्हणजे श्वासोच्छवासांतून व गुदद्वारांतून बाहेर पडणारा जो वारा तो, व पित्त म्हणजे वांतींतून हिरवें पिंवळें पडतें तें, व कफ म्हणजे खोकला या विकारांत जो घशांतून चिकट पदार्थ पडतो तो. हे वायु, पित्त व कफ आर्यानीं रोगकारण मानले (कारण प्रत्यक्ष दिसतात) व नंतर जसजशी त्यांची समजूत वाढली तसतसे सर्व शरीरांतील कार्यांचे ते (त्रिदोष) प्रवर्तक होतं अशी त्यांनीं आपली समजूत करुन घेतली. डॉ. गर्दे यांच्या आक्षेपाचें स्वरुप थोडक्यांत वरीलप्रमाणें आहे; व पुढें त्यांनीं असेंहि म्हटलें आहे कीं, हल्ली आंग्लवैद्यकांतील रोगकारणांचें ज्यांस ज्ञान आहे त्यांस त्रिदोष हे रोगकारण आहेत ही गोष्ट मिथ्या वाटणारी आहे. वरील डॉ. गर्दे यांच्या म्हणण्यांत मुख्य मुद्दा हा आहे कीं आंग्लवैद्यकांत जसें (विकृत अवयव हें) रोगांचें कारण हल्लीच्या शास्त्रांनीं प्रत्यक्ष दाखवितां येतें तसें त्रिदोष हें रोगांचें कारण म्हणून दाखवितां येत नाहींत. यावर आर्यवैद्यकाचें म्हणणें असें कीं, रोगकारण डोळ्यांनीं जें दिसतें (म्हणजे बिघडलेले सप्‍तधातू) तें खरें कारण नाहीं. खरें रोगकारण म्हणजे हे धातू ज्या पदार्थांनीं बनतात त्या अन्नावर ज्या पदार्थांचें संस्कार घडतात व ज्यांच्या साहाय्यानें तें अन्न धातुरुप पावतें त्या पदार्थांतील विकृति नाहींशी केली म्हणजे धातूंवर (शरीरावयवांवर) दिसत असलेला रोग नाहींसा होतो.

इंग्रजी वैद्यकांत रोगाचें निदान म्हणजे बिघडलेल्या शरीरावयवाचें वर्णन होय. उदाहरणार्थ एक प्रकारचें डोकें दुखणें (ब्लड प्रेशर) या रोगाचें कारण डोक्याकडे रक्तप्रवाह जास्त गेल्यानें तेथील वातवाहिन्यांवर रक्ताचा जास्त दाब पडला असतां तो दाब कमी करणारीं म्हणजे रक्तप्रवाह मंद करणारीं औषधें म्हणजे हृदयाची क्रिया मंद करणारीं औषधें देणें, ही डोकें दुखण्याची चिकित्सा होते. आर्यवैद्यकाप्रमाणें वायु हा दोष बिघडल्यानें डोकें दुखतें व तो वायु प्रथम स्वतःच्या आशयांत (स्थानांत) वाढून जेव्हां तो रक्तावर परिणाम करतो तेव्हां शिरोरोग होतो. म्हणजे रक्ताचा दाब जास्त होणें हें डोकें दुखण्याचें जें स्थानिक कारण तो रोग नसून डोक्याकडे रक्तप्रवाह जास्त करणारा जो वायु तोच खरा रोग होय; व आर्यवैद्यकाच्या मतें त्या वायूवरच डोकें दुखणें तात्पुरतें थांबेल परंतु मूळ कारण जें वात कोप तें दूर होणार नाहीं. चरकाचार्यांनां शिरोरोगांत रक्तदुष्टि होते ही गोष्ट माहीत होती. कारण शिरोरोगाचें निदान लिहितांना ''वासादयः प्रकुप्यंति शिरस्यस्त्रं प्रदुष्यति।'' (चरक सूअस्थान, अध्याय १७ वा. ११) असें म्हटलें आहे. या श्लोकावरील टीकाकार चक्रदत्त यानेंहि ''अस्त्रं प्रदुष्यतीत्यभिदधानः सर्व शिरोरोगे रक्तदुष्टिं दर्शयति ।'' असें लिहिलें आहे. परंतु शिरोरोगाचें खरें कारण वातादिकांची दुष्टि हेंच आहे असें लिहून औषधोपचार दोषांवरच करावे असें लिहिलें आहे. रक्त दुष्ट होतें ही गोष्ट माहीत असून ती गोष्ट चरकाचार्यांनीं गौण मानली आहे.

प्रत्येक रोगांत कोणता तरी शरीरावयव बिघडतो ही गोष्ट प्राचीन वैद्यांस माहीत होती. चरकाचार्यांनीं सूत्रस्थानांतील त्रिशोधीयाध्यायांत कांहीं उदाहरणें देऊन ही गोष्ट स्पष्ट केली आहे. तथापि त्यांचा मुख्य रोगवर्णनाचा रोख विकृत अवयवांवर नसून विकृत दोषांचें त्या त्या रोगांत वर्णन करण्यावर आहे. म्हणून त्याच्या पुढील अष्टोदरीयाध्यायांत कोणताहि शरीरावयव बिघडलेला रोग दोषांनींच होतो अशा अर्थाचें विधान स्पष्ट केलें आहे (तथा स्वधातुवैषम्य निमित्ताः सर्व विकाराः वातपित्तकफान्नातिवर्तते।). यावरुन आर्यवैद्यकांतील प्राचीन ग्रंथाकारांस प्रत्येक रोगांत शरीरांतील कोणता तरी अवयव विकृत होतो ही गोष्ट पूर्णपणें कळून आली होती. परंतु या अवयवविकृतिवर्णनानें खरें विकृति वर्णन होत नाहीं असें त्यांचें अनुभवसिद्ध मत असल्यामुळें प्रत्येक रोगांत विकृतावयवांचेंच वर्णन न करतां खरें रोगकारण जे दोष त्यांचेंच वर्णन केलें आहे व यामुळें आजच्या इंग्रजी वैद्यकांतील रोगनिदान, मुख्यतः अवयवांच्या विकृत स्थितिवर्णनावर अधिष्ठित आहे म्हणू, आर्यवैद्यकाच्या निदानाशीं जुळत नाहीं. आजचें म्हणण्याचें कारण इंग्रजी वैद्यक सुद्धां जंतुशास्त्र आणि अंतर्ग्रंथिशास्त्र यांच्या मार्गें आर्यवैद्यकाप्रमाणेंच विकृत अवयवापेक्षां सूक्ष्य अशा रोगकारणांच्या शोधास लागलें आहे. सदरहू म्हणण्याच्या पुष्टिकरणार्थ आर्य वैद्यकासंबंधानें मद्रासकडील रिपोर्टांतील श्रीनिवासमूर्ति यांच्या लेखांतील पुढील उतारा देतों.

''अलीकडील पाश्चात्य इंद्रियविज्ञानशास्त्रवेत्यांचे पेशीकल्पना (सेल्युलर थिअरी) हें आरंभस्थान होय; आणि या कल्पनेच्या वाढीमुळें ग्रीक लोकांच्या त्रिरसालकल्पने (ह्युमरल थिअरी) चें उच्चाटण झालें आहे. परंतु पाश्चात्य पेशीकल्पनेंतील पेशीच्या सूक्ष्मपणापेक्षां किती तरी पटीनें अधिक सूक्ष्मपणा आयुर्वेदांतील त्रिधातुकल्पनेमध्यें अभिप्रेत आहे. कारण त्रिदोषांचा संबंध सूक्ष्म असा पंचमहाभूतांशीं व त्रिगुणाशींहि आहे. किंबहुना पाश्चात्य वैद्यकांतील पुराणपेशी कल्पना जेथें संपते तेथून पुढें आयुर्वेदाच्या त्रिदोषकल्पनेस सुरुवात होते असें म्हणण्यास हरकत नाहीं. म्हणून प्रचलित पाश्चात्य इंद्रियविज्ञानांतील कोणत्याहि भागाशीं त्रिदोषांच्या उपपत्तीची बरोबर तुलना आज करतां येणार नाहीं असें वाटतें. परंतु थोड्याच दिवसांत अशा प्रकारची तुलना करतां येईल असें दिसतें. या बाबतींतील पाश्चात्य शास्त्रज्ञांचे अगदी अलीकडील शोध हे पुष्कळसे आयुर्वेदीक भासतात. जीवनरस (प्रोटोप्लझम), चैतन्यबिंदु (न्यूक्लियस), व केंद्रस्थान (सेंट्रोसम) हेच ज्यांतील मुख्य भाग आहेत अशा साध्या पेशींमध्यें सुद्धां अलीकडील जीवशास्त्रज्ञांस, याहि पेक्षां सूक्ष्मतर असे क्रोमोसोम, इदस्, बायोफोर व आणखीहि महत्त्वाचे अवयव दिसूं लागले आहेत (अशा प्रकारचे अणु परमाणू हे मात्र वात, पित्त, कफ, यांच्या परिमाणाप्रमाणें भासतात). ''रोगप्रतिबंधक व्यक्तीच्या कल्पना (थिअर ऑफ इम्युनिटी) क्षेत्रांत जर आपण पाहूं लागलों तर पूर्वीची पेशींची साधी कल्पना पार जाऊन, त्यामध्यें हेप्टोफोर, अंबोसेप्टर, कांप्लीमेंटोफाईल, अर्गोफोर, आपसोनि नस्, आग्लुटिनिनस्, प्रेसिपिटनस्, सायटोलायसिनस्, अलेक्झीनस्, सेनसिटायझेझन, अनाफिलाक्सीस् यांसारखे अति सूक्ष्म व गुंतागुंतीचे आणि कल्पनामय असे निरनिराळे अवयव जुन्या पेशीकल्पनेच्या पुरस्कत्यांनां दिसूं लागले आहेत. नूतन कल्पनांचा हा आश्चर्यमय पसारा आधुनिकांनीं ज्या गोष्टींच्या वर्णनाकरितां मांडलेला आहे, त्या गोष्टी तरी त्रिधातुकल्पनेइतक्याच बहुशः कल्पनामय आहेत; आणि त्यांचाहि कलुष (कोलॉइडस्) व जीव रसायनांतील (वायोकेमिस्ट्री) रसकल्पनेकडे स्पष्ट कल दिसत आहे.

त्याचप्रमाणे अंतर्मुखपिंड व मन यांसंबधीं विवेचन करतांना पाश्चात्य शास्त्रज्ञहि आतां शारीररस आणि मानसिक भावना यांचा परस्परावर प्रभाव चालतो असें बोलूं लागले आहेत. मग हे आधुनिकांचें म्हणणें आणि वाताची, उत्साहास, कफाची क्षमेस, व पित्ताची बुद्धीस प्रेरणा मिळते हें आयुर्वेदिकांचे म्हणणें यांत तफावत ती काय ? या माझ्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ पाश्चात्य शास्त्रज्ञ प्रो. गुडार्ड यांचा एक दाखविलें आहे कीं अधिवृक्कपिंडास प्रेरणा दिली असतां क्रोधाचा प्रादुर्भाव होतो, आणि उलट अन्य रीतीनें क्रोध उत्पन्न झाला असता अधिकवृक्कपिंड स्त्रवूं लागतो. असे अनेक अंतर्मुखपिंड शरीरामध्यें असून ते अनुवर्तिनसाव्यूहांत गुंफलेले आहेत व त्यांचाहि वरील उदाहरणाप्रमाणें मनोभावनांवर प्रभाव चालत असण्याचा संभव आहे.''

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .