प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या 
               
दंतवैद्यक— दंतवैद्यक हे हल्ली निराळे व स्वतंत्र शास्त्र मानण्यांत येत असून त्याचा उद्देश मुख व त्यांतील दांत वगैरेंच्या रचनेसबंधी सोपपत्तिक आणि व्यावहारिक अभ्यास व त्यांचे नाना प्रकारचे रोग बरें करणें आणि किडके दांत भरणें अगर ते काढूण टाकून नवे दांत अगर त्यांची कवळी बनवून ती बसविणें हा होय. ही विद्या अगदीं नवीन आहे असें नाहीं. ख्रिस्ती शतकापूर्वी ५०० वर्षे हिरोडोटस याच्या ग्रंथात हा स्वतंत्र धंदा असल्याचा उल्लेख सांपडतो व त्याच्या अगोदर मिसर देशांत व हिंदुस्थानांत पडलेल्या दांताऐवजी लांकूड किंवा हस्तिदंताचे दांत बसवीत अशी माहिती उपलब्ध आहे. इ. स. १३१ या वर्षी गॅलेन या वैद्यास दांत म्हणजे हाडाशी साम्य असलेली रचना असून दांत गर्भावस्थेंत बीजरुपाने असतात आणि त्यांच्या वरच्या मज्जातंतूचा सबंध नेत्राच्या मज्जातंतूशी आहे ही माहिती होतीसें दिसते. त्यानंतर ऐका प्राण्याचा दांत काढून तो दुसर्‍या प्राण्याच्या जबड्यांत कलमाप्रमाणें बसवण्याची कला जॉन हंटरने (१७२८-१७९३) प्रचारांत आणली. यानंतर या शास्त्राची प्रगति शास्त्रीय रीतीने करण्याचा प्रयत्‍न फ्रेंच वैद्यांनी करुन त्यांपैकीं फॉर्चार्ड यानें हा धंदा व हे शास्त्र स्वतःच्या पायावर उभे राहील अशी योजना व प्रयत्‍न करुन ग्रंथ लिहिले व म्हणून यास या विद्येच्या कलेच्या पितृस्थानी मानतात. फ्रान्स देशांत यापूर्वी कोणीहि अडाणी मनुष्य हा धंदा कशाहि वाईट तर्‍हेने करुन पैसा मिळवी; हें फॉचॉर्डने बंद करवून जे उमेदवार जुन्या अनुभविक दंतवैद्याजवळ ही कला रीतसर शिकले असतील त्यांची परीक्षा एका अधिकृत मंडळानें घेऊन त्यांतील यशस्वी उमेदवारांनी या धंद्यात पडावे असा प्रघात पाडला व तो लोकांना आवडला. हाड किंवा हस्तिदंताच्या ऐवजी पोर्सीलेन या पदार्थाचा उपयोग कृत्रिम दात बनविण्याच्या कामी करण्याचा प्रघात यानें पाडला. पोर्सीलेनचे दांत करण्याची कला प्रथम फ्रान्स व जर्मनीत गुप्‍त राखण्यांत आली होती; नंतर ती कला इंग्लंडांतहि एकाने नेली व लवकरच त्याचें गौप्य फुटून त्याची माहिती विद्यार्थ्यांना रीतसरपणें शिकवूं लागले. जॉसेफ फॉक्स व टॉमस बेल या इंग्रज दंतवैद्यानी व इतरांनी १९ व्या शतकांत अनेक शोध लाविले; व या धंद्यांतील अडाणी लोकांची हकालपट्टी केली. तेव्हांपासून या धंद्याचे औषधीय व दंतशास्त्र वैद्यकासंबंधी अभ्यास करणारे वैद्य आणि केवळ हुन्नरविषयक म्हणजे ज्यांत हस्तकौशल्य बरेंच लागते असे व केवळ कृत्रिम दांत बनवण्याची कला शिकलेले हुन्नरी दंतवैद्य असे दोन वर्ग प्रचारांस आले. फ्रान्समध्ये मोठी क्रांति झाली त्या धामधुमीच्या काळांत पोट भरण्यासाठी इंग्लडांतून व विशेषतः फ्रान्समधून दोन्ही प्रकारचे पुष्कळ कुशल दंतवैद्य अमेरिकेंत जाऊन स्थाईक झाले, व तेथें त्यांना अनुकूल क्षेत्र सांपडून त्यांजपासून खुद्द अमेरिकन लोकांनी ही कला उमेदवारी करुन उचलली. जुन्या डॉक्टरांजवळ आगोदर कांही वर्षे उमेदवारी करुन नंतर धंदा करण्याचा परवाना मिळविणें ही चाल हल्लीच्या परीक्षेऐवजी इतर डॉक्टरवर्गात पूर्वी होती व ती पुढें मोडली आणि विद्यापीठें, कॉलेजे व परीक्षा तिकडे अस्तित्वांत आल्या. त्याचा परिणाम असा झाला कीं, दंतवैद्यक शिकण्यास उमेदवारी करण्याची चाल मोडून तद्विषयक विद्यापीठें, शाळा व परीक्षा हाच क्रम सोईस्कर वाटूं लागला व तो हल्ली तेथें चालू आहे. हिंदुस्थानांत मात्र इंग्रज व अमेरिकन दंतवैद्यांवळज उमेदवारी अगर चाकरी करुन ह्या  धंद्यास प्रथम मुंबईत पारशी लोकांनी आरंभ केला व फी घेऊन ते व इतर जातीचे दंतवैद्य आपल्या मर्जीनुरुप इतरांस ही काला शिकवितात. हिंदुस्थानांत दंतवैद्यक शाळा अगर कॉलेज अद्याप असावें तसें एकहि नाहीं व म्हणून तत्संबंधी परिक्षा व पदव्याहि नाहींत ही उणीव होय, पाश्चात्य देशांत या दंतवैद्यक शाळांतील प्रवेशपात्रतेचा व अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारत जाऊन हल्लीं तो इतर वैद्यकशाळेच्या तोडीचा केला आहे; व सर्व सुधारलेल्या देशांत या शाळा व कॉलेजांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दंतवैद्यकसंबंधी वरील सुधारलेल्या यूरोपियन व अमेरिकन देशांत वजनदार व श्रमपूर्वक चालविलेलीं नियतकालिकें निघून त्यांच्या द्वारे शोध व अनुभव प्रगट होण्यास चालन मिळत आहे.

या वैद्यकास महत्व येण्यास अलीकडे एक महत्वाचें कारण झाले आहे. मुख व दात हे चवर्णास व पचनास अत्यावश्यक आहेत हें सर्वास ठाऊकच आहे; परंतु नवीन शोधाने असें सिद्ध झाले आहे कीं, या दांतातील व मुखांतील मज्जातंतूंचा संबंध दूरवर असल्यामुळें व मुख म्हणजे नानाविध रोगबीजें शरीरांत प्रवेश करण्याचे आद्य महाद्वारच होय म्हणून दांत व मुख हे दुष्ट जंतूंचे केवळ आगार होय. मज्जातंतूचा व इतर शारीरिक रोगांचा मूळांतच बींमोड करणें असल्यास हें शास्त्र जितकें अवगत असेल तितकी पुढील रोगांची अनर्थपरंपरा टळते. याविषयीं वरील सर्व देशांतील विद्वानांची एकवाक्यता झाल्यामुळें दांतांची सूक्ष्मदर्शनीय रचना, त्यांची गर्भावस्थेतील वाढ यांविषयी फार महत्वाचे शोध लागले आहेत. पादांगुष्ठवातरोग, अस्थिमार्दवरोग, तक्तपित्त, सिकताप्रमेह, खर पडणें, शिसें व पारदविषार व आणखी कांही रोगांमध्यें दांतांवर परिणाम होतो. कांही दूरस्थ रोगलक्षणें केवळ रोगट दांत काढून टाकल्याने थांबतात. सर्वांत मोठा शोध बर्लिन येथील मिलर याने लावला तो हा कीं, अन्नांतील पिठुळ पदार्थ कुजून त्या अम्लोत्पत्तीमुळें व जंतूच्या मध्यस्थामुळें दांतांतील चुना, फास्फेट वगैरे रचना विरघळून जाऊन दांतातील नाजुक मगज उघडा पडतो व तो कुजून जातो व दांतावर कीट जमतें व नंतर तो मगज निर्जीव होतो; परंतु या दुष्ट जंतुपूरित घाणामुळे हाडीव्रण, क्षय, धांवरे, मस्तिष्कावरणदाह, फुफ्फुसावरणपूयप्रवानदाह, गळवें, अर्धांग, वगैरे रोग होतात असें हल्ली मत प्रचलित आहे. या विद्येत शस्त्रदंतवैद्यक आणि हुन्नरीदंतवैद्यक अशा दोन शाखा मानतां येतात व यांपैकीं दुसर्‍या कलेमध्यें किडक्या दांतात चांदी, सोने अगर इतर पदार्थ भरुन त्यांतील भोकें बुजविणें या क्रियेचा समावेश होतो. ही कला १७ ते १९ व्या शतकांत प्रचारांत आली. जुन्या काळीं यासाठीं शिसे वापरीत. पुढें सोन्याचा वर्ख अगर पातळ पत्र दांतात कोंबून बसवीत व नंतर कानशीनें घासून झिर्लइ देत. जस्ताच्या पातळ पत्र्याचाहि उपयोग करीत. या कृती सदोष; म्हणजे पत्र्याच्या तुकड्यांत एकजीवतेचा अभाव असल्यामुळें भरलेले लुकण पडून जाई. म्हणून या पत्र्याचे तुकडे हस्तिदंत, शिसें वगैरेच्या हातोडीनें, कांटेरी दट्ट्याने ठोकून बसवल्यामुळें पत्र्यांतील एकजीवता वाढली व लुकण मजबूत बसूं लागलें. या हातोड्यांतहि स्प्रिंग, हवेचा दाब, विद्युच्चुंबन व दंतयंत्र यांचा उपयोग करु लागल्यामुळें या कलेस पूर्णता आली. दंतयंत्रातील तत्व सामत्याने भोक पाडणे हेंच आहे. दांतांतील किडक्या छिद्रस मोठें करुन तें लुकणाने भरण्याजोगें करणे हें त्याचे मुख्य कार्य आहे; तथापि भरलेले लुकण कानसणें, घासणें व त्यास झिलई देणें, दांतावरील कीट घांसून त्यांस शुभ्र तकाकी आणणे, वांकडे दांत घासून व कानसून इतर दांताबरोबर करणें या कामीं त्याचा उपयोग होतो. याशिवाय जबड्याच्या हाडास अगर डोक्याच्या कवटीस लहान मोठ्या आकाराचें छिद्र पाडून तेथील रोग काढून टाकणें या कामी त्याचा उपयोग होतो. रबराचा तुकडा व सोन्याचा पातळ पत्रा बेमालूम ठोकून नाजुक रीतीनें बसवल्यामुळें मुखांतील दुष्ट जंतुमिश्र लालारस दांतांच्या छिद्रांत व फटींत शिरुन वरील रोग होत नाहीं; तथापि हें सोन्याच्या लुकणाचें काम एकंदरीत अवघड व दिसण्यांत कसेसेच असल्यामुळें गटापर्चा सिमेंट, झिंकआक्साइड, झिंकक्लोराइड व फास्फारिक अ‍ॅसिड यांचा रांधा करुन त्यांचे लुकण बसवितात; अगर अगोदर प्लाटिनमचा अति पातळ पत्रा छिद्रांत पोकळ बसवून त्याचा सांचा करतात. त्यांत पोर्सीलेनचे चूर्ण व अल्कोहोल यांचा रांधा भरतात; व ते वाळल्यावर बाहेंरील सांचा काढून घेऊन तें लुकण छिद्रांत बसवितात व त्यास झिलई देतात. दांताचा मगज उघडा पडल्यास त्यावर पातळ पत्र्याचे टोपण बंदोबस्ताने बसवतात. सोमलामध्यें (आर्सेनियस अ‍ॅसिड) हा मगज निर्जीव करण्याचा गुण आहे. पण ते झोंबते म्हणून त्यांत मार्फिया वगैरे पदार्थ घालून ते तो मगज निरुद्रवी करण्याच्या कामी लावतात. तो क्रमहि हल्ली मागें पडून कोकेननें मगज बधिर करुन तो काढतात व त्यामुळे दांत पोखरतांना इजा व वेदना होत नाहींत. हा मगज मात्र पुरा काढला गेला पाहिजे. म्हणजे तो दांत पुष्कळ दिवस टिकतो व इतर दांतांस आधारभूत होतो. हा मगज निर्जीव झाल्यावर दांत काळवंडतो; पण हे क्यालशियम हैपोक्लोराइड व आसेटिक अ‍ॅसिड त्यांत थोडे भरण्यानें बंद झाले आहे. हे कार्य करणारी दुसरीहि औषधें थोडी आहेत.

वांकड्या तिकड्या अगर किडक्या दांतामुळें खोकला, पडसे, अजीर्ण, रुक्षता हे रोग अंगी जडतात परंतु रोगट दांत उपटणे ही साधी कलाहि परवापर्यंत दंतवैद्यास चांगलीशी साध्य नव्हती; व म्हणून दांत उपटताना बरीच दांडगाई व आरडाओरडा होई, परंतु आधुनिक पद्धतीचे व दंतरचनेबरहुकूम दांत उपटण्याचे वेगवेगळे चिमटे व साधने तयार केल्यामुळें हे अगदी हुकमी, हिशेबी व बिनचुक शास्त्र व कला होऊन बसली आहे. प्रथम दांत बधिर करण्यासाठी नायट्रस आक्साइडचा उपयोग करीत. क्लोरोफार्म व ईथर या गुंगी आणणार्‍या औषधांचा उपयोग या कामी क्वचित करतात. कारण कोकेन व तत्सम औषधें हिरडींत टोंचून दांतास बधिरता आणण्याच्या कामी उपयोग होऊ लागल्यापासून ही मोठीं गुंगी आणणारी औषधें मागे पडली. परंतु हीं औषधें जास्त टोंचली तर हृदयावर परिणाम होतो व टोचलेला भाग सडतो. पण योग्य काळजी घेतल्यास असे बहुतकरुन घडत नाहीं. कारण त्याचें टोचण्याचें प्रमाण थोडें असते.

कृत्रिम दंतपंक्ति करणे— हलणारे दांत अगर एखादा लांकडी शोभेचा कृत्रिम दांत शेजारच्या मजबूत दांतास तारेने बांधणे ही कला पूर्वी अवगत होती व पत्र ठोकून तयार केलेल्या पट्यावर कवळी बसविण्याची कला प्रचारांत येईपर्यंत हीच पद्धत चालू होती. पुढें हस्तिदंत अगर इतर प्राण्यांचा दात कुजलेला दांत काढून त्यच्या मूळांत बारीक खुंति घुसवून बसवूं लागले. यानंतर सबंध कवळी बसवणें झाल्यास हिपोपोटेमसच्या हाडामध्यें कृत्रिम पोर्सेलेनच्या दांताची सबंध कवळी बसवण्याची चेंगट व त्रासदायक पद्धति कांही दिवस चालू राहिली. स्प्रिंगच्या तारांच्या योगानें कवळी तोंडात ठेवीत. ती फार त्रासदायक होई. पुढें अशी युक्ति निघाली कीं प्रथम मेणानें दांतांचा व हिरड्यांचा सांचा घेऊन त्यापासून प्लास्टर ऑफ पारिसचा सांचा करावा. व त्यावरुन पितळी अगर कथली सांचा करुन नरमादीप्रमाणें पूर्वीच्या साच्यांत बसणारा शिशाचा सांचा करावा व या दोहोंच्या मध्यें सोन्यचा अगर चांदीचा पत्रा ठोकून त्याचा सांचा शेवटी तयार करुन दांताची कवळी बसवावी. स्प्रिंगशिवाय हवेच्या दाबानें ती तोंडात राहते. पुढें पोर्सेलेनचे कृत्रिम दांत सोन्याच्या पत्र्यांत ठोकून त्याच्या खाली व वर डांक लावून मजबूत बसवतात. अशा रीतीने अर्धी अगर सबंध कवळी अगर सुटा एक किंवा दोन दांतहि तयार करतात व हिरड्यांच्या स्वाभाविक गुलाबी रंगाशी जुळेल अशा रंगाच्या टोपणावर ते बसवतात. यांत दोष हा आहे कीं या दांतांच्या फटींत अन्नकण व लाळ राहून कुजते. यास उपाय व सुधारणा म्हणून प्लाटिनम व सोने यांचा उपयोग करुन या फटी बुजवतात व शिवाय पोर्सेलेनच्या भुकटीचा लगदा करुन त्यावर दांतांचा व हिरड्यांचा ठसा घेऊन तो चांगला भाजून त्यास हिरड्यांचा रंग देतात. ह्या कवळींत मात्र फटी रहाण्याचा दोष नसतो. यास आरंभ प्रथम फ्रान्समध्यें झाला. यानंतर १८५७ सालीं इंग्लंडमध्यें व्हल्कानाईट म्हणजे रबरापासून केलेल्या पट्ट्यांचा उपयोग दांत बसवण्याकडे होऊन त्याचे पेटंट घेतले गेलें. यांत साधेपणा व स्वस्ताई हे गुण आहेत. कारण निवळ सोने, चांदी व प्लाटिनमचे पत्रे महाग पडतात. या पट्ट्यांचा धातूंसहहि उपयोग करतात. व्हल्कनाइटचा उपयोग फुटलेल्या दांतास आधार अगर टाळूंतील भोकें बंद करण्यासाठी केला जात असतो. व्हल्कनाईट प्रचारांत आल्यापासून सोने व चांदी यांच्या पत्र्यांच्या आधारावर बसवलेल्या कवळ्या मागें पडत चालल्या. परंतु अलीकडे पूल बांधणीच्या रचनेप्रमाणें कवळ्या तयार करण्याची कला प्रचारांत आल्यामुळें दंतवैद्यांस हुन्नरकलेंचे ज्ञान व हस्तकौशल्याची आवश्यकता व्हल्कनाईटच्या कामापेक्षा जास्त वाटूं लागली. पोर्सेलेनचा दांत सोने अगर प्लॅटिनमच्या टांचण्यांच्या योगाने दांत कोरुन तेथें लुकणानें बसवितात. दुसर्‍या प्रकारांत कृत्रिम दांत व कृत्रिम हिरडी यांमधील फटीवर धातूचें वेष्टण दिल्याने मजबूतपणा येऊन फटींत अन्न कुजण्याचे बंद होते. दोन्ही बाजूंस दोन कृत्रिम अशा घट्ट बसविलेल्या दांतांच्या पकडीमध्यें जरुर लागतील तितकी कृत्रिम दातांची पंक्ति डाक लावून अगर लुकणाने बसवितात. पूल बांधणीच्या रचनेबरहुकुम कवळ्या घालत्या काढत्या अगर पक्क्या बसविलेल्या अशा दोन तर्‍हेच्या असतात. घालती काढती कवळी धुवून पुसून स्वच्छ ठेवितां येते हा तिच्यात विशेष फायदा आहे. अनुकूल दंतरचना असल्यास ह्या पूलबांधणीच्या दंतरचनेने कृत्रिम कवळी फारच सुंदर व बेमालुम तयार होते. ही कला वाढती आहे. ग्रेटब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी वगैरे सर्व देशांत दंतवैद्यकीय पदवीधरांची संख्या वाढती आहे. इतर डॉक्टरांप्रमाणें त्यांच्या धंद्याची व शैक्षणिक कसोटी तेथें उच्च दर्जाची ठेविली आहे. यामुळें वाकबगार व शास्त्रशुद्ध असेच दंतवैद्य बहुधां तेथें आढळतात. त्यांची सर्वात मोठी संख्या अमेरिकेंत आहे. १९१० साली सर्व संयुक्त संस्थानांत मिळून सत्तावीस हजार दंतवैद्य होते. तसेंच या व इतर सुधारलेल्या देशांत दंतवैद्यक शिकविण्याच्या पाठशाळांची संख्या वाढती आहे. तथापि हिंदुस्थानांत स्वतंत्र दंतविषयक पाठशाळा एकहि नसावी हें मोठे आश्चर्य व दुर्भाग्य होय.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .