प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या   
        
त्रिंबकजी डेंगळे— हा आरंभीं दुसर्‍या बाजीरावाच्या पदरीं जासूद किंवा हेर म्हणून एक नोकर होता. इ.स. १८०२ मध्यें बाजीराव जेव्हां होळकराच्या तडाक्यांतून सुटण्याकरितां पुण्याहून महाडास पळून गेला तेव्हां त्रिंबकजीनें अगदीं थोड्या वेळांत बाजीरावाचें पुण्यास एक पत्र पोहोंचवून त्याचें ताबडतोब उत्तर आणू दिल्यामुळें पेशव्याची मर्जी प्रसन्न होऊन त्याला खास तैनातींतील जागा मिळाली. तेथें त्रिंबकजीची हुषारी, तडफ, तरतरीतपणा, व कामांतील दक्षता विशेष दिसून तो बाजीरावाचा विश्वासु बनला. पुढें पेशव्यानें तोफखान्यावरील सरदार गणपतराव पानशे याची जहागीर जप्‍त करुन त्रिंबकजीची त्याच्या जागेवर नेमणूक केली. त्रिंबकजी प्रथम माणकेश्वर व खुश्रूजी यांची मर्जी संपादन करण्याची खटपट करीत होता. परंतु त्यांचा अर्धवट कल इंग्रजांकडे दिसूं लागल्यामुळें ही गोष्ट त्यानें लागलीच बाजीरावाच्या कानावर घातली. पुढें माणकेश्वराच्या जागीं तो स्वतःच बाजीरावाचा मंत्री झाला.

इ.स. १८१२ मध्यें चतरसिंगानें पेशव्यांविरुद्ध दंगा माजवून बागलाणांतून स्वदेशीं जात असतां यानें त्यास कैद केलें व बेड्या घालून कांगोरीच्या किल्ल्यांत कैदेंत ठेविलें. चतरसिंगास सोडविण्याचे अनेक प्रयत्‍न झाले व एका तोतयानें तर त्याच्या नांवावर बंड आरंभून लुटालूट सुरु केली. तत्पक्षीय लोक संधि सांपडतांच त्रिंबकजीचा जीव घेण्यास टपून बसले होते. पुढें १७१३ सालीं खुस्त्रूजीनें कर्नाटकच्या सरसुभेदारीच्या जागेचा राजीनामा दिला तेव्हां बाजीरावानें त्या जागीं त्रिंबकजीची नेमणूक केली.

वसईच्या तहानें आपलें स्वातंत्र्य नष्ट झाल्याची जाणीव रावबाजीस मधून मधून होई व तें पुन्हां मिळविण्याची त्याची इच्छाहि होती. पण स्वतः कर्तबगार व धाडशी नसल्यानें कोणाची तरी त्याला मदत लागे. असे विश्वासु मदतनीस त्याच्याजवळ यावेळीं फारसे कोणी शिल्लक राहिले नव्हते. बहुतेकांनीं इंग्रजांशीं स्वतंत्र तह करुन आपापला स्वार्थ सांभाळला होता. त्यामुळें व त्रिंबकजी धाडशी असल्यानें पेशव्यानें त्यालाच हाताशीं धरिलें. त्रिंबकजी हा इंग्रजांचा द्वेष्टा होता. इंग्रजांचा कावा ओळखून त्याला तोड देणारा व मराठी साम्राज्य टिकविण्यासाठीं धडपडणारा त्रिंबकजी हा बापू गोखल्याप्रमाणें पेशवाईंतील शेवटचा पुरुष. त्यानें फौज जमविण्यात प्रारंभ केला व तिच्या जोरावर पुन्हां इंग्रजांशीं दोन हात करुन पहाण्याचा उद्योग चालविला या कामीं इतर सरदारांनीं मदत करावी म्हणूनहि त्यानें खटपट चालविली. सारांश हीं सर्व कृत्यें इंग्रजांच्या हेतूच्या (पेशवाई घेण्याच्या) आड येत म्हणून त्यांनीं त्रिंबकजीचा कांटा दूर करण्याचें ठरविलें. नाना फडणिसानंतर इंग्रजांनां त्रिंबकजीचा धाक होता.

त्रिंबकजीनें महत्त्वाचीं ठाणीं आपल्या विश्वासू माणसांच्या ताब्यांत देण्याचा उपक्रम केला. दक्षिणेंस धारवाडचा किल्ला मजबूत असल्यानें तो कबजांत घेण्याची त्यानें खटपट केली, परंतु तेथील किल्लेदार किल्ला त्याच्या हवालीं करीना, तेव्हां बापू गोखले यानें मध्यस्थी करुन किल्ला त्रिंबकजीस देवविला (१८१४) या वर्षी त्रिंबकजीनें पेशव्यास सल्ला देऊन त्याच्याकडून होळकर, शिंदे, बोंसले व पेंढारी यांच्या दरबारी इंग्रजांविरुद्ध दोस्ती करण्यासाठीं आपले वकील रवाना केले. पुढल्या वर्षी त्रिंबकजीची ब्रिटिश वकीलातीकडे नेमणूक झाली. अलीकडे पेशवे त्याच्या मुठींत आले होते. यावेळीं त्यानें राज्यांतील अव्यवस्था मोडण्यास प्रारंभ केला. तो कडक शिस्तीचा होता. त्याच्या शिक्षा सौम्य तर कधीं अत्यंत कडकहि असत. ठरल्याप्रमाणें इनामदार लोकांनीं चुकारपणा करुन वसूल भरणा केला नाहीं तर तो त्यांनां शिक्षा करी.

१८१४ सालीं त्रिंबकजीनें गुजराथेंत सरकारी फौज पाठवून गायकवाडाकडे इजार्‍यानें असलेले प्रांत ताब्यांत घेतले. कारण यावेळीं गायकवाडाचा गुजराथ इजार्‍यांचा करार संपला होता व नवीन करार करवायाची गायकवाडाची इच्छा होती.त्यासाठीं त्यांचा दिवाण गंगाधरशास्त्री पटवर्धन हा पुण्यास पेशव्यांकडे आला. शास्त्री फार हट्टी, हेकट व इंग्रजांच्या बळावर सर्वांस तुच्छ लेखणारा होता. गायकवाडाकडे सरकारची बाकी १ कोटी निघाली. ती देऊन मग वाटल्यास पु्न्हां इजारा देण्यांत येईल असें दरबारांत ठरलें; परंतु गायकवाडानें (शास्त्र्यानें) तें नाकारिलें व हें प्रकरण चिघळत चाललें. इतक्यांत पंढरपुरास शास्त्र्याचा खून झाला. या खुनाचा आरोप इंग्रजांनीं त्रिंबकजीवर केला; परंतु यास स्पष्ट आधार त्यांनीं दिले नाहींत. अलीकडील ऐतिहासिक शोधांवरून हा खून त्रिंबकजीनें केला नाहीं उलट गायकवाडींतील शास्त्रायाच्या विरुद्ध पक्षांतील लोकांनींच केला असें ठरत आहे. त्यावेळीं सिताराम नांवाच्या एकप्रभु माणसाची खटपट शास्त्रयाऐवजीं आपल्याला गायकवाडाची दिवाणगिरी मिळावी अशी होती. त्यासाठीं त्यानें फौज जमविली होती व याच सुमारास इंग्रजांनीं त्याला कैदेतहि ठेविलें होतें; यावरुन त्याच्या पक्षाकडून हा खून झाला असावा. इंग्रज त्याला दिवाणगिरी देत नव्हते. शिवाय शास्त्र्यांचा खून करण्यांत पेशव्यांचा (अर्थांत् त्रिंबकजीचा) मुळीच फायदा नव्हता, कारण त्यामुळें गुजरात हातची जात होती, उलट जिवंत राखण्यांतच फायदा होता असें क.वॉलेस म्हणत. अर्थात् आपल्या मार्गांतील कांटा काढण्यासाठीं इंग्रजांनीं खुनाचा आरोप त्रिंबकजीवर केला.

त्रिंबकजीनें आपला खुनाशीं कांही संबंध नाहीं किंवा आपणांस त्यासंबंधीं कांहीं माहितीहि नाहीं असे चक्क सांगितले. तथापि इंग्रज रेसिडेंटानें आपल्या फौजेच्या बळावर त्रिंबकजीस आपल्या स्वाधीन करण्याविषयीं बाजीरावाच्या मागें लकडा लावला. पण बाजीराव त्यास इंग्रजांच्या हवालीं करण्यास कांकूं करूं लागला. शेवटीं नाइलाजानें बाजीरांवानें त्रिंबकजीस वसंतगड नामक किल्ल्यांत अटकेंत ठेविलें; तरीहि इंग्रजांचें समाधान न होतां त्यांनीं त्रिंबकजीस आपल्याच हवालीं करण्याचा तगादा लाविला तेव्हां गांगरून (आणि अंगीं धैर्य नसल्यानें) बाजीरावानें त्यास इंग्रजांच्या स्वाधीन केलें (२५ सप्टेंबर १८१५).

इंग्रजांनीं त्रिंबकजीस ठाण्याच्या किल्ल्यांत अटकेंत ठेवले. याच्यावर जे पहारेकरी ठेविले होते त्यांत बहुधा, खबरदारी घेण्याचा उद्देशानेंच, एकहि हिंदी माणूस ठेवला नव्हता. ह्याचा फायदा घेऊन त्रिंबकजीनें सप्टेंबरच्या १२ दरम्यान तटावरुन उडी मारुन आपली सुटका करुन घेतली. त्रिंबकजी निसटून जाण्याच्या कांहीं दिवस अगोदर त्याची मित्रमंडळी व नोकरचाकर आसमंतांत येऊन त्याची वाट पहात होते. त्रिंबकजीस त्यांचा निरोप कळविण्याचें काम किल्ल्यांतील एका अधिकार्‍याच्या मोतद्दरानें केलें. त्रिंबकजीस ज्या खोलींत ठेविलें होतें तिच्या खिडकीखालीं आपल्या घोड्याची चाकरी करीत असतां हा मोतद्दार त्रिंबकजीस कळवावयाची माहिती अगदीं बेफिकीरपणानें गात असे. पहारेकर्‍यांस मराठी येत नसल्यामुळें त्यांनां ही लबाडी ओळखतां आली नाहीं. त्रिंबकजीनें ज्या अडचणींतून आपली सुटका करुन घेतली ती हकीकत ऐकून लोकांत त्याच्याबद्दल कौतुक व आदर वाढला. यानंतर त्रिंबकजीनें पुन्हां फौज जमवून कधीं नाशिक व संगमनेर यांच्या आसमंतांतील डोंगरांत, कधीं खानदेश बागलाणांत तर कधीं सातार्‍याकडील महादेव पर्वतांत फिरून इंग्रजांच्या विरुद्ध त्यानें दंगा उसळून दिला. त्याला पकडण्यासाठीं इंग्रजांनीं फार खटपट केली, परंतु पुष्कळ दिवस ती सिद्धीस गेली नाहीं. त्याचा खरा पत्ताच लागेना. तो आपल्या सासुरवाडीस (नाशिक जिल्हा, निफाड तालुका, निफाडहून वायव्येस ५ कोसांवर) अहिरगांवीं गुप्‍तपणें राहिला होता.

यावेळीं कोरेगांवची लढाई होऊन एलफिन्स्टननें आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता; त्याप्रमाणें पेशवाईंतील सर्व मराठे सरदार, इनामदार इंग्रजांनां मिळाले होते व रावबाजी एकटे पडले. इंग्रजांनीं तशाहि स्थितींत त्रिंबकजी हा पेशव्यांच्या तर्फे धुमाकूळ घालीत असल्यानें त्याला पकडण्यासाठीं मोठमोठीं बक्षिसें लाविलीं. तेव्हां एका स्त्रीनें व त्रिंबकजीचा नोकर नाना यानें फितूर होऊन, ब्रिग्ज यांस त्रिंबकजीच्या ठिकाणाची माहिती दिली. कॅ. स्वान्स्टन हा एक हजार घोडदळाची पलटण घेऊन अहिरगांवीं आला. यावेळीं त्रिंबकजी तेथें एकटाच होता; फौजपांटा मुळींच नव्हता. गांवची नाकेबंदी करुन इंग्रजांनीं पहाटें त्रिंबकजीच्या वाड्यास गराडा दिला. वाडा दोनदां तळघरें बळदासंकट शोधला, परंतु त्रिंबकजी सांपडेना. शेवटीं तिसर्‍यानें पुन्हां शोधला तेव्हां मात्र त्रिंबकजी सांपडला. एका बळदांत एका लोखंडी चोरदाराच्या पलीकडे बुरूजावर जाण्याचा एक जिना होता. तेथली भिंत त्रिंबकजी फोडीत होता. त्याला धरण्यास जात असतां जिन्यावरील एका मराठ्यानें त्यांनां अडथळा केला. जीं जीं माणसें धरण्यास गेलीं तीं या मराठ्यानें आपल्या भाल्यानें ठार केलीं. त्यांची संख्या तीस भरली. शेवटीं स्वान्स्टननें भालाइतावर गोळ्या झाडण्यास हुकूम केला व त्यामुळें मात्र तो मराठा पडला. असा तो शूर भालाईत पुरुष नसून (त्रिंबकजीची) स्त्री आहे हें समजल्यावर स्वान्स्टन यास फार आश्चर्य वाटलें. त्रिंबकजी भिंत फोडीत असतां, त्याच्या अंगावर जाण्याची हिंमत कोणाचीच होईना तेव्हां निराशेनें त्रिंबकजी आपणच होऊन इंग्रजांच्या स्वाधीन झाला. त्यास नंतर बंगालमध्यें एका किल्ल्यांत (चुनार) अखेरपर्यंत कैदेंत ठेविलें. त्याची ९० हजार रुपयांची मालमत्ता इंग्रजांनीं जप्‍त करुन ती स्वान्स्टन यास बक्षीस दिली (जून १८१८). (डफ; नाशिक ग्याझेटियर; राजवाडे खंड ४).

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .