प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या  
           
थर व पारकर— मुंबई इलाख्यांतील सिंध प्रांतात पूर्वेकडील एक जिल्हा. १९०५-०६ सालीं क्षेत्रफळ १३,९४१ चौ. मैल. उत्तरेस खैरपूर संस्थान, पूर्वेस जेसलमीर, मलानी व जोधपूर संस्थानें व कच्छचें रण, दक्षिणेस कच्छचें रण व पश्चिमेस हैद्राबाद जिल्हा.

ह्या जिल्ह्याचे दोन विभाग केले आहेत. पैकीं एकास 'पाट' म्हणतात. ह्या विभागांत नारा या पाट पोटविभागाचा समावेश होतो. दुसर्‍या भागास 'थर' म्हणतात. थर म्हणजे 'ओसाड प्रदेश'. पाटाचा प्रदेश समुद्रसपाटीपासून ५० ते १०० फूट उंच असून बहुतेक सपाट आहे. पूर्व नार कालवा झाल्यापासून 'पाटा' विभागास आतां बरेंच पाणी मिळतें. थरच्या ओसाड वाळूच्या प्रदेशांतून पूर्वी सिंधूचें पाणी बरेंच खेळत असावें असा अंदाज आहे. थर विभागांत वाळूच्या टेंकड्या आहेत. पारकर विभागांत खडकमय टेंकड्या आहेत. पारकरचा त्रिकोणाकृति विभाग आग्नेयीकडील बाजूनें थोडा कच्छच्या रणांत शिरला आहे. नगर पारकरजवळील कारुंजहार टेंकड्या बर्‍याच उंच आहेत.

नाराखोर्‍यांत, बाभूळ, लिम्ब, पिंपळ, सिरिह, लई, किरीर हे वृक्ष आहेत. या जिल्ह्यांत डुकर, फारा (हरणाच्या जातीचें डुकर), लांडगा, कोल्हा व ससा वगैरे प्राणी आहेत.

ह्या जिल्ह्याचा पूर्वेतिहास उपलब्ध नाहीं. ओसाड भाग व पारकर हे कच्छच्या पोलिटिकल एजंटाच्या हाताखालीं होते. १२२६ सालीं उज्जनकडून  ह्या भागांत परमार सोद लोक आले व येथील राजांस हाकलवून देऊन आपण जागा बळकाविली. १६ व्या शतकारंभीं त्यांनीं सुम्राज (सुमेरा) जवळून हा प्रांत विकत घेतला असें म्हणतात. १७५० सालीं हा विभाग सोदजवळून कल्होळांनी घेतला. कल्होळानंतर हात्तालपूरच्या हातीं गेला. ह्यांनीं ह्या प्रदेशांत बरेच किल्ले वगैरे उठविले.

मिथी व इस्लामकोट प्रदेशांतून तालपूर राजे २/५ उत्पन्न सार्‍यादाखल घेत असत असें म्हणतात. १८३० व १८३५ त ह्या भागांत बंडाळी माजली तेव्हां शांतता राखण्याकरितां मिरानीं मोठें सैन्य पाठविलें व त्यांस चांगली शिक्षा केली. पुढें थर व पारकर जिल्ह्यांत एका डाकूनें मोठा धुमाकुल माजविला. कच्छ व इतर जिल्ह्यांच्या लोकांस त्यानें फार त्रास दिला. तेव्हां १८३२ सालीं इंग्रज सरकार मध्यें पडून ती बंडाळी मोडली. हा जिल्हा कच्छमध्ये मोडला जावा अशी येथील लोकांची फार इच्छा होती व ह्याच दृष्टीने १८४४ सालीं बल्यारी, दिप्लो, मिथी, इस्लामकोट, सिंगाल, विरावह, पित्तापूर, भोडेसर व पारकर हे भाग संस्थानास देण्यांत आले. उमरकोट, गट्र व इतर प्रदेश हे मीरपूर पोटविभागांत आले. ह्यापुढें लोकांच्या हातून शस्त्रें काढून घेण्यांत आली. ह्यामुळें स. १८४६ मध्ये बंड झालें. पण लवकरच शांतता करण्यांत आली. सोड रजपुतांच्या कांही मागण्या व हक्क सरकारनें कबूल केले. १८५६ सालीं हा जिल्हा सिंध प्रांतांत घेण्यांत आला; तदनंतर १८५९ सालीं एक बंड झालें तेव्हां कर्नल इव्हान्स साहेबानें नगर पारकर गांव घेतलें व राण्यास कैद केलें. सन १६६८ मध्यें राण्यास व त्याच्या प्रधानास अनुक्रमें १४ व १० वर्षाची हद्दपारी मिळाली. तेव्हापासून ह्या जिल्ह्यांत पूर्ण शांतता नांदत आहे.

जिल्ह्याच्या पारकर विभागांत कांहीं प्राचीन देवालयांचे अवशेष दिसतात. पैकी वीरवाहच्या वायव्येस एक जैन देवालय आहे व जवळच पुरातन पारीनगरच्या अवशेषखुणा दृग्गोचर होतात. हें शहर ४५६ सालीं बालमीरच्या जेसो परमारनें बांधले असें म्हणतात. १६ व्या शतकांत हें शहर नामशेष झालें असें म्हणतात.

अत्युच्च शिल्पकलाज्ञान व सुंदर नक्षीकामाची साक्ष पटविणारे येथें अजूनहि कांही ५/६ जुन्या जैन देवालयांचे अवशेष आहेत. क्षिप्रा शहराच्या दक्षिणेकडील दुसरें नामशेष झालेलें शहर गतकोट हें होय. मिरपूरखासनजीक कहूचा कांहीं अवशेष आहे. सिंधमधील सुम्न व सुम्मच्या कारकीर्दीत हें गांव फार भरभराटींत होतें. दिल्लीच्या अल्लाउद्दिनानें किंवा अरोरच्या दोलोर राजानें ह्या शहराचा नाश केला म्हणतात. इस्लामकोट, मिथि, नवकोट व सिगाल येथील किल्ले तालपूर राज्यांच्या कारकीर्दीत बांधले गेले असावेत. पण ते सध्यां पडक्या स्थितींत आहेत. अगदी मोडकळीस आलेंलें पुरातन ब्राह्मणाबाद शहर हें १८ व्या शतकांत भूकंपाच्या धक्क्यामुळें नाश पावलें. त्या कालचे अजूनहि कांहीं अवशेष आहेत. लो. सं.(१९०६) ३८९७१४. पंजाब व राजपुतान्यांतून शेतकी करण्याच्या उद्देशानें बरेच लोक येऊन वसाहत करुं लागल्यानें लो. सं. वाढली. भाषा-सिंधी व कच्छी; पैकी शेंकडा ६३ लोक सिंधी बोलतात. मुसुलमानांत बलुची लोकांचाच भरणा अधिक आहे. इतर जाती ढोर, कोळी, भिल्ल; उदेज लोक येथील रहिवाशी होत हे लोक शरीरानें पिळदार व शेतकीचा धंदा करणारे असतात. इकडे खरीप, रब्बी व अढाव असे तीन हंगाम असतात. नारा विभागांतील व थर विभागांतील पेरणीची वेळ मात्र एकच नसते.   
 
जमीन अस्सल काळीहि नाहीं व रेताडहि नाहीं, मध्यम आहे. जामराव कालव्यामुळें अधिक अधिक जमीन दरवर्षी लागवडीस आणली जात आहे. तांदुळ, ज्वारी, बाजरी, गहूं, कापूस हीं मुख्य पिकें होत. लागवडीस आणलेली एकंदर जमीन ३२९९ चौ. मै. पडीत २०३९ चौ. मै. व जंगल ६८ चौ. मै. येथील गाढवांचा रंग पांढरा शुभ्र असतो. जामराव कालव्यामुळें ह्या जिल्ह्यांतील ३६५ एकर जमीन भिजते. हा कालवा १८९९-१९०० सालीं तयार झाला. कांहीं जंगल राखून ठेवलेलें आहे. तें डेप्युटी कमिशनरांच्या ताब्यांत आहे; येथील पाण्यापासून मीठ काढण्याची मनाई आहे. दिप्लो व मिथी तालुक्यांत खार्‍या पाण्याचे मोठमोठे तलाव आहेत तेथून मात्र मीठ काढतात.

कारखाने:— गरम कांबळी व पिशव्या, उंटावरील खोगिरें व जाडेंभरडें सुती कापड. येथील बायका रेशमाचें विणकाम फार छान करतात. मीरपूरखास येथें व शादीपली येथें कापसाचे जीन व प्रेस आहेत. शादिपली येथें दोन तांदूळ काडण्याच्या गिरण्या आहेत. दिलियार व सरन येथें मीठ तयार करतात.

येथून बाहेर पाठविला जाणारा माल:— धान्य, लोंकर, तूप, उंट, चामडीं, मासे, मीठ इत्यादि. हा माल गुजराथ, पालनपूर, जोधपूरकडे पाठविला जातो. आंत येणारा माल:— कापूस, खनिजधातू, सुकी फळफळावळ, रंग, रेशीम, तंबाखू, ऊंस वगैरे.    

अक्रीजवळील पिठारो गांवी दरवर्षी सप्टेंबर महिन्यांत जत्रा भरते (येथे पिठोरा देव आहे.) लहान लहान जत्रा इतर ठिकाणीं भरतात. ह्या जिल्ह्यांत एकदंर ११ तालुके आहेत. त्यांची नावें १ चाको, २ दिप्लो; ३ खिप्री, ४ मिरपूरखास, ५ मिथी, ६ नगर, ७ जमेसाबाद, ८ सनघर, ९ अमरकोट, १० पिठोरो, ११ सिन्झोरो.    

या जिल्ह्याचे दोन विभाग करुन प्रत्येकावर एक डेप्युटि कलेक्टर नेमला आहे; व जिल्ह्याचा अधिकारी डेप्युटी कमिशनर आहे. फौजदारी मोकदम्मे चालविण्याकरितां नाराविभागांत मुखतियारकारांची नेमणूक आहे. उमरकोट, मिथी व मिरपूरखास येथें म्युनिसिपालिट्या आहेत. शिक्षणाच्या बाबतींत हा जिल्हा फारच मागासलेला आहे. येथें ७ रुग्णालयें व १६४ शाळा आहेत.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .