प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या
                      
दादाभाई, नवरोजी (१८२५-१९१७)— हा प्रोफेसर, फर्मचा मॅनेजर, बडोद्याचा दिवाण, ब्रिटिश पार्लमेंटचा सभासद, व हिंदुस्थानचा राजकीय पुढारी पारशी धर्माच्या पुरोहित घराण्यांत मुंबईस १८२५ सप्टेंबर ४ रोजी जन्मला. त्याच्या वयाच्या चवथ्या वर्षीच त्याचा बाप वारला, तथापि त्याच्या आईने त्याला त्या काळी मुंबईत शक्य तितके उच्च शिक्षण एल्फिन्स्टन इंस्टिट्यूटमध्यें मिळण्याची व्यवस्था केली. उत्तम विद्यार्थी म्हणून दादाभाईनी पुष्कळ बक्षिसे मिळविली. त्यांची बुद्धिमत्ता, कर्तृत्व व विद्‍वत्ता यांचे त्या वेळचे मुंबईचे चीफ जस्टिस सर एरस्किन पेरी यानां इतके कौतुक वाटले कीं, दादाभाईनीं बॅरिस्टर व्हावे म्हणून विलायतेचा निम्मा खर्च त्यानी केला. पण नुकत्याच घडलेल्या दोनतीन उदाहरणांवरुन दादाभाई विलायतेत गेल्यास ख्रिस्ती होण्याची भीती त्यांच्या जातभाईनां फार वाटत असल्यामुळे बाकी निम्या रकमेची मदत करण्यास कोणी तयार होईना. त्यामुळे एलफिन्स्टन इंस्टिट्यूटमध्येंच प्रथम शिक्षकाची व १८५० साली प्रोफेसरची नोकरी दादाभाईनी पत्करली. स. १८५६ मध्ये तेथे राजीनामा देऊन लंडनमध्ये कामा अँड कंपनीत मॅनेजरची नोकरी धरली. तत्पूर्वी मुंबईत असतानांच दादाभाईंनीं स्टुडंट्स लिटरटी अ‍ॅड सायन्टिफिक सोसायटी व तिच्या गुजराथी व मराठी ज्ञानप्रसारक मंडळी अशा शाखा काढल्या. मुंबईस मराठी व पारशी मुलींच्या शाळा प्रथमतः यानींच सुरु केल्या; तसेंच बाँबे असोसिएशन, इराणी फंड, पारशी जिमखाना, वुइडो मॅरेज असोसिएशन, फ्रामजी इंस्टिट्यूट, व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्यूझियम या संस्था स्थापण्यांतहि त्यांचे प्रत्यक्ष सहाय्य होते. शिवाय त्यानी १८५१ साली 'रास्ता गोफ्तार' (खरे सांगणारा) नांवाचे गुजराथी पत्र काढले होते.

इंग्लंडमध्येंहि दादाभाईनी गेल्याबरोबर राजकीय कामास सुरवात केली. प्रथम आय. सी. एस्. परीक्षा इंग्लंड व हिंदुस्थान दोन्ही देशांत एकदम व्हावी अशाबद्दल खटपट केली. तिला अखेर यश येऊन १८९३ सालीं ब्रिटिश पार्लमेंटने तसा ठराव पास केला (त्याची अम्मलबजावणी मात्र लांबली). दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश लोकांना हिंदुस्थानविषयक माहिती देऊन त्यांची सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशाने लंडन इंडियन सोसायटी स्थापन केली, तीच पुढे विस्तृत करुन ईस्ट इंडिया असोसिएशन बनविली, व तिच्याकरितां गायकवाड, होळकर, शिंदे, कच्छचे राव वगैरे संस्थानिकांकडून देणग्या जमविल्या, आणि संस्थेतर्फे हिंदुस्थानच्या प्रश्नासंबंधी निबंध इंग्रज व हिंदी गृहस्थांकडून वाचविले व स्वतः इंग्लंडभर व्याख्याने दिली. १८६२ सालीं दादाभाईनी कामा कंपनीची नोकरी सोडून स्वतःची कंपनी काढली, पण ती इ. स. १८६६ मध्यें बुडाली. तेव्हां सावरकरांची व्यवस्था त्यांच्या सहानुभूतीने लावून दादाभाई १८६९ सालीं मुंबईला परत आले. त्यावेळी सर पी. एम्. मेथा यांच्या पुरस्कर्तृत्वाने त्यानां एक मानपत्र व थैली देऊन मोठा सन्मान करण्यांत आला. त्यानंतर लवकरच दादाभाई फासेट कमिटीपुढे साक्ष देण्याकरिता इंग्लंडात गेले व त्यांत त्यांनी हिंदुस्थानचे दारिद्र्य व त्यामानाने करांचा असह्य बोजा असल्याचे सप्रमाण सिद्ध करण्याचा प्रयत्‍न केला. हिंदुस्थानांत दरमाणसी उत्पन्न २० रु. च आहे ह्या दादाभाईंच्या विधानामुळे पुष्कळ सरकारी अधिकारी रागावले व त्याबद्दल वाद माजविला. त्यामुळें १८७३ सालीं 'हिंदुस्थानचे दारिद्र्य' नांवाचे स्वतंत्र पुस्तक दादाभाईंनी प्रसिद्ध केले. हिंदुस्थानसरकारनेहि पुष्कळ माहिती मिळविल्यानंतर २७ रु. उत्पन्न असल्याचे जाहीर केले.

स. १८७४ मध्यें दादाभाईंना बडोदासंस्थानचे दिवाण नेमण्यांत आले. तत्कालीन संस्थानिक मल्हारराव गायकवाड यांच्या कारकीर्दीत संस्थानी कारभारांत बराच घोटाळा माजला होता. पण सुमारे दोन वर्षांच्या अवधींत दादाभाईंनी राज्यकारभाराची नीट व्यवस्था लावून दिली. बर्‍याच बाबतींत रेसिडेंट फायर यांच्याशी मतभेद होऊन प्रकरण स्टेटसेक्रेटरीपर्यंत गेले. अखेर दादाभाईंची बाजूच योग्य ठरली. दोन वर्षे पुरी होण्यापूर्वीच दादाभाई राजीनामा देऊन पुन्हां मुंबईत परत आले. तेथें मुंबई म्युनिसिपालटीचे सभासद होऊन त्यांनी स. १८८५ पर्यंत काम केले. स. १८८५ मध्यें मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे यानी त्यानां मुंबई कायदेकौन्सिलचे सभासद नेमले. पण तेथें फार दिवस न राहतां इंग्लंडात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सभासद होण्याच्या इच्छेने ते इंग्लंडांत गेले. तेथें हॉलबोर्नतर्फे लिबरल पक्षाचा उमेदवार म्हणून दादाभाई उभे राहिले पण १९५० विरुद्ध ३६५१ मते मिळून ते पडले. स. १८८७ च्या इंडियन नॅशनल कांग्रेसचे त्यांना अध्यक्षस्थान देण्यांत आले. त्यानंतर पुन्हां इंग्लंडमध्यें जाऊन स. १८९२ मध्यें दादाभाई सेंट्रल फिन्सबरीतर्फे लिबरल पक्षातर्फे पार्लमेंटांत निवडून गेले. कॉमन्स सभेंत पहिले भाषण १८९२ सालच्या आगष्टच्या ९ तारखेस केले. पुढील वर्षी आय्. सी. एस्. परीक्षा हिंदुस्थानांतहि घेण्याचा ठराव दादाभाईंच्या खटपटीने पास झाला. पुन्हां १८९३ सालच्या लाहोरच्या कांग्रेसचे अध्यक्षस्थान दादाभाईंनाच देण्यांत आले. स. १८९५ च्या निवडणुकींत ते निवडून आले नाहीत. १८९६ सालीं नेमल्या गेलेल्या रॉयल कमिशनचे ते एक सभासद असून लॉर्ड वेल्बी अध्यक्ष होते. या वेल्बी-कमिशनपुढे दादाभाईनी आपली साक्षहि दिली. १८९७ पासून स. १९०६ पर्यंत दादाभाई इंग्लंडांतच राहिले. १८९८ साली नेमलेल्या इंडियन करन्सी कमिटीपुढे (फौलर कमिटी) त्यानी साक्ष दिली. १९०२ साली त्यानी आपले 'पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रुल इन इंडिया' हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांत मुख्य मुद्दा हिंदुस्थानांतून इंग्लंडात दरसाल तीन कोट पौंड बिनमोबदला जात असल्यामुळे हिंदुस्थानचे दारिद्र्य सारखे वाढत आहे हा होता. १९०५ सालीं आमस्टरडॅम (हालंड) येथें भरलेल्या सोशल डेमोक्रेटांच्या इंटर नॅशनल काँग्रेसला ते हिंदुस्थानचे प्रातीनीधि म्हणून हजर राहिले. तेथेंहि त्यांनी हिंदुस्थानांतील ब्रिटिश कारभारपद्धतीचा निषेध केला. १९०६ सालीं कलकत्त्यास भरलेल्या हिंदी राष्ट्रीय सभेचे त्यांना तिसर्‍यांदा अध्यक्ष निवडण्यांत आले. याच महत्त्वाच्या सभेंत दादाभाईंनी स्वराज्य (सेल्फ-गव्हर्नमेंट) हे राष्ट्रीय सभेंचे ध्येय म्हणून जाहिर करुन स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण अशी तीन स्वराज्यप्राप्‍तीची निश्चित साधने सांगितली. यानंतर वयोवृद्धत्वामुळे दादाभाई सार्वजनिक व्यवसाय सोडून घरी स्वस्थ बसले. स. १९१६ मध्यें मुंबई युनिव्हर्सिटीने त्यांना एलएल. डी. ची पदवी अर्पण केली. आयुष्याची शेवटची वर्षे शांततेने वेर्सोवा येथें घालवून दादाभाई स. १९१७ जून ३० रोजी परलोकवासी झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा १८९३ सालींच वारला होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुली व बरींच नातवंडे आहेत.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .