प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या    
       
त्वग्रोग (स्किन डिसीझेस)— शरीरांतील इंद्रियें व रचना या ठिकाणीं ज्याप्रमाणें नाना रोग उत्पन्न होतात तसेच ते त्वचा या रचनेमध्येंहि होतात या रोगांपैकीं कांहीं मुख्यांचें स्वतंत्र वर्णन दुसरीकडे आलें आहे. शरीराची इतर सर्व ठिकाणची रचना, संधायक रचनेमध्यें नाना प्रकारच्या जीवनपेशींच्या योगानें बनली आहे. तशीच स्थिति त्वचेचीहि आहे. मात्र फरक एवढाच कीं, त्यापैकीं बाह्य त्वचेंतील पेशी एकमेकांस चिकटून पसरून त्याचा विस्तार होत असतो. इतर रचनेप्रमाणें तो विस्तार त्वचेची जाडी अगर खोली वाढविण्यांत खर्च होत नाहीं. म्हणून त्वचेचे रोग आंत फारसे खोल न शिरतां त्यांची भोंवतालीं पसरण्याची प्रवृत्ति असते व बहुतेक त्वचेच्या रोगांचा आकारहि बहुधा वर्तुळाकार असतो. हे रोग परोपजीवी जंतूमुळें (गजकर्ण वगैरे) उद्भवले असतील तर हा वर्तुळाकार विशेष लक्षांत येण्यासारखा व नियमित असतो. दुसरें हेंहि लक्षांत ठेंविलें पाहिजे कीं, एकंदर त्वचेच्या क्षेत्रफळाचा विचार केला असतां व त्वचा ही नेहमीं उघडी असल्यामुळें कोणतेहि दाह, इजा, मारहाण, शीतोष्णादि कारणाचे परिणाम तिजवरच अधिक घडण्याचा संभव असल्यामुळें जंतुजन्य व इतर रोग कातडींत फार होतात यांत नवल नाहीं, मात्र आरंभापासून रोगाचें प्रत्येक स्थित्यंतर या त्वग्रोगाचें जसें आपणास पाहण्यास मिळतें तसें इतर रोग पहातां येत नाहींत.

या त्वग्रोगाचें वर्गीकरण तरी कोणत्या दिशेनें व कोणत्या तत्त्वावर करावें याविषयीं वरच्यावर मतें पूर्वी बदलत गेलीं आहेत. पूर्वी जेव्हां जंतुशास्त्र व सूक्ष्मदर्शकयंत्र अज्ञातावस्थेंत होतें तेव्हां फक्त बाह्य रोगलक्षणांवरून-म्हणजे लाली, फोड, खपल्या, कोंडा यांपैकीं जो आकरा व जें स्वरूप दिसेल तसें वर्गीकरण करीत असत; व ते शास्त्रशुद्ध नसलें तरी सोयीच्या दृष्टीनें जंतुजन्य त्वग्रोगाची संख्या जोपर्यंत थोडी होती तोंवर तें वर्गीकरण अगदींच टाकाऊ नव्हतें. परंतु पुढें जंतुशास्त्राची फार प्रगति होऊन असें होऊं लागलें आहे कीं, एका रोगास एका पंडितानें जंतुजन्य म्हणावें व दुसर्‍यानें त्यास मज्जाविकृतिजन्य म्हणावें व तिसर्‍यानें कारण अज्ञात आहे. असें म्हणावें. याप्रमाणें पूर्वीपेक्षां हल्ली वर्गीकरण बदलत आहे. बाह्यत्वचेचे पांच पापुदरे असतात, व अंतस्त्वचा अगर खरी त्वचा दोन पापुदर्‍यांची बनलेली आहे. याशिवाय त्वचेंत रक्तवाहिन्या, केश, धर्मपिंड, तैलपिंड वगैरे त्वचेसंबंधीं रचना आहेत त्या सर्वांनां रोग हे होतातच. तेव्हां या सर्वांचें नक्की ज्ञान वैद्यास अवगत पाहिजे. ज्याविषयीं विशेष वाद नाहीं अशा प्रकारच्या रोगांचे कारणानुसार वर्गीकरण खालीं दिलें आहे.

त्वचेंतील मज्जातंतूत विकृति उत्पन्न  होऊन झालेले रोग— यांतहि उपभेद आहेत ते— (अ) स्पर्श संज्ञानांत विकृति होऊन त्वचेंतील सुनबहिरेपणा, मिरमिरणें, मुंग्या येणें व कंडुरोग. (आ) सूक्ष्म रक्त वाहिन्यांतील विकृतीमुळें पित्ताच्या गांधी अंगावर उठणें, अंगावर लाली उठणें, त्वचेवर सूज (मज्जाविकृतिजन्य) येणें, त्वग्रूक्षता अथवा पेलाग्रारोग, नीलरक्तपित्त, कांहीं प्रकारचे इसब, चिखल्या, अंग फुटणें, बारीक ग्रंथियुक्त त्वचेवर लाली, जर उतणें, पांढरें कोड व त्वेचेच व्रणंसंबधीं रोग. (इ) त्वचापोषणक्रिया बिघडल्यानें होणारा त्वचा घनतारोग, खोल चरत जाणारा पावलांतील व्रण, सांध्यांतील चार्कोटरोगसंबंधीं व्रण, व शय्याक्षतें, महारोगांपैकीं त्वचेवरील कांहीं रोग, रेनार्डचा दोन्ही बाजवांकडे होणारा कोथरोग, त्वग्स्फोट, ल्यूपसरोग वगैरे. (ई) धर्मपिंड, तैलपिंड, केश व नखासंबंधीं रोग— जसें, धर्माधिक्यरोग, रक्तधर्मरोग, ब्रोमाइडोर्त्सर्जक पुळ्या, घामोळ्याच्या पुटकुळ्या, उन्हामुळें अंग फुटणें, तैलपिंड मुखावरोधामुळें पुटकुळ्या, गळवें, बहुस्निग्धतारोग वगैरे

त्वचेमध्यें संसर्गामुळें रुजण्यासारखे रोग— हे रोग नाना प्रकारच्या जंतूंमुळें होतात. त्यांचे प्रकार (अ) प्राणिजजंतुजन्य; असें खरुज, उवा, नारु, डुकराच्या व इतर चांगलें न शिजलेल्या मांसाहारामुळें येणारा स्नायुस्तंभतारोग (ट्रायकीनोसिस), हस्तिपादरोग (एलेफंटायासिस), शेतांतील मत्कुणदंशरोग, जिग्गरदंशरोग, व वालुमक्षिकादंशरोग (हे शेवटचे रोग उष्णकटिबंधांतील प्रदेशांत आढळतात). (आ) उद्भिज्जजंतुजन्य रोग— गजकर्ण, लुत भरणें, दाढीस होणारें गजकर्ण व दद्रुरोग, पुळीचा मदुरा, पावलाचा रोग, एसपर जिलोसिस व पिंटोरोग (हा खबुतरें पाळून त्यांनां चारा घालणारांनां होतो). (इ) सूक्ष्मदर्शनीय टेप्टोकॉकाय आणि स्टॅफिलोकॉकायनामक पूयोत्पादकजंतूमुळें होणारीं गळवें, काळपुळी, व इतर नाना प्रकारचें त्वचेचे रोग व इसबाचे कांहीं प्रकार; विशेषतः पू होऊन चिघळणारे व लस वहाणारे. यांपैकीं कांहीचें जंतु अद्याप नक्की समजले नाहींत.

एकंदर शरीरांत भिनलेले अगर भिनण्यासारखे रोग— क्षयजंतू त्वचेंत रुजून त्यामुळें होणारा ल्यूपस नामक रोग तत्संबंधीं व चामखीळ, लाली व व्रण,. या सर्वांत कॉकनें शोधून काढलेला क्षयजंतू विकृत त्वचेमध्यें सांपडतो. स्पायरोकेटा पॅलिडानामक फिरंगोपदंशाच्या जंतूमुळें त्या रोगाच्या तीनहि अवस्थांतील नाना प्रकारचे अंगावर उठलेले पुरळ, फोड कापरें, गळवें, व्रण, क्षतें, डाग, लाली, गांठी, मोड, घरें, चरे, कोंडा, खरका, पुळ्या. त्याचप्रमाणें महारोग अगर गलत्कुष्टांतील नाना प्रकारचे त्वचेवरील रोगप्रकार, वॉज, ग्लँडर्स, एंथ्राक्स हे रोग तसेंच, देवी, गोंवरादि सांथीच्या तापांतील येणारा पुरळ, फोड वगैरे.

ज्यांचें कारण अद्याप निश्चित समजलें नाहीं असे रोग— त्वचेचे खवले व कोंडा याचे मोठाले पापुदरे निघणें, तांबडे शिबें व इतर कांहीं रोग.

पोटांत कांहीं प्रकारचीं औषधें घेऊन त्वचेवर दिसणारे प्रकार— क्लोरल, बेलाडोना, कोपेबा एँटिपैरिन, पारा, कोयनेल, डामर, स्ट्रॅमोनियम, सल्फोनल, सॅलिसिलिक आसिड व सोडासॅलि सेलट यामुळें व रोग बरे करण्यासाठीं लस टोंचून घालतात तेव्हां कधीं त्वचेवर पुरळ व लाली येते.

त्वचेवर नवीन गांठीं प्रमाणें उत्पन्न होणारे रोग— (अ) सुसाध्य-जखमांचे व इतर व्रण, तंतुरचनामय बारिक ग्रंथि, रक्तवाहिनीयुक्त बारिक गांठी, रसग्रंथि, स्नायुग्रंथि कॉलीफ्लावरप्रमाणें दिसणार्‍या ग्रंथि, बारिंक पिंडग्रंथि, त्वचाग्रंथि, चामखीळ त्वेचवरील बारिक कोटरग्रंथि वगैरे असाध्य व कष्टसाध्य ग्रंथियुक्त त्वचारोग, सार्कोमा, क्यान्सर, खोल चरत जाणारा चेहर्‍यावरील व्रण.

त्वचारोगासंबंधीं कांहीं लक्षांत ठेवण्यासारखे मुद्दे— (१) त्वचा हेंहि एक महत्वाचें इंद्रिय असल्यामुळें इतर रचना व इंद्रियें यांनां, रक्ताभिसरणांतील फेरबदल, दाह, सूज, परोपजीवीजंतु, नवग्रंथिरोग, स्थूलीभवन, विरलता, क्षीणता, गात्र संकोचन या कारणांमुळें रोग होतात तसें ते त्वचेसहि होतात.

मूळ रोग एक असून त्याचें बाह्यचिन्ह त्वचेंत दिसून येणें हा प्रकार उन्माद रोगामध्यें स्पर्शज्ञानविकृत होणें व मोठे मज्जातंतु बिघडल्यामुळें शय्याक्षतें अगर खोल चरत जाणारे व्रण, महारोग वगैरे रोगांमुळें दिसून येतो. (३) कांही खनिज प्रकारचीं विषें (फास्फरस, पारा यांसारखी) अगर नील रक्तपित्त व अन्य कांहीं रोगांत एक प्रकारचें विष शरीरांत आपोआप बनून त्यामुळें त्वचारोग उत्पन्न होतो. हाच विपबाधेचा परिणाम देवी, गोंवर, मधुरा, विषमज्वर, क्षय या रोगांत त्वचेवर दिसून येतो. (४) अंगावर एकाएकीं पित्ताच्या गांधी उठतात तीहि एक प्रकारची आत्मविषबाधाच कांहीं विशिष्ट प्रकारचें आपणास न मानवणारें अन्न खाल्यामुळें होते व पांडुर कुष्टवात व मुरलेला हिमज्वर यासारख्या प्रकृतींत मुरलेल्या कारणामुळें हि ह्या पित्ताच्या गांधी उठतात, मनोवृत्तींत गहिंवर,चंचलता, राग, लोभ, या कारणानें पालट होऊनहि व कांहीं कीटकांचा दंश होऊन त्यामुळें गांधी उठतात व एकाएकीं लवकर मावळतात. (५) लाली म्हणून एक त्वचारोगप्रकार वरील रोगनामावलींत आहे त्याचीहि कारणमीमांसा दाह व सूज (कारण यांतहि लाली असते) यांशीं न जमतां पित्ताच्या गांधीच्या कारणांशीं अधिक जुळतें. (६) कांहीं औषधें बाहेरुन त्वचेस लागल्यास फोड व पुरळ येतो-जसें, जायफळाचें तेल व दुसरीं औषधें; कांहीं औषधांमुळें तीं थोड्या प्रमाणांत कांहीं थोडे दिवस लावल्यानें कांहीं प्रकृतीच्या माणसांनां इसबासारखा रोग होतो. (७) इसब हा एक महत्त्वाचा रोग आहे, तथापि गजकर्ण व खरुज या रोगांत विकृत भागांत खाज सुटून त्या दाहामुळें त्या जागीं मुळ त्वचारोग व इसब हे दोन्हीं रोग जडतात. (८) वरील रोग बहुधा बाह्य त्वचेंतील रोग असतात. परंतु अंतस्थ त्वचेंत विशिष्ट प्रकारच्या नाना जंतूंमुळें होणारे धांवरे, गळवें, एंथ्राक्स, ग्लँडर्स. (९) त्वचा रोगांतील पुरळ व फोडास स्वयंनिर्णय जणूंकाय सामर्थ्य असावें अशाप्रकारें पुष्कळ रोगांत ठराविक जागींच उद्‍भव होतो. इसब, कंडुरोग, कांहीं औषध पोटांत घेऊन व लस टोंचल्यामुळें येणारी लाली, देवी गोंवरादि सांथीच्या तापांचे फोड व पुरळ, फिरंगोपदंशांतील प्रथमावस्थेतं दिसणारे फोड व पुरळ हे शरीराच्या डाव्या व उजव्या दोन्हीं बाजूंस व सर्वांगावर दिसून येतात; परंतु जर उटल्याचे फोड, गजकर्ण, फिरंगोपदंशाचे तृतीयावस्थेंतील फोड, पुरळ व क्षतें, व्रण, नवग्रंथीचा उद्‍भव हे त्वचारोग कोणत्या तरी एका बाजूसच दिसतात. हातापायाच्या तळव्याकडील भाग व आपोआप झांकले मिटले जाणारे जसे मांडी कोपर, कांख, यांतील बेचकळ्या या ठिकाणीं इसब होतें. व त्याच्या उलट शरीराची त्वचा खवले व कोंडा रुपानें निघून जाण्याचा रोग हातापायांच्या बाहेरील बाजू व मांडी, कोपर, कांख, गुडघा यांच्याबाहेरील बाजूस होतो. एखादा लहान मोठा मज्जातंतू ज्या मार्गानें जातो त्याच्या बरोबर वरील त्वचेवर जर उतल्याचे मौक्तिकबिंदूप्रमाणें फोड येतात व हा प्रकार मज्जाविकृतिजन्य इतर त्वचारोगांचाहि आहे. मुखावर दिसणारे त्वचारोग, लाली, ल्युपस, मुरुमाच्या व इतर प्रकारच्या पुटकुळ्या, इसब, फिरंगोपदंशसंबंधी व कष्टसाध्य ग्रंथिव्रण हे होय. या शेवटच्यापैकीं खोल चरत जाणारा व्रण नाक, डोळा या ठिकाणीं होतो. मस्तकावर ओले फोड येतात ते इसब, लुत भरणें, आगपैण, यामुळें व कोरडे खवले, खपल्या व कोंडा जाणारे मस्तकाचे रोग— कोंडा जाणारा रोग, गजकर्ण, फिरंगोपदंश, जननेंद्रियावर दिसणारे रोग— खरूज, गजकर्ण, जर उठण्याचे फोड, उपदंशाचे चट्टे हे रोग. हातापायांवर व बोटांच्या बेचकळ्यांत, मनगटाच्या व घोट्याच्या बाजूस व ढुंगणाच्या बेचकळ्यांत व बाजूस खरुज येते. राकेल तेलवाले, हलवाई, डांबर, मीठ, चुन्याच्याकळ्या, गंधक यांची स्वतः देवघेव करणारांनां तसेंच कातडीं कमावणारे, रंगारी, औषधें विकणारे, गंधी, भटारी, परीट, सोन्यारुप्याचा मुलामा करणारे, आचारी, पाणके यांनां विविक्षित व्यवसाय व धंद्यामुळें विविक्षित स्थळीं विविक्षित प्रकारचे त्वचारोग होतात.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .